"मान झुकव, परम ईश्वर आहे मी.."
एक दिवस, फक्त एकच दिवस, सगळ्या तुझ्या जखमांचा हिशेब कर
एक रात्र, फक्त एकच रात्र, कर विचार जरा, तुझ्यासोबत झाले काय
स्वत:पासून लांब कुठवर धावशील, ती पहाटही आता निसटून चालली, कधी उठशील
दुनियेने तुकडे केले तुझे, तुटत गेलास, स्वत:ला कुठवर तोडत राहशील..
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
प्रत्येक स्पर्शामागे एक ओढ आहे, मैत्रीतही का तणाव आहे
दुवा ही मीच, शाप मी, माझ्या जखमांत मला आराम आहे
अर्धा उजेड, अर्धा अंधार, अर्धा जन्म नको असा राख करूस
तू जे समजतोस तेच तू आहेस
कर विचार जरा, हो जागा, सगळ्यांना जागे कर
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
हे चूक, ते बरोबर, ऐक माझे, नको विचार करूस
हे नको घालू, ते नको बोलू, शक्य असेल तर तोंडच नको ना उघडू
हे वाचू नको, ते ऐकू नको, मीच निवडेन, तुला तो हक्कच नको
तुटत रहा, मिटत रहा, झुकायला शीक, झुकत रहा
बास आता अजून नाही, आता अजून नाही, अजून नाही, आता अजून नाही
बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
**
https://youtu.be/V-GWLZOVGvU
बर्याच दिवसांनंतर हे गाणे पुन्हा बघण्यात आले.. पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचा तोच इम्पॅक्ट पुन्हा एकदा अनुभवला.. अंगावर सरसरून काटा आला.. जबर तुफानी !!
'पाँच' या १९९९ साली तयार झालेल्या परंतु अद्यापी प्रदर्शित होण्याचे भाग्य न लाभलेल्या बॅन केलेल्या चित्रपटातील
'मैं खुदा' हे अफाट गाणे. अब्बास टायरवालाचे प्रभावी शब्द, विशाल भारद्वाजचे अविश्वसनीय संगीत, अनुराग कश्यपचे दिग्दर्शन, सगळा दारूगोळा खच्चून भरलेला, विस्फोट ठरलेलाच.
हल्ली असहिष्णूतेच्या नावाने फार ओरड होत असते, आवाज उठत असतात,पण अनुराग कश्यपने सिस्टीम विरोधात लढण्याचं काम खूप आधीपासून सुरू केलंय, हे गाणंही त्याचाच एक भाग, अगदी आपल्या मनातलेच वाटावेत असे ते गाण्यातील विचार, काळाच्या कितीतरी पुढे असणारा हा एक माणूस आणि तसंच त्याचं कामही. अफलातून !
हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची खूप इच्छा होती परंतु ती शक्यता लांबपर्यंत दिसून येत नाही.
सेन्सॉर बोर्डाने अतीव हिंसाचार, गुन्हेगारीचे समर्थन, अंमली पदार्थांचा वापर, द्वयर्थी संवाद, एकही सकारात्मक पात्र
नसणे, कोणताही सामाजिक संदेश नसणे, या सर्व कारणांमुळे या चित्रपटावर बंदी घातली होती जी अजूनही उठलेली नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या स्पून फीडींग विरूध्द कायमच बोलले जाते आणि हे बोलणे अर्थातच वाया जाते, तो सारा मनमानी
कारभार आहे. १८ वर्षांवरील सज्ञान व्यक्तिने काय पहावे, काय नाही, ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी एक समिती असणे आणि या समितीने एका पूर्ण समाजाने काय पहावे काय नाही हे ठरवणे म्हणजे
... पणाचा कळस आहे. चित्रपट वाईटच असेल पण लोकांना ते बघू द्या, त्यांचे मत बनवू द्या, नाही पटला
तर तेच बहिष्कार घालतील, चित्रपट थेटरात आठवडाही नाही काढणार, किंवा मग तुफान चालेल, कुणी सांगावे.
असो. यावर कितीही रिकामा त्रागा करून काही उपयोग नाही.
अर्थात चित्रपटातील काही सीन्स मी पाहिलेत त्यामध्ये प्रमाणाबाहेर हिंसाचार आहे, ड्र्ग्जचा अती वापर दाखवलाय, नैतिकता, नीतीमत्ता, माणूसकी या गोष्टींचा बेधडक चुराडा केलेला दाखवलेला आहे. ते ५-१० मिनिटांचे सीन्स
पाहिल्यानंतर मला मळमळल्यासारखे होऊ लागले होते, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की कसे वाटेल सांगणे कठीण.
असे प्रकार लोकांना कितपत झेपतील हाही प्रश्न आहेच, तरी हॉलिवूडमुळे आपले प्रेक्षक बर्यापैकी निर्ढावलेत म्हणून
बरं.शेवटी ज्याला झेपतं त्याने पहावे इतरांनी लांब रहावे.
हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या
पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो.
या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर !
'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !!
तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला.
एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट.
गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे..
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची,
सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो..
हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश.
असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट.
चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो,
अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग.
** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."
हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या
पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो.
या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर !
'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !!
तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला.
एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट.
गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे..
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची,
सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो..
हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश.
असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट.
चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो,
अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग.
** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."
💬 प्रतिसाद
(67)
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 12:58
नवीन
कथानक बरेच अंशि तसेच आहे.
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
Wed, 03/02/2016 - 13:42
नवीन
.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/02/2016 - 13:03
नवीन
स्वगत : हिंदी सिनेमांत चालणा-या अर्थकारणाबाबत काही तर्क असल्याने....हिंदी सिनेमे बघणे आणि त्यावर चर्चा करणे कधीच सोडून दिलेले आहे.
जितेंद्रच्या कवायती आणि साड्यांची, भांड्यांची, मडकेवाल्यांची दुकाने सुरु झाली आणि हिंदी सिनेमे बघायची हिंमत पण सोडली.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 13:05
नवीन
तोहफा तोहफा लाया लाया .... हे गाण चित्रहार मध्ये यायचे.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 03/02/2016 - 13:14
नवीन
मी चित्रहारपुरतेच जितेंद्रला सहन करायचो.
सिनेमे बघायची हिंमत काही झाली नाही.
जावूदे,
धाग्याचे काश्मीर करायला आम्ही घाबरत नाही, पण ह्या धाग्याच्या बाबतीत, हे पातक नको.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 03/02/2016 - 13:36
नवीन
केके, मनोज वाजपेयी,पियुष मिश्रा इत्यादी* "ॲक्टर" आहेत. बाकी तर केवळ "स्टार" आहेत.
.
.
(*लिस्टमधे अजून बरीच नावं जोडता येतील.)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 15:23
नवीन
सगळ्यात मुख्य या गीताच्या गायकाबद्दल लिहायचेच राहिले.
हा भन्नाट गायक म्हणजे परत केके अर्थात कृष्णकुमार.
हा एक माणूस त्याला मिळेल त्या गाण्याचे सोने करतो, आणि अशा रॉक गाण्यांत तर त्याचा हातखंडा आहे.
हे गाणे, लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा,इ.अनेक गाण्यांत त्याने जे वरचे स्वर लावलेत _/\_
हे तोच करू जाणे.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 15:27
नवीन
म्हणजे तोच ना
जिस्म मुझे देके मिट्टि का शिशे सा दिल क्यो बनाया
और उस पे फितरत कि वो करता है मोहोब्बत वाह रे वाह तीरि कुदरत.
नाय वळखल ना गान ? अवो ह्म दिल दे चुके सनम
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 15:37
नवीन
तडप तडप के माहीत नाही असं कसं होईल, केके ची जवळपास सगळी गाणी माहीत आहेत आणि फेव्हरेट आहेत.
तुम्ही पाँच पाहिलाय असं वाटतं, त्याबद्दल सांगा.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 15:46
नवीन
मला एक सांगा आज पर्यंत तुम्हि सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि कुठला बघितला आहे.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 15:57
नवीन
हिंदीत लेटेस्ट nh१० पाहिला अर्थात तो फार व्हायोलेन्ट नव्हता, त्या आधीचे आठवावे लागतील.
हॉलिवूडचे खंडीभर आहेत. तरी आठवून सांगते.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 03/02/2016 - 18:38
नवीन
१)शुटआऊट ॲट लोखंडवाला.
२)फोर्स
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 03/02/2016 - 18:52
नवीन
शाहरुख- माधुरीचा. त्यात mindless violence होता. मळमळलेलं तो बघून. रच्याकने violence साठी कुणी कुणावर हात उचलायलाच पाहिजे असं काही नाही. सारांश मध्ये एका फूटपाथवर अनुपम खेर, रोहिणी हट्टंगडी आणि सोनी राझदान आणि दुस-या फूटपाथवर उभे असलेले निळू फुलेंचे गुंड. त्यातला एक गुंड लाथेने एक पत्र्याचा डबा या तिघांकडे ढकलतो. रात्रीच्या शांततेत त्या डब्याचा आवाज सगळीकडे घुमतो. यातून जो violence व्यक्त होतो तो पाच लीटर रक्त वाहवूनही होणार नाही.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 03/03/2016 - 09:43
नवीन
अंजाम मि अर्धवट सोडुन आलेल्या सिनेमांपैकी एक.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Wed, 03/02/2016 - 19:16
नवीन
हे फक्त बॉलीवुडच्या काही चित्रपटांपैकी बरं ! हॉलीवुडच्या काही चित्रपटांमधे तर फक्त हिंसाच असते. जसेकी रॉंग टर्न, वी आर लिगॉन, इत्यादी इत्यादी .
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/03/2016 - 05:58
नवीन
३०० च्या सेकंड पार्टात जेवढे रक्त दाखवलेय तेवढ्या रक्तात आपल्या ५० ब्लड बँका वर्शभर चालल्या असत्या. ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/03/2016 - 05:59
नवीन
इव्हा ग्रीन रॉक्स :)
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 03/03/2016 - 06:11
नवीन
स्मायली चुकीची पडली काय रे? ;)
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/03/2016 - 06:15
नवीन
नै रे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 06:17
नवीन
चक्क गणामास्तर हजर वर्गावर. कसं काय?
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
गुरुवार, 03/03/2016 - 06:18
नवीन
ते व्यंकूची शिकवणी घ्यायला आले असावेत.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 06:07
नवीन
तुम्ही कौतुक केलेला तेलुगू यवुडू पहिल्या पाच मिनिटातील थरकाप उडवणारी हिंसा न पाहवल्याने बंद केला.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 03/03/2016 - 13:36
नवीन
मी आतापर्यंत अनेक हॉरर, हिंसक चित्रपट पाहिले. सॉ, फायनल डेस्तीनेशन , हिल्स हॅव आईज पण
पॅथोलॉजी आणी कॅनिबल होलोकॉस्ट इतके भयाण , किळसवाणे चित्रपट दुसरे नाहीत.
एक पॉश लॅबमधला तर दुसरा जंगलामधला पण क्रूरता दोन्हीकडे सारखीच !
हे दोन चित्रपट कोणी पूर्ण पाहिले आहेत का ?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 03/03/2016 - 06:23
नवीन
रिझर्व्ह बँक आहे भौ! व्हाॅल्यूम १ मध्ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत फक्त रक्तपात आहे.
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
गुरुवार, 03/03/2016 - 05:50
नवीन
मी पाहिलेला सर्वात हिंसक चित्रपट 'रक्तचरित्र'.
बाकी,आठवेल तशी भर घालतो.
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
गुरुवार, 03/03/2016 - 11:09
नवीन
होस्टेल, द डेव्हिल्स रिजेक्ट्स, द हिल्स हॅव आईज..
अजुन बरेच आहेत.
- Log in or register to post comments
ह
होबासराव
Wed, 03/02/2016 - 16:00
नवीन
मग तुम्हि पांच बघु शकता... ओरिजिनल लिक झालेलि कॉपि असेल तर जपुन कारण चित्रपटात पुष्कळ जागि संवाद सुद्धा ज्याला अश्लिल अश्लिल म्हणतात त्या भाषेत आहेत.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Wed, 03/02/2016 - 16:01
नवीन
अर्थात , ज्याची त्याची आवड .
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 18:08
नवीन
ते गाणं बरंच लाऊड आहे अगदी मान्य, कारण ते रॉक प्रकारातील आहे आणि या जॉनर मधील गाणी बऱ्यापैकी अशीच असतात. ते सर्वांना आवडेलच असं नाही, तसा डिस्क्लेमर टाकता टाकता राहिला.
बाकी काव्य कोणते म्हणताय, वर गीताचा अनुवाद आहे तो का, तो एवढा जमलेला नाहीये,
आणि गुंता होणे, डोक्यात केसांचा आणि विचारांचाही, नवीन नाही :)
'साँस लो दम भरो चिल्ला चिल्ला के सबसे कहो,
सर झुका खुदा हूँ मैं
आसमानों पे खडा हूँ मैं
मैं खुदा हूँ खुदा'
याचे छान मराठी रूपांतर वाचायला आवडेल.
कर्कश्य गाणी ऐकण्यामागील माझे लॉजिक:
1. हापिसात बॉसचे, इतरत्र सर्वज्ञानी लोकांचे ज्ञान पाजळणे ऐकावे लागू नये म्हणून
2. आजूबाजूच्या लोकांच्या निरर्थक बडबडीतून सुटका म्हणून
3. आपल्या डोक्यातील विचारांचा गोंगाट अशा संगीतामुळे दबले जाऊन माईंड क्लिअर होते
4. ढीगभर कामे आणि अशक्य डेडलाइन्स पार पाडण्यासाठी असे संगीत डोक्याला चालना देते
5. डोक्यातील ताणतणाव, राग, वैताग, फ्रस्टेशन बाहेर काढण्याचा उत्तम मार्ग
अजूनही बरेच आहेत. वरील सर्व प्रश्नांवर शांत गाणी ऐकणे हा सुद्धा उपाय आहेच, आणि त्या त्या वेळच्या मुडप्रमाणे आपण संगीत ऐकतो त्यातीलच हा प्रकार.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Wed, 03/02/2016 - 20:15
नवीन
मूळात ताण मनातल्या गोंगाटामुळे येतो आणि तो घालवण्याचा साधा उपाय म्हणजे शांत बसून , तो गोंगाट ऐकणं आहे . मनाला अवधानाचं इंधन न मिळाल्यानं तो काही वेळात थांबतो . पण तुमच्या प्रतिसादामुळे हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/03/2016 - 04:22
नवीन
असे नाही आहे हो!!!!
आमचे आजोबा ओ.पी.नैयरचे "सर पे टोपी" ऐकायचे...ते आमच्या वडीलांना "अय्यय्या सुकु सुकू" बद्दल शिव्या द्यायचे.
आम्ही "दम मारो दम" किंवा "आप जैसा कोई" लावले की आमचे वडील बोंबा मारायचे.
मुले जे काही ऐकतात ते समजत नाही...मुले हुषार आहेत, ती कानाला हेडफोन लावून ऐकतात.
थोडक्यात काय? तर नविन संगीत आपल्याला आवडत नाहीसे झाले की, वय झाले असे मी ओळखतो आणि बाजूला होतो.
लॅपटोपच्या जमान्यात, मण्यांची पाटी घेवून बसू नये.
आपण आपली मण्यांची पाटी घ्यावी आणि एकांतात, "हरी ओम हरी,,," ऐकत बसावे.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 04:48
नवीन
ते गाण्यांबद्दल म्हणत नसून त्यांनी "मनातला गोंगाट" आणि "मनाला (लागणारे) अवधानाचं इंधन" यावर भाष्य केले आहे.
तुमचा आणि त्यांचा प्रतिसाद हे दोन वेगवेगळ्या पातळींवरचे प्रतिसाद आहेत.
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
गुरुवार, 03/03/2016 - 09:17
नवीन
धन्यवाद!
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 10:40
नवीन
'ताण मनातल्या गोंगाटामुळे येतो आणि तो घालवण्याचा साधा उपाय म्हणजे शांत बसून , तो गोंगाट ऐकणं आहे . मनाला अवधानाचं इंधन न मिळाल्यानं तो काही वेळात थांबतो.'
- तुम्ही सांगताय ते मेडिटेशन, मनन चिंंतन या प्रकारांत मोडेल. मी सांगत आहे ते मनाला स्टिम्युलेट करण्या संबंधी आहे. मनाला पॅसिव्ह मोडमधून अॅक्टिव्ह मोड मध्ये आणायला स्टिम्युलेशन्ची गरज पडते, आणि ते जास्त अॅक्टिव्ह झाले तर त्याला शांत करण्यासाठी, पॅसिव्ह मोड मध्ये नेण्यासाठी मेडिटेशनची गरज पडते.
तर जेव्हा अशा माईन्ड स्टिम्युलेशनची गरज असते तेव्हा मी (तुम्ही म्हणता तशी) कर्कश गाणी ऐकते आणि रात्रीच्या शांततेत, जुस्तजु जिसकी थी, रात हमारी तो चाँद की सहेली है, क्षितीजाच्या पार वेड्या संध्येचे घरटे, सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या, इ.ऐकते.
'तुमच्या प्रतिसादामुळे हल्ली कर्कश्य संगीताच्या लोकप्रियते मागचं कारण कळलं !'
- मला 'हल्ली'च्या पिढीत ढकलल्याबद्दल धन्यवाद :)
'आवाज वाढव' चा श्रोतावर्ग वेगळा, 'मैं खुदा'चा वेगळा, ही दोन टोकाची दोन गाणी आहेत, कोणाला हे आवडेल कोणाला ते तर कोणाला दोन्ही. पण या दोन गाण्यांची तुलना होत नाही, हे म्हणजे हनी सिंगची तुलना केके शी केल्यासारखे होईल. it is like comparing oranges with apples :)
वरील गाणं मला आवडतं, पण म्हणून ते सर्वांना आवडावं आणि सगळ्यांनी त्याला चान चान म्हणावं अशी अपेक्षा मुळीही नाही.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 10:55
नवीन
हे भारीवाले इयरफोन्स घालून फुल्ल व्हॉल्युम वर ऐका आणि कसं वाटलं ते नक्की सांगा :)
युट्यूबवर पूर्ण गाणे नाहीये, ते इथे ऐकायला मिळेल: http://gaana.com/song/bach-ke-bakshy
- Log in or register to post comments
च
चिगो
गुरुवार, 03/03/2016 - 07:50
नवीन
रच्याकने - 'आवाज वाढव डिजे तुला' गाणं मला मस्त वाटतं.. एकदम ढिन्चॅक..
अवांतर : 'पोष्टर गर्ल' हा चित्रपट आला का? 'पोष्टर बॉईज' धमाल होता..
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 09:34
नवीन
"डीजेवाला बाबू मेरा गाना बजादो" असंही एक गाणं कुठल्याशा चित्रपटात आहे.
पोष्टर गर्ल येऊन गेलाही असावा. 'पोष्टर बॉईज' धमाल होता याच्याशी लाख वेळा सहमत.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Wed, 03/02/2016 - 18:29
नवीन
के के मेननसारख्या एका ताकदीच्या अभिनेत्याला असल्या "हिरो"च्या भुमिकेत पाहण्याची सवय नाही. :)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 19:06
नवीन
मग तुम्ही यूट्यूब वर केकेचा या सिनेमातील एन्ट्रीचा सीन अवश्य पहा, पूर्ण सिनेमाच जमल्यास पहा.
तो हिरो ही आहे, अँटी हिरो ही आहे यात.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 03/02/2016 - 18:47
नवीन
जरी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला नसला तरी इंटरनेटवरच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक असायला हरकत नाही. जोशी अभ्यंकर हत्याकांडासारखा विषय आहे. पण हिंदीतल्या सर्वात हिंसक चित्रपटांपैकी वगैरे मी म्हणणार नाही कारण यातली हिंसा कथेच्या ओघात येते आणि त्यामुळे प्रेक्षक गुंतून जातो. अनुराग कश्यप चांगला दिग्दर्शक आहेच, पण त्याहीपेक्षा चांगला लेखक आहे हे या चित्रपटातून समजतं. आपल्या प्रेक्षकांना त्यावेळी असे noir चित्रपट मानवले नसते. पण आता अशा चित्रपटांबद्दल दृष्टिकोन बदललेला आहे. त्यामुळे पांच आज आला तर चालेल असं वाटतं. रच्याकने अनुरागची निर्मिती असलेला बिजाॅय नंबियार दिग्दर्शित शैतान ब-यापैकी पांच च्या जवळ होता.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 03/02/2016 - 18:53
नवीन
शैतानमधले खोया खोया चांद्चे बीटस मला आवडले होते.
ह्या गाण्याला कुणी जुन्या खोया खोयाची सांगितिक हिंसा म्हणले तर म्हणू दे ब्वा. ;)
- Log in or register to post comments
स
सुमीत भातखंडे
गुरुवार, 03/03/2016 - 14:57
नवीन
हे रीमिक्स तर भारीच होतं पण त्याचबरोबर त्याचं चित्रीकरण सुद्धा ग्रेट आहे.
शुटआऊट चा सीन आणि पार्श्वभूमीवर हे गाणं :)
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 03/02/2016 - 19:13
नवीन
शैतान बराचसा psychlogical thriller आहे आणि तेवढा व्हायोलेन्ट ही नाही,पण मस्त वेगळाच सिनेमा आहे
खोया खोया चांदचे स्लो मो चित्रीकरण अफलातून आहे, ती रिंगटोन असते अधून मधून माझी.
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/03/2016 - 09:29
नवीन
पांच पैकी एकहि करैक्टर पॉजिटिव नाही या निकशावर अत्यंत नकारात्मक चित्रपट म्हणून सेंसरबोर्डाने परवानगी नाकारालेला काहीसा रोचक व थोडासा रटाळ चित्रपट. बोर्डाच्या या कृतीने कश्यप फार दुखावला गेला होता व नशेच्या आहारी गेल्याची वदंता आहे. असो दुखावले जाणे त्याचा स्वभाव असावा बॉम्बे वेलवेट नंतर तर तो फ्रान्न्सला निघून गेला म्हणे जिथे व्यक्ती स्वातंत्र्यावर कोणी घाला घालू शकत नाही....
असो चित्रपट संथ, वरील गाणे मस्त, अन शैतान पांचचा रीमेक आहे
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 09:33
नवीन
'आज पर्यंत तुम्ही सगळ्यात जास्त व्हायोलंट मुव्हि कुठला बघितला आहे.'
- hostel, amusement. कोणी पाहिले नसतील तर पाहण्याचा प्रयत्न करूही नये, मी अजून पस्तावतेय.
wrong turn वगैरे तर सुरूवात पाहूनच बंद केले, अर्जंट्मध्ये. हे चित्रपट हॉरर प्रकारात मोडतील खरे तर,
हॉरर मध्ये ring आणि the grudge चे भाग, वाईट !
हे चित्रपट कधी पाहिले होते आठवतही नाही मात्र ते डोक्यात फिट बसले आहेत, अजूनही आठवून काटा येतो अंगावर.
आणि अशा चित्रपटांची खासियत ही की एकदा पहायला सुरूवात केली की थांबणे नसते, शेवटपर्यंत पाहत राहणे भाग पडते. curiosity killed the cat :)
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
गुरुवार, 03/03/2016 - 11:17
नवीन
ह्या यादीत, फायनल डेस्टीनेशन, पण येईल का?
मला हे असले टॉमॅटॉ सॉसवाले सिनेमे आवडत नसल्याने, आम्ही आपले साधे सरळ सिनेमे नघणेच जास्त पसंत करतो.
("सेव्हिंग प्रायव्हेट रायन" मध्ये पण हिंसाचार आहेच, पण तो कथेचा एक भाग ह्या पुरताच मर्यादित आहे.)
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/03/2016 - 11:19
नवीन
जोशी अभ्यंकर हत्याकांडावर आधारित चित्रपट आणि त्यातला खुनी हीरो????
गाणे रॉक किंवा लाऊड वगैरे असण्याबद्दल अजिबात आक्षेप नाही. पण विकृतीला खुदा म्हणून प्रोजेक्ट केलं असेल तर या सिनेमावर बंदी घातली हे सेन्सॉर बोर्डाचे एकमेव चांगले काम असू शकेल.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 12:11
नवीन
पैसाताई,
अशा नकारात्मक व्यक्तिरेखेला जस्टिफाय किंवा ग्लोरिफाय करण्याचा हेतू अजिबातच नाही.
मी फक्त वेगळ्या प्रवाहातील या चित्रपटाबद्दल,परिणामकारक शब्द असलेल्या त्या गाण्याबद्दल आणि केके मेननच्या अशक्य अभिनयाबद्दल लिहिले आहे.
बाकी मैं खुदा हे त्या character च्या devil may care attitude आणि आक्रमक व्यक्तिरेखेला शोभेसे आहे,
त्याच्यासारखा माणूस जो कोणालाही,कशालाही घाबरत नाही तो स्वतःला सर्वशक्तिमान परमेश्वर मानू लागला तर त्यात नवल ते काय.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/03/2016 - 12:16
नवीन
तू ग्लोरिफाय केलंस असं अजिबात म्हणत नाही. अशा समाजविघातक विकृतींना हीरो म्हणून सिनेमे काढणार्या लोकांचे भयंकर आश्चर्य वाटतंय.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 12:21
नवीन
समाजविघातक विकृतींना हीरो म्हणून सिनेमे >> असं आहे खरंच त्यात? म्हणजे जो कोणी मेन कॅरेक्टर आहे त्याच्या कृत्यांना ग्लोरिफाय केलंय कि डिटेलींग केलंय?
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »