Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न

स
सुरवंट
Sun, 02/14/2016 - 10:57
🗣 71 प्रतिसाद
काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे. १. प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light ) समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ? २. दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने. जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल? दुप्पट? सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो? यालाच जोडून एक उपप्रश्न - पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल. यावरुन हा निष्कर्ष काढावा काय? विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते. ३. बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत. multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का? ४. पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही? पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे? उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही? ५. प्रतीगुरुत्वाकर्षण - गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय? प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.
वर्गीकरण
वैज्ञानिक

प्रतिक्रिया द्या
22502 वाचन

💬 प्रतिसाद (71)
ग
गरिब चिमणा Sun, 02/14/2016 - 11:16 नवीन
रविवारी कसं गावरान चुलीवरचं चिकण ,बाजरीची खरपुस भाकरी यावर ताव मारावा,मग १२० ३००, किंवा फुलचंद (रिमझीम ज्यादा) पान खावे व मस्त ताणून द्यावी.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 11:20 नवीन
पहिले हातभट्टीची चपटी ... इसरु नकासा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
त
तर्राट जोकर Sun, 02/14/2016 - 11:36 नवीन
(हलके घ्याच ही धमकी ;-)) (योग्य उत्तरे जाणकार देतीलच.) (वी.डेला सायन्सक्लासला धाडल्याबद्दल हा सूड ;-) तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे. १.>> बंदुकीचे लायसन हाय का? २.>> आदी सांगा, टिकट काढलं का? चेन खेचु नका. दंड होइल. >>> हवलदार पाहत नसल्यास प्रत्येक स्कुटर प्रकाशाच्या वेगानेच जात असते. ३.>> आम्हाला आज नकार मिळाला. कुठल्यातरी युनिवर्समधे होकार मिळाला आसंल. तरी बी आमी ह्या य्नुइवर्समदे येकलेच. ४.>> एकच उत्तरः आप कतार में है. ५. >> प्रतीगुरुत्वाकर्षण : लग्नाची बायको हे ठसठशीत उदाहरण.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 02/14/2016 - 13:37 नवीन
असले गंभीर धागे इथे काढू नका. टर उडली जाण्याची शक्यता ९९.९ टक्के. त्यापेक्षा केळाची शिक्रण करण्याची रीत कशी असा धागा टाका १०० प्रतिसाद नकक्की. आमचा कोकणात अशी करतात खानदेशात अशी वगैरे !
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 02/14/2016 - 14:01 नवीन
हीहीही. यू टू चौराकाका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
प
प्रकाश घाटपांडे Mon, 10/10/2016 - 09:47 नवीन
आम्ही ते शिक्रण म्हणतो ती शिक्रण नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
ए
एस Sun, 02/14/2016 - 14:41 नवीन
तुमच्या पहिल्या व दुसर्‍या प्रश्नाचे उत्तरः Firstly, if I say I'm moving at 50 mph, I have to be saying that in reference to another object. Most commonly the ground. No mass can be measured as moving at the speed of light relative an observer. What then would you be moving at the speed of light relative too? So let's start out a bit slower: 1% the speed of light. If you fire a round that has a muzzle velocity 300 m/s, (0.000001c), in the forward direction while moving at 0.01c, what will the velocity of the round be? In Newtonian physics the round would be moving at 0.01c + 0.000001c = 0.010001c. Straight forward addition. Relativistically, however, the addition isn't so straight foreword. It looks like this: s = (v + u)/(1 + vu/c²) Which would look like this: s = (.01 + .000001)/(1 + (.01 • .000001)/1.0²) s = 0.010001/(1 + .00000001/1) s = 0.010001/1.00000001 s = 0.010000999c That looks like the same thing to me. The difference only amounts to 3 mm/s. At relativistically low velocities Newtonian physics works just fine. But let's speed you up to .99c and speed the bullet up to .99c too. In Newtonian physics the final velocity would be .99c + .99c = 1.98c. Nearly twice the speed of light. But we can't use that; we have to do that other thing. s = (0.99 + 0.99)/(1 + (0.99 • 0.99)/1.0²) s = 1.98/(1 + 0.9801/1) s = 1.98/1.9801 s = 0.999949487c So, even though you were traveling at 99% the speed of light, and your gun fired a bullet at 99% the speed of light. A person watching from the outside would see the bullet moving faster than you but still less than the speed of light. Now, lets say you can move the speed of light: 1c s = (v + u)/(1 + vu/c²) s = (1 + u)/(1 + 1u/1) s = (1 + u)/(1 + u) s = 1c You're bullet is moving at the speed of light relative to you and and relative to an outside observer. He nor you measure the bullet moving faster than the speed of light. The only reason either are measuring it at the speed of light is because we entered this last argument pretending that we could. But even then we couldn't get faster. Quod erat demonstrandum: An observer can never measure a mass moving faster than the speed of light. गुगल केल्यावर सापडले.
  • Log in or register to post comments
S
sagarpdy Mon, 02/15/2016 - 06:41 नवीन
गणितं आणि निरीक्षकाने मोजलेला वेग हे भाग समजले. एक परिशिष्ट प्रश्न. A ने ०.९ C वेगाने जाताना ०.९ C (त्याच्याच फ्रेम ऑफ रेफ़रन्स मध्ये मोजणे) वेगाने गोळी झाडली. गोळीच्या दिशेत १ प्रकाशवर्ष अंतरावर निरीक्षक B आहे आणि हि घटना बघत आहे. तर हि गोळी B पर्यंत केव्हा पोहचेल ? - B ला गोळी लागलेली A ला कधी (म्हणजे गोळी लागल्यापासून किती वेळाने) दिसेल ? - गोळी झाडल्याचे दिसल्यापासून B ला गोळी कधी लागेल ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:36 नवीन
हा प्रश्नही मस्तच आहे. याच्याही ऊत्तरच्या प्रतिक्षेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
शब्दबम्बाळ Sun, 02/14/2016 - 14:44 नवीन
छान प्रश्न आहेत, असेच मलाही काही काळापूर्वी पडले होते आणि त्याची उत्तरे शोधताना काही गोष्टी वाचनात आल्या त्या लिहितो. त्यात काही चुकीचे असल्यास दुरुस्ती करावी. special relativity नुसार प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेग गाठता येणार नाही. तुम्हाच्या पहिल्या प्रश्नाला थोडेसे बदलूया, समजा तुम्ही प्रकाशाच्या वेगाने जाणार्या यानात बसला आहात आणि तुमच्या हातात आरसा धरला आहे त्यात तुमचे प्रतिबिंब आरश्यात दिसेल का??(कारण प्रकाश आरश्यापर्यंत पोहोचून तुमच्यापर्यंत कसा येणार जर तुमचा वेग प्रकाश इतका आहे) >> आता physics चे नियम सगळ्या ठिकाणी सारखे राहतात मानले तर तुमची प्रतिमा तुम्हाला दिसली पाहिजे. मग त्यासाठी प्रकाश दुप्पट वेगाने प्रवास करेल का? तर नाही... observer साठी तुमच्या यानाचा आकार एकदम लहान होईल. जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या वेगाने जात असाल तेव्हा तर तो जवळपास न दिसण्या इतका लहान होईल. त्यामुळे observer साठी प्रकाश तुमच्या चेहर्यापासून आरश्यापर्यंत जाउन परत तुमच्या डोळ्यापर्यंत येउन तुम्हाला तुमची प्रतिमा दिसेल. हे अंतर नगण्य झालेले असेल. हीच गोष्ट बंदुकीच्या गोळी साठी होईल. मुळात हा सगळा फ्रेम ऑफ रेफरन्स चा घोळ आहे. आपण जेव्हा म्हणतो कि ग्रह ४० प्रकाश वर्ष दूर आहे याचा अर्थ एक माणूस इथून ४० वर्षाचा असताना प्रवासाला निघाला तर तो तिथे पोहोचे पर्यंत जिवंत राहील का आपल्याला वाटते. पण खर तर माणूस प्रकाशाच्या वेगाने जाताना शेकडो प्रकाश वर्षाचा प्रवास करू शकतो. कारण त्याच्या यानातले वेळेच घड्याळ "आपल्या (पृथ्वीवरच्या)' वेळेपेक्षा खूपच हळू चालत असते.(observer earth ) त्यामुळे तो चांगला तरुण असतानाच तिथे पोहोचू शकतो. space - Time या मजेशीर गोष्टी आहे. (विवेक ठाकूर यांनी कृपया पुन्हा, काळ भासमान हे हि चर्चा याखाली सुरु करू नये)
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:41 नवीन
<< observer साठी तुमच्या यानाचा आकार एकदम लहान होईल.>> हे असंही होतं? एखादा संदर्भ द्याल काय? << त्यामुळे तो चांगला तरुण असतानाच तिथे पोहोचू शकतो.>> नाही. तो त्याच्या ४० वर्षानंतरच पोहोचेल. मात्र इकडे पृथ्वीवर हजारो वर्षे लोटली असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
आ
आनन्दा Tue, 02/16/2016 - 05:41 नवीन
नाही. तो त्याच्या ४० वर्षानंतरच पोहोचेल. मात्र इकडे पृथ्वीवर हजारो वर्षे लोटली असतील.
आँ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
S
sagarpdy Tue, 02/16/2016 - 07:07 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Time_dilation
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
आ
आनन्दा Tue, 02/16/2016 - 10:35 नवीन
ह्म्म.. काहीतरी अगम्य आहे खरे.. वेळ काढून वाचतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
शब्दबम्बाळ गुरुवार, 10/06/2016 - 16:22 नवीन
> नाही. तो त्याच्या ४० वर्षानंतरच पोहोचेल. मात्र इकडे पृथ्वीवर हजारो वर्षे लोटली असतील. ->नाही! :) त्याची 40 वर्षे नाही होणार. आता पृथ्वीवर बसून आपण म्हणतो कि 40 प्रकाशवर्ष दूर आहे म्हणजे प्रकाशाला तिथे जायला 40 वर्ष लागणार! पण आपण हि वेळ आपल्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये पाहतोय. जेव्हा प्रकाशाच्या वेगाने प्रवास केला जाईल तेव्हा TIME Contraction (समय आकुंचन?) मुळे त्याच्या इथे वेळ हळू हळू सरकू लागेल. तो फरक असा किती असेल? Lorentz Contraction च्या प्रमेयानुसार वेळ बदलाचे गुणोत्तर पुढील प्रमाणे "sqrt(1-v*v )" इथे v म्हणजे प्रकाशाच्या तुलनेत असलेला वेग. म्हणजे समाज यात्री 0.99999c वेगाने निघाला असेल तर या प्रमेया नुसार त्याच्या इथल्या वेळेचे गुणोत्तर पुढील प्रमाणे: √(1−(0.99999*0.99999)) = 0.0045 म्हणजे पृथ्वी वरच्या 40 वर्षांच्या तुलनेत त्याला लागलेला वेळ = 40*0.0045 = 0.18 वर्षे म्हणजे तो खूपच लवकर इच्छित ठिकाणी पोहोचेल. हे कसे होते? TIME Contraction , Length Contraction , Time Dilation आणि Length Dilation हे सगळे ध्यानात घायला लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
प
प्रचेतस Sun, 02/14/2016 - 16:24 नवीन
इंट्रेस्टींग प्रश्न आहेत. सदस्यांचे माहितीपूर्ण प्रतुसाद वाचायला आवडतील. बाकी मल्टीयुनिव्हर्स हा शब्द चुकीचा असून मल्टीव्हर्स हा शब्द योग्य आहे. युनिव्हर्स ह्या शब्दाच्या व्याख्येतच 'एकमेव' असे गृहीत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:43 नवीन
<< मल्टीव्हर्स हा शब्द योग्य आहे>> मान्य. माफी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
क
कंजूस Sun, 02/14/2016 - 16:40 नवीन
आमची झोप उडवलीत. हे सर्व प्रश्न भारतीय मूलत्वाच्या वैज्ञानिकाने उपस्थित करून नेहमीप्रमाणेच खळबळ उडवून दिली आहे.यावैज्ञानिकाच्या गावातल्या आजीची मुलाखत घेण्यास पत्रकार *** बुद्रुक गावात पोहोचले आहेत.
  • Log in or register to post comments
च
चाणक्य Sun, 02/14/2016 - 16:44 नवीन
भारीयेत राव प्रश्न. बेसिक म्हणता म्हणता झोप उडवणारे आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे Sun, 02/14/2016 - 16:55 नवीन
हेच प्रश्न इथे देखील विचारले गेले आहेत. तिथे शास्त्रीय उत्तरं देखील आहेत.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Sun, 02/14/2016 - 19:28 नवीन
. प्रतीगुरुत्वाकर्षण - गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे. प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय? प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.
प्रश्न गंडलाय. प्रति गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा अभाव. https://en.wikipedia.org/wiki/Anti-gravity
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?
विषाणूंचा विकास झाला नाही असे कसे म्हणता? जर इन्फेक्टेड होस्ट मरत असेल तर तो विषाणू मूर्ख आहे कारण त्यानंंतर विषाणूचीच पाळी आहे. जर विषाणू त्वरित प्रसारित होवू शकत नसेल, उच्च किंवा शीत तपमानात जिवंत रहात नसेल तर तो विषाणू अप्रगत आहे. कारण प्रसार न होणारा विषाणू थोड्याच अवधीत संपेल. म्हणून सर्वात कमी धोकादायक विषाणू हे सर्वात प्रगत आहेत (उदाहरणार्थ फ्लू). सर्वात धोकादायक विषाणू हे सर्वात अप्रगत (मूर्ख) आहेत. उदाहरणार्थ एबोला. हवेतून प्रसार होणारे प्रगत आहेत.
पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?
प्रजनन आणि आपल्या प्रजातीचा प्रसार.
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:48 नवीन
<<प्रति गुरुत्वाकर्षण म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा अभाव.>> गुरुत्वाकर्षणाचा अभाव असेल तर त्याला neutral gravity का म्हणू नये? << विषाणूंचा विकास झाला नाही असे कसे म्हणता?>> विषाणू evolve होत नाहीत असे म्हणायचंच नाही आहे. पेशी ज्याप्रकारे ऊत्क्रांत झाल्या, बहुपेशीय जीवांपासून मानवासारखा intelligent प्राणी तयार झाला त्यामानाने विषाणू फारच मागास वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
श
शब्दबम्बाळ Mon, 02/15/2016 - 17:05 नवीन
माणूस हाच विषाणू नाही कशावरून? :P वरच्या प्रतिसादाचे संदर्भ निवांतपणे देतो जरा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरवंट
च
चौकटराजा Tue, 02/16/2016 - 06:57 नवीन
मानवी देहातील प्रतिकारशक्तीमुळे मानवी नवी देह कदाचित जीवशास्त्रात सर्वात प्रभावी संहारक असू शकेल.पण विषाणू म्हणजे तो मारकच असे विधान करता येणार नाही.विषाणू हा जीव व निर्जीव याच्या सीमेवरचा एक जन आहे तो प्राणी नाही. त्याचे पुनरुप्तादन रासायनिक पद्धतीने होते असे वाचल्याचे आठवते.विषाणूला योग्य अशी होस्ट पेशी न मिळाल्यास त्याचे उत्पादन संभवत नाही. कारण तो अन्न खाउन व लैन्गिक पद्धतीने वाढत व पुरुत्पादित होत नाही. अधिक खरे " खरे" सांगतीलच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शब्दबम्बाळ
ग
गॅरी ट्रुमन Mon, 02/15/2016 - 06:10 नवीन
मस्त धागा. इतके अ‍ॅडव्हान्स्ड प्रश्न विचारता येतील इतकेही माझे शास्त्रीय ज्ञान नाही.तेव्हा मी पण माझ्या अतिबेसिक पातळीवर शोभेल असा एकच अतिबेसिक प्रश्न विचारतो: माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? म्हणजे एका सेकंदापूर्वी जिवंत असलेला माणूस आणि आताच मेलेला माणूस यात नक्की फरक काय असतो? हृदय बंद पडणे, मेंदू बंद पडणे इत्यादी गोष्टी या माणूस मेल्यामुळे होतात की हृदय्/मेंदू इत्यादी बंद पडते म्हणून माणूस मरतो? इन आयदर केस, माणूस मरतो म्हणजे नक्की काय होते? (या धाग्यावर लक्ष ठेऊन अतिबेसिक वरून ज्ञानाची पातळी बेसिकवर जाईल अशी अपेक्षा असलेला) ट्रुमन
  • Log in or register to post comments
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:52 नवीन
मेडिकल तज्ञ याचे ऊत्तर देतीलच पण मृत्युनंतर आपले (आत्मा, जीव यांचे वगैरे ) काय होते येथे सायन्स संपून अध्यात्म सुरु होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ब
बहुगुणी Mon, 02/15/2016 - 19:03 नवीन
हृदयक्रिया आणि श्वसनक्रिया पूर्णपणे थांबणे आणि संपूर्ण मेंदूचे कार्य थांबणे अशा तिन्ही क्रिया थांबणे म्हणजे माणसाचा मृत्यू असे सामान्यतः मानले जाते. अमेरिकेतील Uniform Determination of Death Act (UDDA) नुसार: An individual who has sustained either (1) irreversible cessation of circulatory and respiratory functions, or (2) irreversible cessation of all functions of the entire brain, including the brain stem, is dead. या तीन अत्यावश्यक शरीरक्रियांपैकी हृदयक्रिया किंवा श्वसनक्रिया बंद पडली तर काही तात्पुरते उपाय (Life Support Systems) आहेत, उदाहरणार्थ, ventilator (respirator) वापरून श्वसनक्रिया काही काळ सुरू ठेवता येते, किंवा defibrillator वा cardiopulmonary resuscitation (CPR) हे उपाय वापरून बंद पडलेली हृदयक्रिया तात्पुरती सुरू करून काही वेळ सुरू ठेवता येते. संपूर्ण मेंदूचे कार्य थांबण्यावर असा तात्पुरताही उपाय अर्थातच अद्याप तरी उपलब्ध नाही. [अपघातामुळे वा काही व्याधींमुळे मेंदूचे कार्य थांबल्यावरही हृदयक्रिया व श्वसनक्रिया चालू असतील तर ती व्यक्ति persistent vegetative state मध्ये कित्येक महिने 'जिवंत' राहू शकते, पण यामुळे उद्भवणारे अनेक वाद आंतर्जालावर शोधल्यास सापडतील.]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Tue, 02/16/2016 - 06:57 नवीन
धन्यवाद बहुगुणी.
हृदयक्रिया आणि श्वसनक्रिया पूर्णपणे थांबणे आणि संपूर्ण मेंदूचे कार्य थांबणे अशा तिन्ही क्रिया थांबणे म्हणजे माणसाचा मृत्यू असे सामान्यतः मानले जाते.
म्हणजे या तीन क्रिया थांबणे ही मृत्यूची सिम्प्टम्स आहेत असे म्हणता येईल का? दुसर्‍या शब्दात--या तीन क्रिया थांबल्या असतील तर मृत्यू झाला असे म्हणता येईल.पण या तीन क्रिया थांबणे म्हणजे मृत्यू नाही ना? आज मेंदूचे काम काही काळ चालवू शकेल असे यंत्र उपलब्ध नाही.कदाचित भविष्यात ते येईलही.तसे झाल्यास या तीनही क्रिया थांबल्या तरी माणूस व्हेजिटेटिव्ह स्टेटमध्ये 'जिवंत' राहू शकेलच ना? म्हणजे मृत्यू याचा अर्थ या तीन क्रिया बंद पडण्यापेक्षा काहीतरी वेगळे आहे हे म्हणता येईल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी
आ
आनन्दा Tue, 02/16/2016 - 10:38 नवीन
मला एक वेगळाच प्रश्न पडला आहे. आज आपण हृदय ट्रान्सप्लांट करतो.. उद्या जर मेंदू पण ट्रान्सप्लांट करता आला, तर मग मेला कोण आणि जगला कोण?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तुषार काळभोर Tue, 02/16/2016 - 10:57 नवीन
http://www.misalpav.com/node/25314
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शिवोऽहम् Tue, 02/16/2016 - 19:07 नवीन
मिथुन: दिया और तूफान!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
श
शिवोऽहम् Tue, 02/16/2016 - 19:08 नवीन
https://www.youtube.com/watch?v=G0VZZELCFIE
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिवोऽहम्
स
सुरवंट Mon, 02/15/2016 - 16:56 नवीन
<> <<>> test माझे निम्मे अर्धे प्रतिसाद गायब होतायत .
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/15/2016 - 17:01 नवीन
मला थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीवर काही बेसिक शंका आहेत. काळ, गती, शक्ती आणि वस्तुमानाच्या बाउंड्र्या पार करता आल्या तर टेलीपोर्टेशन शक्य होउ शकेल का? किंवा काळप्रवास. शक्यतो गाणिती सुत्रं मांडावीत थेरी झेपत नाही छोट्या मेंदुला. फिलाडेल्फिया एक्स्पेरिमेंट इझ वन एक्झांपल.
  • Log in or register to post comments
क
काळा पहाड Mon, 02/15/2016 - 18:03 नवीन
काळ, गती, शक्ती आणि वस्तुमानाच्या बाउंड्र्या पार करता आल्या तर टेलीपोर्टेशन शक्य होउ शकेल का?
जरूर. पण या विश्वात नाही. या विश्वाचे नियम सांगतात की गतीचा वैश्विक नियम (ज्याला प्रकाशाच्या गतीची मर्यादा आहे) तो मोडता येणार नाही, कधीच. अवकाशा (स्पेस) ला मात्र गतीचा हा नियम लागू नाही. त्यामुळे अवकाश हा प्रकाशापेक्षा जास्त गतीने विस्तारत आहे.थोडक्यात सांगायचं तर विश्वाच्या निर्मीती मुळे जे अवकाश विस्तारलं जातंय ते प्रकाशापेक्षा जास्त गतीनं विस्तारतंय. पण त्या निर्माण झालेल्या अवकाशातल्या कुठल्याही गोष्टीला प्रकाशाची मर्यादा आहे. शास्त्रज्ञांची टॅकीऑन्स नावाच्या कणांची एक कल्पना आहे. म्हणजे हे कण गणिताचे सर्व नियम पूर्ण करतात पण ते प्रत्यक्षात आहेत की नाहीत हे सिद्ध झालेलं नाही. आणि ते कधी सिद्ध होवू शकेल की नाही याबद्दल साशंकताच आहे. फोटॉन्स (प्रकाशकण) ची उच्चतम गती म्हणजे प्रकाशाची गती आणि न्यूनतम गती शून्य असते. टॅकिऑन्स ची न्यूनतम गती प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त असते. म्हणजे त्यांना शोधणं विज्ञानाच्या सध्याच्या नियमांनुसार बहुधा शक्य नसावं. पण जर एखादं टॅकिऑन्स वापरणारं वाहन असेल तर कदाचित प्रकाशापेक्षा वेगानं (थियरीत तरी) जाता यावं.
किंवा काळप्रवास
आपला सध्याचा प्रवास हा काळप्रवासच आहे. तुमच्या आरशातून प्रतिबिंबीत होणारे प्रकाश किरण तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी काही काळ जावा लागतो. म्हणजे जी प्रतिमा तुम्ही आरशात पहात असता ती जुनी असते आणि तुम्ही भविष्यात प्रवेश केलेला असतो. तुम्हाला भूतकाळात प्रवास करायचा असेल तर त्याबद्दल बरेच वाद आहेत. १. काही म्हणतात की निसर्ग तुम्हाला भूतकाळात जायला प्रतिबंध करेल (कारण तुम्ही एखाद्याच्या आजोबांची हत्या करून त्या माणसाचं वर्तमानकाळातलं आस्तित्व वस्तुस्थितीहीन ठरवू शकता आणि हे फिजिक्स च्या नियमांविरोधात आहे. २. काही म्हणतात की तुम्ही जावू शकता, पण एखाद्याची हत्या करू शकत नाही. ३. विषेशतः मल्टीव्हर्स (अनेक सुष्टी सिद्धांता) चे समर्थक म्हणतात की यावर काही बंधन नाही आणि असं झालं तर काळाची एक नवीन शाखा असं केल्यानं तयार होईल आणि मूळची शाखा बंद पडेल (थोडक्यात, निसर्गाचे नियम पाळले जातीलच). पण भूतकाळात जाण्यानं जर एखादा वैज्ञानिक नियम मोडला जात असेल (उदाहरणार्थ एंट्रॉपी कमी होणे) तर असं होवू दिलं जाणार नाही. तेव्हा यात बरेच इफ्स आणि बट्स आहेत आणि याचं उत्तर कदाचित दूरच्या भूतकाळात असावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 02/15/2016 - 19:15 नवीन
कालप्रवासामधला सगळ्यात मोठा अडथळा किंवा थेरोटिकल धोका म्हणे पॅराडॉक्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ट
टीपीके Tue, 02/16/2016 - 10:21 नवीन
अवकाशा (स्पेस) ला मात्र गतीचा हा नियम लागू नाही. त्यामुळे अवकाश हा प्रकाशापेक्षा जास्त गतीने विस्तारत आहे
विश्वाचे आर्त मध्ये काळ विषयावर लई काथ्या कुटून झाला आहे पण कळला नाही तेव्हा तूर्त काळ विषय ऑप्शनला, पण विश्वाचे आर्त भाग १८ प्रमाणे, सगळ्या गोष्टी म्हणजे ज्यांना वस्तुमान आहे आणि ज्यांना नाही (जसे प्रकाश, खरे तर प्रकाशालाही वस्तुमान असते असे नुकतेच कुठेतरी वाचल्यासारखे वाटते ) त्या सगळ्या अवकाशात असतात. आता अवकाश प्रसारण पावते आहे हा मुद्दा काही निट कळला नाही. उदा. समजा या क्षणाला तुम्ही अवकाशाच्या सीमेवर आहात तर अजून आपल्या एक सेकंदानी ती सीमा अजून ३ लाख किलोमीटर पेक्षाही पुढे असेल बरोबर? तर हे जे काही ३ लाख किलोमीटर अंतर आहे ते आले कुठून? २ सेकंदापूर्वी तेथे काय होते? ते अवकाश नव्हते का? तुम्हाला प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक वेगाने विश्व प्रसरण पावते आहे असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड
ग
गवि Tue, 02/16/2016 - 10:29 नवीन
पॉपकॉर्न कढईत फुलतो तसं विश्व फुलत आहे. पूर्ण स्पेसटाईम प्रसरण पावतो आहे. त्यामुळे दोन विशिष्ट वस्तू एकमेकांपासून दूर जाताहेत असं नसून सर्वच बिंदू एकमेकांपासून दूर जाताहेत. मागे राघांनी उदाहरण दिल्याप्रमाणे तळणीत टाकल्यावर फुलून मोठ्या होणार्‍या गुलाबजामात असलेले वेलदोड्याचे दोन दाणे जसे फुलताना एकमेकांपासून दूर जातील तसं. इथे दाणे दूर गेले असं नसून त्यांच्यामधली स्पेसच प्रसरण पावली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
ह
होबासराव Tue, 02/16/2016 - 10:33 नवीन
मला तरि आता कळाल आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ट
टीपीके Tue, 02/16/2016 - 10:50 नवीन
पॉपकॉर्न किंवा वेलदोडे चे उदाहरण कळले पण तरीही अवकाश प्रसरण नाही कळले , म्हणजे जे अवकाश सीमेचे उदा. मी घेतले त्या अनुशंगाने नाही कळले. माझे उदा. गंडले आहे की मलाच साधी गोष्टी कळत नाही आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Tue, 02/16/2016 - 11:15 नवीन
स्पेसटाईमला सीमा आगोदरपासून ठरलेली अशी नाही. हम जहां पहुंचते है उसे आप सीमा बुला सकते हो, असं आहे. आपण पृथ्वीवरच्या सेटअपनुसार सर्व ठिकाणी काहीतरी असतंच आणि सर्व गोष्टींना सुरुवात अन शेवट (सीमा) असते या चौकटीशिवाय कल्पना करु शकत नाही. त्यामुळे प्रश्न रास्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
त
तिमा Sat, 10/08/2016 - 17:26 नवीन
हम जहाँ खडे रहते है, स्पेस वहाँसे चालू होती है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ब
बबन ताम्बे Tue, 02/16/2016 - 14:31 नवीन
जर आपण खुप ठिपके असलेला फुगा फुगवत गेलो तर त्यावरच्या ठिपक्यांमधले अंतर वाढत जाते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
क
काळा पहाड गुरुवार, 02/18/2016 - 11:20 नवीन
२ सेकंदापूर्वी तेथे काय होते? ते अवकाश नव्हते का?
अवकाश (स्पेस) ही कल्पना या विश्वाशी निगडीत आहे. विश्व नसतं तर अवकाश सुद्धा नसतं. तुम्ही अवकाश अ‍ॅबसोल्यूट मानताय. जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारता, तेव्हा तुम्ही हे गृहीत धरताय की तिथे काहीतरी असायला हवं. तसं नाहीये. विश्वाची सीमा जशी वाढतेय, तसं अवकाश "निर्माण" होतंय. ही कल्पना थोडी अधिक सुलभ होण्यासाठी एक उदाहरण देतो. जर समजा (कल्पनेत) तुम्ही संपूर्ण विश्वाच्या सीमेच्या बाहेर गेलात तर बिग बँगचे पहिले किरण तुमच्या पर्यंत पोहचून तुम्हाला बिग बँग तुमच्या डोळ्यासमोर होताना दिसायला हवं बरोबर? तर तसं होवू शकत नाही. कारण विश्वाच्या सीमेबाहेर काहीही आस्तित्वात नाही. निदान असं काही नाही ज्याचं आकलन आपल्याला होवू शकेल. अवकाश तर नाहीच कारण विश्वच ते बनवतंय.
तुम्हाला प्रकाशाच्या वेगाहूनही अधिक वेगाने विश्व प्रसरण पावते आहे असे म्हणायचे आहे का?
बरोबर. उत्तर गोंधळात पाडणारं पण असं आहे. http://curious.astro.cornell.edu/about-us/104-the-universe/cosmology-and-the-big-bang/expansion-of-the-universe/616-is-the-universe-expanding-faster-than-the-speed-of-light-intermediate any galaxy with a redshift greater than 1.4 is currently moving away from us faster than the speed of light.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टीपीके
ह
होबासराव Mon, 02/15/2016 - 17:40 नवीन
मृत्युनंतर आपले (आत्मा, जीव यांचे वगैरे ) काय होते येथे सायन्स संपून अध्यात्म सुरु होते. नको प्लिज प्लिज :(( विचारलेले प्रश्ण लेखकाच्या द्रुष्टिने जरि बेसिक असले तरि इथे बहुतेक लोकांकरता ते बेसिक नाहियेत. ते आत्मा, सायन्स संपून अध्यात्म वगैरे इथे नको.
  • Log in or register to post comments
ह
होबासराव Mon, 02/15/2016 - 17:43 नवीन
इथे बहुतेक लोकांकरता ते बेसिक नाहियेत including me :)) ते सायन्स संपून अध्यात्म वगैरे गोष्टि एका वेगळ्याच अनुभुतितुन न्यायला इथे एक जण तयारच आहे. तेव्हा ते नको.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 02/15/2016 - 18:01 नवीन
दहशत दहशत म्हणतात ती हीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव
ख
खटपट्या Mon, 02/15/2016 - 23:28 नवीन
विषयाची की काही आयडींची ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 02/16/2016 - 00:48 नवीन
काही आयडी कुठल्याही विषयाला एकाच ठिकाणी घेऊन जातात त्याची
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
च
चिनार Tue, 02/16/2016 - 07:23 नवीन
सर तुमच्या पहिल्या २ प्रश्नांची उत्तरे तर आइनस्टाइन आजोबांच्या सापेक्षता सिद्धांतात मिळतील. तो सिद्धांत कळण्याएवढी बौद्धिक पात्रता आमची नसल्यामुळे पास.. बाकी तज्ञांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेत ! रोचक चर्चा वाचायला मिळणार बहुतेक.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा