Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन

क
कोकणप्रेमी
गुरुवार, 12/24/2015 - 09:45
🗣 146 प्रतिसाद
श्रीशिवचरित्रावरील आक्षेपांचे सप्रमाण खंडन -- ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री. गजानन भास्कर मेहेंदळे यांनी भक्ती शक्ती संगमाच्या निमित्ताने पुण्याच्या जंगली महाराज मंदिरात दिलेले व्याख्यान लिखित स्वरुपात अभ्यासकांच्या माहितीसाठी मिसळपाववर देत आहे. अवश्य वाचा...अनमोल माहिती.. मी १९६९ मध्ये भारत इतिहास संशोधक मंडळात पाऊल टाकलं...शिवचरित्राचा अभ्यास करायला...तेंव्हा माझं वय होतं २२...आता माझं वय आहे ६८...या एवढ्या प्रदीर्घकाळात मी शिवचरित्रविषयक कागदपत्रं वाचली नाहीत, असा दिवस गेलाच असला तर एखाद-दुसरा असेल, सहसा असं झालेलं नाही, की मी शिवचरित्रावर काही वाचलं नाही. त्यातुनं मी सुमारे अडीच हजार पानं.. मराठीचे दोन भाग शिवचरित्राचे लिहिले. त्या अडीच हजार पानात, संदर्भच मुळी ७००० आहेत. आता यंदा मी तिसरा भाग लिहिणार म्हणतो आणि पुढच्या वर्षी चवथा, शेवटचा. मी एक इंग्रजी शिवचरित्र पण लिहिलंय.. ते पूर्ण आहे, त्याच्यात सुमारे हजार एक पानं आहेत. अशी अडीच हजार मराठी, एक हजार इंग्रजी अशी साडेतीन हजार पानं लिहुन झालेली आहेत, आणखीही होतील. मी काही हे त्यागानं केलं नाही. शिवाजी महाराजांबरोबर रहाणं, ही आनंदाची गोष्ट आहे म्हणजे त्यात काही आपण घालवलं काहीच नाही. आणि मला या फ़ार मोठ्या पुरुषाबरोबर, गेली ४५ वर्षे मी कागदपत्रांच्या रुपानं रोज राहातोय त्यामुळे मला त्यांच्याविषयी चांगलंच माहिती आहे. मी आता मुख्य असं बोलणार आहे, त्यांच्याविषयी काही गैरसमज पसरवले जातात, मुद्दाम जातात म्हणा, अज्ञानामुळं जात असतील... उदहरणार्थ मला मध्ये असं कुणीतरी सांगितलं आणि विचारलं की शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली... मी सगळं शिवचरित्र…मी तुम्हाला सांगितलं, की किती दीर्घकाळ करतोय... आणि मी जे सांगीन ते खरं सांगीन, आणि खरं आहे ते सगळं सांगीन...शिवाजी महाराजांनी कधीही, कुठंही मशीद बांधली नाही. नाही याचा अर्थ ना आणि ही. तुम्हाला बाकी कोणीही मशीद बांधली असं सांगितलं तरी माझ्याकडं पाठवून द्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो, अशी एक लोकांची समजूत आहे, की शिवाजी महाराजांनी मशीदींना इनामं दिली. त्यांनी जर दिली असती तर मी दिली असती म्हणून सांगितलं असतं...माझ्या पदरचं काहीच जात नाही हो, ते त्यांचीच देणार होते, दिली असती तर...एखाद्याला वाटू शकेल की द्यायला हवी होती...पण ते त्याचं मत झालं...मुद्दा असा आहे की शिवाजी महाराजांनी दिली का नाही दिली. तुम्हाला काय वाटतंय, मला काय वाटतंय आपण बाजूला ठेऊ. शिवाजी महाराजांनी मशिदीला नवीन इनाम करून दिलं असा कागदाचा एक कपटा सुद्धा नाही. तुम्हाला कोणीही काहीही सांगितलं तरी ते खोटं आहे. मी शिवचरित्रविषयक सर्व कागदपत्रं वाचलेली आहेत. सर्व...मराठी, फ़ारसी, पोर्तुगीज…सर्व...त्यांनी कुठल्याही मशिदीला कधीही, नवीन इनाम करून दिलं नाही. मी सांगतोय ते काळजीपूर्वक ऐका, नवीन इनाम दिलं नाही. जसं, माझे गुरु होते, प्राध्यापक ग. ह. खरे. खूप मोठे होते. त्यांनी असं सांगितलंय आणि मला ते कागदपत्रांच्या रुपानं माहितीही आहे की एखाद्या मुसलमान बादशहानं हिंदु मंदिराला नवीन इना¬म करून दिलं, असं सहसा आढळत नाही.एखादंच उदाहरण असलं तर असेल. म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो. इब्राहीम आदिलशहा म्हणून होता. तो हिंदूच व्हायचा शिल्लक होता. त्यानं गणपतीवर आरत्या केल्या! मी हिंदू... जन्मानं हिंदू असून अजून कधी गणपतीवर आरती केली नाही. आणि त्या इब्राहिमनं केली. आता तो कुठला आलाय मुसलमान हो, तो हिंदूच झाला होता...वर्तनानं तो हिंदूच झाला होता. तेंव्हा अशा एखाद्या बादशहानं हिंदू मंदिराला एखादं इनाम दिलंय, नाही असं नाही. पण सहसा नाही. मग जी इनामं चालू राहिली ती कशी राहिली? त्यांच्या (बादशहांच्या) पदरी हिंदू सरदार असायचे. हिंदू कारकून असायचे. शेवटी आपल्या घरचा नोकर असला तरी त्याला नाही दुखवता येत.त्यानं काम नीट करायला पाहिजे असेल तर सांभाळून घ्यायला लागतं. हे हिंदू परस्पर ती इनामं खाली चालू ठेवायचे म्हणून मुसलमानी आमदानीत काही हिंदू इनामं चालू राहिली. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा काही दोन तीन मशिदी अशा आहेत की ज्यांची इनामं चालू होती. म्हणजे पूर्वीपासून चालत आली ती...नवीन नाहीत...त्याला एक अपवाद असा आहे, इंदापुरची जी मशीद आहे, तिथल्या काझींनी असं म्हटलंय, कागदपत्रांमध्येच आहे, हे मी त्यांचे शब्द सांगतोय, माझे नहीत, की शिवाजी भोसल्यांच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. शिवचरित्र साहित्य खंड तीन म्हणून आहे, कागदपत्रांचा खंड आहे, आपण काढून बघा...आता तो काझी आहे, काझी म्हणजे तर न्यायाधीश असतात, ते खोटं नाही बोलणार. ते सांगताहेत, त्यांच्या भाषेत मी सांगतो, त्यांच्या शब्दात सांगतो की शिवाजी भोसल्याच्या कारकिर्दीत आमचं इनाम चाललं नाही. तेंव्हा कुणी शहाणे जर असं म्हणतील की चालू होतं तर ते खोटं आहे. चालू नव्हतं...दोन तीन मशिदींचे चालू होतं तेवढेच..नवीन कुठलंही दिलं नाही. आता शिवाजी महाराजांच्या राज्याचा हेतू तरी काय होता? मी माझ्या इंग्लिश पुस्तकात सविस्तर लिहिलंय, मराठीत पुस्तकाच्या पुढच्या भागात येईल...म्हणून सांगतो. दोन तीन प्रकारे सांगता येईल. एक, शिवाजी महाराज स्वत: काय बोलले...आणि स्वत: त्यांनी काय केलं...शिवाजी महाराजांची उक्तीच सांगायची तर त्यांचा भाऊ आहे व्यंकोजी, त्याला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, की मी तुर्कांना....तुर्क हा शब्द मुसलमान अशा अर्थी वापरला जातो. (आजही तंजावरी मराठीत मुसलमानांना तुरुक म्हणतात)...जुन्या कागदपत्रांमध्ये....ते म्हणतात की मी तुर्कांना मारतो, आणि तुझ्या सैन्यात तुर्क आहेत तर तुझा विजय कसा काय होईल? ते होणं शक्य नाही. शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ, नार्व्याला गोव्याजवळ आहे. ते पोर्तुगिजांनी पाडलं होतं, त्या पूर्वी मुसलमानांनी पाडलं होतं, अनेकांनी पाडलं होतं...त्याचा जिर्णोद्धार शिवाजी महाराजांनी केला. का बरं केला? आपण विचार करा. वास्तविक पुण्यात त्यांना देवळं बांधायला भरपूर जागा होती. तिथलंच कशाला बांधायचं? तुम्ही जसं हट्टानं पाडलं, तसं मी ते हट्टानं बांधणार. म्हणूनच बांधलेलं आहे ते, परत बांधलं ते. त्यांच्या आयुष्यात अशी अनेक उदाहरणं आहेत. मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. कर्नाटक तेंव्हा म्हणायचे, आज तमिळनाडू आहे तो. तेथे तिरुवण्णामलाई, तिथे देऊळ आहे, शोणाचलपतीचं...ते पाडलेलं होतं. शिवाजी महाराजांनी ते हट्टानं परत बांधलं..तुम्हाला म्हणायचं तर हट्टी म्हणा.. पण बांधलं...परत बांधलं..एक फ़्रायर नावाचा इंग्रज प्रवासी होता. इंग्रज होता, डॉक्टर होता त्या काळातला, कॉलेजात जाऊन डॉक्टर झाला होता. त्यांच्याकडे तेंव्हा तशा शिक्षण संस्था होत्या. हा फ़्रायर कल्याण भिवंडीला आला होता. तो असं म्हणतो की तिथं मशिदी होत्या त्या महाराजांनी पाडल्याच असत्या, त्याच्या ऐवजी महाराजांनी त्याची धान्याची कोठारं केली आहेत. असं फ़्रायर सांगतो. एक मशीद ओस पडली होती, तिथला हवालदार म्हणजे आजच्या परिभाषेत मामलेदार... त्यानं सांगितली ती पडलीय तिथं जाऊन रहा तिथं.. म्हणून तो तिथं रहात होता..हे फ़्रायर सांगतो,, स्वत: सांगतो. तमिळनाडूत जेझुइट पाद्री जे असतात, ख्रिश्चन लोकांमध्ये पंथ आहे जेझुइट , ब्रह्मचारी रहातात ते... कडवे असतात, आयुष्य घालवतात लोकांना बाटवता यावं म्हणून, फ़ारसं यश येत नाही पण प्रयत्न करतात, त्या जेझुइटांनी लिहिलंय की इथल्या मशिदी महाराजांनी डेसिग्रेट केल्या म्हणजे भ्रष्ट केल्या.हे मी नाही सांगत, मी तुम्हाला जे जेझुईट पाद्री काय सांगतात ते सांगतोय, आणि हे देवाचे दास असतात, ते मला वाटतं खोटं नाही बोलणार. आता हे झालं शिवाजी महाराजांचं... उक्ती, व्यंकोजी महाराजांना लिहिलेल्या पत्रात मी उक्ती सांगितली आणि कृती पण सांगितली. आता त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते सांगतो. अलि अदिलशाहानं पाठवलेलं फ़र्मान आहे. त्या फ़र्मानात.. कान्होजी जेध्यांना पाठवलेलं आहे.त्यात असं लिहिलं आहे, मी ते फ़र्मान वाचलयं, मूळ फ़र्मान पाहिलयं, फ़ार्सी मध्ये आहे, मला फ़ारसी येतं, त्या फ़र्मानात त्यांनी म्हटलंय की शिवाजी महाराजांमुळं म्हणजे त्यांनी शिवाजी म्हटलंय कारण ते त्यांच्या फ़र्मानांमध्ये शिव्या देऊनच बोलतात, ते काही शिवाजी महाराज म्हणत नाहीत पण आपण म्हणावं, की शिवाजी महाराजांमुळं मुसलमानी धर्माची वाढ खुंटलेली आहे. असं त्यांनी म्हटलंय. त्या फ़र्मानात...आणि म्हणून मी अफ़झल खानाला त्यांच्याविरुद्ध पाठवलंय असं त्या फ़र्मानात म्हटलंय...अलि अदिलशाहाचं फ़र्मान...त्यांचे शत्रू काय म्हणतात, ते मी सांगितलं आणखी पण उदाहरणे देईन...आता त्यांचे मित्र काय म्हणतात, मित्र याचा अर्थ त्यांच्या बाजूचे लोक, काय म्हणतात ते सांगतो. संभाजी महाराजांचं दानपत्र आहे. संस्कृत मध्ये आहे, त्यांना संस्कृत येत होतं, त्या दानपत्रावर त्यांनी स्वत:च्या हस्ताक्षरात लिहिलेला श्लोक आहे. कुठंय ते दानपत्र? कुणाला पहायचं असेल तर पुण्यात टिळक रोडला एस.पी. कॉलेज आहे, त्याच्या मागच्या बाजूला शिक्षण प्रसारक मंडळीचं कार्यालय आहे, तिथं ते दानपत्र आहे. त्याचा फोटो छापला गेलेला आहे. पूर्ण दानपत्राचा. बेंन्द्र्यांचं (वा.सी. बेन्द्रे) जे साधन चिकित्सा पुस्तक आहे त्यात आहे. त्या दानपत्रात ते आपल्या वाडवडलांचं वर्णन करतात, अशी पद्धत आहे, दानपत्रामध्ये आपल्या पूर्वजांची.... प्रशंसा करणं , त्यांचं मोठेपण सांगणं, त्यात असं म्हटलंय, कसे होते माझे वडील? “म्लेंछक्षयदीक्षित”!!! कुमारवयातच म्लेंछक्षयदीक्षित म्हणजे म्लेंछांचा क्षय करण्याची, नाश करण्याची दीक्षा यांनी घेतलेली आहे! असं कोण म्हणतं?? असं संभाजी महाराज म्हणतात! बापाला ओळखणार ना मुलगा! पण आजकाल लोकं जे आहेत ते वेगळाच अर्थ सांगतात, संभाजी महाराज वेगळं सांगतात, आपल्याला संभाजी महाराजांचा विश्वास जास्त ठेवला पाहिजे, आणि केवळ संभाजी महाराजच सांगतात असं नाही, संभाजी महाराजांचा अधिकारी होता, गोव्याजवळ...हाडपोळण म्हणून गाव आहे गोव्याजवळ...तिथं संभाजी महाराजांचा अधिकारी होता. त्याचा शिलालेख आहे.त्याच्याकडं गावक-यांनी काही कर माफ़ करण्याची विनंतीकेली, ती त्याने मान्य केलीय, ते शिलालेखात तिथं नमूद केलंय..काय शिलालेखात म्हटलंय? त्याचा फ़ोटो ही छापलाय हं! कमल गोखल्यांनी लिहिलेले जे संभाजी महाराजांचं चरित्र आहे त्यात त्या शिलालेखाचा फ़ोटो छापलाय, तुम्ही बघू शकता. त्यात असं म्हटलंय की आता हे हिंदू राज्य झालेलं आहे! हे संभाजी महाराजांच्या त्या अधिका-याला तिथल्या प्रजाजनांनी केलेल्या विनंतीतलं वाक्य आहे. हे माझं वाक्य नाही. तेंव्हा खुद्द शिवाजी महाराजांची उक्ती काय होती खुद्द शिवाजी महाराजांची कृती काय होती ते मी थोडक्यात सांगितलं. त्यांचे जे समकालीन लोक होते त्यांच्याबाजूचे, ते पण सांगितलं, त्यांचे शत्रू काय म्हणतात, अलि आदिलशाह सारखे ते पण सांगितलं, आता तुलनेनी तटस्थ असे लोक काय म्हणतात, ते सांगतो. हेन्री रेव्हिंग्टन हे नाव ब-याच जणांनी ऐकलं असेल, त्यांनी महराजांवर तोफ़ा डागल्या होत्या, पन्हाळ्यावर, ब-याच जणांनी नाव ऐकलं असेल, त्या हेन्री रेव्हिंग्टननं शिवाजी महाराजांना पाठवलेलं पत्र आहे. इंग्लिश रेकॉर्ड्ज ऑन शिवाजी म्हणून पुस्तक आहे. त्या पुस्तकात, ते पत्र छापलंय. पत्राची सुरुवातच अशी केलीये, शिवाजी महाराजांना अनुलक्ष्य़ून जनरल ऑफ़ द हिंदू फ़ोर्सेस! म्हणजे हिंदू सैन्याचे अधिपती! हिंदू सेनाधिपती! असं कोण म्हणतो? इंग्रज मनुष्य म्हणतो. फ़ार हुशार होता तो. तो महाराजांना ओळखून होता. इतका ओळखून होता, की इंग्रजांचं राज्य भारतात पुढं मागं कधीतरी स्थापन करता येईल अशी स्वप्नं पहिल्यांदा पडलेला इंग्रज म्हणजे हेन्री रेव्हिंग्टन, इतका तो हुशार होता, त्याने महाराजांना ओळखलं होतं. तो त्या वेळीच त्यांना म्हणतो, जनरल ओफ़ द हिंदू फ़ोर्सेस, हिंदु सैन्याचे अधिपती. तेंव्हा शिवाजी महाराजांची स्वत:ची उक्ती म्हणजे बोलणं, आणि कृती, शिवाजी महाराजांच्या शत्रूंचं सांगणं आणि कृती, शिवाजी महाराजांचे जे समकालीन होते, संभाजी महाराजांसारखे लोकं , कवी भूषणासारखे लोकं, त्यांना जवळून पाहिलेला त्यांचा चरित्रकार, परमानंद, तो म्हणतो, लहानपणापासून हे यवनांचा अपमान करीत आले आहेत! असं शिवभारतात नमूद आहे.तेंव्हा त्यांना जवळून पहाणारे परमानंद असोत, कवी भूषण असोत, मघाशी गुरुजी जे म्हणाले, सुन्नत होती सबकी ते काव्य ज्याचे आहे त्या भूषण कवीने शिवाजी महाराजांना पाहिलं, तो रायगडावर राहिला होता, हा हिंदी प्रदेशातला आहे. तर हे समकालीन लोक शत्रू आणि मित्र आणि त्यांच्या उत्तरकाळातील परंपरा, ही परंपरा सुद्धा हेच सांगते की मराठ्यांना आपलं राज्य काय कळलं होतं? ते उदाहरणानं सांगतो. त्र्यंबकेश्वरचं देऊळ आहे बघा, ते मशीद पाडून बांधलेलं आहे. माझे मित्र आहेत पांडुरंग बलकवडे ते आज बहुतेक आले नाहियेत अजून, त्यांच्याकडं त्या देऊळाच्या प्रारंभीपासून अखेरपर्यंतचे सर्व हिशोबाचे कागदपत्रं आहेत, अगदी पाया रचण्यापासून सगळे. ते त्र्यंबकेश्वरचं देऊळ मशीद पाडून बांधलेलं आहे. दुसरं एक देऊळ सांगतो.नाशीक गावामध्ये, कुणी नाशीकचं असतील तर, सुंदर नारायणाचं देऊळ आहे नाशिकमधे, ते देखील मुस्लीम बांधकाम पाडून बांधलेलं आहे, त्याचे ही कागदपत्रं आहेत. ते शिवचरित्र साहित्य खंड २ मध्ये छापलेले आहेत. तेंव्हा शिवाजी महाराजांच्या राज्याचा काय हेतू होता? तर कुणी म्हणेल की असं नको करायला पाहिजे होतं त्यांनी, आपलं सर्वधर्मसमभाव त्यांनी ठेवायला पाहिजे होता, ते शक्य आहे असे वाटेल कोणाला, पण शिवाजीमहाराजांना काय वाटलं तुर्त आपण ते बघायचं, लोकांना काय वाटत, मला काय वाटतं, मला असं वाटतं त्यांनी सर्वांना सारखं वागवलं असतं तर बरं झालं असतं, पण त्यांची इच्छा नव्हती तशी, ते त्यांच्या इच्छेप्रमाणे वागणार, माझ्या किंवा तुमच्या किंवा आणि कुणी असतील त्यांच्या इच्छेप्रमाणे कसे वागणार? तेंव्हा त्यांचं वागणं हे असं होतं. आजच्या परिस्थितीत आज मी जेंव्हा आजुबाजुला बघतो, मला ७१-७२ मध्ये दिल्लीला जाण्याचं... दुर्भाग्य माझ्या नशिबी आलं. आणि तिथं मी बघितलं, तिथं औरंगजेब रस्ता मोठा रस्ता आहे. लोधी रोड आहे, लोधी कोण कुठला काढला लोधी? तर भला मोठा रस्ता हो, म्हटलं काही शिवाजी महाराजांच्या नावाने नाही वाटतं काही? मी नुकतीच अभ्यासाला सुरुवात केली होती, २ वर्षं झाली होती, ते म्हणाले एवढी लहान गल्ली ही, ही शिवाजी गल्ली ...चांगलयं म्हटलं..त्यांनी. तिथल्या एका करोल बागेत मराठी वस्ती आहे. तिथल्या मराठी माणसाला म्हटलं, काय हो तुमची दिल्ल्ली ही? हा औरंगजेब रस्ता, तो मला म्हटला तुमच्या स्वत:च्या महाराष्ट्रात बघा की, मी म्हटलं काय झालं? तो म्हणे, औरंगाबाद म्हणून एक शहर आहे ना तुमच्या महाराष्ट्रात, थुत तुमच्या जिंदगानीवर! मला असं झालं आपण जोड्यानं मार खाल्ला. आता माझ्या नशिबानं त्या शहरात मला कधी जायला लागलं नाही, कारण त्याला आज लोक जरी संभाजीनगर म्हणत असले तरी त्या शहराचे सरकारी नाव अजुन औरंगाबाद हेच आहे. आणि हे फ़ार मोठं पाप आहे. त्यांनी ज्यांनी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं, इतकं मोठं निलाजरेपणाचं लक्षण कुठल्या समाजात असेल असं मला वाटत नाही. असे जगात कुठे ही नाही. उदाहरण मला तरी माहित नाही. तेंव्हा हा बदल केंव्हातरी सरकारला सुचेल मला असं वाटलं होतं जेंव्हा दिल्लीत गेलो मी तेंव्हा मला असं वाटलं होत की शिवाजी महाराजांच्या नावानी भव्य रस्ता असेल, हरीहर बुक्काच्या नावानेही मोठा रस्ता असेल, राणा प्रतापाच्या नावाने मोठा रस्ता असेल, रणजित सिंहाच्या नावानं मोठा रस्ता असेल, हे तर मोठे राजकीय राजे झाले. ज्ञानेश्वर तुकारामांच्या नावाने रस्ते असतील, तुळशीदासाच्या नावाने रस्ता असेल, नरसी मेहेतांच्या नावानं रस्ता असेल, ते बाजुलाच राहिलं आणि लोधी रोड, काय औरंगजेब रोड काय, हे आपण भारताच्या राजधानीत आलोय का कुठं लाहोर बिहोरला आहोत? आता शिवाजी महाराजांच्या पदरी बरेच मुसलमान लोक होते असं लोकं सांगतात. परवा एक दीड शहाणे म्हणाले की शिवाजी महाराजांच्या सैन्यात १ लाख मुसलमान होते. एक लाख! असं म्हणाले एक गृहस्थ असं मला कळलं, मी काही हजर नव्हतो, अशा लोकांच्या व्याख्यानाला मी कशाला जातोय, पण ऐकलं इतरांकडनं, तेंव्हा तुम्हाला कायमचं माहिती असावं म्हणून सांगतो, शिवाजी महाराजांच्या पदरी कोण कोण मुसलमान होते? त्यांची संख्या काय होती, सगळं सांगतो. एक त्यांच्या पदरी सत्तावन सालपर्यंत ४-५ मुसलमान होते. १६५८ सालचं अलिआदिलशहाचं शहाजी राजांना फ़र्मान आहे. की तुमच्या मुलाच्या कृत्याबद्दल आम्ही तुम्हाला जबाबदार धरणार नाही त्याचा तो जबाबदार आहे. हे काय कसलं फ़र्मान आहे? १६५८ सालपासनं शिवाजी महाराजांनी स्वराज्याची अधिकृत घोषणा केली. म्हणजे त्यांनी अदिलशाहीवर स्वत:हून आक्रमण केल्याची पहिली घटना १६५८ ची आहे. त्या पूर्वी १६४८ मध्ये त्यांचा अदिलशाही सैन्याशी लढा झाला. पण ते आदिलशाही सैन्याने केलेलं आक्रमण होतं. त्यांनी पुरंदरवर हल्ला केला होता फ़त्तेखान हा सगळ्यांना माहिती आहे. शिवाजी महाराजांनी आदिलशाही वर आक्रमण केलं असं घडलं १६५८ मध्ये. तर पूर्वी ते त्यांच्या वडिलांचे प्रतिनिधी म्हणून इथला कारभार बघत होते. वडिलांचे प्रतिनिधी, मोठी जहागीर होती ती त्यांना, १२०० गावे होती. शहाजीराजांच्या जहागिरीच्या मानानं लहान होती, त्यांच्या मोठ्या जहागिरी कर्नाटकात होत्या. इथली लहान होती. ती १२०० गावं महाराज बघत होते. त्यावेळेला इथं जे अधिकारी होते, १० मार्च १६५७ पर्यंत, त्याच्या मध्ये तुम्हाला नावं सांगतो. एकजण होता सिद्दी अंबर बगदादी. म्हणजे हा बगदादचा असेल. तुम्ही ऐकलं असेल अलिकडं मुंडकी कापतात बघा तिकडं, त्या बगदादजवळचा तोच भाग आहे तो जवळपासचाच भाग अहे, त्यांची प्रथा आहे तशी.. तर हा तो बगदादी. सिद्दी अंबर बगदादी, हा हवालदार होता पुण्याचा. जैना खान पिरजादे हा सरहवालदार होता म्हणजे आजच्या परिभाषेत कलेक्टर होता. बेहेलिम खान हा बारामतीचा हवालदार होता. ही तीन नावं मी तुम्हाला सांगितली, एवढी ३ आहेत. १६५७ नंतर यांचं नख सुद्धा कुठे दिसत नाही. हे कुठं अद्रुष्य झाले , मी तुम्हाला सांगितलं १६५८ साली स्वराज्याला शिवाजी महाराजांनी आधिकृत सुरुवात केली. १६५७ सालाच्या नंतर चुकून सुद्धा एक सुद्धा, मी एक सुद्धा म्हणतोय, परत परत सांगतो, एकही मुलकी अधिकारी, एक सुद्धा मुसलमान नाही! हे जे तुम्हाला ३ सांगितले, हे १० मार्च १६५७ नंतर दिसणार नाहीत. नाहीच आहेत. जो लोक खूप पुकारा करतात, कुणी काही नूर खान बेग म्हणून होता, नूर बेग, सरनोबत होता. तो या १० मार्च १६५७ च्या कागदपत्रात शेवटचा दिसतो. त्यानंतर नूर खान बेग गेला.म्हणजे कुठं अदृष्य झाला, त्याला काय केलं महारजांनी आपल्याला माहिती नाही.त्यानंतर जो सरनौबत होता पायदळाचा येसाजी कंक. नूर बेग नव्हे! आता मी तुम्हाला चार माणसं सांगितली. पाचवं सांगतो. त्याचं नाव होतं सिद्धी हिलाल.तो महाराजांकडं येऊन जाऊन होता. कधी अदिलशाहीतही होता, पण तो होता कोण मुळात? तो होता खेळोजी भोसल्यांचा क्रीतपुत्र. क्रीतपुत्र म्हणजे विकत घेतलेला गुलाम, पण मुलाप्रमाणे घरात वाढवलेला. त्याला क्रीतपुत्र म्हणतात. तुम्हाला मला प्रश्न पडेल की त्याला हिंदू का नाही करून घेतलं? बरोबर आहे का नाही? तर अडचण अशी होती की त्या काळांत जो जन्मानं हिंदू नाही त्याला हिंदू करता येत नव्हतं. एकोणीसाव्या शतकापर्यंत असा एकही माणुस नाही की जो जन्मानं हिंदू नाही... त्याला हिंदू केलं.. नाही, पूर्वी शक कुशाण हूण झाले पण ते कसे झाले? पिढ्यानपिढ्या, पिढ्यानपिढ्या वहिवाट पडून झाले. एकाएकी कुणी एक मुसलमान आणि ख्रिश्चन आलाय आणि तो म्हणलाय मला हिंदू करा, ते शक्य नव्हतं. कारण प्रश्न असा असायचा की त्याला जात कोणती द्यायची? हिंदू धर्मातली कुठली ही जात म्हणायची आमच्याकडे हा नको. त्यामुळं एखादा तयार झाला तरी त्याला हिंदू करता येत नव्हतं, नेतोजी पालकराच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे, नेतोजी पालकर स्वत: जन्मानं हिंदू होता.त्याला जबरदस्तीनं बाटवलं, त्याला पुन्हा हिंदू करता येतं. जो जन्मानं हिंदू नाहीच, किंवा ज्याचे वाडवडील पण हिंदू नाहीत त्याला हिंदू करता येत नव्हतं. नाहीतर सिद्दी हिलाल हा हिंदूच झाला असता. तेंव्हा हा झाला सिद्दी हिलाल. हा चौथा, आता शिवाजीमहाराजांचे २ नौसेनाधिपती , नौदलाचे अधिकारी मुसलमान होते. एक होता.दौलतखान आणि एक होता दर्यासारंग. त्या दर्यासारंगाला महाराजांनीच १६७९ साली अटक केली. १६७९ साली दर्यासारंगाला अटक केली म्हणजे त्याचाही हिशोब संपला. आता दौलतखान आहे, तो कशासाठी ठेवला होता तर तुम्ही काढून बघा, इंटरनेट वर खूप लोक बघतात, भारत जेंव्हा स्वतंत्र झाला १९४७ साली त्यानंतर १० वर्षं भारतीय नौदल आणि भारतीय हवाई सेना यांचे प्रमुख ब्रिटिश होते. भारतीय नव्हते. ब्रिटिश होते. स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर १० वर्षे. का? कारण आपल्याकडं एवढे अनुभवी त्या क्षेत्रातले लोक नव्हते. इंग्रजांनी तेवढी वरची पदं आपल्याला दिलीच नव्हती. हीच परिस्थिती महाराजांच्या नौदलाच्या बाबतीत होती. की त्यावेळेला आपल्याकडे एवढे अनुभवी अधिकारी नव्हते म्हणून हा दौलतखान होता. त्यांच्या नियंत्रणात होता आणि त्यानंतर मात्र आंग्रे आणि धुळप होते, बाकी परत मुसलमान अधिकारी दिसत नाही.कधीही नाही, एकदाच तो सुरुवातीला होता , आपल्या लोकांना ट्रेनिंग मिळेपर्यंत, तेवढचं...नंतर नाही. आता मी तुम्हाला ४-५ नावं सांगितली. याच्या पलिकडं त्यांच्या... जेंव्हा....अफ़झलखान वध केला..तेंव्हा त्यांचे जे १० अंगरक्षक होते त्यात एक मुसलमान होता. सिदी इब्राहिम त्याचं नाव, त्याची स्थिती थोड्या बहुत प्रमाणात हा जो आता मी तुम्हाला सिद्दी हिलाल सांगितला ज्याला खेळोजी भोसल्यांना मुलाप्रमाणं वाढवलं होतं तशीच त्या सिद्दी इब्राहिमची स्थिती आहे,. तेंव्हा ही जी मी तुम्हाला नावं सांगितली, एखादं राहिलं असेल, राहता राहिलं,मदारी मेहेतरचं नाव, ते खोटं आहे, खो आणि ट....खोटं!! त्यात काही सुद्धा खरं नाही, १८०० सालानंतर हकीकत लिहिलेली अाहे आणि काय लिहिलय ? की सवाई जयसिंगाची स्वारी महाराजांवर झाली.हा सवाई जयसिंह कोण? अहो तो त्या मिर्झा राजे जयसिंहाचा खापरपणतु आहे. तेंव्हा महाराज स्वत: हयात नव्हते. त्या सवाई जयसिंगाची स्वारी झाली तेंव्हा हे मदारी मेहेतरानी केलं, आता हे कसं काय खरं मानायचं? यात काही खरं नाही, असं कुणीही सांगेल हो, की माझे पूर्वज शिवाजी महाराजांच्या काळात होते, मी सुद्धा सांगेन, पण त्याला आधार पाहिजे, त्याला कागदपत्रं पाहिजेत, हे त्या काळातले कागदपत्रं नाही, तेंव्हा एक ८-१० नावं सोडली तर शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये मुसलमान अधिकारी कोणीही नव्हते. एक.. दोन....त्यांच्या सैन्यात , त्यांच्या राज्यकारभारात मुल्की अधिकारी कोणीही मुसलमान नव्हते...शून्य होते. नव्हतेच... आणि लष्करामध्ये मी तुम्हाला सांगितलं हा सिद्दी हिलाल किंवा हा दौलतखान किंवा तो दर्यासारंग किंवा त्यांचा फ़ार्सी क्लार्क होता, कारकुन होता, फ़ारसी, त्याचं नाव काझी हैदर...आणि तो... त्यानं बरोबर केलं, तो संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत औरंगजेबाला जाऊन मिळाला...८२ साली. म्हणजे तो कुठं जायचं तिथं योग्य ठिकाणी गेला... तेंव्हा काझी हैदर याला कसं काय मी महाराजांचा प्रामाणिक माणुस म्हणु? त्यांच्याकडे फ़ार्सी लिहायल कुणीतरी लगतं तसा होता...तेंव्हा जे लोक भलत्याच काहीतरी गोष्टी सांगतात, आता महाराजांनी जर मुसलमान नोकर ठेवले असते तर माझ्या पदरचा काही पगार जात नव्हता. त्यांच्याच पदरचा जाणार होता, तुम्हाला सांगायला माझं काहीच बिघडत नाही पण जे खरं आहे ते सांगणं हे इतिहासकाराचं काम आहे, लोकं तुम्हाला खोटं काहीतरी अलिकडं सांगत असतात म्हणून नाईलाजानं मला तुम्हाला हे खरं काय आहे ते सांगायला लागलं.... मला वाटतं गुरुजी थांबू का? (संभाजीराव भिडे गुरुजी) ५ मिनिटं बोलू?...बरं... मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की शिवाजी महाराजांनी सप्तकोटीश्वराचं देऊळ हटकून परत बांधलं,, हटकून का म्हटलं? हट्टी पणानं का बांधलं? त्यांनी हट्टीपणानं पाडलं म्हणुन यांनी हट्टीपणानं बांधलं तशा आणखी २ गोष्टी त्यांच्या आयुष्यात अहेत. एकतरराजव्यवहारकोष...म्हणजे मराठी भाषेत फ़ारसी शब्द फ़ार आले होते...आणि कशामुळं आले होते?आपणहून देवाण स्वाभाविक देवाण घेवाणीतनं आले नव्हते ...जबरदस्तीनं त्यांचं राज्य असल्यामुळं आले होते. ते काढण्याकरता त्यांनी राजव्यवहारकोष रचून घेतला.. त्यात असं म्हटलंच आहे की यवनांच्या भाषेमुळं मराठी भाषा दुषित झाली आहे, ती शुद्ध करण्याकरिता राजव्यवहारकोष रचलाय... असं त्याच्या प्रस्तावनेत सांगितलंयं...२ गोष्टीतलं साम्य बघा..जबरदस्तीनं देऊळ पाडलं...त्यांनी जबरदस्तीनं देऊनळ बांधलं...जबरदस्तीनं भाषेत शब्द शिरले, त्यांनी जबरदस्तीनं बाहेर काढले आणि अशीच तीसरी गोष्ट आहे नेतोजी पालकर...राहिला असता मुसलमान, काय बिघडत होतं? सगळं धर्म सारखे आहेत ना, लोकं म्हणतात, नाहियेत! पूर्ण वेगवेगळे आहेत! अजिबात सारखे नाहीत... खोटं बोलतात. कुठल्याच धर्माची माहिती नसलेले लोक असं बोलतात. सर्व धर्म पूर्णपणाने वेगवेगळे आहेत. आणि मी जेंव्हा हिंदू म्हणतो, तेंव्हा भराताच्या राज्यघटनेच्या २५ व्या कलमात हिंदु शब्दाची जी व्याख्या आहे, ती काय व्याख्या आहे? त्यात हिंदू आहेत, म्हणजे पारंपारिक हिंदू, ग्यानबा तुकाराम करणारे तुमच्या माझ्यासारखे, शीख आहेत...जैन आहेत...बौद्ध आहेत....हे सर्व लोक हिंदू या शब्दाच्या व्याख्येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच घातलेले आहेत. आणि तोच अर्थ मला कायम सुरुवातीपासून आत्ता पर्यंत अभिप्रेत आहे, दुसरा कुठला अर्थ माझ्या मनात नाही. एवढाच अर्थ मला येतो. तेंव्हा तिसरी जी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की राहिला असता नेतोजी पालकर मुसलमान, मुसलमान राहिला तर राहिला, सगळे धर्म सारखेच आहेत, असे काही लोकांना वाटू शकलं असतं पण महाराजांना तसं वाटलं नाही.तुम्ही त्याला जबरदस्तीनं मुसलमान केलं...तेंव्हा मी पण त्याला तितक्याच हट्टीपणानं परत हिंदू करणार! तीन गोष्टी आहेत बघा! तुम्ही भाषा दुषित केली ती मी शुद्ध करणार, तुम्ही माणुस दुषित केलात , मी शुद्ध करणार, तुम्ही धर्मस्थान दुषित केलंत, मी ते शुद्ध करणार...हा एक प्रकारचा चांगल्या अर्थानं हट्टीपणा महाराजांच्या स्वभावात होता म्हणून ते महाराज झाले, आपण सामान्य माणुस.... गुरुजी थांबतो. (समाप्त) श्रीराजाशिवछत्रपति-चरित्रकार इतिहासाचार्य श्री गजानन भास्कर मेहेंदळे व्याख्यान स्थळ : श्री सद्गुरु जंगली महाराज समाधी मंदीर, पुणे दिनांक: अधिक आषाढ वद्य नवमी शके १९३७, शिवशक ३४२ (१० जुलै २०१५)
वर्गीकरण
इतिहास
चर्चा

प्रतिक्रिया द्या
25342 वाचन

💬 प्रतिसाद (146)
र
राही Fri, 12/25/2015 - 14:10 नवीन
महाराजांची आरमारविषयीची रणनीती आणि दूरदृष्टी इतरांपेक्षा कितीतरी पुढे होती. त्यांनी नव्याने बांधलेले सागरी किल्ले ही त्यांची एक फार मोठी कर्तबगारी आणि खरेखुरे स्मारक आहे. पण दुर्दैवाने या बाबीचे आम जनतेमध्ये फारसे कौतुक दिसत नाही. डोंगरी किल्ल्यांमध्येच सगळे रमलेले दिसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
अ
अनुप ढेरे Fri, 12/25/2015 - 14:44 नवीन
हे व्याख्यान खरच गजानन मेहेंदळ्यांच आहे ही शहानिशा करता येइल का?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 12/25/2015 - 15:14 नवीन
शिवाजींनी हिंदवी स्वराज्य स्थापित केले याचा अर्थ ते मुस्लीम विरोधी होते, असा होत नाही. हे सत्य आहे त्या काळी हिंदुधर्मियांवर अत्याचार करणारे मुस्लीम शासक होते. त्यांच्या बिमोड करणे म्हणजे मुस्लीम विरोध होत नाही. आपल्या वर झालेल्या अत्याचारांचा विरोध करण्याचा अधिकार सर्वांना आहे. शिवाजी हिंदू असल्यामुळे अधिकांश अधिकारी हि हिंदू राहणार हे साहजिक आहे.
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Fri, 12/25/2015 - 15:32 नवीन
पण महाराज मुस्लीम विरोधी नव्हते हे सिद्ध करण्याचा एवढा अट्टहास का? आणि त्यासाठी पुरावे वा संदर्भ कोणिही देत नाही. मेहंदळेंनी मुस्लीम विरोधी सिद्ध करण्यासाठी पुरावे व संदर्भ दिलेत. त्यांचा प्रतिवाद व्हावा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 12/25/2015 - 15:36 नवीन
भारतात असलेले १७ कोटी मुसलमान काही स्वखुशीने धर्मांतर केलेले नाहीत. यातील बहुसंख्य जबरदस्तीने बाटवलेले आहेत. तेंव्हा त्या काळात( ३०० वर्षापूर्वी) जर एखाद्या राजाने आपल्या धर्मावरील आक्रमण थांबविण्याचा प्रयत्न केला तर त्यात काय चुकीचे आहे? आज एक मशीद पाडल्यावर एवढा गदारोळ होतो ती मुळात एक मंदिर पाडून बांधलेली आहे तर त्याकाळात असले सेक्युलर किंवा निधर्मी शब्दच अस्तित्वात नव्हते तर शिवाजी महाराजाना सेक्युलर ठरवण्याचा अट्टाहास कशासाठी. "देव, देश अन धर्मासाठी प्राण घेतले हाती" हे म्हणण्याची लाज कशाला?
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 12/25/2015 - 15:51 नवीन
शिवाजी सेक्युलर होते हे ठरविण्याचा इतका अट्टाहास कशासाठी हेच समजत नाही. हाच आक्षेप सर्वच बाबतीत सर्वच संताच्या बाबतीत संत अत्याधुनिक होते आधुनिक मुल्ये अंगात मुरवलेले होते इ.इ. अगदी सेम वरच्या सारखा अट्टाहास कशासाठी ? काहीच अर्थ नाही त्यात मला वाटत त्यात अहंकार तृप्त होत असावा बघा आम्ही कीती पुढारलेले होतो कीती काळाच्या पुढचा विचार करत होतो या अहं च्या तृप्ती व्यतिरीक्त अजुन काय असेल ? एका अर्थाने मेहेंदळे यांनी शिवाजींचा हा सेक्युलर मुखवटा फाडला हे बरेच केले. मात्र आयोजकांचा अजुन एक हेतु दिसतो अगोदर सेक्युलर नाही प्रथम पायरी - अगोदर सेक्युलर नाही मुस्लिम विरोधी आहे द्वीतीय पायरी- हट्टी ( कट्टर ऐवजी हा शब्द वापरलेला दिसतोय ) आहे जशास तसे ( काहींनी प्रेरणा पण लगेच घेतलेली दिसतेय इन्स्टंट इन्स्पायरेशन बघा कसे जशास तसे हट्टी ) हट्टी वा कट्टर हिंदु आहेत तृतीय पायरी- माझा अंदाज आता पुढील विषय गाय शिवाजीने गायींसाठी केलेले कार्य चतुर्थ पायरी- गो ब्राह्मण प्रतिपालक नंतर सत्य पंचतत्वात विलीन व्हावयास अवधी लागणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अवतार Fri, 12/25/2015 - 15:57 नवीन
हे दोघेही धर्मगुरू नसून राज्यकर्ते होते. राज्याच्या वाढीसाठी जे काही करणे आवश्यक होते ते दोघांनीही केले. आलमगीर स्वत:च्या सरदारांना आणि प्रजेला हट्टाने मुस्लिम करून घेण्याच्या फंदात पडला नाही की शिवराय स्वत:च्या मुस्लिम सैनिकांना आणि प्रजेला हट्टाने हिंदू करून घेण्याच्या भानगडीत पडले नाहीत. औरंगजेबाने जिझिया लादला, तेव्हा त्याला थेट पत्र पाठवून जाब विचारणारे शिवरायच होते. पण त्या पत्रातही शिवराय हे औरंगजेबाला त्याच्या पूर्वजांची आठवण करून देतात. सरसकट इस्लामला शिव्या घालत नाहीत. (गैर मुस्लिमांवर जिझिया लादणे खुद्द पैगंबराने दाखवून दिले असले तरीही) शिवरायांची प्रतिमा कट्टर हिंदू म्हणून बिंबवणे किंवा संपूर्ण धर्मनिरपेक्ष म्हणून बिंबवणे हे दोन्ही प्रकार त्यांना हायज्याक करण्याचेच आहेत. इतिहास आहे तसा स्वीकारणे हे समाजातील बुद्धिवादी आणि राज्यकर्त्या वर्गांच्या हितसंबंधांच्या विरोधात जात असेल तर इतिहासावर सोयीस्कर रंगकाम केले जाते. असा इतिहास स्वीकारतांना त्याची लिटमस टेस्ट करणे आवश्यक असते. शिवरायांना बाबू बजरंगीच्या पातळीवर नेणे जितके हास्यास्पद आहे तितकेच थोमस पेनच्या पातळीवर नेणे हास्यास्पद आहे. महापुरुषांनाही काळाच्या मर्यादा असतात ह्याचे भान सुटले की आत्मवंचना सुरु होते.
  • Log in or register to post comments
स
सुधीर Sat, 12/26/2015 - 05:42 नवीन
प्रतिसाद आवडला. मेहेंदळे यांच्या व्याख्यानाचं ध्वनीमुद्रण ऐकायला आवडेल. कुणाकडे असेल तर शेअर करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवतार
य
याॅर्कर Fri, 12/25/2015 - 18:04 नवीन
प्रत्येकांनी आपापल्या सोयीनुसार शिवाजी बनवला आहे. . . पण शिवाजीमहाराज कट्टर/हट्टी होते असं म्हणाल तर व्यापक स्वरूपात ही वृत्ती(कट्टरतावाद) कोणी आजच्या युगात स्विकारणार नाही. . . आजचं युग globalised आहे,आणि यासाठी काही आदर्श तत्वे आहेत.ज्याचा प्रगत राष्ट्रे स्विकार करतात उदा-समानता,धर्मनिरपेक्षपणा,शांतता इ. यामुळेच शिवरायांचे कट्टर स्वरूप दाखवण्याचा निरर्थक प्रयत्न या काळात करणे उचित नाही. . . परत ते कट्टर स्वरूप काही धर्ममार्तंड आपल्या सोयीनुसार विशिष्ठ धर्माविरूद्ध आज वापरतात,त्यामुळे या गोष्टींना खतपाणी घातल्यासारखे होईल. . . शेवटी मोदीसुद्धा बाहेरच्या देशात गांधीजींचं नाव घेतात,त्याशिवाय पर्याय नाही.कट्टरपणा हा कोणीही स्विकारणार नाही,कट्टरवादी देशांचे आज काय चित्र आहे ते स्पष्टचं आहे. . . शिवरायांनी तेव्हाच्या अनुरूप परिस्थितींनुसार भूमिका घेतल्या असतील,तेव्हा त्यांचे एकांगी चित्रण उचित नाही,मग ते डावे असो अथवा उजवे.
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 05:15 नवीन
"आजचं युग globalised आहे,आणि यासाठी काही आदर्श तत्वे आहेत.ज्याचा प्रगत राष्ट्रे स्विकार करतात उदा-समानता,धर्मनिरपेक्षपणा,शांतता इ." हे स्टेट्मेंट पूर्णपणे चुकीच्या समजुतींवर आधारीत आहे. ही तथाकथीत "आदर्श तत्वे" ही लोकांना उपदेश करण्यासाठी आहेत. प्रत्यक्ष व्यवहारात मात्र कोणतेही प्रगत राष्ट् असे वागत नाही. आपण मात्र गोरे लोक काय म्हणतील ह्या विचारांनी उगाच कानकोंडे होत असतो. सर्व प्रगत राष्ट्रात निवडणूक प्रचारात उमेदवार उघड्पणे चर्चला भेटी देतात, आपण कसे चांगले ख्रिस्ती आहोत हे दाखवतात, जर्मनीत "ख्रिस्चन" डेमोक्राटीक पार्टी हे नांव खटकत नाही, अमेरीकेत रेशीअल प्रोफायलींग चालते, वर्णविद्वेष वगैरे तर आहेच. सर्व युरोपीय देशांनी सिरियन मुस्लीम निर्वासीत नकोत असे सरळ सांगीतले पण हीच भूमिका ख्रिस्ती निर्वासीत लोकांबद्द्ल ते घेणार नाहीत. धार्मिक बाबी सोडा इतर काही विषयांतसुद्धा हे चालू आहे. स्वतः अणुप्रकल्प चालवा पण भारत वगैरे देशात ग्रीनपीसकडून विरोध. हे तिथेही विरोध करतात पण कोणी त्यांना भाव देत नाहीत. नव्या सरकारने ह्या लोकांच्या ***वर लाथ घातली हे अभिनंदनीय आहे. ह्याच प्रकारे इतर बाबतीत हे शहाणपण शिकवतात ते बंद करायला हवे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
स
सुबोध खरे Sat, 12/26/2015 - 05:29 नवीन
बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
य
याॅर्कर Sat, 12/26/2015 - 05:54 नवीन
मान्य, तुमचं म्हणणं ही काही खोटं नाही. मग भारत आणि इतर राष्ट्रांत काही फरक नाही म्हणायचा. मग आता, विविधतेत एकता,इन्स्क्रिडिबल इंडिया,विश्वबंधुत्व या गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
न
नाखु Sat, 12/26/2015 - 06:04 नवीन
त्या फक्त आणि फक्त भारतानेच पाळाव्यात म्हणून या शहाजोगांनी कोकलू नये इतकीच माफक इच्छा आहे "सामान्य मानवाची". भारताने कागाळीखोर्/भांडणारा/चिथावणी राहू नये असे वाटते तसेच अगदी बुळे/आणि नेहमीच पड्+रड धोरण वाले राहू नये हीच सदिच्छा !!!! प्र.मात्र नाखु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
य
याॅर्कर Sat, 12/26/2015 - 06:48 नवीन
त्यासाठीच मोदी काल पाकिस्तानात उतरले होते. . . (मोदीभक्तांनी हलके घेणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 07:10 नवीन
"मग भारत आणि इतर राष्ट्रांत काही फरक नाही म्हणायचा." मला अगदी याच्या उलट म्हणायचे आहे. भारत आणि इतर राष्ट्रांत फरक आहेच. किंबहुना प्रत्येक राष्ट्र हे वेगळेच आहे आणि प्रत्येक राष्ट्राला आपले वेगळेपण जपण्याचा आधिकार आहे. इतरांबद्द्ल आदर बाळगताना स्वतःचे आचार व सामाजिक संकेत जपण्याचा आधिकार प्रत्येक राष्ट्राला आहे. जागतिक प्रवाहांमुळे बदल हे नैसर्गिक रितीने होतातच पण जबरदस्तीने हे घड्वून आणणे तेही कोणाला तरी आवडणार नाही म्हणून करणे हे चूकच आहे. "विविधतेत एकता,इन्स्क्रिडिबल इंडिया,विश्वबंधुत्व या गोष्टी गुंडाळून ठेवाव्या लागतील." विविधतेत एकता-ह्यातिल एकता हा शब्दच नेहमी महत्वाचा का? विविधताही जपायला हवी का नको? इन्स्क्रिडिबल इंडिया-ही पर्यटन व्यवसायाची प्रमोशनल मोहीम आहे. ह्याचा इथे काय संबंध? विश्वबंधुत्व-हो चारचौघात बोलायला ठीक आहे. पण आपला स्वार्थ महत्वाचा. फारसा व्यवहारीक उपयोग नाही. म. गांधी, अहिंसा हे जगात चलती असणारे शब्द आहेत. तोंडावर सर्व सहमत होतात म्हणून नेहमी त्यांचा वापर करावा पण प्रत्यक्षात जे करायचे तेच करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर
म
माहितगार Sat, 12/26/2015 - 07:20 नवीन
म. गांधी, अहिंसा हे जगात चलती असणारे शब्द आहेत. तोंडावर सर्व सहमत होतात म्हणून नेहमी त्यांचा वापर करावा पण प्रत्यक्षात जे करायचे तेच करावे.
=))=)) त्याने काँग्रेसतयार होते ? =))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 08:01 नवीन
काँग्रेसने हेच करून ६० वर्षं राज्य केलं. पण ही ट्रीक जागतीक राजकारणात वापरली नाही ही त्यांची घोड्चूक झाली. तिथे मात्र ही मूल्ये खरच आचरणात आणल्याने आपली एक कमकुवत राष्ट्र ही प्रतिमा बनली. मोदींनी ही चूक सुधारावी ही इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
न
नगरीनिरंजन Sat, 12/26/2015 - 09:10 नवीन
तुम्ही नक्की पृथ्वीवरच राहता ना? स्टेट आणि चर्चचे सेपरेशन करण्यासाठी पाश्चात्य देशांमध्ये चळवळी झालेल्या आहेत. पूर्वीच्या त्यांच्या नेत्यांनी गुलामगिरीचा आधार घेतला म्हणून आता थोडे मूर्ख लोक सोडले तर कोणीही गुलामगिरीचे समर्थन करत नाही. रेसिझम, जेंडर बायस इत्यादींविरुद्ध विरुद्ध तिथे कडक कायदे आहेत आणि त्यांची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात होते. उगीच नाही लोक धडपडत तिथे जायला. असल्या भेदभावाच्या प्रचाराला बळी पडणाराही गट तिथे आहे. उदा. अमेरिकेतल्या उजव्या रिपब्लिकन पक्षाचे मतदार बहुतेक कॉलेजलाही न गेलेले व फारसे कौशल्य नसलेले बिनडोक लोक असतात. आपल्याकडे मात्र चांगले शिकलेले व समाजातले अग्रणी लोक या उजव्या विचारधारेच्या विषारी प्रचाराला बळी पडतात हे भारताचे दुर्दैव आहे. यात बहुतेक उच्चवर्णीय लोक असतात असे निरीक्षण आहे. त्यांना बहुधा पूर्वीची त्यांची अत्यंत फायदेशीर वर्णव्यवस्था पुन्हा येईल अशी आशा वाटते की काय कोण जाणे? निम्नवर्णियांना हिंदु धर्माबद्दल इतका कळवळा नाही. आणि पूर्वीही झालेल्या धर्मांतरात निम्नजातीय लोकांनीच धर्मांतर केले व ते सग्ळेच्या सगळे जबरदस्तीने नव्हते. हिंदू धर्मात आपल्याच लोकांना कमी अपमानलारक वागणूक मिळालेली नाहीय. असो. चिंचवडच्या मोरया गोसाव्याला झापणार्‍या राजांचा धर्म व राज्यकारभार वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न होता असे मला वाटते. बाकी तुमची पेरणी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 09:50 नवीन
व सुदैवाने आजुबाजुचे जग चिकित्सकपणे पहातो स्वतःच्या विचारांनी व थोडंफार वाचनही करतो. प्रगत देशांचे कायदे, नियम हे स्वतःसाठी व इतरांसाठी नेहमीच वेगळे होते, आहेत व राहतील. इतकं सगळं आहे तर इराक्मधील हल्ला खोट्या माहीतीवर आधारीत कसा झाला? त्याबद्द्ल बुशवर काय कारवाइ झाली? ओसामाला मारणे कुठल्या कायद्यानुसार वैध होते? (मी अयोग्य होते असे म्हणत नाही पण कायदेशीर बाजू विचारतोय. त्याला ठेचला हे योग्यच.) चीन्मधील युद्ध कैद्यांवर रासायनीक व जैविक अस्त्रांच्या चाचण्या करणार्या जपानी संशोधकावर युद्ध गुन्हेगार म्हणून कारवाई न करता त्याला अमेरिकेत नेउन त्याला रासायनीक व जैविक अस्त्रांच्या संशोधनासाठी वापरले. ते सोडा भोपाळ दुर्घटनेबद्द्ल अमेरिकेत काय कारवाई झाली? तुम्ही म्हणाल भारत सरकार किंवा दुर्घटनाग्रस्त व्यक्तीनी तेथे केस का केली नाही? पण इतक्या मानवतावादी लोकशाही मानणार्या देशातील न्यायालये स्वतःहुन चौकशी करु शकत नाहीत? तेव्हा दाखवायचे व खायचे दात हे वेगळेच असतात हीच जागतिक नीती आहे. ज्यांना भाबड्या विचारांनी मूर्खांच्या नंदनवनात रहायचे आहे त्यांनी अवश्य रहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sat, 12/26/2015 - 10:13 नवीन
इराकच्या हल्ल्यात धर्माचा काहीही संबंध नाही. चष्मा काढून वाचन करावे ही विनंती. धर्म, वर्ण, जात-पात याचा वापर करुन आपल्याला हवे तसे जनमत करुन घेणारा एक वर्ग आहे. त्या वर्गाला तुमच्या इतिहासाबद्दल काही देणे घेणे नाही फक्त लोकांचे लक्ष भलत्या गोष्टींकडे वळवून आणि काल्पनिक शत्रू निर्माण करुन स्वतःला हवे ते मिळवणे हे त्या वर्गाचे ध्येय असते. हे सध्याचे वास्तव आहे पण लोक आपसात भेदभाव आणि भांडणे करुन त्यांना हवे ते देत राहतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/26/2015 - 09:35 नवीन
+१ योग्य किंवा अयोग्य हा प्रश्न अलाहिदा, पण वस्तूस्थिती अशीच आहे ! माझा एक जर्मन मित्र अज्ञेयवादी, पण बराचसा बौद्धधर्माकडे झुकणारा आहे. त्याला सद्य जागतिक राजकारणात बराच रस आहे. त्याने मला एकदा विचारले, "आमचा देश सेक्युलर आहे. पण तेथे ख्रिस्चन बहुसंख्य असल्याने "आमचा देश ख्रिश्चन आहे" असे म्हणणे किंवा मोठ्या राजकीय पार्टीच्या नावात "ख्रिश्चन" हा शब्द असणे किंवा कोणी "मी ख्रिश्चन आहे" असे म्हणणे असे विचित्र किंवा वाईट समजले जात नाही. मग तुमच्या देशात "हिन्दूइझम" इतका वाळीत टाकल्यासारखा का आहे ? मी अर्थातच नि:शब्द !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
न
नगरीनिरंजन Sat, 12/26/2015 - 19:03 नवीन
हिंदूईझमलाला आक्षेप नाही. मूलतत्त्ववादी हिंदुत्वावर टीका केली जाते. वारी, गणशेत्सव, नवरात्र, दिवाळी हे व इतर हिंदू सण आणि हिंदू रितीरीवाज सुखैनैव चालू आहेत. उगाच हिंदू खतरेमें म्हणणार्‍या लोकांना विरोध आहे. हिंदूंना नाही. ज्यांना हिंदूंना विरोध होतो असे वाटते ते प्रोपागांडाचे बळी आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 12/26/2015 - 19:57 नवीन
"भारतातील सद्य राजकारणात इतर धर्माच्या लोकांनी छातीवर हात ठोकून मी अमूक धर्माचा आहे असे वारंवार म्हटलेले चालते. इतर धार्मिक नाव व अजेंडा असलेल्या पक्षांशी तथाकथित सेक्युलर पक्ष सहज गठबंधन करतात, पण केवल हिंदुत्ववादी असलेल्या किंवा आरोप असलेल्या व्यक्तीकडे व पक्षांकडे दुजाभावाने पाहिले जाते." याकडे त्या मित्राचा रोख होता. सर्वसाधारपणे सजग परदेशी व्यक्तिंना भारतातल्या "राजकारणातले राजकारण" समजते आणि ते त्याच्याकडे काहीश्या आश्चर्याने बघतात असा माझा अनुभव आहे... मग ते अर्थकारण असो, धर्मकारण असो, अथवा परदेशांशी व्यवहार करताना दाखवलेला कणखरपणा (अथवा त्याचा अभाव) असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sun, 12/27/2015 - 03:47 नवीन
मग ते पुरेसे अभ्यासू नाहीत असे म्हणावे लागेल. कारण एनडीएमध्ये सगळेच पक्ष हिंदुत्ववादी नव्हते. उदा. नितीशकुमार आधी एनडीएलाच सपोर्ट करत होते. ते का दुरावले त्याची कारणे वेगळी आहेत. हिंदुत्ववादी व त्यांचे मित्रपक्ष अनेक राज्यांत व केंद्रात सत्तेवरही आलेत. बाकीचे धार्मिक पक्ष आले नाहीत. तरीही असा प्रचार करत राहणे ही गरज बनली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/27/2015 - 08:39 नवीन
तुम्हीच वर म्हटल्याप्रमाणे नितिशकुमार मोदी पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणुन जाहीर केले गेल्यावर आपल्या हितसंबंधाना (पंतप्रधानपदाच्या दाव्याला) धोका निर्माण झाला म्हणुन एनडीएतून बाहेर पडले हे उघड गुपित आहे. पण बाहेर पडताना त्यांनी हिंदुत्ववादीत्वाच्या (हे म्हणजे काही अस्पृश्य आहे असे दाखवत) मुद्द्यावरूनच गदारोळ केला होता. भारतात हितसंबंध असलेल्याना हे विसरणे सोपे जाते, पण त्रयस्थ अवलोकन करणार्‍याला हे दिसायला आणि दाखवायला करायला काहीच अडचण पडत नाही. तुमची मते तुम्हाला योग्यच वाटतील यात शंका नाही. मी माझ्या संपर्कात असलेल्या व सजगपणे आंतरराष्ट्रिय राजकारणाचे अवलोकन करत असणार्‍या काही जणांचे मत दिले आहे. त्यांचे भारतात कोणतेही हितसंबंध नसल्यामुळे त्यांची मते नि:पक्षपाती असण्याची जास्त शक्यता आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Sun, 12/27/2015 - 16:40 नवीन
माझेही काही हितसंबंध नाहीत. भाजप जाऊन काँग्रेस आल्याने मला घबाड मिळणार नाही. पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि हिंदुंवर अन्याय होतो अशा कंड्या पिकवण्यात व विकास सोडून भलतीकडे लोकांचे लक्ष वळवण्याय काही लोकांचे जरुर हितसंबंध आहेत. त्यासाठी आपल्याला सोयीस्कर अशी मतेच ग्राह्य धरणे हा कन्फर्मेशन बायस आहे पण अर्थातच तुम्हालाही ते चुकीचे वाटणार नाही. त्यामुळे वाद इथेच थांबवू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 12/28/2015 - 09:02 नवीन
पण हिंदु धर्म धोक्यात आहे आणि हिंदुंवर अन्याय होतो अशा कंड्या पिकवण्यात व विकास सोडून भलतीकडे लोकांचे लक्ष वळवण्याय काही लोकांचे जरुर हितसंबंध आहेत. याबाबत सहमती आहेच. प्रत्येक धर्मात असे हितसंबंधी आहेत. पण, त्यांना सर्वांना एकाच तराजून तोलले जात नाही ही आजची मुख्य समस्या आहे. वरच्या मोदी-नितीशकुमार वादात नितिशकुमारांना एनडीएतून वेगळे होताना मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाल्याने कम्युनॅलिझम वाढेल या दिशाभूल करणार्‍या सोईस्कर (व निर्धोक) टीकेची मदत नितीशकुमारांना घ्यावीशी वाटली आणि त्याबाबत अपेक्षेप्रमाणे फारतर थातूरमातूर टीका झाली. त्याअगोदर अनेक वर्षे भाजपबरोबर एनडीएत सत्ता उपभोगताना तो पक्ष नितीशकुमारांना कम्युनल वाटत नव्हता ! भारतात प्रत्येक पक्षाने धार्मिक लांगुलचालनाचा आधार घेतलेला आहे. तसे करणे एखाद्या पक्षाच्या / एखाद्या धर्माच्या बाबतीत "सेक्युलर" तर दुसर्‍याच्या पक्षाच्या / धर्माच्या बाबतीत "कम्युनल ठरते", हा विरोधाभास ठळकपणे दिसतो, ते काही गुपित नाही... ते मानणे न मानणे प्रत्येकाच्या नजरेवर अवलंबून आहे. ते एखाद्या त्रयस्थ व्यक्तीने ओळखले तर आश्चर्य नाही व त्याचे मत "भारतिय पद्धतिने सोईस्कर कारणे देऊन" खोडून काढणे मला जमत नाही... कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते. सद्याच्या भारतिय राजकारणात मोदींच्या विकासाच्या मुद्द्याचे जेवढे नुकसान विरोधी पक्षाने केले आहे त्यापेक्षा जास्त "तथाकथित हिंदू धर्मरक्षकांनी" विरोधकांच्या हाती आपल्या उथळ कृती/वचनांच्या पेटलेल्या मशाली देऊन केले आहे. यामागे भाजपमधील व भाजपसंबंधीत संस्थांमधिल अंतर्गत हेवेदावे व सत्तासंघर्ष असावेत असा माझा अंदाज आहे. असे संघर्ष एक सामान्य व्यावहारीक सत्य असले तरी, त्याने देशाला नुकसान होत आहे व देशाचे नुकसान करणारे कोणचेही वचन अथवा कोणाचीही कृती माझ्यासाठी निषेधार्हच आहे व असेल. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
न
नगरीनिरंजन Mon, 12/28/2015 - 10:17 नवीन
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.
१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नगरीनिरंजन Mon, 12/28/2015 - 10:18 नवीन
कदाचित याच कारणासाठी मी कधीच कोणत्याही पक्षाला आपली निष्ठा कायमस्वरूपी वाहू शकणार नाही. त्यापेक्षा देश, देशाचा फायदा आणि सत्य यांच्याशी माझी बांधिलकी कायम ठेऊन सर्वच पक्षांना एकाच तराजूत तोलणे मला योग्य वाटते.
१००% सहमत. काँग्रेसच्या राज्यात त्यांनी केलेल्या अल्पसंख्यांक तुष्टीकरणाच्या राजकारणाचाही मला तिटकारा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ए
एक सामान्य मानव Sun, 12/27/2015 - 07:39 नवीन
आपण मूलतत्त्ववादी हिन्दु संघटना कोण्त्या मानता. काही संघटना तशा असतील तर त्या फ्रिंज एलेमेंटस आहेत. पण हिन्दुत्ववादी संघटना ज्या कायद्याच्या चौकटीत काम करतात त्यांनाही त्याच चौकटीत टाकणे चूक आहे. उदा. भाजप, शिवसेना हे पक्ष किंवा रा. स्व. संघ ह्यांना मूलतत्त्ववादी म्हणणार का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 12/27/2015 - 09:11 नवीन
"असणे" आणि "विरोधकांनी तसे सोईस्कर लेबल चिकटवणे" याबाबतीत त्यांचा गोंधळ झालाय बहुतेक :) बर्‍याच जणांचा असा गोंधळ होतो... कधी खरोखर, कधी सोईस्कर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
न
नगरीनिरंजन Sun, 12/27/2015 - 16:43 नवीन
भाजप व शिवसेना तशा संघटना नाहीत पण राजकीय फायद्यासाठी बजरंग दल व तोगडियासारख्यांचा ते खुबीने वापर करुन घेतात. हेही तुम्हाला मान्य नसेल तर सोडून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
म
मितभाषी Fri, 12/25/2015 - 18:23 नवीन
सहमत. एवढय़ा मोठय़ा लेखाच्या फाफटपसार्यातून शेवटी हाती काहीच लागत नाही. =))
  • Log in or register to post comments
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 05:24 नवीन
हाती काही लागावे म्हणून मिपावर येता की काय? अहो एव्हढे नवे विचार मिळाले, स्वतः फार वाचन न करता व पुण्याला न जाता व्याख्यान ऐकायला मिळाले खूप झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितभाषी
म
माहितगार Sat, 12/26/2015 - 06:28 नवीन
जिथपर्यंत माझी व्यक्तीगत माहिती आहे भाषणांबाबतच्या तरतुदी कॉपीराइट कायद्यात इंटरनेटपुर्व कालापासून चालत आल्या आहेत. पब्लिक स्पीचेस कॉपीराईटेड असणे अभिप्रेत असावे (वृत्तसंस्थांना अपवाद केलेला असतो) . इंटरनेट आल्या नंतरच्या काळात ह्या संदर्भात काही बदल पाहण्यात आलेला नाही पण सहसा संसदेने बदल करे पर्यंत न्यायालय आहे त्या कायद्यानुसार चालते. हेच भाषण एखाद्या वृत्तपत्राने ऑनलाईन टाकले तर त्यांना परवानगी असावी इतरांना नसावी ह्यात काळानुसार विरोधाभास आला असेल असे वाटते. सर्वात महत्वाचे धागालेखकाने कॉपीराइट संदर्भात त्याच्या बाजूने काय काळजी घेतली ? मूळ वक्त्याकडून अथवा इतर श्रोत्यांकडून तो हेच बोलला आहे ह्याचा दुजोरा घेतला आहे का ? असे काही प्रश्न उपस्थीत होतात असे वाटते. (चुभूदेघे उत्तरदायकत्वास नकार-हा प्रतिसाद म्हणजे कायदेविषयक सल्ला नाही, कायदे विषयक सल्ल्यांसाठी अधिकृत तज्ञ सल्लागारांशी संपर्क साधणे उचित असते.)
  • Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे Sat, 12/26/2015 - 11:11 नवीन
लेख वाचला आणि प्रतिक्रियाही वाचल्या. लेखकाच्या मताच्या विरोधी मत मांडणार्‍यांनी लेखकाच्या मताचे ‘सप्रमाण खंडन’ केले आहे असे जाणवले नाही. मी काही इतिहासतज्ज्ञ नाही त्यामुळे मी ऐतिहासिक तपशीलात शिरू शकत नाही. तरी राजकारण मग ते शिवाजीराजांचे असो वा आधुनिक राजकीय पक्षांचे असो ते पर्सेप्शनवर बेतलेले असते.उदा. दादरी केसमुळे देशात असहिष्णू वातावरण झाल्याचे पर्सेप्शन तयार झाले. त्याचा विरूद्ध बोलणारे हिंदुत्ववादी म्हणतात तसे एक-दोन घटनांवरून असे निष्कर्ष काढणे योग्य नाही पण सेक्युलर म्हणतात तसे पर्सेप्शन आहे. असो. इथे तो मुद्दा नाही.अवांतराबद्दल क्षमस्व. शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते की नाही हा एक नेहमीचा प्रश्न. इथेही तीच चर्चा चालू आहे. यात दोन-तीन मुद्दे आहेत असे वाटते. १.धर्माधिष्ठित राज्यसत्ता म्हणजे काय ? जेव्हा कोणी शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते असे म्हटले की सेक्युलर पुरोगामी चवताळतात. याचे कारण म्हणजे हे सेक्युलर बहुतांश वेळा जन्माने हिंदू असतात (देशात ८०% हिंदू असल्याने सेक्यूलरातही हिंदूंचे प्रमाण जास्त असणारच) आणि भारताची धर्मावर झालेली फाळणी, अरब मुस्लीम देशातील इस्लामी राज्याच्या सुरस,क्रूर आणि चमत्कारिक कथा, त्यानंतर तालिबान, इस्लामी दहशतवाद , आताशा आयसिस वगैरे अशा वेगवेगळ्या रूपात धर्माधिष्ठित राज्याचे भयावह चित्र आपण पाहिलेले असते. आणि वर सर्व धर्म सारखेच अशा खुळचट कृत्रिम कल्पना आपल्यावर लादल्या गेल्या आहेतच. त्यामुळे धर्माधारित राज्य म्हणजे काहीतरी भयंकर पाप अशी आपली समजूत झाली आहे. कारण या राज्याबद्दलची आपली कल्पना ही प्रामुख्याने वर म्हटलेल्या इस्लामी राजवटी पाहून झाली आहे हे लक्षात घ्यायला हवे. इतर धर्माधारित राज्यांशी उदा. रोमन साम्राज्याशी आपला दैनंदिन पातळीवर संपर्क आला नाही. ब्रिटीश सत्तेने जरी ख्रिश्चन धर्मप्रसाराला मुक्तहस्त दिला असला तरी व्यावहारिक अंमलबजावणीच्या पातळीवर त्यांचे राज्य आधुनिक होते. या सत्तेने आपल्याला कायद्याच्या आधुनिक राज्याची सवय लावली. त्यामुळे आज कोणी हिंदू राज्य असे म्हटले की लगेच हिंदू तालिबान वगैरे शब्द ऐकू येतात. मग शिवाजीराजांचे राज्य हिंदू राज्य होते किंवा संघाचे प्रस्तावित राज्य हिंदूराज्य आहे असे म्हटले की समीक्षकी भाषेत सांगायचे तर त्यावर आपण तालिबानीकरणाचा आरोप करतो. अर्थात या भीतीला हिंदू आततायी आणि त्यांना मिळणारी अवास्तव प्रसिद्धीही एक कारण आहे. पण असे करताना हिंदू-मुस्लिम-ख्रिश्चन आदींना एकाच पातळीला आणून (अफूची गोळी न्याय) ,त्यांची विचारपरंपरा आणि धार्मिकतेच्या इतिहासाकडे सोयीस्कर कानाडोळा करतो. जणू काही हे तीनही धर्म म्हणजे मोबाईल फोन सर्विस प्रोवायडर आहेत आणि त्यांच्यात गुणात्मक फरक नसून कधीही इकडून तिकडे जाण्याची पोर्टाबिलिटी आहे. २.दुसरा मुद्दा शिवाजीराजांना सेक्युलर ठरवण्याच्या अट्टाहासाचा. भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट हा नेहरूवियन समाजवादी विचार आपल्यात पद्धतशीरपणे भिनवला गेला आहे. म.गांधींची हत्या एका हिंदू मराठी ब्राहमणाने केली हे दिवसातून शंभरवेळा ऐकवले जाते मात्र भारताची फाळणी धार्मिक आधारावर झाली हेही पद्धतशीरपणे विसरायला लावले गेले आहे. तेच कश्मीरी हिंदूंच्या हकालपट्टीबाबत.जणू असे काही कधी घडलेच नाही. याचे कारण म्हणजे नव्या पिढीने समजा फाळणीबद्दल चिकित्सा करायचा प्रयत्न केला,'अखंड भारत का नाकारला' असे प्रश्न उभे केले की त्याला सेक्यूलर उत्तरे शोधणे अडचणीचे होते. फाळणी कितीही दुर्दैवी घटना असली तरी माणसाच्या इतिहासातील एक महत्वाची घटना म्हणून निव्वळ अॅकेडमिक हेतूने तरी आपण त्याचे काही स्मारक केले आहे का, मला माहिती नाही. हीच गोष्ट १९७५ च्या आणीबाणीबाबत. या वर्षी प्रथम मी सरकारी डीडी न्यूजवर आणीबाणीविषयी सविस्तर डॉक्युमेंटरी सीरीज पाहिली. जो जतन करणे सहज शक्य आहे/होते अशा आधुनिक इतिहासाबद्दलच आपली इतकी अनास्था आणि लपावाछपवी करणारी अप्रामाणिक भूमिका असताना शिवाजीराजांच्या इतिहासाबाबत आपण आपल्या आजच्या राजकीय भूमिकेशी सुसंगत अशी सोयीस्कर भूमिका घेतो यात नवल ते काय ? याबद्दल महाराष्ट्रभूषण पुरस्कारवादानंतर मुक्ता दाभोलकरांच्या पत्राला उत्तर म्हणून लोकसत्तेत पत्र दिले होते. ते इथे वाचता येईल. त्यातील एक मुद्दा असा-
ज्याप्रमाणे संघ परिवारावर स्वत:चे ‘हिरो’ नसल्यामुळे सरदार पटेल, नेताजी बोस, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर आदींचा वारसा पळवण्याचा आरोप होतो त्याचप्रमाणे पुरोगामी चळवळीचेही होऊ घातले आहे की काय अशी शंका येते. शाहू-फुले-आंबेडकर आदी युगप्रवर्तक विचारवंतांना त्यांच्याच अनुयायांनी आणि पुरोगामी राजकारण्यांनी जातींच्या क्षुद्र बंधनात अडकवल्यामुळे त्यांचे ‘अपील’ मर्यादित झाले आहे याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे आता ‘मास अपील’ असलेल्या शिवाजीराजांना आपल्या धर्मनिरपेक्ष कळपात ओढण्याचे आणि त्यानिमित्ताने हिंदुत्ववादी राजकारण्यांच्या हातून एक हुकमी मुद्दा काढून घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे हेही ‘संधिसाधू’ राजकारणच आहे.
मग उदा. ज्याप्रमाणे शिवाजीराजांचा उदोउदो करणारे हिंदुत्ववादी पक्ष त्यांच्या किल्ल्यांच्या जतनासाठी काही करत नाही अशी ओरड होते त्याचप्रमाणे स्वत:ला अभ्यासू, सुशिक्षीत,विवेकवादी, अभिजन वगैरे म्हणवून घेणारे शिवाजीराजांबद्दल प्रेम दाखवणारे जे पुरोगामी (हा शब्द वापरल्याशिवाय आजकाल पुढे जाता येत नाही) आहेत त्यांनी शिवाजीराजांचा इतिहास जपण्याबद्दल , त्याचा अभ्यास करण्याबद्दल कुठले ठोस प्रकारचे काम केले ? उलट जेम्स लेन प्रकरण आणि त्यानंतरचे भांडारकर संस्था जळीतकांड वगैरे प्रकरणात भूमिका घ्यायची वेळ आली तेव्हा मात्र हेच लोक एकतर गप्प राहिले किंवा जे बोलले ते सेक्युलर शिवाजींबद्दल असलेली आपली अॅकेडमिक चिकित्सेची भूमिका सोडून शिवाजीराजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत, त्यांच्याबद्दल अवमानकारक गोष्टींनी भावना दुखावतात वगैरे जस्टीफिकेशन देत राहिले आणि वेळ मारून नेली. ३.हिंदुत्ववादी असोत वा सेक्यूलर असोत ,प्रत्येकजण आपण शिवलेल्या अंगरख्यात शिवाजीराजांना बसवून पाहण्याचा प्रयत्न करत राहणार आणि तात्पुरते राजकारण करत राहणार. शिवाजीराजांबद्दल एकवेळ ठोस माहिती मिळेल आणि सर्वजण एक कॉमन भूमिका घेऊ शकतील पण आधुनिक भारतातले नेहरू, गांधी, बोस, मोदी इ.बाबत खरी माहिती लोकप्रिय माध्यमे, शैक्षणिक अभ्यासक्रम इ.द्वारे कधीही समोर यायची शक्यता नाही. तोवर पुतळे व स्मारके आहेतच.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 12:10 नवीन
'सेकुलर' व 'पुरोगामी' हे दोन नवीन धर्म आहेत जणू, असं आपल्या प्रतिसादावरून वाटतंय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे
ए
ए ए वाघमारे Sat, 12/26/2015 - 12:51 नवीन
खरेच तसे दिसते.कम्युनिस्टांचा आवडता शब्द वापरायचा तर हा एक नवा वर्गसंघर्ष आहे. विशेषत: पुरोगामी नावाची छत्री तर इतकी मोठी आहे की निधर्मी,समाजवादी,मानवतावादी,विवेकवादी,बुद्धिप्रामाण्यवादी,अज्ञेयवादी,नास्तिक,अंधश्रद्धाविरोधी,सत्यशोधक इ.इ.अनेक वादी-संवादीस्वर आपला 'विवेकाचा आवाज बुलंद'करत या पुरोगामित्वाच्या वळचणीला जाऊन उभे राहतात आणि आपण पुरोगामी असल्याचा दावा करतात.मात्र पुरोगामित्वाच्या प्राबल्यासाठी प्रसिद्ध असलेल्या एका मराठी संस्थळावर मी 'पुरोगामी होण्यासाठी मला नेमके काय 'करावे' लागेल?'असा प्रश्न विचारल्यावर नेमके उत्तर मात्र कोणी दिले नाही.असो.हे अवांतर होते आहे (आणि कंटाळवाणे तर आहेच आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 12:58 नवीन
ज्याप्रमाणे धर्मात चिकित्सा व विरोधी मताला विरोध असतो तसच ह्या पुरोगामी व सेकुलर लोकांचं आहे. उजव्या विचारांचा म्हणून ब्रांडेड माणूस काहीही बोलला की तो काय बोलतोय हे ऐकूनही न घेता ठरलेल्या प्रतिक्रिया येतात. जशा वरील लेखावर. एकही पुरावा न देता वा मुद्याला स्पर्श न करता थेट मतप्रदर्शन. धर्ममार्तंड तरी दुसरं काय करतात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Sat, 12/26/2015 - 13:19 नवीन
खरं आहे तुमचं. कोणत्याही विचारांचा असो, सगळ्यांचीच असहिष्णुता वाढली आहे. काय कारण असावे बरे..? (जगण्याच्या मूलभूत विवंचना संपल्यात की वर्गसंघर्ष तीव्र केला जातोय मुद्दाम..?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक सामान्य मानव
ए
एक सामान्य मानव Sat, 12/26/2015 - 15:35 नवीन
संदीपजी खरं पहाल तर पुरोगामीच जास्त असहिष्णु असतात. म्हणजे पहा एखादा हिंदुत्ववादी म्हणेल की मला इतर धर्मांबद्द्लही तितकाच आदर आहे. वाजपेयींसारखा अत्यंत सहिष्णु नेता उजव्या भाजपमधुन पंतप्रधान झाला. पण उलट कधी शक्य आहे का? एखाद्या समाजवादी किंवा पुरोगामी नेत्याने म्हणले की मी हिंदु असल्याचा मला अभिमान आहे तर तो दुसर्या दिवशी पक्षाबाहेर जाईल किंवा मी बोललोच नाही अशी सारवासारव करावी लागेल. सर्व पुरोगामी नेते (आणि भाजपाईसुद्धा) इफ्तारला टिपिकल मुस्लीम टोपी घालतात. पण कोणी पुरोगामी नेता भगवा साफा, टिळा अशा वेशात पाहिलाय का? अवांतरः चेपुवर एक फोटो आला होता इफ्तारचा. त्यात हमीद अन्सारी, ओमर अब्दुल्ला, सलमान खुर्शीद इ. साध्या वेषात म्हणजे विदाउट टोपी पण झाडुन सारे पुरोगामी हिंदु असुन टोप्या घालुन. कदाचित ह्यालाच सहिष्णुता म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
भ
भिकापाटील Sat, 12/26/2015 - 18:47 नवीन
मिपा राॅक्स. चांगली चर्चा. वर्णवर्चस्वाचा फूकाचा दांभिकपणा इथे चालत नाही. नाहीतर मायबोली आणि मिपा त काय फरक राहिला असता?
  • Log in or register to post comments
ल
लालगरूड Sun, 12/27/2015 - 04:32 नवीन
याआधी कुठे लिहला होता का लेख? मला whatsapp वर आला होता तुमच्या लेखाच्या आधी
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 12/27/2015 - 06:29 नवीन
भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट हा नेहरूवियन समाजवादी विचार आपल्यात पद्धतशीरपणे भिनवला गेला आहे.
जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्ती आणि विचारांना मर्यादा असतील, किंवा प्रत्येकाने सहमत व्हावे असे नाही, नेहरुंवरील राग-लोभ राजकीय विरोध हे सगळे समजूनही भारतीय परंपरेतले ते सगळे वाईट अस नेहरुंनी सरसकटीकरण केलं आहे ? आणि आमच्या वाचण्यात आले नाही असे झाले आहे का ? याच्या साठी कृपया संदर्भ उपलब्ध होऊ शकेल का ? चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास आभारी असू Image removed.
  • Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे Mon, 12/28/2015 - 06:00 नवीन
ते माझे मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 12/28/2015 - 07:11 नवीन
ते माझे मत आहे.
नक्कीच प्रत्येकाला आपले व्यक्तीगत मत बनवण्याचा ठेवण्याचा अधिकार आहे आणि त्या बद्दल आदरही. पण आपण असे सरसकटीकरण असलेले मत बनवताना जवाहर नेहरुंच्या काही साहित्याचे वाचन वगैरे केले आहे, का इतर कुणाच्यातरी एक तर्फी दृष्टीकोणावर आधारले आहे ? व्यक्तीपूजा टाळणे श्रेयस्कर आणि त्यासाठी गरज असल्यास मुद्दाम उकरुनही हेतुपुरस्सर टिका करण्यास अथवा राजकीय कारणाने एकतर्फी टिकाकरण्यास मुळीच हरकत नाही. अर्थात व्यक्तीगत मत बनवताना आणि एकतर्फी टिका करताना तसे करण्यासाठी पुरेसे सयुक्तीक आधार असतील तर इतरांसमोर केलेल्या मांडणीस विश्वासार्हता येऊ शकते किंवा कसे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा