Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

रोहीत वेमुला

S
shvinayakruti
Mon, 01/18/2016 - 18:01
🗣 150 प्रतिसाद
आय आय टी मद्रास मध्ये "आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल" वर बंदी आणली जाते, का ? तर ते दलित आहेत म्हणून शीतल साठे च्या कार्यक्रमांवर अभाविप कडून बंदी आणली जाते, का ? तर दलित आहे म्हणून दादरी हत्याकांडात गोमांस असल्याच्या संशयावरून जीवे मारले जाते, का ? तर मुसलमान आहे म्हणून खैरलांजी, खर्डा, शेवगेडांग, सोनई हत्याकांड घडले, का ? दलित आहेत म्हणून हैद्राबाद विद्यापीठातून विद्यार्थ्यांना "आंबेडकर विद्यार्थी विंग" काढून लढतात म्हणून बाहेर काढला जातं, का ? तर दलित आहेत म्हणून मुलाचं प्रेत घेऊन ५ किलोमीटर चालत जावं लागतं, का ? तर तो आदिवासी आहे म्हणून म्हणून जोपर्यंत मुसलमान आहे, दलित आहे, आदिवासी आहे म्हणून माणूस मारला जाईल तो पर्यंत फक्त माणूस मारला गेला असं म्हणता येणार नाही.

प्रतिक्रिया द्या
25729 वाचन

💬 प्रतिसाद (150)
र
राजो गुरुवार, 01/21/2016 - 10:51 नवीन
आरक्षण असावे पण या गोष्टीला कुठे तरी सीमा असावी. या बाबतीत असे करता येईल. ज्या व्यक्तीने आरक्षणाचा लाभ शिक्षण/नोकरी मिळवण्यासाठी घेतला आहे, त्याच्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीला (भाऊ/बहीण्/मुले) पुढे घेता येऊ नये. हळूहळू आरक्षणाचा विषय आपोआपच संपून जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ज
जव्हेरगंज Wed, 01/20/2016 - 16:01 नवीन
आर्थिक आरक्षण हे अजिबात नसावे.>>>>> याबद्दल जाणून घेण्यास ऊत्सुक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ख
खंडेराव Tue, 01/19/2016 - 23:22 नवीन
भाषेवर नियण्त्रन ठेवा जरा, अन्यथा अशाने विषय दुरच रहातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shvinayakruti
प
पैसा Wed, 01/20/2016 - 07:41 नवीन
दुसऱ्याना मूर्ख म्हणायचा हक्क तुम्हाला कोणी दिला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shvinayakruti
D
DEADPOOL Wed, 01/20/2016 - 18:02 नवीन
ओ नीट बोला जरा! तुम्हांला जर विरोधी मते पचत नसतील तर येथे येऊच नका! आणि ज्या व्यक्तींना तुम्ही मूर्ख म्हणालात त्यानी तुमच्यापेक्षा अनेक पावसाळे जास्त पाहिलेत मिपावर! आणि आता मीच म्हणतो तुमच्यासारख्या मूर्खाना मिपावर बंदीच आणायला हवी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shvinayakruti
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 01/19/2016 - 18:14 नवीन
बाकी धागालेखक ह्यांनी भाषेवर तोल ठेवावा असे सुचवतो! अर्थात ही फ़क्त सूचना आहे एक , बाकी ज्याचात्याचा वकुब अन स्वभाव!.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Tue, 01/19/2016 - 18:40 नवीन
बरोबर आहे, भाषेवरचा तोल गेल्याने चर्चेत फायद्या एवजी नुकसानच अधिक होत असावे. एखादा विषय खूप गरम असेल तर तोल जाणार्‍यांनी सहसा दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा असे माझे व्यक्तिगत मत असते - म्हणजे मी तसा तो घेत असतो. दुसर्‍या बाजूस अनावश्य्क वाचाळ विरताही दिसते आहे. काही अपवाद वगळता, आजच्या काळात जुन्या काळा एवढे जातीयवादी कुणीच नसेल. मतांतरे असतात कठोरतेने टिका करतानाही असभ्यता टाळली पाहिजे. ज्यांना रुची असेल त्यांना मिपावरील कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ? हि धागा चर्चा अभ्यासता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
च
चैतन्य ईन्या Wed, 01/20/2016 - 03:09 नवीन
Hyderabad Central Uuniversity – 18/01/2016 The propaganda machine is back. As mark Twain said - Before the truth comes out and wears the shoes, the false hood must have traveled across half of the world. This is the truth about the latest incidents in Hyderabad Central University. Some elements inimical to the Nationalistic school of thought and have ulterior agenda are using the name and banner of Ambedkar Students Association to malign the image of other organisations and black out any other version or school of thought. The main accused in serial Bombay blasts of 1993, Mr.YakubMenon was found guilty on several counts. The death sentence imposed upon him by the trial court was confirmed by the Supreme Court. After that he was hanged. Some persons under the banner of ASA had protested against this hanging. They are entitled to. This meeting was held in University campus with many new unknown faces participating in it. It was claimed that from every house another Yakub will emerge. “Tum KitneYakub Mar denge, HarGhar se YakubNikalege– ASA. UOH”. The English translation reads as follows: “How many Yakubs you kill! From every house one Yakub Will be generated”. This was on 3-8-2015 One Susheel Kumar ( office bearer of local unit of AkhilBharatiyaParishad, ABVP) protested at this. He put up his comment on face book commenting about the aggressive behavior. Does he have right to comment on this protest? Or Not? On the same day, at mid night 30 persons barged into hostel room of Susheel and dragged him out of the room. The police came and left. He was beaten in the presence of two constables. The ASA volunteers beat up susheel badly and dragged him to the main security gate. He was forced to open the face book account at the Security room and forced to write a note of apology. The Security officer was witness to all this and he counter signed on the note written by Susheel. He was rushed to Hospital , and he underwent treatment in hospital, operated upon etc., This was attack on one student by 30 persons. This is not denied by anyone. There was no scuffle or a fight. As usual, the police and the University administration colluded with the attackers. There were complaints and mother of Susheel was abused when she visited the campus in the presence of senior officers of the University. She went to court and sought a direction to the management of the university to check such incidents. The university had constituted a committee to go into all this. After full-fledged inquiry, it was recommended that five students be rusticated from the university. This means that the students will lose the academic career scholar ships etc., There was huge outcry that the Dalit students are being sent out of the campus. Violent protests and confinement of in charge VC Mr. Sharma took place. The implementation of the final decision was kept in abeyance. After the new Vice Chancellor took charge, the issue was pursued and the mild punishment of keeping these erring students out of Hostel alone was imposed. Their Monthly fellowships were not affected and they are allowed to pursue their studies. These students approached the High Court in December 2015 and the case is to come up for hearing on third week of January 2016. In meanwhile ASA students protested. The High Court is to reopen on 18-1-2016. On 17 January 2016 a research scholar and one among the five who were given punishment Mr. Rohit committed suicide. This is most unfortunate. The legal battle was on. Now the story is spread that the Dalit boy was targeted. The spin story which is doing rounds is that there was a clash on Muzafarpur riots and Rohit is punished. Muzafurpur issue is regarding communal incident between Muslims and Hindu Jats in that area. The issue here in University was hanging of YakubMenon. The issue was whether 30 persons can go to room of a student and beat him up for two to three hours. This was failure of police who left the scene and university administration. The dean of Students Welfare was told (prior to the attack) by ASA that they are going to Susheels room. Should he not take steps prevent further escalation. He was instrumental in attack on Susheel. It has nothing to do with DALIT boy etc., Why Dalit card is used to protect the image of YAKUB Menon? What has Ambedkar got to do with hanging of YakubMenon.Yakub was not a champion of dalits!! The usual demands of resignation of new VC , central ministers etc., is on. The university Administration and irresponsible local police will do lot of explanation. The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/20/2016 - 05:51 नवीन
मराठीत लिहील्यास उत्तम , कमीतकमी गोषवारा तरी मराठी मध्ये लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य ईन्या
म
मारवा Wed, 01/20/2016 - 04:27 नवीन
संवेदनशील विषयावर चर्चेचा आवाज इतका कर्कश्श का व्हावा नेहमीच ? आपण शांततेने साध्या शब्दांच्या मदतीने हळु आवाजात बोलु शकतो असो.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Wed, 01/20/2016 - 05:13 नवीन
आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
ई
ईश्वरसर्वसाक्षी Wed, 01/20/2016 - 09:03 नवीन
लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. हा प्रकार कोण करतय ईथे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 01/20/2016 - 05:14 नवीन
आहे मारवाजी, एक २६ वर्षाचा मुलगा मेला. तो या व्यवस्थेचा बळी होता, ते सोडुन, त्याचा तोल कसा ढळला, तो हिन्दुविरोधी होता, तो देश्द्रोही कसा होता हे सुचवणे, आरक्षण आणि शिश्यव्रुत्ती मधे आणने, हे किळसवाणे आहे. उद्या, एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
न
निनाद मुक्काम … Wed, 01/20/2016 - 07:50 नवीन
असे पूर्वीही झाले आहे शासन निर्णय घेते त्याला विरोध करणारे आत्महत्या सारखा मार्ग निवडतात त्यातून त्या मुद्याकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न असतो. मंडळ आयोगाच्या वेळी अश्याच एका तरुणाचा बळी गेला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
न
नाखु Wed, 01/20/2016 - 08:25 नवीन
आता पुढच्या बातमीत काही राजकीय्+सामाजीक पोळी भाजण्याचे मूल्य नसल्याने आणि म्रुत व्यक्ती अगदीच गरीबाघरची असल्याने ना दांडी मिडीयाला त्याचे सोयरेसुतक नाही की सजग मिपाकरांना (आणि हो अपराधी लोकांबद्दल बोलल्लात तर खबरदार) हे आरोपी १०००% निर्दोष सुटतील याबाबत मी पक्की खात्री बाळगून आहे संबधीत बातमी मटा आणि पुढारी याबरोबरच सकाळमध्ये आली आहे
पेटवून दिलेल्या तरुणाचा ससून रुग्णालयात मृत्यू - - शनिवार, 16 जानेवारी 2016 - 03:45 AM IST Tags: crime, thief, burn, police, kasba peth, pune पुणे - चोरीच्या संशयावरून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलेल्या तरुणाचा शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सावन धर्मा राठोड (वय 17, रा. करमाळा, सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने गुरुवारपर्यंत (ता. 21) पोलिस कोठडी सुनावली. इब्राहिम मेहबूब शेख (वय 35, रा. 726, कसबा पेठ), जुबेर इकबाल तांबोळी (वय 29) आणि इमरान इकबाल तांबोळी (वय 30, दोघेही रा. फातिमानगर) या तिघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. सावन राठोड हा मूळचा करमाळा (जि. सोलापूर) येथील रहिवाशी आहे. त्याचे वडील वीटभट्टीवर काम करतात. घरी भांडण झाल्यामुळे दहा-बारा दिवसांपूर्वी तो रागाने पुण्यात आला होता. कचरा आणि भंगार जमा करून त्याची उपजीविका चालली होती. असेच काम करणाऱ्या काही तरुणांसोबत त्याची ओळख झाली होती. पुण्यात कोणी नातेवाईक नसल्यामुळे पदपथ हेच त्याचे घर होते. बुधवारी दुपारी कसबा पेठेतील पवळे चौक ते फडके हौद चौकादरम्यान तो भंगार जमा करत असताना आरोपींनी चोरीच्या संशयावरून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पेट्रोल पाजून काही पेट्रोल अंगावर टाकून पेटवून दिले. सुमारे 70 टक्‍क्‍यांपेक्षाही अधिक भाजल्याने त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असताना आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. वडील आणि बहिणीच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक (गुन्हे) ज्ञानेश्वर भोसले यांनी दिली.
सकाळ दि १६ जानेवारी २०१६
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी
म
मोदक Wed, 01/20/2016 - 09:01 नवीन
हे लोकांच्या आडनावावरुन सोयीस्कर भुमिका घेणे आपण थांबवु तेव्हाच चर्चा निट होतिल. रोचक आहे. एखादा जोशी किम्वा कुलकर्नी वेमुला नावाच्या VC ने केलेल्या छ्ळामुळे मेला, तरिही मी त्या जोशीचीच बाजु घेउन लिहिल. गेल्या ११ महिन्यात असे काहीच घडले नाही का? तुम्ही लिहिले असल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ख
खंडेराव Wed, 01/20/2016 - 17:01 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
म
मोदक गुरुवार, 01/21/2016 - 08:02 नवीन
मग गेल्या ११ महिन्यांमध्ये जोशी/कुलकर्णींवर अत्याचार झालेच नाहीत का? कोल्हापूरची घटना ताजी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 01/21/2016 - 08:23 नवीन
मोदक दादा, अहो कोल्हापुर मधे belligerent parties ह्या दोन्ही सवर्ण होत्या की हो! जातीच्या फुकट अन वृथा अभिमानातून घडलेली ती घटना आहे खाप पंचायत टाइप हॉरर किलिंगची, त्याच्यात दलित-सवर्ण किवा वाईस वर्सा एंगल कुठे आहे? बरं तुम्ही म्हणता तशी एक केस अमरावती मधे काही वर्षं मागे झाली होती, ज्यात एका दलित मुलाने कुळकर्णी मुलीला एकतर्फी प्रेमातुन घरात शिरून खलास केले होते, अन माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा पुर्ण सहानुभूति (मीडिया कोर्ट प्रशासन) ही पीड़ित कुळकर्णी च्या बाजुने होती. मग कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 01/21/2016 - 08:24 नवीन
केस चे डिटेल्स सद्धया हाताशी नाहीत मिळाल्यास नक्की पोस्ट करतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
सुबोध खरे गुरुवार, 01/21/2016 - 08:27 नवीन
बापूसाहेब हा हिशेब चुकला पहा. उद्या अगदी एखाद्या उच्च कुळातील राजघराण्यातील मुलाने अगदी गरीब मुसलमान मुलीला जर एकतर्फी प्रेमातून जीवे मारले तर अगदी कट्टर हिंदुत्व्वादिसुद्धा त्या मुलीची बाजुच घेतील. येथे कुणीही कुणाला मारले नसून आत्महत्या आहे आणि तिला दलित विरुद्ध उच्च असा राजकीय रंग मुद्दाम भरला जात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 01/21/2016 - 09:33 नवीन
बरोबरच आहे की सर! मोदकभाऊ जे कोल्हापुर केस बद्दल म्हणत होते मी त्याच्यावर बोललो, प्रॉपर हुकला का पॉइंट माझा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मोदक गुरुवार, 01/21/2016 - 10:38 नवीन
बरोबर आहे बापू तुमचे.. मला इतकेच म्हणायचे आहे की खंडेनाना विसंगती विसंगती म्हणताना स्वत: एखादी विसंगती दाखवायचे विसरले काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
श
श्रीगुरुजी Wed, 01/20/2016 - 07:46 नवीन
The sequence of events is rather queer. The hanging of YakubMenon is questioned by ASA. Susheel says that the ASA members are ‘GOONS’ on his face book. HE is attacked by 30 persons in the midnight in his hostel room. The university punishes the attackers with mild punishment. This is challenged in the court. One of the attackers commits suicide. Who is scheming the violence? Who is benefitted? Now, the caste issue. Susheel Kumar who was beaten in the midnight for over two hours by 30 persons ( mostly non boarders who had occupied the campus) is an OBC from a Telangana lower middle class family. Whenever a volunteer of ASA is involved in anything, the caste card comes out. Should anyone not criticize any member of ASA? Are the members of ASA or persons using the banner of ASA out of bounds for any scrutiny or criticism? If any one criticizes or acts against the ASA, should he be punished? Is ASA beyond scrutiny and criticism? The TOLERENCE and INTOLLERENCE debate needs to be discussed in new paradigm.
+ १
  • Log in or register to post comments
त
तुडतुडी Wed, 01/20/2016 - 13:24 नवीन
अत्यंत तोकड्या आणि अर्धवट माहितीच्या आधारे लिहिलेला लेख . रोहित वेमुला चा इतिहास बघता त्याच्या आत्महत्येच निव्वळ राजकारण केलं जात आहे . याकुब मेनन च्या फाशीला विरोध करणारा , अभाविप च्या कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात सामील झालेला असल्यामुळे त्याला होस्टेल मधून निलंबित करण्यात आले होते . त्याने त्याची वर्तणूक सुधारण्या ऐवजी आत्महत्या केली . आता आत्महत्या कोणत्याही जातीचा , कोणत्याही धर्माचा माणूस करू शकतो . पण त्याचं दलित असणं हे काही फेक्युलर लोकांनी उचलून धरलं. लेखामध्ये गोमांस खाल्याचा संशयावरून मारण्याचा उल्लेख केलाय पण ब्याटरी चोरण्याच्या संशयावरून पेट्रोल पाजून पेटवून दिल्याच्या , मालदा घटनेचा , टिपू सुलतानच्या जयंती वादात 'शांतताप्रिय' धर्मियांनी ३ हिंदूंना मारल्याचा उल्लेख नाहीये . प्रसारमाध्यमे अश्या गोष्टींना महत्व देत नाहीत कारण त्यावरून राजकारण करता येत नाही ना.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 01/20/2016 - 13:42 नवीन
विरोधी पक्षांनी राजकारण करावयाचे आणि परिस्थीतीनुसार सत्ताधारींनी राजकीय बचाव करावयाचा या चाकोरी पलिकडे राजकीय पक्ष आणि त्यांचे समर्थक कितपत जाऊ शकतील याची सांशकताच वाटते. दलितांना राजकीय दृष्ट्या सामिलकरून घेण्यासाठी सारेच पक्ष धडपडताना दिसतात, पण सामाजिक स्तरवरील अभिसरणाच्या बाबतीतल राजकीय नेते फारसे कृतीशील दिसत नाहीत. -नाही म्हणावयास, उदाहरणार्थ हैदराबाद विद्यापिठातील प्रस्तुत घटने बाबत अगदी संसदीय समिती मार्फत चौकशी पर्यंत सोपस्कार होऊ शकतील- वस्तुतः आरक्षणावरूनची मनातली अढी दलितांना सर्वांसोबत सहभागी करून घेण्याच्या आड येणार नाही ह्या दृष्टीने आपल्या समर्थकांना मार्गदर्शन करणे, हि राजकीय नेत्यांची नैतीक जबाबदारी असावी पण राजकीय नेते हि जबाबदारी निभावताना दिसत नाही. आंदोलनांना रचनात्मक दिशा देऊ शकेल असे दलितांमधूनही राष्ट्रीय स्तरावरील स्विकार्य आणि जबाबदार नेतृत्व आकार घेताना दिसत नाही. आंध्र आणि तेलंगाणातील द्लित विद्यार्थी चळवळी - सध्या चर्चेत असलेल्या हैदराबाद विद्यापीठाची धरून- ह्या मुख्यत्वे डाव्या कम्यूनीस्ट पक्षांच्या विद्यार्थी चळवळींशी संलग्न आहेत आणि बाकी भारतातील दलित चळवळीतील नेत्यांचा त्यांच्यावर सरळ प्रभाव कमी असेल असे गृहीत धरले तरीही, राजकारणात एखादी अडचणीची जागा असते तेथे संवादाची मागचे दरवाजे उघडे असावे लागतात हैदराबाद विद्यापीठ प्रसंगाबाबत भाजपाचे राजकारणी या बाबत असे प्रयत्न न करून अयशस्वी झाले का? हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी चळवळी सोबत होत असलेल्या संघर्षाने भाजपाचे मान्यवर नेते अस्वस्थ झाले असतील त्यांनी मंत्रालयामार्फत अधिकृत कागदी घोडे नाचवले, मंत्रालयातील बाबूलोकांनी विद्यापीठातील बाबू लोकांनीही कागदी घोडे नाचवून आपापली कर्तव्ये पारपाडली हे ठिक परंतु राजकीय प्रश्नांची सोडवणूक राजकीय पद्धतीने करण्यासाठी काही -परोक्ष-अपरोक्ष- राजकीय संवादाचे प्रयत्न करून पहाण्यात भाजपाचे आंध्र आणि तेलंगाणातील मान्यवर नेते कमी पडले का ? तळे राखी तो पाणि चाखी हे समजता येते, सत्ता बदलल्या नंतर सर्व ठिकाणी तुम्ही तुमचे उमेदवार लावणार हे समजता येते. पण काही जागा संवेदनशील असतात, बाकी भारतास हैदराबाद विद्यापीठातील जातीय संघर्षांचा इतिहास माहित नसेल म्हणजे त्यांच्या आंध्र आणि तेलंगाणातील नेत्यांना माहित नसेल असे नसावे; त्यांच्या नेत्यांना जर स्थानिक माहिती असेल तर दलित विद्यार्थ्यांशी संघर्षाची जुनी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती (भले मग त्यांची समजा जुन्या घटनांमध्ये चुक नसेलही) उपकुलगुरू म्हणून कशी काय निवडली जाऊ शकते ? उपकुलगुरू म्हणून संवेदनशील ठिकाणी नेमण्याकरता तुमच्या कडे तुमच्या गटाची दुसरी एकही व्यक्ती नसते का ?
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Wed, 01/20/2016 - 17:00 नवीन
संयत प्रतिसाद..आवडला..धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/20/2016 - 15:40 नवीन
प्रकाटाआ.
  • Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 01/20/2016 - 15:22 नवीन
नाय पटले बुआ कप्तान साहेब! अजिबात नाही पटले! असो! आता काय बोलणार... एका फोटोवर "स्कॉलरशिप"वाल्या सगळ्या विद्यार्थ्यांस हीनपणे जोखणे वाटले मला होनेस्टली अधिक उणे माफ़ी पण अजिबातच आवडले नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 01/20/2016 - 15:39 नवीन
प्रतिसाद काढुन टाकतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Wed, 01/20/2016 - 15:51 नवीन
अत्यंत आभारी आहे कप्तान साहेब! तुम्हास विचार करता येतो ह्या विश्वासाने खुल्यामनाने बोललो होतो, तुम्ही आमच्या मैत्रीचा मान राखलात आनंद वाटला ____/\_____
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ख
खंडेराव Wed, 01/20/2016 - 17:23 नवीन
१) अनुपमा राव, सिनियर वैद्यकिय अधिकारी - सुशील ला मारहाण झाल्याचे मी जेव्हा त्याला तपासले तेव्हा वाटले नाही. तारिख - ८ ओगस्त २) डो. चेन्ना रेड्डी, अर्चना हॉस्पिटल जिथे सुशील दाखल होता - USG abdomen taken on August 7 show acute appendicitis. PAC and surgical profile done, patient taken up for surgery. Diagnostic Lap and Appendectomy done under GA on August 7. Patient improved well and discharged with stable vitals - ३) डिएसओ दिलिप सिन्ग - सेक्युरिटि अधिकारी- मी असा च्या विद्यारथ्यांना सुशिल ला मारताना बघितले नाही. मी पोहोचलो तेव्हा ते ( सुशील आणि असा ) बोलत होते. सुशीलला अपेन्दिक्स होता, आनि त्याने त्याचे ओपरेशन करुन असा वाल्या विद्यर्थ्यांना अडकवण्यासाठी हा उद्योग केला. हे झाल्यानंतर, रोहित आणि सुशिल यांना, डो. राव आणि सिन्ग यान्च्या साक्षि ग्राह्य धरुन, समज देउन सोडण्यात आले. नंतर, HRD आणि दत्तत्रया बान्देरु यान्च्या दबावामुळे ५ जनांचे निलंबन झाले. अधिक माहितीसाठी - http://indianexpress.com/article/india/india-news-india/hyderabad-students-suicide-abvp-leader-claimed-stomach-pain-after-assault-was-operated-for-appendicitis/
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 01/20/2016 - 18:29 नवीन
ही अजून एक नवीन धक्कादायक माहिती - Former chairman of the University Grants Commission (UGC) and chairman of Indian Council of Social Science Research (ICSSR) Professor Sukhadeo Thorat said that the issue should be looked in a wider context. "In Hyderabad University, there were two suicides, one was in 2008 and now in 2016. But in Hyderabad city itself there were nine suicides. If we come to northern India, then two suicides were reported in AIIMS, 14 suicides reported from Lucknow, Kanpur, Roorkee and Chandigarh. The issue is why is that the proportion of suicide much higher among the Dalits. The 23 cases that I mentioned, one is Muslim and one tribal and rest of them were Dalits. It means there are problems as far as the stay of Dalits in universities is concerned," Thorat said. गेल्या काही वर्षात निरनिराळ्या विद्यापीठात इतक्या मोठ्या संख्येने दलित विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली हे आजच समजले. बरोबर आहे. तेव्हा केंद्रात व राज्यात धर्मनिरपेक्ष सरकार असल्याने या आत्महत्या देखील धर्मनिरपेक्ष समजल्या गेल्या असाव्यात.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 01/20/2016 - 20:03 नवीन
यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात . मेरी कमीज उस्से सफेद है ! जिथे राजकीय कारणांमुळे आत्महत्या कराव्या लागल्या त्या सगळ्या कॉंग्रेसशासित , सप शासित , आप शासित राज्यांचा , मंत्र्यांचा निषेध !! आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ? २. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खंडेराव गुरुवार, 01/21/2016 - 01:27 नवीन
सगळ निट बाहेर येतेय, कि कसा सुशिल आणि बान्देरु यांनी बनाव केला असा वाल्यांना अडकवण्यासाठी, तर हे आता भुत़काळात पोहोचायला लागलेत. यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
चार लाडु खाल्यानंतर
लाडु चवदार होते. त्यांनी तब्येत सुधारली पाकिस्तान घाबरले. इत्यादि इत्यादि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कॅप्टन जॅक स्पॅरो गुरुवार, 01/21/2016 - 02:42 नवीन
म्हाळसेने ट्याब का फोडला ओ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 01/21/2016 - 05:57 नवीन
तेवढे तुम्ही महत्वाचे नाही आणि तुमची मतं वाचल्यावर तर तुम्हाला महत्व देण्याची गरज नाही हेही समजतंच आहे. काॅग्रेसने आधी जे केलं ते तर दाखवावंच लागेल, कारण जर ते चुकीचं असेल आणि त्यामुळे काँग्रेसवाले करुन सवरुन नामानिराळे राहात असतील तर भाजपवाल्यांना एक न्याय आणि काँग्रेसवाल्यांना दुसरा असं म्हणायचंय का तुम्हाला?
यांना ताटात चार दगड ठेवुन, त्यावर भाजप लिहुन दिले, तर हे लाडु म्हणुन ते दगड खातिल, आणि वर मिपावर एक लेखही प्रसवतिल
असली लाचारी हे काँग्रेसी लांगुलचालक करतात. इथे मिपावरही त्यांची कमी नाहीच आहे. तुम्ही त्यातले नसाल असा अंदाज आहे, पण तो खोटा ठरला तर आश्चर्य वाटणार नाही. मुळात रोहितने आत्महत्या ही बंडारू दत्तात्रेय यांच्या पत्रामुळे झालेल्या तथाकथित कारवाईमुळे केली हे कोर्टात सिद्ध करुन दाखवणं आणि इथे त्यावरून गळा काढणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्यावरून तुम्हाला मिपावरील रुदाली असा किताब का देण्यात येऊ नये?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खंडेराव
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2016 - 08:24 नवीन
हेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी गुरुवार, 01/21/2016 - 08:18 नवीन
यांना या वर्षीचा काही विचारला की मागच्या ६० वर्षाचा , दुसऱ्या राज्याचा काढतात .
हे मी दिलेले नाही. एका आधीच्या वेगळ्या सदस्याने दिलेल्या प्रतिसादातील हा परिच्छेद आहे.
आता १. वर तुम्ही दिलेलया विदा मधील आत्महत्येची कारणे राजकीय , सामाजिक होती का ?
मुळात या आत्महत्येच्या बातम्यांना इतके दिवस प्रसिद्धीच देण्यात आली नव्हती. रोहीत वेमुलाच्या आत्महत्येनंतर हे प्रसिद्ध झाले आहे. एकंदरीत या आत्महत्यांच्या बातम्या दडपून ठेवल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यामागे जी काय कारणे असतील ती यापुढे बाहेर येतील.
२. तुम्ही भाजपाचा निषेध करणार का ?
कशासाठी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
माहितगार Wed, 01/20/2016 - 20:15 नवीन
केंद्रातील सरकारला स्वत:लाच उर्वरीत राज्यातील निवडणूका जिंकत जाणे आणि राज्यसभेतील सध्याची कमकुवतस्थिती हि मोठी आव्हाने आहेत की ज्यामुळे मोदीसरकारकडून एकीकडून स्वपक्षीयांचा बचाव केला जातानाच दुसरीकडून -स्वतःच्या सरकारची प्रतिमा पॉलीटीकली करेक्ट ठेवण्यासाठी- संसदीय समित्या आणि इतर वरीष्ठ स्तरीय चौकशांचे सोपस्कार पार पाडण्याची तारेवरची कसरत करावी लागेल. या चौकशी समित्यांपुढे कोणत्या गोष्टी येऊ शकतील १) ज्या सुशिलकुमारांना दुखापत केली गेल्याचे आक्षेप आहेत ते आक्षेप तपासले जाऊ शकतील २) मानवसंसाधन मंत्रालयातील बाबू लोकांनी नाचवलेले कागदी घोडे खरेच सुविहित प्रक्रीयेचा भाग होते का हे तपासले जाऊ शकेल ३) हैदराबाद विद्यापिठाची निर्णय घेणार्‍या काऊंसील सदस्य ज्यांना ऑदरवाई़ज गोपनियतेच्या आड रहाता येते त्यांच्या भूमिका तपासून योग्यायोग्यतेची खात्री केली जाऊ शकेल. ४) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यास झालेल्या विलंबाची कारणे; पण यातील निसटणारी बाजू म्हणजे विद्यार्थ्यांच हॉस्टेलमधून निलंबन ऐन हिवाळ्यात केले गेले, आणि ऐन थंडीत बाहेर टेंट टाकून झोपण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय, आणि निलंबीत केलेल्या विद्यार्थ्यांशी समोरून कडकपणाचा आव आणला तरी दुसरा पाठीवर ठेवणारा हात हवा, हा हात देण्यात विद्यापीठ प्रशासन आणि विद्यार्थी संघटनेचे नेतृत्व दोन्हीही आपापल्या परीने कमी पडले नाही का ? हे कोणत्याही चौकशी अहवालातून पुढे येणे अवघड असेल याच्यासाठी माणसात माणूसकीचा धर्म शिल्लक असावा लागतो. हजारे सारख्या गांधीवाद्यांचा एक गुण असा की आंदोलन केव्हा थांबवायच याचा अंदाज यावा लागतो अथवा महाराष्ट्रातील दलित चळवळीप्रमाणे अधिकतम किती ताणता येईल याचा तरी अंदाज नेतृत्वास हवा. मला मुंबईच्या गिरणीकामगारांचा संप आठवतो, कुठे थांबायच आणि जनतेची सहानुभूती कशी जपायची हे माहित नसणे, हा योगायोग आहे का की डाव्या चळवळींची सर्वसाधारण शोकांतीका असते ? हि सर्व चौकशी जेव्हा व्हावयाची तेव्हा होईल ती पूर्ण होऊन कुणी चांगला अहवाल तयार करून काही रचनात्मक सूचना केल्यातरी विवाद्य भागाचे चर्वितचर्वण आणि घ्यावयाच्या रचनात्मक स्टेप्सकडे दुर्लक्ष असे न होण्यासाठी भारतासारख्या देशात नशिबच चांगले असावे लागते. गमतीचा भाग असा कि चौकशी अहवाल कसेही आले तरीही दुखवलेल्या जनतेचा विश्वास बसू नये एवढे राजकारण लगोलग केले गेले आहे. हैदराबाद-तेलंगणाच्या भाजपा नेत्यांनी मानवसंसाधन मंत्र्यांना दिलेली आणि मानव संसाधन मंत्र्यांनी विद्यापिठाला दिलेली सर्वच पत्रे मी वाचलेली नाहीत पण प्रथम दर्शनी कायदेशीरदृष्ट्या त्या पत्रांमध्ये काही वावगे नसावे, परंतु तेलंगणाच्या पोलीस, मिडीया सर्वांनी असा भ्रम निर्माण करून ठेवला आहे की हि दोन तीन मंडळी अगदी केवळ त्या पत्रांच्या भरोशावर कायदेशीर दृष्ट्याही बहुधा दोषी असावीत, आणि बहुधा अशी आरोपबाजी सहजपणे चौकशी आयोगांसमोर आणि न्यायालयासमोर टिकणे कठीण असू शकेल. त्यामुळे चौकशी अहवाल काही आले तरीही दुखावलेले लोकांना विश्वास ठेवणे कठीण जाईल हे चित्र आजच दिसते आहे. रोहीतची बातमी आली तेव्हा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची मुलगी अद्वातद्वा आरोपबाजीत मश्गुल होती आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री जे स्वत: कायद्याचे अभ्यासक आहेत ते शॉपींगकरण्यात व्यस्त होते ह्या टाईम्स ऑफ इंडीया बातमीचे आजीबात नवल वाटले नाही. दुखावलेल्या विद्यार्थ्यांनी काही राजकारण्यांना त्यांच्या कंप्लेटमध्ये आरोप लावणे आणि विद्यार्थ्यांचा राग शांत व्हावा म्हणून पोलीसांनी अशी कंप्लेंट नोंदवून घेणे -मग राजकारण्यांचे राजकारण- हा क्रम समजून घेता येतो परंतु या सर्वातून निसटणारी बाजू म्हणजे स्थानिक पोलीसांनी रोहीतच्या मृत्यूच्या इतर सर्व शक्यता तपासून पहाण्याचे कर्तव्य कितपत चोखपणे बजावले ह्याची बातम्यांमधून माहिती मिळतच नाही उलटपक्षी शंकाच अधिक वाटते. सर्वात महत्वाचे म्हणजे समाज घटकांचे एक्मेका प्रति विश्वास संपादन, अभिसरण आणि समरसता हे उद्दीष्ट बाजूस राहून नित्या प्रमाणे राजकारणाचीच शक्यता अधिक; जी बाजू निसटावयास नको ती नेमकी निसटत राहते.
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Wed, 01/20/2016 - 20:46 नवीन
डोक्याचा दावणगीरी का काय तो डोसा झालाय मायला... :(
  • Log in or register to post comments
अ
अभिजितमोहोळकर गुरुवार, 01/21/2016 - 04:07 नवीन
परत परत तेच धोरण..... आपल्याकडे रूजलेलं राजकीय हस्तक्षेपाचं, द्वेषाचं आणि दुहीचं विष काही केल्या जाणं जवळ जवळ अशक्य आहे हे दाखवणारी उदाहरणं परत परत घडताना दिसतायत. सगळेच आपापला बाब्या निवडून बाकी कारटी ठरवून मोकळे झालेत. चूकीपेक्षा कोणी केली ह्यावर शिरा ताणून जास्त चर्चा होते आणि तीच खरी पोटदूखी आहे असं वाटतं. भाजपायींच्या कुठल्याही चुकीने बाकीच्यांच्या मनाचे मोर थुई थुई नाचू लागतात तर भाजपाई रामशास्त्री लगेच मागचा हिशोब मांडू लागतात आणि चुकीचं समर्थन करायचा प्रयत्न करतात...मग अजून काहीतरी वाद विवाद....ह्यात आत्ता करणारे चुकीचे आहेत असं हिरीरीने सांगणारे मागचं सोयीने बाजूला सारतात.....वाद वाढत वाढत भक्त वि विरोधक असा होतो. आता राजकीय नेतॄत्व काय परिपक्वता दाखवते ते पहाणे आले. दोषींवर (कुणी असल्यास) त्वरीत करवाई होऊन न्याय मिळावाअ ही सदिच्छा!!!!
  • Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१ गुरुवार, 01/21/2016 - 08:16 नवीन
मद्रास आय आय टी मध्ये २०१५ ऑक्टोबर च्या एकाच महिन्यात दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या
ह्या डॉक्टरसाहेबांनी दिलेल्या माहीतीवर सर्वच मुग गिळुन गप्प आहेत. नक्कीच ते सवर्ण असतील त्यात सुद्धा ब्राह्मण. आणि ३ टक्क्याच्या व्होटबँकेसाठी कोण आंदोलन वगैरे करणार? किंवा मिपावर लेख पाडणार? त्यात, ही ३ टक्के व्होटबँक सुद्धा विभाजीत.
  • Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 01/21/2016 - 09:11 नवीन
रोहितला हिंदू/हिंदूत्व/भगवा याबद्दल प्रचंड संताप होता. साहजिक आहे,विद्रोही साहित्य फार वाचलं कि असं होतं.आणि संताप येण्यामागे तथ्यही आहेच,ते नाकारता येत नाही. पण त्याने लढा चालू ठेवायला हवा होता. भाजप/संघ/हिंदूत्ववादी इत्यादिंनीही विद्रोही/आंबेडकरी साहित्य वाचलं तर थोडं बरं होईल.
  • Log in or register to post comments
ए
ए ए वाघमारे गुरुवार, 01/21/2016 - 13:23 नवीन
कुणाच्याही मृत्यूची अशी चर्चा होणे हे खरेच खूप दुर्दैवी आहे. रोहितच्या मृत्यूला तो दलित असणे आणि केवळ त्यामुळेच त्याला अपमानास्पद वागणूक मिळणे आणि त्यामुळे त्याला नैराश्य येणे हेच एक आणि एकमेव कारण होते काय? तसे असेल तरच 'दलित विद्यार्थ्याची आत्महत्या' हे शीर्षक योग्य ठरेल असे माझे मत आहे. असे नसेल तर वारंवार तसा उल्लेख करून सर्वसामान्य लोकांचा समूह म्हणून आपणात फूट पाडण्याच्या सोयीस्कर राजकारणाला आपण बळी पडत आहोत असे वाटते.तसेच रोहितच्या आत्मघाताशी दैनंदिन आयुष्यासंदर्भात त्याच्या दलितत्वाचा संबंध नसेल तर तटस्थ निरीक्षक म्हणून पाहता माझ्यादृष्टीने हे प्रकरण व त्यावरची चर्चा ही निव्वळ राजकीय ठरते. तसेच एका कायदेशीर बाबीची माहितीही कुणाकडे असेल तर शेअर करावी.(माझ्यासाठी वैयक्तिक पातळीवरही ही माहिती महत्वाची आहे) आंतरजातीय विवाहातून जन्मलेल्या व्यक्तींना आपली जात(एकतर वडीलांची किंवा आईची)अशी 'ठरवण्या'चा अधिकार आहे का? या बातमीतून तरी तसेच ध्वनित होते. तीत लेखक म्हणतो-
Rohith was a Dalit, he chose to take up his mother's caste since his father had deserted them.
अवांतर:जातीची चर्चा केलेली मला आवडत नाही.पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते.
  • Log in or register to post comments
म
मैत्र गुरुवार, 01/21/2016 - 14:51 नवीन
पण जन्मासोबत येणारी जात ही संविधानातल्या तरतुदींमुळे आणि आजवरच्या राजकारणामुळे आपल्यात इन्स्टॉल केल्या गेली आहे.आपण ती कितीही दुर्लक्षण्याचा प्रयत्न केला तरी बाकीची दुनिया तुम्हाला तिची सतत आठवण करून देत असते. जातीचे संदर्भ बाजूला पडतात. संमिश्र कॉस्मो वातावरणात अजूनच. पण सरकारी गोष्टीत सगळीकडे जात टोचत येतेच. यावर long term उपाय काढणे गरजेचे आहे. रोहीत वेमुलाची आई दलित तर वडील इतर मागासवर्गीय होते. पण ते सोडून गेल्यामुळे तो आईबरोबर आणि त्या वातावरणात / समाजात वाढला. आजच्या हिंदूच्या बातमी प्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने अशा परिस्थितीत जात ठरवण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. आणि आईची जात लावणे योग्य समजले गेले आहे. आपल्या कायद्याप्रमाणे वडिलांची जात लावली जाते. http://www.thehindu.com/news/national/rohit-vemula-supreme-court-verdict-of-2012-supports-his-dalit-status/article8131528.ece जातीच्या राजकारणातून बाहेर पडण्याऐवजी अधिकाधिक त्यातच बुडत आहोत. feel frustrated with opportunists everywhere.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ए ए वाघमारे
र
राँर्बट गुरुवार, 01/21/2016 - 16:58 नवीन
येत्या ४-५ महिन्यांत कोणत्या मेजर निवडणूका आहेत का? बिहार निवडणूकीच्या आधी दादरी प्रकरण घडलं (की घडवून आणलं?), त्यात बीफवरुन बोंबाबोंब करण्यात आली, पुरस्कार वापसीची नाटकं यशस्वीपणे राबवण्यात आली आणि बिहारची माठ जनता त्याला नंदीबैलासारखी भुलली. अर्थात बिहारमध्ये असलेल्या जातीय समीकरणांना आणि त्याप्रमाणे चाललेल्या राजकारणाला तर कुठेच तोड नाही म्हणा! कम्युनिस्टांचं शिरकाण करण्यासाठी हर्मान गोअरींगने आपल्या हस्तकांकरवी जर्मन पार्लमेंट - राईशस्टॅग जाळली होती. त्याच धर्तीवर आगामी काळातल्या निवडणूकीची पूर्वतयारी म्हणून रोहीतची आत्महत्या 'घडवून' तर आणण्यात आली नाही ना?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 01/22/2016 - 10:09 नवीन
भारतात दरवर्षी कोणत्यातरी राज्यात निवडणुक असतेच. २०१६ मध्ये तामिळनाडू, केरळ, पाँडिचेरी, पश्चिम बंगाल व आसाम मध्ये विधानसभा निवडणुक आहे. २०१७ मध्ये पंजाब, उत्तराखंड, उत्तर प्रदेश व गुजरात मध्ये निवडणुक आहे. २०१८ मध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान मध्ये निवडणुक आहे. २०१९ मध्ये लोकसभा व अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. दादरीसारख्या हत्या किंवा रोहित सारख्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येसारखी प्रकरणे गेली अनेक वर्षे घडत आहेत. परंतु आता मोदी, भाजप इ. दलितविरोधी, असहिष्णु, हुकुमशहा इ. ठरविण्यासाठी त्यांच्यावर झुंडीने हल्ले होते आहेत. रोहीतच्या आत्महत्येनंतर तिथले काही दलित प्राध्यापक राजीनामा देणार आहेत म्हणे. याच विद्यापीठात गेल्या १० वर्षात इतर ९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. तेव्हा माध्यमांनी किंवा या प्राध्यापकांनी काही बोलल्याचे ऐकिवात नाही. परंतु आता सगळ्यांना अचानक कंठ फुटला आहे. यामागचे कारण उघड आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राँर्बट
व
विकास Fri, 01/22/2016 - 17:29 नवीन
खालील लेख / निरीक्षण महत्वाचे वाटले. http://www.indianexponent.com/2016/01/the-real-truth-of-rohith-vemula-suicide.html त्यात म्हणल्याप्रमाणे रोहीथ हा सुरवातीस इतर कुठल्याही तरूण विद्यार्थ्यासारखा होता... (मी नंतर चेपूवरील माहितीची खातरजमा करून घेतली) त्याची म्हणून मते होती आणि आवडी-निवडी देखील होत्या. धार्मिक नव्हता पण विवेकानंदांचा फोटो खोलीत ठेवत होता. भारताबद्दलचा अभिमान दिसत होता, सैनिकांचे दिवाळीच्या वेळचे फोटो देखील होते. निर्भयाप्रकरणाच्या वेळेस फाशीच्या शिक्षेचे कडक समर्थन करण्यात पुढे होता. अगदी सुब्रम्हण्यम स्वामींचे वक्तव्य देखील त्याला मान्य होते (जरी तो कुठेही भाजपाच्या अथवा हिंदूत्वाच्या जवळ नव्हता तरी). हैद्राबाद विद्यापिठावर खूष असल्याची काही वक्तव्ये, फोटो देखील दिसतात. पण त्याच सुमारास एक गडबड झाली. अण्णा हजार्‍यांनी लोकपाल निमित्त जनजागृती केली आणि केजरीवाल म्हणून एक राजकीय तारा दिवसाकाठी देखील लोकांच्या डोळ्यात चमकू लागला. या तार्‍याचा प्रभाव पडलेला नंतरच्या काळात दिसू लागला. पुढे अचानक सगळेच चुकीचे वाटू लागले. त्यात विवेकानंद चुकीचे होते हे देखील आले आणि याकूब मेमनची (त्या आधी अफझलची देखील) फाशी कशी चूक होती ते आले... जे झाले ते अत्यंत दुर्दवी आहे. त्याच्या मृत्यूचा ज्याप्रकारे राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तो भाग "...टाळूवरील लोणी खाणे" या एकाच पद्धतीत बसू शकेल असा आहे. त्याच्या पत्रातील आंबेडकर स्टूडंट युनियन बद्दलची नाराजी/अपेक्षाभंग संदर्भातील खोडलेला भाग आता प्रकाशात आला आहे. आणि ते पत्र मिळायला ६ तास का वेळ लागला, त्याला ६ तासात कोणी शोधायला कसे गेले नाही, मित्राच्या खोलीत तो एकटा कसा होता वगैरे प्रश्न पण धूळ बसत असताना पडू लागले आहेत. अजून एक महत्वाचा प्रश्न वाचनात आला की त्याने काहीकाळ आधी कुलगुरूंना लिहीलेल्या एका पत्राची प्रत मिळाली, त्याने ते पाठवले का हे सिद्ध झालेले नाही. पण ते जर पाठवले असले तर त्यात त्याच्या मानसीक हताशपणाची कल्पना येते. जर ते पत्र पाठवल्यावर त्याचे (मानसीक अवस्थेचे) गांभिर्य लक्षात घेतले गेले नसले तर ते चूकच आहे, कारण काही असुंदेत...या संदर्भात सर्वच विद्यापिठांमधे कुलगुरू, पिन्सिपॉल, प्राध्यापकांना शिक्षण देणे गरजेचे आहे असे वाटते. असो.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Fri, 01/22/2016 - 23:51 नवीन
लोकहो, ही घोषणा बघा : तुम कितने याकूब मारोगे? हर घरसे याकूब निकलेगा https://pbs.twimg.com/media/CZDdYbEUEAAGQbP.jpg:large कित्ती सुंदर घोषणा आहे, नाही? आवडली का? रोहित वेमुला कोणाच्या संगतीत होता ते कळतं. आ.न., -गा.पै. प्रश्न : वरील फलक हाती घेतलेल्या दोघांपैकी एक रोहितच आहे का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा