Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

दोन व्यवसाय: मान अपमान

स
संदीप डांगे
Fri, 01/29/2016 - 17:14
🗣 162 प्रतिसाद
परवाचा वाद परत उकरुन काढतो. कारण माझे नेमके काय चुकले हे कोणीच सांगितले नाही अजून. वेश्यालयातल्या स्त्रीयांच्या शारिरिक संदर्भासाठी सनी लियोनचे उदाहरण दिले तेव्हा पब्लिक चिडली. म्हणे हा सनी लियोनचा अपमान आहे. म्हणजे 'वेश्या असणे, ते काम करणे' हे अपमानास्पद आहे असे त्यांचे म्हणणे आहे का? भले त्या वेश्या मजबूरीने, अजून कशानेही बळजबरीने झाल्या असल्या, आपले प्रपंच चालवत असल्या, आपल्या मुलींचे-मुलांचे शिक्षण करत असल्या, थोडक्यात आलिया भोगासी म्हणून सादर होत असल्या तरी त्यांची तुलना एका पॉर्नस्टारशी करणे हे त्या पॉर्नस्टारसाठी अपमानास्पद आहे. जी पॉर्नस्टार स्वतःच्या बुद्धीने, मर्जीने, घसघशीत पैसा घेऊन सर्वसामान्यांसाठी निषिद्ध अशा क्षेत्रात काम करते. मारवा म्हणाले. "सनी लियोनी ही कलाकार आहे पॉर्न चित्रपटात काम करते म्हणजे.....असेलच, असा विचार करत असाल तर ठीकच आहे " म्हणजे पॉर्नस्टार असणं हे उच्चभ्रू आणि वेश्या असणं हे नीच कृत्य असे काही आहे काय? पैसाताईंनी म्हटलंय की "ती लग्न झालेली मुले बाळे असलेली बाई आहे. तिच्याबद्दल असे बोलणे योग्य वाटले नाही. किंबहुना कोणाचाही उल्लेख अशा चर्चेत असा यावा हेच दुर्दैवी वाटले." 'असे बोलणे' म्हणजे नेमकं काय? वेश्यांना मुलंबाळं नसतात काय? वेश्याव्यवसाय करणारे समाजविघातक वैगरे काम करतात आणि पॉर्नस्टार हे समाजहितकारक काम करतात असे काही म्हणायचे आहे काय? मृत्यूंजय यांच्यामते, "एकुणात आक्षेप विधानाच्या सत्यतेबद्दल नसून औचित्याबद्दल आहे " येथे औचित्य म्हणजे नेमके काय? जेव्हा डॉक्टर "एखाद्याची बायको सनी लियोन(सारखी मादक दिसणारी, वैगरे) नसते" असे म्हणतात ते उचित. आणि "वेश्यालयात सनी लियोन(सारख्या माद्क दिसणार्‍या, वैगरे वेश्यां)साठी मोठी किंमत मोजावी लागते" हे माझे म्हणणे हे अनुचित, हे कसे काय? हे काथ्याकूट काढण्याचा उद्देश एवढाच की खालील प्रश्नांची उत्तरे मिळावीत. १. पॉर्नस्टार आणि वेश्या यांच्याबद्दल वाचकांच्या काय भूमिका आहेत? २. दोन्ही व्यवसायापैकी कोणते काम चांगले, कोणते वाईट असे वाटते व का? ३. दोन व्यवसायात तुलना आवश्यक की अनावश्यक? ४. दोन्ही व्यवसायात मान-अपमान करण्याचे/होण्याचे व्यवच्छेदक लक्षण कोणते व का? ५. माझ्या मूळ विधानातून मला जे म्हणायचे होते तो अर्थ संदर्भासहित व्यवस्थित ध्वनित होतोय की वाचकांना स्वतःला वेगळं काही वाटलं? आपल्या प्रतिसादांबद्दल आधीच खूप खूप आभार मानतो. अपेक्षा आहे नेहमीप्रमाणेच योग्य तर्‍हेने चर्चा होईल. धन्यवाद!

प्रतिक्रिया द्या
35123 वाचन

💬 प्रतिसाद (162)
न
नगरीनिरंजन Mon, 02/01/2016 - 00:46 नवीन
पोर्नोग्राफी हा शब्द कसा आला ते पाहिले तर थोडाफार फरक पडेल का? पोर्ने + ग्राफिएन या ग्रीक शब्दांच्या संयोगातून पोर्नोग्राफोस आणि पुढे पोर्नोग्राफी हा शब्द आला. त्याचा शब्दशः अर्थ आहे वेश्यांबद्दल लिहीणे. एखादी व्यक्ती जर स्वतःला पोर्नस्टार म्हणवून घेत असेल तर त्याचा अर्थ त्या व्यक्तीला वेश्या म्हणवून घेण्यात काहीच हरकत नाही असा होतो. मुळात पैशांसाठी शरीर विकणारी ती वेश्या या व्याख्येत ती व्यक्ती बसते. निव्वळ तिला जास्त पैसे मिळतात म्हणून वेगळे नामाभिधान शोधायची गरज नाही. अनेक अभिनेत्रीसुद्धा पात्राच्या भूमिकेचा संबंध नसूनही अंगप्रदर्शन करत असतील (आठवा "बेटा"तली धकधक माधुरी) तर त्या वेश्यावृत्ती दाखवतात असे म्हणायला हरकत नाही. गंमत या गोष्टीची वाटते की पुरेसा पैसा मिळत असेल तर समाजाच्या प्रतिष्ठेच्या कल्पना बदलायला वेळ लागत नाही. मातंगादि समाजाच्या नाचगाण्याला हलके समजणारा समाज त्याच नाचगाण्याचे पुरेसे पैसे मिळायला लागल्यावर अशा लोकांना डोक्यावर घेऊन नाचू लागतो. कालाय तस्मै नमः|
य
याॅर्कर Mon, 02/01/2016 - 05:56 नवीन
पिंजरा चित्रपटातला सीन आठवला चंद्रकला : काय घोडं मारलय ओ तुमचं आमच्या तमाशानं,आमचा पेशा हाय त्यो. गुरूजी : उद्या चोरसुद्धा चोरी हा माझा पेशा आहे,असे म्हणेल. थोडक्यात काय, काही गोष्टी भारतीय संस्कृतीत बसत नाहीत,त्यातच वेश्या/पाॅर्नस्टार या बाबी येतात.ज्यावेळी आपण प्रगत होऊ(?) त्यावेळी सनी लिओनीचा सन्मान करू,तुर्तास नाही.
प
पगला गजोधर Mon, 02/01/2016 - 06:02 नवीन
Image removed. ''ती'' पूर्वीपण होती, आजपण आहे, उद्याही असणार …
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 07:21 नवीन
डांगे अण्णा.. खुप मोठे मोठे प्रतिसाद लिहीत आहात. सगळेच काही वाचता येत नाहीयेत. पण तुमचा मुद्दा थोडाफार समजला आहे. तुम्ही एकाच मुद्दयाचा विचार करायला हवा; तो म्हणजे.. क्ष व्यक्ती सुंदर आहे.. मादक आहे.. लोकांची फँटसी आहे... हे सगळं ठिक आहे... पण "क्ष साठी ची किंमत मोजणे सर्वांना शक्य नाही" ह्यात १. क्ष ही पैसे घेऊन देहविक्रय करते. २. किंमत मोजायची तयारी असल्यास तसा सौदा तुम्ही करु शकता ३. म्हणजे हवी तेवढी रक्कम दिल्यास, क्ष तुम्हाला उपलब्ध आहे. हे सगळे अर्थ निघतात. क्ष पॉर्नस्टार असणे.. आणि वेश्या असणे ह्यात फरक आहे. तुमच्या विधानातुन क्ष वेश्या आहे असा अर्थ निघत आहे. जो भारतात कायद्याने गुन्हा आहे. फक्त ह्या मुद्द्या बद्दल तुमचे काय म्हणणे आहे?
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 07:39 नवीन
'क्ष' च्या ठिकाणी रंभा, उर्वशी, मेनका हे शब्द वापरा, तुम्हाला मुद्दा लगेच लक्षात येईल अशी अपेक्षा आहे. प्रतिसाद मोठे असले तरी वाचलेत तर माझा मुद्दा समजून घेण्यात मदत होईल असे वाटते. प्रतिसाद न वाचताच प्रस्तुत वाक्यातून 'स्वतःस पाहिजे तो अर्थ काढला गेला' तर त्याबद्दल मी काही करू शकत नाही.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 07:45 नवीन
रंभा उर्वशी मेनका ह्या विधानावर आक्षेप घेण्यास येऊ शकतात का? सनी लिओन पैसे दिल्यास शय्यासोबतीस उपलब्ध आहे असे तुमच्या विधानातुन ध्वनित होत नाही का? जे होतच आहे.. आणि असे विधान तुम्हाला चुक वाटत नाही का? प्रतिसाद वाचलेच नाहीत असं अजिबात नाहीये.. पण तुम्ही साध्या प्रश्नाला बगल देऊन खुप काही लिहीत आहात जे वाचणे आता शक्य होईलच असे नाही. म्हणुन हो / नाही पद्धतीचे प्रश्न विचारत आहे. तुम्ही तशी उत्तरे द्याल का?
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 08:09 नवीन
रंभा उर्वशी मेनका ह्या विधानावर आक्षेप घेण्यास येऊ शकतात का? >> नाही. कारण त्या काल्पनिक प्रतिमा आहेत. सनी लिओन पैसे दिल्यास शय्यासोबतीस उपलब्ध आहे असे तुमच्या विधानातुन ध्वनित होत नाही का? >> अजिबात नाही. सनी लियोन हे एक रुपक आहे. जे होतच आहे.. आणि असे विधान तुम्हाला चुक वाटत नाही का? >> 'जे होतच आहे' असे म्हणणे चुकीचे आहे. प्रस्तुत विधानाचा मूळ अर्थ वेगळा आहे, वाचकाच्या आकलनशक्तीप्रमाणे 'काढला जाणारा अर्थ' वेगळा असू शकतो. यात 'काढल्या जाणार्‍या अर्था'ची जबाबदारी विधानकर्त्यावर येत नाही. ह्याबद्दलचे अगदी ताजे उदाहरण शरद यांनी मित्रत्वाच्या हक्काने यनावालांची टर उडवणारा लेख लिहिला त्यात दिसून आले. शरद यांचे लेखामागचे हेतु वेगळे असूनही वाचकांना त्यात सार्वजनिक अपमानाचा हेतु आहे असे वाटले. कायदेशीर खटल्यांमधेही एकाच वाक्याचे वेगवेगळे अर्थ काढून खटल्यांचे निर्णय फिरवले जातात. त्यामुळे प्रस्तुत विधानाचे किती व कसे अर्थ काढले जावे हे विधानकर्त्याच्या कक्षेबाहेर आहे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गवि Mon, 02/01/2016 - 08:33 नवीन
तुम्ही पुनःपुन्हा रंभा, उर्वशी यांचं उदाहरण आणि सनी लियॉन हे रुपक असं समजावताहात. केवळ याबाबत क्लॅरिफिकेशन देण्याबाबतची तुमची पॅशन पाहून याबाबत तोंड उघडतोय. पटतं का बघा. जनरल स्टेटमेंट्स आहेत. १. एखाद्या वाक्यरचनेमुळे दहापंधरा एकमेकांशी अनरिलेटेड मेंबर्स ऑफ पब्लिक लोकांना एक अर्थ ध्वनित होत असेल आणि तो तुमच्या मनातल्या मूळ इच्छित अर्थापेक्षा भलताच विपरीत असेल, तर किमान वाक्यरचनेत गडबड आहे असं मानून पहायला हरकत नसावी. २. सर्व वाद सोडून वाक्यरचनेत एक बदल मनातल्या मनात करुन पाहू. मूळ वाक्य: "मिनी सलोनीसाठी पैसे मोजणं.." बदललेलं वाक्य: मिनी सलोनीसारख्या रुपरंगाच्या / मिनी सलोनीसारख्या दिसणा-या, शरीरसौष्ठव असणा-या व्यक्तीशी संबंधांसाठी पैसे मोजणं. असं किंचितच वेगळ्या रचनेचं वाक्य असतं तर रुपक, उदाहरण, उर्वशीऐवजी वापरलेलं प्रतीक हे सर्व सांगावं लागलं नसतं कदाचित. पण अमुकसाठी म्हटलं की स्पेसिफिक व्यक्तीच वाटणार. इनफॅक्ट "त्याने माधुरी दिक्षितशी लग्न केलं" असं आपण म्हणत नाही. "त्याने माधुरी दीक्षितसारख्या दिसणा-या मुलीशी लग्न केलं" असं म्हणतो. सर्वांनीच मिसइंटरप्रिटेशन करणं असं सहसा होत नाही. तुमचा हेतू वेगळा असेल पण वाक्यरचनेचा भाग अशा "मास मिसइंटरप्रिटेशन" मधे असतो.
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 09:10 नवीन
गवि, प्रतिसादाबद्दल धन्यवाद! प्रतिसाद पटला. बदललेलं वाक्य: मिनी सलोनीसारख्या रुपरंगाच्या / मिनी सलोनीसारख्या दिसणा-या, शरीरसौष्ठव असणा-या व्यक्तीशी संबंधांसाठी पैसे मोजणं. वाक्य असे बदलून घेण्यात माझी अजिबात हरकत नव्हती.
↩ प्रतिसाद: गवि
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 08:34 नवीन
सनी लिओन कुणी काल्पनिक व्यक्ती नाही. तिचे नाव "तुम्ही" रुपक म्हणुन वापरत आहात. पण म्हणुन "सनी उपलब्ध आहे" असा अर्थ ध्वनित होत नाही असे नाही. तुम्ही काहीही म्हणून तिचे नाव वापराल. पण ह्या विधानावरुन सनी किंवा तिचा नवरा तुमच्यावर गुन्हा दाखल करु शकतो असे दिसते. अजुन एक म्हणजे.. हा काढलेला अर्थ नाही. हे निसंदिग्ध विधान आहे. ह्यावर संपादक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. मिसळपाव संस्थळाने ह्या वादात पडण्याचे कारण नसल्याने तसा निर्णय घेतलेला असावा. तुम्हाला मान्य करायचेच नाहीये असे जाणवत आहे. पुढे चर्चा करण्यात किती अर्थ आहे ते समजत नाही. म्हणुन इति लेखनसीमा!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 09:17 नवीन
प्रश्न फक्त कायदेशीर कारवाई होण्याचा वा क्ष व्यक्तीने.नवर्‍याने माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा असेल तर ते संपूर्णपणे मान्य आहे. त्यात वादाचा विषय नाही. वाक्यरचनेबद्दल आक्षेप असेल तर ती बदलावी असेही मत मी वारंवार व्यक्त केले आहे. ह्यापेक्षा अजून काय लिहिणे? मला मान्य करायचा नाही तो मुद्दा वेगळा आहे. त्याचा भारतीय कायद्यांशी व कायदेशीर कारवाईशी संबंध नाही. हे निसंदिग्ध विधान आहे निसंदिग्ध म्हणजे जिथे संशय घेण्यास अजिबात वाव नाही. जिथे एकमेव अशीच शक्यता आहे. माझ्या वाक्यामधे असे काही नसल्याने मला ते पटत नाही. बस इतकेच. प्रतिसादाबद्दल धन्यवाद! कदाचित एकूण प्रकाराबद्दल माझी बाजू योग्य रितीने पोचवू शकत नसल्याने गैरसमज झाले असावे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नगरीनिरंजन Mon, 02/01/2016 - 07:44 नवीन
अशी कोणती गोष्ट आहे जी वेश्या करते पण पॉर्नस्टार करत नाही? थोडक्यात फरक सांगता येतील का?
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 08:39 नवीन
दोन्ही ठिकाणी पैशासाठी देहविक्रय होत असला तरी पॉर्न मध्ये ओळख लपवलेली नसते. तुम्ही काय करताय हे जगजाहीर असते. वेश्या व्यवसायात मात्र ही ओळख लपवली जाऊ शकते. लपवली जात असावीच. सनी लिओनने भारतात कधी काम केलेले माहिती नाही म्हणुन तिने भारताचा कायदा मोडला आहे असे वाटत नाही. आणि ती वेश्या आहे असा आरोप आत्ता झाल्यास तिच्यावर व्याभिचाराचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो. ज्याचा पुरावा नाही. अजुन एक... पॉर्नमध्ये काम करुन सनीने इथे कायदा मोडलेला नाही, पण माझी वेश्या व्यवसाय हा भारतात गुन्हा आहे अशी समजुत असल्याने एखाद्याला वेश्या म्हणणे म्हणजे भारतीय कायदा मोडल्याचाही आरोप करणे असे मला वाटत होते. पण विठांनी दिलेल्या माहिती नुसार वेश्या व्यवसाय हा गुन्हा नाही. पण पैसाताईच्या माहिती प्रमाणे "विवाहित" व्यक्तीसाठी तो गुन्हा आहे.
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 08:57 नवीन
तुमचा प्रतिसाद परत दोनदा वाचला, गोल गोल फिरण्यापेक्षा थेट मुद्द्याचे लिहावे वाटले. क्ष व्यक्ती सुंदर आहे.. मादक आहे.. लोकांची फँटसी आहे... हे सगळं ठिक आहे... हे कसं काय ठिक आहे? यात नक्की चुकीचे नाही? सदर व्यक्ती आपण लोकांची फँटसी व्हावे म्हणून प्रचार-प्रसार करत आहे हे चूक वा बरोबर? पण "क्ष साठी ची किंमत मोजणे सर्वांना शक्य नाही" ह्या वाक्यावर ज्या अर्थाचा आरोप होतोय तोच अर्थ आता सिद्ध करुन दाखवण्याचा प्रयत्न करतो. १. क्ष ही पैसे घेऊन देहविक्रय करते. >> पॉर्नस्टार हे पैसे घेऊन देहाचा व्यापार करतात. त्यांच्या कामाचे स्वरुप देहविक्रयच आहे. तुमच्यामते देहविक्रय आणि पॉर्नफिल्ममधले काम यात काय मूलभूत फरक आहे? २. किंमत मोजायची तयारी असल्यास तसा सौदा तुम्ही करु शकता >> पॉर्नफिल्मचे निर्माते असे क्ष व्यक्तिला पैसे मोजून तसा सौदा करु शकतात. पैसे मोजून त्यांचे शरिर व त्याचे विविध उपयोग पडद्यावर दाखवण्याची त्यांना मुभा सदर क्ष व्यक्ती देते. ह्यात त्यांचे पार्टनर म्हणून असलेल्या व्यक्ती त्यांचे कायदेशीर पती असेलच असे नसते. बहुसंख्यवेळा पार्टनर अनोळखी असतात. भारतातल्या क्ष व्यक्तीच्या पहिल्या सिनेमासाठी तीने सहअभिनेत्यांचे मेडिकल रिपोर्ट्स मागवले होते. हे रिपोर्ट मागवण्याचे कारण उघड होते. ह्याचा अर्थ निर्माते जर किंमत द्यायला तयार असतील तर निर्मात्यांच्या इच्छेनुसार आपल्या देहाचा पाहिजे तो उपयोग करु देण्यास सदर व्यक्ती काही अटींवर तयार होती. वेश्याव्यवसायात ह्यापेक्षा वेगळे काय घडते? ३. म्हणजे हवी तेवढी रक्कम दिल्यास, क्ष तुम्हाला उपलब्ध आहे. >> मला जर पॉर्नफिल्म काढायची आहे, क्ष ला घेऊनच काढायची आहे, क्ष ने अशा फिल्ममधे काम करण्याची तयारी दाखवली आहे. जे तिच्या आधीच्या कामांवरुन स्पष्ट आहे की ती अशा प्रकारच्या फिल्ममधे काम करते. क्ष ने ह्या कामासाठी काही मोबदला, मानधन ठरवले आहे. जे देण्याची माझी तयारी आहे. तसेच ह्या फिल्ममधे तिच्यासोबत पार्टनर म्हणून मीच काम करणार आहे. ह्या परिस्थितीत क्षला सौदा मान्य असल्यास ही फिल्म तयार होईल. म्हणजेच तिला हवी तेवढी रक्कम दिली तर ती अशा प्रकारच्या शय्यासोबतीस उपलब्ध आहे असाच अर्थ होतो. भले ते फिल्मसाठी का असेना. प्रस्तुत प्रतिसादात उपस्थित केलेली माझी वैयक्तिक मते नाहीत. पण अर्थच काढायचा झाला तर प्रस्तुत व्यक्तीच्या वागण्यातूनही बरेच अर्थ काढले जाऊ शकतात ह्यासाठी सर्व लिहिले.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 09:09 नवीन
बरं.. कायद्यात पळवाटा काढता येतात म्हणजे नक्की काय हे सोदाहरण स्पष्ट केल्याबद्दल धन्यवाद! तुमचा हा मुद्दा समजला. पण इथे मला काय वाटतं हा प्रश्न नसुन संस्थळाचे काय म्हणणे आहे हा आहे. मला जेवढी माहिती होती तेवढे प्रतिसाद मी दिले आहेत. ह्याहुन जास्त ह्या मुद्द्यावर काही नवीन मी लिहु शकेन असं वाटत नाही. धन्यवाद!
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
ब
बॅटमॅन Mon, 02/01/2016 - 12:12 नवीन
रच्याकने वेश्याव्यवसाय प्रायव्हेटली करणे कायद्याने चूक नाही तर जाहिरात करणे बेकायदेशीर आहे असे वाचले होते. तेव्हा एकाच लेबलाखाली लावायचे आहे सगळे की कसे?
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
विवेक ठाकूर Mon, 02/01/2016 - 07:36 नवीन
तुमच्या विधानातुन क्ष वेश्या आहे असा अर्थ निघत आहे. बरोब्बर! जो भारतात कायद्याने गुन्हा आहे. तो गुन्हा नाही Prostitution in India. पण ते पुराव्या आभावी केलेलं विधान आहे.
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 07:41 नवीन
In India, prostitution (the exchange of sexual services for money) is legal,[1] but a number of related activities, including soliciting in a public place, kerb crawling, owning or managing a brothel, prostitution in a hotel,[2] pimping and pandering, are crimes.[3] Prostitution is legal only if carried out in private residence of a prostitute or others[4]
हे माहिती नव्हते. पण माझ्या विधानातुन तसा अर्थ निघत असेल तर माझ्यावर कुणी अब्रु नुकसानीचा दावा करु शकेल काय?
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
प
पैसा Mon, 02/01/2016 - 07:43 नवीन
कारण क्ष विवाहित असल्यास त्यात फक्त वेश्याव्यवसायच नव्हे तर व्यभिचाराचाही आरोप होतो.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
व
विवेक ठाकूर Mon, 02/01/2016 - 08:01 नवीन
पण तसा गुन्हा संबधित व्यक्तींशी रिलेटेड बाधित व्यक्ती (म्हणजे विवाहितेचा पती किंवा विवाहेतर संबंध ठेवणार्‍याची पत्नी) दाखल करु शकते. पण इतक्या साध्या गोष्टीवर इतकी घनघोर चर्चा का चालूये?
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 02/01/2016 - 07:42 नवीन
काही विशिष्ट परिस्थितीमधे तो गुन्हा आहे, तर काहीवेळा नाही. The primary law dealing with the status of sex workers is the 1956 law referred to as The Immoral Traffic (Suppression) Act (SITA). According to this law, prostitutes can practise their trade privately but cannot legally solicit customers in public.[citation needed] A BBC article, however, mentions that prostitution is illegal in India; the Indian law does not refer to the practice of selling one's own sexual service as "prostitution".[22] Clients can be punished for sexual activity in proximity to a public place. Organised prostitution (brothels, prostitution rings, pimping, etc.) is illegal. As long as it is done individually and voluntarily, a woman (male prostitution is not recognised in any law in India but even consensual anal intercourse is illegal under section 377 of the Indian Penal Code) can use her body in exchange for material benefit. In particular, the law forbids a sex worker to carry on her profession within 200 yards of a public place. Unlike as is the case with other professions, sex workers are not protected under normal labour laws, but they possess the right to rescue and rehabilitation if they desire and possess all the rights of other citizens. In practice SITA is not commonly used. The Indian Penal Code (IPC) which predates the SITA is often used to charge sex workers with vague crimes such as "public indecency" or being a "public nuisance" without explicitly defining what these consist of. Recently the old law has been amended as The Immoral Traffic (Prevention) Act or PITA. Attempts to amend this to criminalise clients[23] have been opposed by the Health Ministry,[24] and has encountered considerable opposition.[25]
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ग
गॅरी शोमन Mon, 02/01/2016 - 07:47 नवीन
काल परवाच एका चॅनलवर सोनी फिल्मफेअर अवार्ड पहात होतो ज्यात सनी लिओनच्या हस्ते एका कलाकाराला पुरस्कार देण्यात आला. स्त्रीयांना अनेकवेळा नाईलाजाने काही व्यवसाय क्षेत्रे पत्करावी लागतात. कुणी राजीखुषीने पोर्न स्टार अथवा वेश्या व्यवसाय करत असेल असे वाटत नाही. जर कान्होपात्राला संतांनी आपले मानले. तिची नि र्भत्सना केली नाही तर त्यांच्या पावलावर पाऊल टाकायला काय हरकत आहे ?
न
नगरीनिरंजन Mon, 02/01/2016 - 08:43 नवीन
बरोबर. इथे मात्र सनी लिओनीला वेश्या म्हणू नये म्हणून वादंग उठले आहे. जणू वेश्या म्हणजे अतिशय नीच प्रकार आणि पोर्नस्टार म्हणजे अगदी उदात्त व्यवसाय. प्रत्यक्षात पोर्नस्टारही तेच करतात फक्त त्यांना कॅमेरा लागतो. वेश्यांनाही सन्मानाची वागणूक समाज देऊ लागला तर वरील वादावादी सार्थ होईल. अन्यथा हा महाप्रचंड दुटप्पीपणा आहे.
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/01/2016 - 09:03 नवीन
इथे गैरसमज होत आहे ! मूळ मुद्दा "कोणी कोणाला काय म्हणावे" किंवा "पोर्नस्टार व वेश्या यांच्यातली समानता/विरोधाभास स्पष्ट करणे" हा नसून... "मुक्त सार्वजनिक संस्थळावर एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप/टीकाटिप्पणी (इथे वेश्यावृत्ती केवळ एक निमित्तमात्र आहे) केल्याने संस्थळ कायदेशीर समस्येत अडकू शकेल" हा आहे... आणि या दृष्टीने आक्षेपार्ह वाटणारे लिखाण अप्रकाशित करण्याचा संस्थळाला हक्क आहे व तसे करणे ही संपादकांची जबाबदारी आहे.
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
स
संदीप डांगे Mon, 02/01/2016 - 09:22 नवीन
संपादकांच्या जबाबदारी व हक्कांबद्दल पूर्ण आदर आहे. त्याबद्दल गैरसमज नसावे ही विनंती. धन्यवाद!
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
न
नगरीनिरंजन Mon, 02/01/2016 - 09:35 नवीन
मूळ वाक्य "प्रत्येक वेश्या म्हणजे सनी लिओनी नसते" अशा अर्थाचे होते. याचा अर्थ सनी लिओनी वेश्या आहे असा वाटत नाही. सोमण आडनावाचा प्रत्येक माणूस मदनाचा पुतळा नसतो असे म्हटल्यास मदनाचे आडनाव सोमण होते असा शोध कोणी लावेल का?
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ब
बॅटमॅन Mon, 02/01/2016 - 12:15 नवीन
एग्झॅक्टली!!!!! हे लक्षात घ्यायचे सोडून दुसर्‍याच जिलब्या पाडल्या जाताहेत. सौंदर्याला सनी लिऑनची उपमा दिली तर उत्तमच आहे. ती उपमा वेश्येला दिली याचा अर्थ सनी लिऑन = वेश्या असा घेणे म्हणजे वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स बोलावून रिकामा करवून घेतल्यागत वाटते.
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
ह
होबासराव Mon, 02/01/2016 - 12:18 नवीन
वेलकम बट्ट्मण्ण :)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
अ
अस्वस्थामा Mon, 02/01/2016 - 14:44 नवीन
वरचा मजला मूव्हर्स / पॅकर्स बोलावून रिकामा करवून घेतल्यागत वाटते.
नवा वाकप्रचार आवडला आहे हो.. ;)
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नया है वह Mon, 02/01/2016 - 15:51 नवीन
वाकप्रचार आवडला
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 02/01/2016 - 14:50 नवीन
मूळ वाक्य परत वाचल्यास मत बदलेल असे वाटते. असो.
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन
व
विवेक ठाकूर Mon, 02/01/2016 - 16:56 नवीन
प्रतिसादातलं केवळ पहिलं वाक्य घेऊन अर्थ काढलायं. त्यापुढच्या वाक्याची दखल घेतली की संपादन योग्य आहे हे उघड होतं. तरीही सनीला एक न्याय आणि केजरीवालांना दुसरा हे धोरणात कसं बसतं हा प्रश्न उरतोच.
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
क
कपिलमुनी Mon, 02/01/2016 - 11:18 नवीन
माननीय सौ. सनी लिओन यांनी राजीखुषीने पोर्नस्टार हा व्यवसाय स्वीकारला आहे. अधिक तपशीलासाठी गुगलून पहा.
↩ प्रतिसाद: गॅरी शोमन
क
काकासाहेब केंजळे Mon, 02/01/2016 - 09:02 नवीन
सेक्स आणि पोर्न याशिवाय आजकाल कोणतीच चर्चा मराठी संस्थळांवर चालू नसते,भारत ही सेक्शुअली डिप्रेस्ड सोसायटी आहे याचेच तर हे द्योतक नव्हे!
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 09:07 नवीन
भारतीय सोसायटी नाही.. फक्त पुरुष... स्त्रियांना लैंगिकता नसते..!
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
म
मृत्युन्जय Mon, 02/01/2016 - 10:16 नवीन
????????????
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
म
मृत्युन्जय Mon, 02/01/2016 - 10:18 नवीन
हे विधान बॅट्या किंवा टकाला उचकवण्यासाठी केलेले असेल तर सोडुन द्या. अन्न्यथा या विधानाचा नेमका अर्थ काय घ्यावा? जरा विस्कटुन सांगाल तर बरे होइल. लैच स्फोटक विधान आहे.
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पैसा Mon, 02/01/2016 - 10:34 नवीन
ये पीएस्पीओ नहीं जान्ता! http://www.misalpav.com/comment/796949#comment-796949 http://www.misalpav.com/comment/797028#comment-797028 निदान एक दिवसाआड वाचत जा रे! =)) =))
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 10:37 नवीन
तूच माझी खरी मैत्रिण!!
↩ प्रतिसाद: पैसा
प
पैसा Mon, 02/01/2016 - 10:39 नवीन
जी.पी.टी.ए. =))
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 10:36 नवीन
अरे ये पीएसपीओ नही जानता!! कुठे असता आजकाल मृत्युंजय राव! हे पहा:- हे विधान माझे नाही, काकांचेच आहे! http://www.misalpav.com/comment/796949#comment-796949
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
प
पैसा Mon, 02/01/2016 - 09:22 नवीन
डिप्रेस्ड, डिप्राईव्ह्ड, सप्रेस्ड की ऑप्रेस्ड? आधी ते ठरवा. :D
↩ प्रतिसाद: काकासाहेब केंजळे
अ
अजया Mon, 02/01/2016 - 09:21 नवीन
पुरुष पण दमले भागलेले.दहा लिटर लाळ तयार करुन करुन!!
प
पिलीयन रायडर Mon, 02/01/2016 - 09:32 नवीन
टका सारखे नवतरुण धसका घेतील रे!!! काय चर्चा!!
↩ प्रतिसाद: अजया
ह
होबासराव Mon, 02/01/2016 - 11:40 नवीन
अति म्हंजि अतिच अवांतरः- एका पेक्षा एक सरस धागे निघताहेत्..ज्यात स्वंयघोषित मिपा मोगुल ट्यार्पि वाढवु शकतात, पण कुठाय ते युणाणी दाक्तर ? नाय म्हंजे सदैव सुशुम्नावस्थेत असलेला आयडी (केंका म्हणा किंवा काकें) लयच अ‍ॅक्टिव झालाय... मोगा च्या आय्डी ला पुन्हा पंख लागले का ?
च
चिगो Mon, 02/01/2016 - 12:23 नवीन
व्यक्तिशः काहीच अनुभव नाही. वेश्यागमन कधी केले नाहीये, आणि सनीबाईंनापण फक्त पडद्यावरच पाहीलंय. जर फरक करायचा झाला तर तो असा असेल.. १. सर्वसाधारणतः वेश्यागमनाकडे वळणार्‍या स्त्रिया बळजबरीने/ मजबुरीने ह्या व्यवसायाकडे वळतात. बाकी पॉर्नस्टार्सबद्दल माहीत नाही, पण सनी लिओने तिच्या गाजलेल्या 'चौबे' मुलाखतीत बोलली कि तिची कसलीही 'सॅड स्टोरी' नाहीये. ती स्वमर्जीने पॉर्नस्टार झाली आहे. (बादवे, ह्या मुलाखतीतला तिचा प्रामाणिकपणा आणि 'क्लॅरीटी ऑफ थॉट' वाखावण्यासारखा आहे..) २. जनरली, वेश्येला तिच्याशी संग करणार्‍या व्यक्तीस नाकारणे/निवडणे शक्य नसते. पॉर्नस्टारला ते शक्य असते. ३. अनेक वेश्या त्यांच्याशी संबंध ठेवणार्‍या व्यक्तींवर प्रतिबंध ठेवू न शकल्याने यौनरोगांना बळी पडतात. पॉर्न इंडस्ट्रीमध्ये आरोग्याची योग्य तपासणी व काळजी घेतल्या जाते, असं ऐकलं आहे.. संक्षेपात सांगायचं झाल्यास वेश्याव्यवसाय करणार्‍या स्त्रीला, विशेषतः भारतात, 'निवडीचे व नाकारण्याचे स्वातंत्र्य' नसते बहुधा.. त्यामुळे तिच्या भाव-भावनांना कसलीही किंमत न राहता ती फक्त एक 'वस्तू' बनते.. हेच स्वातंत्र्य बहुतांश पॉर्नस्टार्सला असल्याने आम जनतेसाठी (ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी) ती अप्राप्य असते, आणि म्हणूनच त्यांना जास्त महत्त्व वा भाव दिल्या जातो..
क
काकासाहेब केंजळे Mon, 02/01/2016 - 12:42 नवीन
चिगो छान निरिक्षण , प्रतिसाद आवडला .
↩ प्रतिसाद: चिगो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/01/2016 - 12:48 नवीन
परत एकदा सांगतो. कुठल्याही एका व्यक्तीला केवळ तिच्या/ त्याच्या व्यवसायामुळे हिन लेखणे नको. कुठल्या परिस्थितीमधे तो व्यवसाय त्या व्यक्तीला निवडायला लागला हे ना शिव्या घालणार्‍यांना माहित कौतुक करणार्‍यांना माहित. नेमक्या एका व्यक्तीकडे बोट दाखवुन बोलत नाहिये पण तिला इथे म्हणा किंवा मिपाबाहेरच्या लोकांपैकी म्हणा जी लोकं पॉर्नस्टार म्हणुन हिनपणे बोलत आहेत ना त्यातलेचं बहुसंख्य लोकं चोरुन मारुन तिचं पॉर्न पहाणारे आहेत. आणि ह्या अश्या लोकांनी तिला असं बोललेलं पाहुन ड्वॉळे पाणावले बॉ आपले. एखाद्याला भंगी म्हणुन हिणवणं जितकं वाईट तितकचं एखाद्याला/ एखादीला पॉर्नस्टार म्हणुन हिणवणं वाईट.
च
चांदणे संदीप Mon, 02/01/2016 - 13:06 नवीन
Pretty Woman (1990) Quotes Edward Lewis: I never treated you like a prostitute. [Walks away] Vivian: You just did. (सौजन्य: आयएमडीबी.कॉम) :/ Sandy
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कपिलमुनी Mon, 02/01/2016 - 17:55 नवीन
ती पोर्नस्टार आहे. ही वस्तुस्थीती आहे. सनी लिओनला पोर्नस्टार म्हणून स्वत:ची ओळख करुन द्यायला वाईट वाटत नाही . ती म्हणते , तो व्यवसाय तीने राजीखुशी स्वीकारलाय तर त्यात हिणवणे कुठे आहे ? बहुधा "पोर्नस्टार म्हणने " म्हणजेच हिणवणे. बाकी भंगी म्हणने यात काय वाईट आहे ? याला हिणवणे म्हणतात का ??
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा