Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

राष्ट्रपाव

त
तर्राट जोकर
Wed, 03/02/2016 - 10:35
🗣 135 प्रतिसाद
उ.ठाक्रे: माध्यमं कधी शिवसेनेची चांगली कामे दाखवत नाही. खरे बोलले. शिवसेनेने किती चांगली कामे केली आहेत. मरगळलेल्या मराठी माणसाला बलशाली बनवलं. उद्द्यमशील बनवता बनवता उत्सवशील बनवलं. त्या उत्सवास सहृदयतेने निरपेक्ष मदत न करणार्‍यास योग्य ती मायेची समज देण्याइतकं कनवाळू बनवलं. आपल्या हक्कांसाठी जागरुक राहायला शिकवलं. माध्यमं: शंभर वडापाव फुकट दिले नाहीत म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्याने वडापाववाल्याला बांबूने मारहाण केली. मला काथ्याकूट करायची हुक्की आली, उचकी आली. कारण का तर हा प्रश्न दारूच्या ग्लासात बर्फाच्या जागी पडला होता. ही माध्यमं बेणी नेअमी चुकीच्या बातम्या का ब्रे देतात? मंडली, हाय काय उत्तर? (धागा राजकिय नाही. गैरसमज करुन घेऊ नये. भावना दुखावल्यास शिवसेनास्टाईल उत्तर दिले जाईल) - (कुठलाही जोक न मारणारा) तर्राट जोकर

प्रतिक्रिया द्या
18523 वाचन

💬 प्रतिसाद (135)
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 19:21 नवीन
तुमची जी काय मतं असतील ती तुमच्या जवळ ठेवा. You are not important. Your existence is not important. Your way of thinking is not important. >> exactly my feeling.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
D
DEADPOOL Tue, 04/05/2016 - 15:58 नवीन
जॅक भौ कशाला नादी लागतायेत? आपल्याला एवढी घाण भाषा वापरायला जमणार नाही हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
त
तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 00:00 नवीन
धागा: चोरी ..>>.. भरल्या पोटावरुन एक हात फिरवता दुसर्‍या हाताने धरलेल्या टॅबवर ही कथा वाचतांना छान वाटतं.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 12:55 नवीन
स्वतःच्या इभ्रतीपेक्षा पक्ष मोठा, त्याची इभ्रत मोठी असे मानणार्‍यांच्या त्याग, बलिदान अशा हुच्च विचारांना माझा राष्ट्रसलाम. टिंबटिंबटिंबदारी करणार्‍यांची विचारधारा महान आहे. जय हो! Image removed. रच्याकने, वेलेंटाइनडेला प्रेमीयुगुलांना मारहाण करणार्‍यांच्या ट्रेनिंगसेशनमधे मुलेमुली एकत्र राहतात, नाचगाणे करतात. लै भारी. करोत बापडे, हम्कू क्या? हमारा तो नजरही गंदा है. छोडो.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 13:01 नवीन
माननीय संपादक मंडळ, कॄपया ह्या प्रतिसादातील पत्राचा फोटो त्वरित काढून टाकावा, त्यात सदर मुलीचे नाव असल्याचे नंतर लक्षात आले. तसदीसाठी क्षमस्व.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy Wed, 03/30/2016 - 14:40 नवीन
abp माझा ला आत्ताच बातमी आली आहे, नावासकट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 03/30/2016 - 14:46 नवीन
धन्यवाद! महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
श
श्रीगुरुजी Sun, 04/03/2016 - 11:51 नवीन
महिलांसोबत कथित आक्षेपार्ह वागण्याबद्दल कन्हयाला तोंड दुखेपर्यंत शिव्या घालणारे, हिरिरीने पुरावे देणारे पांडेच्या बाबतीत काय भूमिका घेतात बघूया.
कथित???? कन्हैय्याचे वागणे कथित नसून प्रत्यक्षात घडले होते. ते चौकशीत सिद्ध झालेले आहे व त्याला त्याबद्दल दंड भरावा लागला होता. तेव्हा कथित असा शब्द वापरून त्यावर पांघरूण घालू नका. कन्हैय्याने केलेल्या व सिद्ध झालेल्या किळसवाण्या प्रकाराची आणि या गणेश पांडेच्या प्रकरणाची तुलना निदान अजूनतरी होऊ शकत नाही. कन्हैय्याने विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघात विजारीची चेन उघडून लघवी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर एका मुलीने हटकल्यावर त्याने तिलाच धमक्या दिल्या. त्या मुलीने विद्यापीठात तक्रार केल्यावर चौकशी होऊन कन्हैय्याने हा घाणेरडा प्रकार केल्याचे सिद्ध होऊन त्याला ३००० रूपये दंड भरायला लागला होता. गणेश पांडेची केस निदान सध्यातरी वेगळी आहे. त्यातले सत्य अजून बाहेर आलेले नाही. दोन्ही बाजूने आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. गणेश पांडेने ४ मार्चला आपला विनयभंग करायचा प्रयत्न केला अशी तक्रार मैथिली जावकरने तब्बल १८ दिवसांनी केली. ती तक्रार पोलिसात न करता आशिष शेलारांकडे केली. खरं तर ४ मार्चलाच तिने पोलिसांकडे तक्रार करायला हवी होती. ती पोलिसांकडे न जाता शेलारांकडे का गेली हे समजत नाही. दोघेही राजकारणात आहेत. राजकारणातील वैयक्तिक महत्वाकांक्षा, प्रतिस्पर्धी, एकाच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसर्‍यावर गोळी झाडणे असे अनेक अँगल आरोप करताना असू शकतात. तिथे नक्की काय झाले हे अजून पूर्णपणे बाहेर आलेले नाही. ४ मार्चला कथित विनयभंगाचा प्रकार झाल्यावर, ५ व ६ मार्चला ती आमच्याबरोबरच होती व ७ मार्चला तिने व्हॉट्सअ‍ॅपवर पांडेचे कौतुक करणारे संदेश पाठविले होते असे पांडेचे म्हणणे आहे. त्याने ते मेसेजही पत्रकारांना दाखविले. त्यामुळे यात कोण खरेखोटे बोलत आहे याविषयी अजूनतरी गोंधळ आहे. दोन्ही बाजूने वेगवेगळे आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रकरण अजून पोलिसांकडे गेलेले नाही. आआपच्या जसलीन कौरने प्रसिद्धीसाठी सरबजित सिंग वर केलेला विनयभंगाचा आरोप शेवटी खोटा निघाला होता. रोहतकच्या दोन भगिनींनी बसमधील आसनावरील जागेवरून भांडण झाल्यावर विनयभंगाचे आरोप करून ३ मुलांना पट्ट्याने मारहाण केली होती. शेवटी त्या दोघी भगिनी खोटे बोलत आहेत हे सिद्ध झाले होते. जोपर्यंत या पांडे प्रकरणातील सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत दोघांपै़की कोणा एकाची बाजू घेणे टाळायला हवे. या प्रकरणातील ही पांडेची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-pandey-rubbishes-all-the-allegations/articleshow/51600107.cms या प्रकरणातील ही मैथिली जावकरची बाजू - http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/ganesh-pandey-has-money-and-muscle-power-claims-maithili-javkar/articleshow/51619126.cms
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
प
प्रसाद गोडबोले Wed, 03/30/2016 - 13:33 नवीन
१००
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 11:35 नवीन
जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Sat, 04/02/2016 - 17:59 नवीन
अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे.
म्हणे !!!!!!!!!!!!!!!!!!!!! यातच सर्व काही आलं. बादवे, ती चित्रफीत मी संपूर्ण पाहिली. त्यातले एक वाक्य वगळता ("हा आमचा माणूस नाही ..." असं एक बो घातलेला माणूस सांगताना दिसतो) इतर काहीही ऐकू येत नाही.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 19:39 नवीन
लोल्झ =)))))) चित्रफित पाहण्यसाठीच टाकली होती. बाकी सुजात आम्बेडकर (तोच तो बो घातलेला माणूस - बाबासाहेब आंबेडकरांचा पणतू आहे) ह्यांना जाऊन विचारू शकता, काय घडले ते. पुण्यातच आहेत. फर्गुसनमधे. त्यांच्या गृपमधे हा काय करत होता एकटाच ते. आणि का पकडला ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/03/2016 - 11:15 नवीन
त्या चित्रफीतीत एकसुद्धा घोषणा ऐकू येत नाही. प्रचंड गोंधळ सुरू आहे. एक मोठा घोळका आहे. कॅमेरा सतत एकडेतिकडे हलत आहे. त्यादिवशी अनेक विद्यार्थी संघटनांचे अनेक कार्यकर्ते फर्ग्युसनमध्ये आले होते. जोरदार गोंधळ सुरू होता. गोंधळात कार्यकर्ते इ़कडेतिकडे जाणे सहज शक्य आहे. या आरोपाच्या समर्थनार्थ जी चित्रफीत टाकली आहे. त्यात कोणीही एकही घोषणा देताना ऐकू येत नाही. त्यामुळे अभाविपचा कार्यकर्ता घोषणा देताना पकडला हा शुद्ध खोडसाळ आरोप आहे. फर्ग्युसनमधील या चित्रफितीत तर एकही घोषणा ऐकू येत नाही. त्यामुळे मूळ प्रतिसादातील "जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे." हा खोडसाळ आरोप नेहमीप्रमाणे ऐकीव माहितीवर केलेला दिसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 11:54 नवीन
ओ महाराज, चित्रफित पकडल्याचे दाखवते. घोषना चित्रफितित ऐकु आली पाहिजेच ह्या तुमच्या हट्टाचे काय करावे बरे? त्या घोळक्यात हजर असलेल्यांनी त्याला घोषणा देतांना पकडले. तो पकडला गेला हे दाखवण्यासाठी चित्रफित आहे. त्याने काय घोषणा दिल्यात ह्या ऐकवण्यासाठी नाही. बाकी त्याला का पकडला आणि तो तिथे काय करत होता ह्याबद्दल तुम्ही सांगा. पकडणारा आणी पकडला गेलेला दोघांचेही नाव दिले आहे. तुम्ही खात्री करुन घ्या. अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/03/2016 - 12:06 नवीन
कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का?
अगदी महत्त्वाचा नसलेला मुद्दा कुठुनतरी काढायचा आणी मग विजयाचे ढोल पिटायचे. तुमच्या ढोलाच्या आवाजात सत्य दबत नाही.
मी विजयाचे ढोल पिटत नाही. मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो. १५ लाख परत न आणल्यास मला फासावर चढवा असे मोदी म्हणाले, हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला, शिवसेनेच्या भगवान गोयलने हुसेनचे हात कापण्याची धमकी दिली होती या तुमच्याच पूर्वी केलेल्या आरोपांचा असत्यपणा मी सप्रमाण सिद्ध केलेला आहे व सिद्ध केल्यानंतर कोठेही ढोल पिटलेले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 12:13 नवीन
कोणी पकडला? पोलिसांनी? मग पुढे काय झाले? नक्की कोणत्या घोषणा दिल्या? कोणत्या घोषणांमुळे पकडले? नक्की कोणत्या कारणासाठी पकडले? इ.इ. गोष्टींची माहिती आहे का? >> तुम्हाला आहे काय? . मी जिथे जिथे ऐकीव माहितीवर खोटे आरोप केले जातात, तिथे जाऊन सत्य समोर आणून त्या आरोपांचा खोटेपणा उघडकीला आणतो. >> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/03/2016 - 12:17 नवीन
>> तुम्हाला आहे काय?
तुम्हीच लिहिलंय ना देशद्रोही घोषणा देताना अभाविपचा कार्यकर्ता पकडला गेला म्हणे आणि पुरावा म्हणून एक चित्रफितही टाकलीत. आणि आता मलाच पुरावे मागताय? तुम्ही जे आरोप करताय त्याचे पुरावे मी द्यायचे का तुम्ही द्यायचे?
>> हा हा. तुम्ही राहु द्याहो. तुम्हीच वकील आणि तुम्हीच जज, तुमच्या न्यायालयात तुम्ही म्हणाल ते विश्वासार्ह आणि तुम्हाला नाय रुचलं ते खोटं असतं.
मी वकीलही नाही आणि जजही नाही. न्यायालय देखील माझे नाही. तुम्ही केलेले आरोप खोटे आहेत हे सिद्ध करणारे अनेक संदर्भ मी दिले आहेत. ते संदर्भ वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांचे आहेत. ते संदर्भ मी तयार केलेले नाहीत. आपले आरोप सिद्ध करणारा एकही संदर्भ तुम्हाला देता आलेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 12:26 नवीन
मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना? बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 12:37 नवीन
माफ करा मध्येच बोलतोय
अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे
अशी अजूनतरी खात्रीलायक बातमी नाहीये.असेल तर ती स्वीकारली जाईल. मात्र तुम्ही हा विडियो पाहिला आणि घाईने शाहनिशा न करता इथे डकवून मोकळे झालात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 13:09 नवीन
https://www.facebook.com/sujat.ambedkar?fref=ts ह्या टाइमलाईनवर आपल्याला ह्या प्रकरनाचे अधिक डिटेल्स मिळतील. तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही. तरीही बरीच काथ्याकूटं झालीच चिंधीभर माहिती आणि टोपलंभर अंदाजांवरुन. इथे भाजपविरोधी लोकांनी खुट्ट जरी केलं तरी साद्यंत मेगाबायटी टाकणारे बघितले मग ह्याच प्रकरनाला का झाकून ठेवायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 13:55 नवीन
तुम्हाला तिथे हे मिळाले नाही काय? अभाविपच्या राम सातपुतेने सुजात आंबेडकरांना लिहलेली कमेंट सुजात नमस्कार, आताच तुझी फेसबुक वरची चन्नवीर बंकुर या आमच्या कार्यक्रत्याबद्दलचि पोस्ट वाचली मला एक समजत तू आणि तुझ्यासोबत च्या डाव्या लोकांनी त्याला आक्षेपार्ह आणि देशद्रोही ठरवायचा जो केविलवाना प्रयत्न चालवला आहे यावरून तुमची मानसिकता लक्षात येते .मुळात तो आमचा कार्यकर्ता आहे तो भारत माता की जय ,जय भीम आशा घोषणा देत होता त्या कुठल्याही प्रकारे आक्षेपार्ह नाहीत .त्याला एवढ घाबरन्यासारख काय आहे ? एकाबाजूला तुम्ही मान्य करत आहात की तेथे देशद्रोही घोषणा दिल्या नाहीत अस म्हणता आणि दुसऱया बाजूला त्या कार्यकर्त्याला Socail media च्या माध्यमातून बदनाम करण्याचा केविलवाना प्रकार का करत आहात ? पराभूत मानसिकतेच तर हे लक्षण नाही ना ? त्यावर सुजातची कमेंट पहा:- Priya Ramji, Jai Bheem! Ek manus aplya gatala sodun dusrya gatat jato ani tyanchat ghoshna baji karto, tyachya manasikte var tumhala prashna kase padat nahi ho? Mi tumchya bajula basun, he manya kele ki amhi kinvha ABVP ni kontya hi Deshdrohi ghoshna dilya nahit. Pan, tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay देशविरोधी घोषणा दिल्या नाहीत असे सुजात आंबेडकरच सांगत आहेत. मग तुम्ही इतकी घाई का केलीत?
तसे म्हटले तर जे एन यु प्रकरनाचे सत्यही अजुन पुर्ण बाहेर आले नाही.
भारतातच राहता ना? झापड ओढली असेल तर काढून टाका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 14:01 नवीन
tyala jar pakadle naste tar ani tyane tasech continue kela asta tar pudhe kay हे टाळले काय? अभाविप किंवा सुजातच्या गृपनी घोषणा दिल्या नाहीत असे म्हटले आहे. त्या मुलाने दिल्या का कसे ह्याबद्दल नाही ते. असो. हे प्रकरण अजून संपलेले नाही. सुजात आंबेडकरला मेल धाडला आहे खुलाशाबद्दल. आला की टाकेन इथे. जे ही उत्तर येईल ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 14:10 नवीन
जर आणि तर मध्ये काथ्याकूट होत नसतो. त्याला जर पकडले नसते आणि त्याने तसेच कंटीन्यु केले असते तर? म्हणजे तो त्या गृपमध्ये जाऊन जय भीम,भारत माता कि जय,या घोषणा देत होतो,पण त्याने जर आमच्या गृपमध्ये राहून देशविरोधी घोषणा दिल्या तर? असे आहे ते साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 14:26 नवीन
तो त्यांच्या गृपमधे कशाला गेला होता हे तर गुलदस्त्यातच आहे ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 14:51 नवीन
1)जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे. 2)तो त्यांच्या गृपमधे कशाला गेला होता हे तर गुलदस्त्यातच आहे ना? वरील दोन प्रतिसांदांमध्ये बराच फरक आहे,त्याबद्दल आभारी आहे. मुद्दा इतकाच आहे कि तुम्ही पूर्ण माहिती नसताना तो विडीयो इथे डकवला होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Sun, 04/03/2016 - 15:12 नवीन
पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब? साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे, म्हणुनच म्हणे हा शब्द वापरला आहे. म्हणे म्हणजे ज्यांनी विडियो बनवला युटुब वर टाकला त्यांचे. माझा मुद्दा आहे तो त्या गृपमधे जाऊन काही घाणेरडे प्रकार करण्याच्या प्रयत्नात होता का किंवा केले का? अभाविप आणि विडियोतले लोक ह्यांचे विळ्याभोपळ्याचे सख्य आहे हे फर्गुसनमधे सर्वांना माहिती आहे. त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
द
दिग्विजय भोसले Sun, 04/03/2016 - 16:03 नवीन
'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. आणि 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार सोडून तुम्ही बाकिचं सगळं बोलत आहात.कारण बाकि सगळं तुमच्या सोयीचं आहे. 'भारत विरोधी घोषणा' हा तुमच्यासाठी अडचणीचा विषय आहे,हा एक असा विषय आहे कि ज्यामध्ये प्रतिवाद करायला फारसं काही शिल्लक राहत नाही.
पूर्ण माहिती नसतांना जे एन युत डॉक्टर्ड विडियो वर घमासान सुरु होते तेव्हा कुठे होतात साहेब?
म्हणजे त्यांनी केलं म्हणून यांनीही करावं,असा तुमचा आशय आहे का? डाॅक्टर्ड विडियो अभाविपने केले होते का? ढीगभर विडियोमधले दोन विडियो डाॅक्टर्ड आढळले आहेत.बाकि तुम्ही कन्हैय्याची कितीही बाजू मांडली तरी सत्य आज उघड आहे. डाॅक्टर्ड विडियोचे मी समर्थन करीत नाही.बाकि घमासान सुरू होते तेव्हा मी मिपावर नव्हतो.
साहेब, तो त्या गृपमधे जाण्याचे आणि पकडले जाण्याचे तर सत्य आहे ना? त्याने घोषणा दिल्या किंवा नाही हा माझा मुद्दा नाहीच, ते तर विडियो तल्या लोकांचे म्हणणे आहे,
बापरे!खरचं कि काय? मग हा प्रतिसाद काय म्हणतोय? "जे एन यु व कन्हय्यावर भडकलेल्यांनी अभाविपच्या ह्या घाणेरड्या प्रकाराकडे सोयिस्कर दुर्लक्ष केलेले दिसतंय. अभाविपचा कार्यकर्ता भारतविरोधी घोषणा देतांना पकडला गेला म्हणे." "म्हणे" हा शब्द वापरला म्हणून तुम्ही निसटू शकत नाही.ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखा प्रकार झाला हा.तुम्हाला जे हायलाईट करायचं होतं तेच तुम्ही केलं आहे.
त्यांच्यात हा ऑडमॅन आउट काय करत होता हा प्रकार दुर्लक्षिला काय हे विचारणे होते. आता तुम्ही मूळ कारनामा बाजूला ढकलून 'भारतविरोधी घोषणा' हा संदिग्ध प्रकार तुमच्या सोयीचा वाटतोय तेवढ्यावरच बोलत आहात. बाकी ह्या प्रकरणाचे पूर्ण सत्य दहा वर्षांनी बाहेर येईल तोपर्यंत थांबावे काय?
मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब. तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही? मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
श
श्रीगुरुजी Mon, 04/04/2016 - 11:16 नवीन
मुळ कारनामा देशविरोधी घोषणाबाजी हा आहे साहेब. तो तिथे काय करत होता?हा दुय्यम कारनामा आहे.जरी त्याच्या मनात काही खोडसाळपणा असला तरी पुढे त्याला पकडल्यावर स्वतःच्या आणि संघटनेच्या बदनामीची काळजी त्याला असेल कि नाही? मुळ कारनाम्यातला मुळ मुद्दा हा आहे कि त्याने देशविरोधी घोषणाबाजी केली नाही,आणि हे सजेत आंबेडकरच सांगतोय.बाकि त्याला तुम्ही मेल केला आहेच तर त्याचं काय म्हणणं आहे तेही सांगा.
विद्यापीठात भर रस्त्यात चारचौघांसमोर लघवी करताना कन्हैय्या पकडला गेला. ते करताना एका मुलीने हटकल्यावर त्याने त्या मुलीशी गैरवर्तन केले. हे आक्षेपार्ह वर्तन त्याने केल्याचे सिद्ध होऊन त्याला तीन हजार रूपये दंड झाला. तरी यांना वाटते की ते कन्हैय्याचे ते वर्तन "कथित" आक्षेपार्ह वर्तन होते. आणि "मी १५ लाख रूपये प्रत्येकाला न दिल्यास मला फाशी द्या, असे मोदी म्हणाले", "हुसेनने जीवाच्या भीतिने देश सोडला", "शिवसेनेच्या गोयलने हुसेनचे हात तोडल्यास ५० लाखाचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते" इ. खोडसाळ अफवा १०० टक्के खर्‍या आहेत यावर मात्र यांचा ठाम विश्वास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिग्विजय भोसले
श
श्रीगुरुजी Mon, 04/04/2016 - 11:05 नवीन
मी कुठे आरोप करतोय की त्याने घोषणा दिल्यात. 'त्याने घोषणा दिल्या म्हणून त्याला पकडले' असा हा विडियो सांगतोय. तेवढं इथं टाकलंय. आता खरं मानायचंच नसेल तर त्याला कोण काय करणार? त्याला घोषणा देण्यासाठी पकडले नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तुम्हाला पुरावे द्यावे लागतील ना?
त्याला पकडलं म्हणजे नक्की कोणी पकडलं? पोलिसांनी? सीबीआयने? सीआयडीने? एफबीआयने? सीआयएने? रॉने? केजीबीने? मोसादने? .... आणि पकडलं म्हणजे नक्की काय केलं? नक्की कोणत्या कारणासाठी पकडलं? या सर्व गोष्टी अजिबात माहिती नसतील तर "अभाविपचा एक कार्यकर्ता पकडला गेला. त्याने देशद्रोही घोषणा दिल्या म्हणे." असली दिशाभूल करणारी वाक्ये टाकून ज्यात एकही घोषणा ऐकू येत नाही अशी चित्रफीत इथे टाकण्याचे कारणच काय?
बाकी, मी दिलेले संदर्भ अमुकतमुकचा आहे म्हणुन तुम्ही शिक्के मारत नाकारले. ह्यात मी काय करु शकत नाही.
तुमचा एक संदर्भ म्हणजे समाजवाद्यांच्या एका संकेतस्थळावर केला गेलेला एक निराधार दावा आणि दुसरा संदर्भ म्हणजे एका ट्रॅव्हल कंपनीचे संकेतस्थळ जिथे त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे की "इथे प्रसिद्ध झालेल्या राजकीय मजकूराच्या अचूकतेची खात्री नाही व त्याची सत्यासत्यता आम्ही पडताळून पाहिलेली नाही.". मुळात ट्रॅव्हल कंपनीला आपल्या संकेतस्थळावर कोणत्याही तर्‍हेने व्हेरिफाय न केलेला सिलेक्टिव्ह राजकीय मजकूर टाकण्याचे कारणच काय? असले दोन हास्यास्पद संदर्भ हा तुम्हाला आपण केलेल्या असत्य आरोपांचा पुरावा वाटतो! गंमत म्हणजे टाइम्स ऑफ ईंडिया, इंडियन एक्स्प्रेस, द हिंदू, हिंदुस्तान टाईम्स, डीएनए अशांसारख्या कोणत्याही वृत्तपत्रात हा उल्लेख नाही. एनडीटीव्ही, एबीपी न्यूज, आजतक, झी न्यूज, आयबीएन, टाईम्स नाऊ, इंडिया टीव्ही अशांसारख्या कोणत्याही वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर याचा उल्लेख नाही. वरील दोन हास्यास्पद संकेतस्थळे वगळता भारतातील कोणत्याही वृत्तसंस्थेकडे हे वृत्त नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
आ
आरोह Sat, 04/02/2016 - 18:50 नवीन
जोकर भाऊ, तुम्ही नक्की काय करता,म्हणजे मला अस विचारायचे आहे तुम्ही पोटापाण्यासाठी काय करता? सरकारी नोकरीत आहात काय कि व्यवसाय आहे तुमचा? कुतुहल हो दुसरं काही नाही म्हणजे अस बघा, तुमचा संचार सर्व धाग्यांवर....बरे प्रतिसाद पण लांबलचक....आपले मत पटवण्यासाठी दिलेले लिंक्स....म्हणजे कायम इंटरनेट च्या समोर.... तुमचे एका दिवसात जेव्हढे टंकटाय ते पाहून कोणीही अवाक होईल .. जर नोकरीत असाल तर कुठल्या नोकरीत? जिथे नेट आणि वेळ भरपूर आहे कि कुठल्या पक्षासाठी मार्केटिंग चे काम घेतलाय?
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Sat, 04/02/2016 - 19:16 नवीन
जोकरसाहेब एकतर आयटीवाले नोकरदार असावेत, कारण आयटीवालेच हाफीसातलं फुक्कटचं नेट वापरून मिपावर पडीक असतात:'(::-( किंवा स्वतःचा बिझनेस असावा,इतरांना कामाला लावून मिपावर वावरायला नामानिराळे.(ह.घ्या)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
त
तर्राट जोकर Sat, 04/02/2016 - 19:41 नवीन
चांगले प्रश्न. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
आ
आरोह Sun, 04/03/2016 - 12:23 नवीन
प्रश्न चांगले आहेत हो...पण तुम्हाला अडचणीचे आहेत असे दिसते तुम्हाला नेट adiction झालेय का? काही काही धाग्यांवर तर तुमचे प्रतिसाद तर दिवसभर सुरु...जसे ऑनलाइन chatting... असो...
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 04/04/2016 - 12:23 नवीन
तुम्हाला खुपतंय ते कळतंय हो, पण काय करणार सौदीचा पैसा आहे, इसिसची नोकरी, डोक्यावर गन लावून लिहायला बसवतात दिवस दिवस. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आरोह
E
Ea imputo praemitto Mon, 04/04/2016 - 12:18 नवीन
काहीही हं!
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा