Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदस्यांतर्गत भेदभाव आणि धोरण

व
विवेक ठाकूर
Sat, 02/06/2016 - 09:47
🗣 97 प्रतिसाद
या धाग्यात दोन व्यवसाय: मान अपमान बॅटमॅन नामक सदस्याचा हा प्रतिसाद आहे : विठाकाका, नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली? या प्रतिसादाविषयी सं.मं.कडे तक्रार करुन योग्य मार्गानं निवाडा होईल अशी रास्त अपेक्षा होती पण अजूनही प्रतिसाद कायम आहे. तर प्रश्न असा पडतो की एखादा प्रतिसाद व्यक्तिगत आणि शिष्टाचाराचे नियम सोडून बेतालपणे दिला आहे किंवा कसे, याचा काय निकष आहे. इथे `व्यक्तिगत प्रतिसाद' या कारणाखाली आयडी बॅन होतात मग वरचा प्रतिसाद कशा प्रकारात मोडतो? आणि मग व्यक्तिगत प्रतिसाद देणार्‍यांना तंबी दिली जाते तर ज्यांच्या बाबतीत असे प्रतिसाद दिले जातात त्यांना उत्तर देण्याची किंवा काय निवाडा झाला ते सांगण्याची, शासकांची किमान जवाबदारी नाही काय? आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला, शासक काहीच करत नाहीत म्हटयावर, त्याच पातळीवर येऊन पुरतं वाजवलं, तर तो उत्तर देणार्‍याचा फाऊल का धरला जाईल का किंवा का धरला जातो?

प्रतिक्रिया द्या
11058 वाचन

💬 प्रतिसाद (97)
त
तर्राट जोकर Sat, 02/06/2016 - 09:50 नवीन
धागा धागा अखंड विणुया. पॉर्न सर्वेचा धागा अखंड विणला जाणार आहे असे दिसते. जय बोलो राम!
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 09:57 नवीन
विठाकाका, उपरोल्लिखित प्रतिसादाचा दुवा द्या ना. त्या महाधाग्यात हा तीन ओळींचा प्रतिसाद कुठे शोधणार.
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 10:11 नवीन
त्यामुळे प्रतिसाद आहे तसा पेस्ट केलायं. हा धागा तरी राहातो की नाही कल्पना नाही. पण मग डांग्याच्या, साध्या `प्रतिसाद संपादनावर' धोरणात्मक चर्चा आणि इथे उघड व्यक्तिगत प्रतिसाद असतांना धागा उडवणं म्हणजे पुन्हा सदस्यांतर्गत भेदभाव होईल असं वाटतं .
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 10:27 नवीन
तो धागा वाचनमात्र झाल्यानं लिंक देता येत नाही...
असं नाही. वाचनमात्र धाग्यावरील प्रतिसादाची लिन्क देता येते. मी तो प्रतिसाद शोधला आणी सापडला. ही त्या प्रतिसादाची लिन्क. मला तुमचा हा धागा वाचून वेगळाच प्रश्न पडला आहे. श्री. यनावाला यांच्या धाग्यावर "अस्तित्वाविषयी" लोकांना समजवणारे विवेक ठाकूर नक्की आपणच आहात का? ज्याला "अस्तित्व" कळले तो एका संकेतस्थळावरील तथाकथित आभासी अपमान सहन न होऊन चक्क व्यवस्थेकडे दाद मागत आहे हे बाब आश्चर्यकारक आहे. असो. "अस्तित्व" कळलेली दहा वर्षांची मुक्ता ज्ञानदेवांना काय म्हणते बघा: -- १ -- संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥ तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥ थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥ रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥ ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- २ -- योगी पावन मनाचा । साही अपराध जनाचा ॥ विश्व रागें झाले वन्ही । संती सुखें व्हावें पाणी ॥ शब्द शस्त्रें झालें क्लेश । संती मानावा उपदेश ॥ विश्व पट ब्रह्म दोरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ३ -- सुखसागरी वास झाला | उंच नीच काय त्याला ॥ अहो आपण जैंसे व्हावें | देवें तैसेंचि करावें ॥ ऐसा नटनाटय खेळ | स्थिर नाही एकवेळ ॥ एकापासुनी अनेक झाले | त्यासी पाहिजे सांभाळिले ॥ शून्य साक्षित्वें समजावें | वेद ओंकाराच्या नावें ॥ एकें उंचपण केले | एक अभिमानें गेलें ॥ इतकें टाकुनी शांती धरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ४ -- वरी भगवा झाला नामें | अंतरीं वश्य केला कामें ॥ त्याला म्हणूं नये साधू | जगीं विटंबना बाधू ॥ आपआपणा शोधून घ्यावें | विवेक नांदे त्याच्या सवें ॥ आशा दंभ अवघें आवरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ५ -- संत तेचि जाणा जगीं । दया क्षमा ज्यांचे अंगी ॥ लोभ अहंता न ये मना । जगी विरक्त तोची जाणा ॥ इह परलोकीं सुखी । शुद्ध ज्ञान ज्यांचे मुखीं ॥ मिथ्या कल्पना मागें सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ६ -- एक आपण साधू झाले । येर कोण वाया गेले? ॥ उठे विकार ब्रह्मी मूळ । अवघे मायेचें गबाळ ॥ माय समूळ नुरे जेव्हां । विश्व ब्रह्म होइल तेव्हां ॥ ऐसा उमज आदिअंतीं । मग सुखी व्हावे संती ॥ चिंता क्रोध मागे सारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ७ -- ब्रह्म जैसें तैशा परी । आम्हा वडील भूतें सारी ॥ अहो क्रोधें यावें कोठे । अवघे आपण निघोटे ॥ जीभ दातांनी चाविली । कोणें बत्तीशी तोडीली? ॥ मन मारुनी उन्मन करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ८ -- सुखसागर आपण व्हावें । जग बोधें निववावें ॥ बोधा करुं नये अंतर । साधू नाहिं आपपर ॥ जीव जीवासी पैं दयावा । मग करुं नये हेवा ॥ तरणोपाय चित्तीं धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ९ -- सांडी कल्पना उपाधी । तीच साधूला समाधी ॥ वाद घालावा कवणाला । अवघा द्वैताचा हो घाला ॥ पुढे उमजेना काय । उडत्याचे खाली पाय ॥ एक मन चेष्टा करी । भूतें बापुंडी शेजारी ॥ अवघी ईश्वराची करणी । काय तेथें केलें कोणीं ॥ पुन्हा शुद्ध मार्ग धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १० -- गिरीगव्हारे कशासाठीं । रागें पुरवीली पाठी ॥ ऐसा नसावा संन्यासी । परमार्थाचा जो कां द्वेषी ॥ घर बांधिलें डोंगरीं । विषया हिंडे दारोदारीं ॥ काय केला योगधर्म । नाही अंतरी निष्काम ॥ गंगाजळ ह्रदय करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- ११ -- अहो क्रोधे यावें कोठें । अवघे आपण निघोटे ॥ ऐसें कळलें उत्तम । जन तेची जनार्दन ॥ ब्रीद बांधिलें चरणीं । नये दावितां करणीं ॥ वेळे क्रोधाचा उगवला । अवघा योग फोल झाला ॥ ऐशी थोर दृष्टी धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥ -- १२ -- अवघी साधन हातवटी । मोलें मिळत नाही हाटीं ॥ शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥ कोणी कोणास शिकवावें । सार साधुनिया घ्यावें ॥ लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायीं ॥ तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 10:54 नवीन
आणि माझ्या वरील विधानाचा तुम्ही दिलेल्या दाखल्यांशी काहीएक संबंध नाही. ही धोरण विषयक चवकशी आहे.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 10:56 नवीन
:)
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
क
कपिलमुनी Sat, 02/06/2016 - 10:22 नवीन
धागा अल्पायुषी ठरणार नाही अशी आशा करतो. आणि पॉपकॉर्न घेउन बसतो
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 10:26 नवीन
हा एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तुम्ही किंवा इतर कोणीही प्रतिसादात उल्लेख केलेल्या मादक द्रव्यांचं सेवन करता असा कोणताही आरोप किंवा विधान त्यांनी केलेलं नाही. त्यामुळे यात तुम्ही उगाचच हे स्वतःला लावून घेतलेलं आहे. अर्थात तो तुमचा हक्क आहे. या प्रतिसादात (वाल्गुदस्वामींच्या) आक्षेपार्ह मला तरी काही वाटलं नाही. संंमंलाही वाटलं नसावं.
त
तर्राट जोकर Sat, 02/06/2016 - 10:34 नवीन
येस्स... त्यापेक्षा जास्त गंभीर प्रतिसाद त्यांनी वाचलेला दिसत नाही.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 11:05 नवीन
तुम्ही काय पद्धतीनं विचार करता असा प्रश्न पडतो. नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो. उगीच वृथा समर्थनात काय हाशिल आहे ?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 11:28 नवीन
नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो.
हे तुमचं मत आहे आणि ते तसं असण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. पण संपादक मंडळाचं मत तुमच्याप्रमाणेच असावं असं जरुरी नाही ना? त्यांना वेगळं मत असण्याचा अधिकार आहे, जो त्यांनी कारवाई न करुन बजावलेला आहे. झालंच तर सदस्यांतर्गत भेदभाव हे लेखाचं शीर्षक आहे त्यानुसार बॅटमॅन यांना संपादक मंडळाने झुकतं माप दिलं आहे असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे कारण इतके दिवस बॅटमॅन यांचा आयडी माझ्या माहितीप्रमाणे बॅन होता. आत्ताच तो परत सक्रीय केलेला आहे. त्यामुळे पक्षपाताचा आरोप हा (जर तुम्ही करत असलात तर) चुकीचा आहे.
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
महासंग्राम Sat, 02/06/2016 - 11:31 नवीन
अगदी हेच्च म्हणतो कि ओ मी --- गोथम गावचा पाटील
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 11:42 नवीन
अर्थात, पण प्रतिसाद केंव्हा व्यक्तिगत होतो आणि केंव्हा नाही याचं निश्चिती करण व्ह्यायला हवं. अशा प्रतिसादाला जर मी तिथल्या तिथे वाजवलं तर `संकेतस्थळाचं वातावरण बिघडतं' असा आरोप झाला असता. थोडक्यात, एका साध्या संपादनाला, जर शासक धाग्यावर येऊन स्पष्टीकरण देतात, तर एखादी तक्रार आल्यावर, त्या सदस्याला किमान, प्रतिसाद धोरणात आहे असं, नियमाचा निर्देश करुन सांगता यायला हवं. म्हणजे दुसर्‍यालाही बरोबर त्याच नियमात राहून वाजवता येईल.
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 11:39 नवीन
आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला
हे आपल्याला विसंगत नाही वाटत? जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे प्रतिसाद इतका भिकार आहे तर त्याच्यावर एक धागा काढून त्याला जरूरीपेक्षा जास्त महत्व का देताय? जर तुम्हाला विचलित करणे हा प्रतिसादकर्त्याचा हेतू असेल, तर I am sorry to say, but you have just played into his hands!
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 11:43 नवीन
जर तुम्हाला विचलित करणे हा प्रतिसादकर्त्याचा हेतू असेल, तर I am sorry to say, but you have just played into his hands!
=))
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 11:46 नवीन
म्हणजे तो प्रतिसाद थोर आहे का? आणि ज्यामुळे आयडी बॅन होतो ते`व्यक्तिगत म्हणजे नक्की काय'? याविषयी सद्स्यांना नक्की कल्पना नको का?
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 12:12 नवीन
याबद्दल मी काही म्हणतच नाहीये. ज्यामुळे आयडी बॅन होतो ते व्यक्तिगत म्हणजे बहुधा चारित्र्यावर टीका किंवा अश्लाघ्य शब्द वापरणं असावं. समजा बॅटमॅनच्या प्रतिसादाचा अर्थ तुम्ही मद्यपान करता असा जरी होत असला तरी ते (मद्यपान) पाप आहे का? एखाद्याच्या चारित्र्यावर तो मद्यपान करतो किंवा for that matter कुठल्याही मादक द्रव्याचं सेवन करतो या आणि फक्त या गोष्टीने शिंतोडे उडतात का?
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 12:14 नवीन
असे वाचावे.
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
क
कवितानागेश Sun, 02/07/2016 - 07:48 नवीन
याचा अर्थ `मद्यप्राशनाशिवाय असं लिहीता येत नाही' असा होतो.-------म्हणजे तुमच्या प्रगाढ ज्ञानाचे श्रेय मद्याला दिल्याने तुम्ही त्रासले आहात का? मग तिथेच स्पष्टसांगा कि तुम्हाला तुमचे ज्ञान व्यक्त करण्यासाठी मद्याची गरज नसते तुम्ही नेहमीच लाईट मूडमध्ये असता.... वगरे वगरे.... नवीन धागा काढूनभांडत कशाला बसता?
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सुबोध खरे Sat, 02/06/2016 - 10:39 नवीन
ठाकूर साहेब तुमच्या भन्नाट कल्पना विलासामुळे त्यांनी असा प्रश्न विचारला आहे.तो व्यक्तीगत घ्यावा असे मला तरी वाटत नाही, बाकी आपली मर्जी
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 10:55 नवीन
एखाद्याच्या मताविषयी, शिष्टाचाराला धरुन दुमत व्यक्त करणं आणि त्यावर ` नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे?`असं विचारणं यात फरक नाही का?
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
मारवा Sat, 02/06/2016 - 10:49 नवीन
विवेक जी तुम्ही परवानगी देत असाल तर या धाग्याविषयी जो आक्षेप मला वाटतो तो नोंद्वु का ? म्हणजे प्रतिकुल मत आहे ते मी मांडण्यास तुमची परवानगी आहे का ?
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 10:58 नवीन
प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे, फक्त ते शिष्टाचाराला धरुन आहे का ? इतकाच प्रश्न आहे.
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Sat, 02/06/2016 - 12:28 नवीन
माझा प्रतिसाद शिष्टाचाराला धरुनच असेल. वरील परवानगी मागितली तो प्रतिसाद आपल्य मते अशिष्ट तर नाही ना ?
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 02/06/2016 - 11:02 नवीन
घेणार्याला मात्र अभिमान वाटतो अशावेळी...कोणी तरी क्याप्यासिटीची चौकशी केली म्हणून.... एक नोंद !!
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 11:04 नवीन
चला बसूया मग. एकमेकांचा अपमान न करता "अस्तित्वाची" चर्चा करू. :)
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 02/06/2016 - 11:10 नवीन
जे नाही त्यावर बोलूया......
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 11:15 नवीन
जरा चुकीचे जरा बरोबर फेकू काही चला दोस्तहो नाही त्यावर बोलू काही
↩ प्रतिसाद: माम्लेदारचा पन्खा
म
माम्लेदारचा पन्खा Sat, 02/06/2016 - 11:19 नवीन
हवापाणी काय म्हणतंय तिकडचं....इथं हवाही धड नाही आणी पाणीही....
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
म
महासंग्राम Sat, 02/06/2016 - 11:09 नवीन
एकुणात विषय पाहून धाग्याची १०० भरणार हे निश्चित. एक चीज पोपकोर्ण आणा रे.
अ
अद्द्या Sat, 02/06/2016 - 11:49 नवीन
आणि या प्रकारे . बॅटमॅन ने आल्या आल्या सिक्सर मारून कोणाला तरी दुखवलेलं आहे. तरी त्यांचे एक टकीला शॉट देऊन स्वागत करावे अशी जेपी भाऊंकडे ईनंती करतो. स्वगत: आजकाल कोणीही कुठेही कशानेही दुखावलं जातंय =]]
म
मोदक Sat, 02/06/2016 - 11:54 नवीन
असहिष्णुता वाढली आहे हो.
↩ प्रतिसाद: अद्द्या
म
मोदक Sat, 02/06/2016 - 11:55 नवीन
स्मायली विसरली :) ;) :D :P
↩ प्रतिसाद: मोदक
अ
अद्द्या Sat, 02/06/2016 - 12:02 नवीन
मोदींचा राजीनामा मागायला विसरलात राव.
↩ प्रतिसाद: मोदक
क
कपिलमुनी Sat, 02/06/2016 - 12:08 नवीन
सनी लिओन आणि केजरीवाल यांच्याबद्दल काही विधाने झाली. संदीप डांगेंचा प्रतिसाद संपादीत करण्यात आला . पण सर्व गोष्टी स्पष्ट मांडूनही श्रीगुरुजींचे प्रतिसाद संपादीत केले गेले नाहीत यावरुन मला तरी स्पष्ट कळले आहे , हो , मिपावर सदस्यांतर्गत भेदभाव केला जातो. अर्थात हे संपूर्ण खासगी संस्थळ आहे त्यामुळे पटल तर रहायचा नाहीतर चपला घालायच्या आणि निघायचा हा ऑप्शन आहे.
अ
अभ्या.. Sat, 02/06/2016 - 12:28 नवीन
कम्मुला १०० वेळा सहमत. इथे भेदभाव तर केला जातोच शिवाय त्या भेदभावाला धोरणे, तत्वे अन नियमांचा सालस मुलामा ही दिला जातो. त्या मुलाम्याची जमेल तितक्या हिरीरीने जाहिरात केली जाते. खाजगी संस्थळ आहे हे माहित झाल्याने बूट घातलेलेच आहेत, लेस बांधली की निघायचे. ;)
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
त
तुषार काळभोर Sat, 02/06/2016 - 12:49 नवीन
अभ्या..च्या शेवटच्या वाक्यात असं अ‍ॅडवतो: खाजगी संस्थळ आहे हे माहित झाल्याने बूट घातलेलेच आहेत, लेस बांधली की निघायचे. ;) नाहीतर लाथ बसली की पळायचे.
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाव आडनाव Sat, 02/06/2016 - 14:44 नवीन
अभिजीतला १०० वेळा +. सालस पणा जरा जास्तंच होत चाललाय ...
↩ प्रतिसाद: अभ्या..
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:18 नवीन
बूट घातलेलेच आहेत. लेस बांधली की निघायचेच!
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 02/06/2016 - 15:58 नवीन
आपण ऑलवेज बटूशास्त्रीला १०० परसेंट सहमत असतो. म्हण्जे कसय ते की बॅट्याला सहमत नाही व्हायचे म्हणजे काय... पण. पण. मला संजयजींचे लिखाण पण खूप खूप आवडते. विवेक ठाकूरांत पण ती प्रतिभा आहे पण त्यांना संजयजीसारखे फॅन फॉलोविंग मिळणे जरा मुश्कील आहे. त्यांना चांगल्या निर्भेळ प्रोत्साहनाची गरज आहे. पाठिंब्याची आवश्यकता आहे. त्यांनी अशा वादात न पडता आपले लिखाण कंटीन्यु करावे ही नम्र इनंती.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 18:25 नवीन
अभ्याशी आपणही बाडीस असतो. विवेक ठाकूर नीड्स टु अप हिज़ गेम.
↩ प्रतिसाद: अभ्या..
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 18:26 नवीन
विवेक ठाकूरांत पण ती प्रतिभा आहे पण त्यांना संजयजीसारखे फॅन फॉलोविंग मिळणे जरा मुश्कील आहे. त्यांना चांगल्या निर्भेळ प्रोत्साहनाची गरज आहे. पाठिंब्याची आवश्यकता आहे.
तुमच्याच क्षेत्रातील एक नामवंत मान्यवर त्यांना आवर्जून प्रोत्साहन देतात. संक्षीनाही द्यायचे, विठाकाकांनाही देतात. मात्र त्यांचे प्रोत्साहन निर्भेळ आहे की ते हरभर्‍याच्या झाडावर चढवून मजा बघणे आहे याबद्दल अजून आमच्या मनात गोंधळ आहे. मला एक प्रश्न पडतो, विठाकाकांचा उल्लेख होताना नेहमी संक्षींचा उल्लेख का होतो बरे? किंबहूना स्वत विठाकाका "संक्षींनी यंव केलं असतं, संक्षींनी त्यंव केलं असतं" असं लिहित असतात. क्या ये राज आखिरतक राजही रह जायेगा?
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sat, 02/06/2016 - 18:43 नवीन
येवुडू पाह्यला का. अल्लू अर्जुन आणि रामचरण हायेत. कळतील सगळे राज पाह्यल्यावर.
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/06/2016 - 19:49 नवीन
लेदू. नेनू अल्लू अर्जून योका आर्या मरीयू हॅप्पी विक्षींचारु. सरे इदी रामचरण येवुडू?
↩ प्रतिसाद: अभ्या..
आ
आदूबाळ Sat, 02/06/2016 - 19:14 नवीन
...जिसे आप ने देखा, वो था लक्ष्मणप्रशाद दशरथप्रशाद शर्मा। मेरा जुडवा भाई।
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/06/2016 - 13:43 नवीन
++१०००० शिवाय केजरीवाल काळे का गोरे अन चांगले का वाईट ह्याच्याशी आम्हाला काही घेणे देणे नाही तरीही त्यांचे नाव अन अस्तित्व ही एक शिवी आहे असे संबंधित आयडी म्हणाला आहे . सनी लियॉन ला वेश्या म्हणणे जर वाईट असेल तर हे काय फार मोठे राष्ट्रकार्य आहे काय? "केजरीवाल" शिवी आहे म्हणणे हे नुसते राजकीय दृष्ट्या असहिष्णु असल्याचे द्योतक नाही का?
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
ग
गॅरी ट्रुमन Sun, 02/07/2016 - 15:48 नवीन
सनी लियॉन ला वेश्या म्हणणे जर वाईट असेल...
बाकी सगळं सोडा हो. एक गोष्ट सांगा: सनी लियॉन की सनी लिऑनी? मला वाटते सनी लिऑनी :)
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
स
संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 16:50 नवीन
ज्याने 'कायदेशीर' अडचण येणार नाही ते... ;-)
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 02/07/2016 - 17:01 नवीन
ठ्ठो!!!! :D :D :D :D गॅरी भाऊ, लियॉन ऐकले आहे बुआ! अमेरिकन काही वेगळा उच्चार करत असल्यास कल्पना नाही! अर्थात आता तुम्ही बाकी मुद्दे सोडले आहेत तर बाकी काही बोलण्यासारखे नाही म्हणा! शुभेच्छा
↩ प्रतिसाद: संदीप डांगे
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2016 - 09:56 नवीन
उगी उगी मुनीवर्य. जरा शांत व्हा. इतके असहिष्णु होऊ नका. जरा सहिष्णु घ्या. माझ्याविरूद्ध तुम्ही तक्रार करीत असलेला हा तिसरा धागा आहे. आधी दोन धाग्यांवर तक्रार करून झाली. दुसरा धागा अचानक बंद झाल्याने मला तिथे काहीच उत्तर देता आले नाही. परंतु (निदान अजूनतरी) संमंला माझा प्रतिसाद संपादित करावा असे वाटलेले दिसत नाही. त्यावर तुम्ही लगेच "मिपावर सदस्यांतर्गत भेदभाव केला जातो." असा त्यांच्यावर आरोप करून मोकळे झालात. समजा त्यांनी माझ्यावर काही कारवाई केली असती तरी मी तो निर्णय मान्य करून अजिबात विरोध केला असता, कारण तसे करणे हा त्यांचा अधिकार आहे. त्या धाग्यावर तुम्हाला योग्य उत्तर देता येत नव्हते, म्हणून लगेच "मला मूळव्याध झाली आहे" अशी व्यक्तिगत टिप्पणी करून मोकळे झालात. दुसर्‍या एका धाग्यावर तुम्ही माझ्यावर अनेक वेगवेगळ्या प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी केलीत. मी तुमच्याविरूद्ध एकाही प्रतिसादात व्यक्तिगत टिप्पणी केली नव्हती. परंतु तुम्ही तसे माझ्या बाबतीत वारंवार केलेत. माझा त्याबद्दल काहीच आक्षेप नाही. त्यामुळे मी कोठेही तक्रार केली नाही. परंतु माझ्याविरूद्ध तक्रार करायची ही तुमची तिसरी वेळ. संमंबद्दल भेदभाव करण्याचा आरोप करण्याऐवजी त्यांच्या निर्णयाचा आदर करायला शिका.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा