Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

मुरुड चौपाटीवर नक्की काय घडले??

च
चलत मुसाफिर
Tue, 02/02/2016 - 17:40
🗣 69 प्रतिसाद
मुरुड येथे आलेल्या महाविद्यालयीन सहलीतील अकरा विद्यार्थ्यांचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक बातमी सर्वांना धक्का देऊन गेली असेल. मी महाराष्ट्राबाहेर वास्तव्यास असल्यामुळे जे इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आले व आंतरजालावर प्रसिद्ध झाले, तेवढे कळले (मराठी वृत्तवाहिन्या दिसत नाहीत). ही शोकांतिका कशी घडली, हे समजले नाही. मुले मोठ्या संख्येने होती. तशी जाणत्या वयाची होती. शिक्षक सोबत होते. दिवसाची वेळ होती. किनाराही आडवाटेचा नसून प्रसिद्ध पर्यटनस्थळाचा होता. पावसाळा नव्हता आणि समुद्र खवळलेला नव्हता (नसावा). असे असूनही हे का झाले? कुणाची हलगर्जी याला कारणीभूत होती का?
वर्गीकरण
मुरुड
विद्यार्थी
पर्यटन
सहल
सुरक्षितता

प्रतिक्रिया द्या
13368 वाचन

💬 प्रतिसाद (69)
S
sagarpdy गुरुवार, 02/04/2016 - 14:11 नवीन
अगदी अगदी. स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्याबाबत प्रचंड उदासीनता आहे. बहुतांश कंपन्यांमध्ये हेल्मेट सक्ती आहे, त्याशिवाय गाडी गेट च्या आत येऊ देत नाहीत. परिणाम - डाव्या हातात हेल्मेट अडकवून गाडी कंपनीपर्यंत आणायची, हेल्मेट घालायचं आणि मग जायचं गेट मध्ये. शो जातो म्हणून गाडीचे साईड मिरर काढून ठेवायचे, राँग साईड ने गाडी चालवायची (तीही हेडलाईट बंद करून) इ. आहेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
V
viraj thale गुरुवार, 02/04/2016 - 09:05 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अनुप७१८१ गुरुवार, 02/04/2016 - 10:28 नवीन
मस्ती- एक जण जातो म्हणुन दुसरा .दुसरा जातो म्हणुन तिसरा.... बकि काहि नहि वाळू- अक्सा बिच वर पण हाच प्रकार आहे...तिथली वाळू फर्म नाही ...रोज वेगळॅ खड्डे होतात....त्यचा अन्दाज नहि आल तर असे होते
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या गुरुवार, 02/04/2016 - 14:36 नवीन
एकदम डझनभरापेक्षा जास्त मुले बुडून मेली हे आश्चर्यकारक वाटते. एखादी प्रचंड लाट येऊन त्यामुळे घडले की काय? चौकशीनंतर काय ते कळेलच. पण अकाली आपल्या मुलांना मूठमाती देण्याची वेळ आलेल्या पालकांवर मात्र आभाळ कोसळले असणार. असे पुन्हा न घडो. भारतात नियम पाळणे हे बहुतांशी बुळेपणाचे, बावळटपणाचे लक्षण मानले जाते. ते धुडकावून वागणे हे शौर्याचे, पराक्रमाचे लक्षण समजले जाते. विशेषतः तरूण मुलांचा असा समज असतो की आपण नियम मोडून काही बहादूरी करुन दाखवली की मुलींना आपले फार कौतुक वाटेल! नियम हे पुढच्यास ठेस मागचे शहाणे ह्या तत्त्वावर बनवलेले असतात. पण काही लोकांना ठेच लागली तरच शहाणपण शिकण्याचा ध्यास असतो आणि काही वेळा ही ठेच जीवघेणी ठरते.
  • Log in or register to post comments
च
चैतन्य ईन्या गुरुवार, 02/04/2016 - 15:32 नवीन
मुळात नियम हे तोडण्यासाठीच असतात आणि आजूबाजूला विशेषतः आपलेच आई वडील बिनदिक्कत नियम तोडताना दिसतात. मग मुले काय वेगळे करणार? ज्या पद्धतीने पुण्यात काय आणि बाकीच्या ठिकाणी गाड्या लोक चालवितात ते पाहिल्यावर सतत कोण मरणार का हाच विचार येतो. कोणालाच नियम पाळायचे नाहीये फक्त असे काही झाले कि म्हणायचे आणि खरे साहेब म्हणतात तसे and they happily lived ever after
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
क
कपिलमुनी गुरुवार, 02/04/2016 - 15:00 नवीन
आचरा बीच वर सहकुटूंब गेलो असता आणि गुडघ्याएवढ्या पाण्यात उभे होतो वय १०-५० असा २०-२२ लोकांचा ग्रुप होता . आणी अचानक खालचा वाळूचा मोठा थर परतीच्या लाटेसोबत वाहून गेला आणि आम्ही गुडध्याभर पाण्यातून छातीभर पाण्यात क्षणार्धात आलो. सुदैवाने सगळेजण जवळ जवळ उभे होते . लहान मुलांना मधे घेउन एकमेकांचे हात धरून गोल रिंगण करून बाहेर आलो. सर्वांना पोहता येत होते आणी गुडघ्याभर पाण्यात होतो हेच नशीब , अशा वेळेस अगोदरच छाती/ गळ्यापर्यंतचा माणूस नक्की बुडेल. समुद्राचा तळ फसवा आणि सतत बदलणारा असतो याचे भान ठेवावे.
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 02/05/2016 - 04:41 नवीन
असे होते????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मयुरेश फडके Fri, 02/05/2016 - 14:07 नवीन
बापरे. असही होउ शकत ? बाकी ह्या पंचमहाभूतांसमोर आपला आगाऊपणा करू नये हेच खर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/04/2016 - 17:47 नवीन
मृतांना श्रद्धांजली...
  • Log in or register to post comments
P
palambar गुरुवार, 02/04/2016 - 19:00 नवीन
शंभर जणांचा ग्रुप होता , कसा कंट्रोल होणार? पण सर्व ठपका आता सरांवर येणार. असो, मृतांना श्रद्धांजलि.
  • Log in or register to post comments
ह
हेमंत लाटकर Fri, 02/05/2016 - 05:13 नवीन
असे अपघात फाजिल आत्मविश्वास, अति साहसामुळे होतात.
  • Log in or register to post comments
स
स्पा Fri, 02/05/2016 - 05:24 नवीन
अतिशय दुर्देवी घटना शाळेत पोहणे सक्तीचे करायला हवे असे वाटते.म्हणजे जरी असा प्रसंग ओढवलाच तर काही प्रयत्न तरी करता येइल
  • Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक Fri, 02/05/2016 - 08:14 नवीन
माझे माहेर मुरुड आहे. अनेक वर्ष आम्ही समुद्रात पोहण्यासाठी जातो, पण आम्हाला कधीही कुठला धोका वाटला नाही. तवसाळकर लॉजच्या मागे समुद्रात घळ आहे आणि राजवाड्याच्या खालील भागात खडक आहेत. ह्या दोन जागा वगळून संपूर्ण समुद्र किनारा सुरक्षित आहे. त्यापैकी तवसाळकर लॉजच्या मागे अतिशय घाण आहे व राजवाडा खूप लांब आहे. त्यामुळे स्थानिक लोक तिथे अजिबात जात नाहीत. ८०% बाहेरील पर्यटक दारू पिवून समुद्रावर येतात. ते कुणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसतात. उलट त्यांचाच लोकांना त्रास होतो. अनेक जण छातीपर्यंत किंवा पोटापर्यंत आत जातात. स्थानिक लोक सावधान करतात पण कुणी ऐकत नाही. बोर्ड लावले जातात पण ते पावसाने, खाऱ्या हवेने सतत खराब होतात. लोक गाड्या ठोकून ते मोडतात. त्यावर कपडे वाळत घालतात. आणि खर सांगा हो असे बोर्ड वाचले जातात का ? खाली लिंक देत आहे. त्यातील या दुर्घटनेची सर्व कारणे बरोबर आहेत. http://www.lokmat.com/storypage.php?catid=1&newsid=11378226
  • Log in or register to post comments
प
पूर्वाविवेक Fri, 02/05/2016 - 08:58 नवीन
दुपारी २.३० वाजता जेवल्यावर लगेच हि मुले तवसाळकर लॉजच्या मागे पोहत गेली होती असे कळले. बहुधा काही मुले व शिक्षक अजून जेवत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
क
कविता१९७८ Fri, 02/05/2016 - 09:48 नवीन
म्हणजे मुले धोक्याच्या ठीकाणी गेली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
ब
ब़जरबट्टू Fri, 02/05/2016 - 09:09 नवीन
मुद्दे पटले.. पण एका दमात १४ पोर वाहून गेली यामागे फक्त मस्ती कारण असेल वाटत नाही.. नक्कीच घळ प्रकारात सापडली असावी बिचारी. त्यातही पोरी जास्त आहेत, त्यामुळे त्या एवढा पोरांवर "फ्ल्याश" मारायला डेअरिंग करत असतील असे वाटत नाही.. असो.. सरकारने अहवाल मागवला आहेच. बघूया...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पूर्वाविवेक
स
सर्वसाक्षी Fri, 02/05/2016 - 10:09 नवीन
सुशिक्षित लोक इ एल सी बी वारंवार ट्रीप होतो म्हणुन इलेक्ट्रिशियनला तो बायपास करायला सांगतात, फ्युज उडु नये म्हणुन त्यात तांब्याची जाड तार घालायला सांगतात.
  • Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम … Fri, 02/05/2016 - 16:11 नवीन
झाला प्रकार खूपच वाईट झाला. मला काळजी वाटते कि उर्वरीत विद्यार्थी जे पाण्यात न उतरल्याने वाचले जर त्यांच्या मनस्थितीविषयी विचार करूया कवळ्या वयात आपल्या मित्र मैत्रिणींचा असा दुर्दैवी मृत्यू पाहून पार भेदरून गेली असतील. ह्या प्रसंगाचा ओरखडा त्यांचा मनावर संपूर्ण आयुष्य राहणार ,ह्या मुलांना मानसोपचार मिळाले पाहिजे. बाकी शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे वर्तन अयोग्य होते. भले पालकांनी त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली तरी त्यांची तत्कालीन मनस्थिती पाहता त्या कडे दुर्लक्ष करत संस्थेच्या पदाधिकार्यांनी संयम बाळगायला पाहिजे होता.
  • Log in or register to post comments
अ
अकिलिज Wed, 02/10/2016 - 22:15 नवीन
मुरूडला हेच झाले नसावे. पण समुद्राची विशिष्ठ ठिकाणची परिस्थीती अशी असू शकते हे दाखवतो. https://www.facebook.com/realkraze/videos/726345530835440/?fref=nf
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा