मोदींच्या काही चुका
पंतप्रधान, नरेंद्र मोदी, यांनी त्यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत ज्या चुका केल्या त्याचा आढावा घेण्याचा हा प्रयत्न आहे. प्रस्तुत लेखक, मोदी समर्थक वा मोदीद्वेष्टा, दोन्हीही नसल्यामुळे, एका सामान्य नागरिकाच्या नजरेने जे वाटते, ते लिहित आहे. यांत सर्वच मुद्द्यांचा परामर्ष घेतला आहे, असा माझा दावा नाही. मिपाकर त्यांत मोलाची भर घालू शकतात.
१. बीफ प्रकरणांत, भाजपातले अतिरेकी देशभर गोंधळ घालत असताना, मोदींनी वेळीच हस्तक्षेप करायला हवा होता आणि इतके दिवस जे धोरण चालू आहे तेच यापुढेही चालू राहील, हे स्पष्टपणे सांगायला हवे होते. खाण्यापिण्याच्या बाबतीत हे सरकार, कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करणार नाही, हे ठासून सांगणे आवश्यक होते.
असे केले असते तर, त्यानंतर असहिष्णुतेवरुन झालेली पुरस्कारवापसीही टळली असती.
२. जे.एन.यु. प्रकरणांत, भारतविरोधी घोषणा झाल्यावर, खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायला हवा होता. घोषणा देणार्या विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा न लावता, सुप्रीम कोर्टाचा अनादर केल्याचा गुन्हा, वा तत्सम योग्य कलमाद्वारे गुन्हा दाखल करुन पुरले असते. बाकी मिडिया ट्रायल चालूच राहिली असती, पण सरकार बदनाम झाले नसते.
३. 'मनकी बात'चा अतिरेक होतोय, असे लोकांना वाटायच्या आंत तो कार्यक्रम बंद करायला हवा होता. तिथे भरभरुन बोलायचे आणि महत्वाच्या प्रश्नांवर मौन बाळगायचे, हा प्रकार अनाकलनीय आहे.
४. लोकसभा व राज्यसभा नीट चालावी असे वाटत असेल तर काँग्रेसला सतत टोमणे मारणे बंद करायला हवे होते. काँग्रेसने गेल्या साठ वर्षांत केवळ वाईटच गोष्टी केल्या आहेत, हा अपप्रचार आहे. त्यांच्या चांगल्या गोष्टींचा उल्लेख केला असता, तर इतके कटु वातावरण झालेच नसते.
५. भाजपातल्या, मूर्खपणाची बडबड करणार्या लोकांची जाहीरपणे कानौघाडणी करुन, त्यांना गप्प करायला हवे होते.
अर्थात, आत्तापर्यंत झालेल्या कारभारात काहीच चुकले नाही, असे त्यांना वाटत असेल तर, वरील सर्व मुद्दे गैरलागू होतात.
💬 प्रतिसाद
(184)
श
श्रीगुरुजी
Fri, 03/11/2016 - 16:33
नवीन
केंद्र सरकारची २ वर्षे पूर्ण झाल्यावर २ वर्षात झालेल्या चुका व चुकलेले निर्णय यावर धागा लिहायचा विचार होता. पण हा धागा आधीच आला. या लेखात चुका म्हणून लिहिलेल्या मुद्द्यात फारसा दम नाही. अनेकांनी त्यावर सविस्तर लिहिले आहे त्यामुळे नवीन काही लिहित नाही. काही निर्णय जाणताअजाणता नक्कीच चुकलेले आहेत, परंतु त्यांचा इथे उल्लेख दिसत नाही.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 03/11/2016 - 17:13
नवीन
तुमच्या लिखाणाचे फॅन आहोत .
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Fri, 03/11/2016 - 17:22
नवीन
परत नवा एपिसोड करताय काय हो कपिलमुनी ?? :D :D
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 03/11/2016 - 16:42
नवीन
तिकडे सीमेवर सैनिक गोळ्या खातायत आणि इकडे लोक मोदींच्या चुका काढतायत.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 16:48
नवीन
मोदींची, मोदीभक्तांची, मोदी समर्थकांची, झालतर अगदी मोदी टायर्स, मोदी धाग्यांची पण थट्टा केलीत, त्यांना ridicule केले म्हणून हरकत नाही. आनंदाने करा. अशीच थट्टा तुम्हाला करता यावी म्हणून पुढच्या निवडणुकीत देखील व्यवस्था केली जाईल... :)
पण आशा करतो, यात सीमेवर गोळ्या खाण्यार्या सैनिकांना ridicule केले जात नाही आहे...
- Log in or register to post comments
न
नितिन थत्ते
Fri, 03/11/2016 - 16:59
नवीन
सैनिकांना ridicule केल्यासारखे का वाटले? मी तर मोदी द्वेष्ट्यांना सांगत होतो.....
- Log in or register to post comments
ग
गरिब चिमणा
Fri, 03/11/2016 - 16:50
नवीन
हा हा हा ,तुम्हालाच प्रश्न विचारतो ,५६ इंचाची छाती काय करतेय??
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 17:41
नवीन
सीमेवर गोळ्या? यमुनेच्या तीरी घरगड्यासारखी राबवल्या जात आहेत. स्वयंघोषित देशभक्त अळीमिळी गुप्प्चिळी करुन बसलेत. आता लष्कराचा अपमान होत नाहीये. घोषणा दिल्या की होतो.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/11/2016 - 18:15
नवीन
कोणत्याही एका चुकीने दुसर्या चुकीचे समर्थन होत नाही. या कार्यक्रमास इतर देशांचे राजप्रमुख येत असतील तर त्यांच्या संरक्षण आणि प्रोटोकॉल्स दृष्टीने सुविधा द्यावी म्हणून लष्कराची मदत घेणे आवश्यक झाले असू शकते तर ठिक आहे पण तसे विशीष्ट कारण नसेल तर लष्कराला खाजगी संस्थेच्या कार्य करावयास दिले असल्यास प्रशस्त ठरत नसावे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:25
नवीन
हा कार्यक्रम सरकारी आहे काय? सरकार आयोजक आहे काय? त्या कोणा राजप्रमुखांना सरकारने आमंत्रण धाडले आहे काय? कुणीही उपटसुंभ स्वतःच्या हिरोगीरीसाठी आरती ओवाळुन घ्यायचे कार्यक्रम घ्यायला लागला तर लष्कर काय ही असली कारणे देऊन राबवले जाणार काय? जे चूक आहे त्याला स्पष्ट चूक म्हणण्याची तरी तयारी दाखवायला हवी. नरो वा कुंजरोवा अपेक्षित नाही.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/11/2016 - 18:36
नवीन
राजप्रमुख व्यक्तिगत दौर्यावर जरी आले तरीही प्रोटोकॉल्स पाळावे लागतात सहसा पाळले जातात, देशाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय राजकारणातील डिप्लोमसीचा राजकीय संबंध राखण्याचा भाग असतो. सरकारी आमंत्रण दिले नसेल तरीही राजप्रमुखांनी भेटीची इच्छा कळवली तर आमंत्रणाची अथवा स्वागताची फॉर्मॅलिटी शक्यतोवर पाळली जाते. दुसर्या देशाच्या राजप्रमुखांची आवभगत देशाच्या संबंधाच्या दृष्टीने केली जाते, खाजगी संस्थांना अथवा राजकीय पक्षांना काय फायदे पोहोचतात हे सहसा गौण असते.
अर्थात शत्रुराष्ट्रे आणि देशाच्या अंतर्गत गोष्टीत हस्तक्षेप होण्याची शक्यता असेल तर स्वागत टाळले जाते खाजगी आमंत्रणेही रद्द होतील हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिले जाते. या सर्व गोष्टी सर्वच देश करत असतात.
- Log in or register to post comments
म
माहितगार
Fri, 03/11/2016 - 18:17
नवीन
त.जो. कन्हैय्याने केलेल्या अपमानाची आणि सैनिकांकडून एखादे काम करुन घेतल्याची बरोबरी होत नाही उलटपक्षी कन्हैय्या म्हणतो त्यापेक्षा वेगळी कामे भारतीय लष्कर करत असते हे या निमीत्ताने लक्षात आले असेल तर ठिकच.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 18:19
नवीन
लष्कराचा वापर उठसूठ नागरी गोष्टींमधे करण्याच्या मी विरुद्ध आहे. (अर्थात माझे मत म्हणजे काही ब्रेकींग न्यूज नाही, तरी आपलं सांगतो!). या मधे लष्कराचा वापर हा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अथवा जेंव्हा दंगल अथवा दंगलसदृश प्रसंग होतात तेंव्हा वापरणे देखील मान्य नाही. लष्कराने केवळ आणि केवळ बाह्य शत्रूपासून देशाचे संरक्षण केले पाहीजे. नागरी घटनांमधे लष्कराने, भले कारण कितीही उदात्त असुंदेत पण लष्कर म्हणून involve होणे हे अयोग्य आहे. याचा अर्थ आपली नागरी व्यवस्था पुरेशी तयारच केलेली नाही असा होतो. हे बदलणे गरजेचे आहे. जसे वाजपेयींच्या काळात नैसर्गिक आपत्तीसाठी परदेशी सरकारची मदत घेणे बंद करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला तसेच ह्या संदर्भात केले पाहीजे. स्वतःला विकसीत म्हणवून घेयचे असले तर परदेशी मदतीबरोबर लष्करी मदत देखील नागरी कामासाठी घेऊ नये....
तीच गोष्ट वर्ल्ड कल्चरल फेस्टीवलच्या दरम्यान झाली असावी. जेंव्हा कैक लाख लोकं ही देश-परदेशातून येणार असतात तेंव्हा आवडो अथवा न आवडो त्यांची जबाबदारी सरकारवर पडते. आमच्या इथे साधे शाळेत ५०-१०० च्या वर कुठल्याही सार्वजनिक संस्थेला कार्यक्रम करायचा असेल तर पोलीस ठेवावा लागतो. काही शे अथवा हजाराच्या घरात कार्यक्रम असला तर पोलीस, अँब्युलन्स, अग्निशमन वगैरे सर्व लागते. वॉशिंग्टनच्या काँग्रेस आणि व्हाईटहाऊस मधील जागेवर - नॅशनल मॉल वर अथवा न्युयॉर्कच्या टाईम स्क्वेअर, सेंट्रल पार्कमध्ये असे कार्यक्रम होतात तेंव्हा सरकारला देखील मदत करावी लागते. अर्थातकधी कधी सूट देतही असतील पण त्याचे ते संघटनेकडून पैसे घेतात.
इथे मिलिटरीला बोलवले होते म्हणजे सीमेवरील सैनिकांना बोलावले नव्हते आणि हमाली काम तर नक्कीच करायला बोलावले नव्हते. तर कमी वेळात जर बांधकाम करायचे असेल तर आपल्याकडे खर्या अर्थाने मिलिटरी इंजिनिअरींग सर्विसेस ला खूप चांगले ज्ञान आहे आणि व्यवस्थापन कौशल्य देखील आहे. त्यामुळे त्यांची मदत द्यावित अशी विनंती आपचे मंत्री कपिल मिश्रा यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे केली होती. (अजून एक दुवा) . अर्थात याचे नंतर माध्यमांकरवी राजकारण केले गेले. जर खरेच यात काही दम असता, तर आपल्या सगळ्यांचे लाडके नेते दिल्लीचे मुख्यमंत्री मा. अरविंदजी केजरीवालसर यांनी कित्ती आक्रस्ताळे पणा केला असता! पण तशी टिवटिव करण्याऐवजी त्यांनी खालील व्टीट केली....
असो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:34
नवीन
फारच लंगडा प्रतिवाद. त्यातही केजरीवाल यांच्या ट्विटची साक्ष देऊन हा प्रकार कसा लेजिटिमेट आहे, अनैतिक नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्नही लाजवाब. ज्या केजरीवालला मोदिसमर्थक चोविस तास शिव्या घालत असतात त्याचेच ट्विट साक्ष म्हणून द्यावे हा काय प्रकार असावा. असो.
तुम्हाला सामाजिक कार्यक्रम आणि व्यक्तिगत कार्यक्रम ह्यात फरक माहित असावा अशी अपेक्षा आहे. आता तुम्ही खोदकाम करुन काँग्रेसच्या राज्यात एखाद्या व्यक्तीसाठी लष्कर वापरले गेले तेव्हा कुठे होतात असा प्रश्न विचारणार असा कयास आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 18:51
नवीन
काय राव! सरळ प्रतिसादाला लंगडा म्हणून जोक करता काय?
माझे म्हणणे आधी स्पष्ट केले आहे. मला लष्कर हे कुठल्याच नागरी कामात येता कामा नये असे वाटते. तेच चुकीचे आहे. तुम्हाला तसे वाटते का? ते जरी वाटत असले तरी त्यासाठी आपली नागरी यंत्रणा तरबेज आहे का? याची आधी उत्तरे दिलीत तर बरे होईल.
हा कार्यक्र्म व्यक्तिगत म्हणणे हा अजून एक जोक झाला. तुम्हाला मान्य नाही असले कार्यक्रम असे म्हणालात तर काहीच हरकत नाही. आर्ट ऑफ लिव्हिंग (मी याच्याशी संलग्न नाही) हे काहीतरी वेगळेच रसायन आहे. यात फक्त भारतीय आणि त्यातही केवळ हिंदूच आहेत असे नाही. किंबहूना यात अभारतीय आणि अहिंदूच जास्त असतील. ह्या कार्यक्रमाला म्हणूनच खूप अहिंदू अमेरीकेतूनही गेल्याचे मला माहीत आहे. आता तो एका संघटनेचा कार्यक्रम आहे म्हणालात तर ठीक आहे. पण जे काही पाहीले आहे त्यावरून श्री श्री हे टिपिकल बुवा बाबा नाहीत ह्याची बर्यापैकी कल्पना आहे. पण तो विषय वेगळा आहे. असो.
केजरीवालांची व्टीट देण्याचे कारण इतकेच होते की या माणसाने इतकी सुवर्णसंधी सोडली नसती जर खरेच यात काहीतरी चुकले आहे सिध्द झाले असते तर... अर्थात तुम्हाला तर्कशास्त्र मान्य नसेल तर मुद्दा वेगळा. समजू शकतो झालं!
जेंव्हा पस्तिस लाख लोकं गोळा होतात तेंव्हा त्यांची काळजी घेणे हे कुठल्याही सरकारचे काम असते. दिल्ली सरकारला देखील हे समजले, जरी ते सहज केंद्र सरकारला दोष देऊ शकले असते तरी! तशी मदत देण्याचे टाळणे म्हणजे अनैतिक ठरले असते. यात कुठल्याच पक्षाचा संबंध नाही. तसेच मला खात्री आहे, त्याचा खर्च देखील सरकार वसुल करेल. आर टी आय अंतर्गत ही माहिती देखील नक्की बाहेर येईल. अर्थात त्याला वेळ लागेल. अर्थात तुम्ही तात्काळ आरटीआय फाईल करू शकता...
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 19:33
नवीन
मला लष्कर हे कुठल्याच नागरी कामात येता कामा नये असे वाटते.
>> मलाही. याबाबतीत समर्थन.
यात फक्त भारतीय आणि त्यातही केवळ हिंदूच आहेत असे नाही.
>> मी हा कार्यक्रम हिंदू वैगरे आहे असे कुठे म्हटले नाही. प्रायवेट कार्यक्रम हिंदू असो वा हिब्रू, तो प्रायवेटच. बाकी आर्ट ऑफ लिविंग आरतीवोवाळू कार्यक्रम आहे ह्याची बर्यापैकी कल्पना आहे.
या माणसाने इतकी सुवर्णसंधी सोडली नसती जर खरेच यात काहीतरी चुकले आहे सिध्द झाले असते तर.
>> म्हणजे ह्या माणसाचे वर्तन हा काहीतरी चुकले आहे की नाही याचा पुरावा मानावा का?
लोकं गोळा होतात तेंव्हा त्यांची काळजी घेणे हे कुठल्याही सरकारचे काम असते
>> ओके फाईन.
आता जसा मी नेहमी वाकडाच विचार करतो त्यायोगे हे मान्य करुया की उद्या दाऊद इब्राहिम भारतात पकडून आणला, त्याल फाशी बीशी झाली तर त्याचे जेवढे नेटवर्क आहे ते सगळे मयतीला हजर राहिल, तो आकडा साधारण पाच-सहा लाख होईल तेव्हा त्याच्या नातेवाईकांनी लष्कराला पैसे देऊन पाचारण केले व्यवस्था बघायला तर चालेल.
तुमचा दृष्टिकोन लक्षात आला. मतभेद राहतीलच. तुम्ही मला जास्त समजवण्याच्या फंदात पडू नका, मी पण पडत नाही. ओके?
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 03/11/2016 - 19:49
नवीन
त्याच नेटवर्क येत असेल तर बहुधा लष्कर पैसे न घेताच येईल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 20:05
नवीन
जर तुम्ही म्हणताय तसं झालं आणि त्याला फाशी झाली तर कोण कोण उघडपणे येईल हे बघणं खरोखर मनोरंजक असेल.किती लोक आपण दाऊदचे पाठीराखे आहोत हे openly दाखवतील तो तर अजून वेगळा मुद्दा.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 20:13
नवीन
इट वाज हायपोथेसिस. हायपोथिसिस मधे कल्पनेला महत्त्व असते की उदाहारणाला? हायपोथेसिस ची कल्पना सोडून उदाहरनाकडे विस्तृत व अनावश्यक लक्ष देणे मुद्दे संपल्याचं लक्षण आहे. व्हाट यु से?
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 20:27
नवीन
Why so serious? It was just a figment of my imagination.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 20:28
नवीन
Army in aid of civil authority: when, how do troops come in?
दिल्ली सरकारने संरक्षण मंत्रालयाला लष्कराच्या विशेष मदतीसाठी विनंती केली होती... ती संरक्षण मंत्रालयाने खालील मार्गदर्शक तत्वांनुसार पाळली.
Under what circumstances is the Army requisitioned by the civilian administration?
Regulations permit civil authorities to requisition the Army for (1) maintenance of law and order, (2) maintenance of essential services, (3) assistance during natural calamities such as earthquakes, (4) any other type of assistance which may be needed by the civil authorities.
Who approves the request from the civil administration for using the Army?
When the services of the Army are requested by the civil administration, the local military commander is supposed to take the permission of the central government through official Army channels. If the delay in seeking permission is likely to exacerbate the situation, leading to loss of life and property, local Army authorities are required to respond immediately, as far as possible, and send a report of the action taken at the first instance for approval by Army authorities.
उरलेले त्या दुव्यावर वाचा.
आता मुद्दा असा आहे की संरक्षण मंत्रालयाने अशी मदत देण्याचे नाकारले असते तर तत्वांच्या बाहेर जाऊन, आपने मदत मागितली म्हणून मोदींनी दिली नाही असे म्हणणार. बर आता दिली तर मोदींनी श्री श्रींच्या वैयक्तीक कार्यक्रमासाठी मोदींनी मदत केली असे म्हणणार. म्हणजे काही केले तरी मोदीच चुकलेत असे म्हणायचे असले तर काय उपयोग आहे?
बरं अशी मदत केली जाते तेंव्हा त्याचा खर्च देखील संरक्षण मंत्रालय वसुल करते. या संदर्भात देखील तो केला जाईलच असे वाटते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 19:03
नवीन
मिपावर गेल्या चोवीस तासांत केजरीवालना एकही शिवी घातली आहे का ते बघा. आता कन्हैयाला बाल केजरीवाल म्हणणं हे तुम्हाला शिवी वाटत असली तर इलाज नाही. धागा मोदींवर असल्यामुळे तुम्ही सुटणार आणि आयडी सार्थ करणार हे उघड आहे. केजरीवाल यांचं ट्विट पाहून तर मला गहिवरून आलं. धरणं धरण्याऐवजी ते चक्क लोकांचं स्वागत करताहेत. काय खरं नाही राव! बरं, त्यांनी लष्कराची मदत मागितली असती आणि जर या सरकारने ती नाकारली असती तर बाहेरच्या देशांतून येणाऱ्या लोकांपुढे आपण आपले राजकीय मतभेद समोर आणले आणि देशाला लाज आणवली म्हणून इकडे धागे काढले गेले असतेच (तुम्ही काढले असते असं म्हणत नाहीये मुद्दामच, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी स्वतःवर घ्यायची सवय आहे). रच्याकने भाजपवाले राहुल गांधींबद्दल काय म्हणतात ते तर आपल्याला माहित आहेच. त्यांनाही कुठल्यातरी एका सूचनेसाठी (EPF नाही. ही वेगळी सूचना आहे)अरुण जेटलींनी आपल्या भाषणात धन्यवाद दिलेच. द्यायलाच पाहिजेत. जर देशाच्या image चा प्रश्न असेल तर पक्षीय मतभेद विसरून काम करायलाच पाहिजे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 19:37
नवीन
बोकाशेठ, नीट वाचा. मिपावर चोविस तास शिव्या घातल्या जातात असे लिहिलेले नाही तिथे.
कोण्यातरी बाबाबुवाची इवेंटगीरी देशाच्या इमेजचा प्रश्न झालाय. वॉव. यनावाला सर, यु आर मोस्ट वेलकम हीअर.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 19:59
नवीन
त्याला ३५ लाख लोक उपस्थित आहेत. त्यांची व्यवस्था जर नीट ठेवली गेली नाही तर देशाची इमेज खराब होणारच. अर्थात तुम्हाला मोदींचे दोष दाखवण्यापुढे त्याची काही फिकिर नसावी हे समजू शकतो. घटनेने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहेच.
रच्याकने यनावालांना बोलावताय? म्हणजे तुमची पाॅवर गेली? तुम्हाला मुद्दे सुचत नाहीत? का तुमच्याकडे बोलायला आता मुद्देच नाहीत?
बाकी यनावालांची सर तुम्हाला येणार नाही हेही तितकंच खरं आहे.
ता.क. मिपावर असं मी मुद्दाम म्हटलं कारण इथे केजरु के गुलाम नावाचा सदाहरित (निदान ५ वर्षे) धागा आहे. त्यावर काहीही post झालेलं नाही हा मला पुरावा म्हणून दाखवायचा होता. बाकी भाजपवाले exactly किती तास शिव्या घालतात हे तुम्ही नोंद करुन ठेवताय का? घटनेने तुम्हाला तोही अधिकार दिलेला आहे.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 20:34
नवीन
देशाची इमेज ह्या गोंडस नावाखाली बरं चाललंय. आम्ही भारतीय नागरिकांनी श्री श्री यांचे पाय पकडुन आमच्या देशाच्या इमेज खातर कार्यक्रम घ्याच असे साकडे घातले नव्हते ब्वा. त्याला त्याची इमेज ग्लोबल करायची आहे. त्यासाठी देशाच्या सैन्याचा, पर्यावरणाचा वापर. कोण कुठचा तो बाबा, त्याला स्वतःला जगत्गुरु सिद्ध करायचंय त्यासाठी आमची सेना राबते हे आम्हाला अजिबात पटत नाही.
दुसरं असं की सरकारने म्हणे ह्या कार्यक्रमाला ग्रँटही दिली आहे. तेही घसघषीत अडीच कोटी. तुम्हीच दिलेल्या लिंकमधे होतं. म्हणजे करदात्यांच्या पैशातून प्रायवेट इवेंटला सढळ हस्ते मदत. वरुन कोर्टात पाच कोट भरले नाही तर हे अडीच कोटी जप्त होणार. म्हणजे ह्यांनी कायदे मोडून इवेंट करायचे, त्याला सरकार करदात्यांच्या पैशातून मदत करणार, तेच पैसे दंड म्हणून हे इवेंटबाबा भरणार.
तिसरं असं टुकार लॉजिकपुढे मुद्दे संपत नसतात. यनावालांना यासाठी बोलावलं का ब्वॉ, घटनेत वैज्ञानिक विचारसरणीचा अवलंब करावा असं दिलंय त्याचा ते सतत प्रसार, प्रचार करत असतात. त्यांना फार मान देतात इथले लोक. ह्या असल्या बाबाबुवांच्या इवेंटमधे नक्की कोणत्या वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार होतो ते विचारायचे होते. बाकी आम्हाला कुणाची सर नकोच. आमची सरसरच भल्याभल्यांना धडकी भरवते. ;-)
बाकी, मी सांगतो मुद्दे संपले की काय होतं. प्रतिवाद्याच्या मुद्द्याला खोडू शकलो नाही की अगदी क्षुल्लक शब्द उचलून तीसमारखानच्या आविर्भावात प्रश्न केले जातात. जसे इथे आधी 'मिपावर कुठे शिव्या दिल्या' हा प्रश्न मांडला, मग तो खोडला तर 'मिपावर अमुक धागा आहे त्यात कुठे शिव्या दिल्यात' हा प्रश्न. हाही खोड्ल्या जाईल हे लक्षात येताच पुढल्या वाक्यात 'तुम्ही चोविस तास शिव्याच मोजता काय' हा प्रश्न केला जातो. मुद्दे नसले की असे होते बोकाशेठ.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 20:43
नवीन
बरं मग त्या मनोज मिश्रांच्या ऐवजी तुम्ही कोर्टात जाऊन हा कार्यक्रम रद्द करण्यासाठी याचिका का दाखल केली नाही? तेही कुणी मोठा माणूस वगैरे नाहीयेत. सामान्य माणूसच आहेत.
बाकी तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून आणि मुद्दे सोडून भांडणं बघून एक शंका आली होती आणि ती खरी असल्याचं नुकतंच समजलं आहे. बाकी तुम्ही तुमचे मुद्दे संपले की कुठल्या पातळीवर उतरता ते पाहिलेलं आहेच. त्याबद्दल बोलायला लावलं नाहीत तर बरं होईल.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 21:10
नवीन
तुमचा एकंदरीत आविर्भाव पाहून आणि मुद्दे सोडून भांडणं बघून एक शंका आली होती आणि ती खरी असल्याचं नुकतंच समजलं आहे. बाकी तुम्ही तुमचे मुद्दे संपले की कुठल्या पातळीवर उतरता ते पाहिलेलं आहेच. त्याबद्दल बोलायला लावलं नाहीत तर बरं होईल.
>>मी आमंत्रण तर दिलं नव्हतं माझ्या प्रतिसादावर प्रतिसाद द्यायला या म्हणून. तुमच्या मुद्द्यात दम नाही म्हणून तुम्हाला माझा आविर्भाव आता भांडणाचाही वाटू शकतो, थोड्यावेळाने शिवीगाळही वाटू शकते. तुम्ही आता पर्सनलही होत आहात. मी इथे तुम्हाला दिलेला एकही प्रतिसाद मुद्दा सोडून आहे हे सिद्ध करा. धमक्या देण्याची भाषा नाही केली तर उपकार होतील.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 03/12/2016 - 03:09
नवीन
आणि ते तुम्हाला सांगून काय फायदा? तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ शकते हेच मान्य नाही तिथे बोलणंच खुंटलं.
आअापला २४ तास शिव्या देणारे भाजपवाले, आमचे सैनिक घरगड्यांसारखे वापरले जात आहेत, वगैरे अनेक मुक्ताफळं तुम्ही याच धाग्यावर उधळलेली आहेत. आणि मी काही पर्सनल वगैरे होत नाही. तुमची पातळी मला माहित आहे. ती सगळ्यांसमोर सांगावी अशी इच्छा असल्यास सांगतो. आणि याला धमकी समजायचं की काय तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही काय समजताय त्याने मला काहीही फरक पडत नाही.
- Log in or register to post comments
च
चेक आणि मेट
Sat, 03/12/2016 - 07:09
नवीन
तुम्हाला जिथे स्वतःची चूक होऊ शकते हेच मान्य नाही तिथे बोलणंच खुंटलं.
अगदी अचूक
- Log in or register to post comments
S
sagarpdy
Fri, 03/11/2016 - 18:39
नवीन
महत्त्वाची माहिती, धन्स!
- Log in or register to post comments
न
नितीनचंद्र
Fri, 03/11/2016 - 18:01
नवीन
ब्रीज बांधण्याचा सराव सैनिक नेहमीच करतात. यावेळेला यमुनेवर केला इतकेच.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 18:26
नवीन
सोनिया गांधी वायुसेनेचे हेलिकॉप्टर आणी सेवा वापरत होत्या. ते आपणांस मान्य असावे ह्याच लॉजिकने.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 03/11/2016 - 18:48
नवीन
हवाईदलाचं विमान वापरायचे आणि काँग्रेसच्या केंद्रीय मंत्र्यांच्या हातांच्या ओंजळींवर पाय देऊन विमानात जायचे - शिडी मिळाली नाही तर. हे तुम्हाला कुठे माहीत आहे?
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 18:53
नवीन
मला लष्कराचा नागरीसेवे साठी वापर मान्य नाही. सोनिया गांधी ह्या पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा वायूसेनेचा वापर करतात ते मान्य नाही. तुम्हाला मान्य आहे का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 19:33
नवीन
तसले प्रकार अजिबात मान्य नव्हते व आताही. परत तसले काही होऊ नये म्हणुन त्याचमुळे तर भाजपाला निवडून दिलंय ना?
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 20:10
नवीन
त्याचमुळे तर भाजपाला निवडून दिलंय ना?
आपले अमुल्य मत भाजपाच्या पारड्यात टाकल्याबद्दल प्रवक्ता नसलो तरी धन्यवाद! :)
तसले म्हणजे कसले? मिलीटरी कुणी वैयक्तिक खर्चाला वापरली आहे? इथे तर पंतप्रधान स्वतःचा घरखर्च देखील स्वतःच्या पगारातून करतात.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Fri, 03/11/2016 - 20:39
नवीन
श्री श्री रविशंकर हे पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा सेनेचा वापर करतात ते मान्य नाही.
कुणी पैसे देऊन विकत घ्यायला भारतीय सेना रस्त्यावर पडलेली नाही एवढी तरी जाणीव मोदीसमर्थकांनी ठेवावी. अर्थात तुम्हाला आहे हे मान्य, हे इतरांसाठी ज्यांना देशाच्या इमेज हा शब्द फार आवडला आहे.
- Log in or register to post comments
व
विकास
Fri, 03/11/2016 - 23:41
नवीन
श्री श्री रविशंकर हे पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा सेनेचा वापर करतात ते मान्य नाही.
सेनेच्या वापराबद्द्ल माझे काय मत आहे हे सांगून झाले. तरी देखील यात तुमच्या विधानात दोन चुका होत आहेत.
एक म्हणजे श्री श्री रविशंकर यांच्यासाठी सेनेचा वापर झालेला नाही तर ३५ लाखांच्या समुदायासाठी झालेला आहे, जसा कुंभमेळ्याला देखील होतो.
दुसरे म्हणजे ही विनंती श्री श्रींनी केलेली नव्हती अथवा केंद्राने आपणहून घेतलेला निर्णय नव्हता. तुमच्या वाचनात आले असले की श्री श्रींनी पैसे टाकून अथवा न टाकता भारतीय सेनेची मदत मागितली होती, तर तसे अवश्य दाखवा, नाहीतर शुद्ध कांगावा करत आहात हे मान्य करा.
हा निर्णय दिल्ली सरकारने त्यांच्या अख्त्यारीत होणारा कार्यक्रम सुखरूप पार पाडण्यासाठी घेतलेला निर्णय होता. आणि तो योग्यच होता... इथे वादाकरता केंद्रात कॉंग्रेस/साम्यवादी/आप/तिसरी आघाडी/अथवा इतर कोणा गोम्यासोम्याचे सरकार असते आणि त्यांनी देखील असे केले असते तर ते बरोबरच आहे. यात सुरक्षा आणि सावधानता होती.
केंद्राने त्यांची विनंती कशी मान्य केली ह्याचे कारण वर एका प्रतिसादात दिले आहेच. पण परत खाली चिकटवत आहे...
Army in aid of civil authority: when, how do troops come in?
दिल्ली सरकारने संरक्षण मंत्रालयाला लष्कराच्या विशेष मदतीसाठी विनंती केली होती... ती संरक्षण मंत्रालयाने खालील मार्गदर्शक तत्वांनुसार पाळली.
Under what circumstances is the Army requisitioned by the civilian administration?
Regulations permit civil authorities to requisition the Army for (1) maintenance of law and order, (2) maintenance of essential services, (3) assistance during natural calamities such as earthquakes, (4) any other type of assistance which may be needed by the civil authorities.
Who approves the request from the civil administration for using the Army?
When the services of the Army are requested by the civil administration, the local military commander is supposed to take the permission of the central government through official Army channels. If the delay in seeking permission is likely to exacerbate the situation, leading to loss of life and property, local Army authorities are required to respond immediately, as far as possible, and send a report of the action taken at the first instance for approval by Army authorities.
आता मुद्दा असा आहे की संरक्षण मंत्रालयाने अशी मदत देण्याचे नाकारले असते तर तत्वांच्या बाहेर जाऊन, आपने मदत मागितली म्हणून मोदींनी दिली नाही असे म्हणणार. बर आता दिली तर मोदींनी श्री श्रींच्या वैयक्तीक कार्यक्रमासाठी मोदींनी मदत केली असे म्हणणार. म्हणजे काही केले तरी मोदीच चुकलेत असे म्हणायचे असले तर काय उपयोग आहे? राजा भिकारी आणि राजा घाबरला ही उंदीर छाप गोष्ट झालं!
बरं अशी मदत केली जाते तेंव्हा त्याचा खर्च देखील संरक्षण मंत्रालय वसुल करते. या संदर्भात देखील तो केला जाईलच असे वाटते.
- Log in or register to post comments
L
lakhu risbud
Fri, 03/11/2016 - 18:51
नवीन
एकाच शब्दात वर्णन होइल…. तर्ककर्कश्य
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Fri, 03/11/2016 - 19:11
नवीन
http://m.indiatoday.in/story/sri-sri-mega-show-manohar-parrikar-explains-why-army-building-yamuna-bridges-dda-defends-permit/1/614518.html
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Fri, 03/11/2016 - 19:30
नवीन
आर्मीचं काम संरक्षणाचं नाहीये. तिचं काम आक्रमणाचं आहे. बाह्य प्रदेश काबीज करून शत्रूला मारून टाकण्याचं आहे. =
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sat, 03/12/2016 - 05:57
नवीन
मुघलांच्या घोड्यांना जसे जळी स्थळी संताजी धनाजी दिसायचे तसच काहीतरी होतंय का?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 03/12/2016 - 07:16
नवीन
म्हणजे भाजपला जसे जळी स्थळी राहूल सोनिया दिसतात तसे...?
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
Sat, 03/12/2016 - 07:22
नवीन
लष्कर केंव्हा बोलावले जाते हे वर आलेले आहेच. शिवाय या कार्यक्रमासाठी लष्कराला पूल बांधायला का बोलावले याची करणे मी दिलेल्या दुव्यात आहेत. ती पाहून घ्यावी. खाजगी कार्यक्रमाला लष्कराची मदत घ्यावी कि नाही हा सरकारचा प्रश्न आहे लष्कराचा नाही.
१९९७ साली आग्र्याला ताजमहाल च्या मागे यमुनेच्या पात्रात यान्नी यांचा कार्यक्रम झाला होता तेंव्हा असेच दोन पूल लष्करातर्फे बांधण्यात आले होते. तेंव्हा खाजगी कार्यक्रमासाठी लष्कराची मदत घेण्याचा हा काही पहिला प्रसंग नाही. असे करावे कि नाही हा सरकारचा निर्णय असतो.
मी स्वतः गोवा सरकारच्या वैद्यकीय कॅम्प मध्ये भाग घेतला होता. अगोंडा समुद्रावर श्री लुईझीनो फालेरो मुख्यमंत्री असताना (१९९९) हा कॅम्प झाला होता. एकंदर सरकारी व्यवस्थापन ढिसाळ असते म्हणून लष्करी माणसाला त्यात जावे असे वाटत नाही.
मुंबईत नौदल आठवड्यात होणार्या प्रात्यक्षिकासाठी सुद्धा मरीन ड्राईव्हवर होणार्या प्रात्यक्षिकासाठी येणाऱ्या प्रचंड गर्दीसाठी (महाराष्ट्र सरकारच्या विनंती वरून) मला डॉक्टर म्हणून एका कार्डीयाक रुग्णवाहिकेत बसवून ठेवले होते. तेथे जर चेंगरा चेंगरी झाली असती तर माझा काय आणी किती उपयोग झाला असता? हा प्रश्नच होता.
असे असूनही अशा खाजगी कार्यक्रमात लष्कराचा सहभाग असू नये असे मला वैयक्तिक रित्या वाटते.
याची काही कारणे अशी आहेत
हा पूल बांधला त्याची क्षमता एक विशिष्ट असते. त्यावरून जाणारी लष्करी वाहने किंवा माणसे शिस्तशीर पणे जातात. सामान्य माणसांची जर पळापळ झाली तर त्यावर कोणतेही नियंत्रण राहत नाही आणी क्षमतेपेक्षा आणी बेशिस्तपणे त्याचा वापर झाला त्यातून जर तो पूल उलटला आणी जीवितहानी झाली तर लष्कराला फुकटच्या शिव्या खाव्या लागतात आणी त्यातून आम्ही त्याचे पैसे भरले होते काही फुकट काम केले नव्हते असे मुलकी प्रशासन अधिकारी लष्कराला दोष देऊन नामा निराळे होतात आणी स्वतःच्या चुकांवर पांघरूण घालतात. त्यामुळे लष्करातील लोक अशा "लष्करच्या भाकरी" भाजण्यास सहज सहजी तयार नसतात.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 03/12/2016 - 07:28
नवीन
तुमच्याच प्रतिसादाची वाट पाहत होतो. प्रतिसाद आवडला.
खाजगी कार्यक्रमाला लष्कराची मदत घ्यावी कि नाही हा सरकारचा प्रश्न आहे >> हाच माझा मुद्दा आहे. बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख
Sat, 03/12/2016 - 07:35
नवीन
मग काय निष्कर्ष निघाला,
करायची का जनहित याचिका दाखल।
- Log in or register to post comments
व
विकास
Sat, 03/12/2016 - 14:30
नवीन
याचा अर्थ, आपण वर जे काही हे, "श्री श्री रविशंकर हे पंतप्रधान अथवा कुठलेच घटनेने तयार केलेले पद नसताना जेंव्हा सेनेचा वापर करतात ते मान्य नाही. " काढले होते, ते चुकीचे होते हे मान्य आहे का? तसेच लष्कराला बोलावण्याची म्हणून जी काही पद्धती आहे, ती पाळली गेली आहे, हे मान्य आहे का?
उगाच लष्कराला घरगडी म्हणणे जरा अतिच होते...
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 03/12/2016 - 16:58
नवीन
सोडा, ते सगळं सोडा. आमच्या कॉमनसेन्सरेडिओ ने पकडलेली काही संभाषणं ऐका. विण्ट्रेस्टींग आहेत.
रविभाई: हेल्लो, नरु भाई, अपुनको काम था.
नरु भाई : बोलो रविभाई, कोई भी काम बोलो, तुम अपन का दोस्त है, अरे विलेक्षन में विलक्षण हेल्प किया तुम अपनको;
रविभाई: वही अब वसूल करणे का टाईम आगया है. मेरेको अब मेरा इमेज बडा बनानेका, उसके वास्ते एक बडा इवेंट करनेका. तुम्हारा बॉईज लोगका मॅनपावर, ब्रेनपावर लगेगा ऐसा मेरा इवेंट मॅनेजर बोला. तो करेगा ना हेल्प?
नमो: सु वात करे छे. तेरा काम मेरा काम, मेरा काम, भारत का काम, भारतके काम में बॉईज क्या, सायंटीस्ट को भी लगाना पडा तो कायदे में बिठायेंगे. अभी मन्नु को बोल देता हूं, थोडा कलचरलसे खर्चापानीवास्ते ढाई करोड दे देता हूं. ओके. खुश ना?
रविभाई: एकदम खुष, अब लास्ट हेल्प. तुमको आके इदर एक स्पीच मारना पडेगा.
नरु भाई: अरे वोहिच तो मेरा फेवरेट काम है रे. डन!
नरु भाई टू मन्नु: वो रविभाई का लिगलमें देख लेना.
नरु भाई टू मफलर: सुन मफलर, इतना बडा इवेंट हो रहा है, साले नाक घुसाडेगा ना तो सारा केसर तेरे खिलाफ कर दूंगा.
नरु भाई टु एन्जीओ: बॅलन्सके लिये थोडा फाइनवाईन मार दो.मेरे कुछ आदर्शवादी फॅन है, खुश हो जायेंगे.
नरु भाई टू फॅन्स: सुनो रे. मिडिया रायता फैलायेगी, तुम्ही कित्ता भी राँग रहने दो, लिगल फॉर्मॅलिटी की बात करते रहना. कायदेके आगे सबकी नानी चुप हो जाती है. ओवर अँड आउट.
मन्नु टु बॉयज: अबे चलो, काम पें जाना है. रविभाई का इवेंट है तो क्या, पैसा मिल रहा ना बराबर तुम लोगो को? वैसे भी साला एक व्यापारी तुमसे जादा बहादुर होता है ऐसा नरुभाई केहता है. तुम इधर दिनभर कामधाम नही, फोकट का खाते बैठे हो. कुच्छ पैसा वैसा कमावो. ये इवेंट के बाद और भोत सारे इवेंट का कॉन्ट्रॅक्ट मिलेगा.
फॅन्स टू फॅन्सः भाई सब सेट हो गया है. ये पूरा मामला लिगल मे बिठानेका, कोइ कुछ बोलेगा तो वहिच डायलोग उठाके उसिको वापस मार्ना, बोलना की कितना गंदा सोच है रे तेरा आर्मीके बारे में.
असो. वरिल संभाषणाशी कोणाही जीवंत मृताचा संबंध नाही. असल्यास फक्त आम्च्या एक्स्ट्रा-सेन्सिटीव कॉ-मन-सेन्स च्या तरंगलहरी पकडण्याच्या क्षमतेचा आहे.
- Log in or register to post comments
अ
अभिजित - १
Mon, 03/14/2016 - 16:06
नवीन
उत्तम प्रतिसाद
- Log in or register to post comments
व
विकास
Mon, 03/14/2016 - 16:29
नवीन
सोडा, ते सगळं सोडा.
ते का सोडायचं? मी काही कुणाचा भक्त नाही (पक्षि: मोदींचाही नाही आणि श्री श्रींचा ही नाही). पण या वादात तुम्ही असे दाखवून देयचा प्रयत्न केलात की जणू काही श्री श्रींनी सैन्याची मदत मागितली आणि मोदींचे सरकार असल्याने त्यांना ती मिळाली... आता ते चूक आहे हे दिसले तरी मान्य करायला एव्हढे जड का जात आहे?
वरिल संभाषणाशी कोणाही जीवंत मृताचा संबंध नाही.
पण या प्रश्नाचा संबंध तुमच्या लेखनाशी आहे.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- ›
- »