Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

सदस्यांतर्गत भेदभाव आणि धोरण

व
विवेक ठाकूर
Sat, 02/06/2016 - 09:47
🗣 97 प्रतिसाद
या धाग्यात दोन व्यवसाय: मान अपमान बॅटमॅन नामक सदस्याचा हा प्रतिसाद आहे : विठाकाका, नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अ‍ॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली? या प्रतिसादाविषयी सं.मं.कडे तक्रार करुन योग्य मार्गानं निवाडा होईल अशी रास्त अपेक्षा होती पण अजूनही प्रतिसाद कायम आहे. तर प्रश्न असा पडतो की एखादा प्रतिसाद व्यक्तिगत आणि शिष्टाचाराचे नियम सोडून बेतालपणे दिला आहे किंवा कसे, याचा काय निकष आहे. इथे `व्यक्तिगत प्रतिसाद' या कारणाखाली आयडी बॅन होतात मग वरचा प्रतिसाद कशा प्रकारात मोडतो? आणि मग व्यक्तिगत प्रतिसाद देणार्‍यांना तंबी दिली जाते तर ज्यांच्या बाबतीत असे प्रतिसाद दिले जातात त्यांना उत्तर देण्याची किंवा काय निवाडा झाला ते सांगण्याची, शासकांची किमान जवाबदारी नाही काय? आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला, शासक काहीच करत नाहीत म्हटयावर, त्याच पातळीवर येऊन पुरतं वाजवलं, तर तो उत्तर देणार्‍याचा फाऊल का धरला जाईल का किंवा का धरला जातो?

प्रतिक्रिया द्या
11058 वाचन

💬 प्रतिसाद (97)
क
कपिलमुनी Sun, 02/07/2016 - 12:04 नवीन
मी काय शिकायचा ते तुम्ही शिकवू नका. माझी तक्रार संमं विरूद्ध आहे ,आम्ही बघून घेऊ. तुमचा शेवटचा प्रतिसादवाला खेळ चालू द्या.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 02/07/2016 - 16:12 नवीन
तुमचा कसला खेळ सुरू आहे ते दिसतेच आहे. आतापर्यंत या खेळातले तुमच सगळे डाव फसलेले आहेत. फक्त माझे नाव वारंवार घेऊन व्यक्तिगत टिप्पणी करू नका.
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
अ
अजया Sat, 02/06/2016 - 12:08 नवीन
आॅर्डर अाॅर्डर बॅटमॅन कहाँ है?उसको हाजिर किया जाय. @ बोका -मुद्देसूद नहीं बोलनेका.धागा तुटतो मग.नीट विणला जात नाही.
अ
अन्नू Sat, 02/06/2016 - 12:13 नवीन
बॅटमॅन दुपार की वामकुक्षी घे रहे है! संध्याकाळ को आएंगे तंब्बी बोलो... :)
अ
अजया Sat, 02/06/2016 - 12:16 नवीन
कोणाची उद्वेगाने झोप उडवून स्वतः वामकुक्षी घेणे बरोबर नाही
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 02/06/2016 - 13:12 नवीन
सनी लियोन ही पोर्न स्टार आहे, असं जरी कोणी म्हटलं असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही. असे वाटते. बाकी, संस्थाळावर खुप भांडावं पण व्यक्तिगत आयडी किंवा असलेले नाव घेऊन संबधीतावर टिका करून हिशेब चुकते करू नये असे व्वाटते. बाकी, चालु द्या. -दिलीप बिरुटे
ज
जेपी Sat, 02/06/2016 - 13:23 नवीन
मिपाला एका 'प्र'भावी संपादकाची गरज आहे.हे मी वारंवार अधोरेखित (पक्षी:पिवळे)केले आहे.. एवढे बोलुन मी खाली बसतो. - अवांतर-बॅट्या ट्राय सिरीज पुर्ण करायच सोडुन दुसर्याचे पेग मोजतो.. हॅड..
ज
जव्हेरगंज Sat, 02/06/2016 - 13:56 नवीन
मिपा वातावरणाला साजेशी वाटतेय प्रतिक्रिया (आणि धागाही ;-) ) बाकी चलु द्या!!!
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 14:16 नवीन
हेलो विठाकाका. तुमचे प्रतिसाद आणि त्यातली मते पाहून मला सोमरसमदजनित कल्पनाविलासाशी अपार साम्य आढळले म्हणून पृच्छा केली. आता दारू पिण्याचा आणि चारित्र्याचा संबंध कुठे आला? तुम्ही दारू प्या वा ना प्या, झिंगा अथवा झिंगू नका. जे काही करता त्यात इतरांशी वर्तणूक कशी असते यावर तुमचे चारित्र्य ठरते , बसल्याजागी किती टकीला शॉट लावून काय तर्कटे लढवता याच्यावर नाही. तेव्हा या प्रश्नावर दुखावले जाणे म्हणजे कुठेतरी मनातच दारू = वाईट असे समीकरण लपलेले आहे याची पोचपावतीच आहे. तस्मात हा श्लोक पहावा असे सुचवतो. किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् | अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम् || "मद्य हे गुणधर्माने पाहता अन्नासारखेच आहे. विचार न करता ढोसले तर रोगास कारणीभूत होते आणि योग्य प्रमाणात इ. घेतले तर अमृताप्रमाणे परिणाम करते." तेव्हा चीअर्स.
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 14:29 नवीन
अशी शंका आलीय का तुम्हाला वाल्गुदस्वामी?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 15:14 नवीन
असं विचारल्यास चारित्र्य हनन होणार नाही, कसे? कारण तुमच्या म्हणण्याप्रमाणे `जे काही करता त्यात इतरांशी वर्तणूक कशी असते यावर तुमचे चारित्र्य ठरते'. तस्मात, अशा विचारणेत तुमच्या चारित्र्यावर हल्ला होत नाही. तरीही मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे, याचा गोमूत्र प्राशनानंतर विसर पडत असावा असे प्रतिसादावरुन वाटते.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:19 नवीन
तुम्ही हा प्रतिसाद गोमूत्र पिऊन लिहीला आहे का?
नाही बा. आम्ही दूध, चहा, कॉफी, ग्रीन टी, अदरकवाली चाय, काहवा, फिल्टर कापी, ताक, सांबार, रसम वगैरे पितो.
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 02/06/2016 - 15:22 नवीन
नीरा सोडली का हल्ली? आणि फ्रुट ज्युस?
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:23 नवीन
श्श्श, अशी खाजगी माहिती उघड करणं शोभतं का तुला, दू दू दू
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 15:26 नवीन
मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे याचा विसर पडला म्हणजे आश्चर्य आहे. तस्मात, गोमूत्र पिऊन लिहीला असवा अशी रास्त शंका आहे.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:28 नवीन
मद्यप्राशनाचा आणि तर्कशुद्ध विचारसरणीचा संबंध आहे याचा विसर पडला म्हणजे आश्चर्य आहे.
अनुल्लेखाने मारले ओ त्याला. बाकी तुमचा विसर कसा पडू देऊ ? =))
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 15:33 नवीन
त्यामुळे गोमूत्र पिणे सोडा.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:36 नवीन
उघडे पडल्यावर सारवासारव करुन उपयोग होत नाही
सारवासारव वगैरे साफसफाईची कामे तुम्ही स्वतः सांभाळता हे पाहून तुमच्याबद्दलचा आदर की काय तो वाढीस की काय लागला बरं का.
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 17:20 नवीन
अर्थात, तुमच्याच प्रतिसादाप्रमाणे, स्व-मूत्रप्राशनाचा चारित्र्य हननाशी संबंध येत नाही. पण त्यानं नक्की कोण काय करतंय हे कळेनासं होतं. म्हणजे गोमूत्रामुळे, `मद्यप्राशन आणि तर्कशुद्ध विचारसरणी' यातला संबंध कळत नाही आणि स्वमूत्र प्राशनानं, सरवासारवी आपण करतोयं हे कळेनासं होतं.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 18:22 नवीन
म्हणजे गोमूत्रामुळे, `मद्यप्राशन आणि तर्कशुद्ध विचारसरणी' यातला संबंध कळत नाही आणि स्वमूत्र प्राशनानं, सरवासारवी आपण करतोयं हे कळेनासं होतं.
बाकी काही असो, पण या वाक्यामुळे आपण तुमचा फ्यान झालो. धर्माभिमानी हिंदू असूनही गोमूत्र कधी प्राशिले नाही आणि शिवांबुचिकित्सा तर नाहीच नाही. पण आपण या दोन्हीही द्रवांचे सेवन करता हे पाहून आपल्याबद्दलचा आदर दुणावला. अजून स्व किंवा गो यांच्याशी निगडित कशाकशाचे सेवन करता याचा विदा जर मिपाकर पामरांशी शेअर कराल तर बाकीचे मिपाकरही त्याला प्रोत्साहन देतील यात शंका नाही.
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sat, 02/06/2016 - 18:45 नवीन
ते दोन्ही प्राशन केल्यामुळेच तर तुम्हाला, मद्यप्राशन आणि तर्कशुद्धता यातला संबंध आणि स्वतः केलेली सारवासारवी समजू शकत नाही. आता काहीही न घेता पुन्हा स्वतःचे प्रतिसाद वाचा म्हणजे समजेल.
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 05:36 नवीन
दोघांनी आता एकमेकांना तिरपे प्रतिसाद लिहिणं थांबवावं असं एक मिपाकर म्हणुन वाटतं. वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही. एकमेकांवर आपण दोघं जितकी चिखलफेक कराल तितकी आमची वाचक प्रेक्षक म्हणुन करमणुक होईल. आपण दोघंही चांगलेही चांगले पहिलवान आहात कोणाचीही पाठ लवकर लागणार नाही, तेव्हा दोघांनीही हा सामना आता थांबवावा. धन्यवाद. ह्याव अ गुड डे. -दिलीप बिरुटे (पंच)
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 02/07/2016 - 05:58 नवीन
वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा कोणाचा असला म्हणजे तो प्रतिवादात जिंकला असा अर्थ होत नाही. असं फ़क्त तर्क गुंडाळून सरकार पक्षा संबंधी प्रचारकी लेख लिहिणाऱ्या अन विरोधकांप्रती विखारी घाण ओकणाऱ्या एका आयडीला वाटते सर!!
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क
कवितानागेश Sun, 02/07/2016 - 07:32 नवीन
या वरच्या वादात बिरुटे सर जिंकलेत! ;) -बघ्यांच्या गर्दीतली एक
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 07:35 नवीन
आत्ताशी जिंकलो मग. :) -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: कवितानागेश
प
पैसा Sun, 02/07/2016 - 08:00 नवीन
तुम्ही पंच ना ओ सर! मला वाटले तुम्ही दोन राउंड्स च्या मधली विश्रांती दिलीय. पुन्हा शिट्टी वाजली की म्याच सुरू होईल. =))
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 02/07/2016 - 08:14 नवीन
आता पुरे हं. मला जिंकु द्या. एक आवडलेल्या कवितेच्या ओळी टाकतो. उपप्रतिसाद देऊन दाद द्यायची नाही. खरडवहीत दाद द्यायची. काल (काल्पनिक) मैत्रीणीची धावती भेट झाली. तो आनंद असा - सांग कसा होऊ मी ताजवरती फिदा त्यास येईल का तिच्या लाजण्याची अदा पत्थराची पूजा मी कशाला करु चालता बोलता काल मी ताज पाहिला. -दिलीप बिरुटे
↩ प्रतिसाद: पैसा
क
कवितानागेश Sun, 02/07/2016 - 08:32 नवीन
आता त्या कवितेखालील प्रश्न सोडवा. ताज का चालतो? वरील कवितेत नक्की कुणाला लाज वाटत आहे आणि का? पत्थराची पूजा का करू नये स्पष्ट करा. ताज काय बोलत आहे? पु ना ओक यांच्या दृष्टीने ताजची १० वाक्यात माहिती लिहा. फिदा आणि अदा यास मराठी संस्कृत प्रतिशब्द लिहा. --( पहिली ते बारावीचे उट्टे काढणारी) माऊ ;)
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अ
अद्द्या Sat, 02/06/2016 - 15:15 नवीन
"किन्तु मद्यं स्वभावेन यथैवान्नं तथा स्मृतम् | अयुक्तियुक्तं रोगाय युक्तियुक्तं यथाऽमृतम् ||" फक्त या गोष्टींसाठी हा माणूस इथे हवा .. बाकी
या प्रश्नावर दुखावले जाणे म्हणजे कुठेतरी मनातच दारू = वाईट असे समीकरण लपलेले आहे याची पोचपावतीच आहे.
यासाठी +१
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
स
स्पा Sat, 02/06/2016 - 14:20 नवीन
छे विठा, इतक्याशा इशु मुळे हललात
क
कवितानागेश Sun, 02/07/2016 - 07:33 नवीन
अच्रत बव्लत हल्कत!
↩ प्रतिसाद: स्पा
क
कैलासवासी सोन्याबापु Sat, 02/06/2016 - 14:25 नवीन
तर असं आहे बुआ हे प्रकरण नाही !! (ओ आय सी असा सगळा प्रकार झाला तर च्या चालीवर) धागाच अज्ञानोत्भव दिसतोय ! एकंदरित श्लोक भूमिका पाहता बॅटमॅन ह्यांनी एक स्पष्टीकरण दिलेले आहे! तरीही, चियर्स (सोमवेत्ता) बाप्या
र
राजेश घासकडवी Sat, 02/06/2016 - 14:41 नवीन
बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू प्यायल्यावर असे प्रतिसाद सुचतात' असा प्रश्न विचारून प्रचंड चूक केली आहे याबाबत विठांशी सहमत. मी खात्रीने सांगू शकतो की १९२० साली जी दिडकी होती, तिची किंमत आत्ता फारतर शंभर रुपये असेल, त्यापेक्षा जास्त नाही. मी तेवढ्या किंमतीची दारू अनेक वेळा, वेगवेगळ्या परिस्थितीत प्यायलेली आहे. पण असा प्रतिसाद मला कध्धीही सुचला नाही. बॅटमॅन, तुम्हाला एवढं कळत नाही का, 'नशा शराब मे होता तो नाचती बोतल' असं एक थोर हिंदी कवी म्हणून गेला आहे. अहो बॅटमॅन, हा असला प्रश्न विचारण्याआधी तुम्ही किती ताक पिऊन बसला होतात? (आता याबद्दल बॅटमॅन माझ्याविरुद्ध धागा काढणार...) बाकी तो मूळ प्रतिसाद वाचला. कॅन्सरपासून बचाव करणं इतकं सोपं असेल तर अनेक स्त्रियांना त्यासाठी मदत करायला मी उत्सुक आहे. फेसबुकावर कायम ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस वगैरे खुळं चालू असतात. मला वाटतं आपण त्यापुढे जायला हवं. मिपाकरांनी एकत्र येऊन 'ब्रेस्ट कॅन्सर एलिमिनेशन ग्रुप' काढायला हवा. त्यासाठी गरजवंत स्त्रियांना हा मुद्दा पटवून देऊन त्यांच्यावर उपचार करण्याची मोहीम सुरू करावी. हे भयंकर कष्टाचं काम असेल, पण ब्रेस्ट कॅन्सर निवारणासाठी आपण तेवढा त्याग करायला तयार झालं पाहिजे.
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:18 नवीन
सहमत, बाकी वेगळा विदर्भही झालाच पाहिजे.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बोका-ए-आझम Sat, 02/06/2016 - 15:23 नवीन
की जय हो!
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
न
नाव आडनाव Sat, 02/06/2016 - 15:21 नवीन
मोहीम :):):) इच्छुक कार्यकर्त्यांनी नावनोंदणी कुठे करायची? प्रा.डाँ. चा कोनाडा वाला धागा? :)
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ब
बॅटमॅन Sat, 02/06/2016 - 15:30 नवीन
मला विदा गोळा करायचा होता की किती एमेल आणि कुठल्या प्रकारची (बियर व्हिस्की इ.) व कुठल्या ब्रँडची दारू पिल्यावर कशी क्रिएटिव्हिटी बहरते ते. त्या उदात्त उद्देशाकरिता विचारत होतो ओ.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
ज
जेपी Sat, 02/06/2016 - 15:09 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.विठाकाका,बॅटमॅन आणी घासकडवी यांचा सत्कार एक एक क्वार्टर देऊन करण्यात येत आहे. -शुभेच्छुक-जेपी आणी तमाम कार्यकर्ते *आजपासुन राज्यात लिकरचे भाव कमी झालेत ;)
स
सुहास झेले Sat, 02/06/2016 - 18:45 नवीन
आणखी स्टॉक रेडी ठेवा... नक्कीच गरज पडेल ;-)
↩ प्रतिसाद: जेपी
त
तर्राट जोकर Sat, 02/06/2016 - 15:56 नवीन
कोय ते बी बोला इदर फ्री में दारू मिल रया करके, वो लेकिन फ्री के दारू में भेदभाव नै चलेगा. अपन पुरा खंबा पियेगा हे अपना दोरण रैताय. पैले बोलके रखताय... जिनको पिने का नै, अपना अपना गिलास उठाके घर जावो...
व
विनायक प्रभू Sun, 02/07/2016 - 04:48 नवीन
ये ग ये ग विठाभाइ
क
कैलासवासी सोन्याबापु Sun, 02/07/2016 - 05:09 नवीन
धाग्याला म्हणावा तसा उठाव नाही!! श्या बायस्ड एटिट्यूड
प
पैसा Sun, 02/07/2016 - 05:48 नवीन
झाडावर बसून पॉपकॉर्न खाणारी मंडळी फिरकली नाहीत ना!
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु
प
पैसा Sun, 02/07/2016 - 05:51 नवीन
मिपाच्या इतिहासात हाणामारीचा पहिला प्रकट धागा म्हणून नोंदला जाईल हा धागा!! सर्व संबंधितांचे हार्दिक अभिनंदन आणि मिपाला मनापासून शुभेच्छा!!
स
संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 06:23 नवीन
आमचे प्रत्येक विषयावर हटकून मत असतेच. तेव्हा ह्या विषयावरही देऊन टाकतो. सदस्याने अशा पद्धतीच्या वादात पडू नये, उघड द्वंद्व असल्याने कोण किती पाण्यात आहेत हे लगेच कळतं, विचारसरणीचे कपडे फाडले जातात. वादात कोणीच जिंकत नाही, वादात फक्त कोणाचा 'स्व' कसा आहे एवढंच कळतं. हसं होतं.
अ
अत्रन्गि पाउस Sun, 02/07/2016 - 07:33 नवीन
विम्बल्डन फायनल च्या प्रेक्षकात बसल्यावणी वाटतय ...
स
संदीप डांगे Sun, 02/07/2016 - 08:06 नवीन
नळावरची भांडणं झालीत हो दादा आता ती...! ;-)
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा