Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

(असा नवरा असता तर..)

न — नीलमोहर, Wed, 03/09/2016 - 05:49
असा नवरा असता तर, आम्ही असे झालो नसतो भर उन्हात रिक्षावाला शोधत हापिसला पायी निघालो नसतो त्याच्या नखाची कुणाला आली नसती सर असा नवरा असता तर घरदार काय जग गाजवले असते शॉपिंग हॉटेलिंग ऐश केली असती आएम द क्वीन ऑफ द वर्ल्ड म्हणत मिरवले असते पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर असा नवरा असता तर तळजाईच्या जंगलात निवांत हिंडलो असतो आम्ही झेड ब्रिजवर तुम्हाला कधीच दिसलो नसतो ओंकारेश्वराची कृपा झाली असती आम्हावर असा नवरा असता तर सेंट्रलच्या वॉचमनने केला असता सलाम रोज दुपारी ताणून देऊन केला असता आराम नवऱ्याने माझे न ऐकता वेळेअगोदर रेडी ठेवले असते ब्रेकफास्ट लंच अन डिनर असा नवरा असता तर गाडगीळांनीही होम डिलिव्हरी केली असती पाचूची अंगठी न बोलता हातात आली असती काही नसता म्हटला तो मागितल्यावर प्लॅटिनमचे ब्रेसलेट नाजूक पोवळ्यांचा सर असा नवरा असता तर मंगलात मैत्रिणींनी पकडली असती त्याच्या शेजारची जागा म्हटले असते त्यांना टवळ्यांनो अंतर ठेऊन वागा मेल्या स्कार्फवाल्याही जळल्या असत्या सिग्नलवर असा नवरा असता तर आता स्वतःला दोष देऊन काय फायदा तो होता.. वेळही होती.. केला असता ठामपणे तेव्हाच एक वायदा झाले असते घरटे दोघांचे सुंदर असा नवरा असता तर... पेर्रणा...

प्रतिक्रिया द्या
8514 वाचन

💬 प्रतिसाद (48)
प
प्रचेतस Wed, 03/09/2016 - 05:51 नवीन
=))
  • Log in or register to post comments
ज
जेपी Wed, 03/09/2016 - 05:54 नवीन
=))=))=)) होळीच्या आधीच दिवाळी =))
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 03/09/2016 - 05:56 नवीन
जमलंय पण नेहमीची मजा नाय आली. बादवे या निमित्ताने प्रेरणा वाचली.
  • Log in or register to post comments
प
पलाश Wed, 03/09/2016 - 05:59 नवीन
अगदी छानच!! :)))
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Wed, 03/09/2016 - 06:00 नवीन
=))
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 03/09/2016 - 06:14 नवीन
वाईट्ट !! =))
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Wed, 03/09/2016 - 06:15 नवीन
अगदीच भारी!! उच्चच!!
मंगलात मैत्रिणींनी पकडली असती त्याच्या शेजारची जागा म्हटले असते त्यांना टवळ्यांनो अंतर ठेऊन वागा मेल्या स्कार्फवाल्याही जळल्या असत्या सिग्नलवर असा नवरा असता तर
महान! विडंबन स्पर्धेसाठी काही शिल्लक आहे की नाही!!!
  • Log in or register to post comments
न
नूतन सावंत Wed, 03/09/2016 - 06:39 नवीन
मस्त.मस्त.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 03/09/2016 - 06:39 नवीन
ल ई भा री ! मजा आहे बुवा! :-)))
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/09/2016 - 06:40 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
अ
अजया Wed, 03/09/2016 - 06:43 नवीन
लैच भारी.योग्य ठिकाणी फाॅरवर्ड केल्या गेले आहे ;)
  • Log in or register to post comments
म
माहितगार Wed, 03/09/2016 - 07:16 नवीन
प्रेरणा आणि विडंबनांची दुनिया न्यारी, तुमास्नी इडंबन जमलया, लै भारी !
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/09/2016 - 07:27 नवीन
=)) विडंबन भारी! पण शेवट जरा उदास करून गेला. आणि हो, मित्र खूप छान असतो. त्याचा नवरा झाला की गेलाच कामातून!
  • Log in or register to post comments
च
चिगो Wed, 03/09/2016 - 09:39 नवीन
भारीच विडंबन.. शेवट मात्र थोडा 'भातुकलीच्या खेळामधली..' टाईप झालाय..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
न
नीलमोहर Wed, 03/09/2016 - 10:02 नवीन
कवितेचा मी लिहीलेला शेवट आणि सर्वांच्या समजण्यात येत असलेला शेवट बहुधा वेगवेगळे आहेत. मला अभिप्रेत असलेला अर्थ कोणाला शोधता येतो का बघू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
ब
बॅटमॅन Wed, 03/09/2016 - 07:28 नवीन
ठ्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
न
नाखु Wed, 03/09/2016 - 08:12 नवीन
दगडात इशारा,इरादा आणि इमानी (की इमामी) पक्षी उडवलेले आवडले.. हि होळीची झलक सम्जावी काय ?
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 03/09/2016 - 08:14 नवीन
पीसीएमसीत छोटसं आमचं असतं घर
  • Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक Wed, 03/09/2016 - 08:19 नवीन
पण बाकी उल्लेखही दुर्गा टेकडी, भक्ती शक्ती, शिवार गार्डन, प्रदीप स्वीट्स , बिग सिनेमा यांचे असते तर अजून मजा आली असती (जयश्री सिनेमा पण चालला असता :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
न
नीलमोहर Wed, 03/09/2016 - 09:52 नवीन
पीसीएमसीत घर घ्यायचं स्वप्न कधीचं आहे :) सध्या पुणेकर असल्यामुळे पुण्यातील ठिकाणे आलीत, तिकडे रहायला गेलो की मग आहेच.. रावेत पूल, भे़ळ चौक, प्राधिकरण, आकुर्डी रे.स्टे, पुनावळे, स्पाईन रोड इ. इ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
न
नाखु Wed, 03/09/2016 - 11:38 नवीन
ठिकाणे चालत जाण्याच्या अंतरावर आहेत (माझ्या घरापासून) रावेत पूल, भे़ळ चौक, प्राधिकरण, आकुर्डी रे.स्टे पिंचीवाला पुणेकर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर Wed, 03/09/2016 - 12:02 नवीन
असू द्या हो असू द्या.. जळवू नका.. मीही घेईन तिकडे घर मग असेच लिहीन.. (लहानपणापासून अजूनपर्यंत शिवाजीनगर ते आकुर्डी, लोणावळा लोकलने मामाच्या घरी जाणे एन्जॉय करणारी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
न
नाखु Wed, 03/09/2016 - 12:07 नवीन
जळवित नाहीच्च मुळी , उलट जास्तीत जास्त मिपाकर या भागात आले तर भागाला जरा प्रसिद्धी मिळेल. कप्ताना,मुनी ऐकताय ना रे !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/10/2016 - 05:31 नवीन
तुमच स्वप्न लवकर पुर्ण होवो म्हणून शुभेच्छा. पिपरी चिंचवडमध्ये तुमचं स्वागत करायला आवडेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
च
चौथा कोनाडा Wed, 03/09/2016 - 12:29 नवीन
जयश्री सिनेमा ....... :-))) इस्कू बोलतें हार्ड कोर पिंचिंकर ! इथं बर्‍याच वारया केल्यात विशाल होण्यापुर्वी !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
म
मराठी कथालेखक गुरुवार, 03/10/2016 - 05:34 नवीन
:) पुर्वी सहकुटूंबही जाता यायचे जयश्रीला. तसेच जवळपासच्या काही कारखान्यातील लोक अर्धी सुटी घेवून वा मध्येच कलटी मारुन जयश्रीला सिनेमा बघून यायचे असं खूप ऐकलं आहे. आताचं जयश्री मात्र... सहकुटूंब तर दूर राहिलं मित्रासोबतही जाण्याचा विचारही करवणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ज
ज्ञानोबाचे पैजार Wed, 03/09/2016 - 08:16 नवीन
चेष्टेच्या स्वरुपात का होईना पण सत्य मान्य केल्या बद्दल निलमोहरताईचे मन:पूर्वक अभिनंदन. हे सूर्यप्रकाशा इतके प्रखर सत्य आहे की जगातला प्रयेक नवरा असाच असतो आणि हे उघड सत्य मागील १० हजार वर्षात कोणत्याही स्त्रीने जाहीरपणे मान्य केलेले नाही. पण प्रत्येक विवाहित स्त्री मनातल्या मनात हे मान्य करतेच की तिचा नवरा खुप महणजे खुपच, म्हणजे फारच, म्हणजे अतिशयच, म्हणजे लई म्हणजे लैच चांगला आहे. तिचे भाग्य थोर म्हणुनच तिच्या नशिबी असा सद्गुणांचा पुतळा आला. याच्याशी लग्न करताना तिची मागील सात जन्मांची पुण्याई सार्थकी लागली पण इतर जळकुंड्या स्त्रियांची आपल्या नवर्‍याला नजर लागू नये या आणि केवळ याच भावनेने ती आपल्या नवर्‍याला चारचौघात नावे ठेवता असते. खरेतर जगातला प्रत्येक नवरा हा एक हिराच असतो. खराब टाकाऊ नवरा मी तरी आज पर्यंत पाहिलेला नाही. या संसाररूपी रथाला दोन चाके असतात एक स्त्री आणि एक पुरुष. पण ही चाके बनवताना पण देवाने थोडी गम्मत केली आहे. त्यातले पुरुष रुपी चाक हे वर्तुळासारखे असते गोल गरगरीत . त्यामुळे ते कुठेही कसेही वेगाने जाऊ शकते. तर दुसरे चाक थोडे अष्टकोनी किंवा षटकोनी असते (काही पंचकोनी चौकोनी आणि त्रिकोणी चाके सुध्दा माझ्या पहाण्यात आहेत ). पण कसेही असले तरी, जे आहे ते आपल्याच रथाचे चाक आहे हे मान्य करुन पुरुष ते चाकही आपल्या बरोबर नेटाने चिकाटीने आणि मोठ्या धैर्याने ओढत असतात. इथल्या मिपा बायकांनी दिलेल्या प्रतिक्रीया वाचल्यावर सुध्दा हीच गोष्ट लक्षात येते की प्रत्येक स्त्रीला आपल्या नवर्‍या बद्दल किती आदर आणि अभिमान आहे ते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 03/09/2016 - 08:23 नवीन
पण इतर जळकुंड्या स्त्रियांची आपल्या नवर्‍याला नजर लागू नये या आणि केवळ याच भावनेने ती आपल्या नवर्‍याला चारचौघात नावे ठेवता असते. खरेतर जगातला प्रत्येक नवरा हा एक हिराच असतो. खराब टाकाऊ नवरा मी तरी आज पर्यंत पाहिलेला नाही.
जळकुंड्या शब्द लईच आवडलेला आहे! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
स
सूड Wed, 03/09/2016 - 09:55 नवीन
कुजाया जायेत क्वचिदपि कुभर्तार न भवति॥ ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
न
नीलमोहर Wed, 03/09/2016 - 11:42 नवीन
अहो, मी या विषयावर टिप्पणी करण्याच्याही पोझिशनमध्ये नाही तिथे मान्य अमान्य काय करणार डोंबलं :p 'जगातला प्रयेक नवरा असाच असतो आणि हे उघड सत्य मागील १० हजार वर्षात कोणत्याही स्त्रीने जाहीरपणे मान्य केलेले नाही.' - असाच म्हणजे नक्की कसा ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार
अ
अभ्या.. Wed, 03/09/2016 - 11:46 नवीन
असाच म्हणजे असातसाच हो. (सगळ्या मिपाकर नवर्‍यानो/नवरे मिपाकरांनो सॉरी बर्का.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
ड
डॉ सुहास म्हात्रे Wed, 03/09/2016 - 08:24 नवीन
=)) =))
  • Log in or register to post comments
अ
अबोली२१५ Wed, 03/09/2016 - 08:26 नवीन
नवरा विकणे आहे
  • Log in or register to post comments
प
पैसा Wed, 03/09/2016 - 08:34 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५
अ
अभ्या.. Wed, 03/09/2016 - 09:24 नवीन
हेहेहेहेहेहे मस्त. मंगला खरच फेमस दिसतय. ;)
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर Wed, 03/09/2016 - 12:16 नवीन
तुम्ही पाहिले असेल की, नसले तर जाऊन या. मल्टिप्लेक्सच्या गर्दीत कधीच जावे वाटत नाही, त्यामुळे मंगलाला पर्याय नाही. तिथे फालतू पब्लिक फिरकत नाही, निवडक प्रेक्षक येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
न
नाखु Wed, 03/09/2016 - 12:23 नवीन
रैट म्हंजे रैट्ट है !
तिथे फालतू पब्लिक फिरकत नाही, निवडक प्रेक्षक येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
प
पद्मावति Wed, 03/09/2016 - 10:01 नवीन
=)) मस्तं, मस्तं!!!
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Wed, 03/09/2016 - 11:34 नवीन
एकदा बघावा म्हणते हा कवतिकाचा नौरा !
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 03/09/2016 - 14:28 नवीन
हल्ली क्रेडिट कार्डाला नवरा म्हणायची फ्याशन आलेली दिसते =)) =)) कविता अवडली =))
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Wed, 03/09/2016 - 14:40 नवीन
हा हा हा ! झ्याक !!!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 03/09/2016 - 15:37 नवीन
झकासच. जियो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ए
एस Wed, 03/09/2016 - 16:49 नवीन
काहीच्या काही कविता.
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 03/09/2016 - 16:56 नवीन
नीमोबेण आपणास मिपाच्या 'देवांगी पटेल(पुणेकर)' हा किताब पेशवेउद्यानातील तळ्याकिनारी, जिथे टिकाऊ रोपे दिसतात त्या गर्दीच्या साक्षीने देण्यात येत आहे. जरा मंगळवारपर्यंत थांबा. सारे बेशणेलनेट्वापरणारे कसे निलायम टोकीजकडून त्वेषाने येतेत बघा. ;)
पेर्रणा...
  • Log in or register to post comments
न
नीलमोहर गुरुवार, 03/10/2016 - 06:10 नवीन
किताब वगैरे नको हो, सगळ्यांचे प्रोत्साहनाचे शब्द हाच सर्वात मोठा किताब (खिताब ?) बाकी सत्काराचे ठिकाण पाहून मन भरून आले, डोळे पाणावून... असो. मला नेहमी जाणवायचं, वाटायचं पण आज मात्र खात्री पटलीय... तुम्हीच... ते माझे जत्रेत हरवलेले भाऊ, हो ना? त्या टेलिपथीशिवाय का तुम्हाला हे ठिकाण सुचलं असतं, तिथे सत्काराचे ठरलेच तर अजूनही बरीच मंडळी येतील नारळ, आपलं श्रीफळ द्यायला :p (सांगाचतुम्हालाकसेकळालेमाझेहापिसतळ्यातलागणपतीपेशवेउद्याननिलायम्टोकीज्जवळआहेते!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
श
श्रीरंग_जोशी गुरुवार, 03/10/2016 - 06:29 नवीन
किताब वगैरे नको हो, सगळ्यांचे प्रोत्साहनाचे शब्द हाच सर्वात मोठा किताब (खिताब ?)
केवढा हा विनम्रपणा.
मला नेहमी जाणवायचं, वाटायचं पण आज मात्र खात्री पटलीय... तुम्हीच... ते माझे जत्रेत हरवलेले भाऊ, हो ना?
ही दुनिया म्हणजे एक जत्राच आहे अन मी प्रथमपासून हरवलेलाच आहे (सा प ड ल्या स स ड पा त ळ बां धा) =))
(सांगाचतुम्हालाकसेकळालेमाझेहापिसतळ्यातलागणपतीपेशवेउद्याननिलायम्टोकीज्जवळआहेते!!)
आकाशातल्यादेवाच्याकृपेनेटुक्कालागलानेहमीलागतनाहीआजचलागलाअबमैक्याकरू!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर
न
नीलमोहर गुरुवार, 03/10/2016 - 07:00 नवीन
स ड पा त ळ बां धा क र्क रा स जि ल बी प्र मा णे सा धे स र ळ शां त ग री ब वि न म्र सु स्व भा वी प रो प का री म न मि ळा वू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
स
सायकलस्वार गुरुवार, 03/10/2016 - 00:34 नवीन
ताई तू टेन्शन नको घेउ... आमच्या उर्मिलालासुद्धा बेचाळीसाव्या वर्षी का होईना नवरा मिळाला... तुलाही मिळेल हो!!...
  • Log in or register to post comments
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा