ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही.
माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी.
आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच.
ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.
💬 प्रतिसाद
(280)
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 08:16
नवीन
उत्तर "नाही" असं आहे. जेव्हा त्या पंथाचा साधक होतो तेव्हा खनिजयुक्त पाणी वापरत असे. ;)
तरीही तुम्ही "ते आमचे वैयक्तिक मत आहे" असे म्हणून मुळ मुद्दयाला बगल दिली आहे असे नम्रपणे आपल्या निदर्शनास आणू ईच्छितो. आणि आपली रजा घेतो.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 08:47
नवीन
=)) लिहू हो, तेही लिहू. दारू कशी प्यावी ह्यावर समाजप्रबोधन आवश्यकच आहे.
(काय दिवस आलेत बघा. दारू पिऊ नये यावर प्रबोधन व्हायचं, आता कशी प्यावी ह्यावर प्रबोधन होतंय.)
चला, ह्यावर एक किस्सा सांगतो.
दोनेक वर्षांआधीचा किस्सा. मी, वडील आणि मेहुणे घरच्या बायकांपासून लपून-छपून मदिरापानास बाहेर पडलो. ड्रायविंगसीटवर मीच होतो. कुठे जायचे म्हणुन त्यांनी अकोल्यातल्या योगी बारचे नाव सांगितले. मी गेले बारा-तेरा वर्ष अकोल्यापासून दूर असल्याने मला त्याचा पत्ता माहित नव्हता. मुळात योगी बारच माहित नव्हता. तेव्हा दोघांनीही महद-आश्चर्याने तुला योगी बार माहित नाही? असे 'पिएसपीओ नही जानता'च्या थाटात विचारले. मला ती माहिती नसल्याबद्द्ल ते दोघे माझी खेचत होते. तेव्हा मी त्यांना शांतपणे म्हटले, "कसं आहे, जेव्हा मी अकोला सोडले त्या काळात बीअरबारचे नावही माहीत असणे मोठा गुन्हा होता, बीअरबारसमोर/दारुच्या दुकानासमोर दुसर्याच कुठल्या कामानिमित्त उभे दिसले तरी पंचक्रोशीत बदनामी व्हायची. दारू पिणार्यास लोक नाही नाही ते अपमानास्पद बोलायचे. दहाच वर्षात दुनिया १८० डीग्रीत फिरली की बार माहित नाही म्हणून बाप मुलाची खिल्ली उडवतो. नेमकं काय झालं ह्या दहा-बारा वर्षात?" त्यावर दोघांकडे उत्तर नव्हते. =))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 08:50
नवीन
जबरा किस्सा. =))
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 09:05
नवीन
:-)
आमच्या शाळेच्या रस्त्यावर ९३-९४ च्या सुमारास 'सुरभि' नावाचा आलिशान बार सुरू झालेला. बार आहे म्हणजे वाह्यात दारूडे असणारच ह्या भावनेतून त्यामुळे तिकडून होणारी शालेय वाहतूक कमी झाली होती. तिकडून रेंगाळत जाणेही संशयास्पदरित्या बघितल्या जायचे. सोन्याबापुंना माहित असेल हा बार. हा बार म्हणजे आर्थिक उदारिकरणानंतर भारतात घडणार्या आर्थिक, सामाजिक, मानसिक बदलांच्या टर्निंग पाइण्टचा इंडिकेटर होता. आता अकोल्यात असे बार-रेस्टॉरण्ट निघालेत की सुरभि बार देशी दारूचं दुकान वाटेल. सगळ्या महाराष्ट्रात हे बदल दिसत आहेत म्हणा.
चला, बस झालं बोअर करून, तुम्ही जर्मन पोरीसोबत जावा, मजा करा.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 09:18
नवीन
बापा सुरभी म्हणजे आइकॉन होता एकेकाळी !! बार मधे एकंदरित उत्तम जेवण मिळते अन सुरभीचे जेवण क्लास असे फार!! संदीप भाऊ आता अकोल्यात पेशानुसार बार वर्गीकरण झाले आहे वकील सगळे गीतानगर बायपास ला एमपी बार एंड रेस्टॉ ला बसतात, डॉक्टर सगळे सिटी स्पोर्ट्स क्लब ला वगैरे (सिटी स्पोर्ट्स ने आता नॉनवेज सुरु केले हो)
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 09:31
नवीन
हौ ले.
ते जौ द्या. आपन आकोल्यात कुठीसा बश्याचं तेवळं सांगा?
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 09:34
नवीन
खंबा बाहेरून घेऊन पातुर रोड वर बशीरभाई च्या अमनदीप ले बसु!!! आजही रस्सा खलास बनवते अन महान डॅम मधली फ्रेश मच्छी बी देते
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 09:58
नवीन
ज्जे बात! अपन दोनोंकी पसंद एकीच. अमनदीप ले तोडच नाइ.
अपनी खूब जमेगी भाई!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 07:35
नवीन
सासूरवाडीस जाचे हाये. त ट्राय करून पाहतो म्हणल!
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Tue, 02/02/2016 - 07:39
नवीन
ह्या अनिरुद्ध भाऊले अजुन एक दोन जागा सांगुन ठेवजा हो! *"रावसाहेब" हात ते आपले!!
*अकोल्यात जावयाला रावसाहेब म्हणतात!!
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 08:33
नवीन
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 08:39
नवीन
धन्यवाद बापूसाहेब, संदीप भो :)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 08:27
नवीन
ठ्ठो !!!!!! आम्ही पैजारबुवांचे पंखे झालो आहोत,
तसे पाहता इतर वारुणीशी आमचे शत्रुत्व नाही पण विद्यार्थी दशेत इतके मैत्रीपूर्ण संबंध होते की आम्ही "अतिपरिचयात अवज्ञा" टाइप झालतो असे नमूद करतो :D
उदा :- यूपीएससी सारखी अनिश्चित परीक्षा , त्याची तयारी पुण्यात राहून, ते ही प्रार्थमिक मास्तर बापाच्या पेंशन मधुन! मधेच इंसेक्यूरिटी ची झीट यायची आम्हाला मग आम्ही जूनियर पोरांचे तास घेऊन "खरी कमाई" करीत असू, बा च्या पेंशन ची एक थेंब नाही प्यायलो कधी :) पण खरी कमाई जपून ही ठेवली नाही ज्या दिवशी कमाई आली त्याच दिवशी ती लाल पाण्यात उडवणे हा शिरास्ता होता आमचा, तेव्हा कॉलेजवयीन मानसिकता होती, प्यायला हार्ड बॉटम टमलर नसला तरी स्टीलच्या ग्लासातही कधीच प्यायलो नाही, आमच्या एका मित्राला नेमका बार मधेच क्लेप्टोमानिया होई तोच आम्हा गरीबांची गल्लास सोय करी :D , रूम आमची समाजवादी होती तिथे सीए सीनियर सॉफ्ट शॉप फ्लोर इंजीनियर कोचिंग क्लास मास्तर अन लोकसेवा आयोग विद्यार्थी हे सगळे एकत्र बसत, दारू पिताना गोल करुन बसावे हे उत्क्रांती ने दिलेले बेसिक ज्ञान आहे हा आमचा ठाम समज आहे. आमच्या रूम वर प्यायला यूनिफार्म असे तो म्हणजे चड्डी बनियान , ते तूमचे ग्लॉसी फॉर्मल्स अन आरेफायडी कंपनी मधे घरी नाही हा दंडक होता , तर असे मस्त गोल करुन ४ रूममेट बसणार प्रत्येकाला भेंडी खंबा हवा असे मग करणार काय? तर वाइन शॉप मधे जायचे कर्वेरोड ला अन "भाऊ सगळ्यात स्वस्त व्हिस्की कुठली?" अशी पृच्छा करायची! (गरजवंताने लाज बाळगता कामा नये) अश्याच सिंदबादच्या सफरी करताना एकदा एक अमृत हाती आले होते ते म्हणजे बारामती का फलटण च्या कुठल्याश्या डिस्टिलरी न काढलेली "मास्टर ब्लेंड" ही व्हिस्की च्यायला ११० रु ला हाफ अन २०० ला खंबा होता त्या काळी (२००७-११) , बॉटल दिसायला एकदम साधी अन व्हिस्की किरमीजी रंगाची असे! शिवाय हैंगओवर अजिबात नाही म्हणजे वयानुरूप खंबा रिचवला तरी काही होत नसे सोबत उधारीत आणलेला ट्रिपल शेझवान फ्राइड राइस असे जेवायला अन चकन्यात ५ ५ रु ची चिली मिली ची पाकीट (पुण्यात कुठल्याही मारवाड्याच्या किराणा/जनरल स्टोर ला मिळतील) जास्त माज असल्यास हॉट चिप्स वाल्या कडील बटर चकली अन पावशेर प्लेन साल्टेड बटाटा वेफर्स!
आठवणी अश्या वाहु लागतात बघा!!! :D
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 01/31/2016 - 08:40
नवीन
अहाहाहाहाहाहाहा
बापूसाहेब बापूसाहेब. त्या मास्टरब्लेंड, चिली मिली अन हॉट चिप्साची साक्ष आहे. आम्ही तुमच्यातलेच.
(मास्टरब्लेंडाने एकेकाळी काय लॉन्चिंग केलेले. शेवटी शेवटी बारवाल्यानी ओसीबीपीत घालून खपवली. सध्या सुरुय परत ब्रॅन्डिंन्ग.)
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 08:45
नवीन
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Mon, 02/01/2016 - 07:05
नवीन
देवादिकांची अन
असुरांची हि आवडती |
परी सतजनाशी
असे नावडती ||
केला कुणीही कांगावा
मदिरे तुझी ख्याती ऐशी
जितेपणी स्वर्गात (?) नेशी - ||
- Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य
Tue, 02/02/2016 - 07:33
नवीन
काय प्रतिसाद! मस्तच हो पैजारबुवा!
- Log in or register to post comments
ज
जेपी
Sun, 01/31/2016 - 05:18
नवीन
स्वत:ला किंवा दुसर्याला त्रास होणार नाही ईतपत,
बीयर,व्हिस्की किंवा स्कॉच(JD) अथवा याच कॉकटेल..
सोबत जर गप्पा मारायला कोणी नसेल तर चांगले पुस्तक वाचत अथवा चित्रपट पहात ..
नंतर जेवण आणी मस्त झोप.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Mon, 02/01/2016 - 10:18
नवीन
'जेडी' स्काॅच नाय.
- Log in or register to post comments
अ
अवतार
Sun, 01/31/2016 - 05:43
नवीन
आपण काल काय आणि किती प्यायलो होतो हे आठवण्याइतपतच असावं.
- Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर
Sun, 01/31/2016 - 06:03
नवीन
दारू (बियर) पिण्याची गरज माणसाला का पडते. तेही मांसाहारी जेवणासोबतच.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 01/31/2016 - 06:50
नवीन
असं काय नाय. सुसाट दारू पिणारे शाकाहारी बघितलेत, दारूला स्पर्शही न करणारे मांसाहारी बघितले.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 06:57
नवीन
शाकाहारी दारू पिणारे दारू प्यायल्यावर छान गाणे म्हणतात, त्यांची आपल्याला ज्ञात नसलेली बाजू दिसते.
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 08:07
नवीन
काय आठवण काढली देवा! आमचा मित्र होता स्वतः पुजारी अन भिक्षुकी करणारा एक त्याला एमपी मधल्या उज्जैनच्या महाकाल बाबाच्या पुजेचा नाद लागला होता अन इंदौर जवळील भैरव मंदिरात सुद्धा चकरा असत (ह्या मंदिरात दारूचा नैवेद्य असतो) आमच्या सोबत टेबलावर बसे, भाऊ चा खंबा वेगळा, ग्लास वेगळा चकना वेगळा, स्पष्ट म्हणत असे
"भाऊ तुले लागन तर तू एक अलग दाल फ्राई बलावजो पर माझ्या निवदात तुये मटनाचे हात टाक्याचे काम नाही बस" दारू पिणार मजबूत पण कितीही कड़क कोरी पिला तरी जेवण व्हेज अन सोमवार असल्यास बिना कांदालसुन सांगत जाय कैप्टेन ला स्पेशल! त्याचं नावंच अघोरी बाबा ठेवलत पोट्याईनं
- Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी
Sun, 01/31/2016 - 06:13
नवीन
असं म्हटलं तरी न घेणारे घेणार्याना सोडण्याचा वा न घेण्याचा उपदेश करतात आणि घेणारे न घेणार्याना 'हे काय घेत नाहीस?' 'एकदा चाखुन बघ / आम्हाला साथ दे' असा आग्रह करतात
मी लौकिकार्थाने ज्याला दारु म्हणतात ती २५-३० वर्षांपूर्वी सोडली. मला फक्त ओल्ड मंक आवडायची आणि तीही जशीच्या तशी. सोडा फसफसत राहतो आणि पाण्याने उगाच वस्तुमान वाढते. अन्य मिश्रणाने मूळ चव ढळते. एक एक टोपण ओतुन घ्यायची आणि प्राशन करायची. माथेरान सहलीला जाताना ठाण्याहून रात्री १.४० ची (तेव्हाची) शेवटची कर्जत पकडायची आणि तीन च्या सुमारास नेरळ गाठायचं. साडेपाचच्या सुमारास रस्ता पकडायचा आणि गप्पा, विनोद, उखाळ्या पाखाळ्यां सोबत टोपणा टोपणाने चपटी संपवताना रस्ता कधी संपायचा ते समजायचं नाही.
त्यानंतर फक्त बिअर. जेव्हा मनापासून घ्यावीशी वाटेल, बरोबर हवे ते गडी असतील, खुली जागा असेल, निघायची घाई नसेल, गाडी चालवायची नसेल, शक्यतो रात्री बैठकीच्या स्थानापासून जायची गरज नसेल तेव्हा बिअर घेतो. बरोबर काकडी, गाजर , बीटाचे काप, शेव व मिरचीच्या तलम चकत्यांनी सजवलेली सॉस लावलेली जिरा मोनॅको बिस्किटे, हिरवी चटणी लावलेल्या व मिरपूड शिंपडलेल्या शेव बटाटा पुरीच्या पुर्या, चिजचे बारीक तुकडे आणि खमंग भाजलेले पंजाबी मसाला एडीद पापड असे असेल तर काय विचारता! कींगफिशर अल्ट्रा, हनिकन, कार्ल्सबर्ग या आवडत्या. ट्युबोर्गही चांगली आहे. फारा वर्षांपूर्वी प्रथमच चाखलेली कॅफ्रे विलक्षण आवडल्री होती. चीनी दौर्यंमध्ये शिंताव फार आवडायची.
असो. असे योग नेहेमी येत नाहीत.
- Log in or register to post comments
अ
असंका
Sun, 01/31/2016 - 06:37
नवीन
हेमंत लाटकरांचा अत्यंत वाजवी प्रश्न ....कुणी तरी सांगा उत्तर...?
- Log in or register to post comments
म
मयुरMK
Sun, 01/31/2016 - 07:03
नवीन
तुमच्या धाग्याला जे शीर्षक आहे त्यातल प्रश्नचिन्ह आणि '' किती'' हा शब्द काढून टाका = उत्तर
- Log in or register to post comments
भ
भाते
Sun, 01/31/2016 - 07:30
नवीन
माझी आणि बऱ्याच मिपाकरांची आवड एकच आहे हे वाचुन छान वाटले. व्होडका, व्हिस्की कधीच आवडले नाही. रममध्ये सुध्दा फक्त म्हातारा संन्याशी. नाहीतर कट्टयाला मिपाकरांबरोबर बिअर.
किमान तिन पेग आणि जास्तीत जास्त चार पेग, तेसुध्दा पाण्यातुन. कोल्ड ड्रिंक सोडा यामुळे दारूची सगळी मजा जाते. घसा ओला व्हायला एक लार्ज पेग लागतो. त्यामुळे ९० मिली / दोन पेग पिण्यापेक्षा न प्यायलेली बरी.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 08:03
नवीन
"शाही हरीण निवडक पिंप" पाण्याबरोबर काय लागते. अहाहा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Sun, 01/31/2016 - 08:07
नवीन
खी खी खी.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/31/2016 - 08:11
नवीन
जाणकारांच्या उत्तराच्या प्रतिक्षेत :)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 08:18
नवीन
जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास हाक मारी..
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 01/31/2016 - 08:22
नवीन
जाणकार म्हणोनी कोणी दुसर्यास हाक मारी..
कोरी दारु पेटेना, म्हणोन हलकेच काड्या सारी
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Sun, 01/31/2016 - 08:27
नवीन
हिकडं यौन बुवांची कमी भरून काढलीत तुम्ही. भडकलेल्या जीभ काढणाय्रा स्मायल्या.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/31/2016 - 08:36
नवीन
हेलाकाका...कधी फक्त चव घेण्यासाठी प्यायची असेल तर अॅबसिंथची चव घ्या
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/01/2016 - 08:12
नवीन
हि कोणालाच माहित नाही???

- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 02/01/2016 - 08:44
नवीन
एका पुणेकराने पण असेच विचारलेले. तुला अॅबसिंथ माहीत नाही? जणू काय ही माहीत नाही तर सगळी जिंदगी वेस्ट. अर्थात पुणेकरच तो.
आवर्जून उल्लेख करण्याइतकी भारी वाटली नाही एवढेच. ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/01/2016 - 09:11
नवीन
प्यायला आहेस का? असल्यास किती? ;)
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 02/01/2016 - 09:36
नवीन
माझ्या ह्या प्रतिसादातच तुझ्या दोन्ही प्रश्नाची उत्तरे हायेत. ;)
- Log in or register to post comments
आ
आदूबाळ
Mon, 02/01/2016 - 10:36
नवीन
अॅबसिंथ काय आहे? प्रथमच ऐकतोय...
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Mon, 02/01/2016 - 10:41
नवीन
हाय्येस्ट अल्कोहोल पर्सेन्तेज असलेली म्हणून फेमस झाली, बरीच वर्शे बॅन होती. आता मिळते. प्यायच्या वेगवेगळ्या मेथड पण आहेत. त्याचा कलर मला व्यक्तिशः आवडत नाही. नेटवर बरीच माहीती आहे उपलब्ध.
डोस्के धरलेले जरासे :(
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Mon, 02/01/2016 - 11:20
नवीन
२-३ शॉट्स प्या...मग दुसर्या दिवशी समजेल ;)
- Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज
Sun, 01/31/2016 - 08:54
नवीन
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 01/31/2016 - 09:18
नवीन
कोपच्यात उभारलेली जेडी तेवढी ओळखीची. बाकी सगळे अनोळखी. :(
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/31/2016 - 09:37
नवीन
दादा आपली बकार्डी पण दिसतीय ना वरुन दुसर्या लायनी मध्ये
बाकी हे घ्या
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Sun, 01/31/2016 - 09:54
नवीन
नमस्कार करतो माऊली.
आता सरांचे पण १०० झालेत. हिला उचलावी अन कल्टी मारावी ह्या धाग्यावरून. कसे???
- Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार
Sun, 01/31/2016 - 10:18
नवीन
अभ्या वाक्यं प्रमाणं....
जाता जाता :- सर १०० झाल्या बद्दल अभिनंदन.
रच्याकने हे प्रॉमिस विसरू नका. मिकाला मी आणतो.
पैजारबुवा,
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/31/2016 - 12:39
नवीन
प्रा.डॉ. के वादों और बातो पर संदेह नहीं करते. नक्की बसू. :)
मित्रहो, काल पासून नेट गंडलं आहे, उत्तम प्रतिसाद आले आहेत आणि आपल्या प्रतिसादाच्या आनंदात सालं मला सहभागी होता येत नै ये. नेट रेग्युलर सुरु झालं की हजर होईनच. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 01/31/2016 - 09:49
नवीन
दारुड्यांनी बेवड्यांबरोबर संस्क्रूतीला बूडवन्यासाथी काडलेला धागा
- ले"संत" बाटकर
- Log in or register to post comments
क
कैलासवासी सोन्याबापु
Sun, 01/31/2016 - 09:51
नवीन
कुठंशी बुडवणार? बियर मधे का रम मधे
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- ›
- »