काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न
काही बेसिक वैज्ञानिक प्रश्न
तसे आमचे वैज्ञानिक नॉलेज बेसिक असल्याने काही बेसिक प्रश्न मनात आले. आपण याची ऊत्तरे द्याल अशी खात्री आहे.
१.
प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. ( प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light )
समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?
२.
दोन ट्रेन प्रकाशाच्या वेगाने धावत आहेत. पण विरुद्ध दिशेने.
जेव्हा या दोन ट्रेन एकमेकींना क्रॉस करतील तेव्हा पहिल्या ट्रेन मधील observer ला दुसऱ्या ट्रेनचा वेग किती दिसेल?
दुप्पट?
सापेक्ष वेग जरी असला तरी तो प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त कसा असू शकतो?
यालाच जोडून एक उपप्रश्न -
पृथ्वीवर मी ५० किमी प्रतितास वेगाने स्कुटर चालवत आहे. चंद्रावरुन पाहिल्यास ह्याच स्कुटरचा वेग कितीतरी जास्त वाटेल. सुर्यावरुन पाहिल्यास अजून वेगवान वाटेल. दिर्घीकेच्या केंद्रापासून पाहिल्यास अजून अफाट वाढलेला दिसेल. अजून कुठूनतरी पाहिल्यास हाच वेग प्रकाशाच्या वेगाएवढा वाटेल.
यावरुन हा निष्कर्ष काढावा काय?
विश्वातील प्रत्येक गोष्ट ही प्रकाशाच्या वेगाने जात असते.
३.
बिग बँग- विश्वाचा जन्म एका बिंदूच्या स्फोटापासून झालाय असे सर्वमान्य आहे. मात्र स्पोटाअगोदर जर तो एक बिंदू अस्तित्वात असेल तर असे अनेक बिंदू अस्तित्वात असले पाहिजेत. आणि त्यांच्या स्फोटांतून अनेक विश्वे निर्माण झाली असली पाहिजेत.
multiuniverse थेरी ग्राह्य धरली जावी का?
४.
पेशी (cells) आणि विषाणू (virus) जीवनाच्या उगमापासून अस्तित्वात आहे. पेशींचा विकास झाला मग विषाणूंचा का नाही?
पेशींचा विकास विषाणूंच्या वारंवार हल्ल्यांमुळेच होत गेला. विषाणू असे हल्ले का करतात? त्यांचे अंतिम ध्येय काय असावे?
उपप्रश्न - झाडांचाही अजून म्हणावा तसा विकास का झालेला नाही?
५.
प्रतीगुरुत्वाकर्षण -
गुरुत्वाकर्षण म्हणजे आजूबाजूच्या पदार्थाला स्वतःकडे खेचून घेणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण म्हणजे स्वतःपासून दूर ढकलणारे.
प्रतीगुरुत्वाकर्षण असलेला पदार्थ आपल्या कणांनाही दूर ढकलेल आणि त्याचे अस्तित्व लवकरच नष्ट होईल. मुळात असा पदार्थ तयार होणेच शक्य नाही. याचा अर्थ असा घ्यावा काय?
प्रतीगुरुत्वाकर्षण अस्तित्वात नसते.
💬 प्रतिसाद
(71)
र
राजेंद्र मेहेंदळे
गुरुवार, 02/18/2016 - 11:47
नवीन
धाग्याचे नाव वाचुन अपेक्षेने उघडला आणि प्रश्न वाचताना टोपी उडाली. आपला पास!!
स्टिफन हॉकिन्ग्सचे मराठी भाषांतर केलेले "ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम" मोठया हौसेने विकत घेतले. १०० पानी छोटे पुस्तक मी १-२ वर्षे झाली हळुहळु वाचतोय :(
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
गुरुवार, 10/06/2016 - 20:54
नवीन
एस यांचा प्रतिसाद आवडला. विज्ञानात बहुतांश वेळा गणित जास्त बोलते शब्दापेक्षा.
उत्तम धागा अजून प्रश्न आणि उत्तरे येवू द्यात.
https://cosmosmagazine.com/physics/why-can-t-anything-travel-faster-light
In 1964, Bill Bertozzi at MIT accelerated electrons to a range of speeds. He then measured their kinetic energy and found that as their speeds approached the speed of light, the electrons became heavier and heavier – until the point they became so heavy it was impossible to make them go any faster. The maximum speed he could get the electrons to travel before they became too heavy to accelerate further? The speed of light.
सोप्या भाषेत समजा तुम्हाला A या ठिकाणावरून B ह्या ठिकाणी जायचं आहे, तुमच्यावर एक condition आहे कि तुमची प्रत्येक नवीन स्टेप हि जुन्या स्टेप च्या अर्धी असेल. असे करत राहिलात तर तुम्ही कधीच B ठिकाणी पोहचू शकत नाही.
तुम्ही जसे जसे प्रकाशाच्या वेगाकडे झाल तसे तुमचे वस्तुमान वाढेल आणि acceleration कमी होईल ज्यामुळे तुम्हाला प्रकाशाचा वेग घाटता येणार नाही. मग खालील प्रश्न पडतो
१. मग प्रकाशच का प्रकाश्याच्या वेगाने जातो.?
कारण प्रकाश म्हणजे photons ज्याच खर वस्तुमान शून्य आहे, त्यमुळे तो सर्वोत्तम वेग घेवू शकतो. म्हणूनच MIT मध्ये इलेक्ट्रोन वर केलेल्या प्रयोगात प्रकाशाचा वेग achieve करता आला नाही कारण कितीही झाल तरी इलेक्ट्रोन ला थोडफार वस्तुमान आहेच. हे वाचल्यावर पुडाचा प्रश्न पडतो
२. photon वस्तुमान नाही तर प्रकाश energy कसा carry करतो कारण E=m*c*c. तसेच black होल प्रकाश कसे वळवू शकते ?
याच उत्तर इथ मिळतंय. photon च real mass शून्य असल तरी relativistic mass शून्य नाहीये. photon ची energy momentum मधून मिळते. मग अता पुढचा प्रश्न पडतो
३. प्रकाश अंदाजे ३ लाख किलोमीटर पर सेकंद vaccum मध्ये ह्याच वेगाने का जातो
आता याच उत्तर थोड कठीण आहे आणि सध्या यावर संशोधन चालू आहे. पण खात्रीलायक माहिती इथे वाचू शकता. प्रकाश हा electromagnetic wave आहे, त्यामुळे electromagnetic properties of the quantum vacuum आणि Maxwell थेअरी वापरून संशोधकांनी प्रकाशाचा वेग काडला आणि काय by surprise तो तेवदाच निघाला. पण यासाठी संशोधकांनी काही assumptions वापरल्या मुळे हे उत्तर अजून satisfying नाहीये.
आणखीन प्रश्न पडलेत जालावर उत्तरे शोधणे चालू आहे. काही प्रतिसादातून छान माहिती मिळाली
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 10/08/2016 - 15:48
नवीन
१) प्रकाशाच्या वेगानं जाण्याऱ्या यानात मी बसलो आहे. (प्रकाशाच्या वेगानं म्हणजे 99.99% of light) समजा माझ्या हातात एक बंदूक आहे. आणि त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती? प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त ?
= समजा मी आणि तुम्ही काही ठरावीक (परंतू कॉन्स्टंट) वेगाने जात आहोत. आता माझ्या दृष्टीकोनातून मी स्थीरच असेल आणि तुम्ही काही वेगाने जाताना दिसाल, आणि तुमच्या दृष्टीकोनातून तुम्ही स्थीर असाल आणि मी काही वेगाने (आणि विरुद्ध दिशेने) जाताना दिसेल. (हा परिणाम गाडी मधून जाताना झाडे मागे पळतात, यातून दिसतो). लक्षात घेण्यासारखी गोष्ट आशी की "स्थिरता" आणि "कॉन्स्टंट वेग" या संकल्पना सापेक्ष आहेत, निरपेक्ष नाहीत (आपल्या दृष्टीकोनातून आपण स्वतःला स्थिरच मानतो). कोण स्थिर आहे आणि कोण कॉन्स्टंट वेगाने जाते आहे हे सांगता येत नाही. या तत्वाला "गॅलीलीयन इन्व्हेरियन्स किंवा गॅलीलीयन रिलेटिव्हीटी" म्हणतात.
आता तुमच्या प्रश्नाच्या संदर्भात गॅलीलीयन इन्व्हेरियन्स वापरून पाहू. समजा तुम्ही कॉन्स्टंट वेगाने (99.99% of light) जात आहात. परंतू कितीही वेगाने जात असाल तरी तुमच्या स्वतःच्या दृष्टीकोनातून तुम्ही स्थीरच असायला हवे, आणि पृथ्वी विरुद्ध दिशेने 99.99% of light वेगाने जाताना दिसायला हवा तसेच पृथ्वी वरच्या माणसाला तो स्वतः स्थीर आहे आणि तुम्ही 99.99% of light वेगाने जात आहात असे दिसायला हवे. मात्र गॅलीलीयन इन्व्हेरियन्स नुसार ही दोन्ही निरिक्षणे (तुमचे आणि पृथ्वीवरच्या माणसाचे) सापेक्ष असतील (म्हणजे आपापल्या दृष्टीकोनातून बरोबर असतील). अॅबसोल्यूट बरोबर आणि चूक कोणीही नसेल कारण वेग कोणातरी सापेक्षच मोजावा लागतो.
समजा तुमच्या गोळीच्या वेगामध्ये काही फरक पडला (म्हणजे तुम्ही पृथ्वीवर असतानाचा तीचा वेग आणि वेगवान यानात बसून मोजलेला वेग) तर तुम्हाला निश्चीतपणे सांगता येयील की तुम्ही वेगात जात आहात आणि पृथ्वी स्थीर आहे. परंतू गॅलीलीयन इन्व्हेरियन्स नुसार तुम्हाला असं निरपेक्षपणे कधीच सांगता येत नाही. याचाच अर्थ तुम्हाला गोळीचा वेग तेवढाच दिसायला हवा जेवढा पृथ्वी वरच्या माणसाला दिसतो आहे.(१)
आता पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीकोनातून विचार करून पाहू? त्याच्या दृष्टीने तर तुम्ही वेगवान यानात बसून जात आहात, तुमचा वेग 99.99% of light आहे आणि स्वतः (पृथ्वीवरच्या माणूस) स्थिरच आहे. मग त्याला तुमच्या गोळीचा वेग हा "0.9999 c + गोळीचा वेग" एवढा दिसेल का? समजा गोळीचा वेग 20% of light होता, तर पृथ्वीवरच्या माणसाला तो 119.99% of light वाटेल का? परंतू हा तर प्रकाशापेक्षा जास्त वेग झाला, आणि प्रकाशापेक्षा जास्त वेग असणे म्हणजे कार्यकारणभावाच्या वेगापेक्षा जास्त वेग असणे, जे शक्य नाही. म्हणजे पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीनेही गोळीचा वेग प्रकाशापेक्षा कमी असायला हवा.(२). आता (१) वरून असे कळते की पृथ्वी वरच्या माणसाने मोजलेला वेग आणि तुम्ही यानामधून मोजलेला वेग हे दोन्ही सारखेच हवेत. हे वेग सारखेच मोजले जाण्यासाठी "पृथ्वी वरच्या व्यक्तीच्या दृष्टीकोनातून यानाचे अवकाश आकुंचन पावलेले असायला हवे" (म्हणजे पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीकोनातून ज्याला १ मीटर म्हणतात त्यापेक्षा कमी अंतराला यानातील व्यक्ती १ मीटर म्हणेल) आणि "यानामधले घड्याळही पृथ्वीच्या दृष्टीकोनातून हळू चालायला हवे." (म्हणजे पृथ्वीवरच्या माणसाच्या दृष्टीकोनातून ज्याला १ सेकंद म्हणतात त्यापेक्षा जास्त वेळाला यानातील व्यक्ती १ सेकंद म्हणेल). त्याचप्रमाने पृथ्वीचे अवकाश आणि काळ यानाच्या दृष्टीकोणातून प्रसरण पावलेले असायला हवेत. अंतर व काळ कीती प्रमाणात बदलेल हे सांगणार्या सूत्रांना लोरेन्ट्झ ट्रान्स्फॉर्मेशन म्हणतात. अंतर आणि वेळ यांचा भागाकार करून वेग मिळेल जो दोघांसाठीही सारखाच असेल (अवकाश आणि काळाचे आकुंचन प्रसरण सारख्याच प्रमाणात झाल्यामुळे).
बाकीचे नंतर टाईप करतो.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sat, 10/08/2016 - 18:54
नवीन
अगदी अगदी!
हे पहा Hafele–Keating experiment
याच्यामध्ये चार ऑटोमिक घड्याळे पृथ्वी भोवती दोनदा फिरवण्यात आली. पहिल्यांदा पूर्वेकडून आणि नंतर पश्चिमीकडून, त्यानंतर ती एकमेकांबर तुलना करण्यात आली. त्यावरून असे आढळून आले की time reading मध्ये फरक आहे आणि तो रेलटीव्हीटी थेअरी ने प्रेडीक्ट केल्यानुसार आहे. याला time dialation पण म्हणतात, वर काही प्रतिसादात याचा उल्लेख आहे.
अवांतर - ऑटोमिक घड्याळाची accuracy आहे 10^-9 सेकंद प्रति दिवस.
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sat, 10/08/2016 - 19:02
नवीन
क्षमस्व. ती एकमेकांबर नाही तर reference clocks at the U.S. Naval Observatory बरोबर compare करण्यात आली. खालील लिंक मध्ये पूर्वेकडे जाणाऱ्या विमानातील घड्याळातील time lost आणि पश्चिमेकडे जाणाऱ्या घड्याळातील time gain खालील लिंक मध्ये आहे.
http://hyperphysics.phy-astr.gsu.edu/hbase/relativ/airtim.html
- Log in or register to post comments
श
शब्दबम्बाळ
Sat, 10/08/2016 - 22:58
नवीन
खूप चांगल्या प्रकारे सांगितलंत! लोरेन्ट्झ ट्रान्स्फॉर्मेशन बद्दल कशा प्रकारे लिहू विचार करत होतो पण आपण सोप्या शब्दात मांडणी केलीत!
अजून माहिती येऊ द्यात! :)
- Log in or register to post comments
त
तिमा
Sat, 10/08/2016 - 17:32
नवीन
बंदुकीच्या गोळीचा स्पीड प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असला तर यान जोराने पुढे जाताना ती गोळी, बंदुक मारणार्याच्याच छातीत घुसेल का ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sat, 10/08/2016 - 18:44
नवीन
नाही,
- Log in or register to post comments
म
मिहिर
Sat, 10/08/2016 - 21:37
नवीन
ह्याचे कारण समजून घ्यायला प्रकाशाच्या वेगाजवळची उदाहरणे घ्यायचीही गरज नाही. ह्या प्रश्नालाच समांतर दुसऱ्या प्रश्नाचा विचार करता येईल. समजा मी रेल्वेत उभा आहे व हातातून चेंडू वरच्या दिशेने फेकतो. चेंडूला आडव्या दिशेने (माझ्या गतीला समांतर) कोणताच वेग नाही, पण मी रेल्वेबरोबर पुढे जातो आहे, तर चेंडू माझ्या मागे पडेल का? ह्याचे आपल्या अनुभवातले उत्तर नाही असे आहे. कारण मुळात रेल्वेत असल्याने मला आणि चेंडूलाही रेल्वेचा वेग प्राप्त झाला आहे.
मूळ धाग्याबद्दल:
आबांनी अगदी योग्य प्रकारे मुद्दा मांडला आहे. बंद डब्यामध्ये केलेला कोणताही प्रयोग डबा स्थिर असणे किंवा एकसमान वेगाने जात असणे ह्यातला फरक सांगू शकत नाही. पण आबांनी "याचाच अर्थ तुम्हाला गोळीचा वेग तेवढाच दिसायला हवा जेवढा पृथ्वी वरच्या माणसाला दिसतो आहे." असे म्हटले आहे त्याच्याशी असहमत आहे. गोळीचा वेग ही मूलभूत राशी नव्हे. वेगवेगळ्या वेगाने जाणारे निरीक्षक सारखीच मोजमापे करतील हे खरे नसून ही मोजमापांना जोडणारे मूलभूत नियम सारखेच असतील. उदा. प्रकाशाच्या ९९% वेगाने जाणारे यान व त्यातून २०% वेगाने सोडलेल्या गोळीचे उदाहरण घेतले, तर गोळीचा यानातून मोजलेला वेग प्रकाशाच्या २०% असेल तर स्थिर निरीक्षकाने मोजलेला वेग हा (०.९९+०.२)/(१+०.९९*०.२) = ०.९९३३ म्हणजे प्रकाशाच्या ९९.३३% असेल. आबांनी जे म्हटले आहे ते प्रकाशाचा वेग मोजण्यासाठी बरोबर आहे.
प्रश्न क्र. २ आणि ३ यांची उत्तरेही अशा प्रकारेच देता येतील. अ-ब चा सापेक्ष वेग = अचा वेग - बचा वेग हे आईनस्टाईनच्या सापेक्षतेच्या सिद्धांतात खरे नाही. कारण त्या सूत्रात अ आणि बची घड्याळे नेहमी एकाच गतीने चालतील असे गृहीत धरले आहे. अधिक माहितीसाठी हे पाहा. दोन वस्तूंचे वेग कितीही असले तरीही सापेक्ष वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त येऊ शकत नाही. दुव्यातील सूत्रात वेगांच्या वेगवेगळ्या किमती घालून खेळून बघता येईल.
बिग बँगबद्दल विचार करताना आख्खे विश्व एका बिंदूतून जन्माला आले असा विचार करण्याऐवजी आपल्याला ज्ञात विश्व (observable universe, म्हणजे विश्वाच्या ज्या ज्या भागातून आपल्यापर्यंत प्रकाशकिरण पोहोचू शकतात/पोहोचतात असा भाग) हे एका बिंदूतून आले असा विचार करा. उदा. आज ज्ञात विश्वाचा आकार (त्रिज्या) क्ष आहे. अनेक वर्षांपूर्वी ही क्ष/२ असेल, अजून काही वर्षांपूर्वी क्ष/४ असेल, असे करत बिग बँगवेळी ती ० असेल. ह्याचा अर्थ बिग बँगची सुरुवात आज आपण जिथे आहोत तिथून झाली असा होतो का? तर नाही. दूरवरच्या एखाद्या दीर्घिकेतून दिसणारे दृश्य विश्व अगदी वेगळे असेल. तिथल्या ज्ञात विश्वाची त्रिज्या कमी करत करत कोणता तरी दुसराच बिंदू हा बिग बँगचा सुरुवातीचा बिंदू म्हणून सांगता येईल. बिग बँग विश्वातल्या प्रत्येक ठिकाणी झाला. हे थोडे गोंधळवणारे झाले असल्यास क्षमस्व. अधिक माहितीसाठी व्हेरिटॅसियमचा हा व्हिडिओ पाहावा.
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 10/08/2016 - 21:57
नवीन
तुमचे बरोबर आहे
"याचाच अर्थ तुम्हाला गोळीचा वेग तेवढाच दिसायला हवा जेवढा पृथ्वी वरच्या माणसाला दिसतो आहे."
असे म्हणायचे नाही
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Sun, 10/09/2016 - 01:28
नवीन
मला हेच लिहायचं होतं. वेग, वस्तुमान, काळ या सर्व गोष्टी निरीक्षक सापेक्ष आहेत. निरपेक्ष आहेत ते भौतिकीचे नियम.
जर जवळपास प्रकाशाच्या वेगाने जाणाऱ्या व्यक्तीने गोळी झाडली (समजा प्रकाशाच्या निम्म्या वेगाने) तर त्या गोळीचा बंदूकसापेक्ष वेग पृथ्वीवरच्या निरीक्षकाला अतिशय कमी दिसेल, जेणेकरून गोळीचा एकंदरीत वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असेल. ते भौतिकीच्या नियमांत बसण्यासाठी गोळीचं वस्तुमान प्रचंड वाढलेलं दिसेल.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
Sun, 10/09/2016 - 17:31
नवीन
आपल्या समोर प्रवासात एखादी सुंदर युवती बसली असेल तर वेळ पटकन जातो.उलट बाहेरून प्रखर उन जर खिडकीतून आत येत असेल तर वेळ जात नाही. शेवटी निरीक्षक कसे बघतो काय बघतो यावर सारे अबलंबून आहे. ))) सापेक्ष आहे सारं !
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 10/09/2016 - 07:54
नवीन
उत्तम प्रतिसाद. दोन्ही लिंक पहिल्या. शेवटचा परिच्छेद गोंधलात टाकणारा आहे.
व्हिडीओ मध्ये अस म्हटलंय कि जर विश्व हे अनंत असेल तर ते कायम अनंत असायला हवं अगदी बिग बँग वेळी सुद्धा. म्हणजे याचा अर्थ असा घ्यायचा का कि बिग बँग चे सुरवातीचे बिंदू (singularity) सुद्दा अनंत आहेत ? याअगोदर मी संपूर्ण विश्वाचा एकच सुरवातीचा बिंदू होता असे समजत होतो ते चुकीचं आहे का ?
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 10/09/2016 - 08:32
नवीन
बिग बँग शेवटी एक कल्पना आहे, चुकीची असू शकते,
- Log in or register to post comments
ए
एस
Sun, 10/09/2016 - 10:08
नवीन
असं समजा की बिग बँग च्या वेळी जो एकच बिंदू अस्तित्त्वात होता तो बिंदू म्हणजे एक मोठा फुगा आहे. आणि तुम्ही त्या फुग्यात बसलेले आहात. तो फुगा अतिसूक्ष्म आहे. पण त्या फुग्याच्या बाहेर काही आहे की नाही हे जाणून घेण्याचा कुठलाच मार्ग तुमच्याकडे नाहीये. आता महास्फोटानंतर तो फुगा विस्तारत चालला आहे. आणि तो आता आपल्या विश्वाच्या आकाराइतका झाला आहे. तुम्हांला अजूनही त्या फुग्याच्या बाहेर काही असेल की नाही हे सांगता येणे किंवा जाणून घेणे शक्य नाहीये. आता येतंय का लक्षात?
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Sun, 10/09/2016 - 10:15
नवीन
हे म्हणन एवड सोप नाहीये, याचा पुरेसा अभ्यास न करता अस म्हणन तर चुकीच आहे असे मी म्हणेन. बिग बँग ला alternative म्हणून इतर मोडेल्स किंवा hypothesis मांडली गेली आहेत, परंतु आतापर्यंत हजारो संशोधक चे संशोधन, अत्याधुनिक lab आणि telescope यांची निरीक्षणे, General relativity ची equations आणि predictions एकच दर्शवितात कि बिग बँग हेच बहुतांश मान्य मॉडेल आहे. ह्या मॉडेल मध्ये बदल हि घडू शकतात, पण सध्याच्या संशोदनावरून हे मॉडेल पूर्ण चुकीच नाहीये.
अर्थात काही संशोधक याच्या विरोधात आहेत/होते, आणि alternative मॉडेल त्यांनी मांडलेली आहेत पण ती सर्वमान्य नाहीत, अधिक प्रकाश जाणकार टाकू शकतील. माझी चुकी असेल तर दुरुस्त हि करा.
तरी वरील प्रश्नाची उत्तरे मिळावीत हि अपेक्षा.
- Log in or register to post comments
म
मिहिर
Sun, 10/09/2016 - 22:52
नवीन
हो. समतुल्य उदाहरण म्हणून संख्यारेषेचा विचार करा ज्यावरील पूर्णांकांतील अंतर आज १ मीटर आहे. मी आख्खी संख्यारेषा आकुंचन पाववत गेलो, तर पूर्णांकांतील अंतर कमी होत जाईल. पण संपूर्ण संख्यारेषा एकाच बिंदूत माववता येईल असे म्हणता येईल का? अशाच प्रकारे विश्व सान्त असेल तर संपूर्ण विश्व एकाच बिंदूतून निर्माण झाले असे म्हणता येईल, अनंत विश्वाबद्दल असे म्हणता येणार नाही. हे जरा अजून चांगल्या प्रकारे इथे सांगितले आहे.
पण ह्या चित्रात विश्वाचा आकार अगदी लहान असताना नक्की काय होईल हे सांगण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची क्वांटम थिअरी हवी. गेली अनेक दशके आईनस्टाईनचे गुरुत्वाकर्षण (सामान्य सापेक्षता) आणि पुंजभौतिकी (क्वांटम फिजिक्स) ह्यांची सांगड घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे बहुतांश फिजिसिस्ट आजच्या थिअरीनुसार सिंग्युलॅरिटी असेल, पण क्वांटम ग्रॅव्हिटीची बरोबर थिअरी सापडल्यावर सिंग्युलॅरिटी असेल/नसेल, स्वरूप कसे असेल हे आत्ताच सांगता येत नाही असे म्हणतात.
संदीप डांगे, बिग बँग ही केवळ कल्पना नाही. ह्या सिद्धांताने वैश्विक पार्श्वप्रारण, दीर्घिकांचे गुच्छ (गॅलॅक्सी क्लस्टर्स) किती निर्माण होतील अशी अनेक भाकिते अचूक वर्तवलेली आहेत. आता सिंग्युलॅरिटीचे स्वरूप काय, डार्क मॅटर नक्की कशाचे बनले आहे असे अनेक प्रश्न अजून अनुत्तरित असले तरी त्यामुळे हा सिद्धांत केवळ कल्पना आहे; चूकही असू शकतो, बरोबरही असू शकतो असे नाही.
- Log in or register to post comments
स
संदीप डांगे
Sun, 10/09/2016 - 23:54
नवीन
तुम्हा तिघांचेही अनेक धन्यवाद!
- Log in or register to post comments
अ
अमितदादा
Mon, 10/10/2016 - 19:42
नवीन
प्रश्नाच उत्तर मिळाल. लिंक वाचली. खालील वाक्ये अगदी महत्वाची आहेत
So at the Big Bang we have the very odd situation where the spacing between every point in the universe is zero, but the universe is still infinite. The total size of the universe is then 0(zero) × ∞(infinity), which is undefined.
- Log in or register to post comments
म
मराठमोळा
Mon, 10/10/2016 - 03:00
नवीन
प्रश्न आवडले आणि त्यापेक्षा हे प्रश्न पडतात हे जास्त महत्वाचे. मी बर्याच वर्षांपासून फिजिक्स, अॅस्ट्रोफिजिक्स आणि काही ईतर शास्त्रांमधील शोध, विकास यावर नजर ठेवून आहे (आवड म्हणून). माझं निरिक्षण असं आहे की आजही आपल्याला (मानव जातीला) फारच कमी माहिती आहे. जितके शोध लागतात त्यापेक्षा जास्त क्लिष्ट प्रश्न निर्माण होतात. आज जे अश्क्य वाटते ते थोड्याच काळात शक्य वाटू लागते.
आवड अस्ल्यास काही युट्युब चॅनेल सुचवतो, बर्याच प्र्श्नांची उत्तरे तिथे मिळतील आणि प्रश्नही विचारु शकता.
१. PBS Nova - https://www.youtube.com/user/NOVAonline/videos
२. PBS Space Time - https://www.youtube.com/channel/UC7_gcs09iThXybpVgjHZ_7g
३. Curiosity stream - https://curiositystream.com/
४. डी न्युज - https://www.youtube.com/channel/UCzWQYUVCpZqtN93H8RR44Qw
५.टेड एड - https://www.youtube.com/teded
धन्यवाद.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 10/11/2016 - 00:30
नवीन
> त्यातून मी समोरच्या दिशेने एक गोळी झाडली तर त्या गोळीचा वेग किती?
बुलेट ची गती निर्धारीत करण्याचा फॉर्मुला खालील प्रकारे आहे :
w = (u + v)/(1 + uv/c²)
अर्थात आपण प्रकाशाच्या वेगाने जात असल्याने आपल्यासाठी काळाची गती मंदावेल आणि तुम्हाला साधारण बंदूक झाडल्याप्रमाणेच जाणवेल.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2