Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

स्यूडो सेक्यूलर्स अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे

श
श्रीगुरुजी
गुरुवार, 02/25/2016 - 17:00
🗣 200 प्रतिसाद
प्रेरणास्त्रोत : फॅसिझमची व्यवच्छेदक लक्षणं मिपावरील एक पुरोगामी आणि निधर्मी विचारवंत श्री. घासकडवी यांनी नुकताच हा विचारप्रवर्तक लेख लिहिला (ते एका विचारवंताने लिहिलेल्या मूळ लेखाचे भाषांतर आहे). त्याच धर्तीवर स्यूडो सेक्यूलर अर्थात निधर्मांधांची व्यवच्छेदक लक्षणे सांगण्याचा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली. घासकडवींच्या लेखात ६ फॅसिस्टांच्या नावांचा उल्लेख आहे. मूळ लेखात ७ व्या फॅसिस्टाचा स्पष्ट उल्लेख नसला तरी स्पष्ट उल्लेख न केलेल्या त्या ७ व्या व्यक्तीला त्या लेखातील फॅसिस्टांची लक्षणे कशी चपखल बसतात हेच लेख लिहिण्यामागचा मूळ उद्देश होता. जरी ताकाला जाऊन भांडे लपविण्याचा सुरवातीला प्रयत्न झाला तरी नंतर ताकाची उबळ अनावर झाल्याने शेवटी लेखकाच्या प्रतिसादात ७ व्या फॅसिस्टाचा उल्लेख आलाच. सूचना - जो पुरोगामी असतो तो विचारवंत व निधर्मी असतोच. जो विचारवंत असतो तो पुरोगामी व निधर्मी असतोच आणि जो निधर्मी असतो तो पुरोगामी व विचारवंत असतोच. ज्याच्याकडे या ३ पैकी कोणताही १ गुणविशेष नसतो, त्याच्याकडे उरलेले २ गुणविशेषही नसतातच. मी पुरोगामी अथवा विचारवंत अथवा निधर्मी नसल्याने खालील लेख गांभिर्याने घ्यायची अजिबात गरज नाही. १. दांभिक निधर्मतेचा/छद्म धर्मनिरपेक्षतेचा जोरदार आणि सतत पुरस्कार - हिंदू वगळता इतर धर्मियांची श्रद्धास्थाने, त्यांची संस्कृती, त्यांच्या चालीरिती, त्यांचे धर्मग्रंथ इ. बद्दल अतिरेकी श्रद्धा. या धर्मातील वाईट चालीरितींबद्द्ल बोलणार्‍यांचा तिरस्कार. हिंदू धर्मातील चिन्हे, धार्मिक ग्रंथ, सण, उत्सव इ. बद्दल संशय. हिंदू या शब्दाबद्दल घृणा. २. हिंदू धर्मातील संस्कृती, उत्सव, श्रद्धास्थाने, चालीरिती इ. बद्द्ल तुच्छता आणि संकोच - निधर्मांधांना आपल्याला जे हवं आहे त्यात हिंदूंचे अधिकार, त्यांच्या श्रद्धांबद्दल आदर, त्यांची धार्मिकता, त्यांची सहिष्णुता ही अडचण मानली. प्रचाराची सर्व साधने वापरून हिंदू हा धर्मच नाही, हिंदू हेच खरे अत्याचारी होते, हिंदू हेच खरे आक्रमक होते, त्यांनीच हा धर्म कसा स्थानिकांवर लादला, इ. इ. हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा धार्मिक दंगली व्हायच्या तेव्हा तेव्हा हिंदूंबद्दल अफवा/गैरसमज पसरवण्यात निधर्मांध वाकबगार असतात. ३. हिंदूंकडे बोट दाखवून एकाच वेळी त्यांना बळीचा बकरा बनवणं आणि इतर धर्मियांना त्यांच्याविरुद्ध संघटित होण्यास कारण बनवणं - सर्व निधर्मांधांचे सगळ्यात महत्त्वाचं सूत्र म्हणजे इतर धर्मियांना त्यांच्या अंधश्रद्धातून दूर करण्याऐवजी सतत हिंदूंची भीति दाखवून भयभीत ठेवणे. हिंदूंच्या पक्षपातामुळेच तुम्ही अजून गरीब व मागासलेले आहात हे दाखविण्यात या निधर्मांधांना यश आलं. सतत प्रचार आणि खोटी माहिती पसरवून अनेक वेगवेगळ्या हिंदू संघटनांकडे बोट दाखवण्यात आलं. सर्वसाधारणपणे हिंदू, भारतीय संस्कृती, वेदपुराणे, गीता, योगसाधना, भक्ती, उपासना असा कोणताही शब्द उच्चारणार्‍यांना जातीयवादी/मनुवादी/संकुचित अशी विशेषणं लावून त्यांचा उपहास केला जायचा. ४. माध्यमांचे वर्चस्व - निधर्मांधांनी कायमच माध्यमांचा आपल्या प्रोपागंडासाठी अतिशय चपखल वापर करून घेतला. वेगवेगळ्या नियतकालिकातून लिहिलेल्या लेखातून, भाषणातून, वाहिन्यांवरील चर्चासत्रात, परदेशातील माध्यमातून हिंदू धर्मावर, त्यांच्या चालीरितींवर, त्यांच्या संस्कृतीवर सातत्याने हल्ले करून हिंदूंच्या मनात हिंदू असण्याबद्दल अपराधीगंड निर्माण केला गेला. हिंदूंच्या बाजूने बोलणार्‍यांकडे प्रखर जातीयवादाचं व सरंजामशाहीचे प्रतीक म्हणून पाहिलं गेलं. माध्यमे, विद्यापीठे, साहित्य संमेलनासारखे कार्यक्रम इ. ठिकाणी आपल्याच विचारांची माणसे घुसडून सातत्याने निधर्मांधतेचा प्रचार करणे व हिंदूंविरूद्ध बोलणे यावर यांचा सातत्याने भर राहिला. ५. मानवतेचा गंड - इतर धर्मियातील कुख्यात गुन्हेगारांना मानवतेच्या नावाखाली समर्थन देणे, मुळात त्यांना शिक्षा देणार्‍या न्यावव्यवस्थेविरूद्ध ज्युडिशिअल किलिंग असा प्रचार करणे अशा प्रकारे दहशतीला पाठबळ देण्याचे काम हे करतात. गुन्हेगारांना विरोध करणार्‍यांना मानवताविरोधी, धार्मिक उन्मादी आणि एखाद्या विशिष्ट धर्माच्या विरोधी ठरवण्याचा निधर्मांधांचा प्रयत्न राहिला. ६. धर्म आणि निधर्मांधांचं साटंलोटं - हिंदूंवर कडाडून टीका व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष अशी भूमिका सातत्याने घेऊन हिंदू इतर धर्मियांचा नाश करायला आतुर आहेत अशी भीति इतर धर्मियांच्या मनात पसरवून आपण त्या धर्माचे रक्षक असल्याची भूमिका त्यांनी घेतली. इतर धर्मियांची प्रत्यक्ष वागणूक ही धर्माच्या व्यापक मानवतावादी तत्त्वांविरोधी असली तरी त्याकडे निर्लज्जपणे काणाडोळा केला गेला. इतर धर्मियांच्या वाईट प्रथा व चालीरितींना विरोध म्हणजे त्या धर्माला विरोध असं चित्र निर्माण केलं गेलं. ७. कट्टर धार्मिक कर्मठांचे हात बळकट करणं - हिंदूंचं आयुष्य कायदे व नियम करून नियंत्रित केलं जात असतानाच इतरांना हवं ते करण्याच्या अमर्याद स्वातंत्र्याला पाठबळ दिलं गेलं. त्यासाठी वेळप्रसंगी धर्मावर आधारीत वेगळे कायदे करून इतर धर्मियातील धार्मिक कर्मठांसमोर मान तुकवून सामान्यांवर अन्याय करण्यात हेच निधर्मांध पुढे होते. मतांसाठी इतर धर्मियातील वाईट चालिरितींना कायदेशीर संरक्षण देण्यात आले. ८. दुटप्पी भूमिका - हिंदूंवर टीका करणारी पुस्तके, हिंदू देवदेवतांची विटंबना करणारी चित्रे इ. ला प्रतिभाशाली कलाकाराच्या प्रतिभेचा अमूर्त आविष्कार, अभिव्यतीस्वातंत्र्य इ. भरजरी शब्द वापरून पाठिंबा दिला गेला. तर जेव्हा इतर धर्मियांच्या असे घडले तेव्हा त्यांच्या भावना दुखावतील असे निमित्त करून अशा गोष्टींवर तातडीने कायदेशीर बंदी घातली गेली. ९. हिंदुत्ववादी लेखक, कलावंत यांच्याबद्दल तुच्छता आणि त्यांचं खच्चीकरण - कोणत्याही लेखकाने किंवा इतरांनी हिंदू धर्माबद्दल चांगले बोलले, हिंदूंच्या बाजूने बोलले की त्याला वाळीत टाकणे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून खच्ची करणे, त्याच्याबद्दल खोट्यानाट्या अफवा पसरविणे असे करून समाज त्यांच्या कार्याबद्दल अनभिज्ञ राहील असे निधर्मांध प्रयत्न करतात. १०. आपण आणि ते - हिंदूंविरूद्ध बोलणारे व इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठबळ देणारे तेच फक्त मानवतावादी, लोकशाहीवादी, पुरोगामी, निधर्मी आणि विचारवंत आणि हिंदूंच्या बाजूने बोलणारे, इतर धर्मियांच्या वाईट चालीरितींवर टीका करणारे ते जातीयवादी, बुरसटलेले, कर्मठ, सरंजामशाही, धर्मांध व प्रतिगामी विचारांचे अशी सरळसरळ समाजाची दोन भागात विभागणी.

प्रतिक्रिया द्या
32139 वाचन

💬 प्रतिसाद (200)
S
sagarpdy Sat, 02/27/2016 - 18:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रोहित गोसावी Sat, 02/27/2016 - 10:07 नवीन
कृपया कोणाकडे पेशवेकाळातील विश्रामबागवाडा या वाड्याचे त्याकाळातील महत्व काय होते याविषयी माहीती आहे का
  • Log in or register to post comments
र
रोहित गोसावी Sat, 02/27/2016 - 10:08 नवीन
असेन तर मला whtsapp करा...8421060808
  • Log in or register to post comments
व
विकास Sat, 02/27/2016 - 14:01 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Vishrambaug_Wada जर हे आधी पाहीले नसले तर थोडक्यात इतिहास!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रोहित गोसावी
V
viraj thale Sat, 02/27/2016 - 17:56 नवीन
औरंगजेबाने काशी विश्वनाथाचे मंदिर का पाडले याची एक कथा मध्यंतरी पुरोगाम्यांनी फेसबुकवर सोडली होती. कथा काही अशी आहे, औरंग्या सरदारांचा लवाजमा घेऊनचालला होता. वाटेत काशी विश्वनाथ लागलं. हिंदू सरदारांनी देवदर्शनाची परवानगी मागितली. पुरोगामी औरंग्याने ती दिली.दर्शन घेऊन परतलेल्या सरदार व त्यांच्या बायकांमध्ये एका सरदाराची बायको नव्हती.शोधघेतल्यावर ती विश्वनाथ मंदिराच्या तळघरात सापडली. तीच्यावर पुजार्याने बलात्कार केला होता. चिडलेल्या औरंगजेबाने मंदिर नष्ट केलं व पुजार्याला शिक्षा दिली.आता गम्मत अशी की ही कथा आवरण कादंबरीमध्ये एस. एल.भैरप्पा यांनी कम्युनिस्ट मुस्लिम अनुनयासाठी कशी कथा रंगवतील हे दाखवायला रचली आहे. याच खोट्या कथेच्या पुढे त्यांनी औरंगजेबाने पाडलेल्या हिंदू मंदिरांची संख्या त्यांच्या स्थानासहित दिली आहे. पन पुरोगाम्यांनी फक्त हवी तेवढीच कथा सोशल मिडीयावर सोडली.या साठी पुरोगाम्यांची मी एवढीच व्याख्या करेन - मुस्लिमप्रेम व हिंदूद्वेषाचा पु झालेला मनोरोगी म्हनजे पुरोगामी.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 02/27/2016 - 18:29 नवीन
एकदा पुरोगामी शब्दाची व्याख्या ठरवा राव. मला पुरोगामी म्हटले की ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम, शाहू, फुले, आगरकर, आंबेडकर हे सारे आठवतात. आजच्या आपल्या सामाजिक सुधारणा ही या सार्‍या महामानवांची देणगी आहे. आपल्याला न पटणारे विचार असणार्‍या लोकांसाठी पुरोगामी शब्द वापरून या शब्दाचा अर्थच बदलला जात आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 02/27/2016 - 19:07 नवीन
पुरोगामी या शब्दाची व्याख्या काय यापेक्षा कोणाला पुरोगामी व कोणाला प्रतिगामी ठरविले आहे ते जास्त महत्त्वाचे आहे. वृत्तपत्रात नेहमीच समाजवादी पक्ष, राजद, काँग्रेस इ. पक्षांचा पुरोगामी असा उल्लेख होतो. दिल्लीत जंतरमंतर वर पुरोगामी पक्षांनी सरकारविरूद्ध धरणे धरले. त्यात राजद, समाजवादी, संजद, माकप, भाकप इ. पक्षांच्या नेत्यांचा समावेश होता हे अनेकवेळा वाचलेले आहे. तसेच मुंबईत सप, जनता दल, भाकप, माकप, शेकाप इ. पुरोगामी पक्षांनी सरकारविरूद्ध मोर्चा काढला अशीही बातमी अनेकवेळा येते. तस्मात पुरोगामी म्हणजे भाजप व शिवसेना वगळता इतर सर्व पक्ष व त्यांचे नेते (यात मुलायम, लालू इ. चाही समावेश होतो).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 02/27/2016 - 19:13 नवीन
असे असेल तर या शब्दाचा चुकीचा वापर होतोय. तो बंद करायच्या ऐवजी लोक हा "नवा" अर्थ पुढे रुढ करू पाहत आहेत. कारण ते जसे या नव-पुरोगाम्यांसाठी सोयीचे आहे तसेच त्यांच्या विरोधकांसाठीही तो शब्द सोयीचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
V
viraj thale Sat, 02/27/2016 - 19:00 नवीन
स्यूडो सेक्यूलर बाटगे पुरोगामी यांबद्दल मी ते म्हटले आहे . शाहू, फुले, आगरकर, आंबेडकर हे खरे समाज सुधारक , खऱ्या अर्थाने पुरोगामी होते यांनी कधीही हिंदू मुस्लिम यांमधे भेदभाव करून स्वतच्या स्वार्थासाठी राजकारण केले नाही .माझा आक्षेप बनावट खोट्या पुरोगाम्यानवर आहे जे वस्तुस्थिती ग्रुहीत न धरता वेगळ्याच मार्गाने गोष्टीला फाटे देतात यांचे समाजाशी, देशाशी काहीही देणेघेण नसते .
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 02/27/2016 - 19:08 नवीन
"स्यूडो" किंवा "खोटा" हे शब्द तुम्ही मी आक्षेप घेतल्यानंतर आता वापरलेत. तुमच्या मुळ प्रतिसादात हे शब्द नाहीत. तिथे पुरोगामी हाच शब्द आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sat, 02/27/2016 - 19:29 नवीन
तुम्हमी तुम्हाला तुमच्या सोयीनुसार त्याचा अर्थ लावू शकता . तस बघायला गेल तर तुमच्या मतानुसार जे जे लोक स्वतला पुरोगामी म्हणवतात किंवा तसा आव आणतात ते प्रत्येक वेळेला खरेच असतात ,सत्याची बाजू घेतात अस तुम्हाला म्हणायचे आहे का मग ते वर उल्लेख केल्याप्रमाणे हिंदूंच्या विरोधात खोटी कथा उभी करून त्याना खोटे पाडणे असो वा देशविघातक ,आतंकवादी लोकांची बाजू घेऊन raw ,ib अशा संघटनांना खोटे ठरवणे ,देशाच्या सुरक्षेस धोका उत्पन्न करणे असो .
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 02/28/2016 - 04:15 नवीन
जरा लक्ष देवून वाचत जा की दादा. जरा विरोधी मत दिसले की लगेच आखाडयात उतरायचे काय? माझा आक्षेप फक्त पुरोगामी शब्दाच्या चुकीच्या वापराला आहे. याउप्पर माझे कशाबद्दल काहीही मत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: viraj thale
V
viraj thale Sun, 02/28/2016 - 06:11 नवीन
भाऊ माझे बी तेच मत आहे की . पुरोगामी शब्दाला स्यूडो सेक्यूलर लोकांनीच बदनाम करून ठेवले आहे .
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 02/28/2016 - 10:25 नवीन
अनुप ढेरे, आपला इथला प्रतिसाद वाचला. तुम्ही म्हणताय :
>> बाबरी पाडणं हा दहशतवादच होता माझ्यामते.
माझं मत थोडंसं वेगळं आहे. बाबरी नावाची कोणतीही मशीद अस्तित्वात नसतांना ती पाडल्याची अफवा उठवणारे पुरोगामी दहशतवाद प्रसारक आहेत. प्रत्यक्षात दहशतवादी नाहीत, पण दहशतवादास खतपाणी घालणारे आहेत. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sun, 02/28/2016 - 11:32 नवीन
तुम्ही कारसेवा करायला गेले नव्हते वाटतं, तरीच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान
V
viraj thale Sun, 02/28/2016 - 11:31 नवीन
+111111111
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Sun, 02/28/2016 - 12:19 नवीन
आता खर्‍या सेक्युलर ची व्यवच्छेदक लक्षणे सांगा. एक चुकीचा प्रश्न...सेक्युलर की कम्युनल हा राजीव साने यांचा लेख या अनुषंगाने जरुर वाचा.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sun, 02/28/2016 - 16:18 नवीन
या लेखातील "जे इस्लामोफोबियाला मुख्य मुद्दा बनवतात, ते हिंदुत्ववादी! " या वाक्यातच सर्व लेखाचे सार आहे. बाकी काही वाचायची गरजच नाही. लेखकाची एकंदरीत विचारसरणी या एका वाक्यात अत्यंत स्पष्टपणे दृग्गोचर झाली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
त
तर्राट जोकर Sun, 02/28/2016 - 17:01 नवीन
अपेक्षित प्रतिसाद! बाकी काही वाचायची गरजच नाही. हीच ती विचारसरणी. बाकी काही बोलायची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 17:12 नवीन
बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना वाचायचे त्यांना वाचु दे ही वृत्तीही नाही! कोणी वाचुन मत प्रदर्शन करू धजला तर त्याला सिक्युलर वगैरे शेलकी विशेषणे दगडं मारल्याप्रमाणे मारायची! असो! कुठलीही गोष्ट वाचायची नाही असे म्हणले तरी न वाचता कश्यावरही टिका कशी काय करायला जमते राव लोकांना? किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे! नाही तर मग प्रोजेक्टरच्या कॉमेंट मधे बल्या होतो मोठा! अवांतर :- कॉमनसेन्स खतरे में है!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Sun, 02/28/2016 - 17:46 नवीन
कॉमनसेन्स अनकॉमन असतो त्यामुळे तो खतरेमे कसा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Sun, 02/28/2016 - 17:52 नवीन
बरोबर आहे, अनकॉमन म्हणले की "endangered" म्हणायला हवा नुसता खतरे में है नाही चालणार मराठीत काय म्हणावे बरं ह्म्म्म "लुप्तप्राय"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश गावडे Sun, 02/28/2016 - 18:43 नवीन
किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे!
वाह. माझ्या पुस्तकाने भरलेल्या कपाटातील पुस्तकांपैकी निम्म्याहून अधिक पुस्तके धार्मिक, अध्यात्मिक, देव, आत्मा, पुनर्जन्म वगैरेंबद्दल आहेत. त्यामुळे माझी ही पुस्तके पाहणारे मला हा प्रश्न आवर्जून विचारतात, "तू तर नास्तिक आहे मग ही पुस्तकं तुझ्याकडे कशी काय?" तेव्हा मी हेच उत्तर देतो. मी ज्या गोष्टीला विरोध करतो ती गोष्ट विरोध करण्याआधी मी समजून घ्यायला हवी आणि त्यासाठी मला त्याचा अभ्यास करायला हवा. मागे मिपावर मी पुनर्जन्मावरील चर्चेत मी विरोधी मत मांडल्यावर "तुमचा याबद्दल काही अभ्यास आहे का?" असा प्रश्न मला विचारला गेला. या प्रश्नाला उत्तर म्हणून मी पुनर्जन्माच्या बाजूने मत मांडणारे जे जे ग्रंथ अभ्यासले होते त्यांची यादी दिली. आणि तरीही मी विरोधी मत का मांडत आहे हे ही लिहिले. बहुतेकांना पुनर्जन्म ही संकल्पना भगवदगीतेतील "आत्मा" संकल्पनेवरून माहिती असते. क्वचित कुणीतरी हिराभाई ठक्कर यांचे "कर्माचा सिद्धांत" वाचलेले असते. पण बहुतेक वेळा हे इथेच थांबते. माझी यादी बरीच मोठी होती. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 08:19 नवीन
बरं "तुम्ही नका वाचु" ज्यांना वाचायचे त्यांना वाचु दे ही वृत्तीही नाही! कोणी वाचुन मत प्रदर्शन करू धजला तर त्याला सिक्युलर वगैरे शेलकी विशेषणे दगडं मारल्याप्रमाणे मारायची! असो! कुठलीही गोष्ट वाचायची नाही असे म्हणले तरी न वाचता कश्यावरही टिका कशी काय करायला जमते राव लोकांना? किमान तर्कपूर्ण टिका करायला तरी विरोधी मत नीट वाचलेच पाहिजे!
सबूर नानासाहेब सबूर. त्या दुसर्‍या नानासाहेबांसारखी एकदम निष्कर्षावर उडी मारलीत. मी लेख पूर्ण वाचला नाही हे तुम्हाला कोणी सांगितले? हे कशावरून तुम्ही ठरविले? संपूर्ण लेख व त्याखालील ४ प्रतिसाद वाचल्यानंतरच मी प्रतिसाद लिहिला आहे. "जे इस्लामोफोबियाला मुख्य मुद्दा बनवतात, ते हिंदुत्ववादी! " या वाक्यातच सर्व लेखाचे सार आहे असे मी लिहिले ते सुरवातीपासून शेवटपर्यंत लेख वाचल्यानंतरच. त्यामुळेच हे वाक्य वाचल्यानंतर खरं तर पुढे वाचायची गरज नाही हे लिहिले. पण मी लेख पूर्ण न वाचतात मत बनविले असा निष्कर्ष काढून तुम्ही मोकळे सुद्धा झालात. आणि ज्यांना हा लेख वाचायचा आहे त्यांनी तो वाचू नये हे मी कधी आणि कोठे सांगितले? कोणीतरी कसला तरी "पुरोगामी" लेख लिहिणार, दुसराच एक जण हा लेख वाचा म्हणून संदर्भ देणार आणि लेख वाचून मतप्रदर्शन केले की तिसराच त्या मतांना तर्कहीन नावे ठेवणार. हा काय प्रकार आहे? तेव्हा एकदम उडी मारून निष्कर्ष काढू नका (निदान माझ्याबाबतीत तरी). आता लेखाबद्दल अजून टिप्पणी. "इस्लामोफोबिया हा जे मुख मुद्दा बनवितात ते हिंदुत्ववादी" अशी एक नवीन "पुरोगामी" व्याख्या लेख वाचून समजली. हिंदुत्ववादी म्हणजे शाळेत रामायण/महाभारत/गीता शिकवा असे सांगणारे, शाळेत सूर्यनमस्कार/योगासने शिकवा असे सांगणारे, धर्मावर आधारीत अन्यायकारक वेगळे कायदे करू नका असे सांगणारे, हिंदू देवदेवतांची विटंबना करू नका असे सांगणारे अशी आमची इतके दिवस समजूत होती. परंतु हे करणारे ते हिंदुत्ववादी नाहीत. हिंदुत्ववादी म्हणजे इस्लामोफोबिया हा जे मुख मुद्दा बनवितात ते अशी नवीन "पुरोगामी" व्याख्या या लेखातून समजली. आणि त्यामुळेच फ्रान्स, इंग्लंड, स्वित्झर्लंड इ. देश हिंदुत्ववादी आहेत व डोनाल्ड ट्रंप हा देखील हिंदुत्ववादी आहे हे देखील लक्षात आले.
अवांतर :- कॉमनसेन्स खतरे में है!!!
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर या वाक्यातील सत्यता दृग्गोचर झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 08:20 नवीन
अपेक्षित प्रतिसाद! बाकी काही वाचायची गरजच नाही. हीच ती विचारसरणी. बाकी काही बोलायची गरजच नाही.
हा पण अपेक्षित प्रतिसाद. खाली सविस्तर लिहिले आहे, त्यामुळे वेगळे उत्तर देत नाही. अवांतर - भाजपच्या जातीयवादी राजकारणावरचा लेख पूर्ण झाला का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 08:30 नवीन
स्बूर. गुरुजी सबूर. उतावीळता तुमचा स्थायीभाव. कंट्रोल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 08:38 नवीन
आता यात कसला आलाय उतावीळपणा? हा लेख लिहिणार असे तुम्ही सांगून बरेच दिवस झाले. म्हणून म्हटलं की आठवण करून द्यावी. आम्हाला अजून किती दिवस/महिने/वर्षे वाट बघायला लावणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 08:50 नवीन
काय आहे की मी तुमच्यासारखा प्रतिक्रियावादी नाही. उठसूठ एखादा आवडत नाही म्हणून बिनबुडाचे आरोप करत नाही, मग फाटलेलं शिवता शिवल्या जात नाही हे माहित आहे. म्हणुन व्यवस्थित अभ्यास करतो आणि पुरावे काढतो. तूर्तास ताजी ताजी बातमी घ्या. आता ह्याला प्रतिक्रियावाद म्हणू नका फक्त. हा शुद्ध अवसरवाद आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 09:14 नवीन
मग ते लिहा लेखात सगळं. त्याचीच तर वाट बघतोय. अर्थात लेख लिहिण्यासाठी समर्पक मुद्दे नसल्यामुळे लेख लिहिता येत नसेल तर तसं सांगा. आम्ही समजून घेऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 09:21 नवीन
तुम्ही समजून घेण्यासाठी मला काही सांगायची गरज वाटत नाही. तुमचं तुम्हीच समजून घेतलंय. मग काय गरज? इथे तथाकथित अभ्यासू किसपाडू प्रतिसादांचा विचार आधी करायला लागतो. नाहीतर हजारी धागे निघतात. बाजू सांभाळता सांभाळता नाकी नऊ येतात. तुमच्यासारखे बिना-पुराव्याची प्रतिसादाची आगगाडी मला जमत नाही. एवढं समजतंय का बघा. बाकी किती शिल्लक आहे ते बघूच वेळ आल्यावर. रच्याकने, ती लिंक दिलीय, इग्नोर मारली का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 09:44 नवीन
बघितली की लिंक. त्यात काही विशेष नाही. असे अनेकपक्षांचे अनेकजण यापूर्वी बोललेले आहेत. जसे जेएनयूतील विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे तसेच यांनाही ते नको का? ज्याप्रमाणे देशद्रोही घोषणा दिल्याने देशद्रोह होत नाही, त्याचप्रमाणे अशा भाषणांनी काहीही होत नाही. समजा या भाषणाने जर काही गुन्हा झाला असेल तर उत्तरप्रदेश सरकारने तसा गुन्हा दाखल करून न्यायालयात जावे. समजा उत्तरप्रदेश सरकार दुर्लक्ष करीत असेल तर कॉंग्रेस किंवा इतर कोणीही अशा भाषणाविरूद्ध न्यायालयात जाऊ शकते. तस्मात असल्या फुसक्या लिंककडे दुर्लक्ष करावे हे उत्तम.
तुमच्यासारखे बिना-पुराव्याची प्रतिसादाची आगगाडी मला जमत नाही.
आगगाडी सोडा. बिना-पुराव्याची एखादी बोगी असली तरी ती दाखवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 09:47 नवीन
अंगावर आले की कोपरे शोधायचे. काही नवीन नाही. असु द्या. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 09:56 नवीन
आता इथे कोपरा कोठून आला? तुम्ही जी काही लिंक दिली आहे त्यात काही विशेष नाही हे दिसतेच आहे. आणि बिन-पुराव्याची आगगाडी म्हणालात म्हणून तर आगगाडीची निदान एखादी बोगी तरी दाखवा असे विचारले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Mon, 02/29/2016 - 16:18 नवीन
जोकर बुवा हे अरुण माहूर दलित होते. पण यांच्या बद्दल मायावती किंवा अरविंद केजरीवाल किंवा राजीव गांधी आणि त्यांचे चेले चमचे तत्सम कोणालाच "दलिताची" हत्या झाली म्हणून पुळका कसा आला नाही. का तो "दलित" असला तरी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता म्हणून. इथे "रोहित वेमुला"च्या दलित असण्याबद्दल शंका असूनही त्याचे जोरदार राजकारण केले गेले कारण ते "सोयीस्कर" होते आणि त्यात मिपा वरील निधर्मान्धानी हि हात धुवून घेतले. या दुटप्पी पणा ची शिसारी येते. http://indianexpress.com/article/india/india-news-india/vhp-leader-murder-rss-vhp-say-entire-dalit-community-will-begin-stir/ बरं हि खाजवून खरुज आपणच काढलेली आहे. फक्त त्यातील सोयीस्कर तेवढा दुवा आपण निवडलात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Mon, 02/29/2016 - 16:20 नवीन
हो आणि या गोष्टीला आता चार दिवस होऊन गेले आहेत. कार्य बहुल्यामुळे या सर्व लोकांना जर तेंव्हा जमले नसेल तर आता जायला हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Mon, 02/29/2016 - 16:26 नवीन
हे अरुण माहूर दलित होते. पण यांच्या बद्दल मायावती किंवा अरविंद केजरीवाल किंवा राजीव गांधी आणि त्यांचे चेले चमचे तत्सम कोणालाच "दलिताची" हत्या झाली म्हणून पुळका कसा आला नाही. का तो "दलित" असला तरी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता म्हणून.
जे जे संघ, विहिंप, भाजप, बजरंग दल, अभाविप इ. "फॅसिस्ट" संघटनांशी संबंधित असतात ते ते सर्वथा त्याज्य असतात. ते मेले तर कशाला दु:ख करायचे? उलट एखादा "फॅसिस्ट" गेला म्हणून आनंदोत्सवच करायला हवा. कर्नाटकातील प्रशांत पुजारी, केरळ्मधील सुजित, उ.प्र. मधील अरूण माहूर, पुण्यातील राठोड नावाचा कचरा गोळा करणारा अशा अनेकांचे गेल्या ३-४ महिन्यात खून झाले. पुजारी, माहूर, राठोड इ. खुनातील आरोपी मुस्लिम होते. यवतमाळमधील नमाजानंतर मशिदीबाहेर ३ पोलिसांना भोसकणारा मुस्लिम होता. या ढोंग्यांनी या खुनाबद्दल, यवतमाळमधील हल्ल्याबद्दल आजतगायत एक चकार शब्दाने प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा "असहिष्णुतेचे बळी" असा आरडाओरडा करून कोणी पुरस्कारही परत केलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
त
तर्राट जोकर Mon, 02/29/2016 - 16:27 नवीन
याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला रोहित वेमुला केस समजली नाही. पीरियड.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Tue, 03/01/2016 - 06:54 नवीन
पांढरे निशाण दाखविण्याची ही पद्धत आवडली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/01/2016 - 07:08 नवीन
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी एवढं कळतं मला. तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. तुम्हाला हरवणं कठीण आहे. तुम्ही जिंकले. (बघा, तुमच्या खात्यात पुढचे इन्स्टालमेंट आले असेल भाजपाकडून. आम्हाला च्यायला त्या ब्लॅकमनीचीच वाट पाहणे नशीबी. १०० दिवसांत आणणार होते, नाहीतर फाषी द्या म्हणले होते. विसरुन जातेत लोक. असो.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Tue, 03/01/2016 - 08:23 नवीन
हा हा हा. चर्चा कुणाशी करावी एवढं कळतं मला. तुम्हाला काय समजायचं ते समजून घ्या. तुम्हाला हरवणं कठीण आहे. तुम्ही जिंकले.
आधीच्याप्रमाणे ही पण पद्धत आवडली.
(बघा, तुमच्या खात्यात पुढचे इन्स्टालमेंट आले असेल भाजपाकडून. आम्हाला च्यायला त्या ब्लॅकमनीचीच वाट पाहणे नशीबी. १०० दिवसांत आणणार होते, नाहीतर फाषी द्या म्हणले होते. विसरुन जातेत लोक. असो.)
वा! आमच्य खात्यात भाजपकडून इन्स्टॉलमेंट? आता काय बोलायचं? आणि ते काळ्या पैशाबद्दल लिहिताना १५ लाखांचा उल्लेख राहिला की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Tue, 03/01/2016 - 12:00 नवीन
आणि तेही सपाची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशातील एका शहरात? आणि त्यावर सपा, बसपा, कम्युनिस्ट वगैरे कोणाचीही प्रतिक्रिया नाही? २००९ च्या निवडणूक प्रचाराच्या वेळी याहून पुष्कळ सौम्य भाषा वापरूनही मायावतींच्या सरकारने वरुण गांधींना तुरूंगात टाकलं होतं. आणि ते योग्यच होतं. पण अजूनही कुणीही प्रतिक्रिया दिलेली नाही? आश्चर्याची गोष्ट नाही वाटत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/01/2016 - 12:24 नवीन
रे भाइ केहना क्या चाहते हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
स
सुबोध खरे Tue, 03/01/2016 - 14:27 नवीन
का तो "दलित" असला तरी विश्व हिंदू परिषदेचा कार्यकर्ता होता म्हणून. साधं आहे जर दलित भाजप किंवा त्यांच्या जवळ गेला तर आपोआप उच्च वर्णीय होतो मग त्याचा कड घेणे हे प्रतिगामी होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/01/2016 - 15:43 नवीन
ओक्के. तो माहूर का कोण दलित म्हणुन मारलाय का? ह्या भाजपलोकांनी आजवर दलितअत्याचार विरोधात काय काम केलंय तेही कळू देत ह्या निमित्ताने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Tue, 03/01/2016 - 15:59 नवीन
असं जर त्याचं विच्छेदन केलं तर पुरोगामी म्हणवता येत नाही. मेलेला पहिल्यांदा "दलित" आहे का ते पाहायचं मग त्यातून काय "फायदा" होईल ते पहायचं आणि मग बोंब मारायची. जाता जाता -- रोहित वेमुलाला दलित म्हणून कुणी मारलंय का? आम्ही तर असं वाचलं कि त्याने आत्महत्या केली आणि ते सुद्धा त्याने लिहिलं आहे कि कुणाला जबाबदार धरू नये म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/01/2016 - 16:15 नवीन
म्हणूनच म्हटलंय. तुम्हाला रोहित वेमुला प्रकरण समजलेलंच नाही किंवा आवडत्या पक्षाखातर डोळे मिटून घेताय. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 03/01/2016 - 16:35 नवीन
रोहित च्या प्रकारणा बद्दल तुम्हाला माहिती असल्यास तुम्ही नविन धागा काढून ह्या मिपा वरच्या अनाड्यांच्या माहितीत भर घालावी ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सुबोध खरे Tue, 03/01/2016 - 16:48 नवीन
जोकर बुवा जरा हे पण वाचून घ्या ना. उगाच आपलं ते"च" खरं म्हणायचं The value of a man was reduced to his immediate identity and nearest possibility. To a vote. To a number. To a thing. Never was a man treated as a mind. As a glorious thing made up of stardust. In very field, in studies, in streets, in politics, and in dying and living. I am writing this kind of letter for the first time. My first time of a final letter. Forgive me if I fail to make sense. Maybe I was wrong, all the while, in understanding world. In understanding love, pain, life, death. There was no urgency. But I always was rushing. Desperate to start a life. All the while, some people, for them, life itself is curse. My birth is my fatal accident. I can never recover from my childhood loneliness. The unappreciated child from my past. I am not hurt at this moment. I am not sad. I am just empty. Unconcerned about myself. That's pathetic. And that's why I am doing this. People may dub me as a coward. And selfish, or stupid once I am gone. I am not bothered about what I am called. I don't believe in after-death stories, ghosts, or spirits. If there is anything at all I believe, I believe that I can travel to the stars. And know about the other worlds. I forgot to write the formalities. No one is responsible for my this act of killing myself. No one has instigated me, whether by their acts or by their words to this act. This is my decision and I am the only one responsible for this. -Rohith's suicide note[8] Rohith's suicide has been called an "institutional murder" by Bahujan Samaj Party leader Mayawati,[14] Sitaram Yechury of Communist Party of India (Marxist) .[15] https://en.wikipedia.org/wiki/Suicide_of_Rohith_Vemula
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 03/01/2016 - 16:53 नवीन
सोयीचे तेवढे बघावे, इतर ते दुर्लक्षावे. तुम्ही फक्त हे पत्रच घेऊन बसलात का? का तर त्यात तसे भाजपाला बदनाम करणारे काही नाही म्हणून? असते तर... जस्ट इमॅजिन. श्रीगुरुजी काय बोलले असते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
ट्रेड मार्क Tue, 03/01/2016 - 17:03 नवीन
ही तर फक्त रोहिथनी लिहिलेली सुसाईड नोट आहे. त्याला काय महत्व द्यायचं? राहुल, केजरी, येचुरी, समस्त डावे लोक्स आणि राजदीप, बरखा यासारखे पत्रकार काय म्हणतात हे जास्त महत्वाचं. बाकी स्वतः आत्महत्या करणारा, पोलिस आणि पोस्टर वगैरे सारख्या फालतू गोष्टींना काय महत्व आहे? सरकार आणि कोर्टाचं तर नावच घेऊ नका, रोहिथच्या हत्येला सरकार जबाबदार आहे आणि कोर्ट तर अफझल, याकुब सारख्यांना कारण नसताना फाशी देतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा