Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चित्पावन ब्राह्मण नेमके कोण आहेत?

ग
गरिब चिमणा
गुरुवार, 03/17/2016 - 20:43
🗣 105 प्रतिसाद
चित्पावन ब्राह्मण हा समाज प्रामुख्याने महाराष्ट्रात पहायला मिळतो. मध्यप्रदेश ,गोवा व इतरत्रही हा समाज विखुरला आहे.जागतिकीकरणाच्या रेट्यात ,माहीती तंत्रज्ञानाच्या युगाच्या प्रारंभी ,परदेशात जाणार्या व स्थायिक होणार्यात चित्पावन आघाडीवर होते. चित्पावनांची इतिहासातील नोंद ही खासकरुन शिवकाळानंतर पहावयास मिळते,त्याआधी चित्पावनांचा उल्लेख आढळत नाही.चित्पावनांचे महत्वाचे विशेष हे त्यांच्या रंगरुपात आहे.भारतात क्वचीत आढळनारा लख्ख गोरा रंग,घारे निळे वा पिंगट डोळे,अत्यंत धारदार नाक ,अनुनासिक पण स्पष्ट शब्दोच्चार ही त्यांची रंगरुपाची वैशिष्ठे त्यांना ईतर भारतीयांपासून वेगळी करतात.चित्पावन मुळचे कुठचे यावर अनेक प्रवाद आहेत .काहीजण त्यांचा सबंध बेने इस्त्राईल समाजाशी जोडतात.चित्पावन समाजाविषयी काही प्रश्न उपस्थीत होतात ,जाणकारांनी प्रकाश टाकावा * चितपावन जर भारतीय असतील तर उपखंडातल्या लोकांप्रमाणे त्यांची शरीरगुणवैशिष्ठे का नाहीत?, उदा. गव्हाळ,सावळा रंग ,काळे डोळे,चपटे नाक ईत्यादी * शिवकाळ व त्याआधी चित्पावनांचा उल्लेख का सापडत नाही? *जर ते युरोपातून भारतात स्थलांतरीत झाले असतील तर तो काळ कोणता असावा? * जर ते स्थलांतरित होते तर इथल्या जातिव्यवस्थेत त्यांना सर्वोच्च स्थान कसे प्राप्त झाले असावे??? कृपया हा धागा डीलिट करुनये ,या थ्रेडवरच योग्य व संसदीय भाषेत चर्चा अपेक्षीत आहे.

प्रतिक्रिया द्या
22385 वाचन

💬 प्रतिसाद (105)
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 05:45 नवीन
ऐसिवरील चर्चेचा उपयूक्त गोषवारा सदस्य बॅटमनरावांनी देशस्थ, कोकणस्थ, मराठा आणि धनगर या महाराष्ट्रातील चार प्रमुख जातींच्या जेनेटिक्सबद्दल रोचक विवेचन असलेला खालील पेपर पहाण्यास सुचवले. देशस्थ, कोकणस्थ, मराठा आणि धनगर या महाराष्ट्रातील चार प्रमुख जातींच्या जेनेटिक्सबद्दल रोचक विवेचन असलेला हा पेपर पहावा असे सुचवतो. http://genomebiology.biomedcentral.com/articles/10.1186/gb-2005-6-8-p10 तिथे दिलेला परिच्छेदः Results The generated genomic data was compared with putative parental populations- Central Asians, West Asians and Europeans using AMOVA, PC plot, and admixture estimates. Overall, disparate uniparental ancestries, and l.1% GST value for biparental markers among four studied caste populations linked well with their exchequer demographic histories. Marathi-speaking ancient Desasth-brahmin shows substantial admixture from Central Asian males but Paleolithic maternal component support their Scytho-Dravidian origin. Chitpavan-brahmin demonstrates younger maternal component and substantial paternal gene flow from West Asia, thus giving credence to their recent Irano-Scythian ancestry from Mediterranean or Turkey, which correlated well with European-looking features of this caste. This also explains their untraceable ethno-history before 1000 years, brahminization event and later amalgamation by Maratha. The widespread Palaeolithic mtDNA haplogroups in Maratha and Dhangar highlight their shared Proto-Asian ancestries. Maratha males harboured Anatolianderived J2 lineage corroborating the blending of farming communities. Dhangar heterogeneity is ascribable to predominantly South-Asian males and West-Eurasian females. Conclusions The genomic data-sets of this study provide ample genomic evidences of diverse origins of four ranked castes and synchronization of caste stratification with asymmetrical gene flows from Indo-European migration during Upper Paleolithic, Neolithic, and later dates. However, subsequent gene flows among these castes living in geographical proximity, have diminished significant genetic differentiation as indicated by AMOVA and structure. धनगर जातीच्या उगमस्थानाबद्दलचे निरीक्षणही रोचक आहे. इति बॅटमनराव डॉ. इरावती कर्वे यांचा दाखला देऊन सदस्या प्रियदर्शिनी कर्वे या प्रतिसादात वेगळी रोचक माहिती देतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणस्थ ब्राम्हणांच्या जेनेटिक मुळासंबंधीचे दिलेल्या संशोधनातले वर्णन पहाता कदाचित खालील आख्यायिका कोकणस्थांच्या तुलनेने अलिकडे कोकणात येण्याचे आणि तरीही ब्राम्हण वर्णात स्थान मिळवण्याचे स्पष्टीकरण देईल. कोकणाचा कारभार पुलयोमी राजाच्या मेव्हण्याकडे होता, आणि तेव्हा तिथे निबिड अरण्य आणि मासेमारी करून उपजीवीका करणारे कोळी याखेरीज काहीच नव्हते. या मेव्हण्याने तिथे यज्ञ करायचे ठरवले, आणि त्यासाठी त्याने ठिकठिकाणी यज्ञकामासाठी ब्राम्हण आल्यास त्यांना जमिनी इनाम मिळतील असे निरोप पाठवले. जवळच्या देशावरच्या ब्राम्हणांना कदाचित खडतर भौगोलिक परिस्थितीची कल्पना असल्यामुळे यामध्ये रस वाटला नसावा, पण दूर राजस्थानातल्या काही ब्राम्हणांनी हे आमंत्रण स्वीकारले. या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन - म्हणजे आजचे चिपळूण. यज्ञानंतर इनाम मिळालेल्या जमिनींवर हे ब्राम्हण स्थायिक झाले, आणि त्यांचे नाव अपभ्रंशाने चितपावन पडले. याचा पावन चित्त असण्या नसण्याशी काहीच संबंध नाही. मात्र चितपावन ब्राम्हण हे मुख्यतः कोकणात शेतीवाडी करत होते, केवळ देवाधर्माची कामे नाही, ह्याचे स्पष्टीकरणही यातून मिऴू शकते. त्यावर मी उपस्थित केलेल्या शंका प्रियदर्शिनी कर्वे यांनी दिलेली पुलयोमीची आख्यायिका इतर आख्यायिकांपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटते पण तसे असेल तर चितपावन ब्राह्मण आडनावांमध्ये; एक्सक्लुजीवली राजस्थानी ब्राह्मणी आडनावांशी पुरेसे साम्य असलेली काही ना काही आडनावे आढळावयास हवीत शिवाय डिएनए सुद्धा जुळावयास हवीत.
या यज्ञाचे ठिकाण होते चितपोलन
समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश: Beach) म्हणतात, तेव्हा चिपळूण मधिल पळूण हे पुळणचा अपभ्रंश असण्याची शक्यता असू शकते का ? महाराष्ट्रातील गावांच्या नावाच्या डाटाबेस मध्ये गणपतीपुळे , भंडारपुळे (रत्नागिरी) , पुळास (कुडाळ-सिंधुदुर्ग) हि कोकणातील गावे दिसतात. (अर्थात 'पुळ' हा उपसर्ग अथवा प्रत्ययघेऊन देशावर अगदी गडचिरोली पर्यंत ग्रामनामे आहेत हेही खरे) मोल्सवर्थाची चिपोळणा, चिपुळणा, चिपोळा (p. 284) [ cipōḷaṇā, cipuḷaṇā, cipōḷā ] m A tribe of Bráhmans or an individual of it. Called also चित्तपावन & कोंकणस्थ. आणि A tribe of Bráhmans or an individual of it: called also कोंकणस्थ & चिपोळणा ह्या नोंदी कर्वेंनी मांडलेल्या थेअरीस अंशतः दुजोरा देतात. पण चिपळूण चे नाव आधी चितपोलन होते यास स्वतंत्र दुजोरा उपलब्ध नसल्यास तो केवळ कयास ठरतो शिवाय 'चितपोलन' मध्ये चित हा उपसर्ग कुठून आला हा प्रश्न शिल्लक राहतो खासकरुन 'चित' हा उपसर्ग असलेली चिता, चितळ प्राणिवाचक शब्दांमुळे उर्वरीत महाराष्ट्रात बरीच गावे दिसतात पण कोकणात 'चित' हा उपसर्ग असलेले एकही गाव डाटाबेस मध्ये दिसले नाही. त्यामुळे 'चित' या शब्दाचा उलगडा अद्यापी बाकी रहात असावा किंवा कसे चित्पावनींचे स्थलांतर खूप अलिकडचे असण्यातली एक मोठी अडचण त्यांची चित्पावनी बोली असू शकेल का ? चित्पावनी बोलींचे मला सर्व शब्द माहित नाहीत पण ऐसि आणि मिपावरील धाग्यातून जेवढा शब्द संग्रह पुढे आला तो प्राकृताशी जवळचाच दिसतो सर्वसामान्य मराठी माणसाला न समजणारे शब्द त्यात फार कमी दिसतात, चेड, बोड्यो, सां, विन्चां, पेख हे शब्द जरा वेगळे वाटतात त्यातील काही कानडी किंवा तुळू असतील ते वगळावे लागतील, स्किथीअन संबंध दाखवायचा तर किमान पक्षी पर्शीअन, सिंधी किंवा पंजाबी या पैकी एका भाषेचा काही प्रमाणातरी प्रभाव चित्पावनी बोलीवर मिळावयास हवा तसा प्रभाव आढळत नसेल तर त्यांचे कोकणात येणे बरेच बरेच मागे जाईल. स्थलांतर अलिकडील असेल तर चे एक उदाहरण मराठी विकिपीडियावर पहाण्यात आले ते म्हणजे टाकणकार समाजाची वाघ्ररी बोलीतील हे खूळ वाचावे मग आधीच्या भाषेचे प्रभाव कसे शिल्लक राहतात ते दिसते. तसे प्रभाव जेवढे कमी दिसतील तेवढे स्थलांतर जुने असा अर्थ होऊ शकेल किंवा कसे.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 06:16 नवीन
पकावू धाग्यातही हिरेमाणके मिळतात. खुप छान प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुनील Mon, 03/21/2016 - 06:23 नवीन
समुद्रकिनार्‍यालगतचा रेतीमय भागास पुळण (इंग्लिश: Beach) म्हणतात, तेव्हा चिपळूण मधिल पळूण हे पुळणचा अपभ्रंश असण्याची शक्यता असू शकते का ?
शक्यता कमी. कारण चिपळूण हे गाव समुद्रकिनारी नाही, बरेच आत आहे. त्यामुळे तिथे पुळण असण्याची शक्यता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 06:30 नवीन
माझ्या तर्कातील उणीव दर्शवण्यासाठी आभार. ऐसिअक्षरेचर्चेत कुणाचे या मुद्द्याकडे लक्ष गेले नसेल. एनीवे तसे असेल तर 'चितपोलन'ची केस जरा स्ट्राँग होते. अर्थात अजूनही 'चितपोलन'मधील 'चित' चा उगम शोधणे बाकी असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 06:41 नवीन
प्रत्ययात अथवा उपसर्गात पोलन शब्द येणारी गावे भारतात इतरत्र मिळतात का पहावे लागेल. भारतभराचा डाटाबेस लगेच शोधणे शक्य होणार नाही पण सवडीने करतओ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा