सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...
डॉ सुहास म्हात्रे यांचे मिपावरचे इतर लेखन...
==================================================================मंदिरसंकुलाची भेट संपवून आम्ही समुद्रकिनार्याने जाणार्या सुंदर रस्त्यावरून गालंमार्गे कोलंबोकडे निघालो.
आज लवकर उठून न्याहारी आटपून सहा वाजताच हॉटेलबाहेर पडलो होतो. त्यामुळे भाविकांची गर्दी होण्याअगोदर कातारगामाचे मंदिरसंकुल पाहून सात-साडेसात पर्यंत परत गाडीत बसून प्रवास सुरू झाला होता. आजच्या दिवसात ३०० किलोमीटरचा आणि साडेपाच-सहा तासांचा प्रवास करून कोलंबोला पोहोचायचे होते. तेव्हा बर्यापैकी कंटाळा येणार आणि पर्यायाने झोप घेतली जाणार असेच वाटत होते. मात्र प्रवास सुरू झाला आणि श्रीलंकेच्या निसर्गाने आपले गारूड घालून कंटाळा आणि झोप दोन्हीही येणार नाही याची खबरदारी घेतली ! सुंदर निसर्ग आणि मधून मधून येणार्या वस्त्या पाहत पाहत वेळ बर्यापैकी मजेत जात होता...
कातारागामा ते गालं रस्त्यावर ०१
कातारागामा ते गालं रस्त्यावर ०२
कातारागामा ते गालं ०३
कातारागामा ते गालं ०४
कातारागामा ते गालं ०५
कातारागामा ते गालं ०६
कातारागामा ते गालं ०७
*********************************
गालं
श्रीलंकेच्या दक्षिण प्रांताची राजधानी असलेले गालं हे शहर लोकसंख्येच्या प्रमाणाने पाचव्या क्रमांकाचे आहे. मध्यपूर्व आणि श्रीलंकेचे व्यापारी संबंध इ स पूर्व १४०० वर्षापासून सुरू होते. मध्यपूर्वेत हे शहर तार्शिश या नावाने ओळखले जात असे. इझ्रेलचा राजा सॉलोमन (इ स पूर्व ९७० - ९३१) येथून हस्तिदंत, मोर व दालचिनी आयात करत असे. चवदाव्या शतकात इब्न बतुता या अरबी प्रवाशाने याचा काली (Qali) या नावाने उल्लेख केला आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगीजाचे आगमन होण्यापूर्वी या शहराला गिम्हातिथ्था (Gimhathiththa) या नावाने ओळखले जायचे आणि ते देशातील सर्वात मोठे बंदर होते. इ स १५०२ मध्ये लोरेंको द अलमेडाच्या नेतृत्वाखालील पोर्तुगीज जहाजांचा एक छोटा ताफा मालदीव येथे जात असताना वादळात भरकटून गालंच्या किनार्याला लागला आणि गालं व पर्यायाने श्रीलंकेचा युरोपियन वसाहतवादाशी संबंध सुरू झाला. या भागातील मसाल्याच्या पदार्थांचे (विशेषतः दालचिनी) उत्पन्न आणि गालं बंदराचे अतीपूर्व-पश्चिम व्यापारी मार्गावरचे मोक्याचे स्थान हेरून पोर्तुगीजांनी प्रथम स्थानिक राजाशी करार करून येथे पाय रोवले. त्यानंतर स्थानिक राजेरजवाड्यांमधिल कलहांचा पुरेपूर फायदा घेत आपली सत्ता स्थापन केली. पोर्तुगिजांनी या शहराभोवती इ स १५८८ मध्ये संरक्षक तटबंदी बांधली. त्यामुळे गालं शहर म्हणजेच गालं (भुईकोट) किल्ला झाला. इ स १६४० मध्ये पोर्तुगीजांचा पराभव करून डच इस्ट इंडिया कंपनीने हे शहर ताब्यात घेतले व नंतर एक एक करत सर्व श्रीलंकाभर आपले पाय पसरले. गालंभोवतीची तटबंदी डचांनी इ स १६४९ नंतर वारंवार अधिकाधिक बळकट केली. डच वसाहतवादाखाली गालंने १८ व्या शतकात उत्कर्षबिंदू गाठला होता. या चारशे वर्षांपेक्षा जास्त जुन्या, पोर्तुगीज व स्थानिक स्थापत्यशैलीच्या संगमाने बनलेल्या किल्ल्याला, १६ ते १९ व्या शतकातील दक्षिण व दक्षिणपूर्व आशियातील आता शिल्लक असलेला सर्वोत्तम आविष्कार समजला जातो. या परिसराचे बरेच नुकसान करणारी २००४ सालची त्सुनामी या तटबंदीचे नुकसान करू शकली नाही, हे विशेष ! गालं किल्ल्याला युनेस्कोप्रणित जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित केले गेले आहे. इ स १७९६ मध्ये डचांचा पराभव करून ब्रिटिशांनी कोलंबो आणि जाफना काबीज केले व श्रीलंकेतला ब्रिटिश अंमल सुरू झाला, तो श्रीलंकेला ४ फेब्रुवारी १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळेपर्यंत चालू होता. . दूरूनच डच किल्ल्याच्या घड्याळी मनोर्याने आपले डोके वर काढत गालं जवळ आल्याची खबर दिली. थोड्याच वेळात किल्ल्याच्या भरभक्कम रुंद तटबंदीत बनवलेल्या बोगद्यातून आमची गाडी आत शिरली...
गालं ०१ : तटबंदीतले प्रवेशव्दार
गालं ०२
गालं ०३
गालं ०४
गालं ०५ : गालं किल्ल्याचा घड्याळी मनोरा आणि त्याच्या बाजूची तटबंदी
गालं ०६ : रेस्तराँतून दिसणारा हिंदी महासागर आणि समुद्रकिनार्यावरची संरक्षक तटबंदी
गालं ०७ : रेस्तराँतून दिसणारा हिंदी महासागर ०२
गालं ०८ : दीपगृह
गालं ०९ : बौद्धमंदिर
गालं १० : ऑल सेंट्स चर्च
गालं ११ : एक चौक
गालं १२ : गालं क्रिकेट मैदान (जालावरून साभार)
गालं १३ : किल्ल्याच्या तटबंदीचा एक भाग (जालावरून साभार)
गालं १४ : किल्ला व शहराचे विहंगम दृश्य (जालावरून साभार)
गालं ते कोलंबो ०१
गालं ते कोलंबो ०२
गालं ते कोलंबो ०३
गालं ते कोलंबो ०४
कोलंबोचे प्रथमदर्शन
Book traversal links for सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments