दोन व्यवसाय: मान अपमान
परवाचा वाद परत उकरुन काढतो. कारण माझे नेमके काय चुकले हे कोणीच सांगितले नाही अजून.
वेश्यालयातल्या स्त्रीयांच्या शारिरिक संदर्भासाठी सनी लियोनचे उदाहरण दिले तेव्हा पब्लिक चिडली. म्हणे हा सनी लियोनचा अपमान आहे. म्हणजे 'वेश्या असणे, ते काम करणे' हे अपमानास्पद आहे असे त्यांचे म्हणणे आहे का? भले त्या वेश्या मजबूरीने, अजून कशानेही बळजबरीने झाल्या असल्या, आपले प्रपंच चालवत असल्या, आपल्या मुलींचे-मुलांचे शिक्षण करत असल्या, थोडक्यात आलिया भोगासी म्हणून सादर होत असल्या तरी त्यांची तुलना एका पॉर्नस्टारशी करणे हे त्या पॉर्नस्टारसाठी अपमानास्पद आहे. जी पॉर्नस्टार स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने, घसघशीत पैसा घेऊन सर्वसामान्यांसाठी निषिद्ध अशा क्षेत्रात काम करते.
मारवा म्हणाले. "सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच, असा विचार करत असाल तर ठीकच आहे " म्हणजे पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय?
पैसाताईंनी म्हटलंय की "ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटले." 'असे बोलणे' म्हणजे नेमकं काय? वेश्यांना मुलंबाळं नसतात काय? वेश्याव्यवसाय करणारे समाजविघातक वैगरे काम करतात आणि पॉर्नस्टार हे समाजहितकारक काम करतात असे काही म्हणायचे आहे काय?
मृत्यूंजय यांच्यामते, "एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे " येथे औचित्य म्हणजे नेमके काय? जेव्हा डॉक्टर "एखाद्याची बायको सनी लियोन(सारखी मादक दिसणारी, वैगरे) नसते" असे म्हणतात ते उचित. आणि "वेश्यालयात सनी लियोन(सारख्या माद्क दिसणार्या, वैगरे वेश्यां)साठी मोठी किंमत मोजावी लागते" हे माझे म्हणणे हे अनुचित, हे कसे काय?
हे काथ्याकूट काढण्याचा उद्देश एवढाच की खालील प्रश्नांची उत्तरे मिळावीत.
१. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत?
२. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का?
३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक?
४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का?
५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं?
आपल्या प्रतिसादांबद्दल आधीच खूप खूप आभार मानतो. अपेक्षा आहे नेहमीप्रमाणेच योग्य तर्हेने चर्चा होईल. धन्यवाद!
(क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते)...असे होते. क्ष्क्ष्क्ष्क्ष च्या जागी एका सर्वसामान्याना माहित असलेल्या व्यक्तीचे नाव होते. कोणाही व्यक्तीचे नाव घेऊन वेश्यावृत्तीचा तडक अथवा ध्वनित (इंप्लाईड) आरोप होईल असे विधान करण्याअगोदर त्याबाबतीत सबळ कायदेशीर पुरावा जवळ असावा असा सर्वसामान्य नागरी दंडक आहे. तसा पुरावा तुमच्या प्रतिसादात दिसला नाही. याव्यतिरिक्त, कोणाच्या संबंधात व्यक्तीगत नावाने असे विधान त्या लेखावरच्या चर्चेत फारसे सकारात्मक योगदान देऊ शकणार नाहीच, परंतू ते इथे (मिपावर) स्वतःची बाजू मांडू न शकणार्या व्यक्तीची पाठीमागून बदनामी केल्यासारखे मात्र नक्की होईल. वरची परिस्थिती मिपासारख्या सुसंस्कृत संस्थळाच्या धोरणात बसण्यासारखी नाही. संपादनामागची वरची भूमिका आपण समजून घ्याल व यापुढेही योग्य ते सहकार्य द्याल अशी अपेक्षा आहे.सनी लिओनचा उल्लेख मूळ लेखातच येणे चुकले असे आपणांस वाटले तरी रंभा, उर्वशी, मेनका ह्या रुपकांच्या ऐवजी कंटेपररी प्रचलित रुपक म्हणून एक माध्यमांमधली प्रतिमा -जी हेतुपुरस्सर त्याचसाठी बनवली गेली आहे- वापर होणे माझ्यामते चुकीचे नव्हते. इथे सनी लियोन ह्या विशिष्ट व्यक्तिबद्दल कोणीही बोलत नव्हते. ती एक प्रतिमा आहे फक्त, आता गुंतागुंतीची झाली असली तरी.१. रंभा, उर्वशी, मेनका ही केवळ पुराण/दंतकथांतील व्यक्तीचित्रणे आहेत आणि सनी लिओन ही सद्य कालातील एक जितीजागती व काही कायदेशीर हक्क असलेली व्यक्ती आहे... हा मूळ फरक फार महत्वाचा आहे. २. "क्ष्क्ष्क्ष्क्ष साठी किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" या शब्दप्रयोगाचा... कितीही विरुद्ध समर्थन केले तरी... "क्ष्क्ष्क्ष्क्ष ही व्यक्ती वेश्याव्यवसाय करते व तिची किंमत मोजणे सामान्यांना शक्य नसते" असा (अनेक अर्थांतील एक) अर्थ होतो. दुसर्या शब्दांत म्हणायचे तर, येथे एका मुक्त सार्वजनिक संस्थळावर क्ष्क्ष्क्ष्क्षवर वेश्या असल्याचा लिखीत आरोप होतो आहे. ४. अश्या परिस्थितीत, क्ष्क्ष्क्ष्क्ष ने जर लेखक व प्रकाशक (पक्षी : मिसळपाव) यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा लावायचा म्हटले तर ते शक्य आहे. ५. तसेच, एखादी व्यक्ती प्रत्युत्तर करू शकणार नाही अश्या ठिकाणी, त्या व्यक्तीवर वेश्याव्यवसायासारखा गंभीर आरोप तडक / ध्वनित रुपात करणे औचित्यपूर्ण नाही, असे मला वाटते. ६. मिपावरील वातावरण सौहार्दपूर्ण रहावे यासाठी करायच्या कारवाईबरोबरच, संस्थळावरील लेखनामुळे मिपावर काही कायदेशीर बालंट येऊ नये याकरीता सजग राहणे ही सुद्धा संपादक मंडळाची जबाबदारी असते. हल्लीच्या (अती)सक्रिय जालसागरात हे करणे (अत्यंत पातळ) तारेवरची कसरत असते. हे वरचे माझे व्यक्तीगत मत आहे, तुमचे मत वेगळे असू शकते. पण तरीही, मोफत मुक्त सार्वजनिक संस्थळाने कायदेशीर त्रासांपासून दूर राहण्यासाठी शक्य तेवढे (कदाचित् जरा जास्तच) प्रयत्नशील रहावे याबाबत दुमत नसावे. मिपाच्या धोरणाबद्दल अधिक माहिती येथे आहेच.