नमस्कार,
लोकहो,
मला सध्या उचक्या लागण्याचा त्रास चालु आहे.
यावर उपायास्तव.
1) कोणी माझी आठवण काढत आहे का ?हे आठवणतील सगळ्यांन फोन करुन विचारल.
1)मुंडी वर करुन पण उच्क्या थांबल्या ना हीत..
~ तर आता काय
मुंडी वर करून उचक्या थांबल्या नाहीत,??
मग इतरही बरेच अवयव आहेत ते वर करून बघा नक्की फरक पडेल.
दुसरी गोष्ट तुम्ही स्वतः तर तुमची आठवण काढत नाही आहात ना?याची खात्री करून घ्या.
रोज रात्री झोपताना त्रिफळा चूर्ण एक चमचा कोमट पाण्यातून घ्या. शरीरातील टाॅक्सिन्स बाहेर काढायचा उत्तम उपाय. सध्या युनायटेड फार्मसी, पुणे हे सर्वात शुद्ध त्रिफळा बनवतात.
रोज काळे मनुके खात जा... आम्लपित्त कमी होईल...
सकाळी उठल्यावर रात्रभर भिजवलेल्या चमचाभर हिरव्या धण्यांचे पाणी ग्लासभर प्या...
अंगातली उष्णता कमी होईल...
मानसिक धक्का बसवून घ्या
यावरुन जुन्या पिच्चरांमधले याददाश्त खो जाने पर सांगितल्या जाणारा जालिम उपाय आठवला. 'इन्हे उसी हादसे से फिर से गुजरना होगा, शायद इनकी याददाश्त वापस आ जाये.'
मलाही वरचेवर उचक्यांनचा त्रास होतो, यावर रामबाण उपाय म्हणजे , उभे राहचे,पाणी तोंडात भरुन घ्यायचे, कंबरेत पुर्ण वाकायचे व तोंड जमिनिच्या दिशेनेकरुन पाणि गिळायचे.उचकी थांबली नाही तर् प्रोसिजर रिपीट करायची.
धागा विनोदासाठी काढलेला नाही असे गृहित धरून उपाय सांगतो.
उचक्या अजिबात थांबत नसतील तर एक प्लॅस्टिकची पिशवी घ्या. त्यात नाक पूर्णपणे जाईल अशा तर्हेने नाकाभोवती धरून ठेवा. पिशवीच्या आतील हवा बाहेर जाऊ शकणार नाही व बाहेरील हवा आत येऊ शकणार नाही अशा पद्धतीने पिशवी नाकाभोवती हाताने दाबून धरावी. नंतर पिशवीतच नाकाने जोरजोरात दीर्घ श्वास घ्या. पिशवीतील हवा आतबाहेर जाऊ शकत नसल्याने पिशवितील प्राणवायू कमी होऊ लागतो व पिशवीत कर्बवायू वाढू लागतो. १०-१२ दीर्घ श्वासानंतर गुदमरल्यासारखे होऊ लागते. शक्य तेवढा वेळ ही क्रिया सुरू ठेवा. श्वास घेणे अगदीच अशक्य होईल तेव्हा पिशवी थोडी मोकळी करून पिशवीत थोडी बाहेरची हवा येऊ द्या व नंतर परत हीच क्रिया करा. साधारणपणे १-२ वेळा असे केल्यावर उचकी पूर्ण थांबते.
दुसरा काहिसा संथ उपाय म्हणजे डोक्यावरून जाड पांघरूण घेऊन झोपा. काही वेळाने पांघरूणाच्या आत प्राणवायू कमी होऊन कर्बवायू वाढतो व गुदमरल्यासारखे वाटू लागते व काही वेळाने उचकी थांबते.
तरीसुद्धा उचही थांबत नसल्यास डॉक्टरचा सल्ला घ्या.
हा एका डॉक्टरांनीच सांगितलेला उपाय आहे. यामागचे नक्की लॉजिक डॉक्टरच सांगू शकतील. श्वास रोखून धरणे हा उचक्या थांबविण्याचा एक उपाय असतो. म्हणजे शरीराला प्राणवायूचा पुरवठा तोडणे हे त्यामागचे लॉजिक असावे. मला डॉक्टरांनी सांगितलेल्या उपायात सुद्धा प्राणवायूचा पुरवठा कमी होऊ लागते व त्यामुळे उचकी थांबते. परंतु नक्की लॉजिक एखादा डॉक्टरच सांगू शकेल.
मग खोकला येईल असं काहीतरी करायचं. उदा. बसस्टॉपला जाऊन उभे राहणे. तिथे आपोआप खोकला येईलच. मग उचकीला लागायचा कंटाळा येईल. मग ती तुमचा नाद सोडून देईल. अर्थात हा उपाय गालांसाठी अंमळ रिस्की आहे. स्वजबाबदारीवर करणे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008