रोहीत वेमुला
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल"
वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून
शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली
जाते, का ? तर दलित आहे म्हणून
दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे
मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ?
दलित आहेत म्हणून
हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर
विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं,
का ?
तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर
तो आदिवासी आहे म्हणून
म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी
आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला
गेला असं म्हणता येणार नाही.
💬 प्रतिसाद
(150)
ह
होबासराव
Wed, 01/20/2016 - 07:55
नवीन
वाह निनाद योग्य शब्दात मांडलस
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 01/20/2016 - 00:59
नवीन
रोहितचा विद्यापिठातील प्रवेश हा मेरीट थ्रु होता, आरक्शणातुन नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 01/22/2016 - 10:22
नवीन
जरा नीट फॉर्मॅटिंग करून हेच भाषांतर खालील प्रमाणे -
टwo or three ABVP members (off camera) are confronting Rohith about why he tore down the ABVP banner (during campaigning for student elections, I'm assuming).
Rohith says, "[inaudible phrases] could see. If Hindutva, or Hindus, or using the Hindu name, anyone coming onto minorities, or onto Dalits, if I see them, I will..."
ABVP guys interject, "Hello. Why did you tear the banner? Why?"
One of the ABVP guy says, "I'm a Dalit. You tell me, why did you tear the banner down?"
Another ABVP guy says, "Did you tear the banner?"
Rohith replies, "Yes, I tore it."
The ABVP guy asks, "Why did you tear it?"
Rohith replies, "I saw it. I tore it down. I saw ABVP I tore it down."
Rohith continues, "I got angry, and tore it down."
The ABVP guys say, "You tore it down because you saw us in its vicinity."
Rohith replies, "It has nothing to do with you. I saw the saffron banner and tore it down."
Rohith continues, "I saw the saffron color. I saw the Hindutva color. I saw the RSS color. I tore it down."
The Dalit ABVP guy asks, "Tomorrow morning (during daily rituals), even in your house, it will have saffron colors. Will you tear it down too?"
Rohith replies, "Yes, I will tear it down in my house."
The Dalit ABVP guy continues, "Saris will be there (in saffron color), will you tear them?"
Rohith replies, "In my house, I will tear them down."
The Dalit ABVP guy reiterates, "(Saffron) saris will be there, will you tear them down?"
Rohith replies, "Yes, yes. I will tear it down."
The other ABVP guy says to the Dalit ABVP guy, "He says he'll tear it down. Why are we having this pointless conversation with him."
Rohith interjects, "In my house, I'll tear them down."
One ABVP guy to another, "Ok, Ok. Let him be."
ABVP guy tells Rohith, "Whatever you didn't like, you tore it down. If we tear down what we don't like, not one (banner) will remain. Understand?"
Rohith nods and replies, "Tear it down, tear it down."
One ABVP guy to another, "Hey, don't tear (any banners)."
Another ABVP guy continues with Rohith, "We don't have the need to tear them down. We put up our banners without making any inconvenient fuss."
One ABVP guy to another, "This man doesn't have any common sense," referring to Rohith.
The other ABVP guy says to Rohith, "Ok, so you, you said you'll see, right. Ok, fine. Go. We shall see."
वरील संभाषण नीट वाचले आणि झी-न्यूज ने दाखविलेले फूटेज पाहिले तर झी ने एकही महत्त्वाचा मुद्दा गाळल्याचे दिसत नाही. संपूर्ण संभाषणात असे दिसून येते की अभाविपचे कार्यकर्ते रोहीत ने पोस्टर्स का फाडली हे विचारत आहेत. त्यांनी संपूर्ण संभाषणात एकदा सुद्धा रोहीत बद्दल वावगे शब्द उच्चारल्याचे दिसत नाही किंवा त्याला धमकी दिल्याचे दिसत नाही. याउलट रोहीतच उर्मटासारखा उत्तरे देताना दिसतो. एकंदरीत रोहीतचा हिंदू, अभाविप, भगवा रंग, संघ इ. वर प्रचंड राग दिसतो. जे जे भगवे दिसेल ते ते मी फाडून टाकीन, घरातल्या भगव्या साड्यासुद्धा मी फाडून टाकीन ... अशा उत्तरामधून काहीशी मानसिक समस्या वाटते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 01/20/2016 - 06:19
नवीन
आता कसं. म्हणजे तुमचं मत हे पूर्वग्रहदूषित आहे हे तुम्हीच मान्य केलंत. आता तुमच्या मतांना गंभीरपणे कसं घ्यायचं ग्लिसरीन फॅक्टरी?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 01/20/2016 - 06:37
नवीन
त्या चित्रफितित काय आहे ते लिहिलय मी, वाचता येत असेल तर वाचा जरा.
झी वाल्यांनी त्यांना पाहिजे तेच लिहिलेय..पुर्न ट्रान्सस्क्रिप्त आहे माझ्या पोस्ट मधे..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 07:31
नवीन
काटछाट न केलेल्या पूर्ण चित्रफीतीची लिंक द्या.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 01/20/2016 - 17:07
नवीन
याचा अर्थ होतो, तेलुगु शिका. लिन्क चे काय करणार तुम्ही? तुमच्याकडे आहे त्या लिन्क मधले पुर्ण संवाद एखादा तेलुगु मित्र बरोबर घेउन ऐका. झी ने आख्या ५० ओळीतले एक वाक्य टाकलेय.
तेलुगु मित्र नसेल तर,
తెలుగు తెలుసుకోండి
- Log in or register to post comments
म
मैत्र
गुरुवार, 01/21/2016 - 14:41
नवीन
त्या चित्रफीतीतलं बोलणं आहे त्याप्रमाणे तुमचं english transcript आहे.
मी व्हिडिओ बघून मगच लिहितो आहे. मग .झीने गाळुन त्यांना पाहिजे तेच दाखवले. -- काय गाळलं आहे?
हेच सगळं त्या झी च्या युट्युब मध्ये आहे. मग काय सोयीने गाळलं आहे.
आणि transcript मध्ये मी मला पाहिजे ते करणार - जिथे रंग दिसेल तिथे फाडणार याव्यतिरिक्त काय आहे.
ज्या माध्यमांना भाजपाला आरोपी करायचं आहे ते सरळ निर्णय करून मोकळे झाले आहेत.
ज्यांना भाजप बद्दल पूर्ण खात्री आहे आणि अभाविप ने गुंडगिरी केली असेल यावर ज्यांना विश्वासच ठेवायचा नाहीये ते रोहितला नालायक ठरवत आहेत.
माझे दोन पैसे:
ABVP काही १००% सरळ नाही हे सगळ्यांनाच माहित आहे आणि ASA ने पण बरेच उद्योग केले आहेत. पण मग या अर्धवट माहितीवर सगळेजण न्यायनिवाडा करून कसे मोकळे होतात?
ज्यांना दलितांबद्दल आस्था किंवा victim feeling आहे ते ताबडतोब निष्कर्ष काढून मनुवादी, बामण इ. मध्ये शिरतात, किंवा संघद्वेषामध्ये. जे कट्टर अभाविप आहेत ते एक तरूण मुलगा जिवानिशी गेला याचा विचार करायच्या आधी तो कसा नालायक होता हे सिद्ध करायला पाहतात.
२. दोन विद्यार्थी संघटनांच्या भांडणात एका मुलाने आत्महत्या केली हा संपूर्ण देशाच्या वादाचा विषय का होतो?
बंडारू दत्तात्रेय सिकंदराबादचे खासदार आहेत. अभाविप वाल्यांनी तक्रारी केल्या की आमच्या मुलांना मारतात, याकुब साठी प्रार्थना करतात वगैरे. वेळेला हेच त्यांचे कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी पत्र लिहिलं.
पण केंद्रीय मंत्र्यांनी दोन विद्यार्थी गटातल्या भांडणासाठी थेट केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांना लिहिणं हे अतिच नाही का?
त्यांनी विद्यापीठ कुलगुरुंना का नाही लिहिलं. त्यांचं भाजपामधलं वजन आणि पद यामुळे केंद्रातून पत्र गेलं. एकदा समजू शकतो, पण सहा महिन्यात पाच पत्रं का? आणि गेली तर विद्यापीठाने त्याला जे काही असेल ते उत्तर का कळवलं नाही?
याची स्पष्ट माहिती नाही.
३. आता राजीनामा देणारे दलित प्राध्यापक मागचे दहा वर्ष आणि त्याहून महत्त्वाचं जो एक महिना ही पाच मुलं तंबूत राह्त होती तेव्हा काय करत होते. त्यांनी कुलगुरुंची भेट घेतली का/ पत्रं लिहिली का? कारण तेव्हा अन्याय होत होता.
कोणाचा जीव जाईपर्यंत भारतात कुठलीही कृती का होत नाही?
४. सुशील कुमार अभाविप कार्यकर्ता हा मारहाणीमुळे रुग्णालयात गेलाच नव्हता असा अहवाल आला आहे. खरा खोटा माहित नाही. हा भयंकर प्रकार आहे. म्हणजे तक्रार खोटी होती ज्यासाठी या मुलांना सस्पेंड केले गेले. पण त्यांचे बॅनर फाडले, हॉस्टेल मध्ये येऊन ASA ने धमक्या दिल्या हे खरे आहे. आणि कशासाठी तर सुशील कुमारने बॅनर फाडणार्या मुलांना फेसबुक वर Goons म्हटलं - त्यावर भांडणं झाली. गुंड म्हटलं म्हणजे शिव्या दिल्या, अपशब्द वापरले वगैरे सोयीची माहिती बर्याच माध्यमांनी दिली.
५. रोहित वेमुला हा पीएचडी विद्यार्थी होता. म्हणजे किमान चांगली बुद्धिमत्ता, अभ्यास अपेक्षित आहे. तरी तो इतका वेळ फक्त संघटनेचंच काम करत का होता? त्याचं फेसबुक आणि ट्विटर धक्कादायक आहे. विवेकानंदांबद्दलचे उद्गार अशक्य आहेत. त्याचबरोबर तो २६/११ च्या मृतांबद्दल तळमळीने लिहित होता. दुसरीकडे - "तुम कितने याकुब मारोगे, हर घर से याकुब निकलेंगे" असंही लिहून मोर्चा काढत होता. एकूण confusion आहे.
५. काही वेळा असं वाटतं की दलितांना victimization मधून बाहेर यायची तीव्र इच्छाच नाहीये. पण त्याच बरोबर इतर जातीय आणि दलितांना कटाक्षाने टाळणारे / बाजूला करणारे कर्मठही कमी नाहीत.
आणि मिळाली संधी की कर राजकारण याचा तर वैताग नाही संताप आला आहे. डेरेक ओब्रायन, केजरीवाल, राहुल गांधी यांची कृती ही गिधाड वृत्ती आहे.
एकूणात काहीतरी खराब वातावरण होतं हे तर दिसतंच आहे. एकूण अनुभवातून निराशेपोटी त्याने आत्महत्या केली. त्याचा राष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा करणे वगैरे अती आहे. पण आता दोन्हीही वाईट घडून गेलं आहे तर त्याचा मृत्यू व्यर्थ जाऊ नये. जातीय विद्वेष वाढवण्यापेक्षा दलितांना समान वागणूक कशी मिळेल याचा विचार व्हायला हवा. बामसेफी भयंकर द्वेषातून देशासाठी आणि समाजासाठी काहीही साध्य होत नाही.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 07:30
नवीन
+ १
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 07:24
नवीन
तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका. मला फरक पडत नाही.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 01/20/2016 - 17:03
नवीन
हो तुम्ही..नाही पडत फरक हे मान्य..
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 18:26
नवीन
आंध्रप्रदेशमध्ये १९४७ ते २०१६ या ६८ वर्षात सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हा योगायोग असावा काय?
महाराष्ट्रात सुद्धा प्रचंड जातीयवाद आहे. महाराष्ट्रातही सर्वाधिक काळ कॉंग्रेसचे सरकार होते हाही योगायोग असावा काय?
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
गुरुवार, 01/21/2016 - 01:18
नवीन
तुमचा फारच विश्वास हो गुरु योगायोगांवर!
एक शंका -तुमचा जन्म या ६८ वर्षांमधला का?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 01/21/2016 - 08:28
नवीन
जातीयवाद हा मुख्य विषय आहे आणि जातीयवाद नष्ट करण्यासाठी यत्किंचितही प्रयत्न न करता तो जिवंत राहून वाढावा व त्यामुळे आपली राजकीय पोळी भाजून घेता येईल असे ज्यांनी गेल्या ६८ वर्षात केले त्यांचे नाव घेतले तर राग कशाला मानता?
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 01/19/2016 - 12:45
नवीन
राजकारण करु नका म्हणण्यामागे आम्ही तुमच्यावर उपकार करतोय, मिळतंय ते घेऊन मुकाट बसा असा अर्थ असतो. हा जो बेमुर्वतपणा इथेही दिसतोय तो कधीही जाणार नाही. ह्या लोकांना पिढ्यानपिढ्या अपमान सहन करणे, डोल्यावरुन मैला वाहणे, देवदासी म्हणून भोगदासी होणे, पारधी होऊन रानोमाळ भटकणे म्हणजे काय हे कधीही कळणार नाही. तेवढी त्यांची बौद्धिक कुवतच नाही.
उच्चवर्णियांनी हजारो वर्षे छळ केलेला चालतो पण आता खालचा एखादा माणूस त्रासदायक झाला तर लगेच सरसकटीकरण करून पुन्हा गळचेपी करायला एका पायावर तयार. हेच लोक परत भारत सहिष्णु आहे म्हणून बोंबा मारायला पुढे. =))
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 12:48
नवीन
राजकारण करू नये असे मला जरी वाटत असले तरी शोषण ह्या मुद्द्यावर +१
- Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन
Tue, 01/19/2016 - 13:13
नवीन
राजकारण कोणाही विद्यार्थ्याने करायला नको. अभाविपनेसुद्धा नाही. पण बर्याच लोकांचा सूर तसा नसतो.
याकूब मेमनची बाजू घेणे पटत नसेल तरीही त्यांना तो लोकशाहीने दिलेला हक्क आहे. तो हक्क दडपशाही करुन मारता कामा नये. वर कोल्हापूरच्या ऑनर-किलींगचा उल्लेख आला आहे. त्यात मारणारेही सवर्ण आणि मरणारेही सवर्ण. आपल्या जातीचा अभिमान बाळगणार्यांनाच त्याची झळ पोचायला लागली आहे. त्याचा ठपका इतरांवर ठेवून काहीही होणार नाही.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 13:18
नवीन
++११११११
"राजकारण कुठल्याही विद्यार्थ्याने करू नये अगदी एबीव्हीपी ने सुद्धा"
+१११११११
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 01/19/2016 - 13:22
नवीन
अगदी!
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 01/19/2016 - 14:11
नवीन
पटलं!
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 01/19/2016 - 15:05
नवीन
ननि,
तुम्ही लोकशाहीचा हक्क म्हणता तर मग सोबत कर्तव्येही येणारंच. आत्महत्या करणे हे कुठल्या कर्तव्यात बसते?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
र
राँर्बट
Tue, 01/19/2016 - 17:09
नवीन
विद्यार्थ्यांनी राजकारण करु नये असं म्हणून कसं चालेल हो?
आमच्या 'बुद्दू' विद्यार्थ्याने काय करायचं मग?
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/19/2016 - 18:02
नवीन
..?? वाचाळ विरता ?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Wed, 01/20/2016 - 07:40
नवीन
शिक्षणसंस्था हे शिक्षण घेण्याचे, देण्याचे, संशोधनाचे स्थान आहे. ती राजकारण करण्याची जागा नाही. विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी, शिक्षकांशी संबंधित असे प्रश्न असतील तर त्यात विद्यार्थ्यांनी जरूर भाग घ्यावा. परंतु विद्यापीठाशी, विद्यार्थ्यांशी, शिक्षणाशी अजिबात संबंध नसलेले विषय (उदा. याकूब मेममची फाशी, मुजफ्फरपूरची दंगल, महाराष्ट्रातील बीफबंदी) विद्यापीठात आणून आंदोलन सुरू केल्याव त्यावर विरोधी गटाकडून राजकीय उत्तर येणारच. एकदा राजकारण आले की अशांतता निर्माण होते व त्यात फक्त राजकारण्यांचा फायदा होऊन सर्वसामान्यांचा बळी जातो.
या प्रकरणातही तसेच झालेले दिसते. विद्यार्थ्यांनी विद्यापीठात आपल्याशी संबंधित नसलेले प्रश्न न आणता अभ्यासावर व संशोधनवार लक्ष केंद्रीत करावे व अभाविप सकट इतर कोणत्याही विद्यार्थी संघटनेला विद्यापीठात विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडून इतर प्रश्नात लक्ष घालण्यास बंदी करावी असे माझे मत आहे.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/20/2016 - 07:59
नवीन
तुम्ही वर उल्लेखलेले प्रॉब्लम राज्यशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, अर्थशास्त्र ह्या विद्यापीठात शिकवल्या जाणाऱ्या विषयांच्या केस स्टडी असतात असे वाटते त्यामुळे हे प्रॉब्लम बाहेर ठेऊन नुसते पुस्तकी शिक्षण घ्या म्हणणे तितकेसे पटले नाही.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 01/19/2016 - 12:54
नवीन
यांच्य विरोधातला प्रत्येक जन देशद्रोही कसा होतो? कॉंग्रेस वाला कसा बनतो? रोहित देशद्रोही होता, हे दत्तात्रेय यांनी कसे ठरवले?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 13:04
नवीन
आता ह्याला उत्तर म्हणून कोणीतरी जुने प्रत्यय देणार की अमुक अमुक विद्यापीठात काँग्रेसच्या मंत्र्याने असे तसे केले होते अन ऑल, मुळात ते येड़े होते म्हणूनच ह्यांना निवडून दिले होते न जनतेने? शिवाय सोशल मीडिया प्रचार करुन निवडणुका जिंकायला म्हणून आवडतो इम्प्लीमेंट करता येतो तर ती दुधारी तलवार आहे हे कसे विसरता येईल, तुम्ही इकडे तिकडे इतकेसे केले तरी विरोधक रान उठवणार फेसबुक अन ट्विटर वर, तेव्हा हे सगळे मुळात करूच नये असे मनःपूर्वक वाटते मला.
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Wed, 01/20/2016 - 00:40
नवीन
दत्त्तात्रेय ह्यांना लोकशाहीत स्वताचे मत असण्याचे स्वातंत्र्य आहे , त्यांनी ते मत स्मृती इराणी ह्यांच्या खात्यात पत्र लिहून कळवले ह्यावर पुढे त्यांनी विद्यापीठात चौकशी केली अंतिम निर्णय कुलगुरू ह्याचा आहे
ह्यात वावगे असे काहीच नाही आहे
डाव्या विद्यार्थी संघटना बंगाल व केरळ मधील विद्यापीठात वर्चस्व हे राजकीय आशीर्वादाने इतकी वर्ष टिकवून आहेत
आणि हैद्राबाद विद्यापीठात देशद्रोही व्यक्तीचा अड्डा हा आरोप दिल्ली विद्यापीठाबाबत सुद्धा झाला होता
आता आरोप करण्याचा मक्ता फक्त केजू चा आहे का
भाजपा नेत्यांनी करू नये का
आणि भाजप नेत्यांनी नियमा विरुद्ध केले तर हाय कोर्टात हि केस आहे निर्णय लागेल
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Wed, 01/20/2016 - 00:54
नवीन
वर ते मुघल एक, ज्यांना जळी स्थळी पाषाणी कोण्ग्रेस दिसते आणि तुम्हाला युगपुरुष! अवघड केलेय ना केजरीने :-)
सविस्तर लिहितोच नंतर, पण, दत्तात्रेय यान्चे मत व्यक्त करणे नाहीये, त्याला प्रक्रियेत ढवळाढवळ म्हणतात. विद्यापिठाच्या कुलगुरुने या मुलांना सोडल्यावरही इराणी यांनी ४ स्मरणपत्रे पाठवली.
देशद्रोही व्यक्तिंचा अड्दा? हे असले हवाबाज आरोप नका करु. तुमच्याच पोष्ट चा आधार घेतला तर,
काय निर्णय लागलाय एखाद्या केसचा का ही विद्यापिठे देशड्रोह्याचा अड्डा आहेत म्हनुण?
मी खाली कुठेतरी लिहिलेय, हे सगळे सर्तिफिकेट वाटायलाच बसलेत, कोण देशद्रोही आणि कोण भक्त..समिकरण आहे का, भक्त्=देशभक्त, बाकी देशद्रोही?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 01/19/2016 - 15:07
नवीन
ननि,
मिळतंय ते घेऊन मुकाट बसा हा अर्थ तुम्ही कशावरून काढलात?
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 13:07
नवीन
अर्थात शीतल साठे प्रकरण अन आंबेडकर पेरियार प्रकरण उल्लेख पाहून धागा लेखकांचे विचार सुद्धा एकांगीच असल्याचे स्पष्ट दिसुन येते आहे इतके नोंदवतो
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 01/19/2016 - 14:49
नवीन
दोषींवर योग्य ती कारवाई व्हावी . मग ते दलीत(हा शब्दही मला लिहावासा वाटत नाही.) असोत , सवर्ण असोत, की मुस्लिम असोत. आपण किती दिवस तेच तेच करणार आहोत? हा उच्च हा निच्च बास ना भाऊ ! कसला उच्च आणि कसला नीच सब बराबर सब बराबर !!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 01/19/2016 - 15:13
नवीन
अरे न्यायालाही जात, धर्म कशाला लावतात?
एखादा गुन्हेगार दलित अथवा मुस्लिम असेल तर सोडून द्यायचा का?
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 01/19/2016 - 17:06
नवीन
साहेब, एकदा माझा प्रतिसाद पुन्हा वाचा ही विनंती . गुन्हेगार कुठल्याही जाती, धर्माचा , पंथाचा असो शिक्षा ही समान व्हायलाच पाहिजे . किंबहुना दोषी व्यक्तीचा जात , धर्म हा पाहण्यात काहीच अर्थ नाही. त्याहीपुढे जाऊन असे म्हणेल की जाती, धर्म (religion या अर्थाने धर्म ! धर्म, अर्थ , काम, मोक्ष मधील धर्म या अर्थाने नव्हे) या कंसेप्ट नामशेष व्हायला हव्यात . मग कदाचित जगात शांतता नांदेल.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Tue, 01/19/2016 - 17:31
नवीन
अहो साहेब तुमच्या प्रतिसादाला समर्थन म्हणूनच तो प्रतिसाद टाकलाय!
पूरक म्हणून!
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 01/19/2016 - 18:25
नवीन
सॉरी सॉरी "अरे" च्या जागी "अहो" वाचलं अन् सगळा अर्थच बदलला पहा. एकडाव माफी असावी!
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 01/20/2016 - 04:40
नवीन
चुकीला माफी नाही ;)
ह.घ्या.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/19/2016 - 14:55
नवीन
Losers quit, champions go on.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Tue, 01/19/2016 - 15:07
नवीन
..?? वाचाळ वीरता ?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 01/19/2016 - 16:32
नवीन
संबंध झेपल नाही.
- Log in or register to post comments
ख
खंडेराव
Tue, 01/19/2016 - 16:30
नवीन
आत्महत्या न केलेली तमाम माणसं शूर, धैर्यवान, विचारी वगैरे असतात... साभार फेसबुक
- Log in or register to post comments
S
shvinayakruti
Tue, 01/19/2016 - 17:49
नवीन
उच्च जाती म्हणून मिरवणाऱ्या मूर्खांनो, आरक्षण वगैरे
मध्ये आणून, तुमची आरक्षणाबद्दलची चीड मांडून, तुम्ही
फक्त विषय भरकटवताय. तुमची मतं ही वैचारिक तर दूरच,
पण नुसतं आग टाकण्याचं काम करतायेत. तुमचा हेतू तोच असेल तर, मग बाकीच्यांनी तर अशांकडे दुर्लक्ष करायला हवं.
- Log in or register to post comments
र
राँर्बट
Tue, 01/19/2016 - 18:08
नवीन
अहो वीरभद्र,
आरक्षणाच्या कुबड्या सोडा आता!
सत्तर वर्ष होत आली तरी तेच तेच रडगाणं कितीवेळ रडणार आहात?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 01/19/2016 - 18:12
नवीन
आरक्षण गरजेचे आहे! हे मत मी तथाकथित उच्च जातीचा असुन सुद्धा आहे माझे! इम्प्लीमेंटेशन नीट हवे!
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Tue, 01/19/2016 - 19:32
नवीन
सध्याचे आरक्षण चुलीत घालावे!
आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण लागू करावे!
- Log in or register to post comments
न
नुस्त्या उचापती
Tue, 01/19/2016 - 20:51
नवीन
दलित - आदिवासींचा विषय निघाला की , यांना त्यांचे आरक्षण दिसते .
यावेळी दलितेरांना दलितांपेक्षा अधिक आरक्षण आहे हे मात्र दिसत नाही .
आरक्षणाला इतके वर्ष विरोध करणारे आता आरक्षणासाठी रुसून बसले आहेत .
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Wed, 01/20/2016 - 02:48
नवीन
अतिशय चुक गृहितक! आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे.
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Wed, 01/20/2016 - 16:01
नवीन
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे.>>>>>
याबद्दल जाणून घेण्यास ऊत्सुक!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 01/21/2016 - 03:10
नवीन
आर्थिक आधारावर आरक्षण हे परमानेंट असेल, अन तेव्हा ते खऱ्या अर्थाने कुबड्या हे स्वरुप धारण करेल. तस्मात् बंद होण्याची विंडो एक शक्यता म्हणुन ओपन असलेली जातीअंतर्गत आरक्षण व्यवस्थाच उत्तम वाटते, तसेच एक बघा, कमी मार्क्स मधे प्रवेश ते पदोन्नती मिळायला सधन लोक सुद्धा आरक्षण मिळवयच्या मागे लागतात पण त्यासाठी कास्ट सर्टिफिकेट लागते जे मिळवायला आजही भ्रष्टाचार होतो, आता विचार करा जर आरक्षण आर्थिक निकष लावुन दिले तर खोटे उत्पन्नाचे दाखले बनवायला म्हणुन किती भ्रष्टाचार होणार? (कारण थोड्या इन्वेस्टमेंट मधे मिळते आहे म्हणून कोणीच ती संधी सोडणार नाही), आज मुठभर सधन दलितांनी आरक्षण घेतले (क्रीमी लेयर चे ढीले इम्प्लीमेंटेशन) तर "होतकरु सीट्स जातात अगदी ओपनच्या सुद्धा अन केटेगरीच्या सुद्धा" हे आपण म्हणत असतो उद्या जर आरक्षण आर्थिक केले तर नाही टाटा बिरला तर गावातले समुच्च मारवाड़ी, गुजराती , मामलेदार, कारकुन, वकील, अभियंते प्रथम कामधंद्यातुन उत्पन्न कमी दाखवून दाखले काढून घेणारच, नुसत्या उत्पन्नच्या दाखल्याला इतकी डिमांड आली म्हणजे त्याच्यात टेबलाखालुन भाव वाढणार, म्हणजे एकुण ज्यांना खरेच कमी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज आहे अन जे हुशार आहेत परत एकदा ते सोडुन सगळ्यांना एडमिशन मिळणार. झाले एक , दूसरे म्हणजे सहज प्राप्य असे काही दिसले की पुढे जायची इच्छा संपते हा जातीय आरक्षणावर एक पेटेंट आरोप असतो, जर ५०० रु देऊन मिळवलेल्या इनकम सर्टिफिकेट वर सहज एडमिशन मिळायला लागल्या अन हा वरचा आरोप खरा मानला तरी आर्थिक आरक्षण घेणार लोकांस सुद्धा तो लागु होईल अन कथित क्वालिटीचा ह्रास होणारच, कसे? ह्याऊपर आर्थिक निकष हे कॉन्स्टंट असणार आहेत कारण कितीही पैसा समाजात आला तरी सापेक्षतेनुसार कोणी एक गरीब राहील कोण कोणी श्रीमंत, अश्यात क्वालिटी परमानेंट डेमेज होईल अन तेव्हा झालेल्या अराजकाला कोणीच वाली नसेल, हे झाले तात्विक विचारावर ,
लोकशाही मधील प्रॅक्टिकल आस्पेक्ट चा विचार करता सद्धया अनारक्षित असलेले लोक हे एकुण भारतीय लोकसंख्येच्या 5-8% च्या मधे आहे अन त्यांच्यात राजकीय एकवाक्यता सुद्धा नाही तस्मात् आर्थिक आरक्षण ही मागणी रेटायची म्हणली तरी न अनारक्षित गटाकड़े पुरेसे संख्याबल आहे न राजकीय एकवाक्यता अन वर संगीतलेल्या लोकशाही मधील अनारक्षित जातींची टक्केवारी पाहता कुठल्याच राजकीय पक्षाला त्यात रस असण्याचे कारण ही नाही,
जात आधारीत आरक्षण हे वाईट म्हणले तरी तुर्तास इट्स द बेस्ट अवेलेबल वाईट इन द सिस्टम!ह्यशिवाय पॉलिसी वाईट नसते तर त्याचे "इम्प्लीमेंटेशन" वाईट असते जातिनिहाय आरक्षण पॉलिसीचे इम्प्लीमेंटेशन नीट करता बरेच प्रॉब्लेम सुटू शकतात पण परत राजकीय इच्छाशक्ति इज द की!!!
असे काहीसे माझे वैयक्तिक मत आहे :)
- Log in or register to post comments
श
शलभ
गुरुवार, 01/21/2016 - 09:18
नवीन
खूपच मस्त मुद्देसूद प्रतिसाद. आता कुणी आर्थिक आरक्षण विषय काढला की त्यावर हे उत्तर असेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »