मुरुड चौपाटीवर नक्की काय घडले??
मुरुड येथे आलेल्या महाविद्यालयीन सहलीतील अकरा विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी सर्वांना धक्का देऊन गेली असेल. मी महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असल्यामुळे जे इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आले व आंतरजालावर प्रसिद्ध झाले, तेवढे कळले (मराठी वृत्तवाहिन्या दिसत नाहीत).
ही शोकांतिका कशी घडली, हे समजले नाही. मुले मोठ्या संख्येने होती. तशी जाणत्या वयाची होती. शिक्षक सोबत होते. दिवसाची वेळ होती. किनाराही आडवाटेचा नसून प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा होता. पावसाळा नव्हता आणि समुद्र खवळलेला नव्हता (नसावा).
असे असूनही हे का झाले? कुणाची हलगर्जी याला कारणीभूत होती का?
आवाज नीचे करो; नही तो फेक दूंगा
पी. ए. इनामदारांच्या जिभेचा लगाम सुटला पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) – ‘मुरुड’ दुर्घटनेत मरण पावलेल्या मुलांच्या पालकांशी बोलताना संस्थेचे प्रमुख पी. ए. इनामदार यांच्या जिभेचा लगाम सुटला. पालकांबरोबर सुरू असलेल्या बैठकीत इनामदार यांनी ‘आवाज नीची करके बात करो, नीचे फेक दूंगा’ अशा शब्दांत चक्क धमक्या दिल्या. एकाला तर त्यांनी बैठकीतून हाकलूनही दिले. मुलांच्या मुत्यूच्या दु:खातून अद्याप कोणी सावरलेही नाही. तोवर संस्थेकडूनही अशी अपमानास्पद वागणूक मिळाली. परिणामी बैठकीतून बाहेर येत काहीजणांनी शिवीगाळ सुरू केली. त्यामुळे त्यांना पोलिसांकरवी संस्थेच्या आवारातून हाकलून देण्यात आले. मुरुडमधील दुर्घटनेत मरण पावलेल्या १४ मुलांसाठी आझम कॅम्पस येथे आज श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेनंतर ााही पालकांनी काल त्यांना आलेल्या अनुभवाविषयी तक्रारी केल्या. मुलांचे मृतदेह आणताना महाविद्यालय प्रशासनाने हलगर्जी केली. माहिती व्यवस्थीत दिली जात नव्हती. अशा तक्रारी करत संतप्त पालकांनी निषेध व्यक्त करून घोषणाबाजी केली. वेळेचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेच्या पदाधिकार्यांनी पालकांना चर्चेसाठी बोलावले. मात्र, या चर्चेत पालकांची व्यथा ऐकून घेण्याऐवजी त्यांना इमारतीवरून फेकून देण्याची भाषा खुद्द संस्थाप्रमुखांनीच वापरली. इतकेच नाही, तर त्यांना बैठकीतून पालकांनाच हाकलून देण्यात आले. मृतदेह आणताना मुरुड येथे महाविद्यालयाचा प्रतिनिधी का नव्हता? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर पी. ए. इनामदार यांनी संस्थेच्या प्राध्यापकांची एक टीम तेथे होती, असे स्पष्ट केले. रुग्णवाहिका धुण्यासाठी आम्हालाच पाचशे रुपये द्यावे लागले, अशी तक्रार एका पालकाने केली. यावर बोलताना इनामदार यांनी ‘त्यांना चप्पलने मारायचे होते, पैसे कशासाठी दिले’? असा सवाल केला. इनामदार यांचा वाढलेला आवाज पाहून एक मुलाचे पालक म्हणाले, आपण चर्चा करीत आहोत, वाद नाही, त्यामुळे शांतपणे बोलू. मात्र, इनामदार आणि संस्थेच्या इतर पदाधिकार्यांनी ‘आवाज खाली करून बोलायचे कोणाला सांगता?’, ‘बाहेर फेकून देईन’ अशी धमकी देत त्यांना बैठकीतूनच हाकलून दिले. सामने आया तो चप्पलसे मारूंगी…! बैठकीतून हाकलल्यानंतर संतप्त पालकांनी पी. ए. इनामदार आणि महाविद्यालय प्रशासनाविरोधात शिवीगाळ केली. ‘मेरे सामने आया तो चप्पल से मारूंगी’, अशा शब्दांत एका महिलेने संस्थेच्या पदाधिकार्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. पैसा कमविण्यासाठी संस्था चालवितो. मुस्लिम असून याचा उपयोग नाही, असला कसला मुस्लिम? असे एकेरीवर येत आरोप करून काहीजणांनी इनामदार यांच्या धर्माचाही उल्लेख केला. श्रद्धांजली आटोपताच जेवणावर ताव आझम कॅम्पस येथे झालेल्या श्रद्धांजली सभेनंतर महाविद्यालय परिसरातून पालक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी गेल्यावर संस्थेच्या आवारातच पदाधिकार्यांनी जेवणावर ताव मारला. मुरूड येथील दुर्घटनेवर संपुर्ण राज्य हळहळ व्यक्त करीत आहे. त्या मुलांचे कुटूंबिय अजुनही शोकसागरातून बाहेर आले नाहीत. असे असताना दुसरीकडे संस्थेचे पदाधिकारी संस्थेच्या आवारातच जेवायला बसले