अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
नमस्कार मंडळी,
अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक या आधीच्या धाग्यावर १६० पेक्षा जास्त प्रतिसाद आले आहेत. त्यामुळे भविष्यात चर्चा वाचणे सोयीचे व्हावे या उद्देशाने हा नवा धागा काढत आहे. त्या धाग्यात उल्लेख झालेल्या मुद्द्यांवर काही मते मांडायची असतील तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत आणि नवे मुद्दे या धाग्यावर मांडावेत ही विनंती. गरज भासल्यास तिसरा धागाही भविष्यात काढेन.
तसेच भारतातल्या निवडणुकांप्रमाणे मतमोजणीच्या दिवशी स़काळपासून निकाल पोस्ट करायचाही मानस आहे. तसेच भारतातल्या निवडणुकांच्या वेळी प्रश्नमंजुषा सुरू केली होती त्याप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांसाठीही प्रश्नमंजुषा मिपावर काढायचा मानस आहे. त्यासाठी प्रश्न बनविणे सुरूही केले आहे. प्रश्न साधारणपणे जून-जुलैपासून पोस्ट करेन. भारतातल्या निवडणुकांप्रमाणे अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये तितक्या प्रमाणात सर्वच मिपाकरांना रस असेल असे नाही.तरीही मराठी आंतरजालावर या निवडणुकांसाठी जितकी होईल तितकी परिपूर्ण माहिती केवळ आपल्या मिपावर असावी या उद्देशाने हे काम तसे लवकरच हाती घेतले आहे.
मिशिगन आणि मिसिसीपीमध्ये दोन्ही पक्षांच्या तर आयडॅहो आणि हवाईमध्ये केवळ रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरी मंगळवारी झाल्या.त्यातील काही निकाल आले आहेत.ते थोड्या वेळेत इथे प्रतिसादात पोस्ट करेन.
क.लो.अ
गॅरी ट्रुमन
यापूर्वीचे लेखनः अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक
Book traversal links for अमेरिकन अध्यक्षीय निवडणुक-२०१६ (भाग २)
💬 प्रतिसाद
(175)
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 04/21/2016 - 07:35
नवीन
भाप्रवे प्रमाणे काल दुपारी न्यू यॉर्क प्रायमरीचा निकाल आला. या प्रायमरीमध्ये दोन्ही पक्षातील आघाडीच्या उमेदवारांनी (डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन आणि रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प) अगदी आरामात विजय मिळवला. रिपब्लिकन प्रायमरीमध्ये ट्रम्प यांना जवळपास ६०% मते मिळाली तर डेमॉक्रॅटिक प्रायमरीमध्ये हिलरी क्लिंटन यांना ५८% मते मिळाली.या विजयामुळे नोव्हेंबरमधील निवडणुक हिलरी विरूध्द ट्रम्प होणार असे जवळपास नक्की झाले असे म्हणायला हरकत नसावी. आता कॅलिफॉर्निया आणि पेन्सिल्व्हेनिया या दोन मोठ्या राज्यांमध्ये प्रायमरी व्हायच्या आहेत.पण या राज्यांमध्ये विजय मिळवला तरी प्रतिस्पर्ध्यांना (डेमॉक्रॅटिक पक्षात बर्नी सँडर्स आणि रिपब्लिकन पक्षात टेड क्रुझ) आपली पिछाडी भरून काढणे कठिणच जाईल असे दिसते.
तसेच ९ एप्रिलला वायोमिंग राज्यात डेमॉक्रॅटिक कॉकसेस झाली.त्यात मतांमध्ये बर्नी सँडर्स पुढे होते पण प्रतिनिधींच्या संख्येत बर्नी सँडर्स आणि हिलरी क्लिंटन यांच्यात बरोबरी झाली.
आतापर्यंतचे आकडे खालीलप्रमाणे:
table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8B8B;
color: #FFF;
font-weight: bold;
}
डेमॉक्रॅटिक पक्ष
न्यू यॉर्कवायोमिंगआतापर्यंत
हिलरी क्लिंटन13971930
बर्नी सँडर्स10671189
एकूण245143119
रिपब्लिकन पक्ष
डॉनल्ड ट्रम्प89 845
टेड क्रुझ0 559
जॉन कॅसिक4 148
इतर93 187
एकूण186 1739
तर डेमॉक्रॅटिक पक्षात सुपरडेलीगेट आणि इतर डेलीगेट यांचे आकडे पुढीलप्रमाणे:
table.tableizer-table {
font-size: 12px;
border: 1px solid #CCC;
font-family: Arial, Helvetica, sans-serif;
}
.tableizer-table td {
padding: 4px;
margin: 3px;
border: 1px solid #CCC;
}
.tableizer-table th {
background-color: #8B8988;
color: #FFF;
font-weight: bold;
}
सुपरडेलीगेटइतर डेलीगेटएकूण
हिलरी क्लिंटन50214281930
बर्नी सँडर्स3811511189
एकूण54025793119
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 05/04/2016 - 07:18
नवीन
गेल्या आठवड्यात आणि आज काही महत्वाचे बदल घडले आहेत.गेल्या मंगळवारी पेन्सिल्व्हेनिया, कनेक्टिकट, डेलावेअर,मेरीलँड आणि र्होड आयलंड या राज्यांमध्ये तर कालच्या मंगळवारी इंडियाना राज्यात प्रायमरी झाल्या. गेल्या मंगळवारी ज्याला 'न्यू इंग्लंड' भाग म्हटला जातो त्या दाट लोकवस्तीच्या प्रदेशात प्रायमरी झाल्या आणि एका अर्थी गेला मंगळवार प्रायमरींमध्ये निर्णायक होता. अमेरिकेतील रेल्वे कंपनी अॅमट्रॅकची 'असेला एक्सप्रेस' या भागातून जाते म्हणून या प्रायमरींना 'असेला प्रायमरी' असेही म्हटले जाते.
असेला प्रायमरीमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षात हिलरी क्लिंटन यांनी तर रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला.हिलरींनी या राज्यांमधील आकारात, लोकसंख्येत आणि प्रतिनिधीसंख्येत सगळ्यात पेन्सिल्वेनिया राज्यात १२% ,मेरीलँडमध्ये तब्बल ३०%, डेलावेअरमध्ये २०% तर कनेक्टिकटमध्ये त्यामानाने कमी म्हणजे ५% ची आघाडी मिळवली. तर बर्नी सँडर्स यांनी केवळ र्होड आयलंडमध्ये सुमारे १२% मते जास्त मिळवून विजय संपादन केला. आतापर्यंतचा कल बघितला तर असे लक्षात येत आहे की वरकरणी बर्नी सँडर्स यांनी अनेक राज्यांमध्ये विजय मिळवला आहे असे दिसत असले तरी त्यांनी विजय मिळवलेली राज्ये त्या मानाने आकाराने, लोकसंख्येने आणि प्रतिनिधीसंख्येने लहान राज्ये आहेत (उदाहरणार्थ अलास्का, हवाई, आयडॅहो, कॅन्सस, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, वायोमिंग इत्यादी). केवळ मिशिगन या एकाच मोठ्या राज्यात त्यांना विजय मिळाला आहे. आणि विजय मिळाला तो ही ३०-४०% अशा घसघशीत आघाडीने नाही तर ५-१०% च्या मताधिक्याने. त्यामुळे प्रतिनिधीसंख्येमध्ये या राज्यांमधून त्यांना हिलरींपेक्षा थोडीशीच आघाडी मिळाली. त्याउलट हिलरींनी न्यू यॉर्क, पेन्सिल्व्हेनिया, टेक्सस, जॉर्निया, फ्लॉरीडा इत्यादी मोठ्या राज्यांमध्ये आरामात विजय मिळवला.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही बर्नी सँडर्स यांनी विजय मिळवला पण तो ५% मताधिक्याने. त्यामुळे तिथूनही प्रतिनिधीसंख्येत त्यांना फार आघाडी मिळालेली नाही.
असेला प्रायमरीमध्ये डॉनल्ड ट्रम्प यांनी सगळी राज्ये जिंकली.टेड क्रुझ यांचा असेला प्रायमरीमध्ये अजिबात निभाव लागला नाही. बहुसंख्य राज्यांमध्ये उमेदवारी मिळायची अजिबात शक्यता नसलेल्या जॉन कॅसिक यांनी टेड क्रुझ यांच्यापेक्षा जास्त मते घेतली.कालच्या इंडियाना प्रायमरीमध्येही डॉनल्ड ट्रम्प यांनी टेड क्रुझ यांचा १७% मताधिक्याने आरामात पराभव केला.
त्यानंतर झालेली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे टेड क्रुझ यांनी उमेदवारी मिळवायच्या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता डॉनल्ड ट्रम्प यांच्यापुढे केवळ जॉन कॅसिक आहेत आणि त्यांना उमेदवारी मिळायची शक्यता शून्य आहे. तेव्हा रिपब्लिकन पक्षात डॉनल्ड ट्रम्प हेच उमेदवार असतील हे आता स्पष्ट झाले आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र हिलरींकडे आता सुपरडेलीगेट मिळून २२०२ प्रतिनिधी आहेत आणि त्यांना गरज आहे एकूण २२८३ प्रतिनिधींची. तेव्हा सुपरडेलीगेटनी मत बदलले नाही तर हिलरींची उमेदवारी पण पक्कीच असे धरायला हरकत नसावी.तरीही बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार नाहीत. भाप्रवेप्रमाणे आजच सकाळी सी.एन.एन वर बघितले की बर्नी सँडर्स यांची अपेक्षा आहे की त्यांनी प्रायमरीमध्ये ज्या राज्यांमधून विजय मिळवला होता त्या राज्यांमधील सुपरडेलीगेट त्यांना मत देतील.पण वर म्हटल्याप्रमाणे त्यांनी विजय मिळवलेली राज्ये आकाराने लहान आहेत.आणि त्यापैकी बर्याच राज्यांमध्ये डेमॉक्रॅटिक पक्षापेक्षा रिपब्लिकन पक्षाचा जोर जास्त आहे (उदाहरणार्थ कॅन्सस, नेब्रास्का, आयडॅहो इत्यादी). तेव्हा या राज्यांमधून डेमॉक्रॅटिक पक्षाचे किती सुपरडेलीगेट असणार आणि त्यापैकी किती मते बदलणार हा पण प्रश्नच आहे.
तेव्हा ८ नोव्हेंबरला हिलरी क्लिंटन विरूध्द डॉनल्ड ट्रम्प अशी लढत होईल असे जवळपास नक्की झाले आहे.
रिपब्लिकन पक्षात मात्र असेला
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 05/11/2016 - 07:59
नवीन
कालच्या मंगळवारी वेस्ट व्हर्जिनिया राज्यात दोन्ही पक्षांच्या तर नेब्रास्कामध्ये रिपब्लिकन पक्षाची प्रायमरी झाली.
डेमॉक्रॅटिक पक्षात वेस्ट व्हर्जिनियामध्ये बर्नी सँडर्स यांनी हिलरींचा १५% मताधिक्याने पराभव केला.सँडर्स यांना १६ तर हिलरींना ११ प्रतिनिधी मिळाले. रिपब्लिकन पक्षात वेस्ट व्हर्जिनिया आणि नेब्रास्का या दोन्ही राज्यात डॉनल्ड ट्रम्प यांनी जोरदार विजय मिळवला आहे. रिपब्लिकन पक्षात ट्रम्प हेच उमेदवार असणार हे नक्की झाले आहे. डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स अजूनही माघार घ्यायला तयार दिसत नाहीत.
आता १७ मे रोजी केंटकी आणि ऑरेगन या राज्यांमध्ये तर ७ जूनला कॅलिफॉर्निया या सगळयत मोठ्या राज्यात प्रायमरी आहेत. मला वाटते की कॅलिफॉर्नियात पराभव झाल्यास सँडर्स माघार घेतील (त्यांच्यापुढे दुसरा पर्याय राहणार नाही). या घडीला हिलरींना ५६% तर सँडर्स यांना ४२% मते मिळाली आहेत. ४२% हा आकडाही तसा कमी नाही.त्यामुळे नंतर उपाध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आपला दावा बळकट रहावा या कारणामुळे सँडर्स माघार घेत नसतील हे कारण आहेच.
डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार पारंपारिक रिपब्लिकनपेक्षा थोडे वेगळे आहेत. म्हणजे पारंपारिक रिपब्लिकन फ्री ट्रेडला समर्थन देतात तर ट्रम्प हे त्याच्या विरोधात आहेत. अर्थातच हे निवडणुकपूर्व र्हेटॉरीक आहे आणि ते अध्यक्षपदी आल्यास नंतर ते बदलेल ही शक्यता आहेच. पण सांगायचा मुद्दा हा की अमेरिकेत मतदारांमधील काही गटाला फ्री ट्रेडचे चटके बसले आहेत. असे मतदार ट्रम्पकडे वळायची शक्यता आहे.आणि डेमॉक्रॅटिक पक्षात सँडर्स यांची भूमिकाही फ्री ट्रेडविरोधी आहे. मिशिगनमध्ये त्यांना अनपेक्षित विजय मिळाला त्यामागे हे एक मोठे कारण होते असे म्हटले जात आहे. फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार ट्रम्पकडे जाऊ नये म्हणून सँडर्स यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार केले जाईल ही शक्यता आहेच.
फ्री ट्रेडविरोधी डेमॉक्रॅटिक मतदार फ्री ट्रेडच्या समर्थक रिपब्लिकन पक्षाचे फ्री ट्रेडचे (निदान वरकरणी) विरोधक असलेल्या उमेदवाराच्या बाजूने जायची शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प न आवडणारे रिपब्लिकन पक्षाचे अनेक पारंपारिक मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूने झुकायची शक्यता आहे. त्यातून पॅरीस, ब्रसेल्ससारखा आणखी एखादा हल्ला युरोपात झाला तर ते ट्रम्पच्या पथ्यावर पडेल ही पण शक्यता मोठी.
एकंदरीत चित्र रोचक असेल असे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 05/11/2016 - 08:10
नवीन
हा इशारावजा धोका किंवा धोकावजा इशारा आहे काय ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 05/11/2016 - 08:20
नवीन
दोन्ही नाही. तर केवळ एक शक्यता :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/11/2016 - 09:07
नवीन
पारंपारिक भूमिकेपेक्षाही जास्त उजवीकडे झुकलेले आहेत. मला वाटतं ते निव्वळ एक तडजोड म्हणून रिपब्लिकन पक्षात आले, कारण स्वतंत्र उमेदवाराला अमेरिकन राजकारणात स्थान आणि भवितव्य नाहीये.राॅस पेराॅट यांच्यानंतर स्वतंत्र उमेदवार असा कुणी उभा राहिलेलाच नाही अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत. ट्रम्प हे apparatchik नसल्यामुळेच ते अशी बेछूट विधानं करताहेत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 05/11/2016 - 08:03
नवीन
ट्रम्प रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार होणार आणि ते अध्यक्ष व्हायची शक्यता आहे हे स्पष्ट झाल्यावर इतर देशांच्या नेत्यांनी त्यांची ट्रम्पविरोधी भूमिका नमती घेतलेली दिसते. या नेत्यांमध्ये ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमेरन आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांचा समावेश आहे. याविषयी http://edition.cnn.com/2016/05/09/politics/world-leaders-react-trump-presidency/ हा लेख वाचनीय आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 05/11/2016 - 08:58
नवीन
दुर्दैवाने लिंक मिळत नाहीये. त्यानुसार या निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर नकारात्मक मतदान होण्याची शक्यता आहे. मला ट्रम्प नकोय म्हणून मी हिलरीला मत देणार किंवा हिकरी नकोय म्हणून ट्रम्पला मत देणार - असं होण्याची शक्यता या निवडणुकीत भरपूर आहे. मला स्वतःला Democratic पक्षाला म्हणजे हिलरी क्लिंटन यांना या नकारात्मक मतदानाची आणि anti-incumbency ची झळ लागेल असं वाटतंय.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/27/2016 - 07:21
नवीन
काल रिपब्लिकन पक्षात नॉर्थ डॅकोटा राज्यातील अनबाऊंड डेलिगेटनी (डेमॉक्रॅटिक पक्षातील सुपरडेलीगेटना समकक्ष) डॉनल्ड ट्रम्प यांना पाठिंबा जाहिर केला आणि त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांनी १२३७ हा जादूचा आकडा (मॅजिक फिगर) ओलांडला आहे. रिपब्लिकन पक्षात आता डॉनल्ड ट्रम्प हे उमेदवार असणार हे नक्की झाले आहे.
डेमॉक्रॅटिक पक्षात मात्र बर्नी सँडर्स यांना उमेदवारी मिळणे जवळपास अशक्य असले तरी ते अजूनही माघार घ्यायच्या मनस्थितीत नाहीत. बर्नी सँडर्स यांची ट्विटरवरील पुढील ट्विट त्याचेच द्योतक आहे--
आणि त्यातून बर्नी सँडर्स यांना कॅलिफॉर्निया हे मोठे राज्य जिंकणे अवघडच आहे.तेव्हा ७ जूनला कॅलिफॉर्निया प्रायमरी झाली की त्यानंतर सँडर्स माघार घेतील असे वाटते.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Fri, 05/27/2016 - 07:29
नवीन
ट्रम्प आला तर जागतिक लेवल वर लैच धिंगाणा होईल असे वाटते, ट्रूमन सरांचे विचार ह्यावर वाचण्यास उत्सुक आहे मी !
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Fri, 05/27/2016 - 10:42
नवीन
तसे व्हायची शक्यता कमी आहे असे मला वाटते. ट्रम्प बोलत काहीही असले तरी प्रत्यक्षात काय करतील आणि किती करतील हा प्रश्नच आहे. ट्रम्प अमुक एखादी गोष्ट करतील असे वाटत आहे त्याच्या बरोबर उलटी गोष्ट त्यांनी अध्यक्षपदी आल्यावर केली तरी आश्चर्य वाटायला नको.
रिचर्ड निक्सन अध्यक्षपदी येण्यापूर्वी चीनविरोधी समजले जात असत.पण अध्यक्षपदी आल्यावर चीनला मान्यता देणारे आणि भेट देणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष तेच होते. याचे कारण (मला वाटते) एखाद्या गोष्टीवर टोकाची भूमिका सुरवातीला घेतली तर नंतर निर्णय घेताना तीच गोष्ट केली तरी ती गोष्ट करताना देशाच्या हितसंबंधांना धोका निर्माण झालेला नाही असे चित्र उभे करता येणे सोयीचे होते. भारतातील उदाहरण द्यायचे झाले तर पारंपारिकपणे भाजप हा विरोधी पक्षात असताना पाकिस्तानविरोधी कडक भूमिका मांडणारा पक्ष राहिला आहे.त्याउलट काँग्रेस हा पाकिस्तानवर त्या मानाने कमकुवत भूमिका घेणारा पक्ष असे चित्र होते. त्यामुळे वाजपेयींनी पुढाकार घेऊन १९९९ मध्ये लाहोर डिक्लेरेशनवर सही केली तेव्हा वाजपेयी भारताच्या हितसंबंधांशी तडजोड करून असे काही करणार नाहीत असे चित्र निदान वरकरणी फार काही प्रयत्न करायला न लागता उभे राहिले. तीच गोष्ट काँग्रेस पक्षाच्या सरकारला करणे तितके सोपे गेले नसते कारण काँग्रेसच्या सरकारने असे कोणतेही पाऊल उचलले तर 'कशावरून हे भारताचे हितसंबंधांना धक्का पोहोचवत नाहीत' या प्रश्नाला सामोरे जाणे गरजेचे पडले असते. वाजपेयींना त्यावेळी तरी या प्रश्नाला सामोरे जावे लागले नव्हते. वाजपेयी सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर बोलताना (एप्रिल १९९९ मध्ये-- याच ठरावावरील मतदानात वाजपेयी सरकार एका मताने पडले होते) अडवाणींनी हा मुद्दा मांडला होता.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की राजकारणी सत्तेवर येण्यापूर्वी कितीही काहीही बोलत असले तरी प्रत्यक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना त्या सगळ्या गोष्टी गाऊंड रिअॅलिटी लक्षात आल्यावर करता येतातच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) असे नाही. त्यामुळे डॉनल्ड ट्रम्प यांच्याविरूध्द 'ते अमुक करतील ते तमुक करतील' इत्यादी बोलले जात असले तरी ते प्रत्यक्षात किती गोष्टी करू शकतील याविषयी शंकाच आहे.
रॉनाल्ड रेगन यांच्याविषयी 'ते तिसरे महायुध्द सुरू करतील' अशी भिती व्यक्त केली जात होती. अर्थातच त्यांनी तसे काही केले नाही. पण त्यांनी अशी पावले उचलली की त्यातून सोव्हिएट रशियाच पुढे कोलमडला आणि रशियाविरूध्द तिसरे महायुध्द सुरू करायची गरज (त्यावेळी) राहिली नाही.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 05/27/2016 - 17:50
नवीन
ट्रंपचे विचार हे जागतिक पातळीवर उलथापालथी करण्याचे आहेत असे वाटत नाही. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी थांबवली तर जागतिक पातळीवर काय धिंगाणा होणार डोंबल?
चीनशी व्यापार करताना अमेरिकेच्या फायद्याचे धोरण ठरवले, समजा चीनमधून येणार्या मालावर कर लावला तर चीनवर परिणाम होईल पण जगावर का?
ट्रंपबद्दल अकारण बाऊ करणे ही क्रेझ बनली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/27/2016 - 16:30
नवीन
निर्वासित, स्थलांतरीत, भारतीय, मुस्लिम इ. विरूद्ध ट्रम्प कितीही बोलत असले तरी ते जर प्रत्यक्षात निवडून आले तर त्यांना आहे तीच धोरणे पुढे चालवावी लागतील. वरील प्रश्नांवर त्यांचे धोरण पूर्वीच्या अध्यक्षांसारखेच असेल.
समजा नोव्हेंबर मध्ये ट्रम्प निवडून आले तर, अमेरिकेत कट्टर उजव्या विचारांचे ट्र्म्प आणि भारतात तथाकथित फॅसिस्ट मोदी अशा परिस्थितीत जगभरातील 'पुरोगामी, उदारमतवादी, मानवतावादी आणि निधर्मी विचारवंताचे' काय होणार? त्यांची अवस्था 'न घरका ना घाटका' अशी होईल.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 05/27/2016 - 18:23
नवीन
(खालील प्रतिसाद हा हिलरी क्लिंटनच्या बाजूचा प्रतिसाद म्हणून धरून वाचू नये. कारण तसा तो नाही. केवळ ट्रम्प इतकाच मुद्दा आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी).
ट्रम्प आता रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित झाले आहेत. रिपब्लिकन पक्षाच्या इतिहासात प्रायमरी निवडणुकांमधे सगळ्यात जास्त मते ट्रम्प यांना मिळाली आहेत आणि अजून १० राज्यातील निवडणुका झालेल्या नाहीत!
काल रात्री सीएनएन वर मायकल रेगन यांची मुलाखत ऐकली. त्यात त्यांनी काही चांगले मुद्दे मांडले... सगळ्यांना आशा आहे की ट्रम्प आता जरा गिअर्स बदलतील आणि जरा नीट बोलायला लागतील. त्यात हे मायकल रेगन देखील आले. पण त्यांच्या मते रेगन यांनी शत्रूंमधून मित्र तयार केले तर ट्रम्प हे मित्रांमधे (स्वपक्षियात) शत्रू तयार करत आहेत. त्यांचे दुसरे म्हणणे होते की, त्यांना ट्रम्प यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य वाटत नाही, पण तसे आवडणारे बहुसंख्य असणे हे काळजीचे कारण आहे.
अजून एक महत्वाचा भाग - ट्रम्प यांचा विचार करताना आपण साहजिक रेगन यांच्याशी कळत-नकळत तुलना करतो कारण रेगन देखील आधी कलाकार होते (अर्थात राजकारणी नव्हते). ते जरी खरे असले तरी राष्ट्राध्यक्ष होण्याआधी रेगन हे दोन वेळेस म्हणजे ८ वर्षे कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर होते आणि एकदा रिपब्लिकन प्रायमरीत हरलेले देखील होते. हे महत्वाचे का, कारण त्यांना राजकारणाचा आणि राज्यशासनाचा अनुभव होता. हे अगदी नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते. बुश हे गव्हर्नर होते तर चेनी हे मला वाटते, प्रेसिडंट फोर्ड, रेगन आणि मोठ्या बुश यांच्या राज्यात कसले न कसले सेक्रेटरी होते.
ट्रम्प यांची आपण नकळत मोदींशी तुलना करतो. कारण मोदींना पण असाच विरोध झाला होता असे वाटून. पण त्यात जमिन अस्मानाचे अंतर आहे. दुसरा भाग असा की. मोदी आधी संघप्रचारक होते. त्यांना ८०च्या दशकाच्या शेवटास भाजपामधे पाठवले गेले. तेथे त्यांनी विविधपातळीवर कामे केली. त्यातून अनुभवी झाल्यावर आणि योग्य वाटल्यावर त्यांना मुख्यमंत्री केले गेले. पुढचा सर्व इतिहास आहे.
ट्रम्प यांना यातील काहीच नाही आहे. ट्रम्प हे काही वाटत असले तरी उजवे नाहीत. ते डावे देखील नाहीत. हिलरी क्लिंटनच्या सिनेट निवडणुकीच्या निधीसाठी त्यांनी भरपूर मदत केली आहे. चेलसी क्लिंटन आणि ट्रम्प यांची मुलगी या मैत्रिणी आहेत. (अथवा होत्या) क्लिंटन दांपत्य ट्रंप यांच्या इस्टेटीवर (मला वाटते युरोपमधे देखील) पाहूणे म्हणून जाऊन आलेले आहे. म्हणून असे सुरवातीस म्हणले गेले होते की क्लिंटन दांपत्यानेच त्यांना प्रोत्साहन दिले, जेणे करून रिपब्लिकन पक्षात गोंधळ होईल. जर ते खरे असले तर हा आता त्यांच्यासाठी तो भस्मासूर ठरला आहे.
गंमत म्हणजे ट्रम्प यांच्या मुलांनी न्यूयॉर्क प्रायमरीमधे (जेथे ते मतदान करू शकले असते तेथे) मतदार म्हणून नोंदवणी न करता मत देण्याचे टाळले असेच म्हणावे लागेल.
ट्रम्प हे यशस्वी उद्योगपती आहेत असे म्हणण्याऐवजी उद्योगी आहेत असे म्हणणे जास्त योग्य ठरेल! :) अर्थात त्यामुळे काही फरक पडत नाही. विशेषतः अमेरीकेत हे नक्कीच चालू शकते आणि चालले पाहीजे देखील. वर चर्चेत दोन्ही बाजूने आलेला मुद्दा जो इतरत्र देखील वाचला ऐकला आहे, तो म्हणजे ट्रम्प निवडणून आल्यावर काय होईल - युद्ध, मुसलमानांवर आणि त्याच लाईनीत सर्वच अल्पसंख्यांकांवर अन्याय वगैरे... मला नाही वाटत तसे काही होईल.
पण तरी देखील ते या सत्तापदासाठी योग्य नाहीत असेच वाटते. त्याचे कारण म्हणजे एकंदरीतच त्यांचे वर्तन आणि वक्तव्ये. (त्यात एकदा स्वतःच्या मुलीच्या रुपाचे विचित्र कौतुक देखील ऐकायला मिळाले). ट्रम्प यांना असलेला अंतर्गत म्हणजे रिपब्लिकन पक्षातला विरोध, हा मोदींना झालेल्या भाजपांतर्गत (अडवाणी वगैरे) विरोधासारखा नाही. येथे खरेच तत्वाचा प्रश्न तयार झाला आहे. एका अधिकृत रिपब्लिकन ब्लॉगरने म्हणल्याप्रमाणे हिलरी कुणालाच (रिपब्लिकन्सना) नको आहे. पण म्हणून अण्वस्त्रांच्या चाव्या ट्रम्पच्या हातात देणे बरोबर ठरणार नाही.... अर्थात हे केवळ उदाहरण म्हणून तो म्हणत होता. पण मुद्दा आहे तो राजकीय नेतृत्व गुणांचा. म्हणूनच अजूनही अनेक रिपब्लिकन नेते हे पाठींबा जाहीर करायला तयार नाहीत. किंबहूना काल ऐकल्याप्रमाणे अनेक जण कन्व्हेंशनला जाणार देखील नाही आहेत.
इतके सगळे असले तरी एक नक्की वाटते - अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे.
-------------
जाता जाता विरंगुळा... :)
ज्यांनी कोणी स्पिलबर्गची "बॅक टू द फ्युचर" चित्रपटमालीका पाहीली असेल त्यातील विनोदी खलनायक "बिफ" (Biff) ची कॅरेक्टर ही स्पिलबर्ग आणि त्याच्या टिमने ट्रंपवर रेखाटली आहे. या चित्रपटाच्या भाग दोन मधे वर्तमानात जाताना गडबड होते आणि सगळा काळ आणि वर्तमान बदलले असते. त्याला An alternative time line 1985 A - Paradox म्हणले आहे. कॅसिनोज आणि गुंडगिरी वाढलेली असते. ते विशेष करून ट्रम्प कॅसिनोवर आधारीत होते...
Marty: "I don't get it, Doc. I mean, how can all this be happening? It's like we're in hell or something."
Doc: "No, it's Hill Valley. Although I can't imagine hell being much worse!"
-----
- Log in or register to post comments
न
नंदन
Fri, 05/27/2016 - 21:02
नवीन
नेमकं! असलाच तर त्याची धोरणं/मतं (प्रायमरीत बदलण्यापूर्वी) डावीकडे झुकलेली वाटतात - बहुतेक 'न्यू यॉर्क व्हॅल्युज'च्या प्रभावामुळे.
सहमत. शिवाय, अमेरिकन व्यवस्थेतल्या चेक्स अँड बॅलन्सेसमुळे कुणाही एका व्यक्तीला (किंवा ब्रँचला) हटवादीपणे आपलं घोडं पुढे दामटणं सोपं नसतं.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/28/2016 - 07:53
नवीन
रॉनाल्ड रेगन पूर्वी राजकारणी नव्हते त्याचप्रमाणे आयसेनहॉवरही पूर्वी राजकारणी नव्हते तर ते सैन्याचे प्रमुख होते. तरीही आयसेनहॉवर हे वाईट अध्यक्ष होते असे कोणी म्हणेल असे वाटत नाही. रेगन तर अलीकडच्या काळातील चांगलेच लोकप्रिय अध्यक्ष होते. ओबामांचे म्हणाल तर त्यांनाही कितपत अनुभव होता? राष्ट्रीय पातळीवर केवळ साडेतीन वर्षांचा-- इलिनॉयचे सिनेटर म्हणून जानेवारी २००५ ते २००८ च्या निवडणुकीपर्यंत एवढाच राष्ट्रीय पातळीवरील अनुभव त्यांना होता. त्यापूर्वी ७ वर्षे ते इलिनॉय राज्यातील हाऊसचे सदस्य होते. त्याउलट उपाध्यक्ष जोसेफ बायडेन ३६ वर्षांपासून सिनेटचे सदस्य होते म्हणजे त्यांना राष्ट्रीय राजकारणाचा अनुभव ओबामांपेक्षा बराच जास्त होता.
प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का?
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 05/29/2016 - 02:16
नवीन
प्रशासनाचा आणि राजकारणाचा पूर्वानुभव असणे हा थोडासा ओव्हररेटेड मुद्दा आहे का?
माझ्या मते कसलातरी अनुभव असणे महत्वाचे आहे अगदी एका टोकाच्या विचारसरणीचे राज्य करायचे असले तरी. म्हणजे किमान प्रशासनाचा तरी अनुभव असावा अथवा सत्तेच्या राजकारणाचा तरी... असा विचार करा, इतरत्र म्हणल्याप्रमाणे, मल्या ला सोडा (आय मीन या चर्चेतील वादातून! ;) ) पण उद्या अंबानी बंधू अथवा रतन टाटा पंतप्रधानपदी जाऊन बसले तरी त्यांना अवघड जाऊ शकते. सरकार चालवणे आणि धंदा चालवणे हे जरी वरकरणी समांतर वाटले तरी त्यात जमिन अस्मानाचा फरक आहे. याचा अर्थ असा नाही की टाटा-अंबानींना चालवता येणार नाही पण त्याला वेळ द्यावा लागेल आणि काही अंशी का होईना पण धंदेवाईकाची वस्त्रे बाजूला ठेवावी लागतील...
ट्रम्पच्या बाबतीत लफडे असे आहे की ते बोलतात इतकेव ते काही धंद्यात पण यशस्वी नाहीत. शिवाय आत्तापर्यंत सर्वांनाच दुखावण्याचा चंग बांधला आहे.
ट्रंपना फक्त डावेच विरोध करत आहेत असे नाही तर स्वपक्षिय पण विरोध करत आहेत हे आधी सांगितले आहेच. बरं त्यातील प्रत्येकजण काही politics as usual म्हणणार्यातला आणि तसे वागणार्यातला नाही. याचे मोठे उदाहरण म्हणजे अमेरीकन काँग्रेसचा सभापती (स्पिकर) पॉल रायन जो अत्यंत कडक उजवा आहेच, रॉमनी बरोबर उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी उभा होता. हा शेवटी त्याला पाठींबा देईल ही कदाचीत पण अजूनही ट्रम्पबद्दलचे रिझर्वेशन्स जाहीरपणे सांगत आहे. असे का व्हावे, ह्याचा विचार करायला हवा असे वाटते.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Fri, 05/27/2016 - 20:10
नवीन
(हा प्रतिसाद हिलरीच्या विरुद्ध समजला जाऊ नये. अनुभवी राजकारणी हाच विषय आहे. हिलरीबद्दल नंतर कधीतरी!)
देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे.
बुश आणि चेनी ह्यांचे अमाप, अफाट, अगाध अनुभव विचारात घेऊनही असे म्हणता येईल की त्यांनी अमेरिकेकरता घातक, दीर्घकाळ मारक ठरणारे, अमेरिकेला दिवाळखोरीकडे नेणारे, अमेरिकेची प्रतिमा काळीकुट्ट करणारे निर्णय घेतले. इराकचे युद्ध हा त्यातला सगळ्यात घातक निर्णय. बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते. असे असेल तर प्रशासनाचा अनुभव काय कामाचा? आपल्या मूर्खपणाचे असे दूरगामी घातक परिणाम होतात हे कळण्याची अक्कल नसेल तर निव्वळ त्यांच्या अनुभवाचे काय लोणचे घालायचे आहे का?
हिलरीही अत्यंत अनुभवी, कसलेली मुत्सद्दी वगैरे समजली जाते. तिनेही इराक युद्धाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. जर तिलाही आपल्या निर्णयाची घातकता समजत नसेल तर असल्या राजकारणाच्या पोकळ अनुभवाचा काय उपयोग?
जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय?
शिवाय ओबामाला असा काय सत्तेचे शकट हाकायचा प्रचंड अनुभव होता?
लोकशाहीत लोकांमधून नेता निवडायचा असतो हे आपण विसरता कामा नये. केवळ राजकारणी कारकीर्द असणारेच (करीयर पॉलिटिशियन्स) ह्या पदाला लायक आहेत असा प्रवाद रुजवणे हे घातक आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 05/27/2016 - 22:14
नवीन
जर व्यावसायिक राजकारणी अशी वाट लावत असतील तर राजकारणापासून अलिप्त असणारे लोक सत्तेवर आणून बघू असा विचार लोकांनी केला तर चूक काय?
म्हणूनच आपण राहूल गांधींना पंतप्रधान करायला हवे होते! ते व्यवसायाने राजकारणात असून पण अलिप्त राहू शकतात!
विनोदाचा भाग सोडा, ट्रंपला पाठींबा देणारी लोकं ही बहुतांशी त्यांच्या भडक विधानात आपल्याला हवे असलेले ऐकणारी आहेत. म्हणून त्याच्या बाजूने आहेत. मग त्यात कधी मुस्लीम विरोध असतो तर कधी अल्पसंख्य-स्थलांतरीत-मेक्सिकन्स विरोध असतो. कधी गन्स च्या बाजूने बोलणे असते तर बर्याचदा स्त्रीयांच्या विरोधात बोलणे असते. आत्ताच्या काळात ज्याला सभ्यतेने बोलणे समजले जाऊ शकेल असे बोलणे ट्र्म्प करत नाहीत. त्यामुळे आपल्याला जे बोलायचे असते तो हा माणूस पब्लिकमधे बोलतो यावर जनता खूष होते.
बुश चेनीची कारकीर्द ही अमेरिकेतील सगळ्यात वाईट राजवट समजली जाते.
म्हणूनच माझ्या प्रतिसादात, "नजिकच्या भूतकाळातील अत्यंत अनपॉप्युलर ठरलेल्या बुश-चेनींना पण लागू होते." असे म्हणले होते. पण गंमत माहीत आहे का? या बुश-चेनींनीच परत यावे असे तमाम भारतीयांना - विशेष करूण भारतातील देखील भारतीयांना वाटत होते. कारण त्यांच्या कारकिर्दीत भारतातल्या कंपन्यांना येथे काँट्रॅक्ट्स मिळणे सोपे गेले त्यामुळे आउटसोअर्सिंग वाढले म्हणून...त्या वेळेस देखील असे अनेक डेमोक्रॅटीक अमेरीकन्स होते ज्यांना केरी आवडत नव्हते. पण बुश-चेनी पण नको होते. आज काही वेगळे चाललेले नाही.
देशाची धुरा संभाळताना राजकारणाचा अनुभव असणे, सरकार चालवण्याचा अनुभव असणे ह्याचा अकारण बाऊ केला जात आहे.
प्रश्न नुसत्या राजकारणाचा अनुभवाचा नाही. ट्रम्प यांचे एअरलाईन्स, व्होडका, कॅसिनो, आदी उद्योग बुडीत खात्यात गेले आहेत. कौटूंबिक गोष्टी काढायच्या ठरवल्या तर त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या लग्नांना ग्रीनकार्ड मॅरेजेस म्हणले जाते. ते जर क्वालीफिकेशन असले तर मग आपल्याकडे विजय मल्यांनाच पंतप्रधान करायला हवे. ट्रम्प आज स्वतःचे टॅक्सफॉर्म्स अजून जाहीर करायला तयार नाहीत आणि नुसतेच मी श्रीमंत आहे आणि कुणाकडून पैसे घेणार नाही म्हणत टिमकी वाजवत होते. आता पैसे मागायला लागलेत....
म्हणूनच भारतीय संदर्भ देऊन उदाहरण देयचेच असेल तर इतकेच म्हणेन की, देव न करोत, पण उद्या फक्त आपल्याला दोनच पर्याय असतील - मल्या विरुद्ध केजरीवाल, तर काय करायचे? आज अमेरीकन निवडणुकीची ही अवस्था आहे.
तरी देखील वरील प्रतिसादात म्हणलेले परत लिहीतो, "अमेरीकन लोकशाही व्यवस्था (त्यातील गुणदोषांसहीत) खूपच प्रौढ आहे. त्यामुळे जगबुडी होईल असे काही मला वाटत नाही. तसेच क्लिंटन येवोत अथवा ट्र्म्प, ते एक टर्म राष्ट्राध्यक्ष होण्याचीच शक्यता अधिक आहे."
असो.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/28/2016 - 07:07
नवीन
२००४ मध्ये जॉर्ज डब्ल्यू बुश विरूध्द जॉन केरी अशी लढत होती त्यावेळी भारत सरकारलाही बुशच निवडून यावेत असे वाटत होते असे वाचल्याचे आठवते. तसेच २००८ मध्ये बराक ओबामा विरूध्द जॉन मॅककेन अशी लढत होती तेव्हाही ओबामांचे भारताविषयी धोरण कसे असेल हे स्पष्ट नसल्यामुळे जॉन मॅककेन हे बुश यांचेच भारताविषयीचे धोरण चालू ठेवतील या अपेक्षेने २००८ मध्येही भारताचा कल ओबामांपेक्षा मॅककेन यांच्याकडे होता असेही वाचल्याचे आठवते. याक्षणी याचे संदर्भ लगेच देता येणार नाहीत पण अशा स्वरूपाचे त्यावेळी वाचले होते हे आठवते हे नक्कीच.
एकूणच आधीच्या अध्यक्षांपेक्षा बुश हे भारतासाठी चांगले होते. सप्टेंबर २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी वॉशिंग्टनला भेट दिली होती त्यावेळी बुश यांच्याविषयी खालील उद्गार काढले होते---
When history is written, it will be recorded that Bush played a historic role in bringing our democracies closer.
The credit for ending India’s nuclear apartheid goes to you.
People of India love you
तसेच मनमोहन आणि बुश यांची ही मिठी प्रसिध्दच आहे---
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही.
त्याचप्रमाणे हिलरी आणि डॉनल्ड ट्रम्प या दोघांमध्ये जर डॉनल्ड ट्रम्प अध्यक्ष होणे भारताला अधिक चांगले असेल तर (हा तर फार महत्वाचा आहे) भारतीयांनी ट्रम्प यांना पाठिंबा दिला तर त्यात काय चुकले?
बापरे!!
- Log in or register to post comments
व
विशाखा पाटील
Sat, 05/28/2016 - 09:07
नवीन
याच बुश यांनी मुशर्रफ यांनाही जवळ केले होते. पाकिस्तानला दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी प्रचंड पैसा त्यांच्याच काळात दिला गेला. तो कुठे खर्च होतोय, याकडे मात्र लक्ष नव्हते. पुढे ओबामांच्या काळात केरी- लुगर बिलाने त्यावर नियंत्रण आले.
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 05/29/2016 - 02:56
नवीन
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की बुश अमेरिकेसाठी आणि इतर जगासाठी कसेही असले तरी भारतासाठी ते चांगले असतील तर भारतातील सरकारला आणि सामान्य नागरिकांना बुशविषयी अधिक आत्मीयता वाटली तर त्यात फार काही चूक आहे असे मला तरी वाटत नाही.
अगदी पूर्णपणे सहमत. तसा असण्यात गैर काहीच नाही. पण म्हणून बूश काही चांगला राज्यकर्ता ठरत नाही. याच अर्थाने वरील कुठल्यातरी प्रतिसादात मॅकेन बद्दल पण आले होते. ओबामा विरुद्ध मॅकेनच्या लढतीच्या वेळेस अनेकांनी ओबामाच्या काश्मिर धोरणावरून साशंकता व्यक्त करत मॅकेनला पाठींबा दिला होता. त्या अर्थाने तो योग्य देखील होता.
पण माझा मुद्दा किंचीत वेगळा आहे. बुश अथवा नंतर ओबामा या दोघांनीही भारताशी असलेले संबंध वृध्दींगतच केले आहेत. केरी हे काही भारताचे सुहृद म्हणता येतील असे नाहीत तरी देखील आजच आलेल्या बातमीनुसार स्टेट डिपार्टेमेंटने पाकीस्तानला सुनावले आहे. मोदी समर्थक म्हणून विचार करायचा झाला तर बुशच्या काळात मोदींचा व्हिसा रद्द केला गेला होता तर ओबामाच्या काळात (आता) पायघड्या घालण्यात येणार आहेत...
हे कशामुळे होते? अर्थातच कृशे कशास्ती सौहृदम न्यायाने दुर्बळाला मित्र नसतो पण जसे आपण आपले स्थान बळकट करतो तसे आपल्या बाजूने सगळे होत जातात. तेंव्हा अमेरीकेतला राष्ट्राध्य़क्ष कोण होणार या पेक्षा आपण कोण होत आहोत हे महत्वाचे आहे. हे केवळ तात्विक अर्थाने म्हणत नाही तर व्यावहारीक अर्थाने म्हणत आहे. म्हणूनच केवळ अमेरीकेवर भर देणे योग्य नाही हे मोदी जाणून आहेत आणि एकीकडे या एकमेव महासत्तेशी मैत्री करत असताना जगात इतरत्र आपले बस्तान बसवत आहेत.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 05/28/2016 - 03:50
नवीन
मल्ल्या आणि ट्रंपची तुलना हास्यास्पद आहे. (राहुल गांधी आणि ट्रंपची तर दखलही न घ्यावी इतकी हास्यास्पद आहे.)
मल्ल्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. कोर्टाने त्याच्याविरुद्ध जप्तीची नोटीस काढली आहे. ब्रिटनसरकारकडे हस्तांतराची मागणी केलेली आहे. ह्यापैकी कुठली गोष्ट ट्रंपबाबत केली आहे? उद्योग बुडीत गेले असतील. १००% यशस्वी उद्योजक असल्याचा त्याने दावा केलेला नाही. टक्केटोणपे खात त्याची कारकीर्द चालली असेल तर माझी काही हरकत नाही. उद्योगात निर्भेळ यश मिळवणारे दुर्मिळच असतात.
बाकीचे राजकारणी मेक्सिकोतून होणार्या घुसखोरीविरुद्ध चकार शब्द काढणे हे आपल्या पुरोगामीत्वाला काळिमा फासणे समजतात. एखाद्या देशात प्रवेश करताना तिथले कायदे मोडणे हे कसे समर्थनीय आहे हे माझ्या आकलनाबाहेर आहे. ट्रंपने त्याविरुद्ध आवाज उठवताच त्याला वर्णद्वेष्टा, वंशद्वेष्टा अशी खास ठेवणीतली दूषणे दिली जातात. बेकायदा कृत्याला विरोध करणे हे चूक का आहे?
मुस्लिम इमिग्रेशनबद्दल ट्रंप नक्की काय म्हणाला होता हे जाणायची तसदी घेतली आहे का? तमाम माध्यमांनी नवा हिटलर जन्माला आला की काय अशा थाटात राळ उडवली आहे. पण तो इतके भयंकर बोलला का? आजिबात नाही.
ट्रंप हा समस्त स्त्री जातीच्या विरोधात आहे हा एक असाच लाडका, माध्यमांनी पोसलेला गैरसमज. त्याने एखाद्या स्त्रीबद्दल गैर उद्गार काढले तर त्यामुळे तो तमाम स्त्रीवर्गाशी असाच वागतो हे कसे ठरवले?
अमेरिकन लोक जाणते, प्रगल्भ आहेत असे वाटत नाही. मूर्ख, अज्ञानी लोक प्रचंड संख्येने आहेत (डावे, उजवे दोन्ही बाजूला). बुशला दोनदा निवडून देणारे अमेरिकनच होते.
पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्या बाजूला चान्स मिळेल ही आशा. देव करो आणि हिलरीची पीडा टळो!
- Log in or register to post comments
न
नंदन
Sat, 05/28/2016 - 06:48
नवीन
खरंच? ट्रम्पच्या अनेक भाषणांत तर याच्या उलट चित्र दिसतं.
गेल्या आठ वर्षांत २० लाखाहून अधिक बेकायदेशीर निर्वासितांना देशाबाहेर पाठवलं गेलं. सीमेवर तैनात असलेल्या बॉर्डर पेट्रोल एजंट्सची संख्या ही आजमितीस सर्वाधिक आहे. २०१३ मध्ये, सिनेटने (रिपब्लिकन्स + डेमोक्रॅट्स असे ६८ सिनेटर्स मिळून) कॉम्प्रिहेन्सिव्ह इमिग्रेशन रिफॉर्म पास केला तेव्हा दोन्ही बाजूंच्या सिनेटर्सची वक्तव्यं ऐकायला हवी होती. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी ही बेकायदेशीर असून ती रोखायला हवी, याच मंगलाचरणाने सुरूवात करून ओबामानेही या रिफॉर्मवरील चर्चेला तोंड फोडलं होतं, आणि त्यात सीमेवरील सुरक्षा अधिक वाढवण्यासाठी तरतूदही होती. (रिपब्लिकन बहुसंख्या असलेल्या हाऊसने हा रिफॉर्म काही कडव्या मेंबरांच्या आग्रहामुळे साध्या चर्चेसही घेतला नाही.)
याचा अर्थ, सारं काही आलबेल आहे असं नव्हे - पण याविरुद्ध कुणी चकार शब्द काढत नाही वा पुरोगामी त्याच्या आड येतात, किंवा ट्रम्प हाच याविरुद्ध आवाज उठवणारा कुणी क्रांतिकारी आहे (असं तुम्ही म्हटलेलं नाही, पण अनेक ट्रम्पसमर्थकांचा दावा आहे) हा जावईशोध झाला.
शिवाय, इल्लिगल इमिग्रंट्स हे केवळ मेक्सिकोतून येत नाहीत. क्युबातून येणारे निर्वासित आहेतच (ज्यांना 'पॉलिटिकल असायलम' म्हणून स्वीकारलं जातं), पण 'टूरिस्ट व्हिसा' घेऊन येणारे आणि त्याची मुदत संपली तरी इथेच राहणारे इल्लिगल इमिग्रंट्स मोठ्या संख्येने आहेत. विशेषतः इस्ट कोस्टवर, या पद्धतीने, फिलिपिनो कुशल/अकुशल कामगार पुरवठ्याची सुनियोजित साखळी अस्तित्वात आहे. (आपल्याच शेजारी राज्यातून वा उत्तरेतूनही, हा मार्ग चोखाळून आलेले आणि इथे इल्लिगली राहिलेले लोकही आहेत.) भिंत बांधून यांची विमानं कशी अडवणार? दुसरं म्हणजे, हे इल्लिगल इमिग्रेशन बरीच दशकं चालू असल्याने, कित्येकांची पुढली पिढी अमेरिकेत जन्मली - शिकली - सैन्यात वा अन्यत्र नोकरी करू लागली. अमेरिकन भूमीवर जन्म झाल्याने त्यांना नागरिकत्व बहाल करायचं की त्यांच्या पालकांनी वीस-तीस वर्षांपूर्वी केलेल्या गुन्ह्यांची शिक्षा त्यांना देऊन, त्यांना हाकलून लावायचं - या दोन टोकाच्या भूमिका झाल्या. थोडक्यात, इल्लिगल इमिग्रेशनच्या प्रश्नाला अनेक पैलू आहेत.
ट्रंपवर होणारी टीका ही 'मेक्सिकोतून इथे येणारे लोक हे बहुसंख्येने गुन्हेगार, रेपिस्ट्स असतात' यासारख्या विधानांमुळे होते आहे, इल्लिगल इमिग्रेशनबद्दल तर १७ पैकी प्रत्येक रिपब्लिकन उमेदवार बोंबा मारत होता की.
एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना?
पण, ट्रम्प हा स्त्रीद्वेष्टा किंवा स्त्रीजातीच्या विरोधात आहे, असं मलाही वाटत नाही - तो कुणाबद्दलही जेंडर-न्यूट्रल गैरउद्गार काढू शकतो! :)
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Sat, 05/28/2016 - 07:13
नवीन
इल्लीगल इमिग्रंट्स हे अनेक सीनेटर्स आणि काँग्रेसमन्सच्याच आशीर्वादाने शेतीशी संबंधित आणि अन्नौद्योगाशी संबंधित उद्योगधंद्यांमध्येच अतिशय स्वतातले अकुशल कामगार म्हणून राबवले जातात हे सत्य आहे. इथल्या मिनिमम पे रेटने हे कामगार लीगली आणायचे म्हंटले तर अमेरिकेतले उरलेलेही सगळे छोटेमोठे उद्योग बाहेर हाकलून लावायची वेळ येईल अशी परिस्थिती आहे. कोणी कितीही बोंबा मारल्या तरी लोक येत राहणार त्यांच्यासाठी वेगवेगळ्या कॄप्त्या लढवून भाषणबाजी होत राहणार यापेक्षा जास्ती काही शक्य आहे असे दिसत नाही. आणि याला रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्स दोघेही जबाबदार आहेत.
हा ट्रंप नुसता दिसला तरी माझी तळपायाची आग मस्तकाला जाते बुवा! :(
(अवांतर - कधी नव्हे ते चक्क नंदनलाही, प्रतिसाद का होईना, लिहिण्यास भाग पाडले म्हणजे हा ट्रंप किती डोक्यात जात असेल बघा!! ;) )
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 05/28/2016 - 22:51
नवीन
घुसखोरी थांबव़ली तर अमेरिकन अर्थव्यवस्था रसातळाला जाईल हा एक बिनबुडाचा जावईशोध आहे. तसे काहीही होणार नाही. दर वर्षी लाखो बेकायदा लोक घुसतात. आणि ते अमेरिकेतच रहातात. शेतकामगारांची गरज ही अशी नित्य वाढती आहे का? कामाकरता व्हिसा मिळवणे सोपे करावे इतके अमेरिकन सरकारला करणे शक्य नाही का? केवळ घुसखोरीचाच पर्याय उपलब्ध आहे हा गोड गैरसमज माध्यमांनी जोपासलेला आहे.
ट्रंपला अकारण एक काळाकुट्ट खलनायक म्हणून रंगवले जात आहे. बेकायदा घुसखोरीबद्दल आक्रमक असणे मला तरी आवडते. अशा बेकायदा कृत्याला डोक्यावर घेऊन कौतुकाने नाचले की माझी तळपायाची आग मस्तकात जाते बुवा!
- Log in or register to post comments
च
चतुरंग
Mon, 05/30/2016 - 03:57
नवीन
आहे असं कोण म्हणालंय? त्याबद्दल आक्रमक असू नये असेही म्हणणे नाही. परंतु घुसखोरी आणि त्याविरुद्ध यंव करु अन त्यंव करु अशी टोकाची भूमिका घेणे यांच्यापासून सद्यस्थिती ही कोसो दूर असली तर शहाणा माणूस विचार करेल ना की बाबा हे आरडाओरड करताहेत तसं खरंच शक्य आहे का? का यात राजकारण जास्त आणि प्रत्यक्ष कार्यवाही नाममात्र असे असणार आहे? मी वरती म्हंटलेच आहे की याला दोन्ही पक्ष जबाबदार आहेत त्यामुळे वरकरणी वाटते त्यापेक्षा या प्रश्नाची पाळेमुळे भलतीच खोल गेलेली आहेत. असो यापेक्षा जास्त चर्चा शक्य नाहीये मला.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 05/28/2016 - 23:14
नवीन
>>एखादी स्त्री? रोझी ओ'डनेल, मेगन केली, हिलरी क्लिंटन, हायडी क्रुझ (टेड क्रुझची पत्नी), कार्ली फिओरिना अशी उज्ज्वल परंपरा आहे की अलीकडची. शिवाय गर्भपाताबद्दल स्त्रियांना शिक्षा व्हायला हवी, हेही आहेच. (नंतरचं खास राजकारणी घूमजावही मजेदार होतं). अर्थात, अशा बेलगामी विधानालाही वैट्ट, वैट्ट, दूश्ट मीडियाच कारणीभूत असेल ना?
<<
टेड क्रुझने ट्रंपच्या बायकोचा उत्तान फोटो प्रकाशित केला होता. रोझी आणि ट्रंपचे जुने वैर आहे. (रोझीला स्त्री म्हणावे का नाही हा वादाचा विषय आहे. पण ते जाऊ द्या!) हिलरीबद्दल स्त्री म्हणून काय अनुदार उद्गार काढले आहेत? ही यादी तमाम स्त्रीवर्गाचे प्रतिनिधित्व करते का?
गर्भपाताबद्दलचे विधान मागे घेतले आहे. तेवढे माझ्या लेखी पुरे आहे. ज्या प्रकारे ख्रिस मॅथ्युजने ट्रंपकडून वदवून घेतले होते ते पहाता ते ट्रंपचे खरे मत नव्हते असे माझे मत आहे.
इलिगल इमिग्रेशनबद्दल खणखणीत आवाजात बोलणारा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा माझ्या आठवणीत ट्रंप हाच आहे. बाकी लोक बोलतात ते एक उपचार म्हणून बोलतात. बहुतेक वेळा बेकायदा लोकांना कायदेशीर बनवण्यापूर्वी एक बोलाचीच कढी बोलाचाच भात इतपत बेकायदा घुसखोरीला विरोधी बोलतात.
बाकी मार्गाने बेकायदा इमिग्रेशन होते म्हणून मेक्सिकोतून होणारेही गोड माना हा काय मूर्खपणा आहे? कुठूनही बेकायदा स्थलांतर होता कामा नये.
मेक्सिकोतून बेकायदा घुसणार्यात अगदी १ टक्का जरी गुन्हेगार असतील तरी ते अनिष्टच आहे. अमेरिकेत पुरेसे गुन्हेगार असताना ही आणखी विकतची डोकेदुखी कशाला हवी आहे? मेक्सिकन सरकारला त्यांची डोकेदुखी संभाळू दे. शिवाय सॅक्चुअरी सिटी सारखे विकृत प्रकार सॅन फ्रॅन्सिस्कोत बनले आहेत जे इमिग्रेशनच्या कायद्याला सरळसरळ धाब्यावर बसवतात. गेल्या वर्षी सॅन फ्रॅन्सिस्कोत अशा घुसखोर गुन्हेगाराने एका निरपराध तरूण स्त्रीला गोळी घालून मारले. तिच्या आईबापासमोर बेकायदा घुसखोरीचे समर्थन करता येते का पहा!
मेक्सिकोतून येणारे घुसखोर हे काही हार्ट सर्जन, ब्रेन सर्जन, नॅनो टेक्नोलॉजी तज्ञ असे नसतात. अशिक्षित, अर्धशिक्षित, हातावर पोट असणारे लोकच अमेरिकेत बेकायदा घुसतात. अशा लोकांना पोसायची जबाबदारी अमेरिकेवर का?
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 05/30/2016 - 02:18
नवीन
मी असं विधान कुठं केलंय? असो, चर्चा आता ताशेरेबाजीवर उतरली असल्याने माझ्याकडून पूर्णविराम.
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 05/28/2016 - 22:51
नवीन
पण आठ वर्षांनी निदान डेमोक्रॅटिक पक्षाचा कंटाळा आला म्हणून दुसर्या बाजूला चान्स मिळेल ही आशा.
इतका मनस्ताप होण्याचे कारण कळेल का?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 05/28/2016 - 07:20
नवीन
रॉनाल्ड रेगन यांनी १९८० मध्ये मेक्सिकन घुसखोरांविषयी काय म्हटले होते याविषयीचा एक अॅन्करींग पॉईंट मिळावा म्हणून हा व्हिडिओ डकवत आहे.
रेगनही त्याच रिपब्लिकन पक्षाचे आणि दोन सलग टर्म अध्यक्ष होते (१९८१ ते १९८९) आणि अत्यंत लोकप्रियही होते.
- Log in or register to post comments
न
नंदन
Sat, 05/28/2016 - 07:31
नवीन
जज Gonzalo P. Curiel -
जन्म - इस्ट शिकागो, इंडियाना राज्य, इ. स. १९५३
शिक्षण - बी.ए. + Juris Doctor, इंडियाना युनिव्हर्सिटी, इ. स. १९७९
अनुभव -
१९७९ ते १९८९ - प्रायव्हेट प्रॅक्टिस
१९८९ ते २००६ - असिस्टंट यू.एस. अॅटर्नी, कॅलिफोर्निया (*१९८९ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२००६ ते २०१२१ - जज ऑफ सुपिरियर कोर्ट, सॅन डिएगो, कॅलिफोर्निया (*२००६ साली व्हाईट हाऊस आणि कॅलिफोर्नियाचं गव्हर्नरपद रिपब्लिकनांकडे होतं.)
२०१२ ते आतापर्यंत - जज, यू.एस. डिस्ट्रिक्ट कोर्ट ऑफ सदर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्निया (*यू.एस. सिनेट ज्युडिशियरी कमिटी आणि संपूर्ण सिनेटकडून मान्यता)
. . .
गेली सहा वर्षं (२०१० पासून - म्हणजे ट्रम्पने अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचं ठरवलं, त्याच्या कितीतरी आधी), ट्रम्प युनिव्हर्सिटीच्या विरोधात खटला चालू आहे. या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीतून ट्रम्पने भरपूर फी घेऊन ($३५,००० च्या घरात), त्या बदल्यात जाहिरात केलेल्या गोष्टी/कोर्सेस शिकवले नाहीत, असं त्याचं स्वरूप आहे. सध्या ही केस जज गोन्झालो क्युरिअल यांच्यासमोर असून, तिची सुनावणी नोव्हेंबरमध्ये (२०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीनंतर) आहे.
आज सॅन डिएगो शहरात एका सभेत बोलताना, ट्रम्पने जज क्युरिअल यांच्याबद्दल खालील भाष्य केलं:
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Sat, 06/04/2016 - 19:12
नवीन
डॉनल्ड ट्रम्प एका अर्थी आतापर्यंतच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांपेक्षा वेगळे आहेत. रिपब्लिकन पक्ष हा "फ्री मार्केट" वाला म्हणजे उजवा पक्ष समजला जातो. रॉनाल्ड रेगन अशा उजव्यांपैकी सर्वात आघाडीचे अध्यक्ष होते असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक विजेते मिल्टन फ्रिडमन हे एकंदरीतच रिपब्लिकन पक्षाच्या जवळचे समजले जात. याचे कारण मिल्टन फ्रिडमन हे "फ्री मार्केट" चे आघाडीचे पुरस्कर्ते होते.
युट्यूबवर कोणीतरी डॉनल्ड ट्रम्प यांनी परदेशांशी केलेल्या व्यापाराविरूध्द एका मुलाखतीत काय बोलले आहे आणि नेमक्या त्याच मुद्द्यांवर मिल्टन फ्रिडमन यांनी काय म्हटले आहे याचा खाली दिलेला व्हिडिओ बनविला आहे:
१. ट्रम्प म्हणत आहेत की ते अध्यक्ष झाल्यास परदेशातून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील. त्यावर फ्रिडमन म्हणतात-- ट्रेड डेफिसिट ही वाईट गोष्ट अजिबात नाही. फ्रिडमनच्या काळात जपानचा प्रचंड ट्रेड सरप्लस होता. पण जपानने अमेरिकेत निर्यात करून जमा केलेले डॉलर जमा करून त्याचा उपयोग काय केला? तर अमेरिकेतच शेअर/प्रॉपर्टी विकत घेतली. ते वाईट कसे? फ्रिडमनच्या मते फ्री ट्रेड "benefits large group at the expense of small group. However small group is always politically more influential".
२. ट्रम्प परत चीनमधून आयात केलेल्या मालावर आयातकर लावतील असे म्हटले. त्यावर फ्रिडमन म्हणतात की लोकांचा फ्री ट्रेडला विरोध का करतात? त्याचे एक कारण म्हणजे उत्पादकांचा दबाव असतोच पण त्याचबरोबर दोन देशांमधील चलनांच्या Floating Exchange Rate चा नक्की काय परिणाम होईल हे बहुसंख्य लोकांना समजत नाही. तसेच फ्रिडमनने म्हटले आहे की जपानचा ट्रेड सरप्लस जास्त का? कारण जपानचा saving rate अमेरिकेपेक्षा जास्त आहे. आणि एवढ्या सेव्हिंगचे पुढे काय करायचे? तर त्यातून निर्यात वाढते. अर्थातच मिल्टन फ्रिडमन म्हणत आहेत ते एक अर्थशास्त्रीय तथ्य आहे. फ्रिडमनने पुढे हेनरी जॉर्ज या अभ्यासकाने फ्री ट्रेडविषयीचे मत मांडले---"It is a very interesting thing in time of war we blocade our enemies in order to prevent them getting goods from us. In time of peace, we do it to ourselves by tarrif what we do to ourselves in peace what we do to our enemies at the time of war"
आणि अर्थातच डॉनल्ड ट्रम्प यांचे आताचे धोरण रिपब्लिकन पक्षाच्या धोरणापेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने डॉनल्ड ट्रम्प यांना हर्बर्ट हूव्हर (१९२९ ते १९३३ या काळातील अध्यक्ष) यांच्यानंतर फ्री ट्रेडच्या सर्वात जास्त विरोधात असलेला अध्यक्षीय निवडणुकीतील उमेदवार असे म्हटले आहे.
तसेच मेक्सिकन घुसखोरांविषयी मिल्टन फ्रिडमन (आणि वर दिलेल्या व्हिडिओत रॉनाल्ड रेगन) यांच्या मताच्या पूर्ण वेगळे मत ट्रम्प यांचे आहे. फ्रिडमन म्हणतात की immigration नोकरीसाठी होणे आणि वेलफेअरसाठी होणे (सोशल सेक्युरिटी इत्यादी) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर मेक्सिकन घुसखोर अवैधपणे येत असतील तर त्यांना वेलफेअर नक्कीच मिळणार नाही आणि अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात. त्यातून त्या लोकांचे आणि अमेरिकेतील लोकांचेही हितच होते. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे immigration जर बेकायदा असेल तरच ही गोष्ट फायदेशीर ठरेल. जर का त्या लोकांना सोशल सेक्युरिटी आणि तत्सम फायदे मिळायला लागले तर ते फायदेशीर ठरणार नाही.
एका विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर फ्रिडमन यांनी उत्तर दिले---हे मेक्सिकन लोक अमेरिकेत यायला इतकी धडपड करतात याचाच अर्थ त्यांना तिथे मिळेल त्यापेक्षा अधिक चांगले जीवन अमेरिकेत जगायला मिळेल ही खात्री आहे. आणि अमेरिकेत जा म्हणून त्यांच्यावर कोणी सक्ती केलेली नाही. त्यांच्यापुढे मेक्सिकोत राहणे आणि अमेरिकेत जाणे हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी त्यांच्या मते चांगल्या पर्यायाची ते निवड करतात. बेकायदापणे घुसखोरी करणे हा पण फार चांगला पर्याय आहे असे नाही पण तो मेक्सिकोत राहण्यापेक्षा अधिक चांगला आहे (म्हणूनच ते अमेरिकेत जायला धडपडत असतात). आणखी दुसरा मुद्दा म्हणजे अमेरिकन लोकांच्या पूर्वजांनी युरोपातून immigration केल्यानंतर ज्या आव्हानांना तोंड दिले त्याच टप्प्यातून मेक्सिकोतून आलेले लोक जात आहेत.
याविषयी पुढील व्हिडिओ रोचक ठरेल. साधारण तीन मिनिटांनंतर हे सगळे मुद्दे येतील.
म्हणजे डॉनल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाची आतापर्यंतची भूमिका होती त्यापेक्षा वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाच्या पारंपारिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण व्हायची शक्यता नक्कीच आहे. आणि त्यामुळे डेमॉक्रॅटिक पक्षाचे काही मतदार रिपब्लिकन पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहे. आणि डॉनल्ड ट्रम्प यांच्या रॅश पध्दतीमुळे काही रिपब्लिकन मतदार डेमॉक्रॅटिक पक्षाच्या बाजूला वळतील ही पण शक्यता आहेच.
एकूणच ही निवडणूक रोचक होणार आहे हे नक्कीच.
- Log in or register to post comments
व
विकास
Sun, 06/05/2016 - 16:48
नवीन
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 06/06/2016 - 07:33
नवीन
याचे अर्थशास्त्रीय उत्तर इथे देतो आणि राजकीय उत्तर याच प्रतिसादात खाली देतो.
एका मर्यादापुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असणे वाईट. याचे कारण एखादा देश फार प्रमाणावर निर्यातीवर अवलंबून असेल आणि ज्या देशांमध्ये निर्यात केली जात आहे त्या देशांमध्ये मंदी आली तर त्याचे परिणाम त्या देशावर होतात. चीनने इतकी वर्षे निर्यातीवर आधारीत अर्थव्यवस्था ठेवली आहे आणि देशांतर्गत consumption वाढवायचा तितका प्रयत्न केलेला नाही. पूर्वी चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेपुढे लहान होती तेव्हा ते चालून गेले. पण मधल्या काळात अमेरिका आणि युरोपमध्ये मंदी आल्यामुळे तिथून मागणी कमी झाली. चीनमध्ये स्लोडाऊन आला आहे त्यात हे पण एक कारण आहेच. त्यामुळे झाले असे की २०१२-१३ च्या काळात जगाची गाडी पूर्वीप्रमाणे रूळावर आणायला इंजिन म्हणून अमेरिका सक्षम नव्हती, युरोप तर नाहीच. चीनमध्ये ती क्षमता होती पण या कारणामुळे चीनही ते काम करू शकले नाही आणि याचा सगळ्यांवरच परिणाम झाला.
नोव्हेंबर २००८ मध्ये आर्थिक संकटावर उपाय शोधायच्या दृष्टीने पिट्सबर्गमध्ये जागतिक नेत्यांची (जी-२०) परिषद भरली होती. त्यावेळी मनमोहनसिंगांनी हेच मत मांडले होते. रघुराम राजन यांनीही एका मर्यादेपुढे ट्रेड imbalance (deficit/surplus) असू नये असेच म्हटले आहे. पण फ्री ट्रेडला विरोध करणारे (ट्रंप, सँडर्स इत्यादी) या कारणामुळे विरोध करत नाहीत. वर दिलेल्या व्हिडिओत तर ट्रंप म्हणत आहेत-- अमेरिका चीनला श्रीमंत व्हायला हातभार लावत आहे आणि अमेरिकेतून पैसे बाहेर जात आहेत म्हणून फ्री ट्रेड वाईट.
एक उदाहरण म्हणून असे समजू की अमेरिकन ग्राहकांनी वॉलमार्टमधून १ लाख डॉलरच्या मेड इन चायना वस्तू खरेदी केल्या. हे १ लाख डॉलर चीनमध्ये गेले. त्याचे चीन काय करेल?
१. १ लाख डॉलरच्या अमेरिकन उत्पादनांची खरेदी करेल (डेल कॉम्प्युटर, फोर्ड- जी.एम इत्यादी गाड्या, जी.ई किंवा रोल्स रॉईस इत्यादी कंपन्यांची इंजिनिअरींग उपकरणे इत्यादी) किंवा १ लाख डॉलरच्या अमेरिकन सेवांची खरेदी करेल (सॉफ्टवेअर लायसन्सेस इत्यादी)
२. १ लाख डॉलरचे शेअर किंवा बाँड अमेरिकेत खरेदी करेल
यापैकी (१) मध्ये ट्रेड डेफिसिट शून्य असेल कारण जेवढी वस्तूंची/सेवांची आयात तेवढीच निर्यात असेल. (२) मध्ये ट्रेड डेफिसिट १ लाख डॉलर असेल कारण १ लाख डॉलरचे शेअर/बाँड घेतले तर ते आयात/निर्यातीच्या करंट अकाऊंटमध्ये नाही तर कॅपिटल अकाऊटमध्ये गणले जातात. मग १ लाख डॉलरची आयात तितकी वाईट आहे का?
दुसरे म्हणजे चीनने अमेरिकन सरकारचे बाँड मोठ्या प्रमाणावर घेतले आहेत त्याचा अमेरिकेला काहीच फायदा झाला नाही का? त्यातून बाँडची मागणी वाढून किंमती वाढल्या आणि अमेरिकन सरकारला बाँडवर व्याज कमी द्यावे लागले. अमेरिकन लोक एकूणच बचत वगैरे करायच्या फार भानगडीत पडत नाहीत. हा त्यांचा स्वभाव झाला.एका अर्थी चीन किंवा इतर देशांनी घेतलेल्या बाँडमुळे अमेरिकन लोकांच्या भरमसाठ consumption ला हातभार लागला नाही का? त्याउलट चीनमध्ये इतकी वर्षे लोक मोठ्या प्रमाणावर बचत करत होते (यापुढे काही वर्षे देशात वृध्दांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे हे प्रमाण पूर्वीपेक्षा कमी राहिल). एवढे वाचलेले पैसे घेऊन चीन काय करत होते? तर त्यातून निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर इन्व्हेस्टमेन्ट करत होते आणि निर्यात वाढवत होते.
तेव्हा मिल्टन फ्रिडमनचा हाच दावा आहे. त्यावेळी जपानमध्ये (आणि नंतर चीनमध्ये) बचतीचा दर जास्त होता आणि अमेरिकेत तो कमी होता हे ट्रेड डेफिसिटचे मोठे कारण आहे.तेव्हा चीनमधील आयातीवर आयातकर लावू, याच्यावर बंदी टाकू, त्याच्यावर बंदी टाकू इत्यादी म्हणणे म्हणजे साप साप म्हणून जमीन धोपटण्यासारखे झाले. जे काही होत आहे त्याचे कारण अन्यत्र नाही तर आपल्यातच दडलेले आहे हे यांना कोण आणि कसे समजावणार?
पण तसा धोका निर्माण करताना चीनला स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारावी लागेल त्याचे काय? इतक्या मोठ्या प्रमाणावर निर्यात अमेरिकेत होत असल्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या सशक्त असण्यातच चीनचे हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळेच २००८-०९ मध्ये चीनच्या सॉव्हरीन वेल्थ फंडने मॉर्गन स्टॅनले सारख्या संस्थांमध्ये गुंतवणूक करून त्या संस्थांना एका अर्थी हात दिला. कारण त्यावेळी अमेरिकेत आणखी संकट गडद होणे चीनलाही परवडणारे नव्हते. आणि स्वतःला दुप्पट नुकसान झाले तरी दुसर्यांना थोडेतरी नुकसान करायचे ही मनोवृत्ती चीनची असेल असे वाटत नाही. (ती मोनोपॉली पाकिस्तान, इसिस आणि तत्सम प्रवृतींकडे).
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 06/08/2016 - 22:01
नवीन
एखाद्या बोटीला एक मोठे भोक पडले असेल तर बोटीतले पाणी उपसणे महत्त्वाचे आहे पण तितकेच किंवा त्याहून जास्त महत्त्वाचे ते भोक बंद करणे आहे. कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही.
बोटीला पडलेले भोक हे बोटीचे भूषण आहे असे मानणारे लोक फार असल्यामुळे भगदाड बुजवण्याच्या विचाराला नाके मुरडली जातात! ट्रंपला तसे वाटत नाही आणि बहुतांश लोक त्याच्या मागे आहेत.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 06/08/2016 - 22:30
नवीन
अजून तुम्ही मला या प्रतिसादाला उत्तर दिलेले नाही. थकले रे डोळे माझे अशी अवस्था झाली आहे हो! ;)
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 06/09/2016 - 18:11
नवीन
ओबामा अनेक पातळीवर निराशाजनक ठरला आहे. ग्वांटानमो बे चा बेकायदा तुरुंग बंद करायचे आश्वासन पाळले नाही. ओसामाला ठार केल्यावर अतिरेकी इस्लामचे लांगूलचालन करायचा सपाटा लावला. बेनगाझी प्रकरण हे त्याचे मोठे उदाहरण. कायद्याच्या कचाट्यात कोणी सापडेल का नाही ते नंतर पाहू. पण अमेरिकन सरकारचे वागणे नैतिकदृष्ट्या अत्यंत चूक होते. मुस्लिम दहशतवाद मुस्लिम नाहीच असे म्हणायचा आडमुठेपणा आणि ढोंगीपणा. हा अत्यंत घातक आहे.
सिरियातून अमाप संख्येने निर्वासित घेण्याचा ओसंडून जाणारा उत्साह. ह्यातले ०.००१ टक्के जरी अतिरेकी असतील तरी मला तो धोका पत्करावासा वाटत नाही. उलट सौदी अरेबियासारख्या तथाकथित मित्रराष्ट्राला त्यांना मदत करावी म्हणून दबाव आणायला हवा होता. इथेही ओबामा बेजबाबदार आहे.
बेकायदा घुसखोरीचे तर विचारूच नका. कुठल्याही प्रकारे ह्या प्रकाराला आळा घालायचे धोरण आखले जात नाही. घुसखोर हे अमेरिकन नागरिकांपेक्षाही श्रेष्ठ आहेत की काय अशी शंका येत आहे.
पुरुष स्त्री ह्यांची स्वच्छतागृहे वेगळी असू नयेत ह्या करता कायदा बदलणे हे पॉलिटिकल करेक्टनेसचा अतिरेक करण्याचे उदाहरण. अमेरिकेपुढे बाकी प्रश्न नाहीत का की हा इशू उकरुन काढावा? किती लोकांना ह्या धोरणाचा फायदा होणार आहे आणि किती लोकांना त्रास होणार आहे ह्याचा विचार केला आहे का?
अल्पसंख्यांकाचे लांगूलचालन हेही डोईजड वाटू लागले आहे. अनेक अल्पसंख्य संघटना ज्यांचे वागणे, विचार हे हिंसक, घातक आहेत त्यांच्याशी वागताना बोटचेपेपणा केला जात आहे.
मलातरी ह्यात बदल झालेला आवडेल. पण एकंदरीत तसे होणे अवघड दिसते आहे. हिलरीचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Wed, 06/08/2016 - 22:44
नवीन
कितीही जोरात पाणी उपसले तरी जोवर ते भगदाड बुजत नाही तोपर्यंत त्या पाणी उपसण्याचा हवा तो परिणाम होणार नाही.
तुम्ही कुठं राहता याची मला कल्पना नाही. पण इतका तळतळाटाने बोलणे चालले आहे म्हणून कदाचीत अमेरीकेत राहत असाल असे गृहीत धरतो. अर्थातच अधिकृतपणे रहात असाल असेच समजतोयं, कल्जी नसावी! पण टाईम्समधील बातमीनुसार २०१२ च्या आकडेवारीनुसार जवळपास ४५०,००० बेकायदेशीर भारतीय रहात आहेत. म्हणजे मग आता ते कसे बंद करायचे म्हणे?
तुम्ही जे भगदाड वाटतयं ते खालील माहितीप्रमाणे कमी झालयं हो!
हा तर ग्राफ अजूनच गंमतशीर आहे!
अर्थात तुम्हाला हिटलरशाहीच हवी असली तर गोष्ट वेगळी.
आणि हो, डाव्यांना विरोध असला तर समजू शकतो. तो तसा माझा पण असतो पण आंधळा व्देष करणे मला तरी जमत नाही. त्यांच्याकडून जे काही घेता येते ते मी घेयचा प्रयत्न करतो. असो.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
गुरुवार, 06/09/2016 - 18:18
नवीन
मुद्दे संपले की विरोधकांना हिटलरशाही हवी आहे वगैरे कांगावा करायचा शॉर्टकट चांगला आहे! मीही वापरून बघीन कधीतरी! असो.
बेकायदा घुसखोरी ही कमी होते आहे का जास्त. शून्य आहे का लाखात हा मुद्दा गौण आहे. सीमेचे रक्षण करणे ही अमेरिकन सरकारची जबाबदारी आहे. घुसखोरांची संख्या आपोआप कमी होते आहे का नाही हे न बघता सीमा सुरक्षित केली गेलीच पाहिजे. मग भिंत बांधा वा कुंपण. जे येणार ते कायदा पाळूनच आले पाहिजेत. कुणीतरी किती लोकांची गरज आहे, काय प्रकारचा अनुभव पाहिजे, जे येत आहेत त्यांची पार्श्वभूमी काय आहे हे सगळे तपासून मगच त्यांना प्रवेश दिला गेला पाहिजे. कुणीही यावे आणि अमेरिकेत घुसावे ह्याला विरोध म्हणजे हिटलरशाही अशी आपली व्याख्या असेल तर आपण एकदा हिटलरचा आणि त्याच्या नाझी संघटनेचा नीट अभ्यास करावा असा माझा अनाहूत सल्ला आहे.
बेकायदा भारतीय अमेरिकेत येत असतील तर त्यावरही उपाय केलाच पाहिजे. दंड, तुरुंग, हकालपट्टी जे काही उचित आहे ते. पण बेकायदा मेक्सिकनचा मुद्दा असताना बेकायदा भारतीयांकडे बोट दाखवून बेकायदा मेक्सिकन घुसखोरीचे समर्थन करणे हे मला पटत नाही. दुसरया चुकीमुळे पहिली बरोबर ठरत नाही. उघडी सीमा ही जास्त धोकादायक आहे. विमानाने वा बोटीने येणारे घुसखोर आवरणे तुलनेने सोपे आहे असे माझे मत (बहुधा ही हिटलरशाही नसावी!).
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Sat, 06/04/2016 - 21:16
नवीन
फ्रिडमनने बेकायदा घुसखोरीचे समर्थन करायचा जो प्रयत्न केला आहे तो अत्यंत दयनीय आणि केविलवाणा आहे.
>>अमेरिकन लोक जी कामे ज्या पगारावर करायला कधीच तयार होणार नाहीत त्या गोष्टी हे मेक्सिकन लोक करतात.
हा एक आवडता गैरसमज. तमाम मेक्सिकन लोक जे लाखोंच्या संख्येने दरवर्षी घुसतात ते सगळे "अमेरिकन लोक ज्या पगारावर काम करणार नाहीत" त्या पगारात काम करण्याच्या निश्चयाने कटिबद्ध होऊनच घुसतात ह्याला काय आधार आहे? काही लोक तसे करत असतील. काही हतबल लोक गुन्हेगारी करतात. काही सोशल वेल्फेअरचा गैरफायदा घेऊन सरकारला (म्हणजे अमेरिकन करदात्यांना) लुटतात. अनेक वर्षे कामे केल्यावर ते धंदे करतात आणि अशाच असहाय लोकांना नोकरीवर ठेवतात. अनेक बांधकाम व्यावसायिक तक्रार करतात की मेक्सिकन लोकांनी एक रॅकेट बनवले आहे आणि अन्य कोणाला त्या व्यवसायात शिरणे अवघड होत चालले आहे.
मेक्सिकन लोकांना बेकायदा अमेरिकेत घुसायला आवडते म्हणून ते अमेरिकन लोकांना त्यांचे येणे आवडलेच पाहिजे हे तर्कट माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. आयसिसच्या लोकांना अमेरिकन लोकांनी इस्लाम कबूल केलेला आवडेल म्हणून अमेरिकन लोकांनी तेही करावे की काय?
आता नवनवे रोग जे दक्षिण अमेरिकेत निर्माण होतायत ते हळूहळू अमेरिकेत येऊ लागले आहेत. बेकायदा घुसखोरीत कुठलीही वैद्यकीय तपासणी होत नाही त्यामुळे हे घातक रोग येतच रहाणार.
ह्या आणि असल्या ढुढ्ढाचार्यांचे मत काहीही असले तरी ठोस व्यावाहारिक कारणामुळे सामान्य अमेरिकन लोकांना बेकायदा घुसणे साफ नापसंत आहे. म्हणूनच ट्रंपसारखा उमेदवार जोरदार आघाडी घेताना दिसतो आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 06/06/2016 - 07:51
नवीन
ठिक आहे. त्याचप्रमाणे एकेकाळी मुंबईतल्या मराठी अनेक माणसांनीही राज ठाकरे सारख्या गुड फॉर नथिंग माणसालाही भरभरून समर्थन दिलेच होते.समजा सगळ्या 'भय्यांना' हाकलून दिले असते तर त्याच राठा समर्थकांना इस्त्रीवाले, दूधवाले, भाजीवाले आणि अन्य अनेक वाले कमी पडले असते. मेक्सिकन लोकांच्या बाबतीत अमेरिकेत तीच परिस्थिती आहे का? मला माहित नाही. याविषयी तिथे राहणारेच मिपाकर अधिक सांगू शकतील. पण नन्द्या यांच्या या प्रतिसादावरून तसे वाटत आहे खरे.
बाकी मिल्टन फ्रिडमनना त्यांच्या काळातच प्रचंड विरोध झाला होता. १९७६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले त्यावेळीही त्याविरोधात निदर्शने झाली होती.पण ते जे म्हणत होते त्यातला बहुतांश गोष्टी लोकांना बर्याच काळाच्या गॅपनंतर कळल्या. असो.
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 06/08/2016 - 15:35
नवीन
आपला गोंधळ होतो आहे का? राज ठाकरे आणि भैय्या विरोध ह्यात आणि ट्रंप आणि मेक्सिकन घुसखोर ह्यात एक मोठा फरक आहे. उत्तर प्रदेश, बिहार ही राज्ये भारताचा अविभाज्य घटक आहेत. मी शेवटचे बघितले तेव्हापर्यंत मेक्सिको हे स्वतंत्र राष्ट्र होते. आपल्याला असे वाटते का की मेक्सिको हे अमेरिकेचे राज्य आहे? तसे ते नाही. हा मोठा फरक आहे. त्यामुळे भय्या लोकांना कायद्याचे पाठबळ आहे. बेकायदा मेक्सिकन घुसखोरांना ते नाही. बेकायदा मेक्सिकन लोकांना हाकलले तर अमेरिकेचा बट्ट्याबोळ होईल हे गृहितक अत्यंत खोटे आहे. जर बेकायदा घुसखोरी इतके सोन्याच्या मोलाचे वरदान असते तर कुणीतरी अमेरिका मेक्सिकोच्या सीमा पूर्णपणे उघडून द्याव्यात. सध्या गुंडांच्या टोळ्या लाच घेऊन लोकांना सीमा ओलांडायला मदत करतात. त्यात असहाय बायका मुले ह्यांच्यावर अत्याचारही होतात. आणि अमेरिकेत आल्यावर शोषणही होते.
आजही अगदी डेमोक्रॅटही असा कायदा आणू धजत नाही की कुणीही या आणि घुसा अमेरिकेत आणि करा अमेरिकेची भरभराट! कारण तसे केले तर पुढची निवडणूक हरणार हे नक्की. त्यामुळे बेकायदा घुसखोरीकडे दुर्लक्ष करून आपण लॅटिनो लोकांचे तारणहार असल्याची टिमकी वाजवायची! ट्रंप ती वाजवत नाही म्हणून तो रेसिस्ट! छान.
नोबेल पारितोषिकाचा दाखला देऊन फ्रिडमन म्हणाला ते खरे असणार असे म्हणत आहात का? अहो, ओबामाला नोबेलचा शांतता पुरस्कार मिळाला होता म्ह्णून तो ८ वर्षात शांतिदूत झाला का? नोबेल हा काही मापदंड नाही की जो मिळाल्यावर आपण जे बोलू ते खरेच ठरावे. त्याऐवजी ठोस मुद्दे मांडून बेकायदा घुसखोरी ही अमेरिकेकरता सोन्याची खाण कशी आहे आणि त्यामुळे अमेरिकेत लक्ष्मीची पावले कशी उमटत आहेत ते सांगा. नोबेलचे दाखले नकोत.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Wed, 06/08/2016 - 17:54
नवीन
छे हो. नोबेलचा उल्लेख इथे का आला? कारण तुम्हीच मिल्टन फ्रिडमनना ’ढुढ्ढाचार्य’ की काहीतरी म्हणाला होतात. त्यावर म्हणणे इतकेच की फ्रिडमनच्या हयातीतच त्यांना प्रचंड विरोध झाला होता आणि त्याचे एक उदाहरण म्हणून नोबेल पारितोषिक द्यायच्या समारंभाच्या वेळी बाहेर निदर्शने झाली होती.
मी बेकायदा घुसखोर हे सोन्याची खाण आहे आणि त्यांच्यामुळे लक्ष्मीची पावले उमटत आहेत वगैरे काहीही म्हटलेले नाही. उगीच काहीतरी चिकटवायचा प्रयत्न करू नका. माझे म्हणणे इतकेच की लो पेईंग नोकऱ्यांसाठी जर पुरेसे अमेरिकन मिळत नसतील तर तिथे मेक्सिकन लोक कामाला येतात. आणि जर का त्या कामासाठी पुरेसे अमेरिकन मिळत असतील तर त्यांना खुशाल हाकलून द्या किंवा मेक्सिकन लोक गुन्हेगारी/दहशतवादामध्ये सामील असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे केले तरी काही म्हणायचे नाही हे लिहिलेले वाचले नाहीत का?
असो. २००७ मध्ये ऍरिझोना राज्याने घुसखोरांविरूध्द कडक कायदा पास केला. याविषयी युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफॉर्नियामधील सारा बॉन आणि इतर दोघांनी या कायद्यामुळे मेक्सिकन लोक त्यांच्या देशात हाकलले गेले त्यावर नक्की काय परिणाम झाला यावर एक पेपर लिहिला आहे. त्यातील निष्कर्ष पुढीलप्रमाणे: "Our results suggest that contrary to its intent, the Legal Arizona Workers Act does not appear to have improved labor market outcomes of competing legal low-skilled workers. In fact,we find some evidence of diminished employment and increased unemployment among legal low-skilled workers in Arizona. These findings are concentrated on the largest demographic group of workers – non-Hispanic white men. While they are less likely to find employment, those who do have on average higher earnings as a result of LAWA". म्हणजे काय की या कायद्यामुळे आर्थिक व्यवहार घटले त्यामुळे लो पेईंग नोकऱ्या कमी झाल्या. ज्या काही थोड्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना पगार जास्त मिळाला. एकूणच काय की या प्रकारामुळे मिनिमम वेज वाढविल्यामुळे होईल तो परिणाम झाला (माझा निष्कर्ष). आणि असा परिणाम होणे चांगले आहे का? हा पेपर https://gspp.berkeley.edu/assets/uploads/research/pdf/p82.pdf वर आहे. इतरही अभ्यास झाले आहेत पण त्यासाठी त्या जर्नलचे subscription घ्यावे लागेल त्यामुळे ते पेपर मी इथे देऊ शकत नाही.
आता हा ठोस मुद्दा नाही असे म्हणायला तुम्ही मोकळे आहातच. पण निदान या बाबतीत I rest my case.
बाकी राज ठाकरेचा मुद्दा समकक्ष नाही हे मान्य. तो पण मुद्दा का आला? कारण तुम्हीच म्हटले आहे की फ्रिडमनसारख्या ’ढुढ्ढाचार्यांचे’ म्हणणे काहीही असले तरी सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर ट्रम्पना पाठिंबा देत आहेत. त्यावर माझा मुद्दा हा की सामान्य लोक मोठ्या प्रमाणावर पाठिंबा देत आहेत हा मुद्दाही तितकासा योग्य नाही. कारण सामान्य लोक अनेकदा अशा डेमॉगॉगना भरभरून पाठिंबा देत असतात. राज ठाकरेंचे नाव लिहिण्याच्या आधी मी केजरीवाल लिहिले होते. पण त्यामुळे केजरू समर्थक अंगावर येऊन चर्चा भरकटू नये म्हणून ते नाव काढले.
म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का?
- Log in or register to post comments
ह
हुप्प्या
Wed, 06/08/2016 - 21:54
नवीन
>>
म्हणजे मजा बघा. नोबेल पारितोषिक हा एखाद्याचे म्हणणे बरोबर आहे याचा मापदंड नाही हे तुम्ही म्हणता.त्याविषयी मतभेद असायचा प्रश्नच नाही. पण मग त्याबरोबरच सामान्य लोकांचे मतही डोळे झाकून न घेता pinch of salt ने घेणे योग्य नाही का?
<<
लोकशाही मग ती अमेरिकन वा भारतीय कुठलीही असो. सामान्य लोकांच्या मतावरच सरकार बनते. सामान्य लोकांना डावलून चालत नाही. नोबेल पुरस्कार विजेत्यांचे तसे नाही. जर सामान्य लोकांनी झुंडशाही करुन कुणाच्या हक्काची पायमल्ली केल्यास त्यावर दाद मागायला न्यायालये आहेत. जर बेकायदा घुसखोरीवर बंदी घालून कुणाच्या मूलभूत, सांविधानिक हक्कावर गदा येते असे म्हणणे असल्यास न्यायालये आहेत. पण कुणी तसे केलेले दिसत नाही. निव्वळ एक रिसर्च पेपर, निव्वळ एका नोबेल पुरस्कार विजेत्याचे मत ह्याच्या जोरावर सीमा पुसून टाका, देश ही संकल्पना पायदळी तुडवा, कुणीही यावे आणि अमेरिकेत वसावे असा खुलेपणा दाखवावा हा खुळचटपणा आहे.
जर बेकायदा घुसखोरी हे अमेरिकेकरता एक अनमोल वरदान आहे आणि त्यातूनच अमेरिकेची अफाट भरभराट होणार आहे असा विश्वास असेल तर ते लोकांना पटवा, त्या मुद्द्यावर निवडणुका लढा व जिंका व नवी धोरणे राबवा वा खटले लढा , ते जिंका आणि कायदे बदला.
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Mon, 06/06/2016 - 09:13
नवीन
ट्रुमन साहेब, हे लॉजिक कधी अमेरीकेसाठी चांगले असेल जेंव्हा मध्य पूर्वे सारखे त्यांना काम संपले की पुन्हा मेक्सीको मधी जायला लागेल, आयुष्यात कधीही त्यांना आणि त्यांच्या मुलांना सिटीझनशिप मिळणार नाही.
फक्त आर्थिक बाजु बघितली की असे होते, त्याचा सामाजिक परीणाम नको बघायला? पूर्ण समाजाचा ढाचाच बदलुन जातो जेंव्हा दुसर्या भिन्न संस्कृतीची लोक घुसतात तेंव्हा. आसामचे / बंगालचे उदाहरण आहे ना. ते दाखवा फ्रीडमन साहेबांना.
आता कोकणात पण बांधकाम मजुन बांग्लादेशी आहेत, ते काय परत जाणारेत?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 06/06/2016 - 09:25
नवीन
कसं दाखवणार हो? फ्रिडमनसाहेब २००६ मध्येच गेले की!!
असो. बांगलादेशातील भारतात होणारी घुसखोरी आणि मेक्सिकन लोकांची अमेरिकेत होणारी घुसखोरी याच्यात तुलना कशी करता येईल? एक तर अमेरिका आणि मेक्सिको यांच्यातील आर्थिक सुबत्तेत कित्येक पटींनी फरक आहे तेवढा फरक भारत आणि बांगलादेशात आहे का? त्यामुळे होते असे की काही प्रकारची कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नसतील तर ती कामे करायला मेक्सिकन लोक मिळू शकतात.भारतातील परिस्थिती लक्षात घेता अशा कामांसाठी बाहेरच्या देशातील कोणाचीही गरज भारतात नाही. आणि जर का त्या रेटमध्ये अशी कामे करायला स्थानिक अमेरिकन लोक तयार असतील तर मेक्सिकन लोकांनाही हाकला की. काय फरक पडतो? मी पूर्वी अमेरिकेत काही वर्षे राहिलो आहे आणि भविष्यात परत तिथे जाईन याची फार शक्यता नाही.त्यामुळे मला सध्याची परिस्थिती माहित नाही.पण नन्द्यांसारखे ४५ वर्षांपासून अमेरिकेत राहात असलेले मिपाकर जर म्हणत असतील की अशी कामे करायला अमेरिकन लोक तयार होत नाहीत तर त्यात तथ्य असले पाहिजे असे मला पामराला वाटते.
दुसरे म्हणजे भारतात घुसलेले बांगलादेशी अनेक प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया, दहशतवाद इत्यादींमध्ये सामील असतात (आठवा दिल्लीतील डॉ. पंकज नारंग यांची हत्या). तसे मेक्सिकन लोक करत असतील तर त्यांना अमेरिकेतूनच नव्हे तर पृथ्वीतलावरूनच नाहिसे करा.काहीही म्हणणे नाही.
- Log in or register to post comments
ग
गंम्बा
Mon, 06/06/2016 - 09:48
नवीन
हे वाक्य पण बघा की साहेब.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
Mon, 06/06/2016 - 10:08
नवीन
अमेरिकेला मेल्टिंग पॉट की काहीतरी म्हणतात ना?संस्कृती वगैरे गोष्टी अमेरिकेत कधीपासून महत्वाच्या झाल्या?
आणि खुद्द अमेरिकेचेच बोलाल तर नेटिव्ह लोकांचे शिरकाण करूनच गोर्यांनी अमेरिका स्थापन केली ना? अमेरिकेचा मोठा भाग १८४८ मध्ये अमेरिकेने मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. टेक्सस, न्यू मेक्सिको, अॅरिझोना, कॅलिफॉर्निया, नेवाडा, युटा, कोलोरॅडोचा अर्धा भाग आणि इतकेच काय तर वायोमिंगसारख्या उत्तरेकडील राज्याचाही दक्षिणेतला थोडा भाग १८४८ मध्ये मेक्सिकोकडून जिंकून घेतला होता. त्या भागातील मेक्सिकन ओरिजीनच्या लोकांचे काय झाले? याविषयी कोणाला माहित आहे का? ते अमेरिकन झाले की मेक्सिकोत हाकलले गेले की त्यांचेही शिरकाण झाले? अशावेळी भिन्न संस्कृतीचे लोक घुसल्यामुळे बदल झाले नव्हते वाटते? पूर्वीच्या गोष्टी परत परत उगाळण्यात अर्थ नाही हे ठिक आहे पण मग अमेरिकेत मेक्सिकन घुसत असतील तर तो निसर्गाचा न्याय म्हणायचा का? असो.
- Log in or register to post comments
न
नंदन
Mon, 06/06/2016 - 10:26
नवीन
'Then they came for me—and there was no one left to speak for me.' ही ओळ किती फिट्ट बसते ना इथे?
जॉर्ज लोपेझ या एका अमेरिकन स्टँड-अप कॉमेडियनचा प्रसिद्ध किस्सा आठवला:
प्रश्नः George, what part of Mexico are your ancestors from?
उत्तरः LOS ANGELES, #&*@$!
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »