Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्यूडो सेक्यूलर्स अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2016 - 17:00
🗣 200 प्रतिसाद
प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच. सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही. १. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा. २. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात. ३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा. ४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला. ५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्‍या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्‍यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला. ६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले. ८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली. ९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात. १०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.

प्रतिक्रिया द्या
32139 वाचन

💬 प्रतिसाद (200)
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 13:56 नवीन
+११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गामा पैलवान Sat, 02/27/2016 - 08:44 नवीन
प्रतापराव, ज्यांना जात प्रिय आहे त्यांना तशी ती असू द्या. जातीभेद नसला म्हणजे झालं. महाराष्ट्रातल्या संतांनी जातीभेद कसा संपवायचा ते दाखवून दिलंय. संतांची शिकवण आचरणात आणणे हा खरा उपाय आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
त
तर्राट जोकर Sat, 02/27/2016 - 09:26 नवीन
ज्यांना जात प्रिय आहे त्यांना तशी ती असू द्या. जातीभेद नसला म्हणजे झालं >> विरोधाभास कळतोय का संतगामापैलवानमहाराज?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
ग
गामा पैलवान Sat, 02/27/2016 - 10:30 नवीन
तजो, जात आणि जातीभेद यांतला फरक मला ठाऊक आहे. एक जन्मावरून ठरतं तर दुसरं कर्मावर अवलंबून आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मोदक Sat, 02/27/2016 - 02:39 नवीन
प्रतिसादाशी सहमत आहे. खरेखुरे निधर्मी, नास्तिक (शाकाहार/मांसाहार, स्त्रीपुरूष समानता वाले वगैरे वगैरे) टीका करण्यात वेळ घालवत बसत नाहीत - किंवा संस्थळांवरही सतत आरडाओरडा करत नाहीत. आपली चळवळ / विचार संस्थळापलीकडच्या खर्‍याखुर्‍या गरजू समजापर्यंत पोहोचविण्याच्या त्यांच्या कामामध्ये ते मश्गुल असतात. हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहे संख्येने कमी असतात परंतु कोणताही मुद्दा कितीही ताणून कोठेही जोडण्याचे त्यांचे कसब वाखाणण्याजोगे असते. त्यासोबत या कॉम्रेड्सनी "सेल्फ व्हिक्टीमायझेशन" ची झूल पांघरलेली असते. त्यामुळे सहानुभुती गोळा करण्यास मदत होते. एक शंका. आपला धर्म हा जाती प्रधान आहे. तुम्हाला समाज हा जातीप्रधान आहे असे म्हणायचे आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 06:28 नवीन
समाज आणि धर्मात काय फरक आहे? धर्म म्हणजे नियम.उदा.माणुस मरतो, हिंदु मेल्यावर जाळतात, मुस्लिम पुरतात इतर धर्मातल्यांचे काहि अलग नियम असतात.थोडक्यात काय प्रेत नष्ट करायचे असते.जो तो आपापल्या धर्मानुसार ते नष्ट करतो. नियम वेगवेगळे असले तरी मुळ उद्देश एकच असतो नष्ट करुन विल्हेवाट लावणे.हिंदुंना संकष्टिला उपवास करुन पुण्य लागेल असे वाटते तर मुस्लिमांना रोझे धरुन.अर्थात काय फायदा होतो कि नाही हे सोडुन द्या वांझोटे समाधान तर मिळते.नियमांसाठी लढणे माझे नियम चांगले कि तुझे ह्यावरून दंगली माजवणे हे खेदजनक असले तरी बिनडोकपणाचे मनोरंजनात्मख मुल्य त्यात असतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 09:24 नवीन
हिंदू धर्मावर टीका करणारे फार कमी लोक असतील पण प्रोजेक्टरच्या सहायाने अतिशायोक्ती केली जाते .छोटा प्रोब्लेम मोठा करून दाखवला जातो असे माझे निरीक्षण आहे
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
त
तर्राट जोकर Sat, 02/27/2016 - 09:29 नवीन
हे हे गुरुजी, घाई घाईत वाचत जाउ नये, फजित होते. नीट वाचा वाक्य. तुम्हाला हवा तो अर्थ नाही त्यात, अगदी उलट आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 09:58 नवीन
काय उलट आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sat, 02/27/2016 - 10:10 नवीन
नीट वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 10:14 नवीन
तुम्हीच तुम्हाला समजलेला अर्थ समजावून सांगा ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मार्मिक गोडसे Sat, 02/27/2016 - 14:25 नवीन
काय उलट आहे?
काहीही उलट नाही. तुम्ही प्रोजेक्टरच्या 'योग्य' बाजूला बसला आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 19:10 नवीन
असेल बोवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 13:57 नवीन
खिक्!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मार्मिक गोडसे
ग
गरिब चिमणा Fri, 02/26/2016 - 09:03 नवीन
घासकडवींच्या लेखाला उत्तर म्हणून हा लेख लिहिला आहे,पण एकच मुद्दा फिरुन फिरुन लिहला आहे.काय तर म्हणे सेक्युलर लोक हिंदु धर्मावर् टिका करतात.सेक्युलर हे कधीच छद्म नसतात ,ते नेहमी योग्य व्यक्तीची, समाजाची बाजू उचलतात.आता आमचे श्रीगुरुजी ठरले भगवे धर्मांध ,त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार ? , पण घासू गुर्जींचा लेख दुसर्या गुर्जींना फारच झोंबलेला दिसतोय..
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 02/26/2016 - 13:55 नवीन
नानासाहेब/काकासाहेब/ग्रेटथिंकर/फुलथ्राॅटल जिनियस/ टाॅपगिअर्ड फिलाॅसाॅफर/पोटे/हितेश/..... पण भाषा कधी बदलणार? असो. आता हा आयडी किती दिवस?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गरिब चिमणा
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 09:26 नवीन
तुम जितने आयडी बॅन करोगे, हर दिन एक नया आयडी जन्मेगा|
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ह
होबासराव Fri, 02/26/2016 - 14:03 नवीन
नानासाहेब/काकासाहेब/ग्रेटथिंकर/फुलथ्राॅटल जिनियस/ टाॅपगिअर्ड फिलाॅसाॅफर/पोटे/हितेश/..... बोका भौ हेच लिहायला आलो होतो..
  • Log in or register to post comments
न
नितीनचंद्र Sat, 02/27/2016 - 06:50 नवीन
खरतर निधर्मी अशी कोणती विचारधारा अस्तित्वात नाही. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या धर्मात जन्माला येते. ( सध्यातरी ज्यांना कोणत्या धर्मात बसवायचे हे प्रश्न बाजुला ठेऊ उदा. जंगलनिवासी , मुलनिवासी इ. ) मग त्याच्यावर त्या त्या धर्माचे संस्कार होतात. समजत वय झाल किंवा म्हातारपण आल की त्यांना आपल्याला कोण विचारत नाही याची जाणिव होते. मग ते आपल्या धर्मातील समजुती / श्रध्दा यावर प्रहार करायला लागतात. त्यांना हळु हळु प्रसिध्दी मिळायला लागते. हे हिंदु धर्मात भारतात जास्त पहायला मिळत याची दोन कारणे आहेत. १. हिंदु धर्म एक ग्रंथ आणि एक धर्मनिर्माता याने बांधलेला नाही. धर्माने स्विकारलेली तत्वज्ञाने सहा आहेत. २. धर्माचे बंधन घट्ट नाही. फतवा निघत नाही आणि निघाला तरी तो कोणी मानत नाही. सबब धर्मावर आघात केले तर प्रसिध्दीच मिळते. सलमान रश्दी किंवा बांग्लादेशी लेखिका यांच्यासारखे परागंदा व्हावे लागत नाही. अकबर थोर नव्हताच या पुस्तकात लेखक पु. ना ओक म्हणतात की अकबराला निधर्मी म्हणण्याची प्रथा पडली कारण त्याने सर्व धर्माच्या लोकांना बोलावुन चर्चा करण्याचा प्रघात पाडला. हे खोटे आहे कारण लेखक पुढे म्हणतात अकबर निधर्मी नव्हताच कारण त्याच्या काळात हिंदुंवर जिझीया कर लादला गेला. हिंदुंवर विषिष्ठ रंगाच्या कपड्याचे बंधन आले. ही सर्व नाटके अकबर मुल्ला मौलवी यांच्या प्रस्थाला विरोध करण्यासाठी करत तसेच त्यांचे वर्चस्व मोडुन खलिफा किंवा तत्सम धर्मावर आधारीत बगावत होऊ नये म्हणुन होत. इतर धर्मांविषयी प्रेम होते म्हणुन अकबराने ती चर्चा सुरु केली नव्हती तर त्याच्यावर मुसलमानी बंधने येऊ नयेत म्हणुन ती होती. काँग्रेसच्या काळात हेच धोरण राबवले गेले. हिंदु संस्था आणि धर्म यावर आक्रमणे करण्यासाठी हे विचारवंत पुढे केले गेले. त्यांना मिडीया उपलब्ध करुन दिला गेला. ज्यामुळे त्यांची प्रसिध्दी वाढली. परिणामी १९९२ नंतर हिंदु जन आंदोलनांनी जी ताकद भारतीय जनता पक्षाला मिळाली ती ताकद अनेक वर्षे त्यांना मिळु नये हा डाव होता.
  • Log in or register to post comments
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 07:12 नवीन
भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये मुळात काही फरकच नाहिये.कोन्ग्रेसचे जितके पिएम झाले हिंदुच होते, महत्वाची पदे भुषवणारेही हिंदुच होते.आणि हे सर्व नेते आस्तिकही होते, धार्मिकही होते. कुठलाही कोन्ग्रेस नेता कधिही धर्मावर टिका करत नाही. मात्र राजकारण, मतांच्या बेगमीसाठी त्यांनी सर्वधर्मसमभावाचे घोंगडे पांघरले.आम्हि सर्वधर्मसमभावि आहोत हे प्रोजेक्ट करण्यात ते यशस्वि झाले इतर जमातिंना त्यांचा आधार वाटु लागला.इतर धर्मियांना खुश ठेवताना त्यांनि स्वताचा धर्मही जपला. भाजपने आपण हिंदुंचे रक्षणकर्ते आहोत असा आव आणला.मुळात हिंदु ८०% आहेत त्यांना इतर अल्पसंख्यांकांची भिती घालण्यात ते यशस्वि झाले. आणि मोदींनी निवडणुकित विकासाचा प्रचार केला त्यामुळे धर्मासारख्या गोष्टिंना अतिमहत्व न देणारे आमच्यासारखे लोकही त्यात फसले. शेवटि विकास महत्वाचा मग तो मोदी करो वा राहुल.जर तो न करता धर्मासारख्या निरर्थक गोष्टिंवरुन वाद घातले जात असतिल.तर दोन्हि पक्षांना घरचा रस्ता दाखवण्याइतके मतदार प्रभल्ग व्हायला हवेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितीनचंद्र
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 09:23 नवीन
भाजपा आणि कोन्ग्रेस मध्ये मुळात काही फरकच नाहिये.
-१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
ब
बोका-ए-आझम Sat, 02/27/2016 - 09:40 नवीन
पण दोन्हीही पक्षांना घरी पाठवणे हे आगीतून फुफाट्यात पटण्यासारखं असू शकतं कारण अजून तरी तिसरा समर्थ राष्ट्रीय पर्याय आलेला नाही. प्रादेशिक पक्षांच्या हातात देशाची धुरा सोपवणं आत्मघातकी ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 11:47 नवीन
प्रतापराव थोड़े गणित चुकता आहात. टक्केवारीचे नव्हे तर उपद्र्वमुल्याचे. मुस्लिम जर 30 % च्या वर असतील तर उपद्रवमूल्य कमालीचे भयंकर असते. मुस्लिम बहुसंख्य असलेल्या भागात राहून पहा. रच्याकने, ते फ्रान्सला,ब्रिटनला, जपानला,चीनला,मियांमारला काय भाजपा सांगायला गेले होते. राशियाचे नाव मुद्दामहुन् घेतलेले नाही. त्यांनी ते भोगलेले आहे, बाकीचे वरील देश प्रतिबंधक उपाय योजत आहेत. पण ते कितिसे पुरे पडणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 12:21 नवीन
इतर देशातिल परिस्थितिंची कारणे मला ठाउक नाहित. भारताबाबत मात्र आधि काश्मिर, पंजाब इथल्याच आतंकाच्या बातम्या एकायचो. मात्र बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला. महाराष्ट्र तर सर्वात सेफ राज्य होते. पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
म
मोदक Sat, 02/27/2016 - 13:17 नवीन
टाळ्या...!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
म
मार्मिक गोडसे Sat, 02/27/2016 - 14:20 नवीन
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 14:34 नवीन
बाबरी मशिदीच्या पतनानंतर धर्मान्ध मुस्लिमानि दंगलीला सुरुवात केली. सुरवातीला इतर धर्मियानी मार खाल्ला. अचानक जोगेश्वरीच्या राधाबाई चाळीचे सत्य लोकासमोर आले त्यानंतर हिन्दुनि हत्यार उपसले. आमच्या तथाकथित शांत मुंबईत पाकिस्तान क्रिकेट जिंकल्यावर फटाके फोडले जात. भेंडीबाजार, नागपाड़ा, डोंगरी, बेहरामपाड़ा हे ते विभाग. हिन्दू त्याला उत्तर देत नसत म्हणुन सर्व शांत! 92च्या दंगलीनंतर बाळासाहेबानी आवाज दिला की हे फटाके वाजवणारे देशद्रोही तेव्हा काही प्रमाणात जल्लोष बंद झाला. आजपण पाकिस्तानच्या मैचेस येथील काही भागात आवडिने बघितल्या जातात. तुम्ही पुण्यातल्या सदाशिव पेठेत रहाता काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 14:49 नवीन
काहिजणांनी फटाके फोडले म्हणुन सारा समुदाय कसा दोषि ठरेल. पण अति धर्मांधपणामुळे बाबरी मस्जिद प्रकरणानंतर फटाक्यांचे दिवस जाउन माझ्या शांतताप्रिय महाराष्ट्राच्या नशिबि बाँम्बब्लास्टचे दिवस आले.हे मंदिर मस्जिद प्रकरण कोर्टावर सोडायला हवे होते नको ते होउन बसले.समाजाची मानसिक फाळणी झाली ही भावि पिढ्यांना काय भोगावे लागणार ते राम जाणो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 15:15 नवीन
कबुल, पण त्या आधी पण मुंबईत बॉम्ब ब्लास्ट झाले होते. दंगली झाल्या होत्या. महाराष्ट्राचे माहीत नाही पण मुम्बई कधीच शांत नव्हती. दाउदचे दुश्मन जे हिन्दू होते ते पोलिसांच्या चकमकीत मारले गेले वा गैंगवॉर मधे मारले गेले. हां काही योगायोग नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 15:20 नवीन
मुंबईत आधी बाँम्बब्लास्ट झाले होते कधी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 15:31 नवीन
मालाडला लोकलमधे बॉम्ब स्फोट झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 15:41 नवीन
आपली माहिती चुकीची आहे. २००६ ला वेस्टर्न लाइनला बाँम्बब्लास्ट झाला होता.आणि १९९८ ला बाँम्ब निकामी करण्यात आला होता.१९९२ आधिची आमची मुंबइ छान होति हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 15:58 नवीन
शिवडी, कुर्ला , घाटकोपर, कांजुरमार्ग, हे सर्व 1991च्या आधी आहेत. दंगलीबाबत प्रतापराव तुम्ही काहीच बोलत नाही आहात. मी हे अधिकारवाणीने बोलत आहे कारण माझे आजोबा पोलिसमधे होते. भेंडीबाजार, इममवाड़ा, डोंगरी, नागपाड़ा, मोहमदअली रोड, भायखला हे त्यावेळी अंत्यंत सवेंदनशील भाग होते. बेहरामपाड़ा , मालवणी, हे भाग मिनी पाकिस्तान म्हणुन ओळखले जात. एखाद्या जुन्या जाणत्या माणसाला विचारा, जास्तकरुन या भागात रहाणाऱ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 16:21 नवीन
दंगली तर स्वातंत्र्यपुर्व काळापासुन होतायत. विषय बाँम्बब्लास्टचा सुरू आहे.१९९२ नंतर महाराष्ट्राची रया गेली. सकाळी कामावर गेलेला माणुस रात्री परत येइल की याची खात्री राहिली नाही. ही सारी मंदिर-मस्जिद वादाची देण आहे.धार्मिक तेढ वाढवणारे सुरक्षाव्यवस्थेच्या गराड्यात मजेत राहिले सर्वसामान्याच्या नशिबी मात्र हाल.आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
अ
अनुप ढेरे Sat, 02/27/2016 - 17:27 नवीन
पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
हेच बोल्तो. हिंदू दहशतवाद कुठाय कुठाय म्हणून लोक विचारत असतात. बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 17:41 नवीन
वर्षाचे बावन्न आठवडे शुक्रवारी रस्त्यावर नमाज अदा करून रहदारी बंद करने हां देखिल दहशतवादच्.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
प
प्रतापराव Sat, 02/27/2016 - 17:46 नवीन
हा त्रास आहे हे मात्र खरे.पण ह्याला मी दहशतवाद नाहि म्हणु शकणार.रस्त्यावरचे नमाज, गरबे, उत्सव, विसर्जन मिरवणुका हे सारे बंद करुन टाकले पाहीजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 18:04 नवीन
परत एकदा सांगतो नमाजाच्या वेळी पूर्ण रस्ता बंद केला जातो. अगदी एम्बुलैंस असेल तरी तो उघडला जात नाही. मी पैजेवर सांगू शकतो तुम्ही नेहमी हिंदू बहुल भागातच राहिलेले आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 17:58 नवीन
चिराबाझार, भेंडीबाजार, मोहमदअलि रोड ,नागपाड़ा , बेहरामपाड़ा या भागात रहाणारे आहेत काय? इथे राहणारी व्यक्ति दहशतवाद काय होता हे सांगू शकेल. मी भूतकालात बोललो कारण 92च्या दंगलीनंतर मुस्लिमाना कळून चुकले की बूमरैंग उलटु शकते. त्यामुळे समाजविघाटक शक्तिनि दंगल नाही तर बॉम्ब स्फोटाचा आसरा घेतला. म्हणजे स्फोट करणारे मुस्लिम असतील तर आपले तथाकथित सेक्युलर आंतकाला धर्म नसतो असे बरळायला मोकळे झाले. काही हिन्दू अतिरेकी संगठनानी सुड उगवला पण ते प्रमाण किती टक्के? पण त्याचे कोंग्रेस व् जनता दलवाल्याणी भगवा दहशतवाद म्हणुन भांडवल केले. आज पण मालदाला झालेल्या हिंसाचाराबद्दल हे सेकुलर ब्र काढत नाही आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 18:14 नवीन
काही हिन्दू अतिरेकी संगठनानी सुड उगवला पण ते प्रमाण किती टक्के?
उदाहरण? (१) अतिरेकी असलेल्या (अतिरेकी समजल्या जाणार्‍या नव्हे, तर ज्या हिंदू संघटना अतिरेकी/दहशतवादी कृत्ये करतात हे सिद्ध झाले आहे अशा) संघटनांची नावे? (२) त्यांनी केलेल्या अतिरेकी/दहशतवादी कृत्यांचे संदर्भ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 18:15 नवीन
अजून १. (३) हिंदू दहशतवाद्यांची नावे (म्हणजे ज्यांच्यावर नुसते आरोप आहेत अशी नावे नकोत, तर न्यायालयात ज्यांच्यावर दहशतवादाचे आरोप सिद्ध झाले आहेत अशांची नावे)?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भंकस बाबा Sat, 02/27/2016 - 19:19 नवीन
हे केवळ प्रतापरावांच्या समाधानासाठी म्हटले आहे.ते मानायला तयारच नाही की मुस्लिम दहशतवाद असू शकतो , मी आता हां शब्द वापरला तरी ते सर्वधर्मसम्भावाचे तुनतुने वाजवायचे सोड़तील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 02/28/2016 - 09:23 नवीन
समझोता एक्सप्रेस , मालेगाव ब्लास्ट ही काही उदाहरणे.
या प्रकरणांचा न्यायालयीन निकाल अजून लागलेला नाही. परंतु निधर्मांध या प्रकरणांच्या वारंवार उल्लेख करून हिंदू दहशतवाद, हिंदू अतिरेकी, हे बॉम्बस्फोट हिंदू दहशतवाद्यांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे असे तद्दन खोटे संदर्भ देऊन मुस्लिम दहशतवादाला बॅलन्स करायचा प्रयत्न करतात. काही वर्षांपूर्वी मडगावमध्ये तथाकथित हिंदू दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट केला होता म्हणे. काही काळापूर्वीच त्या खटल्याचा निकाल लागलेला असून त्यातील सर्व आरोप निर्दोष सुटलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Sun, 02/28/2016 - 19:10 नवीन
अहो मी हे प्रतापरावाना बोलते करण्यासाठी करत आहे. ते कबुल करतील व् चर्चेला पुढे येतील मग मी मुस्लिम दहश्तवाद्यानि केलेले नरसंहार दाखवले असते. पण त्यांनी सापळा ओळखला व् चर्चेतुंन सपशेल बाजुला झाले. इथे आपण समविचारी वाद घालत आहोत. पाकिस्तानात होण्यार्या स्फोटात नाव मुस्लिम असतात म्हणुन हे भारतीय समधर्मसम्भाववाले चेकाळत नाहीत. तिथे जर सुरेश ,रमेश, जनार्दन असते तर यानी काय गदारोळ माजवला असता. शिवाय पाकिस्तानात हे अल्पसंख्यक नाहीशे झाले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 08:21 नवीन
ओके, समजलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
प
प्रकाश घाटपांडे Mon, 02/29/2016 - 08:50 नवीन
इथे आपण समविचारी वाद घालत आहोत.<< म्हणजे तुम्ही पुरोगामी आहात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Mon, 02/29/2016 - 13:06 नवीन
तुम्ही कुठल्या बाजूला आहात ते आधी ठरवा. लांडग्याला जर लांडगा म्हटले तर ती व्यक्ति पुरोगामी होते काय? मग ते अफझल गुरु समर्थन व देशविरोधी नारे देणारे आपसुक अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे भोक्त बनतात. मुस्लिमविरोध हां मुख्य मुद्दा नाही तर हे जे धर्मवेड त्यांच्यात पसरत चालले आहे त्याला आक्षेप आहे. शिक्षणाने बदल होतात असे म्हणतात, कुठे आहेत या समाजात बदल? इसिसमधे सामिल होण्याचे स्वप्न पाहणारे तरुण जे समोर आलेले आहेत ते बऱ्यापैकी शिकलेले आहेत. याबद्दल तुमचे मत जाणून घ्यायला आवडेल. तुमचा पुरोगामी. नाव भंकस असले तरी, ही भंकस नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 13:59 नवीन
मकदूम शाह बाबा अल माहिमी बद्दल ऐकले आहे काय देवा??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
स
सुबोध खरे Sun, 02/28/2016 - 14:52 नवीन
@ अनुप ढेरे बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते. मान्य आहे. परंतु "शाहबानो प्रकरणानंतर" बाबरी मशीद पाडली गेली. यानंतर अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन करताना बहुसंख्यान्कांकडे दुर्लक्ष करता येणार नाही हा संदेश राजकारण्यांना मिळाला हे या घटनेचे फल स्वरूप आहे. यापेक्षा त्याकडे फार लक्ष देऊ नये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 18:45 नवीन
मात्र बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला. महाराष्ट्र तर सर्वात सेफ राज्य होते. पण मंदिर मस्जिदच्या भानगडित आपण आपल्या भावि पिढ्यांना आतंकवादयुक्त जिवनाचे गिफ्ट दिले.
चूक. श्रीराम जन्मस्थान पाडून त्यावर उभा केलेला बाबरीचा ढाचा १९९२ मध्ये पाडला नसता तरी भारतात दहशतवाद पसरलाच असता. १९९२ ते २००२ या काळातील दहशतवादासाठी बाबरी हे एक निमित्त म्हणून वापरले गेले. २००२ पासून गुजरात दंगल हे निमित्त म्हणून वापरले जात आहे. भविष्यात एक नवीन निमित्त असू शकते. १९७८ मध्ये रशियाने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यावर अमेरिकेने पाकिस्तानला मदत देऊन रशियाविरूद्ध लढण्यासाठी भरपूर आर्थिक मदत, शस्त्रास्त्रे व राजकीय मदत देऊन मुजाहिद व तालिबान्यांची निर्मिती केली. तालिबानी व मुजाहिद अफगाणिस्तानमध्ये रशियन सैन्याविरूद्ध १९८९ पर्यंत सशस्त्र लढा देत होते. १९८९ मध्ये अफगाणिस्तानमधून रशियाने सैन्य काढून घेतल्यावर काही हे मुजाहिद बेकार झाले. त्यांच्यासाठी लढण्याचे फारसे कामच राहिले नाही. दरम्यानच्या काळात पाकिस्तानमध्ये लाखोंच्या संख्येने निर्वासित अफगाणी तरूण व मुले आली होती. पाकिस्तानने १९९०-९१ पासून या सर्वांना काश्मिरचे निमित्त करून भारताच्या दिशेने वळविले. याची सुरूवात १९९० मध्ये तत्कालीन काश्मिरचे मुख्यमंत्री यांच्या रूबिया सईद या मुलीचे अपहरण करून झाली. तिला सोडविण्यासाठी तुरूंगातील ५ अतिरेक्यांना सोडण्यात आले. या यशामुळे पाकिस्तान पुरस्कृत मुस्लिम अतिरेक्यांच्या कारवाया वाढल्या. बॉम्ब्सचा वापर भारतात १९९० पूर्वीही होत होता. परंतु १९९० पासून भारतात तो मोठ्या प्रमाणावर वाढला कारण बॉम्बस्फोट करणारे प्रशिक्षित अतिरेकी अफगाणिस्तानमधील युद्ध संपल्याने १९९० पासून भारताकडे वळले. तात्पर्य, बाबरी मस्जिद पाडल्यानंतर संपुर्ण भारतभर दहशतवाद पसरला हा निष्कर्ष चुकीचा असून १९८९ नंतर अफगाण सुद्ध संपले व त्यामुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांनी अफगाण युद्ध संपल्यामुळे १९९० पासून भारतात सर्वत्र कारवाया सुरू केल्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रतापराव
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा