Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रपाव

त
तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 10:35
🗣 135 प्रतिसाद
उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही. खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्‍यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं. माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली. मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता. ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात? मंडली, हाय काय उत्तर? (धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल) - (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर

प्रतिक्रिया द्या
18523 वाचन

💬 प्रतिसाद (135)
म
माहितगार गुरुवार, 03/17/2016 - 11:50 नवीन
उर्वरीत पक्षिय अभ्यासपुर्ण आणि तर्कसुसंगत पणे मुद्दे खोडत नाहीत त्यामुळे कट्टरवादी सुद्धा उजवा दिसतो. ओवेसींनी टागोरांचा नॅशनलीझम आदर्श असल्याची दुहाई दिली आहे, पण टागोरांचे जे वाक्य वापरले आहे त्याचा ज्याला जसा वापर करावयाचा तसा करता येतो मग औरंगजेब, निझाम, रझाकार हे सुद्धा हिरो बनवता येऊ शकतील का अशी शंका वाटते. टागोरांचा त्यांनी दाखला दिलाच आहे तर तो विचार तपासला जावा म्हणून टागोर आणि सावरकर तत्वज्ञानातील साम्य आणि फरक हा वेगळा धागा टाकला पण मिपा पब्लिक देखनोको तय्यारीच नइ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 10:45 नवीन
जबरदस्त प्रश्न!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 04:45 नवीन
अख्तर साहेब पण ह्याच धर्माचे पाईक आहेत ना, त्यांनी जे भाषण दिले त्याबद्दल पण लिहा।
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 05:59 नवीन
अख्तर साहेबांच्या नावावर जाऊ नका. ते नास्तिक आहेत. त्यांनी मुस्लिम धर्म केव्हाच सोडून दिलाय. प्रस्तुत भाषणातले मुद्दे आणि प्रश्न बघा, कोणी दिलंय ते बघू नका. कोणी काय म्हणायला पाहिजे ह्यापेक्षा ओवेसीने विचारलेले हे प्रश्न जास्त महत्त्वाचे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 08:55 नवीन
बरं...ते नास्तिक आहेत म्हणून भारत माता कि जय बोलले कि काय,मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 09:08 नवीन
धर्माचे पाईक हा धार्मिक आधारावर त्यांचे महत्त्व अधोरेखित करणारा शब्द आपण वापरला. मुस्लिम नाव असले की तो पार आयसिस प्रेमीच असतो ह्या गृहितकावर आधारित तुमचा प्रतिसाद होता. म्हणजे ओवेसीच्या ज्या धर्माचा आहे त्याच धर्माचा अख्तर असुन त्याल काय प्रोब्लेम नाय तर ह्याला काय असावा असा तुमचा प्रश्न आहे. आता अख्तर मुस्लिम नाही म्ह्टल्यावर तुम्ही म्हणताय तो मुस्लिम असता तर काय बोलला नसता काय? अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. बरं ते नाही म्ह्टलं तर ते देशभक्त नाहीत हा जावई शोध लावणारे संघवाले कोण लागून गेलेत? हा फुकटचा आगावू उपयोगशून्य जिंगोइजम देशाला अजिबात गरजेचा नाही. भारतमाताकीजय म्हनुन मल्ल्या गेला पळून, त्याच्या देशभक्तीवर आपण शंका घेणार की नाही घेणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 10:02 नवीन
माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं मला;
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 10:12 नवीन
अहो लाखो-करोडो मुस्लिम आहेत जे वंदेमातरम पासुन भारतमाता की जय सगळं म्हणतात. >>> ह्यात तुम्हाला उत्तर नाही मिळालं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 10:39 नवीन
मी अख्तरांबद्दल विचारतोय साहेब लाखो करोडो मुस्लिमांबद्दल नाही।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 10:51 नवीन
अख्तर साहेब पण ह्याच धर्माचे पाईक आहेत ना, >> ह्याचा काय अर्थ आहे ते जरा विस्ताराने सांगा मग तुमच्या प्रश्नाचे उत्तर देईल. संदिग्ध प्रश्न मांडणे ही मिपावर फॅशन होत चालली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 11:51 नवीन
तुम्हाला कुठे संदीग्ध वाटले हो माझा प्रश्न सरळ आहे मुस्लिम राहिले असते तर बोलले नसते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 12:45 नवीन
हे मी कसे सांगणार? हा प्रश्न जावेद अखतरांसाठी आहे. त्याचे उत्तर तेच देऊ शकतील. ;-) जावेद अख्तर ह्याच धर्माचे पाईक ना ह्या तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी दिले. खरे तर ते उत्तर नसून माहिती होती. मत तर अजिबात नव्हते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/17/2016 - 05:00 नवीन
जावेद अख्तर
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/17/2016 - 05:06 नवीन
https://www.youtube.com/watch?v=bBJdE-ieHPI&feature=youtube_gdata_player
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
प
प्रदीप साळुंखे गुरुवार, 03/17/2016 - 05:50 नवीन
"भारत माता कि जय" या घोषणेवर कोणाचेही पेटंट नाही.संघाचेही नाही. मग ही घोषणा देताना औवेसीच्या गळ्यात काय हाड अडकतयं कोणास ठाऊक? केवळ भागवत म्हणाले कि "भारत माता कि जय" म्हणायला सर्वांना शिकवलं म्हणजे,म्हणून औवेसीला पिसाळायचं काहीच कारण नव्हतं.ती घोषणा संघाची असल्याचा त्याचा कडू गैरसमज झाला असावा. सगळं कसं अंगावर ओढून घ्यायचं,वातावरण तापवायचं अन् भुंकत सुटायचं हा त्याचा छंदच आहे. निवळ्ळ चमकोगिरी करण्यापलिकडे त्याच्या राजकारणाला कवडीचीही किंमत नसावी. वारिस पठाणला निलंबित केलं आहे,हे सर्वपक्षीय ठरावाने झालं आहे.त्यामध्ये काँग्रेस,राष्ट्रवादीही येतात. पण त्याची देशभक्ती ठरवणारे हे काँग्रेस+राष्ट्रवादीवाले कोण?
  • Log in or register to post comments
य
याॅर्कर गुरुवार, 03/17/2016 - 05:59 नवीन
प्रदीपभाऊ, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही ओ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप साळुंखे
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 07:42 नवीन
खालील सर्व म्हणायला कोणाच्या गळ्यात हाड अडकू नये म्हणजे झालं... Hail Mother India કરા મધર ઇન્ડિયા Karā madhara inḍiyā শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া Śilābr̥ṣṭi mādāra inḍiẏā அன்னை வாழ்க இந்தியா Aṉṉai vāḻka intiyā వడగళ్ళు తల్లి భారతదేశం Vaḍagaḷḷu talli bhāratadēśaṁ جی ماں بھارت भारतमम्मी की जय भारतअम्मी की जय भारतअम्मा की जय भारतमॉम की जय. जय हिंद हिंदुस्तान जिंदाबाद
  • Log in or register to post comments
S
sagarpdy गुरुवार, 03/17/2016 - 07:47 नवीन
आमी बाबा शाकाहारी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बॅटमॅन Wed, 03/30/2016 - 21:00 नवीन
Hail Mother India
चे
শিলাবৃষ্টি মাদার ইন্ডিয়া
ज्याने केले त्या स्युडोटागोरास माझा नोमोश्कार. ( कहानीमध्ये बॉब बिस्वास (खरा उच्चार 'बिश्शाश') 'नोमोश्कार. अ‍ॅक मिनिट.' म्हणतो त्यातला.) Hail = शिलावृष्टी? लैच तर्राट, नव्हे लिटरर्राट धावली ट्रान्सलेटरची बुद्धी. =)) गेलाबाजार कण्टेक्स्ट तरी बघायचा म्हण्टो मी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 21:54 नवीन
हे हे. वो गुगल ट्रान्सलेटकी बुद्धी है. तुमच्यासारख्या म्होट्या माणसाने वळीकने म्होटी गोट नाय. =)) तुम्ही रजेवर हुते नैतो तुम्हालाच सगळे भाषांतर विचारणार हुतो. पण त्या सगळ्या प्रकारात वेळ गेला असता आणि लोहा थंड झाला असता, मग काय मिळेल तो हातोडा मारला. ;-) बाकी आम्ही भाता हलवत बसणारे लोहार. लोक आगीकडे बघतात, हत्यारांकडं नाही. तुमच्यासारखा पारखी आणी बेरकी येकांदाच. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
च
चेक आणि मेट गुरुवार, 03/17/2016 - 08:53 नवीन
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही
ओवेशी?? शेपूट वाकडचं असतय,सरळ होत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 08:59 नवीन
कोणाचं ? :D ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चेक आणि मेट
च
चेक आणि मेट गुरुवार, 03/17/2016 - 09:04 नवीन
कोण अंगावर ओडून त्याचं ओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 09:09 नवीन
खाजवून खरुज काढणार्‍यांचं शेपुट वाकडं होतं आणि राहणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
च
चेक आणि मेट गुरुवार, 03/17/2016 - 09:18 नवीन
अगदी अगदी हे मात्र लाखात एक बोललात, सहमत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 09:23 नवीन
ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता. पण ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते, थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको, भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते. *संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 09:27 नवीन
भारत मटैक्स की जय असे टंकन अनवधानाने झाले असुन ते भारत माता की जय असे वाचले जावे ही विनंती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 09:24 नवीन
ह्या प्रसंगा अगोदर एकंदरित थोरले ओवैसी उर्फ़ असदउद्दीन ओवैसी ह्यांच्या बद्दल एक कुतूहल असे. त्यांना मिळालेली संसदरत्न पुरस्कार. अभ्यासु प्रश्न. त्यांनी एका जाहिर टीवी चर्चेत उडवलेल्या पाकिस्तानी प्रवक्ते अन एजेंडाच्या चिंध्या (ह्यावेळी त्यांच्यासोबत किर्ती आझाद सुद्धा होते) , त्यांचा घटना अन कायद्याचा अभ्यास ह्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत जरी नाही तरी माफक आदर निर्माण झाला होता हे मान्य केलेच पाहिजे मला. एकंदरित तर्क कायदेशीर भाषेत बसवुन बोलणारा किंवा हिंदुस्तानी मुसलमान आपले प्रॉब्लम स्वतः हाताळु शकतात असे म्हणणारा म्हणूनही आदर होता. पण ह्या प्रकारात मात्र ओवैसी हे कायदा अन घटनेच्या आडून आपला उजवा एजेंडा राबवत आहेत असे वाटते. कुरआन मधे अल्लाह सोडुन कोणाच्या पूजनाची परवानगी नाही (ऐकिव माहीती) हा तो एजेंडा होय, ह्याला कायदेशीर अन घटनात्मक मुलामा चढ़वायला त्यांनी "घटनेत कुठेही 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलेले नाही, तसेच आपला 'हिंदुस्तानी मुसलमान' हा एसेंस अबाधित ठेवायला भाषणाची सांगता 'जय हिंद' केली आहे हे इथे ठळकपणे जाणवले तरी, त्यांचा मुळ मुद्दा हा नसुन हल्लीच रा स्व संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ह्यांनी केलेल्या 'तरुण मुलांना जय हिंद म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधानाचा विरोध हा आहे. हिंदुस्तानी मुसलमान भारताला(च) आपला देश मानतात अन इमान राखतात हा त्यांचा मुद्दा इतरवेळी योग्य वाटत असला तरी ह्या विशिष्ट प्रसंगी त्यांचा एजेंडा हा फ़क्त संघाच्या सर्वेसर्वा ने दिलेल्या विधानात कुसपटे काढणे होय असे जाणवते, थोड़े 'भारत माता की जय म्हणायला शिकवले पाहिजे' ह्या विधाना बद्दल भागवत जे म्हणाले आहेत ते मुळात चुक नाही , पण त्याचे डिटेल्स सुद्धा आले पाहिजेत, भारत मटैक्स की जय म्हणायला मी सुद्धा माझ्या संतती ला नक्कीच शिकवेल, पण लोकसमुच्चयाचा विचार करता, सगळ्यांना मुळात मनःपूर्वक भारत माता की जय म्हणावे वाटले पाहिजे तसे प्रेरणादायी अन निकोप वातावरण पाहिजे हे ही ह्या निमित्ताने अधोरेखित करतो, त्याच्यात जबरदस्ती नको, भारत माता की जय विधानाच्या समर्थनार्थ जर *तमाम राष्ट्रप्रेमी लोकं आक्रस्ताळे अन साचेबद्ध नारे देऊ लागले तर तोंडघशी पडतील अशी भीती ह्या निमित्ताने वाटते, इथे जिंगोइसम उपयोगी नाही कारण गाठ एका कायदा पुढे करणाऱ्या अन ह्या विशिष्ट प्रसंगी लुच्चेपणा करणाऱ्याशी आहे हे भावनवेगात विसरून चालण्यासारखे नाही असे फील होते. *संदर्भ :- उत्तरेकडल्या कुठल्यातरी एका भाजयुमो नेत्याने 'ओवैसीची जीभ कापून आणून देणाऱ्यास एक कोट रूपये देऊ' अशी घोषणा करून एका राष्ट्रिय वृत्तवाहिनी वर तो आकड़ा टाकलेला चेक फड़कवला आहे, असे करून उपयोग नाही असे म्हणायचे आहे
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 03/17/2016 - 10:39 नवीन
शिवसेनेने केली अंध विद्यार्थ्याला मदत - हि बातमी आम्ही शेर करणार नाही. शिवसेना आमदाराची महिला कर्मचार्याला मारहाण हा विदिओ मात्र १०० वेळा शेर होणार. ह्यांत आश्चर्य काहीच नाही. कुत्रा माणसाला चावला हि बातमी होत नाही, माणसाने कुत्र्याचा चावा घेतला हि बातमी बनते. ज्या गोष्टीत "Information gain" जास्त आहे ती बातमी बनते. नरेंद्र मोदिनी ढोकळा खाल्ला हि बातमी नाही पण नरेंद्र मोदिनी खाल्ला बीफ पकोडा हि फार मोठी बातमी आहे करण ह्या दुसर्या बातमीत पहिल्या बातमी पेक्शा जास्त माहिती दडलेली आहे. मिडीयाला जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही. शिवसेनेला किंवा इतर कुणाला कितीही वायीत तर्हेने दाखवले तरी शेवटी मत देताना लोक इतर अनेक विषयांचा विचार करून देतात. मिडीयाला लोक भाव देत असते तर आज राहुल पंतप्रधान आणि मोदी जेल मध्ये असते.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 11:08 नवीन
तुम्ही त्या महिला कर्मचार्‍याला कुत्रा म्हणत आहात काय? बाकी शिवसेना राडेबाजी, मारहाणीशिवाय अजुन कशासाठी प्रसिद्ध आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 10:48 नवीन
ओवेसीचे पाकिस्तान्यांना सडेतोड उत्तरः हे विडियो इथे शेअर करण्याचे कारण फक्त एवढेच की माध्यमात नेहमीच ह्या बातम्या येत नाहीत. ओवेसीची ही पण बाजू मांडली गेली पाहिजे असे वाटते. मला कुणाचाही पुळका नाही, बस कोणाबद्दल जजमेंटल होऊ नये असे वाटते. बाकी ज्याच्या त्याच्या राजकारणाप्रमाणे भ्डकाऊ भाषणे करणे ह्या देशात कोणत्याच धार्मिक-जातीय नेत्याला वर्ज्य आहे असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 11:01 नवीन
हाच हाच ह्याच्याचबद्दल बोलत होतो मी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 10:57 नवीन
अजुन एक.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 11:16 नवीन
हाउ रे हौले! उने हैदराबादी हिंदी बोलरे यारो! क्या की किरकिरी! ऐसे आदमी कु जज करनेवालो कु मई घफला बोलेला जैसे यारो! पैराडाइस के बिरयानी की कसम!!.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
ब
बोका-ए-आझम Mon, 03/28/2016 - 08:49 नवीन
बावर्ची मध्ये जास्त चांगली बिर्याणी मिळते असे सांगू इच्छितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
ख
खालीमुंडी पाताळधुंडी गुरुवार, 03/17/2016 - 11:30 नवीन
व्वा वा मस्त चर्चा ओवेसींची दुसरी बाजू पण तपासली पाहिजे,हे यानिमित्ताने सांगू इच्छितो. बाकि स्काॅचराव आणि जोकरराव यांच्या मुद्दे मांडण्याच्या पद्धतीमध्ये,विचारांमध्ये बरीच समानता आढळते.
  • Log in or register to post comments
न
नाना स्कॉच गुरुवार, 03/17/2016 - 11:41 नवीन
दोघं दारुडे!! ग्लासातल्या मैत्री अन एकमते पक्की असतात म्हणे मी :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खालीमुंडी पाताळधुंडी
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 11:53 नवीन
हा हा हा स्कॉच राव फक्त उतरे पर्यंतच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 12:46 नवीन
बिल कुणी द्यायचं हे ठरेपर्यंत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 13:19 नवीन
कन्हया खतम, अब ओवेसी शुरु. गौमातासे आगाज हुवा, अब अंजाम-ए-सफर क्या होगा. पांच साल जब खत्म होंगे, वजह-ए-फकर क्या होगा
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/17/2016 - 13:35 नवीन
बघा ना तुमचा हिरो पडद्याआड गेला कि राव'
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 03/17/2016 - 14:32 नवीन
आमचे हिरो आम्हीच. आम्हाला कुणा हिरोची गरज नाही
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 03/18/2016 - 12:19 नवीन
राष्ट्रशॉपः
फोटोशॉप वापरुन राष्ट्रीय नेत्यांची यथेच्छ खिल्ली उडवायची मुभा आहे.
फक्त संघ व भाजप यांचे सोडून. अन्यथा अटक होऊन जेलमधे जाल.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/28/2016 - 03:12 नवीन
नाशिकला एक फरशीवाले बाबा म्हणुन कोणी आहेत. ते काविळीवर औषधोपचार करतात. (अजुन कृष्णजन्मभुमीमधे गेले नसतील तर) जवळ पडेल तुम्हाला. लवकर बरे व्हा बरं. आपल्या पिवळ्या डोळ्यांचा रंग लवकर उतरो, आपल्या प्रकृतीस लवकर उतारा पडो ह्यासाठी त्र्यंबकेश्वर समर्थ आहेचं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Mon, 03/28/2016 - 05:49 नवीन
चालायचचं आज रंगपंचमी हाय, पिवळा रंग थोडा जास्तच वापरलाय:'(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 12:26 नवीन
तुम्हाला का मिरच्या झोंबल्यात कॅप्टन? वैयक्तिक हल्ले करत आहात म्हणून म्हटलं. असे कुजकट हल्ले करण्याची मुभा आणि आयडी तरीही शाबूत राहण्याची तुम्हाला इमुनिटी प्राप्त असावी. बाकी मुद्दे नसले की लोक वैयक्तिक विखार दाखवतात हे आता सवयीचं झालंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 03/28/2016 - 13:35 नवीन
कुठाय बॉ वैयक्तिक हल्ला? वैयक्तीक हल्ला पहायचा असेल तर आपण तुडतुडी तैंची खरडवही बघु कसं? तब्बेतीची काळजी वाटली म्हणुन आपला सल्ला दिला. आता तुम्ही त्याला जर हल्ला समजणार असाल तर मी काय करणार बॉ? आपणही एकांगी भुमिका घेउन एकाचं विशिष्ट विचारधारेला विनाकारण टारगेट करुन इथे गाळ खरवडताय. आधी एका धाग्यावर बोललो त्याप्रमाणे चांगल लिहायची क्षमता असुनही आपण ***दारी करता त्याला लोकं कंटाळलित. बाकी चालु द्या. इम्युनिटी नाही बॉ आपल्याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
च
चेक आणि मेट Mon, 03/28/2016 - 13:41 नवीन
बादवे त्या तुडतुडी दिसत नाहीत हल्ली?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 13:44 नवीन
बघा ना. जशास तसे उत्तर होते ते. तुम्हाला तुडतुडींचे बोबडे बोल मात्र खटकले नाहीत हे विशेष. एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर? ***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 04/04/2016 - 18:59 नवीन
एवढीच काळजी आपण दुसर्‍या एका विशिष्ट विचारधारेच्या एकांगी आयडींबद्दल दाखवतांना दिसत नाही. मग आपल्याला मलाच सल्ला द्यायची काय हुक्की येते ब्वा? सहन होत नै का आपल्या आवडत्या विचारधारेची पिसं काढली तर?
नाही आवडत आवडत्या विचारधारेची पिसं काढलेली. कारण लैचं स्पष्टं आहे. आपण आधी त्या पिसांची उधळण विचारसरणीवर करता. नंतर मग पिसं काढायचा प्रयत्नं करता. तस्मात नाही आवडत. जे आहे ते दाखवा मग बोलु कसं? पण मग तुम्हाला तुमचं नेटवरचं सुलभ आणि मोफत **लय बंद करायला लागेल नै का? पोटापाण्याचा धंदा सोडवणार नाही एकदम काय?
***दारी म्हणाल तर ते करुन नंतर स्वतःच लेख मिटवून टाकणार्‍यांतला मी नाही. तुमचं काय ते बघा. 'पहले अपने गिरेबान में झांको' का काय म्हणतात ते.
तो धागा परत येणार. वेळ लागेल जरा. पण नक्की येणार. मग त्यावर मैत्रीच्या मुखवट्याआडुन वार करणारे लोक्स येउंदे नैतर कोणीपण. तुम्हाला काय वाटलं ट्रॉलिंग ला घाबरुन बंद केला धागा? गैरसमज. तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा