Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

ग
गरिब चिमणा
गुरुवार, 03/17/2016 - 20:43
🗣 105 प्रतिसाद
चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते. चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा * चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी * शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही? *जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा? * जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे??? कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.

प्रतिक्रिया द्या
22385 वाचन

💬 प्रतिसाद (105)
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/18/2016 - 11:54 नवीन
कोणता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 15:14 नवीन
हा जेनुईन प्रश्न का खवचटपणा??? पोपशास्त्र्यांकडून अश्या घोर अज्ञानाची अपेक्षा नव्हती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/18/2016 - 15:27 नवीन
जेनुईन प्रश्न आहे हो .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
र
रामदास Sat, 03/19/2016 - 03:18 नवीन
हायड्रोकार्बन म्हटलं तरी चर्चा करणारे करणार ते असे "मी किटोन वंशातला आहे . तुम्ही ? अल्डीहाईड का ? आमचं ऑक्सीडाइज्ड अल्कोहलवाल्यांशी जमत नाही . ते उत्तरेकडले पर क्लोरो वगैरे तर फारच वेगळ्या जाती आहेत."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सुबोध खरे Sat, 03/19/2016 - 06:09 नवीन
काजल (KAJAL) आणि काजोल(KAJOL) मध्ये फरक काय? काजल (KAJAL) अल्डीहाईड आहे आणी काजोल(KAJOL) अल्कोहोल आहे. हा जोक आठवला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
अ
अजया Fri, 03/18/2016 - 08:01 नवीन
=)))))
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 08:53 नवीन
मानव वंश शास्त्राच्या अभ्यासातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डी एन ए ची तपासणी कशी आणी का करतात याचा एक खुलासा. पुरुषाच्या प्रत्येक पेशीत एक X आणी एक Y हे गुणसूत्र असते. आणी प्रत्येक स्त्रीच्या प्रत्येक पेशीत दोन X गुणसूत्र असतात. यापैकी पुरुषाचे Y गुणसूत्र हे फक्त बापाकडून येते आणी ते त्याच्या बापाला त्याच्या बापाकडूनच येते. आईकडे Y गुणसूत्र नसल्याने आईकडून ते येण्याची शक्यता नाहीच. म्हणजेच पिढ्या न पिढ्या Y गुणसूत्र अबाधित अवस्थेत मुलाकडे आणी मुलाच्या मुलाकडे आणी मुलाच्या मुलाच्या मुलाकडे असे संक्रमित होत जाते. Y गुणसूत्राचे X किंवा इतर गुण सुत्राशी अदलाबदल होण्याचाही संभव नसल्यामुळे हे UNADULTRATED (भेसळ विरहीत) पुढच्या पिढीतील पुरुषाकडे जाते. X गुणसूत्र पुरुषाला त्याच्या आईकडून मिळते, आणी आईला ते गुणसूत्र तिच्या आई आणी वडील अशा दोघांकडून मिळते.वडिलांना ते त्यांच्या आईकडून मिळते तर तिच्या आईला परत ते तिच्या आई वडिलांकडून मिळते. म्हणजे X किंवा इतर गुणसूत्रांच्या उगम कडे अजून अजून फाटे फुटत जातात आणी त्याच उगम शोधणे अशक्य होत जाते. यात होणारा बदल म्हणजे फक्त उत्परिवर्तन(MUTATION) याचा दर ०. ०१ % असा असतो( हा आकडा मला नक्की आठवत नाहीये) म्हणजे साधारण १०० पिढ्या नंतर त्यात काही बदल होऊ शकतो. त्यामुळे एखाद्या अवशेषाचे जेंव्हा पृथक्करण केले जाते तेंव्हा त्यातील पुरुषाच्या पेशींच्या केंद्राचा बाहेरील उर्जाकेंद्रातील( MITOCHONDRIA) डी एन ए मधील Y गुणसुत्राचा अभ्यास केला जातो. जेंव्हा दोन जातींचा किंवा जमातींचा अभ्यास करतात तेंव्हा या Y गुण सूत्राचा अभ्यास करून त्यातील साम्य किंवा फरक विषद केला जातो. चित्पावन माणसांची Y गुणसूत्रे यांची तुलना केली तेंव्हा त्यांचा पोर्तुगीज किंवा स्पानिश किंवा इंग्रजांशी कोणताही संबंध आढळलेला नाही. केवळ चिखल फेकीसाठी काही लोकांनी चित्पावन हे "वरील" लोकांची अनौरस संतती आहे अशी अवि उठवली होती ते साफ खोटे ठरून आले आहे. चित्पावन लोकांची गुणसूत्रे बेने इस्रायली या ज्यू लोकांशी मिळती जुळती असल्याची आढळून आली आहेत. त्याहुनही जास्त म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएत युनियन मधील इस्टोनिया, लाटव्हिया लीथुआनिया या बाल्टिक देशांच्या लोकांशी बरेच जास्त मिळते जुळते आढळले. त्यामुळे आजच्या चित्पावनांचे वंशज त्या देशातून भ्रमण करीत भारतात पोहोचले असा एक मतप्रवाह आहे. http://www.liquisearch.com/chitpavan/origin/dna_analysis CHITPAVANISM- DR JAY DIXIT. http://www.rootsforreal.com/dna_en.php
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Fri, 03/18/2016 - 09:13 नवीन
पुर्ण प्रतिसाद दोनदा वाचला. योग्य प्रकारे शास्त्रिय भाषेत विवरण केले आहे. लिंक वाचुन बघतो आता. बाकी कुठली एक जात, धर्म वा पंथात जन्माला आला म्हणुन त्याचा बुद्धिमत्तेशी किंवा उच्च नीच स्थानाशी संबंध जोडणे म्हणजे मुर्खपणाचे लक्षण वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा Fri, 03/18/2016 - 11:04 नवीन
म्हणून मुलांना वंशाचा दिवा म्हणतात काय? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
आ
आनन्दा Fri, 03/18/2016 - 15:32 नवीन
हो म्हणजे मला पण हे वाचून जाम गंमत वाटली... मुलगा खरेच वंश चालवतो म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कपिलमुनी Sat, 03/19/2016 - 03:37 नवीन
हे डीएनए वगैरे पूर्वजांना अगोदरच ठाउक होता तर टनाटन जोरात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा
स
सुबोध खरे Fri, 03/18/2016 - 08:54 नवीन
वंशज नव्हे पूर्वज क्षमस्व
  • Log in or register to post comments
अ
अद्द्या Fri, 03/18/2016 - 10:50 नवीन
मुळात एक तर कुठली जात / धर्म कुठून आला आणि कुठे बुडाला याने काय फरक पडतो ? त्यातल्या त्यात या धाग्याचा विषय . डि-ग्रेड सारख्या लोकांची ३ रुपयांची पिवळी पुस्तके वाटणे या पेक्षा जास्त काहीच महत्व नाही. चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी >> कोण कसा दिसतो याने काय फरक पडतो ? * शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही? अभ्यास वाढवा *जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा? असेल ७-८-९-१०-११-१२ हजार वर्ष पूर्वी . who cares , * जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे??? जात ठरवणाऱ्या लोकांना मासे खायला आवडायचे, या लोकांनी सुरमई आणि शिंपले करून घातले, त्यामुळे असं सगळं झालं बघा
  • Log in or register to post comments
स
सूड Fri, 03/18/2016 - 11:33 नवीन
जात ठरवणाऱ्या लोकांना मासे खायला आवडायचे, या लोकांनी सुरमई आणि शिंपले करून घातले, त्यामुळे असं सगळं झालं बघा
=)) वाईट!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 11:49 नवीन
जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे?
हे कधी ठरले??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/18/2016 - 11:53 नवीन
अय्य सोलापुर , थंड घे ;) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Fri, 03/18/2016 - 13:07 नवीन
राह्यलं. .राम समर्थ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/18/2016 - 14:11 नवीन
शिवाय नमः
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
प
प्रचेतस Fri, 03/18/2016 - 14:16 नवीन
पंढरीनाथ महाराज की जय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
न
नाखु Mon, 03/21/2016 - 04:35 नवीन
जगदगुरु कुंथुनाथाय नमो नमः!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
अ
अत्रुप्त आत्मा Mon, 03/21/2016 - 06:13 नवीन
हुरर्रर्रर्रर्रर्रर्र !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
अ
अद्द्या Fri, 03/18/2016 - 11:55 नवीन
आयला . परवा तर मटन खाताना ठरलं न रे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अजया Fri, 03/18/2016 - 11:56 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/18/2016 - 11:56 नवीन
अभिराम दीक्षित ह्यांच्या ब्लॉग वर त्यांनी असे लिहिले आहे कि सर्व मानवांची आई एकच आहे,त्यासाठी त्यांनीRef : River Out of Eden: A Darwinian View of Life is a 1995 popular science book by Richard Dawkins हा संदर्भ दिला आहे,http://drabhiram.blogspot.in/2014/03/blog-post_17.html?m=1 हि त्यांच्या ब्लॉग ची लिंक ।जाणकारांनी ह्यावर त्यांचं मत द्यावं
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Fri, 03/18/2016 - 14:28 नवीन
विज्ञानाच्या चष्म्यातून जाती हा लेख डॉ दिक्षितांनी (मिपावरचे राजघराणं) मिपावरही प्रकाशित केला आहे. धाग्याचे शीर्षक पाहून याच लेखाची आठवण झाली होती. अवांतर - चित्पावन म्हणजे कोण हे मला मिपावरच कळले. माझ्या नातेवाईकांमध्ये अन मित्रांमध्ये अनेक कोकणस्थ ब्राह्मण आहेत. त्या सर्वांच्या तोंडून चित्पावन हा शब्द कधीच ऐकला नव्हता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
श
श्री गावसेना प्रमुख Fri, 03/18/2016 - 15:55 नवीन
धन्यवाद ,पण गरीब चिमणा ह्यांच्या नानासाहेब नेफळे ह्या आजोबांनी तो लेख वाचलेला असूनही ह्यांना हा प्रश्न का पडावा। कि त्यांच्या सारखा ह्यांनीही त्या लेखाच्या चित्रांच्या कंगव्याने भांग पाडला।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
अ
अत्रुप्त आत्मा Fri, 03/18/2016 - 15:56 नवीन
@विज्ञानाच्या चष्म्यातून जाती >> सदर लेखाचा मी अनेक टनाटनी लोकांना प्रतिवाद करायला दिला होता. अजूनही देत असतो. आणि अर्थातच यापुढेही देईन. पण कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी
प
प्रसाद गोडबोले Fri, 03/18/2016 - 16:10 नवीन
पण कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.
हो ना , आम्हीही सुधारित सत्यनारायण पुजा कित्येक पुरोगामी लोकांना ऐकवली पण ती करुन घ्यायला कुणीहि पुढे आलेच नाहीत. येतील असं वाटतही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 03/19/2016 - 01:59 नवीन
तुमच्याकडे आधी कुणी येणच शक्य नाही!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
ह
हेमंत लाटकर Fri, 03/18/2016 - 13:39 नवीन
प्रत्येकजण आम्ही जात-पात मानत नाहीत म्हणतात. पण मुलीच्या दुसर्या जातीतील मुलाशी लग्न करण्यास सगळेच विरोध करतात.
  • Log in or register to post comments
अ
अजया Fri, 03/18/2016 - 15:05 नवीन
या वाक्यात शेप्रेट धाग्याचे पोटेन्शियल आहे काका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर
ह
होबासराव Fri, 03/18/2016 - 14:30 नवीन
कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे. एक तर चिमणा त्यातहि गरिब....बाबु कायले कोब्रा शि खेटे घेउन राह्यला ऑ ! ह.घ्या. ;)
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक Sat, 03/19/2016 - 09:30 नवीन
कालनिर्णय चा २००४ सालचा दिवाळी अंक पहा.त्यात बरीच माहिती आहे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 03/19/2016 - 10:44 नवीन
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत? >> माणसासारखी माणसे आहेत हो.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/19/2016 - 14:23 नवीन
अररर , तजो , तुमच्या कडून असल्या प्रतिसादाची अपेक्सा नव्हती , चित्पावन म्हणजे गोडसेचे भाऊबंध असे काही तरी म्हणा राव =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
सतिश गावडे Sat, 03/19/2016 - 14:35 नवीन
त्यांना काय म्हणायचे आहे त्यांनी स्पष्ट लिहीले असूनही त्यांनी न म्हटलेले वाक्य तुम्ही बळेच त्यांच्या माथी लावू पाहत आहात. आपल्यासारख्या अभ्यासू व्यक्तीने त्यांच्या स्पष्ट मताकडे दुर्लक्ष करून त्यांच्या मिपावरील प्रतिमेच्या अनुषंगाने असे लिहीणे योग्य नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/19/2016 - 14:50 नवीन
आपणास मुद्दा कळलेला नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 03/19/2016 - 14:56 नवीन
कुंथा अता निरर्थक!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
प
प्रसाद गोडबोले Sat, 03/19/2016 - 15:04 नवीन
तो तुमचा समज आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाखु Mon, 03/21/2016 - 04:39 नवीन
दोघांनी मध्येच विंम्बळ्डन चालू केल्याने मूळ कुस्तीवजा फ्री श्टाईल कडे दुर्लक्ष्य होऊन धाग्याचा टीआरपी कमी झाल्यास आम्ही जबाबदार नाही. अखिल मिपा धुराळी धागे वाचक साहक निवारक्,निचारक्,रेचक आणि वेचक महासंघ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सतिश गावडे Sat, 03/19/2016 - 14:38 नवीन
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत? उत्तरः माणसे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/19/2016 - 14:53 नवीन
आमचा इतिहासातील रस १८५७ चे पाठीमागे जात नसल्याने 'माणसे' हे उत्तर सर्वात उत्त्तम !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
अ
अभ्या.. Sat, 03/19/2016 - 14:44 नवीन
चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत? उत्तरः माणसे.
प्रश्न : असे उत्तर कोण नेमके देते? उत्तर : हुशार माणसे.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 03/19/2016 - 14:54 नवीन
>> हुशार माणसे होय. म्हणून तर माणसाने स्वतःला "होमो सॅपियन्स" हे नाव ठेऊन घेतले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
च
चौकटराजा Sat, 03/19/2016 - 14:55 नवीन
सर ही पदवी काय उगाच मिळाली आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ज
जेपी Sat, 03/19/2016 - 14:57 नवीन
मिपावर असे धागे आल्यावर.. जे झाडाच्या शेंड्यावर जाऊन पॉपकॉर्न खातात ते चित्पावन, जे झाडाच्या डाव्या फांदीवर बसतात ते देशस्थ,उजवीकडे सारस्वत बसतात. जे खाली राहुन झाड तोडतात ते कोकणस्थ..
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 03/19/2016 - 15:07 नवीन
तुझ्या बेसिकमध्येच लोचा आहे रे जेपी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Mon, 03/21/2016 - 04:41 नवीन
गावडे सर जेप्याला न्युनगंड यायला आणखी एक कारण झालं तुमच्यामुळे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
द
दा विन्ची Sun, 03/20/2016 - 16:01 नवीन
खरोखरच फालतू धागा. मात्र पोप्कॉर्ण वाल्यांसाठी सुवर्णसंधी. चित्पावन कोण होते, ते इराणी असतील नाही तर, घाना किंवा युगांडाचे असतील, आम्हाला काय त्याचे? उद्यापासून प्रत्येक जातीवर एक एक काथ्याकुट करायचा का? जाववार एक वेगळा विभाग काढायचा? शुद्ध भंकस.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 03/20/2016 - 16:52 नवीन
अहो असं कसं. दुसर्‍या जातीचं नावं काढलं तर अ‍ॅट्रोसिटी लागेल ना. मग दगडं मारायला दुसरी टार्गेटं कोणं मगं मोगाखान सरांना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा