लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे....
बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे.
सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते.
बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही.
संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात.
पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात.
अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो.
इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात.
उपाययोजना:
कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात.
मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.
स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही.
स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा.
बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी.
जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत.
तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत.
थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
💬 प्रतिसाद
(217)
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 06:29
नवीन
लग्ना करुन ठेवलेले शाररिक संबंधच फक्त नैतिक दॄष्ट्या योग्य आहेत, आणि म्हणुन त्याच संबंधात "अपराधभाव" नसतो हे चुक आहे. तुमची नीतीमत्ता तसं सांगते म्हणुन तुमच्या मेंदुपुरतं ते योग्य आहे. पण मुळात ज्यांना हे मान्य नाही ते लग्ना बाहेरही तुम्ही म्हणताय तसा प्रणय अनुभवु शकतात.
सगळा मेंदुचा खेळ आहे.. बाकी काही नाही..
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Tue, 01/12/2016 - 06:50
नवीन
लग्न न करता पार्टनरकडून जे मिळते त्यात समाधान नसते. त्यात एकमेकाकडून फक्त सुख घेणेच असते. त्या सनीबाईंना विचारा ती जे करत होती त्यातून खरेच सुख मिळत होते का? तर मग तिने लग्न का केले.
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 06:52
नवीन
काका.. सनीबाइ जे करत होत्या तो त्यांचा "व्यवसाय" होता.. जीवनशैली नाही..
- Log in or register to post comments
फ
फटू
Fri, 01/15/2016 - 13:24
नवीन
गंमतीचा भाग म्हणजे सनीबाईंनी ज्याच्यासोबत अधिक "व्यवसाय" केला त्याच्याशीच लग्न केलं.
लाख वेळा सहमत. अर्थात विवाह म्हणजे "पवित्र बंधन" असं मत असणार्यांना ते पटणार नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/12/2016 - 07:41
नवीन
पि रा ताई
सगळा मेंदूचाच खेळ आहे.
भरपूर पैसे खाऊनहि लोक उजळ माथ्याने आणी निलाजरेपणाने वावरतातच कि. त्यांना त्या पैशाचा उपभोग घेता येत नाही असं थोडीच आहे?
मुलं जन्माला येतातच, औरसत्व महत्त्वाचं असतं. एकदा तेच अमान्य केलं कि प्रश्नच मिटला.
रांगेत उभा राहून तिकीट घेतलं काय कि मागच्या बाजूने खिडकीतून एक नोट सरकवून घेतलं काय? सिनेमा तोच असतो.
- Log in or register to post comments
फ
फटू
Fri, 01/15/2016 - 13:28
नवीन
मुलांचं औरसत्व ठरून आपली संपत्ती आपल्याच अपत्याकडे जावी म्हणून तर विवाहसंस्था स्विकारली गेली. अर्थात ती फुलप्रुफ नाहीच. ;)
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 01/19/2016 - 15:31
नवीन
एका इंग्रजी पुस्तकात वाचलं व्हतं,
You can enjoy sex without love, but you can't enjoy love without sex!
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Tue, 01/19/2016 - 18:15
नवीन
त्या इंग्रजी पुस्तकवाल्याला लव, सेक्स अन् एन्जॉयमेंट ह्या तिन्हीबद्दल पुरेशी अनुभूती नाही असे दिसते...
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 01/19/2016 - 18:53
नवीन
माझ्या मते आपल्यापैकी त्यालाच जास्त अनुभूति असेल!
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 01/11/2016 - 22:06
नवीन
काही लग्न बिग्न नको. पार्टनर बरा नसेल तर नात्यातून बाहेर पडणे चांगले पण एकूणच एक जोडपे, एक संसार करायचा असे साधे सरळ गणित कुठे असते? संसाराचा भरपूर पसारा असतो. तो मांडायचा, चालू ठेवायचा व वृद्धत्व आलेतरी चालूच ठेवायचा. आपल्याबरोबर संसार संपतो. ज्या महिलांना/पुरुषांना काही कारणाने एकट्याला गाडा ओढावा लागतो त्यांची दमछाक होतेच पण अगदी एकोप्यानं संसार करणार्यांचीही होते. लग्न केलं म्हणून घर घ्या/ रेंट करा मग मुलेबाळे, त्यांच्या शाळा, आपल्या नोकर्या, म्हातारपणाची सोय. वाहने, कपडे, फर्निचर, स्वयंपाकघराचे सामान, हौसमौज, अपेक्षा/ अपेक्षाभंग, आजारपणे यासगळ्यात भोवंडून गेला नाही असा संसार नसेल. थोडे कमीजास्त असेल तेवढेच! मी पुढीलजन्मी माझ्याच नवर्याबरोबर लिव्ह इन रिलेशिपमध्ये मुलाबरोबर राहणार. ;)
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/12/2016 - 08:03
नवीन
रेवाक्का, लिव्ह इन रिलेशिपमध्ये हे सगळं नसतं ? म्हातारपणाची सोय ऑपॉप होते की काय ?
- Log in or register to post comments
र
रेवती
Tue, 01/12/2016 - 21:24
नवीन
सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 01/13/2016 - 02:47
नवीन
=)) =)) =))
अता चिंग्याच्या किंवा तत्सम टिनेजांच्या मस्तीच्या तक्रारी करणार नै म्हणजे तुम्ही? =))
चिंग्याला नक्की दाखवा हा प्रतिसाद. =)) =)) =))
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Wed, 01/13/2016 - 02:55
नवीन
सांगायचा उद्देश हा की ह्योच नवरा आणि मुलगा पायजे.
अशा लिव-इनलाच लग्न म्हणतात !
- Log in or register to post comments
र
रेवती
Fri, 01/15/2016 - 21:55
नवीन
असं कसं चिमणेश! तक्रारी करणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. टीनएजरांच्या तक्रारींचं काही सांगू नकोस. लग्गेच सुरु करीन पण हा धाग्याचा विषय नै ना!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 01/16/2016 - 05:00
नवीन
असं कसं? काढाचं ओ तुम्ही धागा. किंवा लट्टुकाकांना सांगु हाँ आपण काढायला. टिनेजरांच्या वैट्टं सवयी आणि देशहित वगैरे वगैरे. सखोल अभ्यास आहे त्यांचा ते टिनेजर असल्यापासुन.
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Tue, 01/12/2016 - 01:07
नवीन
पूर्वी कित्ती कित्ती छान होतं नै, मुली शिक्षितच नव्हत्या, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबीच नव्हत्या. त्यामुळे नवऱ्याने कसंही वागवलं तरी झक मारत त्यांना लग्न टिकवून ठेवावंच लागायचं. न ठेवून सांगतात कुणाला? त्यामुळे खरं तर मुली शिकल्या आणि नवऱ्याची एकाधिकारशाही संपली ही खरी जाचणारी कारणं दिसताहेत...
एके काळी मिपावर ज्या पाशवी शक्ती होत्या त्यांनी या वाक्यांबद्दल फाडून खाल्लं असतं... गेले ते दिवस.
आणि हो, लग्न ही टिकवून ठेवण्याजोगी गोष्ट का आहे हे सांगितलेलंच नाही. एक अमेरिकन म्हण आहे - डोंट व्हॉट एयंट ब्रोकन. कदाचित पूर्वीच्या काळी चुकीच्या कारणांसाठी लग्नं टिकून राहायची. आणि तोंड दाबून बुक्क्यांचा मार असल्यामुळे कोणी त्याबद्दल बोलायचंही नाही. आता तो प्रश्न सुटून कदाचित चांगली परिस्थिती आली आहे. मग जे सुधारलंय ते का बदला?
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Tue, 01/12/2016 - 03:22
नवीन
भारतात अमेरिकन संस्कृती येत आहे. नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे. तरूणपणी हे सर्व चांगले वाटते परंतू वयाच्या एका टप्प्यावर याचाही कंटाळा येतोच. जे लग्न करत नाहीत ते सुखी आहेत हे कसे काय कळते. सुखी सदरा ही कथा सर्वांना माहितच असेल.
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Tue, 01/12/2016 - 13:56
नवीन
मुळात "अमेरिकन संस्कृती" भारतात येत आहे हाच गैरसमज आहे. अमेरिकेत काही सगळे जिकडेतिकडे लिव इन मध्ये असतात असा तुमचा समज आहे की काय? अहो हेलाकाका, व्यवस्थित २०-२०, २५-२५ वर्षे संसारी लोक सगळीकडेच असतात. मुलं बाळं, नातवंडं, त्यांची अंगडी टोपडी सगळं सगळं "भारतीय संस्कृतीप्रमाणे" करणारे लोक इथे ढिगाने आहेत.
मुळात कोणत्याही मनुष्याला नैसर्गिकरीत्या काही स्थैर्य आवश्यक असतेच, अगदीच भटकणारे असतात परंतु ते अपवादच, त्यासाठी संसाराची जबाबदारी तुम्हाला अँकर करते.
- Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा
Wed, 01/13/2016 - 18:46
नवीन
लट्टू काका , तुम्ही टनाटन संघटनेत जा! एकंदरीत छान जमेल तुमच तिथे. एष धर्म: टन्ना टन्न: टनाटन फ्राय!
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Sat, 01/16/2016 - 09:01
नवीन
वास्तविक लिव्ह इन रिलेशन हे फक्त लिट्मस टेस्ट म्हनु शकता तुम्हि तुम्हाला योग्य वाटतो त्या जोडिदारा बरोबर लिव्ह इन रिलेशन रहा काहि दिवसांनि तुम्हालाच समजेल कि आपले ह्याच्याबरोबर मानसिक, लैंगिक, सांसारिक जुळु शकते कि नाहि, मग जर जुळत असेल तर पुढे लग्न कराव नाहितर सरळ वेगळे होउन दुसरा जोडिदर बघावा. पण लग्न हे केलेच पहिजे लिव्ह इन मध्ये पुर्ण आयुष्य निघत नाहि आणि ते कढु हि नये.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Sat, 01/16/2016 - 09:19
नवीन
अनुभवाचे बोल !
- Log in or register to post comments
अ
असंका
Sat, 01/16/2016 - 09:26
नवीन
काय दादा कसे आहात? फार वेळ लावलात यायला?
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Sat, 01/16/2016 - 10:37
नवीन
:-)
- Log in or register to post comments
न
नाखु
Mon, 01/18/2016 - 05:59
नवीन
संपायला आल्याव्र ईंट्री घेतलीत ???? का नाराज आहात मिपावर...
यमगर्नीकर यांच्या लेखाच्या प्रतिक्षेत असलेला
मिपाकर नाखु
- Log in or register to post comments
अ
असंका
Mon, 01/18/2016 - 07:06
नवीन
+१
लिहा हो दादा...लय दिसांपासून वाट बघतोय...
- Log in or register to post comments
स
सुधीर वैद्य
Tue, 01/12/2016 - 04:09
नवीन
भांडण नेमके का होते ?
नवरा - बायकोच्या नात्यात इतर लोकांच्या अपेक्षांमुळे गुंता होतो. तेव्हा लग्नापूर्वी एकमेकांच्या मुलभुत अपेक्षांची चर्चा करा. इतरांच्या कोणत्या अपेक्षा आहेत याचाही विचार करा, पण त्या अपेक्षांना अवाजवी महत्व देऊ नका. अश्या अपेक्षांच्या बाबतीतील कृती योजना तयार करा. कुटुंबियांना सुद्धा तुम्ही व तुमची पत्नी कोणत्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही किवा कशा रीतीने पूर्ण कराल याची कल्पना द्या. अधिक माहितीसाठी माझा लेख ' लग्न पूर्वतयारी' वाचा. लिंक http://www.spandane.com/Event%20Management/Marriage/Marriage_Expectations_Opinions_checklist..pdf
एका मर्यादे पर्यंत पुरुषांना बायकांची भावनिक गुंतवणूक आवडते. पण त्याचा अतिरेक होता कामा नये. कुठे - कधी - कसे थांबावे (व्यापक अर्थ अपेक्षित) हे जर स्त्रीला कळले, तर वैवाहिक जीवनात प्रश्नच निर्माण होणार नाहीत.
नवरा-बायकोचे प्रेम हे ओंजळीत धरलेल्या पाण्यासारखे असते. खूप प्रेम - खूप प्रेम म्हणून ओंजळ बंद करायला गेलात, तर space न मिळाल्यामुळे वैवाहिक जीवनात प्रश्न निर्माण होतात. बघा विचार करून.
दुसऱ्याला गृहीत धरण्याची सवय अनेक लोकांना असते, कारण त्यांना मी आणि माझे ह्यात जास्त रस असतो. इतर सर्व लोक हे केवळ आपल्याला सेवा देण्यासाठी आहेत असा त्यांचा ग्रह असतो. मी गृहीत धरतो म्हणजे माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे असा युक्तिवादही केला जातो. जेव्हा आपल्याला दुसऱ्याकडून गृहीत धरले जाते, तेव्हा आपण नेमके कसे वागतो ? असा विचार केला पाहिजे. असे झाले तर परिस्थितीत नक्की सुधारणा होईल.
नाते आणि पैसा दोन्हीही आपापल्या जागी योग्यच. पण नात्यात पैसा आला किवा पैशात नाते लुडबुड करायला लागले कि प्रश्न निर्माण होतो.
संवाद करायला माणूस २ वर्षांचा असताना शिकतो. पण काय बोलावे , कसे बोलावे, काय बोलू नये वगैरे शिकायला कधी कधी एक जन्म सुद्धा अपुरा पडतो.
आपण जेव्हडे दुसऱ्यावर अवलंबून राहतो (प्रेमाचा बुरखा पांघरून) तेव्हडे आपण स्वत:चे नुकसान करत असतो. मी माझ्या संपर्कात येणाया लोकांना ' मानसिक दृष्ट्या ' स्वावलंबी' होण्यास प्रवृत करतो. मी स्वत: कोणाच्यात गुंतत नाही आणि कोणाला माझ्यात गुंतू देत नाही.
We are very good Lawyers for our mistakes & Very good Judges for other’s mistakes……….!!
Generally there are fights between two rights, rather than right & wrong. The only precaution one has to take is that your Right should not be at the cost of my RIGHT. With this basic understanding, the dispute can always be resolved.
It is also necessary to understand as to why conflict takes place between the persons. Friends may read my article. Link: http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/68-conflict.pdf
- Log in or register to post comments
स
सुधीर वैद्य
Tue, 01/12/2016 - 04:10
नवीन
भांडणाचे शास्त्र :
भांडणामुळे नवरा - बायकोचे नाते ताजे राहते. भांडणाचे सुद्धा एक शास्त्र आहे.
आपल्या आयुष्यात वाद विवादाचे प्रसंग बरेच वेळा येतात. काही वेळेला वादविवाद करताना मुळ विषय बाजूला पडतो आणि ह्या वाद विवादाला वेगळेच वळण लागते. भांडण वैयक्तिक पातळीवर उतरते. आपला इगो दुखावला जातो. अश्या वेळी एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कि आरोप प्रत्यारोप न करता, शांतपणे चर्चा केली पाहिजे. कारण आरोप प्रत्यारोपाचा उद्देश कोण बरोबर हे ठरवण्याचा असतो. त्यात कोणाचाच फायदा नाही. चर्चा केल्यानंतर नेमके काय बरोबर हे कळू शकते. बघा विचार करुन.
"Argument is bad but Discussion is good,
Because Argument is to find out WHO is right.. &
Discussion is to find out WHAT is right.."
दुसऱ्याच्या चुका सांगताना, आपणही चुका करतो का? हे तपासले तर बरे होईल. आपण जेव्हा एक बोट दुसऱ्याकडे दाखवितो तेव्हा तीन बोटे आपणाकडे असतात, ह्याचे भान ठेवणे आवश्यक आहे.
जेव्हा नम्रता हि तुमची कमजोरी आहे, असा चुकीचा पवित्रा समोरच्या कडून घेतला जातो आणि तुम्ही गप्प बसता, तेव्हा नम्रता हा दोष ठरतो असे मला वाटते.
दुसऱ्याला सांभाळून घेण्यासाठी स्वत:चा इगो आकारात असणे गरजेचे आहे.
भांडण न होण्यासाठी - किंवा टाळण्यासाठी खालील गोष्टींचा विचार व्हावा, असे मला वाटते.
काही प्रसंगात उलटा - दुसऱ्या बाजूने विचार करून प्रश्न सुटू शकतात. उलट्या बाजूने विचार सुरु केला तर कदाचित समोरच्या माणसाची बाजूपण समजून घ्यायला मदत होते.....
बायकांनी सुद्धा नोकरी करत नसल्यास, स्वत:चे विश्व निर्माण केले पाहिजे. छंद निर्माण केले पाहिजेत. वाचनासारखा चांगला मित्र नाही. वाचाल तर वाचाल. !!!!! दोघांनी एकमेकाना space देणे आवश्यक आहे.
दुसऱ्याला प्रेमाने जिंकता येते असे म्हणतात. पण मला वाटते कि दुसऱ्याला डोक्याने सुद्धा जिंकता येते, कारण डोक्याच्या वापरात हृदयाचा विचार घेतला जातोच असे माझे मत आहे.
वैयक्तिक प्रश्नांची उत्तरे वेळेवर मिळाली नाहीत तर ते प्रश्न विसरून जायचे असतात म्हणजे मनाला त्रास होत नाही. उत्तर वेळेवर मिळण्यात जी मजा आहे, ती मजा उत्तर ओरबाडून घेण्यात नाही.
आपल्या समोरील समस्येच्या बाजूला दुसऱ्या माणसाच्या मोठ्या समस्येची रेषा आखली कि आपली समस्या हि समस्याच नसून देवाने आपल्याला परीक्षा देण्यासाठी संधी दिली आहे असा भास होतो. बघा विचार करून ….
चूक कबूल करायला धैर्य लागते. चूक कबूल करताना आपल्या मनाला ज्या वेदना होतात, तीच आपली कालांतराने शक्ती बनते आणि आपण नवीन चुका करण्यापासून परावृत्त होतो.
मन जेव्हा अस्वस्थ असेल तेव्हा मनाचे मन व्हा आणि मनाची समजूत काढा म्हणजे सर्व गोष्टी सोप्या होतात.
मन मारून काहीही करू नये. जे करायचे ते मनापासून आणि मनाचा कौल जाणून. जे आपल्या मनाला पटते तेच करावे, पण त्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे .
चांगल्या शारीरिक आरोग्यासाठी आणि मनाच्या शांती साठी जिभेवर नियंत्रण हवे.
एकटेपणा हा काही वेळा माणसाचा भोग असतो . कधी तो परिस्थितीने लादला जातो. तर काही वेळा मनुष्याच्या स्वभावामुळे तो एकटा पडतो. एकटेपणा काही वेळा थोड्या काळापुरता असतो तर काही वेळा अधिक काळासाठी. मनाशी संवाद साधून ह्या एकटेपणातून मार्ग काढता येतो.
कित्येक वेळा परिस्थिती माणसाला मासिक दृष्ट्या स्वावलंबी बनवते. पण कोणीही हे करू शकतो. ह्याची सुरवात लहान लहान सुखे नाकारून करता येते. मनाची शक्ती आपोआप वाढते. स्वत:ची कामे शक्यतो स्वत: करणे हा दुसरा उपाय. जेव्हा तुम्ही फार कमी गोष्टींसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहता, तेव्हा तुमची बरीच tension साहजिकपणे कमी होतात.
सुखी होण्याचा एक मार्ग म्हणजे आपले कोणावाचून अडता कामा नये. हा नियम मी माझ्या ४० वर्षांच्या career मध्ये पाळला आणि घरात सुद्धा पाळतो. आपण दुसऱ्याची मदत जरूर घ्यावी पण अवलंबून राहू नये. हि विचार धारा एकदा समोरच्याला कळली की तुम्हाला कोणीच त्रास देत नाही.
नात्यांचे गणित सोडविणे हे बरेच वेळा अवघड असते.
काही वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.
चांगुलपणा बरोबर unpredictable पणा जपला, तर गोष्टी थोड्या सोप्या होतात .
संसाराच्या चक्रात अडकले तरी संसारात गुंतता कामा नये. कारण शेवटी संसार हा असार आहे.
आपले आयुष्य म्हणजे असंख्य घटनांची साखळी असते. काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण त्याची वेळ माहित नसते, काही घटनांची वेळ माहित असते. प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ' प्रतिक्रिया ' (Reaction ) देत असतो . त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. अर्थात ह्या साठी त्या घटनेवर आधी विचार करावा लागतो.
माझ्या मते, कोणी विचारल्यानंतरच आपले मत द्यावे . अश्यावेळी आपण जर ' श्रेयस्कर मत ' (समोरच्यासाठी श्रेयस्कर - पण त्याला ऐकायला कदाचित आवडणार नाही ) देणार असो तर फारसा प्रश्न पडत नाही . पण लोकांना ' प्रिय मत' आवडते . प्रत्येकाला मत स्वातंत्र्य आहे, पण जेव्हा Your Right is at the cost of My Right ' अशी परिस्थिती येते तेव्हा संघर्ष अटळ असतो.
माझ्या मते चांगले वागणे आणि वाईट वागणे हे समोरचा माणूस कसा आहे हे बघूनच ठरवावे लागते. जास्त चांगुलपणा हा तुमची कमजोरी असे समजले जाते. आपण वाईट वागू शकतो हा आभास समोरच्याला मनात असणे आवश्यक असत.
समोरच्यासाठी श्रेयस्कर वागणे आणि समोरच्यासाठी प्रिय वागणे ह्याची सीमा रेषा ठरवावी लागतेच.
आपण काय बोलतो हे आपल्याला कळणे जास्त महत्वाचे असते . इतरांचा विचार करू नये.
जर आपल्या वागणुकीचा त्रास दुसर्यांना होत नसेल, तर आपल्या मनाप्रमाणे वागायला हरकत नाही . लोगोका काम है कहेना !!!
आपले अस्तित्वच ह्या जगात शाश्वत नाही, तेथे शाश्वत आधार मिळणे दुरापास्तच आहे.
एखादा माणूस आपल्याला का आवडतो ह्याचे विश्लेषण करता आले पाहिजे. खरेतर असे मत एका ठराविक काळानंतरच देता येते कारण आपली समोरच्या माणसाबद्दलची मते काळानुसार, अनुभवावरून बदलत असतात. आपले पहिले मत हे बरेच वेळा 'व्यक्तीचे दिसणे' यापुरते मर्यादित असते. जसा सहवास वाढतो तेव्हा आपण मत बनवू लागतो. आपण स्वत:च नकळतपणे आपली एक प्रतिमा बनवत असतो. समोरच्या व्यक्तीने जर त्या प्रतिमेला धक्का दिला नाही तर ती व्यक्ती आपल्याला आवडू लागते. पण जर आपल्या प्रतिमेला धक्का लागला आणि विचारांती त्याचे वागणे बरोबर आहे असे आपण मनोमन कबुल केले, तर ती व्यक्ती आपल्याला आणखीन जवळची वाटू लागते.
इथे शाश्वत असे काहीच नाही....!! हे जितक्या लवकर मनात रुजेल तो तुमच्या भाग्याचा दिवस असे समजावे. सुखाचा रस्ता ह्याच दिशेला जातो.
एखाद्या गोष्टीबाबत सगळ अगदी जमून आलंय असं कधी होतंच नाही.....काहीतरी राहूनच जात, नकळत......!! कदाचित ह्यामुळेच आपल्या जगण्याला संजीवनी मिळत असेल.
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर, मी काय करू शकतो, मी काय करणार, किती - कुठपर्यंत तडजोड करणार, स्वत:ला काय नको, मी काय करणार नाही, हे नक्की हवे. बरेच वेळा हृदयाचा आवाज (आतला आवाज- मनाचा कौल ) ऐकणे फायद्याचे ठरते.
आयुष्यात मानसिक शांती हवी असेल तर नाही ऐकायची आणि नाही म्हणण्याची सवय केली पाहिजे .
समस्येवर उपाय शोधत असाल तर प्रथम त्या समस्येचा मनापासून स्वीकार करा. ज्या क्षणी तुम्ही समस्येचा स्वीकार कराल, त्या क्षणी त्या समस्येचा तुमच्या मनावरील ताण कमी झालेला आढळेल. त्यानंतर समस्या सोडविण्यासाठी तुम्ही यशस्वी प्रयत्न करू शकाल.
आपले आयुष्य म्हणजे जन्मापासून - मृत्यू पर्यंत येणाऱ्या अनेक क्षणांचे एक जाळे असते. हे क्षण आनंदाचे, सुखाचे, दुःखाचे, समाधानाचे, यशाचे, अपयशाचे, इच्छापूर्तीचे, अपेक्षापूर्तीचे, समस्येचे, काळजीचे, हुरहुरीचे, प्रेमाचे, रागाचे, अहंकाराचे, वेदनेचे …. ……असतात . (हि यादी कितीही लांबू शकेल…………………… )
काही घटना अनपेक्षित असतात, काही घटना घडणार हे माहित असते, पण वेळ माहित नसते. आपण ह्या क्षणाना - घटनांना कसे सामोरे जातो ह्या गोष्टीवर आपल्या आयुष्याचा डोलारा उभारलेला असतो प्रत्येक घटनेच्या वेळी बरेच वेळा आपण ' प्रतिक्रिया ' ( Reaction ) देत असतो. त्याऐवजी आपण Response देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजे आयुष्यातील बरीच tensions कमी होण्यास मदत होते. मित्रानो, बघा विचार करून.
No & Yes R 2 short words, which need a long thought. Most of the things we miss in life R due to saying No 2 soon or Yes 2 late.
Relationship doesn’t shine by just shaking hands at best time. But it blossoms by holding firmly in times of critical need.
Life is all about d little decisions u make everyday. U can’t change d decisions of the past, but every new day offers opportunity 2 make ‘Right’ decisions.
Good relationships are like Trees. They demand attention & care in the beginning but once they blossom, they provide u shade in all situations of life.
Silence & Smile are two powerful tools. Smile is the way to solve many problems & Silence is the way to avoid many problems.
Life means missing expected things & facing unexpected things. When U R right, No1 remembers, But when U R wrong. No1 4gets.
Expect more from yourself than from others because expectation from others hurts a lot, while expectation from you inspires a lot.
The sign of Maturity is not when U start saying Big things but actually it is when U start Understanding Small Things.
“Changing the face” can change nothing. But “facing the change” can change everything. Don’t complain about others. Change yourself if you want peace.
Lovely thing to learn from Water! “Adjust yourself in every situation”. But most importantly, always find out your “own way to flow” &take everything within it which come with it.
''Waves are inspiring, Not because they Rise & Fall, But because they Never Fail to Rise Again''
- Log in or register to post comments
N
NiluMP
Tue, 01/12/2016 - 14:24
नवीन
+१००००००...
- Log in or register to post comments
स
सुधीर वैद्य
Tue, 01/12/2016 - 04:11
नवीन
मोलाचा सल्ला:
लग्नानंतर नवरा - बायकोत प्रेमाचे संबंध प्रस्थापित व्हावेत हि अपेक्षा बरोबर आहे. पण असे लगेच घडतेच असे नाही. परंतु ह्या काळात नाते कसे पारदर्शी आणि व्यावसाईक तत्वावर कसे ठेवता येईल, यासंदर्भात काही Tips संकलित केल्या आहेत. लिंक खाली देत आहे.
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/83-Behaviour_Therapy_for_would_be_Brides.pdf
http://www.spandane.com/Spandane/Spandane-Articles/84-Behaviour_Therapy_for_would_be_Bridegroom.pdf
तुमच्या वैवाहिक आयुष्यासाठी माझ्या best wishes आणि न भांडता संसार कराल हि अपेक्षा.
सुधीर वैद्य
२४-१०-२०१४
Time Permitting, Follow me on .....
http://spandane.wordpress.com/
www.spandane.com
- Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत
Tue, 01/12/2016 - 05:13
नवीन
भारतात अमेरिकन संस्कृती येत आहे. नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे. तरूणपणी हे सर्व चांगले वाटते.
अहो,भारतात ही संस्कृती येत आहे पण ती अमेरिकन संस्कृती अमेरिकेत evolve झालेली आहे.आणि भारतात त्या संस्कृतीत आपण भारतीय मधेच involve व्ह्यायला पहात आहोत.लिहित गेलो तर एक मोठा लेख होईल.
सर्वच अमेरिकनांबद्दल मला म्हणायचं नाही पण "By and large"विचार केला तर,
१-- अमेरिकेतली लग्न संस्था मोडकळीस आलेली आहे.कित्येक वर्षं evovle होता होता.
२--कोणाची कोण आई आणि कोणाचे कोण बाबा हे मुलांना फ्क्त माहित असतं.बायालॉजीकल आई आणि बाबा,सावत्र आई आणि सावत्र बाबा हे पण माहित असतं.आणि अठरा वर्षाचं झाल्यावर आई नको आणि बाबा नको.स्वतंत्र रहायला मोकळीक सहजच मिळते.आणि आई,बाबांनी केलं त्याचं अनुकरण स्वाभाविक होतं.आणि असंच हे निरंतर चालू रहातं.कोण कोणाचं गॉसिपींग करीत नाही.समाजही गॉसिपींग करीत नाही.
त्यामुळे,
"नवरा/बायको नको फक्त पार्टनर पाहिजे. लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे लग्नानंतर येणार्या जबाबदार्या टाळून मृगजळाच्या मागे धावणे."
अगदी ह्याच स्टेजला सध्याची भारतातली पिढी involve होत आहे.
म्हणूनच,
"तरूणपणी हे सर्व चांगले वाटते." सध्या.
पुढे,
"ढेंगलां वर झाली मग सगळां आठवांक लागतांला"
म्हणजे अंथरूणावर आडवं पडावं लागल्यावर.
बायको नसेल तर नवर्याला आणि नवरा नसेल तर बायकोला आठवावं लागणार.लग्न केलं असतं तर? हक्काने आपलं माणूस असतं.हे भरतात बरं का!
कारण अमेरिकेत ही स्टेज-अंथरूणावर आडवं पडण्याची- केव्हांच येऊन गेलेली आहे.आणि त्याच्यावर त्यांनी उपाय पण योजलेले आहेत.
"सोशल सेक्युरीटी,मेडीकेअर,मेडीकेड,नर्सिंग होम्स,सिनीयर सिटीझन फॅसेलिटी वगैर वगैरे"आपआपल्या आर्थीक कुवती प्रमाणे.अगदी म्हागड्या सोयी पासून ते फुक्कट सोयी पर्यंत एकटं रहाता येतं.
तरूण असे प्रर्यंत ठीक आहे.पण उतार वयात,एकट्याला किंवा एकटीला समाजात "वावरणं" महाकठीण होतं.मी काय म्हणतो ते समजलं असेलच.
अमेरिकेत nobody cares
तेव्हा संसार करून भागलेल्या माझ्या म्हातार्याचो नविचारलेलो सल्लो,
"शक्य असल्यास लगीन करा,संसार करा,जमल्यास तडजोड करा आणि भारतीयासारखे रहा.अमेरिकन संस्कृतीच्या नादाक लागू नका. अमेरिकन फारच पुढे गेले आहेत.आणि काही पस्तावत पण असावेत.असं मला वाटतं."
- Log in or register to post comments
स
सुधीर वैद्य
Tue, 01/12/2016 - 05:17
नवीन
योग्य सल्ला - On spot
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 01/12/2016 - 05:58
नवीन
लग्नाला विरोध करणारे किंवा अनिवार्यता समजणारे बहुदा तो आनंददायी विकल्प आहे हे विसरतात.
माझ्या मते, एकमेकातला अनुबंध हे सर्व वैवाहिक आणि एकूणच जीवनातल्या खुमारीचं रहस्य आहे. एकदा लग्न केलं की तुम्हाला हरेक प्रसंगात साथ देणारी सहेली मिळते. अपत्य जन्मानंतर तर संगोपन हा इतका लोभस आयाम आहे की तुम्ही तुमचं बालपणच पुन्हा एकदा एंजॉय करता. आपल्या आई-वडीलांचा सांभाळ करतांना आणि तिच्याही आई-वडीलांची देखभाल करतांना नात्यांना नवा अर्थ प्राप्त होतो. मेव्हण्या, मेव्हणे, साडू, तिचे काका-काकू, तुमचे नातेवाईक म्हणजे तीचे दीर, नणंदा वगैरे... सुरेख नेटवर्क तयार होतं.
फक्त एक आणि एकच गोष्ट दोघात असायला पाहिजे ती म्हणजे पूर्णतृप्त स्त्री. मग पतीला त्या एकाच नात्यात तिच्याकडूनच आईची ऊब, तीची काळजी घेतांना कन्येचा जिव्हाळा आणि तीच्याशी बेधुंद होतांना मैत्रिणीचा संग उपभोगायला मिळतो.
पैसा, मतभेद, कलह, या इतक्या किरकोळ गोष्टी आहेत की तुमच्या पारस्पारिक प्रेमापुढे त्या फार टिकाव धरत नाहीत. कारण एकमेकांची ओढ इतकी असते की माघार कुणी घ्यायची हा प्रश्नच नसतो. एखादे वेळी काही वेळ दुरावा निर्माण झाला तरी कुणी एकानं हात पुढे केला की दुसर्याकडनं तो हातात घेतलाच जातो...आणि मग पुन्हा धमाल सुरु !
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 06:38
नवीन
विठाकाका...
तुम्ही जितके समंजस आहात तसं सगळं जगच नसतं हाच सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. "सुरेख नेटवर्क" बीबीसी सारखं काम करुन तुमच्या घरातल्या बारिकशा गोष्टींची सुद्धा चवीने चर्चा करत बसायला बनवलेलं असतं. हेच नेटवर्क चांगल्या लोकांचं असेल तर त्याहुन सुंदर दुसरी गोष्ट नाही.. पण साधारणपणे तसं नसतं..
बाकी जोडीदाराने मित्र / मैत्रिण म्हणुन रहायला.. मुल जन्माला घालायला.. लग्न कशाला करायला हवं? उलट खरंच प्रेम असेल तर लोक लग्नाशिवायही आयुष्यभर एकत्र रहातील, एकमेकांची काळजी घेतील.. एकमेकांच्या परिवारातही सामिल होतील.. मुल जन्माला घालुन अपत्य सुख मिळवतील..
हे सगळं करायला "लग्न" नावाच्या विधीची काय आवश्यकता? हजार लोकांना जेवण घालुन जाहीर केलं की "आम्ही आता जन्मभर एकत्र रहाणार बरं का!" तरंच हे नातं टिकणार का? आणि खरंच टिकतं का?
"बंधनात" अडकवलं की मग माणसं तोडताना विचार करतील.. नातं बंधनाशिवाय "स्वैर" होईल... इ इ अनेक कारणं लग्नाच्या बाजुने आणि "लिव्ह इन" च्या विरोधात दिली जातात..
पण बंधन घालुन टिकवावं लागेल ते नातं कसलं? आणि अस्सल असेल तर बंधनाची गरजच काय?
- Log in or register to post comments
न
नेत्रेश
Tue, 01/12/2016 - 07:44
नवीन
लग्न न करता एकत्र राहुन जर सर्व काही विवाहीत लोकांसारखेच करायचे असेल तर मग लिव्ह इन मध्ये रहाण्यात तरी काय पॉईंट आहे? जन्माला आलेली मुले वार्यावर सोडुन तर जाता येणार नाही. वैतागवाडी नातेवाइकांचा त्रास लिव्ह इन मध्ये पण असेलच, किंबहुना कणभर जास्तच.
सर्वात जास्त लिव्ह इन जनता अमेरीकेत रहाते. तीथे तर अशा लग्न न करता / लिव्ह इन मध्ये असलेल्या जोडप्याना कायदेशीर रीत्या विवाहीत जोडप्यांचेच हक्क व जबाबदार्या मिळतात (common law marriage). तीथे तर असे त्रासदायक नातेवाईका भारताइतके जास्त नसावेत.
तेव्हा नातेवाइकांच्या त्रासापासुन वाचण्यासाठी लिव्ह इन चा मार्ग काही पटत नाही.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Tue, 01/12/2016 - 08:44
नवीन
विठाकाका, हेलाकाका, मोगा मौसि
अरे ये क्या चल क्या रहा हय ;))
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/12/2016 - 07:57
नवीन
आमची एक लांबची आत्या स्त्री मुक्ती चळवळीत मोठी कार्यकर्ती होती. आमच्या वडिलांनी तिच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस विचारले कि तू एवढी स्त्री मुक्ती वाली मग मुलीचे लग्न कसे करते आहेस ? त्यावर ती म्हणाली कि कायद्याने मुलांना मिळणारे संरक्षण का सोडायचे?
लग्न का करायचं? आणि अस्सल असेल तर बंधनाची गरजच काय?
पंतप्रधान, मंत्री, राष्ट्रपती यांना पण शपथ का दिली जाते?
न्यायालयात गीतेवर कुरणावर किंवा बायबलवर हात ठेवून शपथ का घ्यावी लागते?
शेवटी मानवी मन हे असेच आहे. बंधन नसेल तर उच्छृंखल होते. मनाची नसेल तर जनाची लाज बाळगून पुरुष बाहेरख्याली होत नाहीत हा यात फायदाच आहे. केवळ संभोग हाच हेतू असेल तर लग्नाची गरज नाही. पण मुले जन्माला घालायची असतील आणी त्यांना सुजाण नागरिक बनवायचे असेल तर त्यात बांधिलकी/ जबाबदारी आवश्यक आहे.
आज जोडपे आनंदाने राहत आहे. उद्या मुल जन्माला घालायचे ठरवले. गरोदर पणात स्त्रीच्या सौंदर्याचा आलेख खाली येतो. प्रसुतीच्या पहिल्या तीन महिन्यात स्त्रीचे रूप पुरुषाला अनाकर्षक वाटते. सहा ते आठ महिने संभोग शक्य नसतो. अशा वेळेस पुरुष दुसर्या स्त्रीकडे आकर्षित झाला( हे बर्याच वेळेस प्रत्यक्षात होते) आणी हिला सोडून गेला तर स्त्रीने मुल सांभाळत बसायचे कि मेनके सारखे मुल पुरुषाच्या गळ्यात घालून बाहेर जायचे?
God has linked procreation with recreation.
Otherwise no man will get married.
प्रेम हे आकर्षणातून निर्माण होते आणि सहवासातून वाढते हे म्हणणे वावगे नाही.स्त्रिया जितक्या भावनात्मक असतात तितके पुरुष नसतात हि पण एक वस्तुस्थिति आहे. विचार करून पहा.
- Log in or register to post comments
म
मनीषा
Tue, 01/12/2016 - 08:05
नवीन
शादी .. लड्डु है मोतीचुरका ,
जो खाए पछताए, जो न खाए पछताय |
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Tue, 01/12/2016 - 08:11
नवीन
लग्न हा केव्हाही दोन्ही पक्षी फायदेशीर आणि सन्माननीय पर्याय आहे यात वादच नाही.
पण म्हणून जर काही असहनीय अडचण असेल तर तडजोड केलीच पाहिजे असे कुठे आहे ?
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 01/12/2016 - 09:38
नवीन
थोडासा गैरसमज होतोय.. आणि खरं तर मी सुद्धा पहिल्यांदाच ह्या बाजुने विचार करत असल्याने माझाही पुष्कळ वैचारिक गोंधळ झालेला आहे. मला कुणाला माझा कोणताही मुद्दा पटवायचा नसुन केवळ चर्चा करुन माझ्या विचारांना निश्चित दिशा द्यायची आहे. तेव्हा माझ्या प्रतिसादात जरा गडबड वाटली तर समजुन घ्या. ;)
लग्नाचे कायदे आणि फायदे मला मान्य आहेतच. ते उपयुक्त आहेत हे ही मला मान्य आहे. पण माझा मुळ आक्षेप हा एकंदरीतच लग्नाला जे अवास्तव महत्व दिलं जातं त्याला आहे. इतकं अति महत्व, की कसंही करुन लग्न झालंच पाहिजे हा कायमचा आग्रह सर्वत्र दिसतो.. आणि मग झालं की ते टिकवलंच पाहिजे हा पुढचा आग्रह. ज्यांनी लग्न करायचं नाही असं ठरवलय अशांची चिंता, की ह्यांच कसं होणार? लग्न न होताही लोक आनंदात राहु शकतातच की. फक्त बाकीच्यांनी त्यांची चिंता वाहणे सोडले पाहिजे.
ज्याच्या सोबत बंधनात काय किंवा लिव्ह इन मध्ये काय, राहण्यात आनंद आहे.. जिथे प्रेम आहे (मुल झाल्यावर बाईचे शरीर बदलले म्हणुन कमी झाले तसे प्रेम नव्हे..) जिथे न सांगताही आयुष्यभर निभावण्याची खात्री आहे, तिथे लग्न तसेही निरुपयोगी नाही का? मला कळतय की मी बरंच "हायपोथेटीकल" बोलतेय. पण मुद्दा इतकाच आहे की जिथे प्रेम आहे (आकर्षण नाही..) तिथे लग्न हा सामाजिक संस्कार म्हणुन तरी का करायचं?
शरीराचे आकर्षण लग्नातही संपु शकतेच.. ५० वर्ष एकाच शरीराचे तसेही आकर्षण वाटणार नाहीच. वर्षानु वर्ष एकत्र राहुन प्रेम असेलच ह्याची खात्री लग्न सुद्धा देऊ शकत नाही. गीता / कुराणावर शपथ घेऊन कुणी मुकरणार नाही असं थोडीच आहे. पण केवळ पायात लग्नाची बेडी असल्याने दुसर्याला निव्वळ वार्यावर सोडता येत नाही इतकेच. कायदा तुम्हाला मदत करु शकेल (कदाचित..).. अशा वेळेस कोणतीही बेडी नसलेले लिव्ह इन काय वाईट? तुम्ही तुमच्या आयुष्याचा एक भाग एका माणसाशी जोडता. पण बाकी तुमचे निर्णय, व्यवहार स्वतंत्र असु शकतात. जिथे समजतं की हा माणुस योग्य जोडीदार नाही, तिथे तुम्ही मोकळे असता. जिथे वाटतं की हाच माणुस योग्य आहे, तिथे तुम्ही मुल इ. गोष्टींचा विचार करु शकता. अर्थात मला त्यातुन होणार्या संततीला मिळणार्या कायदेशीर अधिकारां विषयी माहिती नाही.
लिव्ह इन मध्ये गुंतागुंत असते.. लग्नातही असतेच.. फक्त सध्या लग्नाला कायदेशीर मान्यता असल्याने कोर्ट निर्णय देऊ शकते. उद्या कदाचित लिव्ह इन साठी काही कायदे येतील.. तेव्हा तुम्ही म्हणता तसे मुलाचे औरसत्व किंवा नाते संपल्यावर मुलांची जबाबदारी इ गोष्टींसाठी कायदा असेल.
पण जिथे सामाजिक गरज म्हणुन घडवुन आणले आहे, तिथे तडजोडी करत जगताना "लग्न" नक्की आपली कशी आणि कोणती मदत करतं?
- Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या
Tue, 01/12/2016 - 10:27
नवीन
तुम्हाला अनुमोदन. मुळात हे इतके विचार करायची गरज ढगालेखाकाला वाटत नाही. मग काय होता कि ह्यांचे कसे होणार ह्याचीच बाकीच्यांना चिंता. काय होईल? एकतर आनंदात राहतील किंवा दुखात राहतील. तुम्हाला काय फरक पडतो? पण अजूनही संस्कृति नावाचा दांभिकपणा आड येतो आणि सगळी गडबड होते. शेवटी जे बाहेर चालले आहे तेच आपल्याकडे येणार आहे कारण सध्याच्या सिस्टम मध्ये आता फार फायदा राहिला नाहीये. ते सगळे हळूहळू इवोल्व होणारच
- Log in or register to post comments
प
पद्मावति
Tue, 01/12/2016 - 11:04
नवीन
पिरा, उत्तम प्रतिसाद.
विशेष करून दुसर्या परिच्छेदात अगदी नेमकं लिहिलं आहेस.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 01/12/2016 - 11:11
नवीन
अगदी नेमकं लिहीलंत. लग्न करा लग्न करा म्हणून टुमणं लावणारे हेच लोक नंतर काही कमी-जास्त असेल तर हात वर करतात.
This should help!!
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Tue, 01/12/2016 - 14:03
नवीन
पिरा ताई
लिव्ह इन मध्ये तुझं माझं पटलं नाही तर वेगळे होऊ हे मुळातच ठरलेलं आहे. तेंव्हा त्यात बांधिलकी मुळातच नाही. मग नंतर ती राहील हि शक्यता कमीच आहे. मुळात गुण या सदरात पुरुषाचा पैसा आणि स्त्रीचं रूप हे पहिल्या क्रमांकाचे गुण धरले जातात.
पण यात स्त्रीचे रूप याचा भाव उतरणारा आहे आणि पुरुषाचा पैसा याचा भाव चढत जाणारा आहे यामुळे काही काळाने कंटाळा आला आणि वेगळे झाले तर स्त्रीला दुसर्या नात्यात जाणे हे जास्त जिकीरीचे जाते पण तेच पुरुषाला पैशाच्या जोरावर जास्त तरुण स्त्री मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे.
लग्नात मूळ तो माणूस बांधिलकीला तयार झालेला असतो त्यामुळे तडजोड करायला लागेल हे मुळात गृहीत असतं.लिव्ह इन मध्ये मुळात आपले पटले नाही तर? इथूनच सुरुवात होते
एखादा माणूस जेंव्हा चार चौघात एखाद्या कार्याला देणगी देईन हे कबुल करतो तेंव्हा सामाजिक दबावाने का होईना तो ते पैसे देण्याची शक्यता जास्त असते. हेच त्याने खाजगीत पैसे देतो म्हणाला तर नंतर परिस्थिती बदलली तर त्याला पैसे न देणे हे जास्त सोयीचे असते.
मुळात कोणताही व्यवहार हा कागदोपत्री का होतो तर त्याला एक वैधता प्राप्त व्हावी. मग एकाने आपल्या मित्राला पैसे दिले आणि दुसर्याने घेतले. दोघात गाढ विश्वास आहे तर त्यात कागदपत्र/ करारपत्र कशाला असे आपण म्हणाल काय?
हा दोन जीवांचा व्यवहार आहे आणि त्यात बांधिलकी यावी यासाठी लग्नाला औरस स्वरूप (legitimacy) दिले गेले आहे.
मुळात लग्न संस्था परिपूर्ण नाही. पण त्याला सशक्त असा पर्याय अजून उपलब्ध होत नाही.
राहिली गोष्ट ज्याला लग्न करायचे नाही त्याची. ज्याची/ जिची विचाराची बैठक पक्की आहे त्याच्या साठी हे ठीक आहे. त्याला समाज आता स्वीकार करायला लागला आहे.
परंतु अशी बरीच माणसे दिसतात कि तरुणपणात भावनेच्या भरात एकटे राहण्याचा निर्णय घेतात आणि जशी चाळीशी पार व्हायला लागते तसे ते जास्त जास्त एकटे पडू लागतात आणि मग आपण चूक केली असे लक्षात येते तेंव्हा बराच उशीर झालेला असतो. कारण या वेळेस लग्न करायचे ठरवले तर बरीच तडजोड करावी लागते आणि ती वय निबर झाल्याने करणे कठीण जाते. बरेच लोक ते सहज मान्य करीत नाहीत हा भाग वेगळा. आपल्याला म्हातारपणी कोण विचारेल हि काळजी त्यांना खात असते. ( मुले बाळे असलेल्या किती लोकांना मुले विचारतात हा भाग अलाहिदा आहे. पण म्हातारपणी आपली मुले आपल्याला विचारतील या विश्वासाने तरी त्यांचे मानसिक आयुष्य जास्त स्थिर असते.) तुम्ही जेंव्हा चाळीशी पार कराल तेंव्हा या गीष्टी तुम्हाला जास्त प्रकर्षाने जाणवतील.
मृत्यू सुद्धा तरुण पणी एक सुंदर काव्य असतं
मध्य वयानंतर ते एक रुक्ष गद्य होऊन जातं.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 01/12/2016 - 14:32
नवीन
स्त्रीचे रूप याचा भाव उतरणारा आहे आणि पुरुषाचा पैसा याचा भाव चढत जाणारा आहे यामुळे काही काळाने कंटाळा आला आणि वेगळे झाले तर स्त्रीला दुसर्या नात्यात जाणे हे जास्त जिकीरीचे जाते पण तेच पुरुषाला पैशाच्या जोरावर जास्त तरुण स्त्री मिळू शकते हि वस्तुस्थिती आहे.
एकदम सही !
मुळात लग्न संस्था परिपूर्ण नाही. पण त्याला सशक्त असा पर्याय अजून उपलब्ध होत नाही.
नम्र दुमत. विवाह आणि भारतीय विचार असा सविस्तर प्रतिसाद दिला आहे.
राहिली गोष्ट ज्याला लग्न करायचे नाही त्याची....
एकदम मान्य पण तो लेखाचा विषय नाही.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Tue, 01/12/2016 - 14:35
नवीन
मृत्यू सुद्धा तरुण पणी एक सुंदर काव्य असतं
मध्य वयानंतर ते एक रुक्ष गद्य होऊन जातं.
मृत्यू फार थोर चिज आहे डॉक्टर, त्यावर पुन्हा कधी लिहीन.
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Sat, 01/16/2016 - 10:51
नवीन
१००% सहमत
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Wed, 01/13/2016 - 08:48
नवीन
पण जिथे सामाजिक गरज म्हणुन घडवुन आणले आहे, तिथे तडजोडी करत जगताना "लग्न" नक्की आपली कशी आणि कोणती मदत करतं?
नक्की नाही सांगता येणार. पटवुन तर नक्कीच नाही देता येणार. पण लग्नातली तडजोड ही थोडी इतर आयुष्यासारखीच असते.
बॉसशी वैचारिक मतभेद आहेत म्हणुन नौकरी सोडणारे दुसरी नौकरी देखील त्याच कारणाने सोडतात. ३ -४ जॉब बदलल्यावर बॉस सगळीकडे एकसारखेच हे कळते. बायकोचेही तसेच आहे (नवर्याचेही). दोन माणसे आयुष्यभर एकत्र रहायला येतात तेव्हा कुरबुरी या होणारच. तुमचा जोडीदार हिंसक, विकृत किंवा प्रचंड मानसिक छ्ळ करणारा असेल तर गोष्ट वेगळी. पण एखाद्या माणसाशी पटत नाही म्हणून त्याला सोडायचे आणि दुसरा निवडायचा तर दुसरा तरी अगदी तुमच्या मनासारखाच असेल याची काही ग्यारंटी नाही. नविन माणसाबरोबर नव्याने जुळवुन घेउन, नंतर नव्याने कुरबुरी करत बसण्यापेक्षा पहिल्याशीच थोडे जुळवुन घेउन जुन्याच अवगुणांना सुधारण्याचा प्रयत्न करणे जास्त सोप्पे असते (अवगुन सुधारण्याच्या भानगडीत न पडणे जास्त सोप्पे असते खरे सांगायचे तर. अवगुण तुमच्यासाठी अथवा समाजासाठी किंवा तुमच्या जोडीदारासाठी घातक असतील तर गोष्ट वेगळी).
याबाबत एक जुना जोक वाचला होता:
एरवी नवर्याला शिव्या घालणार्या बायका वटपौर्णिमेला एकच नवरा सात जन्मी मिळो अशी प्रार्थना का करतात?
हा जन्मा या नवर्याला वळण घालवण्यात गेला. पुढच्या जन्मी नविन नवर्याला सुधारण्याची कटकट कोण करत बसणार?
त्यामुळे मला तरी थोड्या तडजोडी करणेच योग्य वाटते.
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
गुरुवार, 01/14/2016 - 05:58
नवीन
व्यावहारिक प्रतिसाद आवडला
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 01/12/2016 - 10:24
नवीन
इथली चर्चा वाचूनच बहुधा पाचपन्नास घटस्फोट होतील.
बाकी १००० + नक्की.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »