Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

ग
गॅरी ट्रुमन
Wed, 03/09/2016 - 06:21
🗣 175 प्रतिसाद
नमस्कार मंडळी, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन. तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे. मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन. क.लो.अ गॅरी ट्रुमन यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक

Book traversal links for अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)

  • ‹ अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६
  • Up
  • अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग ३) ›
वर्गीकरण
राजकारण

प्रतिक्रिया द्या
65919 वाचन

💬 प्रतिसाद (175)
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/09/2016 - 08:04 नवीन
मंगळवार ८ मार्च रोजी दोन्ही पक्षांच्या मिशिगन आणि मिसिसीपी राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. तर रिपब्लिकन पक्षाची आयडॅहो आणि हवाईमध्ये प्रायमरी झाली. या प्रायमरीचा सगळ्यात अनपेक्षित निकाल मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक प्रायमरीचा लागला आहे.सर्व जनमतचाचण्यांमध्ये हिलरी क्लिंटन आरामात जिंकणार असे कल आले होते.पण प्रत्यक्षात बर्नी सँडर्स यांनी सुमारे २% मते अधिक घेऊन ही प्रायमरी जिंकली. असे म्हटले जात आहे की बिल क्लिंटन अध्यक्ष असताना त्यांनी कॅनडा आणि मेक्सिकोबरोबर North American Free Trade Agreement केले होते.त्यामुळे अमेरिकेत जो थोडाफार मॅन्युफॅक्चरींगचा बेस मिशिगन-ओहायोमध्ये होता त्याला धक्का लागला.त्याचा तोटा हिलरींना होताना दिसला.तसेच हिलरींनी केवळ डिट्रॉईटमध्येच प्रचार केला पण बर्नी सँडर्स यांनी मिशिगनच्या इतर भागांमध्येही सभा घेतल्या.एकेकाळी जगाची Automobile Capital असलेल्या डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये हिलरींना मोठी आघाडी मिळाली आहे. कदाचित या भागात पूर्वी नोकरीला असलेले कर्मचारी आता डिट्रॉईटमध्ये राहात नाहीत त्यामुळे त्यांच्या मतांचा फटका हिलरींना खुद्द डिट्रॉईट आणि डिअरबॉर्नमध्ये न बसता राज्याच्या इतर भागात बसला. तसेच डिट्रॉईटमध्ये आफ्रिकन अमेरिकनची संख्या लक्षणीय आहे.हे मतदार हिलरींचे समर्थक आहेत त्याचाही फायदा हिलरींना त्या भागात होताना दिसत आहे. भाप्रवे सकाळी सी.एन.एन वर बघितले की मिशिगनमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांचा तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांचा विजय होणे हे डेमॉक्रॅटिक पक्षासाठी फार चांगले लक्षण नाही.हे दोन्ही उमेदवार फ्री-ट्रेडच्या विरोधात आहेत.जर या कारणामुळे हे मतदार अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह उमेदवारांना मत देत असतील तर त्याचे परिणाम देशाच्या इतर भागात (विशेषतः कॅलिफॉर्निया आणि न्यू यॉर्क या परदेशी लोकांची संख्या लक्षणीय असलेल्या भागात) बघायला मिळतील.विशेषत: हिलरी विरूध्द ट्रम्प ही लढत असेल तर या दोन महत्वाच्या राज्यांमधून फ्री-ट्रेडची झळ बसलेले मतदार ट्रम्पच्या दिशेने झुकतील ही शक्यता आहेच. आतापर्यंत लागलेले निकाल पुढीलप्रमाणे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }        रिपब्लिकन पक्ष    मिसिसीपीमिशिगनआयडॅहोआतापर्यंत डॉनल्ड ट्रम्प242510446 टेड क्रुझ131714347 मार्को रूबिओ000151 जॉन कॅसिक017054 इतर00015 एकूण3759241013         डेमॉक्रॅटिक पक्ष    मिसिसीपीमिशिगन आतापर्यंत हिलरी क्लिंटन2958 1221 बर्नी सँडर्स465 571 एकूण33123 1792 तर डेमॉक्रॅटिक पक्षात पुढील चित्र आहे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }      सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण हिलरी क्लिंटन4617601221 बर्नी सँडर्स25546571 एकूण48613061792 रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांची घोडदौड थांबविण्यात टेड क्रुझ यांना या प्रायमरीमध्ये अपयश आले.जॉन कॅसिक यांची कामगिरी या प्रायमरीमध्येही निराशाजनकच राहिली.मिशिगन हे त्यांच्या ओहायोच्या शेजारचेच राज्य असल्यामुळे मिशिगनमधून त्यांची कामगिरी त्या मानाने चांगली होईल अशी अपेक्षा होती.पण तसे झालेले नाही. रिपब्लिकन पक्षाच्या कॉकसेसमध्ये हवाईमध्ये भाप्रवे प्रमाणे मतदान उशीरापर्यंत चालू होते (मिशिगन आणि हवाईच्या स्थानिक वेळेत ५ तासांचा फरक आहे).मतमोजणी सुरू झाली आहे.आतापर्यंत ८% मते मोजून झाली आहेत. त्यात डॉनल्ड ट्रम्प आघाडीवर आहेत. तिथले निकाल आले की पोस्ट करेनच.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/09/2016 - 13:57 नवीन
हवाई कॉकसेसचा निकाल हाती आला आहे. हवाईमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी ४२.४% मते घेऊन १० प्रतिनिधी तर टेड क्रुझ यांनी ३२.७% मते घेऊन ६ प्रतिनिधी मिळवले आहेत. मार्को रूबिओ आणि जॉन कॅसिक यांचा या राज्यातही फारसा प्रभाव दिसलेला नाही. भाप्रवे सकाळी रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींचे आकडे पोस्ट केले होते.त्यानंतर हवाईमधील कॉकसेसचे निकाल हाती आले. बहुदा मधल्या काळात अनबाऊंड डेलिगेटमध्ये (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) काही बदल झाले असावेत.सध्याचे आकडे पुढीलप्रमाणे आहेत-- table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }    आतापर्यंत डॉनल्ड ट्रम्प458 टेड क्रुझ359 मार्को रूबिओ151 जॉन कॅसिक54 इतर15 एकूण1037
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Wed, 03/09/2016 - 17:38 नवीन
हा शब्द मला बुचकळ्यात टाकत आलेला आहे. हा एकवचनी वापरायचा का नाही की कायम अनेकवचनीच? काही लोक त्याचे अनेकवचन कॉकाय असे करतात ते बरोबर आहे का? हवाईचा कॉकस का हवाईचे कॉकसेस? अत्यंत विचित्र शब्द आहे हा!
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 03/09/2016 - 17:58 नवीन
नुसार Caucuses हा शब्द आहे. काॅकाय म्हटल्यावर Coci हा एका जातीच्या जीवाणूंसाठी वापरला जाणारा शब्द सापडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/10/2016 - 07:48 नवीन
कॉकस म्हणजे पक्षाने राज्यात स्वखर्चाने आयोजित केलेले मेळावे. अर्थातच राज्याचा आकार लक्षात घेता हे मेळावे एकाच ठिकाणी नाही तर अनेक ठिकाणी आयोजित केले जातात.त्यामुळे अनेकवचनी या अर्थी कॉकसेस असे लिहिले आहे. कॉकाय हा उच्चार ऐकलेला नाही.अमेरिकेत सर्व जगातून लोक येतात आणि प्रत्येक माणूस आपल्या मुळच्या ठिकाणची इंग्रजीची छाप घेऊन येतो.त्यामुळे काही लोक कॉकाय हा उच्चार करत असतीलही. (माझे अमेरिकन विद्यापीठातील अ‍ॅडव्हाजर दक्षिण भारतीय आहेत.ते अमेरिकेत कित्येक वर्षे राहत असूनही 'एम' ला 'यम' आणि 'एन' ला 'यन' आणि 'सर्किट' ला 'सर्क्युट' म्हणतात. असे उच्चार दक्षिण भारतात सर्रास ऐकायला मिळतात).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ग
गॅरी ट्रुमन Sat, 03/12/2016 - 18:25 नवीन
गेल्या काही दिवसांमधील घडामोडी: १. डॉ. बेन कार्सन यांनी रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यापासून माघार घेतली आहे. अर्थातच बेन कार्सन हे रिपब्लिकन पक्षाचे फार आघाडीचे दावेदार आहेत असे नाही त्यामुळे त्यांनी माघार घेतल्यामुळे फार उलथापालथ होईल अशातला भाग नाही. तरीही आणखी एक उमेदवार आता कमी झाला आहे. १५ फेब्रुवारीला महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी/कॉकसेस झाली की बहुदा जॉन कॅसिक आणि (कदाचित) मार्को रूबिओ हे सुध्दा माघार घेतील आणि शेवटी डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ हे दोन उमेदवार राहतील. बेन कार्सन यांना माघार घेतल्यानंतर डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आहे. २. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांची शुक्रवारी ११ मार्चला मायामी, फ्लॉरीडा येथे चर्चा झाली. एकूणच रिपब्लिकन पक्षाचा क्लायमेट चेंजवर विश्वास नाही. त्या चर्चेतही हेच प्रतिबिंब उमटले. विशेषत: डॉनल्ड ट्रम्प यांचा तर क्लायमेट चेंज या कल्पनेलाच विरोध आहे. जर क्लायमेट चेंजमुळे समुद्राची पातळी वाढली तर फ्लॉरीडा राज्याला विशेषत: मायामीला धोका उत्पन्न होऊ शकतो. नेमक्या त्याच ठिकाणी बोलताना क्लायमेट चेंजविरोधी भूमिका त्यांनी घेणे हे विशेष. अध्यक्ष बराक ओबामा पुढच्या आठवड्यात क्युबाच्या ऐतिहासिक भेटीवर हॅवानाला रवाना होणार आहेत. ही क्युबाला दिलेली गेल्या ८८ वर्षातील पहिली अमेरिकन अध्यक्षाची भेट असेल. डॉनल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक शैलीला अनुसरून त्यालाही विरोध केला आहे. ३. डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 03/13/2016 - 07:18 नवीन
डॉनल्ड ट्रम्प यांच्या शिकागोमधील सभेच्या वेळी ट्रम्प विरोधक आणि ट्रम्प समर्थक यांच्यात हाणामारी झाली आणि त्यातून ट्रम्प यांना आपली सभा रद्द करावी लागली.
हे ऐकून जरा गंंमत वाटली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हुप्प्या Wed, 03/16/2016 - 10:18 नवीन
रिपब्लिकन लोकांचे असे म्हणणे आहे की हवामान हे नित्य बदलत असते. त्यात नवीन काही नाही. गेली लाखो वर्षे हवामान बदलाची चक्रे फिरत आहेत. अनेक हिमयुगे आली आणि गेली. सध्याचा हवामान बदल हा तसाच आहे. त्यामागे मानवाचे कर्तृत्त्व नाही. प्रदूषण वगैरे गोष्टींमुळे हवामानावर परिणाम होतो. निदान स्थानिक पातळीवर तरी होतोच. त्याबाबतीत अमेरिकेने प्रयत्न करुन परिस्थिती सुधारली आहे. वाहने जास्त स्वच्छ, कमी प्रदूषण करणारी बनवली आहेत. मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. ह्या आणि अशा देशांच्या चुकीची शिक्षा अमेरिकेला का? जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार? म्हणून आमचा त्याला विरोध आहे असे रिपब्लिकन मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
निशदे Wed, 03/16/2016 - 18:32 नवीन
<< मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. >> याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही. <<जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. आणि एवढे करुन समुद्राची पातळी न वाढण्याची खात्री कोण देणार? >> याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
न
निशदे Wed, 03/16/2016 - 18:33 नवीन
"" मात्र भारत व चीनसारखे देश अफाट प्रदूषण करतात. त्यांच्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान कितीतरी मोठे आहे. "" याला काही विदा आहे का? मी आजपर्यंत जितके वाचले आहे त्यात चीन काही बाबतीत अमेरिकेच्या पुढे असला (total emissions) तरी अमेरिका अनेक बाबतीत आघाडीवर आहे(emissions per capita). भारत यात पहिल्या तिनातही(अजून तरी) नाही. "" जाचक हवामानविषयक कायदे, कार्बन कर वगैरे गोष्टींचा त्रास हा सामान्य अमेरिकन नागरिकांनाच होणार. त्यांच्या नोकर्‍या जाणार आणि खर्च वाढणार. "" याबाबतीत अंशतः सहमत. सरकारचा सहभाग आणखी वाढवणे हा यावरचा मार्ग अर्थातच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे
ब
बोका-ए-आझम Fri, 04/22/2016 - 06:31 नवीन
वाया गेलेल्या अन्नापासून होणारं प्रदूषण (वाया जाणारी ऊर्जा, नंतर विल्हेवाट लावताना खर्च होणारी ऊर्जा हे सगळं धरून) हे अमेरिका आणि चीनच्या खालोखाल ग्रीनहाऊस वायू वाढवणारा घटक आहे. लिंक मिळाली नाही. हा report कितपत खरा मानायचा ते माहित नाही. पण खुद्द अमेरिकेत अन्न वाया घालवण्याचं प्रमाण बरंच असावं असं वाटतं. आपण प्रदूषण म्हणजे फक्त खनिज किंवा जीवाष्म इंधन जाळण्याने होणारं प्रदूषण जर म्हणत असू, तर ती व्याख्या अजून व्यापक करायला हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निशदे
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/16/2016 - 06:05 नवीन
१२ मार्चला रिपब्लिकन पक्षाच्या डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबिया (डी.सी) आणि वायोमिंग राज्यात प्रायमरी झाल्या. त्याचे निकाल खालीलप्रमाणे table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }     रिपब्लिकन पक्ष   डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियावायोमिंग डॉनल्ड ट्रम्प01 टेड क्रुझ09 मार्को रूबिओ101 जॉन कॅसिक90 इतर00 एकूण1911 डिस्ट्रीक्ट ऑफ कोलंबियामध्ये मार्को रुबिओ आणि जॉन कॅसिक या उमेदवारांना यश मिळाले. एका अर्थी डी.सी ने इतर देशाविरूध्द कौल रिपब्लिकन प्रायमरीमध्ये दिला. अर्थातच डी.सी ने वेगळा कौल द्यायची ही पहिलीच वेळ नाही. इलेक्टोरल कॉलेजमध्ये प्रतिनिधित्व मिळाल्यापासून प्रत्येक वेळी डी.सी ने डेमॉक्रॅटिक पक्षाच्याच उमेदवारांना अध्यक्षीय निवडणुकांमध्ये विजयी केले आहे-- अगदी १९७२ मध्ये रिचर्ड निक्सन आणि १९८४ मध्ये रोनाल्ड रेगन आणि बर्‍याच अंशी १९८८ मध्ये थोरले जॉर्ज बुश या रिपब्लिकन उमेदवारांना लॅन्डस्लाईड विजय मिळालेला असतानाही. काल १५ मार्चला इतर काही राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या.त्याचे निकाल इथे थोडया वेळात पोस्ट करेन.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Wed, 03/16/2016 - 07:02 नवीन
दिल्लीने देशाच्या बरोबरीने लोकसभेत आणि एकदम विरूद्ध प्रकारे विधानसभेत कौल दिला. त्याची आठवण झाली हे वाचून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
निशदे Wed, 03/16/2016 - 18:35 नवीन
with a small difference............ दिल्लीच्या उदाहरणात संपूर्ण रा॑ज्याने मत दिले होते. इथे रिपब्लिकन्सने दिलेल्या मताचे निकाल आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ग
गॅरी ट्रुमन Wed, 03/16/2016 - 06:27 नवीन
काल १५ मार्चला फ्लॉरीडा, इलिनॉय, मिसॉरी, नॉर्थ कॅरोलायना आणि ओहायो या राज्यांमध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी झाल्या. त्यापैकी मिसॉरी राज्यात रिपब्लिकन प्रायमरीमध्ये जबरदस्त चुरस चालू आहे.हे लिहिताक्षणी डॉनल्ड ट्रम्प ०.१% मतांनी आघाडीवर आहेत. दुसर्‍या क्रमांकावर टेड क्रुझ आहेत. अजूनही काही मते मोजली जायची आहेत.आणि या राज्यात रिपब्लिकन पक्षाचा विजयी उमेदवार सर्व प्रतिनिधी मिळवत असल्यामुळे (विनर टेक्स ऑल) हे राज्य महत्वाचे आहे. इतर राज्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली नाही तरी आतापर्यंत मोजल्या गेलेल्या मतांवरून विविध न्यूज चॅनेल विजयी उमेदवार प्रोजेक्ट करतात.पण मिसॉरीमध्ये अजून कोणत्याही चॅनेलने नक्की कोण विजयी होणार हे प्रोजेक्ट केलेले नाही. तेव्हा तिथली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतरच निकाल पोस्ट करतो. इतर राज्यांमधील निकाल पुढीलप्रमाणे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }        रिपब्लिकन पक्ष    फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो डॉनल्ड ट्रम्प9924290 टेड क्रुझ00260 मार्को रूबिओ0050 जॉन कॅसिक00966 इतर0000 एकूण99246966               डेमॉक्रॅटिक पक्ष    फ्लॉरीडाइलिनॉयनॉर्थ कॅरोलायनाओहायो हिलरी क्लिंटन124685975 बर्नी सँडर्स60644254 एकूण184132101129 मार्को रुबिओ यांचा त्यांच्याच फ्लॉरीडा राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी पराभव केला.आणि तो पराभव १५% पेक्षा अधिक मतांनी केला. म्हणजे रूबिओ यांना त्यांच्याच राज्यात फारशी लढत देता आलेली दिसत नाही.या पराभवानंतर मार्को रूबिओ यांनी अध्यक्षीय निवडणुकांच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक यांनी त्यांच्या राज्यात विजय मिळवला आहे. दोन्ही पक्षांमधील डेलिगेटची आकडेवारी मिसॉरीचे निकाल आल्यानंतर त्याबरोबरच पोस्ट करतो.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 03/17/2016 - 14:09 नवीन
मिसॉरी राज्यात दोन्ही पक्षांच्या प्रायमरीमध्ये अत्यंत चुरस दिसून आली. दोन्ही पक्षांच्या विजयी उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन डॉनल्ड ट्रम्प) यांना अगदी थोडक्यात (सुमारे ०.२% मतांनी) विजय मिळाला. फॉक्स न्यूजने या राज्यातील निकाल खालीलप्रमाणे दिले आहेत (त्याबरोबरच एकूण प्रतिनिधीसंख्याही त्याच कोष्टकात देत आहे) table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8988; color: #FFF; font-weight: bold; }     रिपब्लिकन पक्ष   मिसॉरीआतापर्यंत डॉनल्ड ट्रम्प25673 टेड क्रुझ5411 मार्को रूबिओ0169 जॉन कॅसिक0143 इतर015 एकूण301411          डेमॉक्रॅटिक पक्ष   मिसॉरीआतापर्यंत हिलरी क्लिंटन321606 बर्नी सँडर्स32851 एकूण642457 तर डेमॉक्रॅटिक पक्षात प्रायमरीमधून आलेले डेलिगेट आणि इतर डेलिगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }      सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण हिलरी क्लिंटन46711391606 बर्नी सँडर्स26825851 एकूण49319642457 सध्याची परिस्थिती अशी आहे की डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी चांगलीच आघाडी घेतली आहे. त्यांना उमेद्वारी मिळायला फारसे जड जाऊ नये. अजून न्यू यॉर्क आणि कॅलिफॉर्निया या दोन मोठ्या राज्यांमधील प्रायमरी व्हायच्या आहेत.हिलरी स्वत: न्यू यॉर्क राज्यातून सिनेटवरही निवडून गेल्या होत्या आणि कॅलिफॉर्निया गेल्या अनेक निवडणुकांपासून डेमॉक्रॅटिक पक्षाचा अभेद्य बालेकिल्ला राहिला आहे.या दोन राज्यांमधून हिलरींना मात देणे सँडर्स यांना कठिणच जाईल. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प यांनी आघाडी घेतली असली तरी सध्याचे चित्र असे आहे की ते ५०% डेलिगेटपेक्षा थोडे मागे आहेत. त्यांना ५०% पेक्षा जास्त हक्काची मते मिळणार नसतील तर मात्र रिपब्लिकन पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकेल.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ गुरुवार, 03/17/2016 - 14:26 नवीन
हे असे पक्षांतर्गत निवडणूक घेणे कोणत्याच भारतीय राजकीय पक्षांबाबत का होत नाही?
  • Log in or register to post comments
न
नन्द्या Fri, 03/18/2016 - 00:16 नवीन
inenews हे काय आहे? त्यात कुणि प्रशांत कुमार याने लिहीले आहे की अमेरिकेतील भारतीय, ज्यात हिन्दू बहुसंख्य आहेत, त्यांचा ट्रंप ला पाठिंबा आहे. भारतातील भारतीयांचे काय मत आहे? प्रशांत कुमारच्या लेखात काहीतरी गैर वाटते. कारण माझ्या ओळखीचे कुणीच भारतीय किंवा अमेरिकन ट्रंपच्या बाजूचे नाहीत, अगदी रिपब्लिकनसुद्धा. शिवाय अगदी आवर्जून बहुसंख्य हिंदू लिहिण्याची काय गरज? जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे, जो आपल्या सभांमधे विरोधकांना ठोसे मारा, हाकलून द्या इ. बोलतो, तो भारतीयांना कसा पसंत असेल? अगदी अमेरिकन सुद्धा या मुद्द्यांशी सहमत नाहीत. आज मुसलमान, मेक्सिकन उद्या सरसकट चिनी जपानी भारतीय नकोत असे म्हणणार नाही कशावरून? लक्षात ठेवा, त्याने केकेके चा पाठिंबा नको असे म्हंटले पण तो केकेके विरोधी आहे असे स्पष्ट म्हणत नाही!
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/18/2016 - 09:12 नवीन
माझे अमेरिकेतील काही मित्र ट्रम्पच्या बाजूचे आहेत आणि काही ट्रम्पच्या विरोधात आहेत. ट्रम्प आम्ही अमुक करू, तमुक करू वगैरे बोलत असले तरी त्यापैकी किती गोष्टी प्रत्यक्षात करू शकतील हा प्रश्न आहेच. मेक्सिकोबरोबरच्या सीमेवर भिंत बांधू, अमेरिकन उद्योगांना अमेरिकेतच मॅनुफॅक्चरींग करायला सांगू वगैरे गोष्टी बोलायला सोप्या असल्या तरी करायला तितक्याच कठिण होतील. अगदी बराक ओबामाही बंगलोरमध्ये नाही तर बफेलो (न्यू यॉर्क राज्यातील शहर) मध्ये नोकर्‍या आणा असे म्हणालेच होते. त्याला अमेरिकन उद्योगांनीही विरोध केला होताच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्द्या
ह
हुप्प्या Fri, 03/18/2016 - 20:00 नवीन
एच १ बी हा व्हिसा वापरून उच्चशिक्षित परदेशस्थ अमेरिकेत येऊन नोकरी करू शकतात. यथावकाश ग्रीन कार्ड मिळवू शकतात. नागरिकही बनू शकतात. ट्रंपने ह्यावर काही काळ बंदी असावी असे मत व्यक्त केले आहे. माझे मत १. राजकारणी जी आश्वासने देतात विशेषत: प्रचारादरम्यान ती सगळी पाळली जातात असे नाही. २. ह्या व्हिशाच्या नावाखाली अनेक गैर प्रकार वेळोवेळी उघडकीस आले आहेत त्यामुळे हा मार्ग १००% सोवळा पवित्र नाही. ३. उच्च तंत्रज्ञानावर आधारित अनेक उद्योग अशा बंधनांना विरोध करतील ह्यात शंका नाही. कारण अशा बंदीमुळे ह्या उद्योगांची अडचण होईल. कुठलाही नेता अशा श्रीमंत लोकांना दुखावू इच्छित नाही. ४. ह्या दोन्ही टोकांच्या मधे कुठेतरी उपाय निघू शकेल. ह्या व्हिशावर पूर्ण बंदी न घालता त्यावर जास्त कठोर बंधने येणे शक्य आहे. जसे येणार्‍या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता जास्त तपासली जाणे शक्य आहे. नोकरी देणारा खरोखरच स्थानिक उमेदवार मिळवण्याचा प्रयत्न करतो का ते जास्त काटेकोरपणे तपासले जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ह
हुप्प्या Fri, 03/18/2016 - 19:26 नवीन
>> जो माणूस सरसकट मुसलमान व मेक्सिकन लोकांविरुद्ध आहे, जो एच वन बी व्हिसा मर्यादित करण्याच्या विरोधात आहे, हा अपप्रचार आहे. अत्यंत खोटा आहे. ट्रंप जे बोलला ते फक्त बेकायदेशीररित्या अमेरिकेत शिरणारे (मुख्यत:) मेक्सिकन लोकांविरुद्ध. कायदे पाळून येणार्‍यांविषयी तो काही बोललेला नाही. विरोधकांना घुसखोर लोकांकरता पायघड्या घालायच्या असतील तर आधी परदेशी लोकांना अमेरिकन सीमा कायद्याने खुल्या करून द्या. जोवर ह्या सीमा ओलांडण्याकरता कायदे, नियम आहेत तोपर्यंत ते पाळण्याचा आग्रह धरणार्‍याला चूक म्हणणे ही त्याहून मोठी घोडचूक आहे. मुसलमान लोकांबद्दल तो असे म्हणाला की परराष्ट्र खात्याचा कारभार नीट ठिकाणावर येईपर्यंत मुस्लिम लोकांना अमेरिकेत येऊ देऊ नका. हे सॅन बर्नार्डिनोच्या अतिरेकी हल्ल्यामुळे तो म्हणाला. हल्लेखोरातील स्त्री ही अत्यंत जहाल अतिरेकी विचाराची असून तिला व्हिसा का मिळाला असा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता. अब्जावधी डॉलर्स अमेरिकेच्या सुरक्षेवर खर्च होत असताना असे होत असेल तर कुठेतरी गडबड आहे. ही गडबड ठीक होईपर्यंत काहीतरी कठोर उपाय केले पाहिजेत ह्या दृष्टीने हा विचार मांडला गेला. हा टोकाचा वाटला तरी अनेक अमेरिकन लोकांना तो पटला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नन्द्या
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/18/2016 - 09:40 नवीन
मार्क डाईस हा अमेरिकेतील पत्रकार रस्त्यावर जाऊन लोकांना प्रश्न विचारतो आणि त्यातून अनेक लोकांना काहीच माहिती नसते ही गोष्ट लक्षात येते. मध्यंतरी त्याने एके ठिकाणी जाऊन काहींना "हिलरी क्लिंटन अध्यक्षपदी आल्यास त्या अमेरिकेत शरीया कायदा आणणार आहेत त्याला तुमचे समर्थन आहे का" असा प्रश्न विचारला. अर्थातच हिलरींनी असे काही आश्वासन दिलेलेच नाही. तरीही काही मतदारांनी "हो आमचे समर्थन आहे" किंवा "हिलरी असे काही करणार असतील ते योग्यच असेल" अशा स्वरूपाचे उत्तर दिले. त्याने हा व्हिडिओ युट्यूबवर टाकला आहे. व्हिडिओवरून हे ठिकाण एखादे पर्यटनस्थळ वाटत आहे. अर्थातच सर्व मतदार अशा स्वरूपाचे अज्ञानी असतात असे नाही तेव्हा या व्हिडिओला मनोरंजक व्हिडिओ म्हणून बघणे अधिक योग्य आहे.तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Fri, 03/18/2016 - 09:56 नवीन
ठ्ठो!! बिचारे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
आ
आनन्दा Fri, 03/18/2016 - 09:59 नवीन
तरीही काही भारतीयांना अमेरिकेतलेही सर्वसामान्य मतदार फार वेगळे नाहीत का हा प्रश्नही नक्कीच विचारावासा वाटेल.
ह्म्म.. मोदी म्हणतायत म्हणजे चूक नसणारच.. किंवा बाबाजी म्हणतायत म्हण्जे बरोबरच.. शेवटी सामान्य माणसाला त्या राजकारणाशी काहीही घेणेदेणे नसते. जाताजाता - मला खटकेलेली गोष्ट म्हणजे एकाही माणसाने शरीय लॉ म्हणजे काय हे विचारलेले नाही.. फक्त हिलरी करणार म्हणजे चांगलेच करणार असे समजून प्रश्न चक्क "उडवून" लावला गेलेला आहे. इतके आंधळे समर्थक वाईटच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ग
गॅरी ट्रुमन Fri, 03/18/2016 - 13:40 नवीन
यापुढे ८-१० दिवस बाहेरगावी जाणार आहे.त्यामुळे यानंतरचे अपडेट परत आल्यानंतरच देईन. दरम्यानच्या काळात पुढील घडामोडी होणार आहेतः मंगळवार, २२ मार्चः अ‍ॅरिझोनामध्ये दोन्ही पक्षांच्या प्रायमरी आणि युटा मध्ये दोन्ही पक्षांची कॉकसेस तर आयडॅहोमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस शनीवार, २६ मार्चः अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षाची कॉकसेस जाताना लॅपटॉप घेऊन जाणार आहे तेव्हा अगदीच काही महत्वाचे घडले तर त्याचे अपडेट देता येतील.तसेच फोनवरूनही मिपावर लॉगिन होणारच आहे.पण फोनवरून टाईप करणे कठिण असल्यामुळे केवळ नवे मुद्दे आल्यास वाचण्यापुरताच त्याचा उपयोग करेन.
  • Log in or register to post comments
ह
हुप्प्या Fri, 03/18/2016 - 20:06 नवीन
बेकायदा घुसखोरी, जिहादी अतिरेकी ह्या समस्या आहेत हे कुणी नाकारू नये. पण बहुतेक अमेरिकन पुढारी ह्या नसल्यासारखे वागतात. ओबामा, हिलरी वगैरे अतिरेकी इस्लामी नाहीतच वगैरे छान छान बोलून त्या अतिरेकाच्या धार्मिक पैलूकडे दुर्लक्ष करणे आपले कर्तव्य समजतात. बेकायदा घुसखोरी थांबवली पाहिजे असे स्पष्ट म्हणतही नाहीत. ज्यांचे बोलणेच इतके बोटचेपे असेल त्यांच्याकडून कारवाईची काडीचीही अपेक्षा करता येत नाही. ट्रंपसारखे लोक निदान आक्रमक भूमिका मांडतात तरी. अनेक अमेरिकन नागरिकांना ह्या समस्यांचे शर्करावगुंठन करणे नको झाले आहे. ह्या विरुद्ध आक्रमक बोलणारे बोलतात त्याच्या १००% टक्के नाही तरी निदान १०% तरी काम अशी आशा लोकांना वाटत आहे. ज्यांच्या आडातच असे विचार नाहीत त्यांच्या पोहर्‍यात कुठून येणार?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Tue, 03/22/2016 - 06:41 नवीन
Republican donors finally unite, against Trump http://timesofindia.indiatimes.com/world/us/Republican-donors-finally-unite-against-Trump/articleshow/51504692.cms via @timesofindia
  • Log in or register to post comments
व
विशाखा पाटील Tue, 03/22/2016 - 13:53 नवीन
ट्रम्पकडे स्वत:चाच खूप पैसा आहे भाऊ :) पण रिपब्लिकन पक्षात अस्वस्थता आहे. उद्या चार राज्यांचे निकाल येतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ध
धर्मराजमुटके Fri, 03/25/2016 - 08:33 नवीन
मला वाटले असे प्रकार फक्त भारतातच होतात की काय ? मटा ऑनलाइन वृत्त । वॉशिंग्टन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळावी म्हणून रिपब्लिकन पक्षातील राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. पक्षात उमेदवारीचे प्रबळ दावेदार मानले जाणारे डोनाल्ड ट्रम्प आणि टेड क्रूझ या दोघांच्याही समर्थकांची एकमेकांवर चिखलफेक सुरू असून आता तर ट्रम्प यांची पत्नी मलेनिया यांचा मॉडेलिंग करत असतानाचा १६ वर्षांपूर्वीचा न्यूड फोटो 'व्हायरल' करण्यात आला आहे. या प्रकाराने ट्रम्प चांगलेच भडकले आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी शोमन Fri, 03/25/2016 - 10:51 नवीन
(CNN)Republican presidential front-runner Donald Trump called Monday for barring all Muslims from entering the United States. "Donald J. Trump is calling for a total and complete shutdown of Muslims entering the United States until our country's representatives can figure out what is going on," a campaign press release said. हे ट्रंप कार्ड डोनाल्ड ट्रंप खेळले आहेत. अतिरेक्यांना धर्म नसतो हे वाक्य टाळ्या घेऊन जाते पण आपले नातेवाईक अतिरेक्यांच्या कारवाईत मारले गेले म्हणजे समजते की अतिरेकी कोणत्या धर्माचे आहेत. मला वाटत हा मुद्दा कदाचित अमेरीकेच्या सार्वत्रीक निवडणुकात कळीचा ठरावा.
  • Log in or register to post comments
D
DEADPOOL Fri, 03/25/2016 - 11:48 नवीन
गॅरी ट्रुमन सर ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/29/2016 - 17:33 नवीन
ट्र्म्प ला उमेदवारी न मिळण्याचे किती चान्सस आहेत?
जर सगळ्या प्रायमरी आणि कॉकसेसमध्ये मिळून डॉनाल्ड ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन असेल तर पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी मतदान घ्यायची वेळ येऊ शकते. ओहायोचे गव्हर्नर जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत. त्यांना १४३ प्रतिनिधींचे समर्थन मिळाले आहे.तर फ्लॉरीडाचे सीनेटर मार्को रूबिओ यांना त्यापेक्षा जास्त प्रतिनिधींचे समर्थन असूनही त्यांनी माघार घेतली आहे. मला वाटते की जॉन कॅसिक अजूनही शर्यतीत आहेत याचे कारण इतर राज्यांमधून जितके मिळतील तितके प्रतिनिधी मिळवायचे आणि ते प्रतिनिधी ट्रम्प यांना जाऊ द्यायचे नाहीत. पक्षाच्या अधिवेशनात मतदानाची वेळ आल्यास हे प्रतिनिधी ट्रम्पविरोधी मते द्यायला हाताशी येतील.मार्को रूबिओ यांचा तर त्यांच्याच राज्यात, फ्लॉरीडात पराभव झाला.त्यामुळे त्यांना शर्यतीत टिकून राहणे प्रशस्त राहिले नाही आणि माघार घेणे भाग पडले.पण जॉन कॅसिक यांनी त्यांच्या ओहायो राज्यात विजय मिळवला आहे त्यामुळे त्यांना या कारणासाठी अधिक काळ शर्यतीत टिकून राहायला अडचण नसावी. सध्याचे प्रायमरीचे गणित असे आहे की कॅसिक यांनी अजून मतदान न झालेल्या सगळ्या राज्यातील सगळे प्रतिनिधी जिंकले तरी ते ५०% पर्यंत पोहोचू शकत नाहीत. अशावेळी खरे तर त्यांनी माघार घ्यायला हवी. तरी ते शर्यतीत टिकून आहेत याचा उद्देश ट्रम्प यांचे समर्थन जितके कमी करता येईल तितके करावे हा असावा असे दिसत आहे. १९६८ च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये रिचर्ड निक्सन (ज्यांना पुढे उमेदवादी मिळाली) आणि रॉनाल्ड रेगन यांच्यात अगदी अटीतटीचा सामना होता. रेगन थोडेसे आघाडीवर होते पण कोणत्याच उमेदवाराला ५०% समर्थन नव्हते. अशावेळी पक्षाच्या मायामी बीच, फ्लॉरीडा येथील अधिवेशनात मतदान झाले. तिसरे उमेदवार नेल्सन रॉकफेलर आणि रेगन या दोघांचाही उद्देश निक्सनना रोखणे होता. पण या दोघांनीही उमेदवारीवर दावा सांगितला आणि त्यातून दोघांचे भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असे होऊन रिचर्ड निक्सन यांनाच उमेदवारी मिळाली. २०१६ मध्ये समजा तशीच वेळ आली तर टेड क्रुझ यांचा उमेदवारीवरचा दावा जॉन कॅसिक यांच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रबळ आहे त्यामुळे निक्सनप्रमाणे ट्रम्प उमेदवारी पटकावतील असे वाटत नाही. पुढे १९७६ मध्येही रॉनाल्ड रेगन यांचा पक्षाच्या कॅन्सस सिटी, मिसॉरी येथील अधिवेशनात परत एकदा थोडक्यात पराभव झाला आणि उमेदवारी अध्यक्ष जेराल्ड फोर्ड यांना मिळाली. तरीही रेगन यांनी हिंमत न हारता १९८० मध्ये परत एकदा प्रायमरीमध्ये उडी घेतली आणि उमेदवारी आणि त्यानंतर ८ वर्षे अध्यक्षपदही मिळवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
D
DEADPOOL Tue, 03/29/2016 - 17:55 नवीन
THANK YOU
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
भ
भाऊंचे भाऊ Sat, 03/26/2016 - 05:42 नवीन
एकदम सनी लिओनि सारखा बिंधास्त अन वास्तविकतेची प्रांजळपणाशी उघड सांगड राखणारा... हां सत्तेवर आला तर मजाच येइल. हिलरी न बोलूं शाहणी आहे... विशेषता भारताबाबत
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/29/2016 - 17:10 नवीन
२२ मार्चला अ‍ॅरिझोना, आयडॅहो आणि युटा राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षांच्या तर अ‍ॅरिझोना आणि युटा राज्यांमध्ये रिपब्लिकन पक्षांच्या प्रायमरी झाल्या. तर २६ मार्चला डेमॉक्रॅटिक पक्षांच्या अलास्का, हवाई आणि वॉशिंग्टन राज्यांमध्ये प्रायमरी झाल्या. या प्रायमरीचे निकाल पुढीलप्रमाणे लागले-- table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }            डेमॉक्रॅटिक पक्ष      अ‍ॅरिझोनायुटाआयडॅहोअलास्काहवाईवॉशिंग्टनआतापर्यंत हिलरी क्लिंटन44653891712 बर्नी सॅंडर्स3026171317251004 एकूण7432221625342716             रिपब्लिकन पक्ष      अ‍ॅरिझोनायुटा    आतापर्यंत डॉनल्ड ट्रम्प580    739 टेड क्रुझ040    465 जॉन कॅसिक00    143 इतर00    181 एकूण5840    1528 तर डेमॉक्रॅटिक पक्षात डेलिगेटची स्थिती पुढीलप्रमाणे आहे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }      सुपर डेलीगेटअन्य डेलीगेटएकूण हिलरी क्लिंटन46912431712 बर्नी सॅंडर्स299751004 एकूण49822182716 डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी या ६ पैकी ५ राज्यांमधील प्रायमरी जिंकल्या.असे असले तरी सँडर्स यांनी जिंकलेली राज्ये त्या मानाने विरळ लोकसंख्येची आणि म्हणून निवडणुकांमध्ये कमी महत्वाची आहेत (अलास्का, हवाई, आयडॅहो इत्यादी). सँडर्स यांनी म्हटले की देशाच्या दक्षिण भागातील अधिक कॉन्झर्व्हेटिव्ह राज्यांमध्ये पराभव होणार याची कल्पना होती पण वॉशिंग्टन, अलास्का सारख्या पश्चिमेकडील उदारमतवादी राज्यांमध्ये विजय होणे हे त्यांच्यासाठी चांगले चिन्ह आहे. सध्या तरी हिलरी क्लिंटन सुपरडेलीगेटच्या समर्थनामुळे चांगल्याच आघाडीवर आहेत.पण अर्थातच सुपरडेलीगेटना पक्षाच्या अधिवेशनाच्या वेळी आपले मत बदलायचा अधिकार आहे. जर सँडर्स यांनी कॅलिफॉर्निया, न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया सारखी मोठी (आणि दक्षिणेतील त्यांच्यासाठीच्या कमकुवत क्षेत्रात नसलेली) राज्ये जिंकली तर मात्र सँडर्स या प्रायमरीमध्ये अजून रंगत आणू शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी युटा राज्य जिंकून रंगत आणली आहे.जर ट्रम्प यांना ५०% पेक्षा कमी प्रतिनिधींचे समर्थन मिळाले तर मात्र पक्षाच्या अधिवेशनात मतदान घ्यायची वेळ येऊ शकते. एप्रिलमध्ये न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, मेरीलँड, विस्कॉन्सिन आणि कनेक्टिकट या अधिक मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत. एप्रिलअखेरपर्यंत चित्र आणखी स्पष्ट व्हायला हवे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 03/29/2016 - 18:55 नवीन
थोडेसे अवांतरः डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी अधिक चांगली असते असा दावा केला जातो. हिलरी क्लिंटन यांनीही तोच दावा केला . याविषयी प्रिन्सटन विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक अ‍ॅलन ब्लाईंडर आणि मार्क वॉटसन यांनी एप्रिल २०१६ च्या American Economic Review या जर्नलमध्ये "Presidents and the US Economy: An Econometric Exploration" हा पेपर लिहिला आहे. या पेपरसाठी त्यांनी अमेरिकन अर्थव्यवस्थेचा १९४७ पासून ओबामांच्या पहिल्या टर्मपर्यंतचा अभ्यास केला आहे. हा सगळा पेपर वाचून आणि समजून झालेला नाही कारण त्यातील Econometrics च्या सगळ्या संज्ञा मला माहित नाहीत आणि त्या गोष्टी समजावून घ्यायला वेळ लागत आहे. पण जे काही वाचले आहे त्यावरून गोषवारा समजला की डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेचा वाढीचा सरासरी दर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असताना असलेल्या अमेरिकन अर्थव्यस्थेचा वाढीच्या सरासरी दरापेक्षा तब्बल १.७९% ने जास्त आहे (४.३३% विरूध्द २.५४%). यामागचे कारण काय असावे याचा अभ्यास लेखकांनी केला. त्यांच्या अनुमानातील मला समजलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे: १. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना तेलाचे भाव कमी राहिले आहेत. त्याचा फायदा अमेरिकन अर्थव्यवस्थेला झाला. १.७९% फरकापैकी सुमारे ०.५०% म्हणजे जवळपास २८% फरक यामुळे पडतो. २. डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना Total Factor Productivity मध्ये झालेली वाढ रिपब्लिकन अध्यक्ष असताना झालेल्या वाढीपेक्षा जास्त होती. यामुळे १.७९% फरकापैकी आणखी ०.५% म्हणजे जवळपास २८% फरक पडतो. (यावर माझी टिप्पणी: या वाढीमागे अध्यक्षांच्या धोरणांचा हात असेलच असे नाही. ही वाढ शास्त्रीय प्रगती किंवा अमेरिकेत ज्याला disruptive technology म्हटले जाते त्यामुळे होते.) ३. या काळात अमेरिकेचा कोरिया, व्हिएटनाम, पहिले आणि दुसरे इराक युध्द आणि अफगाणिस्तानमधील युध्द याच्यात प्रत्यक्ष सहभाग होता. युध्दाच्या वेळी सरकारचा संरक्षणावरील खर्च वाढतो आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळते तर युध्द थांबले की हा संरक्षणावरील सरकारी खर्च कमी होतो आणि अर्थव्यवस्था मंदावते. कोरिअन युध्द हॅरी ट्रुमन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना सुरू झाले तर ड्वाईट आयसेनहॉवर (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. व्हिएटनाम युध्द लिंडन जॉन्सन (डेमॉक्रॅटिक) अध्यक्ष असताना अधिक भडकले तर रिचर्ड निक्सन (रिपब्लिकन) अध्यक्ष असताना संपले. पहिले इराक युध्द इतके मोठे नव्हते त्यामुळे त्याचा इतका फरक पडायला नको. इराकमधील अमेरिकन सैन्याची बरीचशी involvement रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश अध्यक्ष असतानाच संपली होती तर अफगाणिस्तानातील चालू होती. सांगायचा मुद्दा म्हणजे मोठ्या युध्दांची समाप्ती रिपब्लिकन अध्यक्ष असताना अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली. १.७९% पैकी आणखी ०.२१% फरक (जवळपास १२%) यामुळे पडतो. ४. मोनेटरी पॉलिसी ठरविणारे अमेरिकन फेडचे चेअरमन रिपब्लिकन अध्यक्ष असताना थोडे hawkish होते आणि व्याजाचे दर जास्त ठेवण्याकडे त्यांचा कल होता. त्याचाही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. डेमॉक्रॅटिक अध्यक्ष जिमी कार्टर यांनी नियुक्त केलेले पॉल व्होल्कर हे त्यातील सर्वात hawkish होते. किंबहुना त्या कारणासाठी रिपब्लिकन अध्यक्ष रॉनाल्ड रेगन यांचे त्यांच्याशी संबंध फार चांगले नव्हते. या कारणामुळे १.७९% पैकी साधारण ०.२३% ते ०.३२% म्हणजे आणखी १३-१४% फरक पडतो. (तर इतर काही संशोधनाप्रमाणे या घटकाचा विशेष फरक पडत नाही) तेव्हा एकूण १.७९% फरकापैकी किमान ६८% फरक या कारणांमुळे पडतो. म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला. या पेपरचे २०१४ मधील जुने व्हर्जन National Bureau of Economic Research च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पण या संकेतस्थळावरील बहुसंख्य पेपरचे formating चांगले नसते त्यामुळे शक्यतो मी तिथून पेपर वाचणे टाळतो. American Economic Review च्या संकेतस्थळावरून पेपर वाचायचा असेल तर मात्र subscription असणे गरजेचे आहे. यापुढील माझी टिप्पणी: २००८-०९ च्या संकटासाठी रिपब्लिकन जॉर्ज डब्लू बुश यांचे प्रशासन पूर्णपणे जबाबदार होते का? खरे तर Fannie Mae आणि Freddie Mac वर सबप्राईम कर्जांनाही securitization मध्ये समाविष्ट करावे हा दबाव डेमॉक्रॅटिक बिल क्लिंटन अध्यक्ष असतानाही होता. इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच. बाकी CDO, Credit Default Swaps वगैरे भानगडींसाठी सरकारपेक्षाही खाजगी क्षेत्राची अधिक जबाबदारी होती. या सगळ्या प्रकाराचे परिणाम बुश अध्यक्ष असताना दिसले तरी त्यासाठी बुश हेच १००% जबाबदार होते असे म्हणता येईल असे मला तरी वाटत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अर्धवटराव Tue, 03/29/2016 - 22:49 नवीन
तुमचा व्यवसाय काय म्हणायचा ? नोकरी वगैरे करत असाल तर ताबडतोब राजीनामा देऊन स्वतःचा बिझनेस सुरु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
न
नंदन Wed, 03/30/2016 - 02:24 नवीन
म्हणजे डेमॉक्रॅटिक पक्षाचे अध्यक्ष असताना अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली असली तरी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेची कामगिरी चांगली होते असे म्हणता येणार नाही असा या पेपरचा आशय वाटला.
बव्हंशी सहमत आहे. रिपब्लिकन पक्षाची धोरणं एरवी कितीही रेसिस्ट, मिसॉजनिस्ट (स्त्री-द्वेष्टी), होमोफोबिक, आक्रस्ताळी असली; तरी त्यांची आर्थिक धोरणं अधिक सरस आहेत; असा एक बचावात्मक पवित्रा काही लोक घेताना दिसतात. त्या पार्श्वभूमीवर हे आकडे आणि विवेचन उल्लेखनीय आहे. ओबामाच्या दुसर्‍या टर्ममधले आकडे यात धरले, तर टक्केवारी डेमोक्रॅट्सच्या बाजूने अजून झुकेल.
इतकेच नव्हे तर विविध आर्थिक संस्थांना एकाच छत्राखाली असायला बंदी असलेला Glass-Steagal Act क्लिंटन अध्यक्ष असताना रद्द केला गेला होता. वाढत्या विषमतेविरूध्द लोकांनी तक्रार करू नये यासाठी सामान्य लोकांना गृहकर्ज स्वस्तात उपलब्ध करून देऊन स्वत:चे घर होणे--अर्थातच American dream जगता येणे ती अफूची गोळी (palliative) बुश यांनी दिली तशी बिल क्लिंटन यांनीही दिलीच
+१ 'बिल क्लिंटन वॉज द बेस्ट रिपब्लिकन प्रेसिडेंट एव्हर!' या विनोदात तथ्य आहेच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
मदनबाण Tue, 04/05/2016 - 01:32 नवीन
अपडेट :- Bernie Sanders Continues To Dominate Caucuses, But He’s About To Run Out Of Them Sanders: 'We are going to win New York' आता एक प्रश्न :- Why the major media fail to see how Bernie Sanders can win या प्रश्नाचे "खरे" उत्तर इथे मिळेल :- These 6 Corporations Control 90% Of The Media In America मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी का नजर भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/05/2016 - 01:41 नवीन
एक लिंक ध्यायची राहिलीच की... Clinton, Trump both losing to Sanders and Cruz in Wisconsin – polls मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/05/2016 - 13:30 नवीन
धन्यवाद मदनबाण. एकूणच अमेरिकेत आपला पक्ष सत्तेत नसताना कॉर्पोरेटमध्ये जायचे आणि पक्ष सत्तेत आल्यावर सरकारमध्ये जायचे हे प्रकार अगदी सर्रास चालतात. उदाहरणार्थः १. हेनरी पॉलसन: जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या मंत्रीमंडळातील २००६ ते २००९ या काळातील अर्थमंत्री त्यापूर्वीची ७ वर्षे गोल्डमन सॅक्सचे सी.ई.ओ होते. २००८ च्या संकटात लेहमन ब्रदर्सला बुडीतखाती जाऊन देऊन आर्थिक संकट त्यांनी अधिक गंभीर केले असा आरोप केला जातो. आणि लेहमन बुडायला हेनरी पॉलसनला का हवी होती? कारण इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगमध्ये गोल्डमन सॅक्स आणि लेहमन ब्रदर्स या कंपन्या प्रतिस्पर्धी होत्या. खरेखोटे तो भगवंत, बुशबाबा आणि हेनरी पॉलसनच जाणोत. २. डॉनल्ड रम्सफेल्डः इराक युध्दामुळे बदनाम झालेले डॉनल्ड रम्सफेल्ड हे १९६२ ते १९७७ या काळात सरकारमध्ये होते. जेराल्ड फोर्ड यांच्या मंत्रीमंडळात ते संरक्षणमंत्री होते. पुढे १९७७ ते २००० या काळात कॉर्पोरेटमध्ये होते.या काळात ते जी.डी.सर्ल या औषधकंपनीचे सी.ई.ओ होते.२००१ ते २००६ या काळात ते जॉर्ज डब्ल्यू. बुश यांच्या मंत्रीमंडळात परत एकदा संरक्षणमंत्री होते. ३. डिक चेनी: डिक चेनी हे जेराल्ड फोर्ड यांच्या कारकिर्दीत चीफ ऑफ स्टाफ, थोरल्या जॉर्ज बुश यांच्या मंत्रीमंडळात संरक्षणमंत्री आणि जॉर्ज डब्लू बुश यांचे उपाध्यक्ष होते. मधल्या काळात बिल क्लिंटन अध्यक्ष असताना हॅलीबर्टन या तलकंपनीचे सी.ई.ओ होते.या कंपनीला फायदा व्हावा म्हणून इराकवर हल्ला करण्यात आला असाही आरोप केला जातो. ४. लॉईड बेन्टसेनः बिल क्लिंटन यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होण्यापूर्वी हे विविध विमा आणि तेल कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर होते. असे इतरही अनेक व्यक्तींविषयी लिहिता येईल. त्यामुळे सरकारवर कॉर्पोरेटचा प्रभाव असणे ही गोष्ट ओघाने आलीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
म
मदनबाण Tue, 04/05/2016 - 03:07 नवीन
अमेरिकेत १} वॉल स्ट्रीट २ } मिलेटरी सिक्युरिटी कॉप्लॅक्स आणि ३ री आणि सर्वात पॉवरफुल असलेली इजरायल लॉबी यावेळी कोण्याचा मागे आहे ? Here's Why AIPAC and the Israel Lobby Will Be Critical to 2016 Elections मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 04/05/2016 - 03:21 नवीन
Jewish Son-in-law Kushner Guided Trump's Triumphant AIPAC Speech मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- कधी कधी नजर का भिजते... :- इरादा पक्का
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
व
विशाखा पाटील Tue, 04/05/2016 - 05:37 नवीन
वॉल स्ट्रीट हिलरी क्लिंटन यांच्या मागे आहे, असे बर्नी सॅंडर्स म्हणतात. ते खरेही असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/05/2016 - 13:46 नवीन
बर्नी सँडर्स यांचा वॉल स्ट्रीटला विरोध आहे त्यामुळे वॉल स्ट्रीटचा त्यांना विरोध आहे. मी आर्थिक दृष्ट्या बराच उजवा असलो तरी वॉल स्ट्रीटवरील पैशाच्या मागे धाऊन जे किळसवाणे प्रकार चालतात त्याला मात्र माझा विरोधच आहे.माझ्या काही मित्रांनी २०१० मध्ये बार्कलेजच्या इन्व्हेस्टमेन्ट बँकिंगच्या कॅपिटल मार्केट्स डिव्हिजनमध्ये न्यू यॉर्कमध्ये समर इंटर्नशीप केली होती.बार्कलेजने लेहमन ब्रदर्सचा अमेरिकेतील कारभार टेक-ओव्हर केला होता त्यामुळे माझ्या मित्रांच्या डेस्कवर मुळातले लेहमन मधले ट्रेडर्स होते.त्यातले अनेक त्या सीडीओ आणि तत्सम प्रकारांमध्येही होतेच. मान्य आहे की २००८-०९ च्या संकटाला कोणी एक व्यक्ती किंवा संघटना जबाबदार नव्हती. सरकारपासून फेड (विशेषतः ग्रीनस्पॅन), रेटिंग एजन्सीज इत्यादी इत्यादी अनेक पातळ्यांवर अपयश आले होते.पण जर अपयश अनेक पातळ्यांवर आले असेल तर त्याची जबाबदारीही अनेक पातळ्यांवरच स्विकारली गेली पाहिजे. प्रत्येक माणूस/संस्था एकदुसर्याकडे बोट दाखवायला लागले तर ते योग्य नाही. असो. तर सांगायचा मुद्दा हा की या मुळातल्या लेहमनमधील ट्रेडर्सना जगाला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले त्यात आपलाही काही वाटा होता याची अजिबात खंत नव्हती. वॉल स्ट्रीटवरील मनी माईंडेडनेसच्या अनेक कहाण्या माझ्या मित्रांकडून मी ऐकल्या आहेत.जिथे कुठे पैसे दिसतील तिथे हे लोक हात घालतात. सगळे जग खड्ड्यात गेले तरी चालेल, मला गलेलठ्ठ बोनस हवा, मला भरपूर पगार हवा असा काहीसा शिसारी आणणारा दृष्टीकोन यांचा असतो. २००८ मध्ये करदात्यांच्या पैशातून यांना बेल आऊट दिले आणि इतके मोठे संकट आलेले असतानाही त्याच करदात्यांच्या पैशातून बोनस घेण्यातही त्यांना काही गैर वाटले नव्हते. बर्नी सँडर्स यांच्या काही योजनांमुळे (विशेषतः मिनिमम वेज वाढविणे) तोटा होईल असे मला वाटते.पण ते किंवा जो कोणी अध्यक्ष बनेल त्या/तीने या वॉल स्ट्रीट वाल्यांच्या माजाला काही प्रमाणात तरी अटकाव घालावा असे फार वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशाखा पाटील
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/05/2016 - 12:57 नवीन
नेवाडा राज्यातील कॉकसेसमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे फिलाडेल्फियातील जुलैमधील अधिवेशनासाठी प्रतिनिधी निवडायची प्रक्रीया थोडी गुंतागुंतीची आहे. राज्यातून एकूण ४३ प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. त्यापैकी २३ प्रतिनिधी फेब्रुवारीमधील कॉकसेसमधून निवडले गेले. या प्रतिनिधींना डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेट म्हणतात. या डिस्ट्रीक्ट लेव्हल डेलिगेटपैकी १३ हिलरींनी जिंकले तर १० सँडर्स यांनी जिंकले.उरलेल्या २० प्रतिनिधींपैकी ८ सुपर डेलीगेट आहेत (आजी-माजी सिनेटर आणि हाऊस ऑफ रेप्रेझेन्टेटिव्हजचे सदस्य). तर १२ प्रतिनिधी आणखी दोन पातळ्यांमधून निवडले जातात. फेबुवारीतील कॉकसेसमध्ये सहभागी झालेल्या मतदारांनी त्यांच्यातून १२,२३३ प्रतिनिधी निवडले. हे प्रतिनिधी काऊंटी लेव्हल संमेलनासाठी एकत्र येतात. या प्रतिनिधींमधून आणखी लहान गट निवडला जातो आणि हा गट मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडला जातो. हे राज्यस्तरीय संमेलनासाठी निवडले गेलेले प्रतिनिधी शेवटी उरलेले १२ प्रतिनिधी निवडतात जे जुलैमध्ये फिलाडेल्फियातील पक्षाच्या अधिवेशनात हिलरी किंवा बर्नी सँडर्स यांच्या बाजूने मतदान करतील. एकूणच नेवाडा राज्यातील कॉकसेसची प्रक्रीया बरीच गुंतागुंतीची आहे. यातील मेख अशी की काऊंटी लेव्हल संमेलनासाठी निवडले गेलेले १२,२३३ प्रतिनिधी या काऊंटी लेव्हल संमेलनात आपले मत बदलू शकतात. या १२,२३३ पैकी हिलरींनी जिंकलेले बहुसंख्य प्रतिनिधी परवा झालेल्या काऊंटी लेव्हल संमेलनासाठी गैरहजर राहिले. त्यातून झाले असे की काऊंटी लेव्हल संमेलनात बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे २,९६४ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे २,३८६ प्रतिनिधी उपस्थित राहिले. त्यामुळे मे महिन्यातील राज्यस्तरीय संमेलनासाठी बर्नी सँडर्स यांच्या बाजूचे १,६१३ तर हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे १,२९८ प्रतिनिधी उपस्थित राहू शकतील. शक्यता आहे की यातून नेवाडा राज्यातील बर्नी सँडर्स यांना हिलरींपेक्षा एखाद-दोन प्रतिनिधी जास्तही मिळू शकतील. सध्या तरी हिलरींची आघाडी बरीच मोठी आहे.त्यामुळे एखाद दोन प्रतिनिधी सँडर्स यांच्या बाजूला गेल्यामुळे फार फरक पडायचा नाही. तरीही हिलरींच्या बाजूचे बहुसंख्य प्रतिनिधी अनुपस्थित राहणे हे हिलरींच्या प्रचारातील उणीवा नक्कीच दर्शविते. २००८ मध्येही हिलरींना हाच अनुभव आला होता. फेब्रुवारीतील कॉकसेसमध्ये जास्त मते मिळूनही शेवटी बराक ओबामांना अधिक प्रतिनिधी मिळाले.हा अनुभव लक्षात घेता हिलरींनी थोडी अधिक काळजी घ्यायला पाहिजे होती असे दिसते.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Tue, 04/05/2016 - 13:14 नवीन
एप्रिल महिन्यात पुढील राज्यात प्रायमरी होणार आहेतः ५ एप्रिलः विस्कॉन्सिन ९ एप्रिलः वायोमिंग (फक्त डेमॉक्रॅटिक पक्षाची प्रायमरी) १९ एप्रिलः न्यू यॉर्क २६ एप्रिलः कनेक्टिकट, डेलावेअर, मेरीलँड, र्‍होड आयलंड आणि पेन्सिल्व्हेनिया भाप्रवे उद्यापर्यंत विस्कॉन्सिन प्रायमरीचे निकाल येतील. निकाल आल्यावर इथे पोस्ट करेनच. सध्या तरी जनमत चाचण्यांप्रमाणे डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ आघाडीवर आहेत. विस्कॉन्सिनमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांचा पराभव झाल्यास रिपब्लिकन पक्षात आणखी चुरस निर्माण होईल. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींची आघाडी बरीच जास्त आहे तसेच न्यू यॉर्क आणि पेन्सिल्व्हेनिया या पूर्वेकडील राज्यांमधून त्यांचा पराभव होणे कठिण वाटत आहे त्यामुळे डेमॉक्रॅटिक उमेदवार हिलरीच असतील असे चित्र या क्षणी तरी आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/06/2016 - 07:46 नवीन
विस्कॉन्सिन राज्यातील प्रायमरीचे निकाल-- या राज्यात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीवर असलेल्या (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला आहे. तर डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांचा विजय झाला आहे.दोन्ही विजयी उमेदवारांनी १३% चे घसघशीत मताधिक्य घेतले आहे. इथे दिलेल्या नकाशावरून कळेल की डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांनी राज्याच्या सर्वच भागात विजय मिळवला आहे.राज्यात अधिक लोकसंख्येची शहरे दोन---मिलवॉकी आणि मेडिसन.त्यापैकी मिलवॉकीमध्ये हिलरींना ४% ने म्हणजे त्यामानाने थोडक्यात विजय मिळाला आहे तर मेडिसन मध्ये सॅंडर्स यांना २५% ने आरामात विजय मिळाला आहे. राज्याचे इतर भाग तुरळक लोकवस्तीचे आहेत.तिथेही सँडर्स यांनी विजय मिळवला आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स यांना ४५ आणि हिलरींना ३१ तर रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ यांना ३३ तर डॉनल्ड ट्रम्प यांना ३ प्रतिनिधी मिळाले आहेत. आतापर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }     रिपब्लिकन पक्ष   विस्कॉन्सिनआतापर्यंत डॉनल्ड ट्रम्प3740 टेड क्रुझ33514 जॉन कॅसिक0143 इतर0188 एकूण361585          डेमॉक्रॅटिक पक्ष   विस्कॉन्सिनआतापर्यंत हिलरी क्लिंटन311743 बर्नी सँडर्स451056 एकूण762799 तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपर डेलीगेट आणि अन्य डेलीगेट यांची आकडेवारी पुढीलप्रमाणे: table.tableizer-table { font-size: 12px; border: 1px solid #CCC; font-family: Arial, Helvetica, sans-serif; } .tableizer-table td { padding: 4px; margin: 3px; border: 1px solid #CCC; } .tableizer-table th { background-color: #8B8B8B; color: #FFF; font-weight: bold; }      सुपर डेलीगेटअन्य डेलिगेटएकूण हिलरी क्लिंटन46912741743 बर्नी सँडर्स3110251056 एकूण50022992799 निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये हिलरींची आघाडी आता बरीच कमी झाली आहे.पण त्यांच्यामागे डेमॉक्रॅटिक पक्षाची संघटना आणि सुपरडेलीगेट आहेत असे सध्याचे चित्र आहे.तिथे बर्नी सँडर्स बरेच मागे आहेत.पण सुपर डेलीगेट आपले मत बदलू शकतात त्यामुळे जर बर्नी सँडर्स यांनी न्यू यॉर्क, कॅलिफॉर्निया यासारखी मोठी राज्ये जिंकली तर कदाचित काही सुपरडेलीगेट त्यांच्या बाजूला जाऊ शकतील. रिपब्लिकन पक्षात मात्र टेड क्रुझ यांनी बरीच रंगत आणली आहे.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/06/2016 - 08:30 नवीन
आतापर्यंत डेमॉक्रॅटिक पक्षातील चित्र कसे आहे हे पुढे दिलेल्या नकाशांवरून समजून येईल. सर्व नकाशे विकिपीडीयावरून घेतले आहेत. १. डेमॉक्रॅटिक पक्षातील निवडून गेलेले प्रतिनिधी Image removed. By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348440 २. डेमॉक्रॅटिक पक्षातील एकूण प्रतिनिधी (निवडून गेलेले + सुपरडेलीगेट) Image removed. By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348438 ३. डेमॉक्रॅटिक पक्षातील काऊंटीनिहाय मतदान (काऊंटी म्हणजे जिल्ह्याला समकक्ष) Image removed. By See #filehistory - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732374 या काऊंटीनिहाय नकाशावरून समजेल की हिलरींनी देशाच्या दक्षिण भागात अगदीच स्वीप केला.पण आपण जसेजसे उत्तरेकडे जातो त्याप्रमाणे परिस्थिती बदलते.उदाहरणार्थ ओक्लाहोमामध्ये सँडर्स यांची कामगिरी बरीच चांगली झाली आहे.कॅन्ससमध्ये तर सँडर्स यांनी सगळीकडेच विजय मिळवला आहे. नेब्रास्कामध्येही कामगिरी चांगली आहे. अर्थातच ही राज्ये तुरळक लोकवस्तीची आहेत त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये सँडर्स यांना या विजयाचाही फार फायदा होणार नाही. पण मिशिगन, मिन्नेसोटा या उत्तरेकडील राज्यांमध्येही त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. स्वतःचे व्हरमॉन्ट आणि त्या शेजारचे मेन ही राज्ये तर त्यांनी अगदी स्वीपच केली आहेत.तीच गोष्ट युटा, आयडॅहो आणि वॉशिंग्टन या राज्यांचीही. आता न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, न्यू जर्सी, मेरीलँड यासारख्या दाट लोकवस्तीच्या राज्यांवर बर्नी सँडर्स अधिक लक्ष देतील.त्यांनी म्हटल्याप्रमाणे दक्षिणेत पराभव होणार हे अपेक्षितच होते आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये प्रायमरी आधी झाल्या आहेत.यापुढे उत्तरेतील महत्वाच्या राज्यांमध्ये प्रायमरी आहेत आणि त्या राज्यांमध्ये चांगल्या कामगिरीची अपेक्षा सँडर्स यांना आहे असे दिसते. आणि म्हणूनच ते पिछाडीवर असले तरी अजूनही स्पर्धेत टिकून आहेत.
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन Wed, 04/06/2016 - 08:46 नवीन
वर डेमॉक्रॅटिक पक्षातले आतापर्यंतचे चित्र दर्शविणारे नकाशे दिले आहेत. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षातील चित्र दर्शविणारे नकाशेही देत आहे. १. रिपब्लिकन पक्षातील प्रतिनिधींची स्थिती Image removed. By Ali Zifan - Own work. Used blank map from here., CC BY-SA 4.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=47348439 २. रिपब्लिकन पक्षातील काऊंटीनिहाय मतदान Image removed. By Ali Zifan, JCRules, Magog the Ogre, Nizolan, & Spesh531 - This file was derived from:  USA Counties.svg, CC0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=46732339 यावरून समजते की डॉनल्ड ट्रम्प आणि टेड क्रुझ या दोघांनीही ज्या राज्यांमध्ये विजय मिळवला आहे ती राज्ये अगदीच स्वीप केली आहेत. इथे दिल्याप्रमाणे जनमत चाचण्यांप्रमाणे न्यू यॉर्कमध्ये ट्रम्प चांगल्यापैकी आघाडीवर आहेत तर कॅलिफॉर्नियामध्ये पूर्वी अधिक चुरस होती पण आता ट्रम्प यांनी आघाडी मिळवली आहे असे चित्र आहे.तसेच पेन्सिल्व्हेनियामध्येही ट्रम्पच आघाडीवर आहेत. जर ट्रम्प यांनी ही महत्वाची राज्ये जिंकली तर मात्र टेड क्रुझ यांना उमेदवारी मिळवणे कठिणच जाईल.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा