Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

क
कोकणप्रेमी
गुरुवार, 12/24/2015 - 09:45
🗣 146 प्रतिसाद
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातुनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मी एक इंग्रजी शिवचरित्र पण लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं लिहुन झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली... मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही मशीद बांधली असं सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की शिवाजी महाराजांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो, ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इना¬म करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी गणपतीवर आरती केली नाही. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चालू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन मशिदींचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी माझ्या इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुस्तकाच्या पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल. एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, त्या पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता..हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगत, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात, ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती, व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी उक्ती सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे.त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महाराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय ते दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर पुण्यात टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे.त्याच्याकडं गावक-यांनी काही कर माफ़ करण्याची विनंतीकेली, ती त्याने मान्य केलीय, ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो ही छापलाय हं! कमल गोखल्यांनी लिहिलेले जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय, तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या त्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं. त्यांचे जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन हे नाव ब-याच जणांनी ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्या हेन्री रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, त्याने महाराजांना ओळखलं होतं. तो त्या वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत! असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाच्या प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो.नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील तर, सुंदर नारायणाचं देऊळ आहे नाशिकमधे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे ही कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे असे वाटेल कोणाला, पण शिवाजीमहाराजांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं होतं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आहे, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाही वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही, ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी. तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो मला म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? तो म्हणे, औरंगाबाद म्हणून एक शहर आहे ना तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला आज लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी त्या शहराचे सरकारी नाव अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. असे जगात कुठे ही नाही. उदाहरण मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावानी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावानेही मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख! असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. १६५८ सालचं अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? १६५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला होता फ़त्तेखान हा सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाही वर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते, १० मार्च १६५७ पर्यंत, त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितली, एवढी ३ आहेत. १६५७ नंतर यांचं नख सुद्धा कुठे दिसत नाही. हे कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं १६५८ साली स्वराज्याला शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. १६५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा, मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळांत जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठली ही जात म्हणायची आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला हिंदू करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला पुन्हा हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल हा हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता शिवाजीमहाराजांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता.दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारत जेंव्हा स्वतंत्र झाला १९४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते. भारतीय नव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळप होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं,मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालानंतर हकीकत लिहिलेली अाहे आणि काय लिहिलय ? की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे. तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते. त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक.. दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते. नव्हतेच... आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरचा काही पगार जात नव्हता. त्यांच्याच पदरचा जाणार होता, तुम्हाला सांगायला माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे, लोकं तुम्हाला खोटं काहीतरी अलिकडं सांगत असतात म्हणून नाईलाजानं मला तुम्हाला हे खरं काय आहे ते सांगायला लागलं.... मला वाटतं गुरुजी थांबू का? (संभाजीराव भिडे गुरुजी) ५ मिनिटं बोलू?...बरं... मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ हटकून परत बांधलं,, हटकून का म्हटलं? हट्टी पणानं का बांधलं? त्यांनी हट्टीपणानं पाडलं म्हणुन यांनी हट्टीपणानं बांधलं तशा आणखी २ गोष्टी त्यांच्या आयुष्यात अहेत. एकतरराजव्यवहारकोष...म्हणजे मराठी भाषेत फ़ारसी शब्द फ़ार आले होते...आणि कशामुळं आले होते?आपणहून देवाण स्वाभाविक देवाण घेवाणीतनं आले नव्हते ...जबरदस्तीनं त्यांचं राज्य असल्यामुळं आले होते. ते काढण्याकरता त्यांनी राजव्यवहारकोष रचून घेतला.. त्यात असं म्हटलंच आहे की यवनांच्या भाषेमुळं मराठी भाषा दुषित झाली आहे, ती शुद्ध करण्याकरिता राजव्यवहारकोष रचलाय... असं त्याच्या प्रस्तावनेत सांगितलंयं...२ गोष्टीतलं साम्य बघा..जबरदस्तीनं देऊळ पाडलं...त्यांनी जबरदस्तीनं देऊनळ बांधलं...जबरदस्तीनं भाषेत शब्द शिरले, त्यांनी जबरदस्तीनं बाहेर काढले आणि अशीच तीसरी गोष्ट आहे नेतोजी पालकर...राहिला असता मुसलमान, काय बिघडत होतं? सगळं धर्म सारखे आहेत ना, लोकं म्हणतात, नाहियेत! पूर्ण वेगवेगळे आहेत! अजिबात सारखे नाहीत... खोटं बोलतात. कुठल्याच धर्माची माहिती नसलेले लोक असं बोलतात. सर्व धर्म पूर्णपणाने वेगवेगळे आहेत. आणि मी जेंव्हा हिंदू म्हणतो, तेंव्हा भराताच्या राज्यघटनेच्या २५ व्या कलमात हिंदु शब्दाची जी व्याख्या आहे, ती काय व्याख्या आहे? त्यात हिंदू आहेत, म्हणजे पारंपारिक हिंदू, ग्यानबा तुकाराम करणारे तुमच्या माझ्यासारखे, शीख आहेत...जैन आहेत...बौद्ध आहेत....हे सर्व लोक हिंदू या शब्दाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घातलेले आहेत. आणि तोच अर्थ मला कायम सुरुवातीपासून आत्ता पर्यंत अभिप्रेत आहे, दुसरा कुठला अर्थ माझ्या मनात नाही. एवढाच अर्थ मला येतो. तेंव्हा तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की राहिला असता नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार! तीन गोष्टी आहेत बघा! तुम्ही भाषा दुषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणुस दुषित केलात , मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दुषित केलंत, मी ते शुद्ध करणार...हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले, आपण सामान्य माणुस.... गुरुजी थांबतो. (समाप्त) श्रीराजाशिवछत्रपति-चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे व्याख्यान स्थळ : श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदीर, पुणे दिनांक: अधिक आषाढ वद्य नवमी शके १९३७, शिवशक ३४२ (१० जुलै २०१५)
वर्गीकरण
इतिहास
चर्चा

प्रतिक्रिया द्या
25342 वाचन

💬 प्रतिसाद (146)
उ
उगा काहितरीच गुरुवार, 12/24/2015 - 13:46 नवीन
लेख आवडला. मिपावर टाकल्याबद्दल धन्यवाद .
  • Log in or register to post comments
म
मितभाषी गुरुवार, 12/24/2015 - 13:54 नवीन
Buddhibhed chalu =))
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 12/24/2015 - 16:18 नवीन
छान व्याख्यानरूपी लेख! पण दोघांनी त्यातील हवाच काढली.
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले गुरुवार, 12/24/2015 - 17:46 नवीन
खूप उपयुक्त माहिती दिली आहे. इतकी वर्षे एकच व्यक्तिच्या चरित्राचा एवढा सखोल व्यासंग करणारे दुर्मिळ असतात. असे श्री. मेहंदळे यांच्या कामाची त्यांनी स्वत: दिलेली माहिती उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद. बऱ्याच गोष्टींचा भ्रमनिरास झाला .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
क
किसन शिंदे गुरुवार, 12/24/2015 - 17:26 नवीन
मेहंदळे सरांच्या कार्याबद्दल बॅट्या, मालोजीराव, वल्ली आदींकडून खूप ऎकले आहे त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल आदर आहेच पण वरील लेख वाचताना महारांजाविषयीचा गैरसमज दूर करणे कमी हिंदू/मुस्लिम या गोष्टींकडे अधोरेखित करणारा जास्त वाटला. बाकी मालोजीराव म्हणतात तसं महाराजांची जशास तसे वृत्ती पटतेय या सर्व प्रकारांकडे पाहताना.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे गुरुवार, 12/24/2015 - 17:51 नवीन
सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
र
राही Fri, 12/25/2015 - 13:55 नवीन
होय. किंचितसे तसेच वाटले. कदाचित या मर्यादित लेखाचा उद्देश तसाच असेल म्हणून भाषणातले तत्संबंधीचे उतारे दिले असतील. मेहेंदळ्यांनी अनेक अंगांनी महाराजांचे उत्कृष्ट चरित्र लिहिले आहे, अजून अपुरे असले तरी उपलब्ध चरित्रांमध्ये अधिक अचूक आणि विश्वसनीय आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 17:42 नवीन
नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार!
आता यामध्ये हट्टीपणाहा शब्द का वापरलायं तेच कळत नाही. नेताजीला यायचं होतं परत धर्मात तर त्याला घेतलं. आता यासाठी राजानेच पुढाकार घेतला म्हणून काय तो हट्ट आहे का? . . . अभ्यासू लोक सुद्धा अशा सोप्या गोष्टी कधीकधी फार क्लिष्ट करून काय पटवून देण्याचा यत्न करतात ते देवच जाणे.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/24/2015 - 17:44 नवीन
शिवाजी महाराजांची कर्नाटक स्वारी म्हणजे धाडसी स्वारी होती. मोजक्या सैनिकासोबत कुतुबशाहाला भेटायला गेले तेव्हा कुतूबशाहच घाबरून गेला होता.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 18:11 नवीन
पंचवीस हजाराची फौज दिक्षिणविजयार्थ निघाली होती. प्रत्यक्ष भेटताना सोबत मोजकेच सैन्य असतात,सुरूवातीस कुतूबशाह दचकला होता हे खरे आहे. . . . . आता याबाबत बा.पुरंदरे काय म्हणतात ते पहा विजापूरच्या आदिलशाहीतील मराठे सरदार फोडून कुतूबशाहीच्या चाकरीत आणावे,आणि बहलोलादि पठाण दुर्बळ करून सोडावेत;सर्व हिंदू-मुसलमान तमाम दखणी मिलोन चालोन घेऊन पठाणास बुडवावा; हा पहिला हेतु पार पडावा.स्वराज्याच्या शत्रूंचा पाडाव करणे आणि तुंगभद्रेपासून कावेरीपर्यंत स्वराज्याचा विस्तार करणे,हाच या दक्षिणियांच्या एकजूट आघाडीमागे महाराजांचा अंतिम हेतू होता. . . मुद्दामहून पुरंदरेंचे संदर्भ देतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
म
मितभाषी गुरुवार, 12/24/2015 - 17:51 नवीन
Hindu muslim durava vadhavnyacha prayatn halli janivpoorvak hotana disto navhe toch chhupa ajenda distoy.
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य गुरुवार, 12/24/2015 - 18:12 नवीन
छानच! एका दमात वाचून काढलं ... परत परत वाचावं असं!! पण हे सगळ आपलं सेक्युलर देशात कस्काय सांगायचं ब्वा ... खरे शिवाजीवाले कळवळतील न ...
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/24/2015 - 18:36 नवीन
पंचवीस हजाराची फौज बरोबर आहे. पण भेटीच्या वेळी दगाफटका होऊ शकला असता. बाबासाहेब पुरंदरेनी वागळेनी घेतलेल्या मुलाखतीत शिवाजी महाराजांनी केलेली चुक म्हणजे आग्रा भेट असे सांगितले. कारण कैदेत असताना शिवाजी महाराजांचे बरेवाईट होऊ शकले असते.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 12/24/2015 - 18:46 नवीन
त्यावेळी कुतूबशाहशी वैर नव्हते,स्वराज्याच्या मार्गात त्याचा अडथळा नव्हता. शिवाय भौगोलिकदृष्ट्या तो दूर होतो. तसेच मादण्णा हा कुतूबशाहचा कारभारी होता,त्यांच्याकरवी भेट आधीच ठरली होती त्यामुळे तिथे दगाफटका होण्याची शक्यता नव्हती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
य
याॅर्कर गुरुवार, 12/24/2015 - 18:37 नवीन
अशाप्रकारे धाग्याचेच सप्रमाण खंडन झाले आहे. त्या कोंकणप्रेमींना बोलवा कुणीतरी.काहीतरी लिहा म्हणावं.
  • Log in or register to post comments
प
पैसा गुरुवार, 12/24/2015 - 18:47 नवीन
या लेखासाठी धन्यवाद!
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/25/2015 - 00:48 नवीन
व्याख्यान नक्की कोणत्या हेतूने केले आहे ते कळले नाही. मुस्लिम राज्यकर्त्यांच्या जुलमी राजवटींविरुद्ध महाराजांचे युद्ध होते व त्याला धर्माचे अधिष्ठान होते हे बहुतेकांना माहित असतेच. महाराज सर्वधर्मसमभावी नसले तरी मुस्लिमद्वेष्टे नव्हते हे नक्की. त्यांची वागणूक काँग्रेस सरकारसारखी असणे शक्य नव्हते कारण तेव्हा राजकीय सीमा आणि आपले-परके याचे संदर्भ वेगळे होते. मुस्लिम राज्यकर्त्यांनी बाटवलेल्या नवमुस्लिम रयतेशी महाराजांचे वर्तन कसे होते याचा उल्लेख व्याख्यानात राहून गेला की मुद्दाम गाळला? एकदा स्वतःचे राज्य झाल्यावर राजांनी स्वराज्यातल्या मुस्लिमांविरुद्ध आघाडी उघडली नाही हेच त्या काळाच्या मानाने खूप आहे. उलट जाती-पातींमुळे ज्यांना परत धर्मात यायचे असेल अशा लोकांना येऊ न देण्यात हिंदू धर्मातील उच्चवर्णीय धर्ममार्तंड कारणीभूत आहेत. सहा सोनेरी पानेमध्ये सावरकर म्हणतात की अशा वृत्तीमुळे हिंदू धर्माचे तेव्हा फार नुकसान झाले. त्या धर्ममार्तंडांची टिनपाट पिलावळ आता घरवापसीच्या गप्पा करते पण आता सगळेच संदर्भ बदलले आहेत. बाटलेली जनता बाटूनही चार-पाचशे वर्षे झालीत आणि खरे परकीय तुर्क लोक उरलेच नाहीत तरीही आपले शत्रू अजूनही म्लेंच्छ लोक असल्याचे काही (ज्यांना धार्मिक ध्रुवीकरणातून फायदा आहे अशा) लोकांना वाटत असते आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी जर कोणा विद्वानाचा व्यासंग वापरला जात असेल तर धिक्कार आहे अशा क्षुद्रपणाचा.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे Fri, 12/25/2015 - 04:13 नवीन
पण इथे काहींना व्याख्यान आवडलेलं आहे,त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय घेण्यास वाव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
पैसा Fri, 12/25/2015 - 06:17 नवीन
व्याख्यानात सांगितले आहे त्याच्या विरोधात काही पुरावे असले तर द्या. उगं कांगावा कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे Fri, 12/25/2015 - 07:59 नवीन
●'म्लेच्छक्षयदीक्षित' आणि नेताजी पालकरची घरवापसी या साध्या सोप्या गोष्टी आहेत यातून महाराजांचा हट्टीपणा दिसतो म्हणल्यास कोणालाही हसू येईल.ते वर मी सांगितलं आहे. ●मंदिरही हट्टीपणानं बांधलं म्हणतात ते,दोन-तीन उदाहरणेही दिली त्यांनी.आता ते हट्टीपणानं बांधलं कि लोकआग्रहास्तव हे बघायला त्या काळात जावं लागेल. ●सैन्यामध्ये मुसलमान किती? एकूणच त्यावेळी पश्चिम महाराष्ट्रात मुसलमान लोकसंख्या किती होती?त्या अनुषंगाने त्यांची संख्या असणार,पण होते ना!कि नव्हतेच. ●दौलतखानला अनुभव होता म्हणून आरमारप्रमुख केलं म्हणतात ते, बरं ठीक आहे;पण केलं ना! ●मदारी मेहतर नव्हता? बरं ठीक आहे मग बाबासाहेब पुरंदरे चुकले असतील कदाचित. . . . स्पेसिफिक दोन-तीन उदाहरणांचे ढीगभर प्रेझेंटेशन करून एखाद्यी गोष्ट सिद्ध होत नाही. . . . महाराजांचा हिंदूत्ववादी हट्टीपणा सिद्ध करण्याचा एवढा हट्ट का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 12/25/2015 - 08:15 नवीन
ते खोडायचे असेल तर तुमच्या बाजूने पुरावे द्या ना. "असे असेल, तसे कसे असेल" असले इतिहासाचा अभ्यास करणार्‍याने म्हणून उपयोग नाही. द.मा.मिरासदारांची "शिवाजीचे हस्ताक्षर" कथा आठवतेय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
श
शैलेन्द्र Fri, 12/25/2015 - 11:32 नवीन
एकेका मुद्द्याचे उत्तर देतो,
  • संपूर्ण स्वराज्य निर्मितीचा अट्टाहास हाच मोठा हट्टीपणा होता, काही हट्ट सकारात्मक असतात
  • लोकांनी तरी का हट्ट केला, आदिलशाही किंवा पोर्तुगीज राज्य असताना का नाही केला
  • सैन्यात मुसलमान असल्याने काय होत, अधिकारावर किती होते, त्याचवेळी आदिलशाही कुतुबशाहीत किती प्रमाण होत
    • चुकले असतील बाबासाहेब, त्यात काय विशेष, त्यांना नवीन पुरावा नसेल मिळाला
जो राजा स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचा अट्टाहास करायचा त्याला (आजच्या व्याख्येने) सेक्युलर ठरवायचा हट्ट का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
प्रदीप साळुंखे Fri, 12/25/2015 - 12:32 नवीन
जो राजा स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचा अट्टाहास करायचा त्याला (आजच्या व्याख्येने) सेक्युलर ठरवायचा हट्ट का
सेक्युलर ठरवायचा हट्ट मुळीच नाही, मात्र कट्टरवादी ठरवायचा हट्ट चालू असेल,तर मात्र नाईलाज आहे. मी आधीच सांगितलयं,दोन-चार उदाहरणांचे अवडंबर माजवून काही साध्य होत नाही. मग, ●शिवाजी-याकुतबाबा ●शिवाजी-कुतूबशाह सौदार्य संबंध ●शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले. अजून बरीच उदाहरणे देता येतील, या दोन-तीन उदाहरणांवरून मी ते सेक्युलर होते असं म्हणू शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Fri, 12/25/2015 - 14:18 नवीन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
अ
अभ्या.. Fri, 12/25/2015 - 14:34 नवीन
कट्टरता अन सेक्युलर हे शब्दच इतके संदिग्ध आहेत की समजावून सांगू म्हणता सांगता येत नाहीत. मग परफेक्ट व्याख्या तर दूरच राहीली. ;) . (ह. घे. रे शैलेन्द्रा, तुला काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम येतोय हे कळलेय)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र
श
शैलेन्द्र Fri, 12/25/2015 - 14:43 नवीन
समजतं नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
S
sagarpdy Sun, 12/27/2015 - 10:36 नवीन
शहाजी हे नाव शहापीर या मुस्लिम पीरावरून ठेवले.
शहाजी म्हणजे शिवांजींचे वडील ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
अ
अभ्या.. Sun, 12/27/2015 - 10:39 नवीन
अवघड आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
S
sagarpdy Sun, 12/27/2015 - 10:54 नवीन
कारण हि माझी समजूत खरी असेल तर शिवाजी सेक्युलर असण्याचा या गोष्टीशी संबंध येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
म
मितभाषी Fri, 12/25/2015 - 17:57 नवीन
@@@ व्याख्यानात सांगितले आहे त्याच्या विरोधात काही पुरावे असले तर द्या. उगं कांगावा कशाला?@@@@@ @@@@@ धार्मिक ध्रुवीकरणातून फायदा लाटण्यासाठी आणि त्याला खतपाणी घालण्यासाठी जर कोणा विद्वानाचा व्यासंग वापरला जात असेल तर ते गैर आहे. यात कांगावा काय आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Fri, 12/25/2015 - 19:50 नवीन
पण इथे काहींना व्याख्यान आवडलेलं आहे,त्यामुळे त्यांच्या हेतूवर संशय घेण्यास वाव आहे.
कोणाला निव्वळ मुद्दे मांडण्याची पद्धत आवडू शकते. हेतूंवर संशय वगैरे फारच जास्त झाले. बरे, धाग्याकर्त्याने फक्त व्याख्यान टाईप करून इथे टाकले आहे. त्याचे स्वतःचे मत काहीही दिलेले नाही. तरी त्याला हिंदुत्ववादी वगैरे लेबले कशासाठी लावली जात आहेत? का ते व्याखान देणारे मेहंदळे सर आणि ते ऐकणारे सगळ्यांनाच हे लेबल चिकटवायचे आहे? मेहंदळे सरांनी तरी फक्त ऐतिहासिक तथ्य मांडली आहेत. त्याच्या विरोधात काही लिखित पुरावे असतील तर जरूर द्या. ते न करता "हेतूंवर संशय" वगैरे बोलणार्‍या आणि विनाकारण आरडाओरडा करताना दिसलेल्या माणसाचाच जास्त संशय येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
प
प्रदीप साळुंखे Sat, 12/26/2015 - 04:50 नवीन
समजा उद्या एखादा ब्रिगेडी धागा आला आणि त्यांनीही दोन-चार पुराव्यानिशी संदर्भ देवून शिवराय कसे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ऐतिहासिक तथ्ये सप्रमाण मांडली तर अशा धाग्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया "लेखासाठी धन्यवाद" अशी असली पाहिजे. जर ती तशी नसेल तर? . . . त्यांनी दोन-चार उदाहरणांवरून जो तर्क केला आहे तो खोडण्यासाठी लिखित पुराव्यांची आवश्यकता नाही.तर्काला तर्कानेच उत्तर मी दिलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Sat, 12/26/2015 - 06:46 नवीन
अब आया ऊंट पहाड के नीचे!
समजा उद्या एखादा ब्रिगेडी धागा आला आणि त्यांनीही दोन-चार पुराव्यानिशी संदर्भ देवून शिवराय कसे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे पटवून देण्याचा प्रयत्न केला, तसेच काही ऐतिहासिक तथ्ये सप्रमाण मांडली तर अशा धाग्यावर सुद्धा तुमची प्रतिक्रिया "लेखासाठी धन्यवाद" अशी असली पाहिजे.
जरूर लिहा! लेख चांगला असेल तर दाद मिळेल. शिवाजी महाराज हे ब्राह्मणविरोधी आणि पुरोगामी होते हे दाखवायचा जरूर प्रयत्न करा. एकही पुरावा सापडणार नाही. शिवाजी महाराजांनी गुन्हेगारांना नेहमीच कठोर शिक्षा केल्या. तेव्हा त्याची जात धर्म पाहिला नाही तसेच कोणाच्या गुणांचे कौतुक करतानाही पाहिला नाही. एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही. तरी तुमच्या समाधानासाठी जरूर प्रयत्न करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
प
पैसा Sat, 12/26/2015 - 08:08 नवीन
इथे तुम्ही मेहेंदळे सरांनी पुरावे दिलेत तरी ते नाकारताय आणि बाजीरावाच्या सिनेमात इतिहासाचे विकृतीकरण आहे त्याचं समर्थन करताय. जे घडलं तो इतिहास. नुसत्या सांगोवांगीच्या गप्पा नव्हेत. तुमची आमची वयं असतील तितकी वर्षे अभ्यास केलेला माणूस जर शेकडो हजारो कागदपत्रे वाचून काही बोलत असेल तर ते नाकारून किंवा नवा आपल्याला सोयीस्कर इतिहास लिहून तुम्हाला काय मिळवायचं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप साळुंखे Sat, 12/26/2015 - 08:17 नवीन
चित्रपट भव्य आणि दिव्य आहे म्हणून मी समर्थन करतोय वेळ मिळाला तर पहा जरूर. . . आपल्याला सोयीस्कर असा इतिहास लिहून काही मिळवायचं नाहीये,तो आहे तसा असावा हाच माझा पण मुद्दा आहे. . . मी त्यांचे पुरावे नाकारत नाही,त्यांचा व्यासंग दांडगा आहे त्याबद्दल आदर आहेच,पण त्यातून निघणारा तर्क मी नाकारत आहे. . . धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
प
प्रदीप साळुंखे Sat, 12/26/2015 - 08:10 नवीन
एवढ्या मोठ्या युगपुरुषाला हे किंवा ते लेबल लावायची किंवा तुमच्या कोणत्याही सर्टिफिकिटाची गरज नाही.
हाच प्रतिसाद आधी तुम्ही दिला असता तर,एवढा प्रतिवाद मी केला नसता. मी ब्रिगेडी नाही हे वर त्या नाद खुळाच्या प्रतिसादाखाली सांगितले आहे. . . स्पेसिफिक माझं आडनाव बघून जर कोणी माझी वृत्ती ठरवणार असेल तर अवघड आहे.(हा टोला नाद खुळा साठी) बाकि टोपन नाव घेवून धुमाकूळ घालण्याची इच्छा नाही. . . नै म्हणजे संपादक या जबाबदारीच्या पदावर तुम्ही होतात,म्हणून म्हणलं आपलं सहज. बाकि मिपावर आठ महिन्यांचा माझा अनुभव आहेच,कधीकधीच प्रतिसाद देतो,एरवी वाचनमात्रच असतो. _ _ _ _ जय हिंद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Fri, 12/25/2015 - 05:06 नवीन
घर वापसी सोडा हो. साधे धर्मांतर विरोधी विधेयक आणायचे म्हटले तर पाद्री आणि मौलवी कडाडून विरोध का करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
प्रदीप साळुंखे Fri, 12/25/2015 - 05:52 नवीन
त्यामध्ये ते आपला स्वार्थ बघतात. . . . आणि काय ते हिंदू कोड बिल,मुस्लिम लाॅ वगैरे सगळं बंद व्हायला पाहिजे. समान नागरी कायदा झालाच पाहिजे. धर्माआधारित कायदे असतील तर भारतीयांनी महासत्ता होण्याचे स्वप्न बघू नये. . . . शिवरायांनी कोणाचे लाडही केलं नाही आणि तुष्टीकरणही केलं नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Fri, 12/25/2015 - 07:49 नवीन
समान नागरी कायदा झालाच पाहिजे. धर्माआधारित कायदे असतील तर भारतीयांनी महासत्ता होण्याचे स्वप्न बघू नये. शिवरायांनी कोणाचे लाडही केलं नाही आणि तुष्टीकरणही केलं नाही. बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
न
नाखु Sat, 12/26/2015 - 04:26 नवीन
शिवरायांनी कोणाचे लाडही केलं नाही आणि तुष्टीकरणही केलं नाही. या वाक्यासाठी जोरदार टाळ्या !!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ग
गामा पैलवान Fri, 12/25/2015 - 14:04 नवीन
न.नि., व्याख्यानाचा हेतू उघड आहे. शिवाजीमहाराज कसे होते हा व्याख्यानाचा अंतस्थ हेतू नाहीच्चे मुळी. शिवाजीमहाराजांच्या उक्तीतून आणि कृतीतून हिंदूंनी आजच्या घडीला काय बोध घेतला पाहिजे हा व्याख्यानामागचा हेतू आहे. माझ्या मते हा हेतू सफल झाला आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
म
मितभाषी Fri, 12/25/2015 - 17:44 नवीन
नगरीनिरंजन अचूक विश्लेषण केले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
प
प्रकाश घाटपांडे Fri, 12/25/2015 - 04:57 नवीन
पानसरे शिवाजी इस्लाम आणि इतिहास हा एक लेख वाचनात आला होता. इतिहास हे शेवटी उपलब्ध माहिती वर आधारित इंटरप्रिटेशन आहे. खरा इतिहास ही काय भानगड असते व तो कुणाला ठाउक असतो? या प्रश्नाच उत्तर मिळणे कठीण. इतिहासात किती अडकून पडायच? हा प्रश्न मला पडतो
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Fri, 12/25/2015 - 07:12 नवीन
लेख छान, आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
स
सतीश कुडतरकर Fri, 12/25/2015 - 07:14 नवीन
व्याख्यात्याने एक डिसक्लेमर टाकायला हवे! 'जे मी सांगणार आहे ते एका विचारसरणीच्या बाजूने'च' झुकलेले असेल.' म्हणजे लोकांना त्यांचा अजेंडा काय आहे याच्यावर आदळआपट न करता थेट मुख्य व्याख्यानाला प्रतिसाद देता येईल.
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Fri, 12/25/2015 - 08:29 नवीन
काही प्रतिसाद वाचून वाटले की आपण सर्वच खूप पूर्वग्रह्दुषित आहोत. आपल्याला शिक्षण व समाजातून काही मूल्ये शिकवली गेली आहेत व ती पटोत व न पटोत तिच सर्वश्रेष्ठ अशी आपली झापडबंद विचारसरणी झाली आहे. म्हणजे सर्वधर्मसमभाव, लोकशाही हीच अंतिम सत्ये आहेत असे आपल्याला वाटते व तिच मूल्ये आपण सर्व लोकांवर चिकटवतो आहोत. शिवाजी महाराज थोर पुरुष म्हणजे ते सेक्युलर असलेच पाहीजेत. किंबहुना सेक्युलर नसणारी व्यक्ती थोर कशी असेल असा काहीसा विचार समाजात रुजत आहे. पण सर्वधर्मसमभाव, लोकशाही यांचीही चिकित्सा व्हायला हवी. ह्या संकल्पना अस्तित्वात येउन जेमतेम २२५ वर्षे झालीत. पण मानवी इतिहास हा किमान ५००० वर्षाचा आहे. ही मुल्ये सुस्थापित नसतानाही राज्ये, साम्राज्ये बनली व लयाला गेली. वरील लेखात काही खूपच धक्कादायक तथ्ये मांडली आहेत (ती तथ्ये आहेत का?). उदा. मदारी मेहतरविषयी. ह्या गोष्टींचा प्रतिवाद कोणीच पुरावे देउन करत नाहीये. किंबहुना जर व्याख्यानात जर नेहमीची शिवाजी महाराज खूपच सेक्युलर होते. त्यानी मुसलमानांनाही नोकरीवर ठेवले, मशिदी बांधल्या असे सांगितले असते तर कोणीही पुरावे मागीतले नसते.
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Fri, 12/25/2015 - 10:04 नवीन
ऐतिहासिक व्यक्तींना (विशेषतः जेत्यांना) नव्या मूल्यव्यवस्थेतले अनेक गुण चिकटवणे नेहमीच होत आलेले आहे. त्यात नवीन काही नाही. आता मात्र विशिष्ट गुणांना विशिष्ट वर्गाकडून विशिष्ट हेतूंनी आक्षेप घेतला जात आहे एवढेच. जाताजाता: पीसीएमसीच्या वेबसाईटवर हा गमतीदार प्रकार आहे. आजकाल कशावरून काय सिद्ध होईल ते सांगता येत नाही.
चिंचवडच्या मोरया गोसाव्यांबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अतिशय आदर होता. परंतु शिवाजी महाराज हे परखड होते. सिंहगडच्या किल्ल्यावर किल्लेदाराला सांगून चिंचवडच्या देवांनी दोन इसमांना परस्पर बंदिखान्यात ठेवले असल्याचे महाराजांना माहीत पडले. तेव्हा शिवाजी महाराज देव महाराजांना म्हणाले, च्तुम्ही आमच्या कारभारात ढवळाढवळ करता, तेव्हा तुमची बिरुदे आम्हाला द्यावीछ, आमची बिरुदे तुम्ही घ्यावी. किल्लेदाराला त्यांनी विचारले, तू चाकर कोणाचा ? देवांचा की आमचा ? असा उल्लेख द.ग.गोडसे लिखित च्समन्दे तलाशछ या पुस्तकात करण्यात आला आहे. यावरुन छत्रपती शिवरायांची चिंचवडच्या मोरया गोसावी व देव महाराजांवर नितांत श्रद्धा असल्याचे सिद्ध होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
म
मुक्त विहारि Fri, 12/25/2015 - 09:00 नवीन
वाखूसा....
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 12/25/2015 - 11:27 नवीन
मेहेंदळे अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे इतिहासकार आहेत. त्यांनी मांडलेली सर्व मते गंभीरतेने घेण्यासारखी आहेत . शिवाय त्यांचे खंडन वा समर्थन करण्यासही एक किमान दर्जा आवश्यकच आहे. वरील विचार वाचुन मी काहीसे आश्चर्य जरुर वाटले. या अगोदर जो शिवाजी महाराजां संदर्भातला इतिहास वाचला होता त्यावरुन ते सेक्युलर वाटले होते काहीसे सेक्युलर... मात्र वरील लेखाने तसे काही ते नव्हते असे दिसत आहे. हे माझ्यासाठी नविन आहे. मात्र काही मुद्दे क्रमाने नोंदवितो. १- साधारण शिवाजी महाराजांविषयी समजा १०० मुद्दे आहेत उदा. त्यांनी शेतसारा मध्ये केलेला बदल काठीने जमीन मोजुन आकारमानानुसार शेतसारा भरणे हा नविन नियम ( पुर्वी वतनदार इ. च्या हातात शेतसारा कीती घ्यावा असे काही होते ) चुक भुल देणे घेणे. किंवा नविन शस्त्र माझ्या आठवणी प्रमाणे मुस तोफा इ. संदर्भात नविन तंत्रज्ञान वापरांणे इ. प्रयोग त्यांनी केले सैन्यास झाडे तोडु नयेत शेत उध्वस्त करु नये युद्धा दरम्यान इ. नियम आदी समजा अनेक बाबी मुद्दे शिवरायांसंदर्भात आहेत. म्हणजे समजा एकुण १०० मुद्दे आहेत त्यातला एक असु शकतो की शिवाजी महाराजांचा मुस्लिम विषयक दृष्टीकोण वा गो ब्राह्मण विषयक दृष्टीकोण ते प्रतिपालक होते की नव्हते इ. इ. २- तर मेहेंदळे यांच्या अफाट ज्ञानाचा रीसर्चचा वापर जर वरील व्याख्यानात हा जो असे समज क्र.९७ चा मुद्दा शिवाजी ऑन मुस्लिम- गो- ब्राह्मण काय भुमिका इ.इ. पुरताच आयोजकांनी केलेला दिसतोय. व त्याहुन म्हणजे स्वतः मेहेंदळे यांना देखील क्रं ९७ च्या मुद्द्यात रस दिसतोय. तर ठीक आहे मात्र हा मेहेंदळे यांच्या रीसर्चचा इनएफीशीयंट युज म्हटला पाहीजे. संभाजी भिडें कडुन अपेक्षा नाही मात्र मेहेंदळे कडुन होती. कारण मेहेंदळे तसे दुर्मिळ आहेत म्हणजे त्यांचे विचार व्याख्याने पुरंदरें सारखी "मुबलक " प्रमाणात उपलब्ध नाहीत. जे कधीतरीच वेळ देतात त्यांना क्रं ९७ चा मुस्लिम गो ब्राह्मण प्रतिपालक मुद्दा देणे अत्यंत मर्यादीत करण्यासारखे वाटले पण मेहेंदळेंनाही रस आहे त्यांचेही काही आस्थाविषय आहेत असे दिसते. ३- सुरतेची लुट शिवाजीची अ‍ॅडमिनीस्ट्रेशन फंडींग आर्थिक विचार, शस्त्रे रणनीती इ. इ. अनेक ९९ मुद्दे होते. पण शक्ती आणि भक्ती मध्ये अर्थातच या विषयात रस कोणालाच नसावा. आता शक्ती व भक्ती त पुढील वेळेस मेहेंदळेंना पाचारण करुन आता शिवाजी महाराजांच्या जीवनातील गायीचे स्थान हा विषय दिल्यावर त्यांच्याकडे डेटा असेलच अमुक अमुक गो शाळेला अमुक अमुक इतके होन महाराजांनी दान दिले.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 12/25/2015 - 11:59 नवीन
तर आजपर्यंत जी सेक्युलर शिवाजी मांडणी एका वर्गाकडुन केली जात होती त्याच्या विरोधात वरील "नव्हे शिवाजी हिंदुवादीच" ही नविन मांडणी वरील व्याख्यानातुन समोर येते. मात्र याचा उपयोग काहीच नाही. म्हणजे मुळात जुने संत राजे इ. फार आधुनिक विचार करणारे होते काळाच्या पुढे विचार करणारे होते. असे खटाटोप करुन सिद्ध करण्याचा एक सतत प्रयत्न होत असतो. प्रत्यक्षात त्या त्या व्यक्तीवर त्या त्या काळाचा जबरदस्त पगडा हा असतोच व ते स्वाभाविकच आहे. पण मला एक दिसत आहे की ते हिंदुवादीच होते हे सिद्ध झाल्याने काय फरक पडतो नेमका ? त्यांच्या आयुष्यातील खरोखर क्रांतीकारक अनुकरणीय अनेक गोष्टी आहेत अनेक रोचक व सुरत लुटी सारख्या काही खटकणारया बाबी पण आहेत. म्हणजे मला आयोजनाचे स्वातंत्र्य असते तर मी शिवाजी महारांजाविषयी अनेक दमदार मुद्दे सुचवु शकलो असतो. वरील मुद्दा देखील एका अर्थाने महत्वाचा पण इतर मुद्द्यांच्या तुलनेने फार कमी महत्वाचा आहे. मेहेंदळे सारख्या श्रेष्ठ अभ्यासकाला जो दुर्मिळ आहे त्यांच्या कडुन शिवाजी विषयी कीतीतरी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवर विवेचन जाणुन घेता येऊ शकते. नुसता शिवाजीची आर्थिक नीती किंवा शिवाजीची आरमार शस्त्र नीती इतका जरी तुकडा घेतला तर काय जबरदस्त रोचक महत्वपुर्ण माहीती मेहेंदळें कडुन काढुन घेता आली असती. व ती खरोखर रेलेव्हंट पण आहे. समकालीन महत्वाची आहे. आता शिवाजी सेक्युलर नव्हते संकुचित विशीष्ट धर्मवादी होते इतकेच नविन लक्षात आले त्याने काय फरक पडला ?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा