"मान झुकव, परम ईश्वर आहे मी.."
एक दिवस, फक्त एकच दिवस, सगळ्या तुझ्या जखमांचा हिशेब कर
एक रात्र, फक्त एकच रात्र, कर विचार जरा, तुझ्यासोबत झाले काय
स्वत:पासून लांब कुठवर धावशील, ती पहाटही आता निसटून चालली, कधी उठशील
दुनियेने तुकडे केले तुझे, तुटत गेलास, स्वत:ला कुठवर तोडत राहशील..
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
प्रत्येक स्पर्शामागे एक ओढ आहे, मैत्रीतही का तणाव आहे
दुवा ही मीच, शाप मी, माझ्या जखमांत मला आराम आहे
अर्धा उजेड, अर्धा अंधार, अर्धा जन्म नको असा राख करूस
तू जे समजतोस तेच तू आहेस
कर विचार जरा, हो जागा, सगळ्यांना जागे कर
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
हे चूक, ते बरोबर, ऐक माझे, नको विचार करूस
हे नको घालू, ते नको बोलू, शक्य असेल तर तोंडच नको ना उघडू
हे वाचू नको, ते ऐकू नको, मीच निवडेन, तुला तो हक्कच नको
तुटत रहा, मिटत रहा, झुकायला शीक, झुकत रहा
बास आता अजून नाही, आता अजून नाही, अजून नाही, आता अजून नाही
बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही, आता अजून नाही
अजून नाही, आता अजून नाही, बास अजून नाही
घे श्वास भरून मोट्ठा, सांग ओरडून या जगाला,
मान झुकव, परम ईश्वर आहे मी,
सारा आसमंत व्यापून राहिलोय तो एक मी..
देव आहे माझ्यात, देव आहे मीच.
**
https://youtu.be/V-GWLZOVGvU
बर्याच दिवसांनंतर हे गाणे पुन्हा बघण्यात आले.. पहिल्यांदा पाहिले होते तेव्हाचा तोच इम्पॅक्ट पुन्हा एकदा अनुभवला.. अंगावर सरसरून काटा आला.. जबर तुफानी !!
'पाँच' या १९९९ साली तयार झालेल्या परंतु अद्यापी प्रदर्शित होण्याचे भाग्य न लाभलेल्या बॅन केलेल्या चित्रपटातील
'मैं खुदा' हे अफाट गाणे. अब्बास टायरवालाचे प्रभावी शब्द, विशाल भारद्वाजचे अविश्वसनीय संगीत, अनुराग कश्यपचे दिग्दर्शन, सगळा दारूगोळा खच्चून भरलेला, विस्फोट ठरलेलाच.
हल्ली असहिष्णूतेच्या नावाने फार ओरड होत असते, आवाज उठत असतात,पण अनुराग कश्यपने सिस्टीम विरोधात लढण्याचं काम खूप आधीपासून सुरू केलंय, हे गाणंही त्याचाच एक भाग, अगदी आपल्या मनातलेच वाटावेत असे ते गाण्यातील विचार, काळाच्या कितीतरी पुढे असणारा हा एक माणूस आणि तसंच त्याचं कामही. अफलातून !
हा चित्रपट थिएटरमध्ये मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची खूप इच्छा होती परंतु ती शक्यता लांबपर्यंत दिसून येत नाही.
सेन्सॉर बोर्डाने अतीव हिंसाचार, गुन्हेगारीचे समर्थन, अंमली पदार्थांचा वापर, द्वयर्थी संवाद, एकही सकारात्मक पात्र
नसणे, कोणताही सामाजिक संदेश नसणे, या सर्व कारणांमुळे या चित्रपटावर बंदी घातली होती जी अजूनही उठलेली नाही.
सेन्सॉर बोर्डाच्या स्पून फीडींग विरूध्द कायमच बोलले जाते आणि हे बोलणे अर्थातच वाया जाते, तो सारा मनमानी
कारभार आहे. १८ वर्षांवरील सज्ञान व्यक्तिने काय पहावे, काय नाही, ती गोष्ट त्याच्यासाठी चांगली की वाईट हे ठरवण्यासाठी एक समिती असणे आणि या समितीने एका पूर्ण समाजाने काय पहावे काय नाही हे ठरवणे म्हणजे
... पणाचा कळस आहे. चित्रपट वाईटच असेल पण लोकांना ते बघू द्या, त्यांचे मत बनवू द्या, नाही पटला
तर तेच बहिष्कार घालतील, चित्रपट थेटरात आठवडाही नाही काढणार, किंवा मग तुफान चालेल, कुणी सांगावे.
असो. यावर कितीही रिकामा त्रागा करून काही उपयोग नाही.
अर्थात चित्रपटातील काही सीन्स मी पाहिलेत त्यामध्ये प्रमाणाबाहेर हिंसाचार आहे, ड्र्ग्जचा अती वापर दाखवलाय, नैतिकता, नीतीमत्ता, माणूसकी या गोष्टींचा बेधडक चुराडा केलेला दाखवलेला आहे. ते ५-१० मिनिटांचे सीन्स
पाहिल्यानंतर मला मळमळल्यासारखे होऊ लागले होते, पूर्ण चित्रपट पाहिल्यावर नक्की कसे वाटेल सांगणे कठीण.
असे प्रकार लोकांना कितपत झेपतील हाही प्रश्न आहेच, तरी हॉलिवूडमुळे आपले प्रेक्षक बर्यापैकी निर्ढावलेत म्हणून
बरं.शेवटी ज्याला झेपतं त्याने पहावे इतरांनी लांब रहावे.
हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या
पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो.
या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर !
'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !!
तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला.
एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट.
गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे..
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची,
सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो..
हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश.
असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट.
चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो,
अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग.
** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."
हे गाणे नुसते ऐकतांना तेवढे प्रभावी वाटणार नाही कदाचित पण त्याचा दृश्य परिणाम जबरदस्त आहे, ते मोठ्या
पडद्यावर पाहायला किती भारी वाटलं असतं याची आपण फक्त कल्पना करू शकतो.
या गाण्यातील के.के.मेनन चा अभिनय निव्वळ जबरदस्त आहे. एक रॉक्स्टार देहबोलीतून, अभिनयातून तंतोतंत उभा केलाय त्याने, गाण्यातील त्याचा चेहरा, डोळे, आवेश, एक्स्प्रेशन्स.. कहर !
'मैं खुदा' म्हणतांना त्याच्या डोळ्यांत आलेली विक्षिप्त, वेडसर झाक.. Awesome !!
तो या गाण्यात फक्त अभिनय करत नाही तर त्यातील प्रत्येक शब्द अक्षरशः जगतो. सलाम या अवलिया कलाकाराला.
एका गाण्यात त्याने एवढा जीव ओतलाय तर पूर्ण चित्रपटातील त्याचा अभिनय खतरनाकच असेल, असेल काय आहेच, आणि असा अभिनय जगासमोर येऊ नये ही फारच वाईट गोष्ट.
गाण्यातील केकेचे नाट्यमय, नकारात्मक कॅरॅक्टर पाहून कोणलाही या माणसापासून कितीतरी हात लांबच रहावेसे वाटेल, मात्र त्याच वेळेस गाण्याच्या शेवटी शेवटी त्याने एक असा माणूसही उभा केलाय जो आयुष्यावर, समाजावर नाराज आहे..
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची,
सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते. अशा दुहेरी भावनांचे द्वंद्व हा माणूस आपल्या मनात उठवतो..
हे अर्थातच केकेच्या उच्च कोटीच्या अभिनय कौशल्याचं यश.
असे कलाकार म्हणजे केके मेनन, इरफान खान, रणदीप हूडा मला खूप आवडतात, त्यांच्या अभिनयातून, चित्रपटांतून खूप काही मिळतं, अभिनय म्हणजे काय ते कळतं. फक्त केके बद्दल बोलायचं तर त्याचे गुलाल, शौर्य, हैदर, लाईफ इन अ मेट्रो, मै मेरी पत्नी और वोह हे माझे काही आवडते चित्रपट.
चित्रपटातील गाणी, दृश्यांतील रहस्यमय अंधारे वातावरण यामुळे सतत एक sense of doom जाणवत राहतो,
अखेरीस यातील पात्रांप्रमाणे चित्रपटही तसाच destined to be doomed ठरावा हा फारच दुर्दैवी योगायोग.
** चित्रपट कोणी पाहिला असेल तर त्याबद्दलचे मत आणि विचार जाणून घ्यायची इच्छा आहे.
चित्रपटाची टॅगलाइनः " Avoid life. It kills you in the end."
💬 प्रतिसाद
(67)
प
पैसा
गुरुवार, 03/03/2016 - 12:26
नवीन
इथे तर सगळ्यांनी त्याला हीरो म्हटलंय. मी सिनेमा बघितला नाही आणि असली घाण बघायची इच्छा पण नाही. उद्या हे असले बघून तेच नॉर्मल आहे असं वाटून गुन्हे करणारेही निघतील. काय नेम नाही.
- Log in or register to post comments
प
पैसा
गुरुवार, 03/03/2016 - 12:29
नवीन
ज्यांनी जोशी अभ्यंकर हत्याकांडाबद्दल वाचलंय त्यांना राजेंद्र जक्कल किती थंड डोक्याने वावरत होता आणि कसे निर्घृण खून केले गेलेत याबद्दल आठवत असेल. त्याच्याबद्दल दया किंवा कणव वाटण्याची सुतराम शक्यता नाही. तो उद्दाम होता. हरलेला वगैरे अजिबात नव्हता.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 12:51
नवीन
मी चित्रपट पाहिलेला नाही आणि जक्कल बद्दलही लिहिलेले नाही,'तो हरलाय' हे
आणि लेखातील इतर विशेषणेही फक्त आणि फक्त गाण्यातील केकेच्या अभिनयासाठी.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 12:55
नवीन
जक्कल आणि कंपनी हा वेगळाच विषय आहे. ते फक्त मजा म्हणुन खून पाडत होते. क्रौर्याचीही नशा असते. काहींना असे सिनेमे पाहून तलफ भागते, काहींची तलफ उफाळून सिनेमांसाठी विषय बनून जाते.
तो हरलाय.. पूर्णपणे कोसळलाय आणि अशा या हरलेल्या, उदास, निराश माणसाला कोणीतरी जवळ घेण्याची, सावरण्याची खूप गरज आहे असेही आपल्याला वाटते.
>> ह्याबद्दल एक कथा-सत्यकथा-बोधकथा वाचलेली आठवते. परदेशातलीच आहे. एका लोकलमधे एक अतिशय हिंस्त्र दिसणारा, दारू प्यायलेला, गुरकावणारा माणूस शिरतो. इतर प्रवाशांवर उगाच डाफरतो, भांडणं उकरुन काढून मारामारी करायला बघतो. त्याला घाबरुन स्गळे डब्याच्या एका बाजूने होतात. हा दुसर्या बाजूला एकटाच हुंकार टाकत बसलेला. एक अतिशय कृश म्हातारा त्याच्या जवळ जातो. इतर प्रवाशी त्या आजोबाला सांगतात की नका करु असं, एका फटक्यात जीव जाईल तुमचा. तो ऐकत नाही. त्याच्याजवळ जाऊन त्याच्या डोळ्यात डोळे घालून अतिशय करुणेने त्याला विचारतो, कायरे बाळा, काय झालं तुला, काही त्रास होतोय का. मला सांग बघू. ते शब्द ऐकुन तो हिंस्त्र मनुष्य लहान बाळासारखा रडायला लागतो. म्हातार्याच्या कुशीत शिरत भोकांड पसरतो, अहो, मला असं प्रेमानं विचारणारं कुणीच भेटलं नाही हो कधीच. आतापर्यंत फक्त घृणा आणि अपमानच मिळाले. मार खाल्ला. पब्लिक आश्चर्यचकित होते.
असो. ते वाक्य वाचून ही कथा आठवली इतकंच.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 12:35
नवीन
गुन्ह्यांसाठी सिनेमावरुन प्रेरणा घेणारे आहेतच म्हणा. किंवा सिनेमात दाखवलेलं थ्रिल प्रत्यक्षात अनुभवलं पाहिजे ह्याची तलफ लागत असणार. जशी सिगरेट, दारु, इत्यादींची तलफ येते तशी हिंसेचीही तलफ येत असेल काय? खरंतर म्ला अशा कथा लिहिणार्या, दिग्दर्शित करणार्या कलाकारांबद्दल विचार पडतो. होस्टेल, सॉ ह्यासारखे चित्रपट लिहणारे, काढणारे मानसिकरित्या कसे असतील? एवढा रक्तपात ते स्वत: आधी इमॅजिन करतात, तो दृश्य स्वरुपात मांडण्याइतका त्यांच्या पेशंस असतो म्हणजे कुठेतरी ते त्यात विश्वास ठेवतात काय? अशा कलाकारांबद्दल गावडेसर काय म्हणतील?
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 13:02
नवीन
मी हा विचार करतोय की मी प्रतिसाद दिल्यानंतर मिपावरील रथी महारथी तो कसा खोडून काढतील. =))
इथे माझे नांव का आठवले हे कळले नाही मात्र व्यक्तीशः मला हिंसाचार मुळीच पाहवत नाही. चित्रपट पाहताना असे वाटते की ती घटना माझ्या नजरेसमोर प्रत्यक्ष घडत आहे. त्यामुळे पुढच्या क्षणी मी तो चित्रपट पाहणे बंद करतो.
जोशी अभ्यंकर हत्याकांडाबद्दल फारशी माहिती नाही.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 13:10
नवीन
तुमचे मानसशास्त्रावर चांगले प्रभुत्व आहे असे ऐकले आहे. म्हणून तुमचे नाव घेतले. तुम्ही लिहा हो. चांगली चर्चा होईल.
: पिवळ्याप्रतिसादांना घाबरू नका. ;-)
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
गुरुवार, 03/03/2016 - 13:19
नवीन
प्रभुत्व नाही हो. थोडे फार वाचन केले आहे. काहींच्या दृष्टीने वाचनाला काही अर्थ नसतो. अनुभूती महत्वाची असते. :)
- Log in or register to post comments
ह
होबासराव
गुरुवार, 03/03/2016 - 13:28
नवीन
मनातला गोंगाट कमि करायला अवधानाचं इंधन कुठल लागेल, व्हिस्कि का रम ?
बर मला एक सांगा तुम्हाला कुठल्याहि गोष्टिकडे ३ dimensional पाहता येत का?
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
गुरुवार, 03/03/2016 - 16:51
नवीन
Y अन Z डिमेंशन त्यांच्याकड़े नक्कीच आहे. फक्त उरला X फैक्टर तेवड़ाच काय तो कन्फर्म करून घ्या.
- वाचनाची अनुभूती नाकारणारा निरागस भाउंचा भाऊ
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
गुरुवार, 03/03/2016 - 13:04
नवीन
गावडेसर मनोवैज्ञानिक चिकित्सा करतीलच पण एक किंचित कलाकार म्हणून माझे चार पैसे.
दिग्दर्शक म्हणा, गायक, संगीतकार, चित्रकार, शिल्पकार, काही सायंटीस्ट हे व्हिज्युअलायझर असतात. प्रत्यक्षात आणण्यापूर्वी बरेचसे काम मेंदूच्या पातळीवर चाललेले असते. वर्शानुवर्शे पाहिलेले, अनुभवलेले हे कशा स्वरुपात व्हिज्युअलाइझ होइल सांगता येत नाही. सामान्यांना जी हिंसा, लैंगिकता किंवा अतिशयोक्ती वाटेल ते त्याला तसेच वाटेल नाही सांगता येत. आता परफोर्मिंन्ग आर्ट असल्यामुळे त्या दॄश्यांना काहीजण पार नाके मुरडतील, काही जण रिलेट सुध्दा करतील. त्या कलाकाराला मानसिक दृश्ट्या पेशंस असतोच. कधी कधी तो ताण असह्यही होतो. पण त्याची इच्छा अथवा स्वभाव तसेच काही करायचा असेल असे नसते. जीवनाचा एक अनुभव म्हणून त्याने ते व्हिज्युअलाइझ केलेले असते. काही अगदी बोधप्रद चित्रपट/देवादिकांची सोज्ज्वळ चित्रे साकारणारे कलावंत असतात. त्यांचे दिग्दर्शक अथवा चित्रकार त्या दृष्टीने व्हिज्युअलाइज करत असतील. आपण त्याचा अनुभव कशा पध्दतीने घ्यायचा हे आपण ठरवायचे.
साध्या सोप्या भाषेत मी एखादे चित्र अथवा व्यक्ती ज्या पध्दतीने पाहतो/मला जाणवते त्या पध्दतीनेच तुम्ही पाहू शकत नाही, जाणवू शकत नाही.
अवांतरः चित्रकला महाविद्यालयात शिकताना आम्हाला सर्रास विचारला जाणारा सवाल "ते न्यूड बिड असते कारे?" मुद्दा असते का नसते हा नाही. कुतुहल, फॅन्टसी आणि त्याचे प्रकटीकरण बर्याच स्वरुपात होते. किंबहुना ते तसे व्हावे ह्या मताचा मी आहे. हा एक सेफ्टी वॉल्व्ह म्हणू शकता. वल्लीने गधेगाळाचे जे व्हिज्युअल उदाहरणे दिलीत त्यामधे केवळ हाच हेतू असावा असे वाटते. केवळ शापवाणीच्या प्रकटीकरणासाठी अशी शिल्पे चितारण्यामागे शिल्पकारांची एक वेगळी 'वहीच्या शेवटच्या पानासारखी' मनोवृत्तीसुद्दा असू शकते.
.
खुलासा: मला जे वाटले ते मी लिहिले. ह्या विषयावर जास्त चर्चा करण्यास मात्र मी असमर्थ आहे. क्षमस्व.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 13:12
नवीन
प्रतिसाद आवडला.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 15:26
नवीन
मनातले विचार असे लिहिता आले पाहिजेत. मुद्देसूद आणि करेक्ट.
'चित्र अथवा व्यक्ती ज्या पध्दतीने पाहतो/मला जाणवते त्या पध्दतीनेच तुम्ही पाहू शकत नाही, जाणवू शकत नाही.'
- अगदी हेच म्हणायचेय.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
गुरुवार, 03/03/2016 - 12:38
नवीन
अशा घातक प्रवृत्तींचा अंतही तितक्याच वाईट प्रकारे होतो हा चित्रपटातील संदेश असण्याची शक्यता जास्त आहे.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 03/03/2016 - 12:54
नवीन
चित्रपटाशेवटी "त्या बाईला तिचे गुन्हे पचले नाहीत. गुन्हे कधीच पचत नाहीत." असा संदेश टाकायला लावला होता सेंसर बोर्डाने. मूळ सिनेमात तो नव्हता म्हणे.
- Log in or register to post comments
ज
जेपी
गुरुवार, 03/03/2016 - 11:29
नवीन
या चित्रपटा बद्दल धन्यवाद निमो..
आज सकाळी थोडा पाहिला..असाच थोडा थोडा करुन पाहण्यात येईल..
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/03/2016 - 11:30
नवीन
विशिष्ट वयात हॉरर चित्रपट आवडतात काय? मला गेल्या दहा वर्षापासुन भूताखेतांचे पिच्चर बघण्याची इच्छाच होत नाही. आपला वेळ घालवून आपणच घाबरायचं हे पकाउ वाटतं. तसंही आजकाल फार अॅन्टीसिपेटींग सीन असतात. किंवा अनपेक्षित असं काही राहिलं नाही. थ्रिलर, क्रुयेल्टी दाखवणारे पिच्चर ठिक आहेत. अॅक्शन, मारधाड, वेगवान स्टोरीज असलेले आवडतात.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2