मरणकल्पना, आत्मा, पुनर्जन्म
.........
सजीव येई जन्मासी ।अटळ असे मृत्यू त्यासी ।जाणीव प्रत्येक व्यक्तीसी ।जी का असते सज्ञानी ॥१॥
अनुभव आणि निरीक्षण । परस्पर संवाद , वाचन । निष्कर्ष तर्काने शोधून । जाणीव विकसित होतसे ॥२॥
सजीवासी मृत्यू अटळ । प्राण्यांना नकळे सकळ । सज्ञानी मानव केवळ । या सत्यासी जाणतसे ॥३॥
व्याघ्र-सिंह- ससे-भेकरे । मेंढ्या-बकर्या-गाई-गुरे । मरणाधीन असती सारे । परि ते सत्य न जाणती ॥४ ॥
पुराणांतरी सात जण । अश्वत्थामा-बळी-बिभीषण । परशुराम-व्यास-हनुमान । तैसा कृप पैं सातवा ॥५॥
यांसी म्हणितले चिरंजीव ।कल्पना केवळ मानीव । त्या त्या काळी सजीव ।ते असतील सातही ॥६॥
परंतु काळीं सांप्रत । या सातांतील जिवंत । कोणीही नसे निश्चित । वैज्ञानिक सत्य हे ॥७॥
देव मानिले अजरामर । नाही मरण नसे आजार । स्वर्गीं तयांचा संचार । सारे कल्पित डोलारे ॥८॥
तैसेचि ते अमृतसत्त्व। नाही तयासी अस्तित्व । मानव इच्छिती अमरत्व । मानसिकता ऐसी दिसे ॥९॥
मरण अटळ सर्वां पटे । परी अंतरी भीती दाटे । मरणासंबंधी शब्द वाटे । अशुभ, अभद्र, अमंगळ ॥१०॥
मयत-प्रेत-मढे- स्मशान । चिता-मर्तिक आणि सरण । तिरडी-गोवर्या-मसण । ऐशा शब्दां घाबरती ॥११॥
दशक्रिया-अकरावे-बारावे । शब्द अपवित्र न उच्चारावे । शुभकार्यीं अवश्य टाळावे । पाळिती संकेत अलिखित॥१२॥
भान औचित्याचे असावे । भय शब्दांचे नसावे । कोठे काहीही बोलावे । ऐसा अनर्थ न घ्यावा ॥१३ ॥
घडण्याची जें निश्चिती । टाळणे न कोणा हाती । तयाविषयीं ऐसी भीती । वाटे कोण्या कारणे ?॥१४॥
विवेकी व्यक्तीस ऐसे भय ।अनावश्यक अशोभनीय । मरणी भयदायक काय ।घटना एक नैसर्गिक ॥१५ ॥
वेदकाळी वदले चार्वाक । मरणीं गूढ न काही एक । जीवनी भोगावे सुख । आनंदाने मनुजाने ॥१६॥
यद्यपि मरण नैसर्गिक । जगावे काळ अधिकाधिक । प्राणिमात्रासी प्रत्येक । स्वाभाविक ऊर्मी ही ॥१७ ॥
म्हणौनि मृत्यू अप्रिय । टाळण्या सजीव सक्रिय । परंतु मानवा मरणभय । कदापीही नसावे ॥१८॥
प्रत्येकासी येते मरण । याचे जैविक कारण । जीवशास्त्रज्ञां उमगले जाण । सर्वमान्य असे हे ॥१९ ॥
टेलोमियर-जिनोम-जीन । गुणसूत्रे पेशी विभाजन । जिनोम लांबी त्रुटीकरण । प्रकरण ऐसे बिकट हे ॥२० ॥
द्यावे इथेच सोडोन । परी ऐसे जाणोन । नैसर्गिक मरणाचे कारण । ज्ञात आता मानवा ॥२१ ॥
अटळ मरण नि:संदेह । कांही न उरे जाता देह । जगाचा ऐसा चिर विरह ।असह्य वाटे मनुजासी ॥२२॥
यास्तव आत्मा असे अमर । ऐसा रचिला विचार । नाशवंत केवळ शरीर ।आत्मा जन्मे पुन:पुन्हा ॥२३॥
आत्मयासी शस्त्र छेदीना ।आत्मयासी अग्नी जाळीना । आत्मयासी पाणी भिजवीना । ऐसी ख्याती आत्मयाची ॥२४॥
आत्मा नाही देहीं कोठे । आत्म्याचे अस्तित्वचि खोटे । परी श्रद्धाळूंसी सारे पटे । कारण अमरत्व इच्छिती ॥२५ ॥
शरीर म्हणजे मी नोहे । ओळख माझी आत्मा आहे । तो अमर म्हणौनि पाहे । मीही अमर जाहलो ॥२६॥
विचार करिता खोटे सारे । श्रद्धावंता वाटे खरे। जगी वेगे असत्य पसरे । सत्या लागे विलंब ॥२७॥
संतवाणी- कथा -कीर्तने । गोष्टी-गाणी- आख्याने । नाटके-चित्रपट-प्रवचने । अनेक माध्यमे प्रभावी ॥२८॥
यांद्वारे पुनर्जन्म संकल्पना ।सातत्याने जनमना--। वरती बिंबविली भावना । मनी ठसोनी दृढ झाली ॥२९॥
असोनी असत्य आघवे। सश्रद्ध मानिती भावे । शंका काही न उद्भवे । सत्यासत्याविषयींची ।।३० ॥
आहे का जर पुनर्जन्म । निश्चित होता गतजन्म । त्या जन्मीचे नाम-धाम । स्मरते काय कोणासी ॥३१॥
आपण प्रयत्न करावे । गतजन्मीचे काही आठवावे । तैसेचि परिचितां पुसावे । कोणा कांही स्मरते का ॥३२॥
याचे उत्तर प्रामाणिक । नकारार्थी देतील लोक । पुनर्जन्म आहे निरर्थक । ऐसेचि सिद्ध होतसे ॥३३॥
गतजन्मीचे काहीही । आठवते ना कोणाही । पुनर्जन्म कल्पना ही । सत्य कैसी मानावी ? ॥३४॥
अपत्यरूपे माता-पितरे । पुन्हा जन्मासी येती खरे । जनुक-संक्रमण आधारे । मानणे हे शक्य दिसे ॥३५ ॥
परंतु माता-पितयाचा । अर्ध-पुनर्जन्मचि साचा । अपत्यजनुकीं दोघांचा समान वाटा निश्चित ॥३६ ॥
जिवंतपणी माय-तात । अर्धपुनर्जन्म देखतात । अपत्य पाहते प्रत्यक्षात । गतजन्म दोन अर्धेची ॥३७ ॥
शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥
शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो ॥३९॥
यापरी आत्मा नाही नाही । कोणाच्याही हृदयीं देही । तैं पुनर्जन्म कोण घेई । असत्य पुनर्जन्म संकल्पना ॥४०॥
पहिला तैसाचि शेवटचा । एकचि जन्म प्रत्येकाचा । गतजन्म-पुनर्जन्म कोणाचा । शक्य नसे कालत्रयी ॥४१॥
जाणावे आपण सर्वांनी । शंका असली काही मनीं । विचारे विवर-विवरोनी । निरसन पूर्णत्वे करावे ॥४२॥
असे सत्य वैज्ञानिक । जाणिती मानिती जे विवेक । पूर्वग्रहपीडित भाविक । अज्ञानासी कवटाळिती ॥४३॥
आत्मा-पुनर्जन्म-संचित ।अज्ञान सारे खचित । यास्तव याची संगत । निश्चये आपण सोडावी ॥४४॥
वृथा भीती मरणाची ।काढून टाकावी अंतरीची । अंतिम घटना आयुष्याची । काही न राही नंतर ॥४५॥
अर्चिरादि मार्ग सूर्यलोक । चंद्रलोक-विद्युल्लोक । पितृयान- देवयान -ब्रह्मलोक ।कल्पित सार्या भरार्या ॥४६॥
जाणणे हे आवश्यक । मानव प्रजातीं जन्म एक । लाभला गेला निरर्थक । ऐसे होईल अन्यथा ॥४७॥
...................................................................................
💬 प्रतिसाद
(68)
स
सतिश गावडे
Wed, 01/06/2016 - 18:11
नवीन
तुमचा प्रतिसाद उपरोधिक असावा असे वाटते तरीही...
फुल फेकाफेकी केली आहे त्या "परदेशी सायकोलोजीस्ट" ने. रच्याकने, ते डॉ. महाशय सायकॉलॉजिस्ट नसून सायकियाट्रीस्ट आहेत.
त्या पुस्तकाला त्यांनी "पेहले मैं ऐसी बाते करनेसे बहुत डरता था. क्योंकी मैं एक सायकियाट्रिस्ट था. अक्सर मैं यही सोचता था की लोग मेरे बारेमे कहेंगे की मै एक सायकियाट्रिस्ट होने के बावजूद ऐसे बाते कैसे कर सकता हूं..." अशा चालीची प्रस्तावना की मनोगत लिहिले आहे.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 01/07/2016 - 05:16
नवीन
इतकी वर्षं परदेशी राहून लक्षात आलेलं आहे की वायझेड लोक सगळीकडेच असतात. पु. ना. ओक काय किंवा एरिक व्हॉन डॅनिकेन काय... वायझेडपणाला धर्म, वर्ण, भूगोल काही नसतं.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
गुरुवार, 01/07/2016 - 08:45
नवीन
घासूगुरुजी
पु.ना.ओक = वायझेड ? मग कुठल्याश्या फ्रेंच जवाहिऱ्याच्या सांगण्यावरून ताजमहाल शहाजहानने बांधल्याचा दावा करणारं भारत सरकार काय ट्रिपलेक्स का ?
तुमच्यासाठी एक प्रत्यक्ष कथा सांगतो.
कर्णावती (म्हणजे अहमदाबाद बरंका) येथे एका हिंदू बांधकाम व्यावसायिकाची इमारत मुस्लिमांनी पडायला लावली. कारण म्हणे ती वास्तू माशिदीपेक्षा उंच होती ! पुढे खटला उभा राहिला. पु.ना.ओकांनी युक्तिवाद सुचवला की ती मशीद भद्रकाली देवीचं मंदिर आहे. हे ऐकल्यावर वादींनी मुकाट्याने खटला मागे घेतला. मुस्लिमांना सत्य बाहेर यायला नको होतं ना !
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
गुरुवार, 01/07/2016 - 14:01
नवीन
अोक थोर वाटत असतील प. वि. वर्तकांचं नाव घ्या, किंवा 'अमुक मंत्र म्हटला की बलात्कार होत नाही, बलात्कार करणारा नपुंसक होतो' वगैरे काहीतरी म्हणणारे कोणतेतरी बापू घ्या. किंवा 'हस्तमैथुन केलं तर स्वर्गात गेल्यावर हात गरोदर राहातील' म्हणणारा कोणतासा मौलवी घ्या. किंवा 'खरोखर बलात्कार झाला असेल तर त्यातून संतती होत नाही' असं म्हणणारा अमेरिकन सेनेटर घ्या... हाय काय नाय काय. मुद्दा बदलत नाहीच. वायझेडपणाला धर्म, जात, भूगोल वगैरे काही नसतं. (एक उदाहरण तुम्हीच दिलंत की!)
- Log in or register to post comments
म
मारवा
Fri, 01/08/2016 - 06:12
नवीन
वाय-झेड शब्दाचा खरा अर्थ असली लाल किताब मध्ये जो दिला आहे तो असा.
वाय-झेड हे यॉर्कशायरी-झेंडु चे संक्षिप्त रुप आहे. नावाप्रमाणेच याचा उगम यॉर्कशायर मध्ये झालेला असला तरी हा कुठेही सहज फोफावतो. याची लागवड करावी लागत नाही हा काँग्रेस गवता सारखा कुठेही फोफावतो. युनिव्हर्सीटीतही हा आढळतो तसेच प्रार्थनास्थळांतही आढळतो. यास्काचार्यांच्या निरुक्तातही यावर निरुपण आलेले आहे. याची व्युत्पत्ती "झ" या क्रिया .... असो.
तर यापासुनच झंडु बाम या वेदनाशामकाची उत्पत्ती झालेली आहे. झंडु बाम वैचारीक वेदनांचे शमन प्रभावीपणे करुन एक दिलासा....हवाहवासा.... प्रदान करतो. तर एक जुन्या लोकांना आठवत असेल मराठीत एक भावगीतही आहे " प्रिया मी झंडुबाम जाहले प्रिया मी केवळ तुजसाठी "
येडी बाभळ ही याची थोरली बहीण झारा याचा धाकला भाऊ.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Fri, 01/08/2016 - 13:18
नवीन
हा हा हा.
एके काळी 'वायझेड' नावाचा माउंटेनियरिंग क्लब होता. ते त्याचं विस्तृतीकरण यंग झिंगारो असं करत.
- Log in or register to post comments
य
यनावाला
गुरुवार, 01/07/2016 - 11:32
नवीन
श्री.राजेश म्हणतात त्याप्रमाणे असले हे सारेच लेखक वाय.झेड. असतात असे नाही. बहुतेक जण धूर्त आणि लबाड असतात. आपण लिहितो ते खोटे, बनावट आहे याची त्यांना पूर्ण जाणीव असते. राजेश लिहितात ते विशेषण त्या लबाडांच्या गिर्हाइकांना मात्र लावता येईल. ही गिर्हाइके श्रद्धाळू असतात. पुनर्जन्मासारख्या कल्पनांवर त्यांची श्रद्धा असते. या कल्पना खोट्या आहेत असे वैज्ञानिक लिहितात, बुद्धिवादी सांगतात,तेव्हा ते हताश होतात. पुरावे सापडून आपल्या श्रद्धा दृढ व्हाव्या म्हणून तळमळतात. पुराव्यांसाठी हपापतात. समाजातील ही गरज कांही लबाड प्रकाशक, लेखक नेमकी हेरतात. मग असली बनावट पुस्तके काढतात. श्रद्धाळूंना आनंद होतो."चला, चला! पुरावा आला. पुनर्जन्म सिद्ध झाला!" असे म्हणत पुस्तकावर उड्या टाकतात. लक्षावधी प्रती खपतात. अशी ही गिर्हाइके सर्वकाळी, सर्व समाजांत असतात. त्यांना गंडवणारे भामटे असतातच.श्रद्धाळूंना अज्ञानात खितपत ठेवण्यातच त्या हितसंबंधीयांचा लाभ असतो.तो ते बरोबर उठवतात.
- Log in or register to post comments
य
यनावाला
Wed, 01/06/2016 - 12:51
नवीन
"बहूनि व्यतीतानि जन्मानि तवचार्जुन|तान्यहंवेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप|"[अर्जुना, तुझे अनेक जन्म झाले.पण ते तुला आठवत नाहीत.]म्हणजे कोणालाच आपला पूर्वजन्म आठवत नाही,हे व्यासांना ठाऊक होतेच.आपणा सर्वांचा अनुभव असाच आहे."आम्हांला गतजन्म आठवत नाही.कुणाला आठवत असेल तर त्याचे अनुभव आम्ही का ऐकू नयेत? ...ऐकावे! ऐकावे! कान भरून ऐकावे. मनभरून ऐकावे.कोण नको म्हणेल ?पूर्वी गतजन्माच्या आठवणीची एखादी बातमी येत असे.आता मुळीच नाही.कारण अशा दाव्याचा खोटेपणा लगेच उघडा पडतो.पण दुसर्याचे कशाला ? तुमचे स्वतःचे अनुभव ऐकण्यासाठी हिप्नॉटिक रिग्रेशनची बुवाबाजी आहे ना!हा माणूस तुम्हाला संमोहित करून भूतकाळात मागे मागे नेतो.तुम्ही मागच्या जन्मात जाता.मग त्या जन्मातील हवे तेवढे अनुभव तो सांगतो.बरीच फी द्यावी लागते एवढेच.
मागील जन्मविषयी कोणालाच काही आठवत नाही.तर कुणीही मानू शकेल की गतजन्मी मी सार्वभौम राजा होतो.वैभवशाली, ऐश्वर्यसंपन्न जीवन जगत होतो.तर ते खोटे कसे म्हणता येईल?पुनर्जन्माची ही हास्यास्पदता लक्षातच येत नाही का? उगीच पुनर्जन्म !पुनर्जन्म म्हणत उड्या मारण्यात काय अर्थ आहे? वास्तवात जग आहे तसे स्वीकारावे. स्वबुद्धीने विचार करावा,ग्रंथातले अज्ञान ग्रंथात राहू दे.
- Log in or register to post comments
क
कवितानागेश
Fri, 01/08/2016 - 00:07
नवीन
जातककथा किन्वा जातिस्मरण म्हणजे काय आहे यावर थोरामोठ्यांनी कृपया प्रकाश टाकावा.
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 01/08/2016 - 08:32
नवीन
पुनर्जन्म म्हटले की लोक तुटुन पडणार हे तर माहितीच होते. त्यातुन चर्चा आत्म्याकडे भरकटणार हे ही नक्कीच.
आत्मा म्हणजे शरीराच्या आत कुठलीतरी अदृष्य / अस्पष्ट आकृती असते आणि मनुष्याच्या मृत्युनंतर ती कुठेतरी निघुन जाते आणि मग परत दुसरे शरीर धारण करते इतका लिमिटेड अर्थ मी तरी नाही काढत.
असे म्हणतात की माणूस जन्मतो तेव्हा त्याच्या हातात माती असते. याचे शास्त्रीय कारणही असेलच काहितरी. मला नाही माहिती. पण माणूस मेल्यानंतर त्याला जाळा, पुरा अथवा त्याला गिधाडांना खायला घ्याला. अंततः त्या शरीराची मातीच होणार. मातीसकट उगवलेला जीव परत मातीतच जातो. थोडक्यात एक चक्र पुर्ण होते. त्या मातीतुनच नविन सजीवाची निर्मिती होते. तस्मात जीवाची झालेली ती माती हाच तो त्या जीवाचा आत्मा ज्यातुन एक नविन जीव निर्माण होतो. घासुगुर्जींच्या एका लेखात लिहिल्याप्रमाणे एकपेशीय जीवातुन अनेक पेशीय जीव निर्माण झाले. त्याच्याही मागे जाउन बघितले तर कदाचित निर्जिवातुन सजीवाची निर्मिती झाली. ज्यातुन तो जीव जन्मला ती निर्जीव अथवा जीव निर्माण करणारी सजीव नसलेली शक्ती म्हणजे आत्मा. अंततः ती त्या घटकाची जीव निर्माण करण्याची शक्ती आहे. त्यातुन एकच जीव निर्माण होइल असे नाही आणी त्यातुन मानवच निर्माण होइल असेही नाही. ८४ योनींच्या चक्रामागेही काही विज्ञान असेल. आजघडीला आपल्याला माहिती नाही.
थोडक्यात आत्मा म्हटल्यावर डोळ्यासमोर जी प्रतिकृती उभी रहते तसेच काही असेल असे नाही पण आत्मा म्हणजे मनुष्यामधील मृत्युपश्चात पुनरुत्पादन करण्याची शक्ती देखील असु शकते.
अवांतरः हे सगळे खुप विस्कळीत आहे हे मान्य. पण तुर्तास माझे विचार या धर्तीवर आहेत. भविष्यात जुन माहिती मिळाल्यास अथवा विचार केल्यास बदलु शकतात.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Fri, 01/08/2016 - 09:41
नवीन
"मृत्युन्जय" माणसाला पुनर्जन्म वगैरे मधे कशाला इतका "इंटरेस्ट"? :-)
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Fri, 01/08/2016 - 10:21
नवीन
मृत्युला जिंकलेला माणूस अमर नसतो हो.
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Fri, 01/08/2016 - 10:06
नवीन
ऋणम कृत्वा घृतम पिबेत असे संस्कृत वचन चार्वाकाने अनंत काळापुर्वी दिले आहे. या वचनाला मानणारी पिढी आता नसेल तर नवल. चार्वाकला सुध्दा महर्षी किंवा ज्याला आदरयुक्त संबोधता येईल असा दर्जा भारतीय संस्कृतीने दिला आहे. मग आत्मा नाही म्हणणारी आजची मंडळी सुध्दा त्याच संबोधनाला पात्र आहेत.
तुम्ही तुप प्या आम्ही अध्यात्माचे अमृत पितो.
- Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन
Fri, 01/08/2016 - 10:15
नवीन
यनावाला,
तुमच्या तर्कशुध्द विवेचनात न पटलेला भाग असा.
शरीरशास्त्रग्रंथी देख । आत्म्याचा ना नामोल्लेख । इंद्रियांचे कार्य हृदयादिक । तयांचे वर्णन परिपूर्ण ॥३८॥
शरीर अंतर्बाह्य अभ्यासिती ।शल्यकर्म यशस्वी करिती । परी आत्म्याचे ना नाम घेती । कधीही देहीं न दिसे तो
जे दिसते ते सत्य मानले तर शरीर फाडल्यावर मन कोठे दिसते ? तरी सायकेट्रिस्ट अश्या पदव्या आहेत शिवाय देशोदेशीच्या लोकांनी ही उपचार पध्दती मान्य केली आहे. तुम्ही शरीरात मन नसते मग ते का मानले जाते ?
- Log in or register to post comments
य
यनावाला
Fri, 01/08/2016 - 17:31
नवीन
"अंगुष्ठमात्रो पुरुषोSन्तरात्मा सदा जनानां हृदये संनिविष्ट:।" असे कठोपनिषदात म्हटले आहे. माणसाच्या हृदयात आत्मा असतो असे सर्व (दहा) उपनिषदांत आहे. शरीरातील अंर्तर्बाह्य खडान् खडा गोष्टी आधुनिक वैद्यकशास्त्राला ज्ञात आहेत. शरीरात नखाएवढा आत्मा असता तरी तो वैद्यकशास्त्रज्ञांना दिसलाच असता. ते असो.
तुम्ही म्हणाल आत्मा दिसत नाही म्हणून त्याचे अस्तित्व नाकारायचे का? मन कुठे दिसते ? पण ते असतेच ना?
हे पाहा ,मन आणि बुद्धी या अमूर्त कल्पना असल्या तरी त्यांचे अधिष्ठान मेंदू आहे. मेंदूत उद्भवणार्या सर्व भावनांचा समुच्चय म्हणजे मन. आनंद, दु:ख, राग, मत्सर इ. भावनांचा आविष्कार स्पष्टपणे दिसतो. त्यावरून मन आहे हे समजते. पण त्या मनासाठी मेंदू आणि मेंदूसाठी शरीर असणे आवश्यक आहे. शरीर नसेल तर मनाचे (तसेच बुद्धीचेही) अस्तित्व संभवत नाही. तद्वतच अशरीरी आत्मा असणे सर्वथैव अशक्य आहे, हे कॉमनसेन्सने कळते. आत्मा अस्तित्वात असता तर त्याचा उल्लेख शरीरशास्त्राच्या एका तरी अधिकृत पुस्तकात असता. पण कुठेच नाही. यावरून आत्मा नाही असाच निष्कर्ष निघतो.("आत्मा आणि मानवी मेंदू" या विषयावर एक लेख ग्लोबल मराठीवर आहे. शक्य झाल्यास वाचावा.)
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Fri, 01/08/2016 - 18:40
नवीन
यनावाला,
सन्निविष्ट म्हणजे जड अस्तित्व नव्हे. हृदयापाशी 'स्व'ची जाणीव असते. तिलाच आत्मा म्हणतात. जाणीव ही देहाहून वेगळीच असते. आत्मा जाणीवस्वरूप असल्याने देहाहून वेगळाच असणार आहे. तो देहाच्या आत सापडायला पाहिजे ही अपेक्षा व्यर्थ आहे.
प्रचलित विज्ञानानुसार इलेक्ट्रॉन अणुगर्भाशी लिप्त असतो. तो अणुकेंद्राच्या आंतही नसतो आणि बाहेरही नसतो. फक्त संबंधित असतो. मग आत्म्यानेच काय घोडं मारलंय?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
ब
बाजीगर
Fri, 01/08/2016 - 16:52
नवीन
बुडती हे जन पाहवेना डोळा ।'यने' धार्ष्ठ केले गोळा। कोळीष्ठके फिरवला बोळा ।विवेकाचा
यनावाला मनी उठती तरंग ।ते हे अभंग ।
वाचा निष्शंक ।तर्कशुध्द
लिहिणे नसे पोरखेळ।यमके व नेमके शब्दमेळ।ना ना मतांची भेळ।व्हावी कदर
- Log in or register to post comments
न
नितीनचंद्र
Mon, 01/11/2016 - 06:08
नवीन
खरच आत्म्याचे अस्तीत्व मान्य करणे कठीण विषय आहे.
योगसुत्र नावाचा ग्रंथ सुध्दा तर्काने आत्मा जाणावा असे सुचवतो. मनाचा व्यापार तर्काने जाणणे शक्य आहे. प्रत्यक्ष मन आजच्या शरीरशास्त्राला दिसले नाही तरी. आत्मा कसा आहे हे लिहताना आद्य शंकराचार्य म्हणतात.
मनो बुद्धि अहंकार चित्तानी नाहं
नच श्रोत्र जिव्हे नच घ्राण नेत्रे
नच व्योम भूमि न तेजो न वायु
चिदानंद रूपः शिवोहम शिवोहम ||1||
जो ना शरीराशी एकरुप नसतो त्याचे अस्तित्व इंद्रीयामार्फत प्रकट होणे अशक्यच. अनुभुती हा शब्द अनेक जण वापरतात. ही अनुभुती सर्वांना येणे अशक्यच. सबब आत्मा नसतोच हा तुमचा तर्क सामान्य रुपाने स्विकारला जाणे अपरिहार्य आहे. ज्याला वेद श्रुती स्मृतीवर भरवसा आहे ते बापडे करोत प्रयत्न.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2