Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ड्रींक्सचं प्रमाण किती असावं ?

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 01/30/2016 - 15:32
🗣 280 प्रतिसाद
नमस्कार मंड़ळी, मंडळी, आयुष्य मोठ्या गमतीदार गोष्टींनी खच्चून भरलेलं आहे. माणसाच्या आयुष्यात कोणती गोष्ट कधी येईल काही सांगता येत नाही. माणुस हा समाजशील प्राणी आहे. माणसात रमणे हा त्याचा स्वभाव आहे. ओळख, मैत्री, प्रेम, कुटुंब अशा अनेक गोष्टींमधे एकमेकांना चिकटून असतो. पण कधी कधी कोणाच्याही आधाराशिवाय माणसानं जगायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी कोणाचा आधार काढून तुम्हाला एकट्याला सोडुन स्वतः मजेत राहील याची काही गॅरंटी नाही. आणि मग एकटं वाटायला लागलं की आधारासाठी अनेक गोष्टींचा आयुष्यात प्रवास सुरु होतो. अशाच एका आयुष्यात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी मित्र म्हणतो 'घे रे कै होत नै' 'एक प्याक घे' 'बरं दोन थेंब घे' 'आनंदाचा प्रसंग आहे, नाही म्हणू नको यार' 'प्रमोशन झालंय तुझं बाकीच्यांचा डिसमुड करु नको' 'आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच प्यालाची' आयुष्यात सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा पेयपानाचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. व्यसनाधीन होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकुटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात म्हणजे ऑफीस, मित्र, वेगवेगळ्या पार्ट्या, यात एक ६० एम.एल. म्हणा किंवा वाईन म्हणा एखादा दोन पेग घेतला की पार्टी इंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात ड्रिंक्स आरोग्यासाठी चालु शकतं ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे ? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी घ्यावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण घेऊच नये ना ? जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त आयुष्य, बैठे काम, आणि विविध आजार हे सोबत असतांना पेयाचं प्रमाण किती असलं पाहिजे ? वाईन घ्यावी की न घ्यावी ? व्हिस्की /रम ? अशा विविध ब्रँड आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणनं दोन चार दीर्घ प्रतिसादात विविध मुद्द्यांसहित आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांचा रतीब पाडण्यापेक्षा मुद्दा आणि त्याचं स्पष्टीकरण आलं तर भरल्या मैफिलीत कोणाचं तरी प्रबोधन करता आलं तर त्याचा फायदा अनेक मित्र मैत्रींनींना होईल म्हणुन हा काथ्याकुटाचा प्रपंच. ता.क. मी अशा गोष्टींपासून चार हात दूर आहे. उगं माझ्याकडे संशयाने पाहु नये. धन्यवाद. खुलासा संपला.

प्रतिक्रिया द्या
77605 वाचन

💬 प्रतिसाद (280)
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 04:10 नवीन
ज्ञान सुरु
स्टीलच्या ग्लासात दारू पिणे म्हणजे धबधब्याखाली रेनकोट घालुन उभे राहणे होय!
ज्ञान समाप्त
  • Log in or register to post comments
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 06:13 नवीन
हाण तिज्यायला... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
अ
अभ्या.. Tue, 02/02/2016 - 08:22 नवीन
शिस्तीत पिनार्‍याला हे ठिक आहे पण येळेला म्हणून चिनीमातीच्या बशीत पिलेले भाद्दर पण माहीतीयेत. एका ट्रीपमध्ये काहीच नसल्यामुळे गाडीचा टेललाईटमध्ये (आधीच ढिल्ला झालेला होता, धुवुन घेतला होता) पिणारा वीर पण माहीतीय. इस्टीलच्या ग्लासात मात्र माप कळत नाही, लैच बल्ल्या होतो राव. आम्ही हॉस्टेललमध्ये असताना लॅबमधले बोरोसीलचे बीकर पळवून आणले होते. ;) त्याच्यावर लै परफेक्ट माप असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 08:34 नवीन
आम्हाला सुद्धा ही ज्ञान प्राप्ती विद्यार्थीदशेत स्टीलच्या गिलास न दिलेल्या खो वरुन झाली आहे अभ्या भाऊ, ग्लास वरुन एक किस्सा आठवला, आमच्या एका दोस्ताला बार मधे ग्लास चोरायची सवय होती, एरवी चवलीपवलीची आचमने असत तेव्हा आम्ही ही सांभाळून घेत असू पण आउट व्हायच्या पार्टी मधे लोचे होत. एकदा असेच सायंकाळी साडे सात ला बसलो अन लास्ट ऑर्डर पर्यंत पितच बसलो होतो (माझ्या सिलेक्शनची पार्टी) साडे अकरा ला मागच्या गेट न बाहेर आलो ते कप्या गायब! मी माझा अन सिबिझेड चा तोल सावरत कसाबसा उभा होतो तितक्यात हा गड़ी लगबगीने आला , त्याच्या कड़े पाहता स्पॉन्डिलाइटिस झालेल्या माणसाने मानेला पट्टा लावतात तसा मान वर करून आला अन "चल बाप्या चल मार पाहु किक चल लवकर चल चल" सुरु केले ! मी पुर्ण बुंग झलेलो तसाच घेतला गाड़ीवर अन घरी . आल्यावर म्हणले कप्या तुला काय धाड़ भरली होती भाड्या? तर भाई ने प्रताप दाखवला, चार टेबल वरले १६ ग्लास एकात एक घालुन ती उतरंड शर्टाच्या आतून लपवून आणलेली लेकाच्याने!! हसावे का रडावे कळेना मला! सोबतचे अजुन दोघं अजुन बिलंदर! पाचव्या मित्राला फोन करून मंडई मधील प्यासा मधुन परत दारू मागवली अन त्या ग्लासेस चे उदघाटन करून रात्रभर परत पार्टी!! अभ्या भाऊ, तू कदाचित असले कस्टमर पाहिले असतील बार मधे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Tue, 02/02/2016 - 08:44 नवीन
असले लैच पाहिले बापूसाब. डेली ३-४ तरी गायब असतात. साताठ खळ्ळ होतात. मार्केटमध्ये घ्यावेच लागतात कायम तरी कंपन्या देतात ग्लास वरचेवर म्हणून बरेय. ठेवणीत ठेवावे असे ग्लास म्हणले तर ब्लेंडर्स रिझर्वचे. मला स्मिर्नोफ चे बीकर स्टाइल उभे ग्लास लै आवडतेत. एक बॉक्स आहे काढलेला. आमचा तत्वज्ञानी मित्र आला की काढणारे वापरायला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
ग
गवि Tue, 02/02/2016 - 10:52 नवीन
मी माझा अन सिबिझेड चा तोल सावरत कसाबसा उभा होतो तितक्यात हा गड़ी लगबगीने आला
मी पुर्ण बुंग झलेलो तसाच घेतला गाड़ीवर अन घरी .
हे पूर्णपणे टाळा अशी विनंती. ड्रायव्हिंग ..अजिबात नो नो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पिलीयन रायडर Tue, 02/02/2016 - 10:54 नवीन
सोन्याबापु ही चिटींग आहे. तुम्ही म्हणलात की "इतकी" प्यायचीच नसते... आनी स्वत" बुंग होऊन गाडी चालवलीत. असं करु नकात हो.. म्हणजे आता करत नसालच..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 11:22 नवीन
सपशेल मान्य आहे मुद्दा!! जेव्हापासुन पिणे हे "नशा" सोडुन "रिलॅक्स" व्हायला सुरवात झाली तेव्हापासुन असले काही प्रताप केलेले नाहीत, अगदी विद्यार्थीदशेत सुद्धा क्वचितच असले काहीतरी करीत असू, वरती सांगितल्या प्रमाणे ५ वर्षे घासुन सेलेक्ट झाल्याची ती पार्टी होती म्हणून अंमळ जास्तच मोकाट सुटलो होतो!!
पण ती एक घोड़चुक होती
आधी कधी झाली असेल तीच शेवटची परत असली मस्ती केलेली नाही/ करणार ही नाही :) (जबाबदार झालेला) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
भ
भाते Tue, 02/02/2016 - 10:13 नवीन
चार सहा पेगनंतर काचेचा ग्लास फुटला आणि आयत्या वेळी स्टीलचा ग्लास नसल्याने दारू ढोसण्यासाठी करवंटी शोधणारे लोक बघितले आहेत. स्टीलच्या ग्लासातून माप कळत नाही हा आरोप चुकीचा आहे. पट्टीच्या पिणाऱ्याला बाटलीकडे बघुन पेग बरोबर भरला आहे का हे समजले पाहिजे. त्यासाठी काचेच्या ग्लासात बघायची काय गरज आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पिलीयन रायडर Tue, 02/02/2016 - 07:40 नवीन
एक प्रश्न दारु पिल्यानंतर ती चढली की आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता.. ह्याची भीती वाटत नाही का?
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Tue, 02/02/2016 - 07:48 नवीन
'दारु पिल्यानंतर ती चढली की आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही, एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता' - यात असंबध्द बरळणं, विनाकारण हाहा हीही करणं, बेकार जोक मारणं, किंवा मग टोटल मौनव्रतात जाणं, इ. अ‍ॅड करा. पिणार्‍यांची अशा परिस्थितीतील अवस्था पाहून करमणूक होणारी ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 08:02 नवीन
माझा एक मित्र एक नैंटी एम् एल पर्यन्त चांगल्या गप्पा मारतो ,आयुष्य, कटकट, जिन्दगी आणि मग हळु हळु ढुप होऊन जातो. जेवतांना अरे राइस घे, अरे ग्रेव्ही घे, नुसता मानेने नकार होकार. बील पेड़ करतो किंवा जे शेअरिंग असेल तेही शांततेने देतो. निरोपाच्या वेळी मात्र गोड हसून गुड नाईट म्हणतो मला आवडतं त्याला कंपनी द्यायला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 07:50 नवीन
इतकी प्यायचीच नसते तै! जो तितकी पितो तो दर्दी नाही बेवड़ा असतो. There's a difference between connoisseur and chronic alcoholic people!! जो स्कॉचच्या फ्यूमिंगचा आनंद घेऊ शकत नाही तो व्यर्थ पितो असे मत आहे आमचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/02/2016 - 07:56 नवीन
एवढी अवस्था होईपर्यंत कधीच घेत नाही हो चांगले पिणारे. वर बापूसाहेबांनी म्हंटले तसे दर्दी लोक जबाबदारीनेच घेतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
आ
आदूबाळ Tue, 02/02/2016 - 08:00 नवीन
नाही वाटत. ताळ्यावर राहायचा पण कंटाळा येतो कधीकधी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 09:01 नवीन
क्लास. जियो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 08:06 नवीन
हे फक्त दारूबद्दल नाही, प्रत्येक नशा देणार्‍या गोष्टीबद्दल (यात वस्तु, वास्तु, व्यक्ती, स्थावर, जंगम, सत्य, काल्पनिक) सगळंच आलं) आहे. ताळतंत्र सुटणे फक्त दारूत होतं असा गैरसमज आहे. बाकी बापुसाहेबांनी म्हटल्याप्रमाणेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 08:26 नवीन
काही आम्ही पिलोय हे दाखवतात त्यामुळे काही ज़रा अति करतात. पण ताळतंत्र कोनाचं सुटत नाही. सालं बदनाम पिणारे झाले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
अ
अभ्या.. Tue, 02/02/2016 - 08:08 नवीन
आपण ताळ्यावर रहात नाही.. परिस्थितीचे भान रहात नाही.. एकंदरीत काय चाल्लय नक्की हे कळण्याच्या स्थितीत तुम्ही नसता..
काय सांगायचं पिराताई तुम्हाला. फक्त दारुनेच असे होत नाही हो. कित्येक लोक साध्या साध्या गोष्टीत ताळ सोडतात, परिस्थितीचे भान राहात नाही. अगदी आमच्या एका मित्राची बायको, भांडायला लागली की ताळ्यावर राहात नाही, परिस्थितीचे सोडा स्व्तःचे, स्वतःच्या नवर्‍याचे, मुलांचे पण भान राहात नाही. बाकी इतर वेळी अगदी नॉर्मल. बरेच लोक असतात हो असे. कुणाला वादाची नशा, कुणाला बुध्दीमत्तेची, कुणाला सौन्दर्याची तर कुणाला पैशाची. बच्चनसाह्यबांचं गाणं नाही का पाह्यलं? "नशा शराब मे होती तो नाचती बोतल" ;) भीती काय वाटायची त्यात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
पिलीयन रायडर Tue, 02/02/2016 - 08:55 नवीन
आदुबाळ आणि तुमच्या बोलण्यात पण मुद्दा आहे हां.. ताळ्यावर रहायचाही कंटाळा येतोच की.. आणि दारु पिल्यावरच लोक डोक्यावर पडल्यासारखे वागतात असेही नाही.. मला दारूचे वावडे वगैरे काही नाही.. फक्त दारुचा वास बराच उग्र असतो.. आणि चवही.. त्यात नक्की काय न कसे एन्जॉय करायचे हे न कळल्याने प्रगती झाली नाही.. नाही तरी आम्ही पण मेगाबायटी प्रतिसाद दिले असते हो!! (म्हणुन समानता हवी.. ह्या गोष्टी का नाही शिकवत आम्हाला सुद्धा.. काय माहिती... ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नीलमोहर Tue, 02/02/2016 - 09:52 नवीन
- दारुचा वास बराच उग्र असतो, लांबूनही सहन होत नाही. चव कशी असते ? एवढे कौतुक करण्यासारखं काय असतं त्यात ? दारूच्या थेंबालाही स्पर्श न केलेली, लांबून गंमत बघण्यात समाधान मानणारी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 09:56 नवीन
मग उग्र वास आणि कडवटपनाचंही काही वाटत नाही असे म्हणतात. ड्रिंक्स करनं म्हणजे काय सोपं काम थोड़ी असतं :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पिलीयन रायडर Tue, 02/02/2016 - 10:04 नवीन
मी थेंबालाही स्पर्श केला नाही कॅटेगरी नाहीये.. चव उग्रच असते.. नक्की का पित आहेत ते कळत नाही.. मला तरी काही हलकं.. किंवा रीलॅक्स इ वाटलं नाही.. कदाचित मी पुरेशी पिली नसेल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Tue, 02/02/2016 - 10:15 नवीन
'हलकं.. किंवा रीलॅक्स इ वाटलं नाही..' - तुम्ही ड्रग्ज वगैरे ट्राय केले का ? अगदीच गेलाबाजार झोपेच्या गोळ्या ? हवेत तरंगत असल्याचा फील अशा गोष्टींनीही येतो म्हणतात ;) 'ड्रिंक्स करणं म्हणजे सोपं काम थोडी असतं' - कठिण कामं करायचा किती तो सोस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
अ
अजया Tue, 02/02/2016 - 12:05 नवीन
:)पिरा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
ग
गवि Tue, 02/02/2016 - 08:28 नवीन
या निमित्ताने डीबी सरांच्या धाग्यावर जुनाट चोप्य पस्ते..: ............. "साहेब कुठली ओतू?" पटवर्धनच्या मोठ्ठ्या आवाजाने सगळ्या सोनेरी चंदेरी बाटल्या किणकिण हलल्या.. रॉयल चॅलेंज नाव छान वाटतं..पण त्याला आर सी म्हणायचं.. .. .. "नको हो आज पटवर्धन..मी काय पट्टीचा नव्हे हो..कशाला .. असू दे.. मी पेप्सी घेतो.." "बसा हो.. घ्या..ए एक आर सी इकडे आणून ठेव रे.." .. .. चला..पटवर्धन म्हणतोय एव्हढा मनापासून तर बसूया आज.. .. .. "पण स्मॉल बनवा हो.. मला ड्राइव्ह करायचंय.." ग्लास भरला.. म्हणजे भरूनच आला.. आता त्यात किती ड्रिंक आणि किती सोडा कसं कळणार..?? घोट कडवट लागत होता..घसा आणि पोट गार गार जळालं.. पुढचा पेप्सी मधे घालूनच घ्यावा.. .. "अजून एक ओततोय बरं का साहेब.." "आता बास् पटवर्धन..!!" सालं आज काही खरं नाही.. हा आज ऐकत नाही.. एव्हढा एक गटागट पिऊन बास करायचं.. गटक गटक गटक.. "ए जगन्या..साहेबांचा ग्लास संपला की रिपीट करत जा.. विचारायचं नाही.." अत्यंत खालच्या आवाजात पटवर्धन वेटरला बोलला.. मला काही ते नीट ऐकू आलं नाही.. जाउदे च्या मारी.. त्याची पार्टी आहे.. चालायचंच.. जगन्या.. म्हणजे जगन असणार.. अजूनही इतकी ओल्ड फॅशन्ड नावं ठेवतात? लहान दिसतो तसा..बालमजूर वाटतोय.. जाऊ दे..पोटाला तर मिळतंय ना त्याच्या.. तिसरा की दुसरा ग्लास आहे हा..? ग्लास म्हणायचं की पेग.. पेग बरं वाटतं.. देशी थोडीच आहे ही.. आता हा पटवर्धन "मराठी विरुद्ध अमराठी", किंवा एकदम "महाभारतातली द्रौपदी" असला काहीतरी विषय काढणार.. बरं असतं ड्रिंक्स सोबत..दोन तीन झाली की मग कुठलाही विषय मस्तच.. मस्तच.. मस्तच..मस्तच.. हे सालं कुठलं मधलंच गाणं लावलंय ?? ना धड दु:खी ना धड आनंदी.. एक तर गझल लावा किंवा मस्त अपटाऊन गर्लबिर्ल लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे.. हा चौथा की तिसरा ग्लास .. साला जगन सगळेच लार्ज भरत चाललाय वाटतं.. तो तरी काय करणार बिचारा.. पटवर्धनने ऑर्डर दिलीय ना..जाऊ दे भेंडी.. नुसते दाणे..?? चिजलींग तरी ठेवायची.. हाश्श्श.... "साहेब हळू सावकाश...!!" पटवर्धनचा आवाज कानात गूं करून घुसला.. अरे तिच्या मारी.. मी ग्लास जर्रा जोरात खाली ठेवला म्हणून लग्गेच.. "आय अॅम परफेक्टली अोक्के पटवर्धन!!.. एक सुरमई फ्राय सांगा लवकर".. सुरमई.. सुरमई.. सुरमई शाम इस तरह आये.. भूक लागलीय तिच्या आयला... सहावा की पाचवा ? की साडेचारावा ?? ग्लास आत्ता तर संपवला होता.. आपोआपच भरतोय.. नीट लक्ष ठेवलं पाहिजे.. लोक तरी किती आलेत पार्टीला..फ़ुकटचे खायला लगेच येतात लतकोडगे.. खाबू साले..खाबू खाबू खाबू ... आत्ता चार पावलं फिरून आलं पाहिजे.. तरच मज्जा.. समोर जोश्या बसलाय.. त्याचा शर्ट वर गेलाय.. बाजरीच्या कणकेसारखं त्याचं पोट दिसतंय.. तरंगत जाऊन मस्त कणीक तिंबून काढावी का ?? का का का.. का का का.. कू कू कू.. अरे यार.. आपल्याच हाताच्या तळव्याकडे बघायला किती मजा येतेय.. वेडावाकडा हलतोय हात.. द्यावी का कोणाला ठेवून राप्पकन.. ?? धम्माल येईल.. लोक म्हणतील साहेबाला चढली.. त्याने तमाशा केला.. पण मला अजिबात चढत नाही हे त्यांना कोण पटवणार.. ?? शांत बसणं सेफ.. उगीच गैरसमज नको कोणाचा.. गैरसमज.. गैरसमज..बम बम.. आठवा ग्लास ?? काहीतरीच.. आपली एव्हढी कपॅसिटी नाहीच आहे..पाचवाच असेल फारतर.. पटवर्धन घेईल काळजी.. ही चायनीज चिंकी कधी आली.. चिकणी बनलीय एकदम..बेब.. हिचं सालं नावच विसरलो.. चिंकी.. चिंकी.. चिकणी.. चिकणी.. चिकन दिसतंय मख्खनवालं.. बुफे टेबलवर.. चिकन जाईल का आपल्याला आता.... पण पोट स्टफ झालंय.. अरे इतके ग्लास लिक्विड.. ****.. पोटाची काशी केलीत.. ... च्यायला.. आले आधार देऊन उठवायला वगैरे.. ज़रा दोन चार पेग घेतले की यांना वाटतं की टल्ली झाला.. मी काय त्यातला दिसतो काय.. मला उठवायला पटवर्धन कशाला.. चिंकीला तरी पाठवायचंत.. मी शांत आहे.. एकदम मस्त शांत.. किंचितही मरगळ नाही..एकदम फ्रेश.. मी उठून ड्राइव्ह करत मसणातही जाऊ शकतो.. मरगळ मरगळ..बरगळ बरगळ.. मळमळ मळमळ .. काहीतरी यमक जुळतंय .. मी उठून लिफ्ट पर्यंत सरळ चालत आलो तरी कुणाला पत्ताच नाही.. मस्त उत्तम भिकार फकीरचंद मूड.. जाळून टाकूया का मस्तपैकी जग..की मस्त नाच करुया.. इपडी पोडे पोडे पोडे पोडे.. टॉयलेट कुठे आहे इथे भेंडी..!! जागेवर टॉयलेट ठेवत नाहीत.. कुत्रे साले.. ... मागे पटवर्धन अत्यंत हलक्या आवाजात कोणालातरी सांगतोय.. "साहेबांचं हे मस्त आहे.. कितीही प्यायले तरी एकदम सोबर माणूस..!!"
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 08:39 नवीन
क्लास ! आवडलं. मस्त. ''मास्तर केव्हाच मेला आहे, आता तू येऊ नकोस. तुझा चाफा नको आणि मोगराही नको'' -दिलीप पटवर्धन ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
न
निओ Wed, 02/03/2016 - 19:23 नवीन
एक तर गझल लावा किंवा मस्त अपटाऊन गर्लबिर्ल लावा.. इथे प्यायला बसलोय.. केस कापायला नव्हे.. 1 नं. ह ह पु झा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 08:40 नवीन
२०० झाले अभिनंदन सर! भरू का एक लार्ज? :D
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध.वैद्य Tue, 02/02/2016 - 08:41 नवीन
अहो हपिसे आज.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 02/02/2016 - 08:49 नवीन
आईस आणि तळलेले पापड पण लागतील. हॉटेल मधे चखना म्हणून कुरडाया देतात का तिकडे ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कपिलमुनी Tue, 02/02/2016 - 10:55 नवीन
एकच उत्तर " ओकू नये एवढा असावा" ओकार पब्लीक डोक्याला ताप असता. बाय द वे , आमचा एक जाणकार मित्र सांगतो , पार्टीच्या आधी ओमेझ किंवा पॅन डी टॅबलेट घ्यावी त्रास होत नाही. खखोदेजा
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Tue, 02/02/2016 - 11:59 नवीन
वकार युनुस म्हणतात त्यांना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 12:07 नवीन
कश्याला आमेज़ अन पॅन-डी चे प्रयोग करावे म्हणतो मी , हिमालया ड्रग कंपनी ने पार्टी स्मार्ट कॅप्सुल काढल्या आहेत ती एक घ्यायची वक्का वक्का पण नाय अन दूसरे दिवशी हैंगओवर पण नाही होत अजिबात! (मुळ मुद्दा हा की वक्का वक्का इतकी पिऊच नये) तरीही, कोणाचा वक्का वक्का चा ट्रॅक रेकॉर्ड असल्यास अन पार्टीचा रंग बेरंग करायचा नसल्यास ही ती गोळी बघा Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अजया Tue, 02/02/2016 - 12:16 नवीन
बापरे! काय तो व्यासंग!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 12:38 नवीन
हॉस्टल लाइफ जिंदाबाद!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
स
सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 15:54 नवीन
बापूसाहेब हे PARTISMART जे दावे करत आहेत कि त्यामुळे अल्कोहोल किंवा अल्डीहाईड डी हायड्रोजनेज विकराची पातळी वाढवते ते जर खरं असेल तर आपल्याला नशा येण्यासाठी जास्त दारू प्यावी लागेल. कारण प्यायलेली दारू यकृतात विघटन पटकन केली जाईल. त्यामुळे पुढच्या वेळेस फाजील अत्न्विश्वासाने आपण जास्त दारू प्याल आणी आपले हसे होईल. बाकी त्यांनी केलेले दावे आणी प्रत्यक्ष पुरावा यांचा मेळ बसताना दिसत नाही. असो Party Smart Ingredients: Party smart contains a smorgasbord of herbal (read: ineffective) ingredients that prevent the buildup of acetaldehyde in the liver—which is produced by the partial oxidation of ethanol and is the cause of hangovers. The Morning After: "Caution: PartySmart will not prevent intoxication and is not intended to treat or prevent the consequences of excessive alcohol consumption.” This is actually on the back of the Party Smart package. So, you really can't call them out for false advertising. Needless to say, second time was not a charm. There's nothing charming about emailing your work friends and telling them you're going to be penning articles from your bed as you're curled up in a fetal position. Conclusion: PartySmart forces you to be smart in the way that you party, because herbal remedies don't work.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
क
कैलासवासी सोन्याबापु Tue, 02/02/2016 - 16:50 नवीन
बापरे! हे असे असते तर!! मी कधीतरी खच्चुन पार्टी होणार असे दिसले की ही गोळी घेत असे , लिमिट कधी क्रॉस केली नाही किंवा तसा निग्रह असला तरी! अर्थात ओकायचे झालेच कधी तर शिस्तीत वॉशरूम ला जाऊन फ्रेश होऊन येत असे (असे जास्त वेळ झालेच नाही) कारण दारू मजा पुरती बरी धतिंग नको हा हिशेब असे पण २-३ वेळ प्यायलोय ओकेपर्यंत! :D अर्थात नोकरीत आल्यापासुन पिण्याला सुद्धा एक वेगळी डिसिप्लीन आली आहे! अन सुदैवाने पार्टी स्मार्टची गरज पडेल अश्या पार्टी आजकाल करायची इच्छा होत नाही अन पटत ही नाही! तरीही शास्त्रोक्त माहीती करीता अनेक धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 02/02/2016 - 15:45 नवीन
ओकारी हा शरीराची संरक्षक प्रितीक्षिप्त क्रिया( PROTECTIVE REFLEX) आहे. पोटात कोणतेही विषारी द्रव्य गेले तर शरीर ते बाहेर टाकण्यासाठी ओकारी करते. आपण जेंव्हा दारू प्रमाणापेक्षा जास्त पितो(दारूचे यकृतात विघटन होण्याच्या क्षमतेपेक्षा) तेंव्हा आपले शरीर "अति सर्वत्र वर्जयेत" या उक्ती प्रमाणे( अति मीठ किंवा साखर खाल्ली तरी शरीर उलटी करते) जास्त झालेली दारू बाहेर टाकण्याचा प्रयत्न करते. यासाठी उलटी होऊ नये म्हणून घेण्याची औषधे (पॅन डी मधील डी- DOMPERIDONE हा घटक ) घेतली तर काय होईल हा विचार करून पहा. राहिली गोष्ट ओमेझ (OMEPRAZOLE) किंवा पॅन भाग ( PANTOPRAZOL) हे जठरात दारूने दाह झाल्याने तयार होणारे आम्ल कमी करते. (पायावर किंवा हातावर झालेल्या जखमेवर दारू ओतून पहा कसे जळजळते ते) मुळात जठराचा दाह होण्य़ा इतकी दारू आपण प्यावीच का हा एक मूळ प्रश्न आहे? (कारण हा दाह जठराच्या कर्करोगाला आमंत्रण देतो तो भाग वेगळा) जठराचा दाह होतो किंवा उलटी येत आहे याचा अर्थच आपण प्रमाणापेक्षा जास्त दारू पीत आहात आणी आता आपल्या जठरात गरजेपेक्षा जास्त दारू "साठली" आहे. म्हणजेच काही काळाने हीच दारू आपल्या रक्तात शोषली जाऊन आपण टाईट होणार आहात.या वेळेस आपला ग्लास धरून ठेवला( (HOLDING YOUR DRINKS) तर आपली नशा कमी होणार नाही पण आपण टाईट पण होणार नाही. आपल्या जठराने दिलेले संकेत दुर्लक्ष करायचे कि नाही हे स्वतः ठरवणे आवश्यक आहे. शरीर संकेत देत आहे कि जास्त झाली आहे आणी मित्र आग्रह करीत आहेत. यात आपण अजून दारू पिता याचा अर्थ आपल्या मेंदू आणी विचारशक्तीवरील ताबा दुसर्याकडे गेलेला आहे. याचा सरळ अर्थ असा आहे कि दारूचे दुष्परिणाम होण्यासाठी औषधे घेण्यापेक्षा आपली दारू कमी करणे आवश्यक आहे. मग आपण टाईट होई पर्यंत दारू प्यायची आहे का मजेसाठी हा मूळ प्रश्न उभा राहतो. ज्या वेळेस आपल्याला ओकारी होत आहे किंवा जठराचा दाह होत आहे त्या वेळेस आपण आपला ग्लास नुसता हातात धरायला( प्यायला नव्हे) शिकायला पाहिजे. हे होत नसेल तर उगाच माझा स्वतः वर पूर्ण ताबा असतो या वल्गना करू नयेत. राहिली गोष्ट दारू ज्याने त्याने आपल्या पैशाने लायकी आणी मगदुराप्रमाणे प्यावी. या धाग्याच्या सुरुवातीला दिलेल्या दुव्यात अगोदरच्या धाग्यात केलेला उहापोह आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
संदीप डांगे Tue, 02/02/2016 - 16:04 नवीन
पूर्ण प्रतिसादाशी संपूर्ण सहमत. __/\__ ओकारी वाईट नाही. चांगलीच असते शरीरासाठी. पिण्याचं प्रमाण कळू न शकणार्‍याला लोक हसतात, पिणार्‍याला वाटतं ओकारीला हसतात. बिचारी ओकारी बदनाम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
च
चिगो Fri, 02/05/2016 - 09:29 नवीन
ओकण्याइतपत पिऊ नये, हा शहाणपणा.. पण मुद्दाम 'मद्यधुंद' होईपर्यंत प्यायलातच (मी एक-दोनदा असं ठरवून टल्ली होईपर्यंत प्यायलो होतओ.. स्वतःला तपासून बघायची खाज आहे मला.. ), तर गपगुमान ओकून टाकावं.. शरीराचं प्रोटेक्शन मेकॅनिझ्म आहे ते.. अवांतर : मी तरी कधी बेक्कार अ‍ॅसिडीटी झाली तर 'वमन पद्धती'चाच वापर करतो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाव आडनाव Tue, 02/02/2016 - 10:59 नवीन
दारू एक जहाल विष आहे, . दारू एक जहाल विष आहे, . . . चला आपण सगळे घोट-घोट पिऊन ते संपवून टाकू एकदाचं :)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 02/02/2016 - 17:42 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव
म
मम्बाजी सर्वज्ञ Tue, 02/02/2016 - 18:06 नवीन
https://www.youtube.com/watch?v=lT67w4_Uqz4 आत्ता बोला.................
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 02/04/2016 - 03:59 नवीन
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 02/04/2016 - 04:00 नवीन
  • Log in or register to post comments
स
साती गुरुवार, 02/04/2016 - 04:02 नवीन
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 02/04/2016 - 06:27 नवीन
कोणता ज्योक. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती
ह
हेमंत लाटकर गुरुवार, 02/04/2016 - 18:17 नवीन
प्रमाण कितीही घेतले तरी शरीराला अपायकारकच. कमी घेतली तर ६० जास्रत घेतली तर ४० ला राम नाम सत्य.
  • Log in or register to post comments
ह
हेमन्त वाघे Fri, 02/05/2016 - 03:22 नवीन
http://content.time.com/time/magazine/article/0,9171,2017200,00.html http://www.cracked.com/article_20142_5-seemingly-harmful-things-that-make-you-live-longer.html हेला आपली बुद्धिमत्ता आपल्या नावाप्रमाणेच आहे का? हे बेवडे इतके कसे जगले ? १ फ्रांक सिनात्रा - ८३ वर्षे २ चर्चिल ८९ varshe ३ राजेश खांना - ७० वर्षे ४ खुशवंत सिंघ ९९ वर्षे ५ दिन मार्टिन ७८ वर्षे ६ Ulysses S. Grant ६३ वर्षे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा