आवर्त सारणी (पिरियॉडिक टेबल) रासायनिक मूलद्रव्यांचे मराठीकरण
भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते.
आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच.
असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात.
रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल.
अणुवस्तुमान / अणुअंक संकेतचिन्ह इंग्रजी मूलतत्त्व संस्कृत-हिंदी मूलतत्त्व समाईक
ऑक्सिडीभवन स्थिति
१ उ [H] hydrogen उदजन ±1
२ या [He] helium यानाति 0
३ ल [Li] lithium लघ्वातु +1
४ वि [Be] beryllium विडूर +2
५ टा [B] boron टांकण +3
६ प्रां [C] carbon प्रांगार ±4
७ भू [N] nitrogen भूयाति −3
८ जा [O] oxygen जारक −2
९ त [F] fluorine तरस्विनी −1
१० शि [Ne] neon शिथिराति 0
११ क्षा [Na] sodium क्षारातु +1
१२ भ्रा [Mg] magnesium भ्राजातु +2
१३ स्फ [Al] aluminum स्फटयातु +3
१४ सै [Si] silicon सैकता ±4
१५ भा [P] phosphorus भास्वर −3
१६ शु [S] sulfur शुल्वारि −2
१७ नी [Cl] chlorine नीरजी −1
१८ मं [Ar] argon मंदाति 0
१९ द [K] potassium दहातु +1
२० चू [Ca] calcium चूर्णातु +2
२१ स्तो [Sc] scandium स्तोकातु +3
२२ रं [Ti] titanium रंजातु +4,3,2
२३ रो [V] vanadium रोचातु +5,2,3,4
२४ व [Cr] chromium वर्णातु +3,2,6
२५ लो [Mn] manganese लोहक +2,3,4,6,7
२६ अ [Fe] iron अयस् +3,2
२७ के [Co] cobalt केत्वातु +2,3
२८ रू [Ni] nickel रूपक +2,3
२९ ता [Cu] copper ताम्र +2,1
३० कु [Zn] zinc कुप्यातु +2
३१ द्र [Ga] gallium द्रवातु +3
३२ सि [Ge] germanium सिकातु +4,2
३३ ने [As] arsenic नेपाली ±3,+5
३४ मे [Se] selenium मेचाग्नि +4,−2,+6
३५ दु [Br] bromine दुराघ्री ±1,+5
३६ ली [Kr] krypton लीनाति 0
३७ दी [Rb] rubidium दीपातु +1
३८ शो [Sr] strontium शोणातु +2
३९ भृ [Y] yttrium भृशला +3
४० गो [Zr] zirconium गोमेदातु +4
४१ का [Nb] niobium काशातु +5,3
४२ सं [Mo] molybdenum संवर्णातु +6,3,5
४३ चे [Tc] technetium चेष्टातु +7,4,6
४४ नक [Ru] ruthenium नक्षरातु +4,3,6,8
४५ ना [Rh] rhodium नाम्लातु +3,4,6
४६ नि [Pd] palladium निचूषातु +2,4
४७ रज [Ag] silver रजत +1
४८ मृ [Cd] cadmium मृज्यातु +2
४९ नै [In] indium नैलातु +3
५० त्र [Sn] tin त्रपु +4,2
५१ अं [Sb] antimony अंजन +3,5
५२ वं [Te] tellurium वंगक +4,6,−2
५३ जं [I] iodine जंबुकी −1,+5,7
५४ को [Xe] xenon कोटयाति 0
५५ द्यु [Cs] cesium द्युतातु +1
५६ ह [Ba] barium हर्यातु +2
५७ सु [La] lanthanum सुजारला +3
५८ पु [Ce] cerium पुष्कला +3,4
५९ श्या [Pr] praseodymium श्यामला +3,4
६० आ [Nd] neodymium आपीतला +3
६१ पि [Pm] promethium पिविरला +3
६२ धू [Sm] samarium धूसरला +3,2
६३ किं [Eu] europium किंविरला +3,2
६४ यो [Gd] gadolinium योनिला +3
६५ इ [Tb] terbium इद्भृशला +3,4
६६ चु [Dy] dysprosium चुम्बला +3
६७ पां [Ho] holmium पांडुला +3
६८ र [Er] erbium रक्तला +3
६९ व्या [Tm] thulium व्याहरिला +3,2
७० श्वे [Yb] ytterbium श्वेतला +3,2
७१ निर्व [Lu] lutetium निर्वर्णला +3
७२ गा [Hf] hafnium गावातु +4
७३ स [Ta] tantalum सहातु +5
७४ च [W] tungsten चण्डातु +6,4
७५ बा [Re] rhenium बाष्पातु +7,4,6
७६ गु [Os] osmium गुर्वातु +4,6,8
७७ घ [Ir] iridium घनातु +4,3,6
७८ म [Pt] platinum महातु +4,2
७९ स्व [Au] gold स्वर्ण +3,1
८० पा [Hg] mercury पारद +2,1
८१ सितु [Tl] thallium सिक्ष्यातु +1,3
८२ सी [Pb] lead सीस +2,4
८३ भि [Bi] bismuth भिदातु +3,5
८४ तो [Po] polonium तोयातु +4,2
८५ ला [At] astatine लावणी
८६ तै [Rn] radon तैजसाति 0
८७ क्षु [Fr] francium क्षुद्रातु +1
८८ ते [Ra] radium तेजातु +2
८९ ए [Ac] actinium एजातु +3
९० ह्र [Th] thorium ह्रसातु +4
९१ प्रै [Pa] protactinium प्रैजातु +5,4
९२ कि [U] uranium किरणातु +6,3,4,5
उपरोक्त यादी रघुविर यांची संस्कृत पर्यायांची बहुधा हिंदी भाषेसाठी वापरली जात असावी. हि मोठी यादी वाचत खाली येई पर्यंत काहीतरी वाचकांचा गैरसमज होत असावा म्हणून धागा लेखाची भूमिका पुन्हा एकदा च्योप्यपेस्त करत आहे.
भाषा सल्लागार मंडळाची परिभाषेच्या निर्मितीसाठी निदेशक तत्त्वे तशी सुस्पष्ट आहेत. संकेतानुसार इंग्रजी नावांचे केवळ देवनागरीकरण करणे अभिप्रेत आणि पुरेसे असावे. तरी सुद्धा सोपे, (खासकरुन नवीन पिढीस रुचतील असे) आकलन आणि वापरसुलभ मराठी पर्याय उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावा असे व्यक्तीशः मला वाटत असतानाच क्लिष्ट बोजड आणि संस्कृतप्रचुरता लादण्याचा त्यात उद्देश असू नये असे ही वाटते.
आकलन आणि वापरसुलभ नसलेल्या शब्दांचा मारा नविन पिढीवर कुणी शुद्धतावादी करु लागतात तेव्हा कपाळावर आठी पडतेच.
असेच काहीसे मराठी विकिपीडियावरील रसायनशास्त्र विषयक शब्दांविषयी होताना दिसते आहे. मराठी विकिपीडियावरील देवनागरी आकलन सुलभ असल्यामुळे हिंदीभाषी सुद्धा येऊन अचानक संस्कृतनिष्ठ पण आकलन सुलभ नसलेले शब्द वापरुन प्रचलित शब्द परस्पर बदलताना दिसतात.
रासायनिक मूलद्रव्यांचे संस्कृतकरण लाहोर मधिल संस्कृत अध्यापक रघुवीर यांनी विसाव्या शतकात केले. ते मराठी विकिपीडियावर थोपले जाताना दिसते आहे. यातील बर्याच शब्दांचे वाचन मला कम्फर्टेबल वाटत नाही एसएससी बोर्डाच्या मराठी रसायन शास्त्राच्या पुस्तकातून कोणते शब्द वापरात आहेत आणि खालील पैकी रसायनांना रघुविरांनी सुचवलेल्या शब्दा पेक्षा काही अधिक सुबोध शब्द सुचवणे शक्य आहे का ते पहावे आणि त्या निमीत्ताने विवीध मुलद्रव्यांच्या गुणधर्मांची चर्चा झाल्यास हवी आहे जेणे करून मराठी विकिपीडियावरील लेखांना अद्ययावत करणे सोपे जाईल.
मराठी विकिपीडियासाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे आपले प्रतिसाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आणि चर्चा सहभागासाठी आभार.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Habibi Ya Eini... :- Nourhanne