Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) रासायनिक मूलद्रव्यांचे मराठीकरण

म
माहितगार
Sun, 03/20/2016 - 06:55
🗣 58 प्रतिसाद
भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते. आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच. असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात. रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्‍याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल. अणुवस्तुमान / अणुअंक संकेतचिन्ह इंग्रजी मूलतत्त्व संस्कृत-हिंदी मूलतत्त्व समाईक ऑक्सिडीभवन स्थिति १ उ [H] hydrogen उदजन ±1 २ या [He] helium यानाति 0 ३ ल [Li] lithium लघ्वातु +1 ४ वि [Be] beryllium विडूर +2 ५ टा [B] boron टांकण +3 ६ प्रां [C] carbon प्रांगार ±4 ७ भू [N] nitrogen भूयाति −3 ८ जा [O] oxygen जारक −2 ९ त [F] fluorine तरस्विनी −1 १० शि [Ne] neon शिथिराति 0 ११ क्षा [Na] sodium क्षारातु +1 १२ भ्रा [Mg] magnesium भ्राजातु +2 १३ स्फ [Al] aluminum स्फटयातु +3 १४ सै [Si] silicon सैकता ±4 १५ भा [P] phosphorus भास्वर −3 १६ शु [S] sulfur शुल्वारि −2 १७ नी [Cl] chlorine नीरजी −1 १८ मं [Ar] argon मंदाति 0 १९ द [K] potassium दहातु +1 २० चू [Ca] calcium चूर्णातु +2 २१ स्तो [Sc] scandium स्तोकातु +3 २२ रं [Ti] titanium रंजातु +4,3,2 २३ रो [V] vanadium रोचातु +5,2,3,4 २४ व [Cr] chromium वर्णातु +3,2,6 २५ लो [Mn] manganese लोहक +2,3,4,6,7 २६ अ [Fe] iron अयस् +3,2 २७ के [Co] cobalt केत्वातु +2,3 २८ रू [Ni] nickel रूपक +2,3 २९ ता [Cu] copper ताम्र +2,1 ३० कु [Zn] zinc कुप्यातु +2 ३१ द्र [Ga] gallium द्रवातु +3 ३२ सि [Ge] germanium सिकातु +4,2 ३३ ने [As] arsenic नेपाली ±3,+5 ३४ मे [Se] selenium मेचाग्नि +4,−2,+6 ३५ दु [Br] bromine दुराघ्री ±1,+5 ३६ ली [Kr] krypton लीनाति 0 ३७ दी [Rb] rubidium दीपातु +1 ३८ शो [Sr] strontium शोणातु +2 ३९ भृ [Y] yttrium भृशला +3 ४० गो [Zr] zirconium गोमेदातु +4 ४१ का [Nb] niobium काशातु +5,3 ४२ सं [Mo] molybdenum संवर्णातु +6,3,5 ४३ चे [Tc] technetium चेष्टातु +7,4,6 ४४ नक [Ru] ruthenium नक्षरातु +4,3,6,8 ४५ ना [Rh] rhodium नाम्लातु +3,4,6 ४६ नि [Pd] palladium निचूषातु +2,4 ४७ रज [Ag] silver रजत +1 ४८ मृ [Cd] cadmium मृज्यातु +2 ४९ नै [In] indium नैलातु +3 ५० त्र [Sn] tin त्रपु +4,2 ५१ अं [Sb] antimony अंजन +3,5 ५२ वं [Te] tellurium वंगक +4,6,−2 ५३ जं [I] iodine जंबुकी −1,+5,7 ५४ को [Xe] xenon कोटयाति 0 ५५ द्यु [Cs] cesium द्युतातु +1 ५६ ह [Ba] barium हर्यातु +2 ५७ सु [La] lanthanum सुजारला +3 ५८ पु [Ce] cerium पुष्कला +3,4 ५९ श्या [Pr] praseodymium श्यामला +3,4 ६० आ [Nd] neodymium आपीतला +3 ६१ पि [Pm] promethium पिविरला +3 ६२ धू [Sm] samarium धूसरला +3,2 ६३ किं [Eu] europium किंविरला +3,2 ६४ यो [Gd] gadolinium योनिला +3 ६५ इ [Tb] terbium इद्‌‍भृशला +3,4 ६६ चु [Dy] dysprosium चुम्बला +3 ६७ पां [Ho] holmium पांडुला +3 ६८ र [Er] erbium रक्तला +3 ६९ व्या [Tm] thulium व्याहरिला +3,2 ७० श्वे [Yb] ytterbium श्वेतला +3,2 ७१ निर्व [Lu] lutetium निर्वर्णला +3 ७२ गा [Hf] hafnium गावातु +4 ७३ स [Ta] tantalum सहातु +5 ७४ च [W] tungsten चण्डातु +6,4 ७५ बा [Re] rhenium बाष्पातु +7,4,6 ७६ गु [Os] osmium गुर्वातु +4,6,8 ७७ घ [Ir] iridium घनातु +4,3,6 ७८ म [Pt] platinum महातु +4,2 ७९ स्व [Au] gold स्वर्ण +3,1 ८० पा [Hg] mercury पारद +2,1 ८१ सितु [Tl] thallium सिक्ष्यातु +1,3 ८२ सी [Pb] lead सीस +2,4 ८३ भि [Bi] bismuth भिदातु +3,5 ८४ तो [Po] polonium तोयातु +4,2 ८५ ला [At] astatine लावणी ८६ तै [Rn] radon तैजसाति 0 ८७ क्षु [Fr] francium क्षुद्रातु +1 ८८ ते [Ra] radium तेजातु +2 ८९ ए [Ac] actinium एजातु +3 ९० ह्र [Th] thorium ह्रसातु +4 ९१ प्रै [Pa] protactinium प्रैजातु +5,4 ९२ कि [U] uranium किरणातु +6,3,4,5 उपरोक्त यादी रघुविर यांची संस्कृत पर्यायांची बहुधा हिंदी भाषेसाठी वापरली जात असावी. हि मोठी यादी वाचत खाली येई पर्यंत काहीतरी वाचकांचा गैरसमज होत असावा म्हणून धागा लेखाची भूमिका पुन्हा एकदा च्योप्यपेस्त करत आहे. भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते. आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच. असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात. रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्‍याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल. मराठी विकिपीडियासाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
वर्गीकरण
रसायनशास्त्र

प्रतिक्रिया द्या
13728 वाचन

💬 प्रतिसाद (58)
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 03/20/2016 - 07:15 नवीन
आज जेवणात नीरजी क्षारातु अंमळ जास्तं झाला. लैचं जड जातात नावं =))!!! चांगला जडशिळ उपक्रम
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sun, 03/20/2016 - 20:07 नवीन
सोडियम क्लोराइड. रच्याकने समीकरण असं लिहायचं की काय आता - २ क्षारातु + नीरजी २ = २ क्षारातु नीरजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/20/2016 - 20:10 नवीन
"नीरजी क्षारातु" नाय हो... "क्षारातु नीरजी (NaCl)" हवं ते... बघा इथेच हे सगळं किती कठीण आहे हे सिद्ध झालंय :) हे एका उत्तर हिंदुस्तानी माणसाचं नाव म्हणूनही खपून जाईल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ट
टवाळ कार्टा Sun, 03/20/2016 - 07:28 नवीन
काय गरज आहे इंग्रजी नावे बदलायची...आणि विषेशनामांचे भाषांतर ही कल्पनाच मुळात चुकीची आहे...उद्या इंग्रजाने पुरणपोळीचे भाषांतर केले तर त्याला आपणच शिव्या घालणार
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 03/20/2016 - 10:17 नवीन
विषेशनामांचे भाषांतर ही कल्पनाच मुळात चुकीची आहे
अगदी माझ्या मनातलं बोललास. जनता फेसबुक, युट्युब आणि व्हाट्सप यांचे अनुक्रमे चेपू, तूनळी आणि कायप्पा असे सर्रास भाषांतर करते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
शेखरमोघे Sun, 03/20/2016 - 07:54 नवीन
अरे, अरे अरे, एखाद्या श्यामलेला काय वाटेल praseodymium म्हटल्यास? आणि एखाद्या जखमी माणसाने जर ऐकले की त्याला iodine च्या ऐवजी "जंबुकी" लावले जाणार तर तो पळच काढेल ! काय हरकत आहे अशा शास्त्रिय सन्ज्ञा इन्ग्रजीतच वापरायला?
  • Log in or register to post comments
व
विद्यार्थी Sun, 03/20/2016 - 08:03 नवीन
यादी मस्त आहे, मराठी भाषेबद्दलचे प्रेम पण मान्य आहे पण भाषा ही संवादाकरता असते. मराठी मध्ये प्रचलित झालेले इंग्रजी शब्द बदलण्याचा अट्टाहास संवादामध्ये बाधा तर निर्माण करणार नाहीत ना हा मुद्दा महत्वाचा आहे. तसे तर इंग्रजी भाषेनेसुद्धा इतर भाषांमधून शब्द जसेच्या तसे उचलले आहेत, उदा. बाजार, गुरु, मंत्रा. मग मराठीने आपले दरवाजे का बरं बंद करावेत?
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Mon, 03/21/2016 - 12:31 नवीन
भाषा ही संवादाकरता असते
खरं की काय? हे मराठीचा विषय आला कीच बरं उमगतं लोकांना. अजब आहे. बाकी चालूद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्यार्थी
व
विद्यार्थी Mon, 03/21/2016 - 16:29 नवीन
अहो मिपावर विषय मराठीचाच असणार ना? एखादा धागा हिंदी किंवा इतर भाषांवर निघाला कि त्यावरही चर्चा करू की. एखाद्या गोष्टीचा शोध मराठी शास्त्रज्ञाने लावून त्या गोष्टीला मराठी नाव दिले तर इंग्रजी बोलणारेही मराठी नाव आहे तसेच वापरतील. प्रश्न सगळ्या अमराठी शब्दांसाठी मराठी शब्द शोधण्याच्या अट्टाहासाबद्दल आहे. बाकी oxygenला जारक म्हणण्याच्या तुमच्या निर्धाराला दाद द्यायलाच हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/21/2016 - 16:36 नवीन
ऑक्सिजनला प्राणवायू हा उत्तम प्रतिशब्द व्यवहारात रुळलेला असताना त्याला जारक म्हणणे म्हणजे... ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विद्यार्थी
आ
आदूबाळ Sun, 03/20/2016 - 08:35 नवीन
ओह् दीज मराठी पीपल्स.... डुईंग मराठायझेशन ऑफ एवरीथिंग. ब्रिंगिंग नाईन टु द नोज. नो ऍड्रेस ऑफ एनीथिंग टू एनीथिंग.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 03/20/2016 - 08:52 नवीन
अगदी अगदी. माझं अनुप्रस्थ महासंयोजी पिंड भंजाळलं हे वाचून. शाळेत असे शब्द दहावीपर्यंत आले आणि मग अकरावीपासून रेग्युलर सायन्स इंग्रजीत सुरु झालं तर अगदी लँड स्प्लिट होऊन आपल्याला स्टमकमधे घेईल तर बेटर असं वाटेल. एनीथिंग ट्रू इजन्ट बाबा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Sun, 03/20/2016 - 09:05 नवीन
काय नाय. ही ब्याण्णव कौरवांची नावे हायेत. बाकी म्हैत असलेले दुर्योधन, दु:शासन वगैरे वगळलीत. ;) हस्तिनापूरचे कौरव याचाच अपभ्रंश हस्तिनस्य कौरवजन = हस्तिनः कौरबजन = हायड्रो कार्बन असा झालाय. गांधारीने लेकरांची प्रगतीपुस्तके वाचण्यासाठी ब्रेल लिपीतले एक्सेल शीट तयार केलेले. त्यालाच पिरिऑडीक टेबल म्हणतेत. ते शकुनीमामाने तयार करुन दिल्याने थोडासा पटाचा प्रभाव आहे त्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
र
राघवेंद्र Sun, 03/20/2016 - 16:17 नवीन
हरिभाईत हेच शिकवतात का??? ह. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Sun, 03/20/2016 - 18:11 नवीन
हरीभाई देवकरण, गावाची मोल...... हाती घ्याल ते तड्डी द्या हे शिकवतात. (बादवे मी एचडी नाही. आम्ही फादरवाले)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
स
सतिश गावडे Sun, 03/20/2016 - 20:11 नवीन
हरीभाई देवकरणला शिकलेले दोघे मला माहिती आहेत. एक आमचे पन्नासराव आणि दुसरे जब्बार पटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
र
राघवेंद्र Mon, 03/21/2016 - 15:56 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
क
कंजूस Sun, 03/20/2016 - 10:04 नवीन
रशिअन/ जर्मनी डॅाइश लोकांनीही रसायन/पदार्थ विज्ञानात खूप प्रगती केली ते कोणत्या संज्ञा वापरतात?
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 03/20/2016 - 10:18 नवीन
खुळचटपणा आहे हा. हे असलं काही पाठयपुस्तकांमधून पोरांवर थोपलं तर पोरं भंजाळून जातील.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Sun, 03/20/2016 - 13:07 नवीन
हे मराठी एसएससी पर्यंतच्या पाठ्यपुस्तकातील नसेल (काही राज्यांच्या हिंदी माध्यमात वापरात असण्याची शक्यता नाकारता येत नाही) , एस एस सी बालभारतीत कोणते शब्द वापरतात ते जाणून घ्यावयाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sun, 03/20/2016 - 20:13 नवीन
मी मराठी माध्यमातून शिकलो आहे. तेव्हा विज्ञानाच्या पुस्तकात "हायड्रोजनचे दोन अणू आणि ऑक्सिजनचा एक अणू मिळून पाण्याचा एक रेणू बनतो." अशीच वाक्ये असायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
मराठी कथालेखक Mon, 03/21/2016 - 09:35 नवीन
खरय. विशेषनामाचे भाषांतर करायचे नसतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
र
राघवेंद्र Mon, 03/21/2016 - 15:54 नवीन
चायनीज लोक करतात त्यांच्या नावाचे इंग्रजी भाषांतर करतात त्यामुळे त्यांचे नाव लक्ष्यात ठेवायला मदत होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
आ
आदूबाळ Mon, 03/21/2016 - 16:22 नवीन
ते भाषांतर नसतं. कोणतंही रँडम इंग्रजी नाव घेतात. माझ्या एका चिनी मित्राचं इंग्रजी नाव "हार्डी" होतं. साहजिकच पब्लिक कमरेखालचे विनोद करून त्याची मनसोक्त खिल्ली उडवायचं. एक दिवस त्याने चिडून सगळ्या वर्गाला मेल लिहिली, की त्याने हे नाव थॉमस हार्डीवरून प्रेरित होऊन घेतलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राघवेंद्र
ए
एस Sun, 03/20/2016 - 10:40 नवीन
काहीच्या काही!
  • Log in or register to post comments
ज
जव्हेरगंज Sun, 03/20/2016 - 12:57 नवीन
अगागा !!! एखाद्या जिलबीचं टकानं केलेल्या विडंबनासारखं झालयं हे! निव्वळ भुछत्री !!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 03/20/2016 - 13:03 नवीन
तुम्ही पुणेकर का हो? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
म
माहितगार Sun, 03/20/2016 - 13:03 नवीन
अहो भूच्छत्री प्रेमाने काढलेली नाही उद्वेगाने काढलेली आहे. मराठी विकिपीडियावरील या महाशयांनी केलेले बदल अभ्यासाल का ? आणि ते झाल्याला दोन वर्षे झाली आज पुन्हा आवर्तसारणीत बदल दिसले तेव्हा चर्चेस घेण्याचा विचार केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज
ब
बोका-ए-आझम Sun, 03/20/2016 - 20:03 नवीन
Astatine ला चक्क लावणी असा शब्द आहे? _/\_ . १९९१ मध्ये दहावी पास झालो हे सुदैव वाटायला लागलं हे वाचून. रासायनिक समीकरणं पण अशीच लिहिताहेत की काय?
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sun, 03/20/2016 - 20:11 नवीन
माहितगार साहेब, राहूंद्या की हो मूळ इंग्लिश नावे तशीच देवनागरीत ! नाहीतरी जगातल्या बहुतेक सर्व भाषा ती तशीच वापरत आहेत. "वर सुचवलेली नावे कोणाला तरी उपयोगी होतील का?" हा महत्वाचा प्रश्न आहेच. पण ती मराठीतून (किंवा इतर कुठल्याही भारतिय भाषेतून) शास्त्र शिकणार्‍या विद्यार्थांचे जीवन अत्यंत कठीण करतील यात काहीच संशय नाही. त्याउप्पर, आंतरराष्ट्रिय स्तरावर अभ्यास/संशोधन करणार्‍यांना त्या नावांचा उपयोग तर होणार नाहीच; पण इंग्लिश न येणार्‍या मराठी लोकांनाचाही ती नावे असलेला शास्त्रिय विषयावरच्या लेख वाचून गोंधलच होईल. त्याऐवजी, मूलद्रव्यांची इंग्लिश नावे देवनागरीत लिहिणे-वाचणे सगळ्यांनाच सोपे, उपयोगी व व्यावहारीक होईल. थोडक्यात, तुमचे मराठीकरणाच्या अनेक स्पृहणिय प्रकल्प चालले आहेत हे मिपावरच्या लेखांतून दिसत आहे आणि त्यांना पूर्ण पाठींबा आहे. परंतु, आवर्तसारणीचे मराठीकरण करण्याचा प्रकल्प अव्यावहारीक होऊन त्यासाठी घेतलेले परिश्रम वाया जातील असे वाटते.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 06:24 नवीन
मी धागा लेखातील भूमिका लिहीताना कुठे चुकलो आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ह
हुप्प्या Sun, 03/20/2016 - 23:27 नवीन
मूलद्रव्यांकरता मराठी संज्ञा बनवणे स्तुत्य आहे. त्याला यश मिळणे हे नशीब आणि शब्द निर्माण करणार्‍याची प्रतिभा आणि मराठी समाजाचा भाषाभिमान यावर अवलंबून आहे. पण असे प्रतिशब्द आहेत हेही नसे थोडके. जर्मन भाषेत पाहिले तर तांबे, जस्त, लोखंड, चांदी (आणि अन्य अनेक) ह्याकरता वेगळी नावे आहेत. मराठीत ह्या आणि अशा मूलद्रव्यांकरता मराठी नावे आहेतच. त्यात थोडी भर घातली तर मराठी भाषा समृद्ध करण्याकरता केलेला प्रयत्न समजायला हरकत नाही. ज्या भाषेत असे नवे शब्द निर्माण करून रुजवायचा प्रयत्न होत नाही ती भाषा यथावकाश मृतप्राय होऊ लागते. मराठी ही निव्वळ संवादाकरता वापरायची भाषा नाही. त्यात अन्य प्रकारही व्यक्त करता येतात. तत्त्वज्ञान, भाषाशास्त्र, काव्य, आरोग्य, शेती, गणित असे विषय मराठीत शिकवले जातात. तिथे निव्वळ साधी सोपी संवादाची भाषा वापरली जात नाही. त्या त्या विषयाशी संबंधित अशी पुस्तकी परिभाषा तिथे वापरली जातेच त्यामुळे प्रत्येक ठिकाणी साधी सोपी मराठीच असावी असा आग्रह अनाठायी आहे. इंग्रजीतही तसे होत नाही. अशा प्रयोगांकडे हेटाळणी, तुच्छता, टिंगलटवाळी असे दृष्टीकोन बाळगणारे भेटतीलच. पण माहितगारसाहेब, आपण आपला प्रयत्न चालू ठेवा. आपल्याला १ टक्का यश मिळाले तरी त्याने मराठी समृद्धच होईल.
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 07:38 नवीन
मदनबाण यांनी शेअर केलेल्या बातमीवरुन International Union of Pure and Applied Chemistry (IUPAC) अनुवादांना प्रोत्साहीत करते, मग आपलेच लोक न्युनगंड बाळगताना पाहून गंमत वाटते. असो प्रोत्साहक प्रतिसादासाठी खूप खूप आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ब
बोका-ए-आझम Mon, 03/21/2016 - 08:22 नवीन
सुलभतेचा आहे. रसायनशास्त्र समजण्यासाठी त्या मूलद्रव्यांच्या मूळ नावांशी परिचय हवा. मेंडेलीफनेही मूलद्रव्यांची प्रचलित असलेलीच नावं वापरलेली आहेत - त्या नावांमध्ये रशियन भाषेतील नावं कमी असूनसुद्धा (मला एकही रशियन-प्रभावित नाव सापडलं नाही.कृपया जाणकारांनी सांगावे). शिवाय एक मुद्दा हाही आहे की कुठल्याही शास्त्रीय विषयाच्या प्रगतीसाठी त्या विषयावर उपलब्ध असलेल्या आणि नव्याने प्रस्थापित होत असणाऱ्या ज्ञानाची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. हा हेतू इथे पूर्ण होत नाही. रसायनशास्त्रात संज्ञा, समीकरणं,संयुजा वगैरे गोष्टी अगदी शाळेपासून सुरु होतात. त्याच वेळी जर हा तक्ता (मूलद्रव्यांच्या भारतीय नावांचा) मुलांना अभ्यासायला दिला तर त्यांचा वेळ आणि ऊर्जा ही नावं लक्षात ठेवण्यात जाईल अाणि मुख्य गोष्टीपासून ते दूर जातील. शिवाय यात फक्त मूलद्रव्यांचा विचार केलेला आहे. संयुगांचं नाव ठरवताना जी nomenclature system रसायनशास्त्रात आहे, उदाहरणार्थ धन आयन प्रथम आणि ऋण आयन नंतर (जसं NaCl - Sodium +ve and Chlorine -ve) तिचा इथे विचार केलेला नाही. शिवाय जर SO3 असेल तर सल्फाईट,SO4 असेल तर सल्फेट अशा रासायनिक मूलकांच्या (radicals) विचारही केलेला नाही. कार्बनी रसायनशास्त्र किंवा Organic Chemistry मध्ये nomenclature वेगळं असतं. त्याचाही विचार इथे झालेला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गवि Mon, 03/21/2016 - 09:34 नवीन
अगदी हेच पुढचं सगळं लिहिण्याचं मनात आलं होतं पण मराठीवादाला अंत नाही. ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एकूणच सर्वच नॉमिनक्लेचर्समधे प्रत्येक नावाचं मूळ महत्वाचं असतं. वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे विशेषनामाचं भाषांतर या गोष्टीला काही अर्थ नसतो. प्रचंड प्रमाणात विशेषनामांची भाषांतरं करण्याची गरज पडण्यामधून आपल्या भाषेत / एरियात किती कमी नवीन संशोधन गेल्या शतकात झालंय ते कळतं. कटु पण सत्य. ज्या देशांमधे ज्या गोष्टीचं मूळ (शोध लागणे या अर्थाने) असतं तिथलं नाव त्या गोष्टीला पडतं. नंतर त्या विशेषनामांचं आपल्या भाषेत फक्त टांकसाळीत घालून नाणी पाडल्यासारखं रुपांतर करणं म्हणजे नुसतेच "मेड इन.." चे शिक्के तयार प्रॉडक्ट्सवर मारण्याच्या मनोवृत्तीपैकी आहे हेच अनेकांच्या लक्षात येत नाही. शून्याचा शोध आपण लावला. त्याखेरीज काही वनस्पतींचे शोध लावले. आयुर्वेदावर / योग या विषयावर आपण मुळात संशोधन केलं.. या सर्वांना आपोआप भारतीय नावं मिळाली. प्राणायामला सर्वत्र प्राणायामच म्हणतात, कपालभातीलाही कपालभातीच म्हणतात. पण लॅपटॉपचा शोध न लावता तो तयार स्वीकारायचा आणि मग त्याला अंकसंगणक म्हणायचं हे कसलं मराठीकरण? उद्या एका भारतीय जोडप्याने (उदा.) उदय नावाचा पुत्र पैदा केला आणि तो पुढे परदेशात जाऊन नोकरी करु लागल्यावर लोक त्याला "राईज" म्हणायला लागले तर आवडेल का आणि योग्य ठरेल का? (जरी आपल्यातले अनेक लोक असे बदल प्रत्यक्षात करत असले तरी.. ;) ) अ‍ॅक्रिलोनायट्राईल ब्युटाडीन स्टीरिन वगैरे हे मराठीत कसं एस्टॅब्लिश होईल आणि त्या खटाटोपात नेमकं वर्थ काय असेल याचा विचार अनेकदा येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अभ्या.. Mon, 03/21/2016 - 09:49 नवीन
अगदी शब्दशः भाषांतर नसावे ह्याला सहमत. पण धाग्यात सल्फर ला शुल्वारि हा शब्द वापरला गेला आहे. शुल्व म्हणजे तांबे. शुल्वारि म्हणजे तांब्याचा शत्रू. तांबे सल्फर सोबत विघटित होते. असे गुणधर्माचे किंवा स्वरुपाचे वर्णन करणारे शब्द असले तर थोड्या कालावधीत ते रुळायला हरकत नसावी असे माझे वैयक्तिक मत आहे. बाकी ह्यासाठी संस्कृत शिकावी लागेल, शिक्षणांचे भगवेकरण आदि मुद्द्यांना अग्र्रिम पास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ग
गवि Mon, 03/21/2016 - 10:02 नवीन
अभ्या, अरे हे सर्व उत्तम चालेल, पण टॉप डाऊन अप्रोचने नव्हे रे. मुळात पूर्ण पदव्युत्तर आणि सर्वोच्च ज्ञान मराठीत उपलब्ध व्हायचं असेल तरच असे शब्द भाषांतरित करुन उपयोग आहे. आणि मुळात ज्ञान / संशोधन असं सगळं वरच्या लेव्हलपर्यंत (शेवटपर्यंत) मराठीतच व्हायचं तर प्रतिशब्दांची टांकसाळ कामाची नाही. मुळात तशी व्यवस्था (ज्ञान, इन्फ्रास्ट्रक्चर, संधी, भविष्यातली व्यक्तिगत समृद्धीची शक्यता, अभ्रष्टता इ.इ.) आधी उभी केली पाहिजे. नाहीतर समुद्र पार न करु शकणारी पण काठापासून शंभर मीटर गेल्यावर खोल पाण्यात फेकून देणारी आणि आता पोहा तुमचेतुम्ही असं म्हणणारी नाव काय कामाची? दहावीपर्यंत मराठीत अशा कॉईन केलेल्या अनुप्रस्थ महासंयोजी शब्दांमधे शिकलेलं सगळं अकरावीत अचानक "अनलर्न" करुन त्याच गोष्टींना सर्वच्यासर्व नवे इंग्रजी प्रतिशब्द शिकणं, आणि विषयही इंग्रजीतच शिकणं यात येणारा भयानक सेटबॅक मराठीतून सायन्सला गेलेली पोरं जाणून आहेतच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
अ
अभ्या.. Mon, 03/21/2016 - 10:38 नवीन
१०० टक्के पटले गविराज. एका चलनातून दुसर्‍यात टॉगल होताना पहिली टांकसाळच 'मोडीत' काढावी लागत असेल तर अवघड होणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/21/2016 - 10:41 नवीन
एकदम चपखल ! अगदी हेच मनात होतं आणि ते नीट लिहायला वेळ काढावा असा विचार करत होतो. धन्यवाद गवि, माझे श्रम वाचविल्याबद्दल ! माझी अजून थोडी भर... स्थानिक भाषांत सर्व शास्त्रे वाचता/शिकता/शिकविता येत नाहीत/येणार नाहीत हा मुद्दा नाहीच... ते शक्य आहे हे फ्रान्स, जर्मनी, नॉर्वे, स्विडन, डेन्मार्क, इ पाश्चिमात्य देशांत आणि जपानमधे सिद्ध झाले आहे/होत आहे. पण ते शक्य होण्यासाठी त्या देशांकडे खालील मूलभूत संसाधने (इंफ्रास्ट्रक्चर) आस्तित्वात आणली गेली आहेत : १. केजी पासून तर अत्युच्च्य स्तराचे (पीएचडी, इ) शिक्षण आणि संशोधन स्थानिक भाषेत शक्य आहे. २. स्थानिक भाषेत घेतलेले शिक्षण व संशोधन जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त आहे. ३. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले संशोधन स्थानिक भाषेत त्वरीत भाषांतरीत केले जाते व ते सर्व स्थानिक संशोधकांना/जनतेला उपलब्ध असते. ४. आणि या प्रकल्पाच्या यशासाठी आवश्यक मुख्य मुद्दा : स्थानिक स्तरावरच्या सर्व प्रकारच्या व्यावसायीक संधी मिळविण्यासाठी स्थानिक भाषेतील शिक्षण पुरेसे असते. मात्र, हे सर्व खरे असले तरीही... जागतिक स्तरावर संशोधन करायचे आहे अश्या संशोधकांना व वरिष्ठ जागतिक स्तरावर काम करायचे आहे अश्या व्यावसायीकांना/अधिकार्‍यांना, एका ठराविक स्तरानंतर इंग्लिशची मदत घेणे भाग पडतेच ! पूर्णविराम ! याशिवाय, "भारताचा एक अभिमान असणारी वस्तूस्थिती"च भारताची "एक मोठी समस्या" आहे ! वरची सर्व संसाधने (इंफ्रास्ट्रक्चर) केवळ एकट्या मराठीत तयार करण्यास लागणार्‍या मनुष्यबळ, पैसा व वेळ यांचा विचारच श्वास रोखायला लावतो... तर मग ते सर्व संसाधन वीसच्या आसपास असलेल्या अधिकृत भाषांमधे निर्माण करायला किती मनुष्यबळ, पैसा व वेळ लागेल ??? हे सगळे करण्यात असणारे खर्च-फायदा गुणोत्तर (कॉस्ट-बेनेफिट रेशो) आपल्याला सद्या तरी परवडेल काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 10:52 नवीन
गवी आणि म्हात्रेसर, दोघांचे प्रतिसाद पटले. रोजच्या वापरातले एखाद्या मूल्द्रव्याचे, वस्तुचे नाम रसायनशास्त्रात किंवा भौतिकात जातांना, समिकरणे मांडतांना, शास्त्रीय भाषेत मांडतांना मात्र त्याचे शास्त्रीय नाम लिहणे अपेक्षित असते. ह्या दोन नामांमधे गोंधळ उडण्याचे काही चांसेस असतात का? उदाहरणार्थ, मीठ = सोडियम क्लोराईड. वनस्पतीशास्त्रामधे कडुनिंबाला Azadirachta indica असे म्हटले जाते. कोणत्याही भाषेत कडुनिंबाला काहीतरी सोपे नाव असेलच. शास्त्रीय प्रबंधांमधे अशी शास्त्रीय नावे गरजेची, पण त्या शास्त्राचे प्राथमिक शिक्षण घेतांना ते सोपे नाव वापरावे की शास्त्रीय नाव वापरावे? दोन्ही नावे वापरावी की कसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/21/2016 - 11:03 नवीन
याबाबतीत, शास्त्रिय व सर्वसामान्य लेखनात "स्थानिक/सर्वसामान्य नाव (इंग्लिश भाषेत शास्त्रिय नाव, इटॅलिक्समधे)" असे लिहिण्याचा प्रघात आहे. या पद्धतिने, सर्व प्रकारच्या वाचकांना, लेखन वाचणे सोईचे होते. उदा : भात / तांदूळ (Oryza sativa) Wheat (Triticum spp.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 11:38 नवीन
धन्यवाद. थोडी गंमतः कायम ह्या शास्त्रिय संशोधनात बुडालेल्या शास्त्रज्ञास बायकोने जेवणासाठी काय बनवू असे विचारले तर तो असे तर म्हणत नसेल ना, 'अगं, थोडासा Oryza sativa टाक. मला फार भूक नाहीये.' =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे
अ
अभ्या.. Mon, 03/21/2016 - 11:46 नवीन
बायको भाषाकोविद असली तर उदजन जारक घ्या अन झोपा म्हणेल. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 11:50 नवीन
हा हा हा. पुढे हेच लिहायला पाहिजे होते. पण आम्ही भाषाकोविद नसल्याने सुचले नाही. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
ड
डॉ सुहास म्हात्रे Mon, 03/21/2016 - 10:45 नवीन
नाहीतर समुद्र पार न करु शकणारी पण काठापासून शंभर मीटर गेल्यावर खोल पाण्यात फेकून देणारी आणि आता पोहा तुमचेतुम्ही असं म्हणणारी नाव काय कामाची? हे खास आवडले !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
त
तर्राट जोकर Mon, 03/21/2016 - 10:08 नवीन
+१०००००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि
म
मदनबाण Mon, 03/21/2016 - 04:21 नवीन
जरासे अवांतर... हा धागा पाहुन शाळेतले दिवस आठवले,पिरियॉडिक टेबल मधे मूलद्रव्य शोधणे हे फार मजेशीर वाटत असे. जाता जाता :- हल्लीच वाचनात आलेली बातमी :- 4 New Elements Are Added To The Periodic Table Four new elements discovered, periodic table's seventh row complete

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Yalla... نانسي عجرم - فيديو كليب يلا :- Nancy Ajram
  • Log in or register to post comments
म
माहितगार Mon, 03/21/2016 - 07:35 नवीन
मदनबाण आपण रोचक माहिती दूवा दिलात त्या बद्दल आभारी आपण दिलेल्या बातमी दुव्यात नवीन मुल द्रव्यांच्या नावांसाठी Inorganic Chemistry Division of IUPAC for ...., translatability into other languages,.... हा क्रायटेरीआ ठेवताना दिसते. मग आपले मराठी लोकच अनुवादाच्या बाबतीत (प्रयत्नापुर्वीच) न्युनगंड का दाखवू इच्छितात असा प्रश्न सहाजीकपणे पडतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
त
तिमा Mon, 03/21/2016 - 06:36 नवीन
अशा अगाध भाषेत परीक्षा द्यायची म्हटली तर आम्ही विद्यावाचस्पतीही नापास होऊ, हे नक्की! आता ब्रोमिनला दु म्हटलं तर मिपावरील सर्व बुवावादी लोक दुदुदुदुदुदुदु म्हणायला लागतील.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 03/21/2016 - 06:47 नवीन
सल्फर व फॉस्फरस यांना अनुक्रमे गंधक व स्फुरद ही मराठी नावे आहेतच की! शिवाय कार्बन- कर्ब नायट्रोजनः नत्र आयर्न: लोह झिंकः जस्त ही नावेसुद्धा प्रचलित आहेत. (नत्र व स्फुरद तर शेतक-यांनाही माहिती आहेत.) आधीपासून माहिती असणा-या गोष्टींना मराठी (किंवा फॉर दॅट मॅटर संस्कृत) नावे असावीत व ती आग्रहाने वापरली जावीत. पण नवीन शोधल्या जाणा-या गोष्टींना असुलभ एत्तदेशीय नाव ठेवण्याचा अट्टाहास नको.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा