Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

खरीच गरज आहे का?

ह
हेमंत लाटकर
Tue, 12/29/2015 - 14:20
🗣 146 प्रतिसाद
आनंदी समाधानी जीवन जगण्यासाठी.... पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट, महागडी कार, 40 इंची एलईडी टिव्ही, एेसी, मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन. हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी. बायकोची नौकरी. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड. मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे. मग त्यावर डाॅक्टरी इलाज. प्रकाश आमटे व मदांकिनी आमटे हे डाॅक्टर दाम्पत्य हिमलकसा सारख्या जंगल भागात काही सुविधा नसतांना किती आनंदी जीवन जगतात. नाही तर आपण व आपली मुले सर्व सोयी सुविधा असूनही करमत नाही, बोअर होते म्हणून किरकिर करतो.
वर्गीकरण
काथ्थ्याकुट

प्रतिक्रिया द्या
26035 वाचन

💬 प्रतिसाद (146)
आ
आदूबाळ Wed, 12/30/2015 - 10:38 नवीन
बरं... काय ठरलं मग? सेदान घेऊ की नको?
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Wed, 12/30/2015 - 10:40 नवीन
सेदान.......सूटे गिराण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
न
नाखु गुरुवार, 12/31/2015 - 05:41 नवीन
पण वापरू नका हट्टाने सगळीकडे चालत जा आणि सगळीकडे त्याची (मिपावर जास्तच) जाहीरात करा......की मी सेदान असूनही अजूनही चालतच जातो म्हणून... दोन ठळक फायदे:तुम्हाला भारतातल्या गाडी नसलेल्या गरीबांबद्दल कळवळा आहे,पेट्रोल दरवाढीच्या काळजीतून मुक्ती. इअतर फायद्यांसाठी बॅट्न मोदक आणि अभ्याकडे देत आहे. वाचनमात्र नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जिन्क्स Wed, 12/30/2015 - 11:09 नवीन
कोल्ह्याला द्राक्ष आंबट .... दुसरं काही नाही
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ Wed, 12/30/2015 - 11:57 नवीन
अगदी अगदी. मला हेच लिहायचे होते. पण हेलाकाका मनाला लाऊन घेतील म्हणुन लिहीले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
उ
उगा काहितरीच Wed, 12/30/2015 - 11:39 नवीन
"शक्ती का पासमे होना जरूरी है । सवाल शक्तीके इस्तेमाल का है। " हा डायलॉग आठवला . कुणी जर प्रचंड पैसे कमाई करून दान केले व निष्कांचन अवस्था चांगली आहे असे म्हणत असेल तर तो मे बी बरोबर असेल. (त्याच्या दृष्टीने!) पण ज्याला लहानपणापासूनच दोन वेळेसचे अन्नच व्यवस्थित मिळू शकत नाही अशा व्यक्तीने जर गरीबीतच सुख आहे असं म्हटलं तर काय फायदा ? त्याला श्रीमंतीत काय सुख आहे ते काय माहीत ! (याला काही सन्माननीय अपवाद असू शकतात)
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 12/30/2015 - 12:24 नवीन
डाॅ खरेंचे प्रतिसाद आवडले. समाधान व्यक्तीसापेक्ष गोष्ट आहे.त्याला कोणा एकाचे निकष लावून कसे चालेल.त्यापेक्षा कुटुंबाचा किंवा त्या व्यक्तीचा हॅपिनेस इंडेक्स महत्त्वाचा नाही का?
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Wed, 12/30/2015 - 12:42 नवीन
अहो अजयाताई, जर ती व्यक्तीच मुळात हॅपीनेस असेल तर हॅपीनेसचा हॅपीनेस इंडेक्स कसा काढता येईल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
अ
अजया Wed, 12/30/2015 - 13:02 नवीन
हेला काका काढून देतील हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ऋ
ऋषिकेश Wed, 12/30/2015 - 12:45 नवीन
याची गरज आहे का? याची माझ्यापरीने उत्तरे: पाच रूमचा वेल फर्निशर्ड फ्लॅट - घरात किती मंडळी आहेत त्यावर हे आवश्यक आहे का सांगता यावे महागडी कार - ऑफिस किती लांब आहे, पर्यटनाची किती आवड आहे त्यावर याचे उत्तर देता यावे 40 इंची एलईडी टिव्ही - चित्रपट पाइत्याडीदीच्ग इत्यादी किती आवडते त्यावर सांगता यावे एेसी - हे एसी आहे असे समजतो. घर कोणत्या प्रदेशात आहे त्यावर सांगता यावे मुलांना इंटरनॅशनल शाळेत अॅडमिशन - मुलांनी काय व्हावेआअहे त्यावरून सांगता यावे हे सगळे साध्य करण्यासाठी 8 ते 8 नौकरी - करा सगळे साध्य करायचे तर याची खरच गरज आहे बायकोची नौकरी - काहीही साध्य करायचे नसले तरीही स्त्रियांना स्वतंत्र मिळकत असावी असे माझे मत आहे. एकत्र कुटुंब नसल्यामुळे मुलांना पाळणाघरात पाठविणे. - मुपाळणागह्रातघरात पाठवणे उपयुक्त आहे. माझे एकत्र कुटुंब असूनही मुले पाळणाघरात जातात.वृद्ध आई-वडिलांना त्यामुळे दुपारची झोप मिळते व त्यांचेही आरोग्य चांगले रहाते. सुट्टीच्या दिवशी बाहेर जायची इच्छा नसणे - हे फिरायची आवड आहे की नाही त्यावरून सांगता यावे. त्यामुळे नवरा बायकोत चिडचिड.- याची गरज वाटत नाही पण कोणत्याही दोन व्यक्तीत थोड्या कुरबुरी होणारच मुलांना मागितले ते मिळाल्यामुळे नाही ऐकायची सवय नसणे.- याची गरज वाटत नाही. काॅलेजात गेले की मुलांना आय फोन, स्कुटी किंवा बाईक. कॉलेज घरापासून किती लांब आहे त्यावर सांगता यावे वयाच्या चाळीशीला हार्ट, बीपी, मधुमेह हे आजार होणे - याची गरज वाटत नाही मग त्यावर डाॅक्टरी इलाज. - आजार झाल्यास याची मात्र नितांत गरज आहे आशा आहे उत्तरे पटतील
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Wed, 12/30/2015 - 12:53 नवीन
गरज आणि चैन ह्यात सीमारेषा कशी आखावी आणि कुणी ओळखावी? माझ्यासाठी जी चैन आहे त्याकडे अंबानी ढुंकूनही पाहत नसेल. तसेच, माझ्याकडे जे आहे त्याचा अजून कुणाला हेवा वाटत असेलही. कुणाला सर्व त्यागण्यात सूख, तर कुणाला सगळं भोगण्यात सूख. ज्याचं त्याने ठरवावं आणि मजा करावी.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 12/30/2015 - 13:23 नवीन
प्रत्येक माणसावर अवलंबुन आहे.. असं सगळ्यांसाठी एकच उत्तर असलेलं नवनीत गाईड थोडीच असतं.. एक मित्र आहे.. शिकलाय आणि कमावतोय न्युयॉर्कमध्ये.. बदाबदा कमावतोय.. साऊथचा आहे.. तिकडेच मोठ्या शहरात स्वतःचा "मॉल" आहे.. सिंगापुर का असंच कुठेतरी घर आहे. पुण्यातही घर घेतोय.. इतकं कमावतोय.. रिलेशनशिप्मध्ये मार खालेल्ला आहे. पण जस्ट तीसचा आकडा गाठलाय.. लग्न होऊन लागेल मार्गी.. अजुन वय गेलेलं नाही.. तर मला वाटायचं इतकं सगळं आहे.. हा माणुस किती सुखी असेल?!! कळालं की त्याची महात्वाकांक्षा ही न्युयॉर्कमध्ये "हेलिकॉप्टर" बाळगण्याची आहे. त्याच्यामते अजुन तर खुप काही करणं बाकी आहे.. आपण असंही म्हणु शकतो की काय हा हव्यास.. आहे त्यात सुखी रहावं.. पण मग असं केलं तर ह्या मोठमोठ्या कंपन्या.. उद्योगधंदे कुठुन उभे राहिले असते.. ही खुप काही मिळवण्याची काहींची आस त्यांच्याच नाही तर इतरांच्याही आयुष्यात फार घडामोडी घडवत असते. ती आवश्यक आहेच की.. आनंद मानणं एक गोष्ट झाली.. आहे त्यात समाधान मानुन स्वस्थ बसणं दुसरी.. सतत काही तरी मिळवत जाणारे आनंदी नसतातच असं काही नाही..
  • Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ Wed, 12/30/2015 - 15:47 नवीन
मला वाटत समाधानी राहण्यासाठी एक "ध्येय" सगळ्यात महत्वाचे असते. मग ते एक TV घेण्याच असो वा एखादे पेटंट फ़ाइल करण्याचे असो. ध्येय माणसाला आळशी होऊ देत नाही आणि कामात गुंतवून ठेऊन निराशही होऊ देत नाही. पण गम्मत म्हणजे सतत नव-नवी ध्येय येत रहाणे देखील महत्वाचे आहे. नाहीतर जे मिळवायचे होते ते मिळवल्यानंतर आता आयुष्यात काय करायचे हि भली मोठी पोकळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे Megamind हा सिनेमा मला फार आवडतो. हिरोला मारल्यानंतर खलनायक कसा आळशी आणि सैरभैर होतो हे त्यात गमतीशीर रित्या दाखवलं आहे. पण शेवटी कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच! म्हणून समाधानाची व्याख्या ज्याने त्याने स्वतःच ठरवावी. सगळ्यांसाठी समान व्याख्या असू शकेल असे मला तर वाटत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 12/30/2015 - 15:51 नवीन
धाग्याने निराशा केली नाही...
  • Log in or register to post comments
न
नितिन नितिन Wed, 12/30/2015 - 16:37 नवीन
दुविदा मनस्तिथि उत्तर नहि
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 12/30/2015 - 17:33 नवीन
सुख हवे ते मिळण्यात नाही, तर मिळालेले हवेहेवेसे वाटण्यात आहे. हे बरोबर आहेच, पण अजून एक सत्य आहे... "जर मिळालेल्या गोष्टींत सर्व माणसांना सुख मिळाले असते तर, आजपर्यंत मानवी जीवन जेवढे विकसित झाले आहे, त्याच्या निम्मेही झाले असते की नाही यात संशय आहे."
  • Log in or register to post comments
व
वीणा३ Wed, 12/30/2015 - 17:55 नवीन
सगळ्याच प्रकारचे लोकं या जगात लागतात. पै पै साठवून कोणीतरी बचत करणारे लागतात तसंच रिस्क घेऊन कर्ज काढून बिसनेस करणारे पण लागतात. जर सगळेच आहे त्यातंच समाधानी असते तर अजूनही आपण पायी फिरत असतो, जात्यावर दळत असतो (किंवा रोज शिकार करून अन्न मिळवत असतो ). कोणाला पोळी भाजी खाऊन समाधान मिळेल कोणाला पुरणपोळी कोणाला चिकन बिर्याणी. कोणाच समाधान आनंद बरोबर किंवा चूक हे मी कोण ठरवणार. मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे असं मला वाटणं महत्वाचा. मग ती झोपडी असो ५ बेडरूम चा flat असो अथवा अजून काही.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 12/31/2015 - 05:57 नवीन
जगी सर्वसुखी असा कोण आहे? विचारी मना तुच शोधोनी पाहे गरीब बी नाय आन श्रीमंत बी नाय! सुखी वा दु:खी या जीवनात असलेल्या अवस्था आहेत. जन्मापासून मृत्यूपर्यंत कायम सुखी वा दु:खी कोणी नसते.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 12/31/2015 - 06:13 नवीन
काही चांगले, खोचक, बोचक, सतसंगी प्रतिसाद आवडले. डाॅ. खरेचे प्रतिसाद परखड असले तरी मनाला लागणारे नसतात. डाॅ. आडनावा प्रमाणे खरे बोलणारे, लष्करी नौकरीत काॅपरेटिव्ह व पाॅप्युलर असावेत असे वाटते. हा धागा टाकण्यामागे गरीब सुखी व श्रीमंत दुखी:, गरीबीतच राहावे, प्रगती करूच नये, आहे त्या परिस्थितीत राहावे हा उद्देश नसून जास्तीच्या हव्यासापायी मनुष्य आनंदी व समाधानी जीवन जगणेच विसरून जाईल. प्रत्येक गोष्टीत इतरांशी तुलना करून इतराकडे असलेले आपल्याकडे असावे याचा आटापिटा करेल. हा धागा मध्यमवर्गीय नौकरदारांना उद्देशून आहे. उद्योजक लोकांकडे सर्व काही असले तरी ते साधे राहतात (नारायण मुर्ती) आमटे दाम्पत्यांचे उदा. देण्यामागे आपण त्यांच्या सारखे करावे असा नाही तर आनंदी व समाधानी राहण्यासाठी जास्तीचा हव्यास करण्याची गरज नाही हे सांगणे आहे.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि गुरुवार, 12/31/2015 - 06:29 नवीन
जितका धागा पोकळ होता त्याच्या दुप्पट हा प्रतिसाद पोकळ आहे. स्व्गतः सोक्य, ठाकूरांचे प्रतिसाद वाचले नसल्याचाच परिणाम असावा का हा वरचा प्रतिसाद - (५ रूमच्या घरात राहून, SUV चालवूनही सुखी व समाधानी असलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
न
नाव आडनाव गुरुवार, 12/31/2015 - 06:41 नवीन
त्यांनी शतक झाल्यानंतर बॅट उंचवून दाखवली आहे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
स
स्पा गुरुवार, 12/31/2015 - 07:40 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि
ज
जेपी गुरुवार, 12/31/2015 - 07:33 नवीन

लाटकर काकांच्या धाग्याचे शंभर झाले, इसी खुशी के मोके पर बॅटमॅन आणी टवाळ कार्टा यांच्यावरील प्रतिबंध काढण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

  • Log in or register to post comments
न
नाव आडनाव गुरुवार, 12/31/2015 - 07:37 नवीन
दोन्ही आयडींसाठी समर्थन / अनुमोदन देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु गुरुवार, 12/31/2015 - 08:04 नवीन
माझा हात वर केला आहे... बाकडा विद्यार्थी मिपा विद्यामंदीर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
आ
आदूबाळ गुरुवार, 12/31/2015 - 08:17 नवीन
मीही झारा वर करून पाठिंबा देतो. - बाहेरचा वडापाववाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
प
पॉइंट ब्लँक Fri, 01/01/2016 - 13:00 नवीन
आयला हे कधि झालं. एवढे भारी दोन आयडी बॅन. ऐकावे ते नवलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ज
जिन्क्स गुरुवार, 12/31/2015 - 07:39 नवीन
बॅटमॅन ह्यांच्या वर प्रतिबंध का घालण्यात आले?
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी गुरुवार, 12/31/2015 - 07:46 नवीन
Image removed. ह.घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जिन्क्स
ह
हाडक्या गुरुवार, 01/07/2016 - 10:59 नवीन
एक चित्र हजार शब्दांच्या तोडीचं की काय म्हणतात ते.. ;) पण कै का असेना.. बॅटमॅन नि टका परत आलाच पायजे. (नैतर आमी सामुहिक जालीय उपोषण करु आता.!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अजया गुरुवार, 12/31/2015 - 07:50 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सिरुसेरि Sat, 01/02/2016 - 04:56 नवीन
"तुझे आहे तुजपाशी" या नाटकात काकाजींनी असेच सांगितले आहे . आमटे परिवार , गांधीजी , विवेकानंद , सावरकर हि सारी लोकोत्तर , महान माणसे आहेत . सर्वसामान्य माणसांनी सोसत नसेल तर उगाचच त्यांचे अनुकरण करु नये . नाहितर मग , न झेपणारया पट्टीत गायला गेले तर जसे गाणे बेसुरे होते , तसेच जीवनही अर्थहिन होउन जाते . हि महान माणसे म्हणजे जणू सागरातील दिपस्तंभ आहेत . सर्वसामान्य मनुष्यरुपी जहाजांनी त्यांच्याकडुन प्रकाश घेउन जीवनरुपी सागरात मार्गक्रमण करावे , परंतु स्वता: क्षमता नसताना दिपस्तंभ बनण्याचा अट्टाहास बाळगू नये. अन्यथा हे मार्गक्रमण दिशाहिन होऊन जाते .
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 01/02/2016 - 05:57 नवीन
मी वर लिहिले आहे ते तुझे आहे तुजपाशी मधीलच वाक्य आहे (मला अतिशय पटलेले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
म
मोगा Sun, 01/03/2016 - 12:26 नवीन
न पेलवणार्‍या गोळ्या घेऊ नयेत. असे काहीतरी ते वाक्य आहे. तुज आहे तुजपाशी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मानस् गुरुवार, 01/07/2016 - 07:59 नवीन
व्वा, क्या बात है...अतिशय समर्पक प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि
स
सिरुसेरि Sat, 01/02/2016 - 06:38 नवीन
+१ . अगदी बरोबर खरे सर . तुमच्या प्रतिक्रिया वाचूनच मला "तुझे आहे तुजपाशी"ची आणी काकाजीं ची आठवण झाली .
  • Log in or register to post comments
न
नया है वह Mon, 01/04/2016 - 12:26 नवीन
पुप्रप्र.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Mon, 01/04/2016 - 14:50 नवीन
लेखाचा उद्देशच कुणाला कळला नाही. सर्वांनी प्रकाश आमटेंचेे अनुकरण करावे किंवा गरीबच राहावे असे माझे म्हणने नव्हते तर अति हव्यासामुळे माणूस आनंदी व समाधानी जीवन जगणे विसरून जाईल हे सुचवायचे होते.
  • Log in or register to post comments
म
मोगा Tue, 01/05/2016 - 02:52 नवीन
आमटे , अवचट , सिंधुताई यांच्या समाजकार्यातही अनेकांच्या लाखो रु दानाचा समावेश आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
स
सुबोध खरे Sat, 01/09/2016 - 06:58 नवीन
त्यांनी पहिल्याने स्वकष्टाने समाजकार्य उभे केले आणी मग लोकांनी त्यांना मदत दिली. पहिल्या दिवसापासून जनतेचा पैसा वापरायला ते राजकारणी नव्हेत. एवढे तरी लक्षात घ्या. जिथे तिथे पिंक टाकणे सोडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा
न
नितिन थत्ते Fri, 01/08/2016 - 17:39 नवीन
Money is not everything. But make sure you have loads of it before saying this. असं वॉरन बफेने म्हटल्याचं ऐकलं आहे.
  • Log in or register to post comments
न
नमकिन Sun, 01/10/2016 - 07:04 नवीन
बहुधा मानव जन्मात मनात जेव्हा वरील ही भावना जोपासली जाईल तेव्हा क्षणिक आनंद, भौतिक सुख व निरंतर समाधान यांचा फरक अनुभवतील, तोवर आहेच उर फुटेस्तोवर धावणे.
  • Log in or register to post comments
अ
अभिजीत अवलिया गुरुवार, 01/14/2016 - 13:27 नवीन
चैन वगैरे गोष्टी व्यक्तीसापेक्ष आहेत. एखाद्या फुटपाथ वर राहणार्या माणसाला झोपडीत राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते, झोपडीत राहणार्या माणसाच्या दृष्टीने चाळीत राहणारा, चाळीत राहणार्याच्या दृष्टीने flat मध्ये राहणारा, तर flat वाल्याना बंगल्यामध्ये राहणारा माणूस चैन करत आहे असे वाटू शकते. प्रत्येक माणसाने आपले जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करावे असे मला वाटते. फक्त त्यासाठी लागणारा पैसा प्रामाणिकपणे कमवावा. चोऱ्या माऱ्या करून, भ्रष्टाचार करून न्हवे. प्रामाणिकपणे पैसा कमवून प्रत्येकाने antilia सारखे घर बांधले तरी चालेल.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव गुरुवार, 01/14/2016 - 13:33 नवीन
=))
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 01/19/2016 - 08:45 नवीन
धागा आणि प्रतिक्रिया वाचून दमले. वेळ कमी असल्याने मिपावर येणे ही आज चैन आहे. खरे तर ती जीवनावश्यक गरज म्हटली पाहिजे.
  • Log in or register to post comments
स
सामान्य वाचक Tue, 01/19/2016 - 09:30 नवीन
अतिशय फालतू विषयावरचा तेवढाच फालतू लेख आणि पब्लिक चढ ओढीने उत्तरे देत आहे झुंजी लावून श्री श्री रा रा रा लाटकर काकासो ( बघा , नीट पूर्ण नाव लिहिले आहे लेखकाच्या विनन्तिनुसार) चला सगळे, आता कुठे तरी दुसर्या धाग्य वर जाऊ वि सु : हि प्रतिक्रिया सर्व लिखाणा साठी blanket प्रतिक्रिया आहे (कुणाच्या लिखाण ला? असे कोण म्हणते आहे?)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा