जे. एन. यु. एक वेगळा विचार
सध्याचा ज्वलंत आणि चघळुन झालेला हा विषय आहे, पण तरीही काही मुद्दे मांडायचा प्रयन्त करतो. या प्रकारात डावे आणि उजवे यांच्यात सरळ लढत झालेली दिसते. यात भाजपाचे काही आडाखे व डाव असतील आणि डावे त्यात अडकले असे वाटते. १० फेब्रु. पासुन या प्रकरणाची सुरुवात झालेली आहे. भाजपाला रोहित प्रकरण आणि दादरी प्रकारात जो धक्का बसला त्याची भरपाई करायची संधी डाव्यांनी दिली. भाजपाला अशी संधी हवीच होती. यामुळे भाजपा विरुध्द डावे + काँग्रेस यांची जुंपली बाकी सगळे गंमत पाहत आहेत. अफजलबाबत दिलेल्या घोषणांची ध्वनीचित्रफीत जशी अभाविप ने जाहीर केली तसे या घटनेतील ताकद आणि जनभावना बदलण्याची क्षमता भाजपाच्या नेत्यांना लगेच लक्षात आली असेल. (कदाचित वरीष्ठांना अगोदरच हे माहित असेल. त्यांनी ध्वनीचित्रफीत पाहिली असेल. नंतर तिला प्रसिध्दी दिली गेली.) त्यातच डाव्या नेत्यांची मुले त्यात पाहुन तर आनंदच झाला असेल. त्यातच पुढे प. बंगालची निवडणुक आहे. असा पत्ता हातचा सोडणे भाजपाला शक्यच नव्हते. हे झाले नेपथ्य. प्रकरण उघड झाल्यावर त्यावर अपेक्षीतपणे डाव्यांनी कडवी प्रतिक्रिया दिली. राहुल गांधींनी त्याचे मस्त पणे समर्थन केले. काँग्रेसी नेते त्यामागे फरपटत गेले. राहुल गांधींनी जे.एन.यु. ला भेट देउन आगीत तेल ओतले. भाजपाने कन्हैयाला अटक करुन त्यात दुसरी चाल खेळली. खरे तर त्याला अटक केली नसती तरी चौकशी करुन काम भागत होते. (हे माझे मत आहे.) भाजपाने आपल्या ईतर संघटना यात उतरवुन दबाव कायम ठेवला. यात भाजपाला बर्यापैकी लाभ झाला आणि ते याचा पुढे बराच वापर करतील.
१. भाजपा भारतातील तमाम जनतेला हे दाखविण्यात यशस्वी झाले की जे. एन. यु. मध्ये भारतविरोधी कार्यक्रम होतात.
(बर्याच लोकांना हे माहित नाही की भारताच्या नितीनिर्धारणात जे.एन.यु. ने किती हातभार लावलाय ते.)
२. या कार्यक्रमात डावे पुढाकार घेतात, त्यांना आपल्या फायद्यापुढे देशाचे महत्व नाही हे सिध्द केले.
३. अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुध्द देशभक्ती यात जनतेने नैसर्गिकपणे देशभक्तीला प्राधान्य दिले.
४. कितीही नाही म्हटले तरी सगळ्या प्रकरणात भाजपाला फायदाच झालेला आहे.
५. भविष्यात जे.एन.यु. वा तत्सम संस्थांमध्ये आपले हातपाय पसरायला भाजपाला या प्रकरणाचा पुरेपुर उपयोग होणार.
६. डाव्यांची छुपी सत्ता आणि वर्चस्व तोडणे हा प्रकरणाचा सगळ्यात मोठा फायदा भाजपाला पुढील काळात होणार.
मागे एका ठिकाणी म्हटल्यानुसार अश्या साठमार्या भाजपा आणि त्यांच्या संघटना पुन्हा पुन्हा करणार. कारण राजकारणात सत्ता नुसती दिसुन चालत नाही तर तिचा भविष्यासाठीसुध्दा वापर करायचा असतो.
💬 प्रतिसाद
(128)
क
कपिलमुनी
Tue, 02/23/2016 - 19:52
नवीन
पप्पू आणि फेकू दोन्ही दाखवले
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 02/23/2016 - 20:16
नवीन
प्रश्न काय विचारला आहे, त्याला थोडक्यात उत्तर देयचे असते. नाहीतर उद्या कोणी बे दुणे किती विचारल्यास, बे दुणे चार आणि तीन दुणे सहा असले काहीतरी म्हणले म्हणून जास्त मार्क मिळणार नाहीत. असो.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Wed, 02/24/2016 - 12:59
नवीन
ईथे उणीदुणी चाल्लीत , त्यामुळे दोन विचारले की चार सांगावे
- Log in or register to post comments
प
पिशी अबोली
Sun, 02/21/2016 - 09:29
नवीन
मग आत्ता जनतेचा जो जेएनयूविरोधात रोष आहे, तो जस्टिफाइड वाटतो ना तुम्हाला?
जनतेच्या मोठ्या बहुमताने निवडून आलेले मोदी सरकार पहिल्या क्षणापासून वाईट नव्हते ना?
झुंडशाही आणि जनतेचे बहुमत यातल्या तुमच्या मते सीमा काय आहेत ते एकदा समजावून सांगा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 02/21/2016 - 10:19
नवीन
खोट्या बातम्या हा शब्द आपण गाळलात की वाचलाच नाही?
जनतेला जेएनयु ही राष्ट्रविरोधी कारवायांचा अड्डा आहे हे सर्वात आधी कुणी सांगायला सुरुवात केली ते शोधून घ्या. रोषाची बिजपेरणी कशी होते ते लक्षात येईल.
मोदी सरकार आता वाईट झाले आहे असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मोठ्या बहुमताच्या जोरावर झालेल्या शाहबानो सारख्या घटना आपणास पसंत आहेत का? गुजरातमधल्या मुसलमानांच्या कत्तली आपणास झुंडशाही वाटत नाही का? आझाद मैदानावरील हिंसक मोर्चा हा झुंडशाही नाही का? मालदा-हरयाणासारख्या घटना ह्या झुंडशाही नाहीतर अजून काय आहे?
खुल्या वातावरणात सर्व प्रकारच्या विचारांचे आदानप्रदान होऊन एक सामायिक, स्वस्थ विचार पुढे येणे त्याद्वारे देशाचा कारभार चालणे ह्याला मी जनतेचे बहुमत समजतो. २०१६ साली जनतेने ज्या मुद्द्यांवर मोदी सरकार निवडून आणले तो हा विकासाच्या मुद्द्याचा सामायिक स्वस्थ विचार होता. पण सत्ता हातात आल्यावर जे सरड्यासार्खे रंग बदलले त्याला जनतेचे बहुमत समर्थक आहे असे समजू नये. आपल्या छुप्या अजेंड्याला राबवण्यासाठी खोट्या बातम्या तयार करुन जनमत भडकवने म्हणजे जनतेचे झुंडशाहीत रुपांतरण करणे होय.
देशभक्तीचे लेबल लावले की आपली कुठलीही हिंसक, अवमानकारक, घटनाविरोधी कृती योग्यच आहे हा विचार झपाट्याने पसरत जात आहे. हे देशातल्या सामान्य जनतेसाठी घातक आहे. सामान्य म्हणजे ह्यात सर्व जातीधर्माचे, व्यवसायाचे, वर्गांचे लोक आहेत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Sun, 02/21/2016 - 13:19
नवीन
अहो तजो, पिअतै तुमच्याच वैचारीक दृष्टीच्या जवळ असाव्यात बहुतेक, काही गैरसमज झालाय का तुमचा पिअतैंच्या प्रश्नांबद्दल ?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Sun, 02/21/2016 - 22:44
नवीन
तजो,
हिंदूंचं हित प्रथम हा संघाचा (पर्यायाने भाजपचा) अजेंडा आहे. आणि तो छुपा नाही. याच्याच बरोब्बर विरुद्ध पवित्रा ओवैश्याचा आहे. त्याच्या अजेंड्यात मुस्लिम प्रथम आहेत. आणि तोही छुपा नसून उघड आहे. तस्मात झुंडशाहीतून छुप्या अजेंड्यास वगळावे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 02/21/2016 - 22:56
नवीन
हिंदूंचं हित प्रथम हा संघाचा (पर्यायाने भाजपचा) अजेंडा आहे. आणि तो छुपा नाही
>> मला वाटलं समस्त भारतीयांचं हित प्रथम हा भाजपचा खुला अजेंडा आहे की काय? खैर, कोई बात नही.
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Tue, 02/23/2016 - 20:26
नवीन
एक छोटासा प्रश्न जर तुम्हाला कोणी आई बहिणीवरुन
शिव्या दिल्यातर अभिव्यक्ती स्वंतत्र म्हणून ऐकून
घ्याल कि बोलणाऱ्याचे दात घशात घालाल?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 07:11
नवीन
तुमच्या प्रतिसादावरुन माझे जर असे मत झाले की तुम्हाला माझ्या आईबहिणींना कचकचून शिव्या द्यायच्या आहेत तर मी तुमचे मुस्काट फोडले तर चालेल का?
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 02/24/2016 - 12:46
नवीन
माझ्या प्रश्नाचे हे उत्तर नाही
तरी सुध्दा जर कोण शिव्या देत असेल तल थोबाड
फोडायलाच पाहिजे
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 12:51
नवीन
तुम्हाला माझा प्रतिसाद समजलाच नाही. अर्थ असा होता की तुमच्या प्रतिसादावरुन मला असा संशय आहे की तुम्हाला माझ्या आईबहिणींना शिव्या द्यायच्या आहेत. मला असं वाटलं म्हणुन मी तुमचं थोबाड फोडलं तर चालेल का?
असो. सोप्या भाषेत, थोबाड त्याचंच फोडाल ना ज्याने शिव्या दिल्यात की संशयावरुन जो दिसेल त्याला मारत सुटाल?
- Log in or register to post comments
ध
धनावडे
Wed, 02/24/2016 - 18:27
नवीन
म्हणजे घोषणा दिल्याच नाहित का?
आणि तुमचा प्रश्न समजला मला
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 18:47
नवीन
घोषणा एकाच्या, अडकवले दुसर्याला. बदनाम पुरी युनिवर्सिटी.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 02/24/2016 - 19:37
नवीन
खून करतो (संघात नसलेला) नथूराम. बंदी आणतात संघावर आणि गांधीहत्येच्या वेळेस जन्माला देखील न आलेल्या आजच्या संघस्वयंसेवकांना देखील आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्यासारखे वागवले जाते....
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 02/24/2016 - 19:44
नवीन
एवढा अभ्यासू माणूस एवढं सुप्राट लॉजिक लावेल असे वाटले नव्हते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2016 - 10:04
नवीन
म्हणजे सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेले कन्हैयाकुमार, उमर खलिद, अर्नबान आणि अजून विद्यापीठात दडून बसलेले त्यांचे ३ सहकारी यापैकी कोणीही घोषणा दिलेल्या नसून त्यांना पोलिसांना अडकावले आहे असा वरील वाक्याचा अर्थ आहे का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 02/25/2016 - 10:24
नवीन
आता प्रकरण न्यायप्रविष्ट झाले आहे. पूर्ण चौकशी, न्यायालयाचा निर्णय झाल्यावरच सत्य कळेल. न्यायालयाचा निर्णय सर्वथा मान्य असेल .
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2016 - 10:29
नवीन
ते आहेच. पण घोषणा एकाच्या व अडकवले दुसर्याल याविषयी जरा सांगता का?
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 02/25/2016 - 18:10
नवीन
न्यायालयाचा निर्णय सर्वथा मान्य असेल.
तुम्हाला असेल कदाचीत... पण या स्वयंघोषित लिबरल्स आणि बाप्या मुलांना (पक्षी: जे एन यु च्या विद्यार्थ्यांना, ज्यांना बरखाताई किड्स म्हणतात) न्यायालयाने परत परत तपासणी करून दिलेला निर्णय मान्य नाही ना!
आज एकीकडे कन्हैय्याला एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तर दुसरीकडे पोलीसांना उमर आणि इतरांच्या आवाजाचे नमुने घेण्यास नकार दिला आहे... म्हणलं तर न्यायालये स्वतंत्रच राहात आहेत. पण उद्या जर का चुकून सौम्य पण देशद्रोह ठरवत काही शिक्षा केली तर हे सगळे तमासगीर* काय करतील ते बघा!
* कला म्हणून आणि पोटापाण्यासाठी कला वापरणार्या खर्या तमासगिरांची क्षमा मागून... :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 02/21/2016 - 10:22
नवीन
झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली काय केले जाऊ शकते ह्याचे उदाहरण म्हणून बडोदा डायनामाईट केस मिळवुन वाचा.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2016 - 08:17
नवीन
तुम्हीच एक धागा काढा ना त्या प्रकरणाबद्दल. त्याआधी झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय कसा फिरविण्यात आला व त्यानंतर आणिबाणी कशी लादण्यात आली तेही लिहा. त्याचप्रमाणे झुंडशाही आणि जनतेच्या बहुमताच्या नावाखाली शहाबानो प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवून मुस्लिम धर्ममार्तंडांसमोर साष्टांग लोटांगण घालून मुस्लिम महिलांची गळचेपी कशी करण्यात आली तेही लिहा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 09:11
नवीन
अरे रे गुरुजी, काय झालं? ही कमेंट वाचली नाही का?
http://www.misalpav.com/comment/806845#comment-806845
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2016 - 15:53
नवीन
आपल्या आधीच्या कॉमेंटचा आणि बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काहीतरी संबंध आहे का? बहुमताचा वापर करून आणिबाणी आणली गेली, शहाबानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरविला गेला ... काँग्रेसने बहुमताचा वापर अशा अनेक देशविघातक गोष्टींसाठी केला. म्हणून तर मी तुम्हाला बडोदा डायनामाईट केसविषयी धागा काढून सविस्तर लिहायला सांगितले. बघूतरी झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 09:15
नवीन
तसेच बडोदा डायनामाईट केसबद्दल म्हटलंय. गुजरात दंगलीबद्द्ल नाहीये ते. काविळ झाली की निष्पक्ष विधानही कसे वाचल्या जाते याचे उत्तम उदाहरण दिलंय.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 02/22/2016 - 09:29
नवीन
बरोबर आहे तजो एका चुकीमुळे दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही, वकीलांनी केलेल्या झुंडशाहीचेही होत नाही, ते बडोदा डायनामाइटचेही होत नाही, डाव्यांच्या कामगारचलवळींच्या नावाखालच्या इतर झुंडशाहीचेही होत नाही, संसदेवर अतिरेकी हल्ल्ला हि सशस्त्र झुंडशाही असते म्हणून त्या सशस्त्र झुंडशाहीचेही समर्थन होत नाही. म्हणून संसदेवर अतिरेकी हल्ल्ला केलेल्या अतिरेक्यांना सहानुभूती दाखवले जाण्याचेही समर्थन होत नाही.
त्यातल्या त्यात फरक करावयाचा असेल तर -मानवाधिकारांचे होता होईतो हनन टाळून, समतेचे न्याय्य तत्वांचे रक्षणकरून- देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता जपणारी हिंसा पवित्र आहे आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 02/22/2016 - 09:32
नवीन
अखंड भारताची माझी व्याख्या आसेतु हिमालय अशीच आहे आणि ती तशीच राहील हे वे सां न ल.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 09:36
नवीन
सहमत.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Mon, 02/22/2016 - 09:36
नवीन
आणि देशाचे स्वातंत्र्य आणि अखंडता डावावर लावणारी हिंसा अथवा अशा हिंसेचे अथवा देश विभाजनाचे समर्थन -कोणत्याही सबबीने- अपवित्र आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2016 - 15:57
नवीन
आता इथे गुजरात दंगल कोठून आली? कावीळबिवीळ कोणाला झाली नाहिय्ये हो. काही दिवसांपूर्वी एका सदस्याला मला नीट प्रतिसाद देता येत नव्हते. म्हणून त्यांनी लगेच मला मूळव्याध झाली आहे असा प्रतिसाद दिला. आता तुम्ही म्हणता कावीळ झालीये.
झुंडशाही व पाशवी बहुमत यांचा व बडोदा डायनामाईट केसचा काही संबंध आहे का ते जरा सांगता का.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 09:17
नवीन
बडोदा डायनामाईट केसः
Baroda dynamite case is the term used for the criminal case launched by the Indira Gandhi government in India during the Indian Emergency (1975 - 77) against the opposition leader George Fernandes and 24 others.
The CBI charged George and others on false and made-up charges of smuggling dynamite to blow up government establishments and railway tracks in protest against state of emergency. They were also charged with waging war against the state to overawe and overthrow the government. The accused were arrested in June 1976 and imprisoned in Tihar Jail, Delhi.
गुरुजी, इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग सोडा आता तरी.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2016 - 16:03
नवीन
आता माझ्या प्रतिसादात इम्पल्सिव व सिलेक्टीव रिडिंग कोठे आहे?
आणि बडोदा डायनामाईट केस बद्दल फक्त एवढंच?
वरील २ छोट्या परिच्छेदात इतकंच लिहिलंय की इंदिरा गांधींनी आणिबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडिस व इतर २४ जणांविरूद्ध हा खटला दाखल केला होता. आणिबाणीच्या काळात हजारो नागरिक कोणताही आरोप नसताना २० महिने विनाजामीन तुरूंगात डांबले गेले होते. जे जे इंदिरा गांधींचे राजकीय विरोधक होते त्या सर्वांना तुरूंगात डांबले होते. जॉर्ज फर्नांडिस हे इंदिरा गांधींचे विरोधक असल्याने त्यांनाही तुरूंगात डांबले व त्यासाठी वरील प्रकरण दाखविले गेले. त्यामुळे हा खटला हा आपल्या राजकीय विरोधकांवर केवळ राजकीय सूड घेण्याचाच प्रकार होता. त्यात काहीही तथ्य नव्हते.
पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते..
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 16:06
नवीन
पाशवी बहुमतामुळे आणिबाणी लादली गेली आणि आणिबाणीत केंद्र सरकारच्या हातात अनिर्बंध अधिकार येत असल्याने त्याचा उपयोग विरोधकांवर सूड घेण्यासाठी करण्यात आला हेच यातून दिसून येते..
>> मी काय वेगळे बोलतोय...?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Mon, 02/22/2016 - 16:14
नवीन
आधीच्या प्रतिसादात आणिबाणीचा उल्लेख नव्हता.
पण ते बडोदा डायनामाईट बद्दल धागा काढणार ना?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 17:00
नवीन
बडोदा डायनामाईट ही केसच आणीबाणीचा परमोच्च गैरवापर सांगणारी आहे, त्यात तुमच्या लाडक्या काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख नाही म्हणून खटकले का? म्हणून मिळवून वाचा म्हटले होते प्रतिसादात. पण काँग्रेसचे गुन्हेच तेवढे सगळे ठळक अक्षरात स्पष्ट पाहिजे असे दिसते. ते नसले तर तळमळ होते.
तसेच त्यावर धागा कशासाठी काढायचा, मी तसे काही म्हटले होते काय? धागा तर भाजपच्या धार्मिक राजकारणावर काढायचा ठरलंय ना?
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Tue, 02/23/2016 - 10:04
नवीन
आणिबाणी संदर्भात काँग्रेसचा स्पष्ट उल्लेख हवा होता कारण पाशवी बहुमताचा गैरवापर करून आणिबाणी लादून दडपशाही करणारा भारताच्या इतिहासातील तो एकमेव पक्ष आहे.
धागा कोणत्याही विषयावर काढा. भाजपच्या तथाकथित धार्मिक राजकारणावर काढा किंवा इतर कोणत्याही विषयावर काढा.
- Log in or register to post comments
ज
जानु
Mon, 02/22/2016 - 15:18
नवीन
आता तर सगळे जे.एन.यु. बसले आहेत. त्यांनी ठरवले ते देशद्रोही नाहीत. व्यवस्थित भाषणे देत आहेत. काँग्रेस आणि सगळे माना डोलावतायेत. पोलीस विनंती करतायेत. मला तर भजन आठवले. दर्शन देरे ....साला मी जर एखाद्याला धमकी दिली तर दिवसभर स्टेशनला बसवतील आणि काय काय करतील नेम नाही. मला तर असे वाटतय की साला सगळाच घोटाळा झालाय अन मी चु....सारखा कळफलक बडवतोय. उमर तेथे देशप्रेमाचे धडे देत होता. मी त्यावर आरोप घेतला कुठे फेडेन हे पाप????
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 16:08
नवीन
कायद्यानुसार फिर्यादीला पुरावे सादर करुन आरोप सिद्ध करावे लागतात. बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का?
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Mon, 02/22/2016 - 16:33
नवीन
बस्सीसाहेब म्हणताय्त, त्या मुलांनी पुढे येऊन आपले निर्दोषत्व सिद्ध करावे. ह्याचा अर्थ पोलिसांकडे निश्चित पुरावे नाहीत असा घ्यायचा का?
तजो साहेब एक अगदि साधा आणि सहज प्रश्न विचारु का?
आपल्याला काय वाटत कि हे विद्यार्थि निर्दोष आहेत आणि भारत सरकार उगाच ह्यांना फ्रेम करतेय ?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Mon, 02/22/2016 - 17:04
नवीन
प्रश्न मला काय वाटतं तो नाही. सत्य काय आहे हा आहे?
तुम्हाला काय वाटतं, स्पष्ट पुराव्यांअभावी ह्याच विद्यार्थ्यांना फासावर लटकवावे, खरे घोषणा देणारे कोण आहेत त्याचा तपास न होताच?
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Mon, 02/22/2016 - 20:17
नवीन
त्यासाठी न्यायव्यवस्था आहेच.
- Log in or register to post comments
ध
धडपड्या
Mon, 02/22/2016 - 20:42
नवीन
आणि त्या "विद्यार्थी" लोकांनी न्यायव्यवस्थेबद्दल त्यांना किती आदर आहे, ते दाखवून दिलेच आहे...
- Log in or register to post comments
य
याॅर्कर
Mon, 02/22/2016 - 19:44
नवीन
जेएनयुमध्ये राष्ट्रविरोधी घोषणाबाजी झाली आहे,हे तर त्रिवार सत्य आहे,आता ती कोणी केली हा दुसरा विषय झाला.
पण असे झाले असताना तेथे जाऊन राजकारण करणे म्हणजे
मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणे.
हे रागां,येचुरींना कोण सांगणार!!
आणि याचा फायदा भाजपलाच होईल असे वाटत आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 02/22/2016 - 19:55
नवीन
ज्या अर्थी मणीशंकर अय्यर, बरखा दत्त यांना अचानक अटल बिहारी वाजपेयींचा आदर्श आठवू लागला तेंव्हापासूनच असे वाटत आहे की ह्या तथाकथीत धर्मनिरपेक्ष आणि स्वतःच लेबल लावलेले असल्याने (अय्यर सारखे) "इंटलेक्च्युअल्स" असलेल्यांना कुठेतरी गडबड केली अशी धाकधूक वाटू लागली आहे असे वाटते.
गंमत म्हणजे हे लोकं पुढार्यांची पण पक्षिय वाटणी करतात. गांधीजीच्या नावाने पण त्यांचा फोटो असलेल्या नोटांनी जशी प्रॉपर्टी तयार केली तशीच काहीशी प्रॉपर्टी वाटते. पण कधी त्यांच्या नावाने ते स्वतःची प्रॉपर्टी आहे असे भासवणार्यांना कोणी उपदेश केल्याचे किमान नजिकच्या भूत-वर्तमानात तरी आढळलेले नाही!
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Mon, 02/22/2016 - 20:16
नवीन
देशद्रोहाची व्याख्या, फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन वगैरे जंजाळात हि केस गुंतवली गेली आहेच. पण या सेंटीमेण्ट्स भोवती हे प्रकरण सुरु झालेच नाहि मुळी. एकुणच राष्ट्रव्यवस्थेशी, पर्यायाने केंद्र सरकारशी काडी करणं ओतकं स्वच्छ प्रकरण आहे हे. त्याचा यथायोग्य समाचार घेतला जावा, मुळासकट काहि इलाज करता आला तर बघावा हि इच्छा आहे.
यु.पी.ए. सरकारबाबत आमच्या बर्याच तक्रारी होत्या. पण बाबा रामदेवने जे आंदोलन केलं व ज्या पद्धतीने ते उधळण्यात आलं ते बघुन आम्हाला फार बरं वाटलं होतं. सरकारशी उगीच चेष्टा करु नये. शेवटी सरकार देखील जनतेची अस्मीता असते. तिची पायमल्ली होता कामा नये.
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Mon, 02/22/2016 - 20:49
नवीन
अवांतर :
तर्राट जोकर,
तुमचा वरील प्रतिसाद वाचला. मी भारतीय या शब्दाऐवजी मुद्दाम हिंदू म्हणतोय. माझी अपेक्षा होतीच की कोणीतरी यावर टिप्पणी करेल. ते तुम्ही निघालात. :-)
त्याचं काय आहे की भारताच्या ज्या भागांत हिंदू अल्पसंख्य झाले ते भाग भारतापासून तुटले. तिथल्या उर्वरित अहिंदूंची अवस्था फारशी चांगली नाहीच, शिवाय हिंदूंची अवस्था तर अति दयनीय झाली आहे. त्यामुळे इतर कोणापेक्षाही हिंदूंचं हित सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा परत कधी हिंदू की भारतीय हा मुद्दा उपस्थित करू नका.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/23/2016 - 06:08
नवीन
हिंदू म्हणजे कोण?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 02/23/2016 - 14:19
नवीन
तजो,
एक सत्य अनेक रूपं या सिद्धांताचा कृतीतून आदर राखणारा कोणीही मनुष्य हिंदू आहे.
आ.न.,
-गा.पै.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 02/23/2016 - 14:20
नवीन
नक्की का?
- Log in or register to post comments
ग
गामा पैलवान
Tue, 02/23/2016 - 22:31
नवीन
हो. नक्की. शंभर टक्के. खुंटा हलवून बळकट करताय वाट्टे?
-गा.पै.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »