Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरीच गरज आहे का?

ह
हेमंत लाटकर
Tue, 12/29/2015 - 14:20
🗣 146 प्रतिसाद
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज. प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
26035 वाचन

💬 प्रतिसाद (146)
स
सर्वसाक्षी Wed, 12/30/2015 - 05:58 नवीन
आपल्या सुखाची याख्या आपण करावी. त्याच सरसकटीकरण होउ शकत नाही. कुणाला तुम्ही म्हणत असलेला हव्यास म्हणजे महत्वाकांक्षा, प्रगती वाटत असेल तर कमी साधनात राहणे हे कर्तव्यशून्यतेचे वाटेल - ही 'ठेवीले अनंते' भावना वाटेल. 'जीवनशैली आणि व्याधी' अशा आशयाच्या एका कार्यक्रमात एका डॉक्टरने सांगितले होते प्रगतीची आस, स्पर्धा, उत्कर्षचे ध्येय, सतत जिंकण्याचा ध्यास यामुळे अनेक रोग जडु शकतात. ऐकायला हे बरे वाटते पण प्रत्यक्षात असं न वागणारे कर्मचारी कोणत्याही आस्थापनेला परवड्त नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 12/30/2015 - 06:05 नवीन
एका कार्यक्रमात एका डॉक्टरने सांगितले होते प्रगतीची आस, स्पर्धा, उत्कर्षचे ध्येय, सतत जिंकण्याचा ध्यास यामुळे अनेक रोग जडु शकतात
ह्याला कुठलाही विदा नाहीये. हेला काकांसारखे हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती असले विचार असलेले खूप लोक भारतात आहेत आणि ते डॉक्टर पण त्यातलेच असतील. गम्मत म्हणजे असले विचार असले तरी त्यांची कृती मात्र ह्या विचारांच्या अगदी विरुद्ध असते.
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Wed, 12/30/2015 - 06:12 नवीन
"हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती" या सारखे फालतू विचार ठेऊन मागच्या २ पिढ्या शक्य असून सुद्धा काहीच न कमावता बसल्या . आणि नंतर माझ्या आधीच्या पिढीला गेली ३०-४० वर्षे जो त्रास सहन करावा लागतोय तो बघतोय . यापेक्षा जमेल तेवढे पैसे कमावणे कधीही प्रिफर करेन . . बाकी . असेल विचार मांडायला आधी करोडपती व्हावं लागतं हे हि खरं . (आमटे इत्यादी मंडळी अति दुर्मिळ अपवाद आहेत )
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/30/2015 - 06:37 नवीन
आधी करोडपती व्हावं लागतं हे हि खरं>>> +१००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अर्धवटराव Mon, 01/04/2016 - 23:10 नवीन
त्यांनी त्यांची श्रीमंती कमवायला अपार कष्ट उपसलेत, ध्यास घेतला. त्यांची श्रीमंतीची व्याख्या इतरांपेक्षा वेगळी होती हे मात्र खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 06:34 नवीन
लाटकर साहेब आपले उदाहरण मुदलातच गंडलेले आहे. मुंबईत माझा ५६० चौ फुटाचा एक बेड रूम चा (तीनच खोल्यांचा) फ़्लैटच एक कोटी रुपयांचा आहे. या रकमेच्या दोन महिन्यांच्या व्याजातच ( दीड लाखात) आपण म्हणता त्या सर्व "बैठकीत इम्पोर्टेड सोफा, मोठ्या स्क्रिनचा टिव्ही, प्रत्येक रूम मध्ये एसी, स्वयंपाक घरात किचन ट्राॅली, फुड प्रोसेसर, मायक्रोआेव्हन" वस्तू येतात. मग या गोष्टीवर आपण म्हणता तसा "इतका खर्च" कसे म्हणता येईल.आपल्या वरील प्रतिसादाप्रमाणे "चार रूमचा फ्लॅट घरात आवश्यक गोष्टी असल्या तरी माणूस समाधानी राहू शकतो." यातील चौथी रूम विकत घ्यायला ( माझ्या तीन रुमच्या घरा ऐवजी) मला २५ लाख रुपये अतिरिक्त खर्च येईल त्यापेक्षा त्या रकमेच्या व्याजात मी घरातील सुखसोयीच्या वस्तू घेऊ शकतो. म्हणून मुंबईतील माणूस मोठे घर घेण्यापेक्षा आपण म्हणता तशा चैनीच्या वस्तू घेताना दिसतो. विश्वास बसत नसेल तर गिरगाव येथे चाळीच्या दोन्ही खोल्यांना लावलेली वातानुकूलन यंत्रे पाहून घ्या.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Wed, 12/30/2015 - 06:47 नवीन
त्यांचा वन बी एचके का उल्लेख तुलनात्मक असावा. तीन खोल्यांच्या घरातही मानूस सुखाने राहू शकतो तर चार किंवा पाच खोल्यांच्या घराचा हव्यास कशाला अशा अर्थी असावे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मृत्युन्जय Wed, 12/30/2015 - 11:17 नवीन
सुखाने तर माणूस दोन खोल्यांच्या घरातही राहु शकतो, एका खोलीतही राहु शकतो. मला वाटते "गरज" शब्दाची व्याख्या प्रत्येक माणसाप्रमाणे बदलत असते आणि प्रत्येकाने स्वतःच्या उत्पन्नानुसार त्याचा विचार करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 06:39 नवीन
परिस्थिती कायम परिवर्तनीय आहे. तस्मात, मनःस्थिती प्रसन्न ठेवा, मग कशानं काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/30/2015 - 06:49 नवीन
शब्दांच्या निवडीबद्दल तुमच्याकडून चूक व्हावी...? सुविधा-साधनांतून मिळते ते 'सुख', पजेशन-मालकीहक्कातून येते ते 'सुख'. दुसर्‍यावर अवलंबून असतं ते 'सुख'. सुख हे परिस्थितीवर अवलंबून असतं. तुम्ही सुख हा शब्द आनंद ह्या अर्थी वापरला आहे. 'आनंद' मनःस्थितीवर अवलंबून असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 10:14 नवीन
सुख आणि आनंद हे समानार्थी शब्द आहेत आणि लेखातल्या मुद्याबद्दल मला जे म्हणायचंय ते एकदम सोपं आहे. दुसर्‍या बाजूनं पाहा, दु:खाचं कारण वस्तूचा आभाव किंवा परिस्थिती आहे असं वरकरणी वाटत असलं तरी खरं कारण `स्वतःचा स्वतःशी होणारा वियोग' (गेटींग डिसकनेक्टेड विथ सेल्फ) आहे. जर तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड असाल तर मनःस्थिती प्रसन्न राहाते आणि परिस्थितीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
स्पा Wed, 12/30/2015 - 10:37 नवीन
जर तुम्ही कायम स्वतःशी कनेक्टेड असाल तर मनःस्थिती प्रसन्न राहाते आणि परिस्थितीचा तुमच्यावर कोणताही परिणाम होत नाही.
क्या बात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
स्पा Wed, 12/30/2015 - 10:38 नवीन
थोडे अजून उलगडून सांगा ना सर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 10:52 नवीन
प्रतिसाद दिला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Wed, 12/30/2015 - 11:01 नवीन
लिंक उघडत नाहीये
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 11:09 नवीन
क्लिक केलं की प्रतिसाद दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
पैसा Tue, 01/19/2016 - 09:51 नवीन
समानार्थी नाहीत. आनंद आतून येतो, तर सुख कोणत्यातरी बाह्य गोष्टीसोबत येतं. म्हणूनच "तुम्ही सुखं विकत घेऊ शकता पण आनंद नाही" असं म्हटलं जातं. सुख आणि दु:ख हे दुसर्‍या कोणत्यातरी गोष्टीचे, वस्तूचे, व्यक्तीचे बोट धरून येतात मात्र आनंदात रहाणे हा प्रत्येकाचा चॉईस असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ह
होबासराव Tue, 01/19/2016 - 09:55 नवीन
छान प्रतिसाद नेमका असाच फरक किंमत आणि मुल्य ह्या मधे आहे... एव्हढे बोलुन मि माझे २ शब्द संपवितो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 06:57 नवीन
ठाकूर साहेब खरी समाजसेवा हि मुळात रक्तात असावी लागते. उगाच डॉ. प्रकाश आमटे करतात म्हणून मी सर्वसंग परित्याग करून समाजसेवा करण्यास गेलो तर मला ते झेपणार नाही. आणी मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही. डॉ. प्रकाश आमटे यांच्या विचाराची बैठक फार उच्च पातळीवर आहे.त्यांची जागा दीपस्तंभासारखी आहे. त्यांच्या प्रकाशात वाट काढणारी जहाजे आहोत आम्ही. मला ती विचारसरणी झेपणार नाही. वीरेंदर सेहवाग पहिल्या बॉलवर षटकार मारतो म्हणून मी मारायला गेलो तर मागून स्टम्पिंग होऊन बाद होण्यात काय हशील आहे? आम्ही दहावे अकरावे फलंदाज म्हणून वीस धावा दहा षटकात काढल्या तर संघाला तेवढीच मदत इतका साधा विचार आहे. तेंव्हा मला "सोसंल" तेवढीच "सोशल" सर्व्हिस मी करतो. त्यांनी हजारो आदिवासींचे कल्याण केले. मी माझ्या कुटुंबाबद्दलची कर्तव्ये पार पडून सुखासमाधानाने जगून दोनच माणसांचे थोडे फार कल्याण करू शकलो तरी मी समाधानी राहू शकेन अशी माझी विचारसरणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
द
देशपांडे विनायक Wed, 12/30/2015 - 07:18 नवीन
आता तुम्हाला भेटल च पाहिजे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 10:34 नवीन
प्रश्न : `मी कितीही उदात्त विचार ठेवले तरी आतून मनस्थिती प्रसन्न राहणार नाही.' असा नाही. तो कायम स्वतःशी संलग्न असण्याचा आहे. कारण मुळात तुम्हीच आनंद आहात. तस्मात, सुख किंवा आनंद बाहेरून येतं असं सकृद्दर्शनी जरी भासलं तरी ते तुम्ही स्वतःशी कनेक्ट झाल्यामुळे आलेलं असतं. उदाहरणार्थ, एव्हरेस्ट सर करून जर हिलरी कायमचा आनंदी झाला असता तर बहुतेक सगळे एवरेस्ट चढायच्याच मागे लागले असते. एवरेस्ट सर केल्यावर तो सुखी होतो कारण काही क्षण का होईना त्याच्या सगळ्या इच्छा संपल्यासारख्या वाटतात आणि त्या शांत मनःस्थितीत तो स्वतःशी कनेक्ट होतो. अर्थात, ही कनेक्टीविटी न कळल्यानं, एवरेस्टवरून खाली उतरल्यावर नव्या व्यावधानानं तो पुन्हा दु:खी होऊ शकतो कारण एवरेस्टवर किती वेळ थांबणार ? तस्मात, सुख वस्तूत नाही, तुम्ही सुख आहात. मग काम काहीही करा कारण कामाला अर्थ तुमच्यामुळे प्राप्त होतो. एकदा तुम्ही स्वतःपासून विलग झाला नाही की परिस्थिती तुम्हाला दु:खी करू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सोत्रि Wed, 12/30/2015 - 12:43 नवीन
गुरूदेव! _/\_ - (संक्षीना मिस करणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
स्पा Wed, 12/30/2015 - 12:48 नवीन
तस्मात, सुख वस्तूत नाही, तुम्ही सुख आहात. मग काम काहीही करा कारण कामाला अर्थ तुमच्यामुळे प्राप्त होतो. एकदा तुम्ही स्वतःपासून विलग झाला नाही की परिस्थिती तुम्हाला दु:खी करू शकत नाही.
चायला एकदम नवी थिअरी पोइंत हय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 13:19 नवीन
इथे बहुतेकांचा वस्तुसुखावर किंवा कार्यमौलिकतेवर भर आहे पण वस्तु किंवा कार्य हे व्यक्तीनिरपेक्ष आहेत. फ्लॅट सुखी करत नाही, तुम्ही सुखी होता. कार्य दु:ख देत नाही, त्याचा दुस्वास करुन आपण दु:खी होतो. त्यामुळे वस्तुप्राप्ती किंवा कार्यबदल व्यक्तीला सुखी अथवा आनंदी करु शकत नाही, कारण पुन्हा नवी वस्तुकांक्षा किंवा कार्याकांक्षा दु:ख निर्माण करु शकते. त्यामुळे जो आनंदी होतो त्याच्याशी (म्हणजे स्वतःशी) अनुसंधान असण्यात आनंद आहे. मग वस्तू असो की नसो आणि कार्य कोणतेही असो, त्यानं काही फरक पडत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा Wed, 12/30/2015 - 13:29 नवीन
सर, --/\--
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 13:47 नवीन
आम्ही "शरद तळवलकर" सारखे आहोत. कान्हा मात्र नसलेली सरळ माणसं. आमची पट्टी काळी दोन पांढरी पाच आम्हाला झेपत नाही. तेंव्हा पास
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 13:50 नवीन
बायकोने कांद्याची भजी किंवा भाजणीचे थालीपीठ केले कि तो दिवस किंवा सणावाराला छान साडी बिडी नेसून चार दागिने घालून सुहास्य मुद्रेने स्वागत केले तरी आमचे चार दिवस समाधानात आणि आनंदात जातात. एवढे उच्च विचार झेपत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक Wed, 12/30/2015 - 14:08 नवीन
एवढे उच्च विचार झेपत नाहीत तुम्ही CA चा अभ्यास का सुरू करत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 14:48 नवीन
अहो काही झेपत नाही म्हणून जीवशास्त्र घेऊन घोकंपट्टी करून डॉक्टर झालो. आता तुम्ही ते अकौंटस वगैरे सांगता कसं झेपणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
व
विवेक ठाकूर Wed, 12/30/2015 - 14:09 नवीन
आपणच आनंद आहोत हा फंडा आहे. त्यामुळे जी गोष्ट आपल्याला स्वतःपासून दूर नेते ती दु:ख देते. आनंदाला प्रमाण नाही कारण तो सदैव एकसारखा आहे. तस्मात, मोठी गाडी म्हणजे मोठा आनंद असं नाही किंवा लहान फ्लॅट म्हणजे दु:ख असंही नाही. हे एकदा लक्षात आलं की आपण स्वतःपासून दुरावत नाही. आणि अशी एकदा स्वतःशी कनेक्टेड असण्यातली खुमारी कळली की मग मन कायम प्रसन्न राहातं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सोत्रि Wed, 12/30/2015 - 16:42 नवीन
दंडवत स्विकारा! _/\_ - (कनेक्टेड) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
स्पा Wed, 12/30/2015 - 16:52 नवीन
कडक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
म्हसोबा गुरुवार, 12/31/2015 - 05:56 नवीन
कधी कधी एखाद्या टुकार गोष्टीतून काही अनमोल हाती लागतं ते असं. हेमंत लाटकरांचा हा धागा एकदम टुकार आणि भंगार आहे. अगदी "रिकामा सलुनवाला, पोचला दिल्लीला" पठडीतला. मात्र त्या निमित्ताने विवेक सरांचे या धाग्यावरील प्रतिसाद ही विचारी मनासाठी अक्शरशः मेजवानी आहे. त्यांच्या विचारांची सघनता, खोली लाजवाब. अध्यात्मविषयक साहित्यात उल्लेख होणारे आत्मज्ञान नेमके काय असू शकेल याचा अंदाज सरांच्या प्रतिसादातून येतोय. विचारांची ईतकी सुस्पष्टता आत्मप्रचितीशिवाय शक्य नाही. आज खुप दिवसांनी मिपावर लॉगिन केले त्याचे चिज झाले. असेच लिहित रहा विवेक सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/31/2015 - 10:39 नवीन
हेमंत लाटकरांचा हा धागा एकदम टुकार व भंगार आहे.
काही वेळा भंगारातून सोने मिळू शकते. पण ते कळण्यासाठी ज्ञानदेवांचा रेडा असून चालत नाही तर स्वतः मध्ये तशी विचार क्षमता असावी लागते. महाराज लोक सतसंगामध्ये बर्याच गोष्टी सांगतात पण ते स्वत:च ढोंगी असतात. उदा. आसाराम बापू अनिरूद्ध बापू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हसोबा
म
म्हसोबा गुरुवार, 12/31/2015 - 15:41 नवीन
ज्ञानदेवांच्या रेडयाने पैठणच्या ब्रम्हसभेत वेद म्हटले हो. तुम्हाला साधूवाण्याची कथा तरी सांगता येते का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/31/2015 - 16:12 नवीन
ज्ञानदेवांच्या रेडयाने पैठणच्या ब्रम्हसभेत वेद म्हटले हो.
ही एक कवीकल्पना आहे. ज्ञानेश्वर हे प्रगाढ पंडीत होते यात वाद नाही. वयाच्या चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली. म्हणून रेडा पंडीत असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हसोबा
व
विवेक ठाकूर Fri, 01/01/2016 - 04:29 नवीन
धाग्याविषयी त्यांची कमेंट खटकणारी आहे तरी त्यावर मी दिलेले प्रतिसाद अनुभवातून आलेले आहेत. मुळात आनंद काय आहे याविषयी उहापोह आहे, आणि धाग्यातल्या नेमक्या प्रश्नाची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे, कदाचित तुम्हाला उपयोगी होऊ शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
होबासराव Wed, 01/06/2016 - 08:53 नवीन
हेलाकाकांचे कोकिळ्व्रतात स्पेशलायझेशन आहे हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: म्हसोबा
स
स्पा Wed, 12/30/2015 - 06:49 नवीन
आस्तिक नास्तिक शांत झाले आता गरीब -श्रीमंत =)) असेही निरीक्षण आहे कि आस्तिक हे गरीब किंवा मध्यमवर्गीय असतात आणि श्रीमंत नास्तिक
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 12/30/2015 - 07:00 नवीन
स्पा एकदम चूक . शिर्डी, सिद्धिविनायक, लालबागचा राजा या देवस्थानांना मिळणाऱ्या देणग्या पाहिल्यास तर तुझे डोळे पांढरेच काय सप्तरंगी होतील. या देणग्या देणारे काय गरीब किंवा मध्यम वर्गीय असतात? मध्यमवर्गीय म्हणजे देवळात गेल्यावर खिशात सुटे पैसे मिळाले नाही म्हणून दहा रुपयाची नोट टाकावी लागली म्हणून अर्धा तास हळहळणारा माणूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ह
हेमंत लाटकर Wed, 12/30/2015 - 06:57 नवीन
हेला काकांसारखे हट्टीकट्टी गरीबी आणि रोगट श्रीमंती असले विचार असलेले खूप लोक भारतात आहेत.
मला गरीबीत खितपतच पडावे, स्वतःची प्रगती करूच नये, पैसा जमवूच नये असे म्हणायचे नाहीच. माझ्याकडेही चार रूमचा फ्लॅट, बाईक, काॅम्युटर, स्मार्टफोन (₹ 5000), साधा सोफा, crt tv अश्या गोष्टी आहेत. आता यापेक्षा जास्तीची काय गरज आहे यात व्यवस्थित चालते. काही जण याबाबतीत फारच हव्यास (महत्वाकांक्षा) करतात. मारूती कार असली तरी सेदान कारसाठी आटापिटा करतात (बर्याच जणाकडील कार सोम-शनि धुळ खात पडलेल्या असतात, ट्रॅफिकचा प्राॅब्लेम, नौकरीमुळे वेळ नसणे). बिल गेटस् दाम्पत्य स्वत: जवळील सर्व संपत्ती दान करणार आहेत. मग आपण, जास्तीचा हव्यास, दोन पिढ्याची संपत्ती जमविण्याची काय गरज आहे. मुलांमध्ये धमक असली तर ते स्वत: आपली प्रगती करतील.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 12/30/2015 - 07:02 नवीन
आता तुम्ही चर्चेचा सांधा बदलत आहात. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
हेमंत लाटकर Wed, 12/30/2015 - 07:27 नवीन
आता तुम्ही चर्चेचा सांधा बदलत आहात.
मी सांधा बदलला नाही. आमटे दाम्पत्याचे उदा. समाधानी जीवन जगणे कसे असते हे सांगण्यासाठी दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
प
प्रसाद१९७१ Wed, 12/30/2015 - 07:54 नवीन
आमटे दांपत्यानी अनेक वेळेला जाहीर रित्या सांगितले आहे की आम्ही जे करतो ते करतो कारण आम्हाला तसे करायला आवडते. आम्हाला कोणताही मोठेपणा देऊ नका. तसेच प्रत्येकाला जे आवडेत ते त्यानी करावे आणि समाधानी रहावे. कोणाला १० रुम चा बंगला आवडत असेल तर त्याची तुलना आमटे दांपत्याशी करायची काही गरज नाही. लोकांनी संपत्ती निर्माण करण्याचे कमी केले तर गरजवंत भुके मरतील. कोणी तरी ३ खोल्यातुन ५ खोल्यात गेले तर अनेक गवंडी, सुतार वगैरेंची २-३ महीन्याची सोय होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
अ
अद्द्या Wed, 12/30/2015 - 07:48 नवीन
हो पण त्या आधी त्यांनी कित्येक वर्षे मेहनत करून एवढी संपत्ती कमावून आपण आणि आपल्या घरच्यांना जगातल्या सर्व सुख सुविधा मिळवून दिल्या . आणि त्यांची मुले आता स्वतः कमवू शकतात असं समजल्या वर त्यांनी हे पूल उचललंय .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
प
प्रसाद१९७१ Wed, 12/30/2015 - 07:58 नवीन
काही जण याबाबतीत फारच हव्यास (महत्वाकांक्षा) करतात. मारूती कार असली तरी सेदान कारसाठी आटापिटा करतात (बर्याच जणाकडील कार सोम-शनि धुळ खात पडलेल्या असतात, ट्रॅफिकचा प्राॅब्लेम, नौकरीमुळे वेळ नसणे).
भारतातल्या ९५% लोकांच्या साठी ४ रूम चा फ्लॅट आणी बाईक ही मोठीच चैन आहे. आणि हेला काका, ती चैन तुम्ही करता आहात. तुम्हाला सेदान कार घेणार्‍यांवर बोट दाखवायचा काहीही अधिकार नाही. माझा पूर्वीचा जॉब च लोकां नी कार विकत घेण्यावर अवलंबुन होता. लोकांनी मारुती वरुन सेदान कडे वाट केली नसती तर मला बेरोजगार व्हावे लागले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
स्पा Wed, 12/30/2015 - 06:59 नवीन
हा सुबोध सरांचा आवडता विषय आहे असेही नमूद करू इच्छितो ;)
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 12/30/2015 - 07:55 नवीन
वरील लेखामध्ये तुम्हीच मांडलेले विचार तुम्ही स्वतः अंमलात आणले आहेत का? असल्यास "कसे अंमलात आणले" ते वाचायला आवडेल. ..आणि तुमच्या फ्लॅट, टीव्ही, कार वगैरे गरजा पूर्ण झाल्यानंतर वरील विचार मनात आले असतील तर तसेही सांगा..! :)
  • Log in or register to post comments
म
मयुरMK Wed, 12/30/2015 - 08:06 नवीन
जो तो आपाअपल्या परीने सुख शोधत असतो. शेवटी अरुन-फिरून माझे मन एकाच विचारावर येते. ''आपले सौख्य आपल्या विचारावर अवलंबून आसते
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Wed, 12/30/2015 - 08:34 नवीन
भारतातल्या ९५% लोकांच्या साठी ४ रूम चा फ्लॅट आणी बाईक ही मोठीच चैन आहे.
माझे म्हणने फक्त मध्यमवर्गीय लोकांसाठी आहे. मी पुणे मुंबईला राहत नाही त्यामुळे चार रूमचा फ्लॅट म्हणजे 1 कोटीचा नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा