पाण्याची धुळवड आणि काही आकडे
भारतांतच नाही तर जगांत सगळीकडे प्राणीप्रेमी, निसर्गप्रेमी इत्यादी चे कातडे पांघरून राजकारण करणे सर्रास चालते. अश्या संघटनांना किंवा लोकांना मदत करताना आपली विवेकबुद्धी वापरूनच मदत करावी.
दर वर्षी होळीच्या उत्सव जवळ आला कि "पाणी वाचवा होळी खेळू नका" असे आवाहन केले जाते. आणखी कुठे दुष्काळ आहे, कुठे शेतकरी संकटात आहे असे भासवून मुंबई पुण्यात होळी खेळू नये असे सर्व राजकारणी NGO वगैरे लोक सांगत फिरतात. होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही. काही लोक चक्क संडास फ्लश करू नका किंवा दाढी करताना नळ चालू ठेवू नका इत्यादी प्रचार करत असतात.
ह्या प्रचाराला शास्त्रीय आधार फार कमी आहे. पाणी किंवा इतर कुठल्याही संसाधनाचा वापर जितका शक्य आहे तितका कमी करावा पण होळी खेळू नये इत्यादी प्रचार अतिशयोक्ती आहे.
भारतातील एकूण पाण्याच्या वापरापैकी ९१% पाणी शेती साठी वापरले जाते, ७% पाणी शहरातील मानवी वापरा साठी जाते तर ५% पाणी विविध उद्योग धंदे वापरतात. [१]
७% मानवी वापरातील पाण्यापैकी सुमारे ५०% पाणी स्नान, कपडे धुणे आणि प्रसाधनग्रहांत जाते. [२] पिण्यासाठी फक्त ४% (७ टक्क्याचे ४%) पाणी वापरले जाते.
वर्षांतील एक दिवस आपण पाण्याने मनसोक्त होळी खेळली तरी पाण्याच्या एकूण साठ्यावर काहीही परिणाम होत नाही त्याशिवाय न खेळली तर जे पाणी वाचते त्यामुळे कुणालाही फायदा विशेष होत नाही. अर्थांत कुणाला प्रतीकात्मक दृष्ट्या होळी न खेळता पाणी वाचण्याचा प्रयत्न करायचा असेल तर जरूर करावा पण त्याने शेतकर्यांना फायदा होतो हा निव्वळ गैरसमज आहे.
सामाजिक प्रथा आणि इतर काही तरी विषय ह्यांत False Dichotomy [३] दाखवून सामाजिक प्रथा बंद करव्यात असा प्रचार जे लोक करतात त्यांच्या विषयी मला नेहमीच संशय वाटतो. उदा शिवलिंगावर दुध व्हावू नका भुकेल्याला द्या इत्यादी. आम्ही आमच्या मुलांना सुद्धा सांगू शकतो, उगाचं शिवरायांचे गड पाहायला जावून वेळ दवडू नका त्या एवजी गणित शिका. म्हातार्या आजीचा हात हातांत घेवून तिच्या बरोबर ५ मिनिटे बोलून वेळ दवडू नका विज्ञानाचे पुस्तक वाचा अभ्यासांत फायदा होयील. Alzimers झालेल्या आजोबा बरोबर बोलणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे कारण त्यांना नंतर त्याचा विसर पडेल त्या ऐवजी एखादे पुस्तक वाचा. ह्या गोष्टी काही प्रमाणात तार्किक वाटल्या तरी प्रत्यक्षांत तार्किक दृष्ट्या चुकीच्या आहेत. कारण इथे दोन पर्याय Mutually Exclusive नसून दोन्ही गोष्टी साध्य केल्या जावू शकतात.
ज्यांना पाण्या विषयी खरोखर कळकळ आहे ते अनेक गोष्टी करू शकतात. उदा एक दिवस तांदूळ जेवणात न वापरता गहू वापरा. साखरेचा वापर कमी करा इत्यादी.
९१% पाणी जे शेत साठी वापरले. पाणी वेस्ट करण्यात भारतीय शेतकऱ्याचा पहिला नंबर लागतो. चीन किंवा अमेरिच्या तुलनेत एक टन गहू उगवायला भारतीय शेतकरी सुमारे दुप्पट पाणी वापरतो.
एकूण शेतीच्या पाण्यापैकी सुमारे ४०% पाणी फक्त तांदूळ आणि उस हि पिके घेतात. भारतीय लोक आपल्या आहारांत तांदूळ फार प्रमाणात ठेवत असल्याने त्याचे आश्चर्य वाटत नाही पण उस ह्या पिकाचे मात्र आश्चर्य वाटते. महाराष्ट्रातील सुमारे ३% शेतजमीन उसाच्या लागवडी खाली आहे पण महाराष्ट्रातील ६०% पाणी मात्र फक्त उस घेतो. [६] पाणी हे शेतकर्यांना फुकट मिळत असल्याने शेतकऱ्याला फरक पडत नाही पण पिकाच्या किमतीत "पाण्याचा वापर" हा घटक ह्यामुळे लक्षांत येत नाही. ह्यामुळे साखरेची किमत कमी राहते. पाण्याचा वापर लक्षांत घेतल्यास साखरेची किंमत किमान १००% वाढायला पाहिजे.
ब्राझील सर्वाधिक साखरेची निर्मिती करतो. सदर साखर भारतांत कमी दरांत विकली जावू शकते म्हणून भारतीय सरकारने ४०% आयात कर लावून ह्या साखरेला भारतांत बंद केले आहे. साखर माफियाना करदात्याचा पैसा देवून सरकार साखर निर्यात करण्यास सरकार मदत करते.
साखरेची निर्यात करण्यास हरकत नाही पण ती साखर तयार करायला जे पाणी खर्च झाले आहे त्याचा खर्च त्याच्या दरातून वसूल नाही झाला तर अर्थ असा होतो कि भारतीय सरकार भारताचे पाणी भेट म्हणून इतर देशांना दिते. वरून करदात्यांचा पैसा साखर कारखान्यांना देणे म्हणजे पाण्याशिवाय गरीब भारतीयांचा पैसा सुद्धा विदेशी लोकांना भेट म्हणून देणे.
ऊस पिकवून शेतकरी गब्बर झाले आहेत असे सुद्धा वाटत नाही. उस पिकवणारे शेतकरी इतर शेतकर्या पेक्षा चांगल्या परिस्थतीत आहेत असे नाही उलट साखर कारखान्यांनी त्यांचे पैसे थकवून ठेवले आहेत. भात किंवा गहूची बाजारपेठ फार मोठी असते. उस फक्त साखर कारखानेच घेवू शकतात ह्यामुळे सरकारचे शेती धोरण "साखर माफिया" सोडून इतर कुणाला फायदेशीर आहे असे वाटत नाही.
ह्यांत मी सरकारचा सुद्धा दोष करू शकत नाही कारण उसाची शेती कमी करण्यासाठी सरकारने काही हालचाल केलीच तर "शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या" अशी आवई विरोधक आणि मिडिया वाले चालवतील.
पाणी वाचवायचे असेल तर. भात आणि साखर आपल्या आहारातून कमी करा. एक किलो साखर वाचवली सुमारे १००० लिटर पाणी वाचवले जावू शकते.
[१] http://www.fao.org/nr/water/aquastat/countries_regions/ind/index.stm
[२] http://indiaenvironmentportal.org.in/files/Water%20consumption%20patterns.pdf
[३] https://en.wikipedia.org/wiki/False_dilemma
[४] http://www.lenntech.com/water-food-agriculture.htm
[5] http://www.indiaenvironmentportal.org.in/files/file/agricultural%20water%20use%20India.pdf
[6] http://www.muthstruths.com/indias-sugar-export-policy-is-almost-criminal/
💬 प्रतिसाद
(61)
अ
अमृता_जोशी
Mon, 03/21/2016 - 21:39
नवीन
या विधानामागे लावलेले गणित फारच भयानक आहे! सगळ्याच पदार्थाची अशी यादी काढून देता का? बाजारला गेल्यावर उपयोगी पडेल..
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 03/21/2016 - 23:40
नवीन
ह्यांत काहीही चुकीचे गणित नाही. सिगारेट वर १% जास्त कर लावला असता सिगारेटची विक्री काही अंशांनी कमी होते. १% कर म्हणजे १-२ रुपयेच जरी जास्त असले तरी त्याचे स्केल इफेक्ट फार मोठे असू शकतात. साखरेची मागणी जर देशांत ५% सुद्धा कमी झाली तरी काही साखर कारखाने बंद पडतील, काही शेतकरी उसाला कंटाळून आणखीन काही तरी पेरतील आणि त्यामुळे काही पाणी वाचेल. एक किलो साखर कमी विकत घेतली तर कुठे तरी जादूने १००० लिटर पाणी उत्पन होईल असा अर्थ घेवून नये.
Water Footprint असे तुम्ही शोधले तर तुम्हाला कुठल्या खाद्य पदार्थांत किती पाणी खर्च होते ते दिसेल.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Mon, 03/21/2016 - 22:08
नवीन
उसाबद्दल यापूर्वी वाचलं होतच . मराठवाड्यात दुष्काळाची तिव्रता जाणवण्यामागे ऊस हे एक मुख्य कारण आहे.
बाकी बरेचसे मुद्दे पण पटण्याजोगेच आहेत.
- Log in or register to post comments
स
साहना
Mon, 03/21/2016 - 23:41
नवीन
हा आकडा मुंबई मिरर मध्ये पहिल्यांदा वाचला होता जास्त क्रेडीबल आकडा कुठे भेटला तर जरूर द्यावा.
- Log in or register to post comments
ध
धनंजय माने
Mon, 03/21/2016 - 23:49
नवीन
आकडा भेटत नाही ओ. मिळतो.
- Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच
Tue, 03/22/2016 - 05:35
नवीन
आणी आकडा लागतो सुद्धा . आकडा टाकता पण येतो.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 05:54
नवीन
खूप प्रयत्केला केला पण आजतागायत माझा आकडा लागला नाय
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Mon, 03/21/2016 - 23:45
नवीन
आशयाशी सहमत आहे.
आता किमान चहात तरी साखर कमी करायला हवी!
अवांतरः हल्ली मुटेकाका आणी बाप्पू कुठे आहेत?
- Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी
Mon, 03/21/2016 - 23:49
नवीन
आकडेवारी वापरून तथ्य काय आहे हे पाहाण्याचा दृष्टिकोन आवडला. अनेक वेळा प्रत्यक्ष उपयुक्त कृती करण्याऐवजी सिंबॉलिक गोष्टी करायला लोकांना आवडतं. त्यात पेनी वाईज अॅंड पाउंड फूलिश असंही होताना दिसतं. नक्की कुठच्या कृतीचा किती परिणाम होईल याचीही सर्वांना कल्पना नसते. ते सांगण्याचा प्रयत्नही आवडला.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 00:07
नवीन
Penni Wise and Pound foolish
अगदी हेच ह्या लेखाचे शीर्षक ठेवण्याचा विचार होता पण नंतर बदलला :)
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Tue, 03/22/2016 - 03:38
नवीन
विचार करण्यालायक गोष्ट आहे साहना जी!! आपले आभार ! U compelled me to put on my thinking hat! बघु काय नवे वाचायला मिळते ते
- Log in or register to post comments
भ
भाऊंचे भाऊ
Tue, 03/22/2016 - 04:23
नवीन
आपले लिखाण म्हटले की हल्के फुल्के असते असाच समज होता परंतु विदा देऊन या धाग्यात आपण खोडून काढला आपला लेख वास्सपवर आपले नाव अन धाग्याच्या लिंक सोबत प्रकाशित करत आहे परवानगी असावी धन्यवाद
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 05:56
नवीन
हलके फुलके ? मी इथवर कष्ट घेवून काही लेख लिहिले पण प्रतिसाद अल्प मिळाला. एक बाष्कळ paragraph होता त्यावर्र अजून धुमश्चक्री चालू आहे
- Log in or register to post comments
अ
असंका
Tue, 03/22/2016 - 13:12
नवीन
=))
- Log in or register to post comments
क
क्रेझी
Tue, 03/22/2016 - 04:38
नवीन
साहनाजी लेख आवडला पण मला वाटतं पाण्याचा काटकसरीने किंवा कोणत्याही निसर्गनिर्मित साधनसामुग्रीचा वापर काटकसरीने केला तर त्या गोष्टीचा आपल्यालाच आणि आपल्या पुढच्या पिढ्यांना उपयोग होईल.
पुणे, मुंबई सारख्या शहरांमधे पाण्याची आवक जास्त आहे त्यामुळे इथे थोडी जरी पाणीटंचाई उद्भवली तरी पाण्याची व्यवस्था लवकर होऊ शकते.
इतर शहरांमधे तशी परिस्थिती नाही, कदाचित तुम्ही वाचलं असेल की ह्या वर्षी उन्हाळ्याच्या सुरूवातीपासूनच मराठवाडा भागांमधे पाण्याचं किती दुर्भिक्ष निर्माण झालं आहे ते आणि अजून दोन पूर्ण महिने जे अति रखरखित असणार आहेत असे सरायचे आहेत.
जर प्रत्येकाने स्वतःला पाणी वापरायची शिस्त लावली तर कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणात टंचाईला तोंड देण्याची वेळ येणार नाही.
तुम्ही म्हटल्याप्रमाणे जर दाढी करतांना पाण्याचा नळ चालू राहिला तर १० मिनीटांमधे जे पाणी वाया जातं ते पुर्नवापर करण्यालायक राहत नाही. अजून तरी मोठ्या शहरांमधे असलेल्या सोसायट्यांमधे पाण्यावर प्रक्रिया करून त्याला पुर्नवापरासाठी उपलब्ध करून देणारी यंत्रणा मी बघितली नाही. तेंव्हा जर प्रत्येक घरातून असं वापरण्यायोग्य पाणी वाया घालवलं गेलं तर शेवटी तो अपव्ययच आहे!
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 03/22/2016 - 04:59
नवीन
लेख छानच आहे, पण खालील कारणासाठी आवडला नाही -
घरगुती पाण्याचा आपण जो अपव्यय करतो त्याचे थोडेसे समर्थन केल्यासारखे वाटले. कदाचित विविध माध्यमांमधून होणार्या त्याच्या मार्याला तुम्ही कंटाळला असाल.. समर्थन करणे ही तुमची भूमिका नसेलच असे गृहीत धरून आहे.. पण लेखातला सूर थोडा वेगळा लागलाय.
बाकी मांडलेले मुद्दे एकदम बिनतोड आहेत. हाच विचार मी आज सकाळी करत होतो.. होळीला जर मी शेजार्याच्या अंगावर १ बादली पाणी ओतले तर असे नेमके किती पाणी मी खर्च करणार आहे? सहानुभूती म्हणून होळी न खेळने वेगळे आणि पाणी वाचवायचे म्हणून होळी न खेळणे वेगळे.
कधी कधी याला पण (मिथ्या)पुरोगामी अजेंड्याचा वास येतो..
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 05:52
नवीन
कुठलेही संसाधन काटकसरीने वापरावे हे तत्वतः अगदी बरोबर आणि आणि मी वर तसे लिहिले सुद्धा आहे. पण त्याचा आमच्या सण उत्सवाशी संबंध जोडू नये.
प्रामाणिक पणे सांगायचे झाले तर पाणी हे कारण पुढे करून काही लोक हिंदू धर्मावर हल्ला चढवत आहेत. उद्या CNN आणि BBC वाले पाणी कमी असताना हिंदू लोक कसे पाणी असहिष्णू पणे नष्ट करत आहेत हे छापतील. मुद्दाम BBC हिंदी ची Facebook पेज बघा.
सर्व शाळांतून होळी म्हणजे पाण्याची नासाडी असे लहान मुलांना शिकवले जाईल. शिव लिंगावर दुध न वाहता त्याचा काय सदुपयोग करता येतो ह्यावर निबंध लिहायला सांगतील. ह्याचे परिणाम दूरगामी आहेत आणि जे लोक हा प्रचार चालवात त्यांचे उद्धेश सुद्धा फार दूरगामी आहेत.
उदा
भारतीय मंदिरावर प्राणी प्रेमाच्या नावाखाली होणारा हल्ला
http://www.huffingtonpost.ca/sangita-iyer/elephant-mistreatment-india_b_6387994.html
योगा म्हणजे लैगिक आणि सामाजिक शोषण आहे ह्यावरची हि conference (मी इथे जाणार आहे)
https://call-for-papers.sas.upenn.edu/node/65385
हिंदू स्मशाने मृतांना जाळून प्रदूषण करतात
http://www.cnn.com/2011/09/12/world/asia/india-funeral-pyres-emissions/
हिंदू लोक गुरांचे शोषण कसे करतात
http://freefromharm.org/animal-cruelty-investigation/no-sacred-cows-the-dark-side-of-the-dairy-industry-in-india/
PETA हि संस्था आणि त्यांचा jalikattu ह्या तमिळ खेळाला असलेला विरोध हे सर्वश्रुत आहे.
यज्ञ याग म्हणजे प्रदूषण हे सुद्धा काही दिवसांनी ऐकू येयील.
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Wed, 03/23/2016 - 10:07
नवीन
लेख ब-याच अंशी पटला. पण शिवलिंगावर दूध ओतणे मला तरी दुधाची नासाडीच वाटते.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Tue, 03/22/2016 - 06:03
नवीन
तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ पासुन हिंदु खतरे में है कड़े वळतो आहे असे दिसते! मला वैयक्तिक दृष्ट्या तसे वाटत नाही धन्यवाद
- Log in or register to post comments
त
तुषार काळभोर
Tue, 03/22/2016 - 06:51
नवीन
लेखाच्या आशयाशी बराचसा सहमत, पण रोखाशी/उद्देशाशी/इंटेन्शनशी नाही.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 06:55
नवीन
Conspiracy Theories मला सुद्धा आवडत नाहीत. पण काही व्यक्ती आणि संघटना ज्यांच्यात विस्तव जात नाही त्या सुद्धा एखादा common objective दिसला कि तत्काळ हात मिळवणी करतात. RTE असो किंवा "होळी" काही जणांनी हिंदू विरुद्ध काही तरी करूया म्हणून एखाद्या खोलीत बैठक घेवून सर्व घडवून आणले असा माझा मुद्दा नाही. एक मुद्धा कुणी तरी उपस्थितीत केला आणि त्यात फायदा दिसणार्या लोकांनी आपले हात धुवून घेतले. मिडिया आणि विदेशी मिडिया जी भारताकडे ख्रिस्ती दृष्टीकोनातून पाहते ती ह्याचा विपर्यास करणार हे स्पष्ट आहे. आम्ही त्याचा प्रतिवाद करण्याची तयारी ठेवली पाहिजे हा माझा मुद्दा आहे आणि प्रतिवाद सुद्धा सत्यावर आधारितच असावा.
अगदी पाणी संवर्धन हाच उद्धेश ठेवून प्रतिवाद करण्यास काय हरकत आहे ? लेखाचा मूळ गाभा तोच तर आहे.
अनेक वर्षां मागे नरेंद्र मोदींना अमेरिकेत बोलवायचे ठरले. मी अनेक डाव्या विचारसरणीच्या विद्यापीठांत (अमेरिकन) जात असल्याने तेथे ह्या विषयाची चर्चा सुरूच होती. आश्चर्य जनक रित्या डावे लिबरल, एवनजेलिस्ट आणि मुस्लिम संघटना एकत्र येवून त्यांनी एकजुटीने ह्या भेटीचा विरोध करायचा प्रयत्न सुरु केला. लोक भेट वगैरे घेत असताना काही भारतीय लोकांना मी ह्याची कल्पना दिली आणि विसा कदाचित नाकारला जायील म्हणून अधिक काळजीपूर्वक पुढे चाला असे इमेल टाकायला सुरुवात केली. (माझी कुठल्याही अतिमहनीय वगैरे व्यक्ती कडे ओळख नाही त्यामुळे खर्या आयोजकाकडे तो पोचला असल्याची शक्यता नाही). काही लोकांनी माझी अक्षरशः टर उडवली. शेवटी वीसा नाकारला गेला. नरेंद्र मोदी ह्यांचा उल्लेख प्रत्येक वेळी "कट्टर हिंदू" असा संपूर्ण अमेरिकन मिडिया मध्ये केला जातो.
- Log in or register to post comments
न
नाना स्कॉच
Tue, 03/22/2016 - 07:02
नवीन
एकीकडे सऊदी अरेबिया का अबुधाबी मधे हिंदु मंदिरा करता जागा मिळवली म्हणून मोदींचे कौतुक आपणच करतो (आता ते त्यांना आवडते की नाही ह्यावर मी काही बोलणार नाही ) पण मग "कट्टर हिंदु" इमेजचे आपल्याला वाईटही वाटते. एकंदरित कंफ्यूजन है भाई
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 03/22/2016 - 22:43
नवीन
अबुधाबी मध्ये मंदिर होणे हे तेथील बहुसंख्य अनिवासी बहुतांशी हिंदू समाजाची मागणी होती तसेच तेथील कामगारांच्या अनेक समस्या होत्या त्या दोन्ही त्यांनी तेथील राजाच्या कानावर घातले भारतात गुंतवणूक करण्यासाठी त्यांना बर्याच योजना सांगितल्या त्याला प्रतिसाद देऊन तेथील राजाने मोदीच्या ह्या मागण्या मान्य केल्या
शरियत कायद्याने राजवट करणे यु ए इ व कातर देशांनी मोदींना स्वीकारले त्यांचा उल्लेख आता ते कट्टर असा करत नाहीत
अमेरिकेत खुद मोदींच्या वर विसा न देणे हे कसे चुकीचे होते हे
- Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे
Tue, 03/22/2016 - 09:51
नवीन
साधी गोष्ट आहे. पुण्याचेच उदाहरण घेतले तर लाखो लोक होळी खेळून पाणी नासवतात. मागच्या वर्षी पावसाने पार सप्टेंबरपर्यंत ओढ दिली होती. अशावेळी धरणे कोरडी पडली तर पाणी आणायचे कोठून ? मग जर आपणच बचत केली तर आपलीच पुढे होणारी गैरसोय दूर होणार नाही का? काय हरकत आहे आपण आपल्याचसाठी पाण्याची बचत केली तर? मला नाही वाटत त्यात हिंदूविरोधी काही आहे म्हणून.
- Log in or register to post comments
र
राहुल मराठे
Tue, 03/22/2016 - 09:55
नवीन
+१ सहमत
- Log in or register to post comments
न
निनाद मुक्काम …
Tue, 03/22/2016 - 22:49
नवीन
मुंबई पुण्याच्या नागरिकांनी एक दिवस पाणी वाचवले तर त्यांच्या तोंडचे पाणी मराठवाड्यात वळविण्याची सुविधा आपल्याकडे आहे का
अनधिकृत पणे बांगलादेशी व इतर परप्रांतीय मुंबई सारख्या मोठ्या शहरात झोपड्या उभारतात व अनधिकृतपणे
पाणी चोरण्यासाठी पाण्याची पाईप लाईन फोडतात लाखो लिटर्स पाणी वाया जाते. ह्यावर कोण भाष्य करणार
बुरा ना मानो होली है
- Log in or register to post comments
अ
अप्पा जोगळेकर
Tue, 03/22/2016 - 10:18
नवीन
होळीमध्ये नक्की किती पाण्याची नासाडी होते ह्याचे आकडे कधी कुणे पुढे ठेवल्याचे आठवत नाही.
आम्हा पामरांना धुळवडी मुळे पाण्याचा नाश होतो असे वाटते. तुम्हाला जर तसे होत नाही असे वाटते तर तुम्ही आकडेवारी देऊन 'होळीत पाण्याची खूपच कमी नासाडी होते हे सिद्ध का करत नाही' ?
निव्वळ सोयीस्कर आकडे नाचवण्यामागे इतर कोणतातरी 'आसारामी, सनातनी' अजेंडा दिसतो.
शेतकरी संकटात आहे म्हणून होळी खेळू नका असे कोणी सांगितले ? आम्ही तर 'प्यायला पाणी नाही म्हणून धुळवड टाळा' असे ऐकले.
- Log in or register to post comments
स
साहना
Tue, 03/22/2016 - 11:37
नवीन
पुरावे वर दिले आहेत. न वाचता कमेंट का टाकता ?
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 03/22/2016 - 21:23
नवीन
अगदी असेच म्हणतो.
- Log in or register to post comments
S
shvinayakruti
Tue, 03/22/2016 - 11:34
नवीन
+11111111111
अप्पा जोगळेकर
- Log in or register to post comments
S
shvinayakruti
Tue, 03/22/2016 - 11:35
नवीन
तुमचा रोख हा पाणी बचत एक मिथ पासुन हिंदु खतरे में है कड़े वळतो आहे असे दिसते!
+११११११११११
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Tue, 03/22/2016 - 11:41
नवीन
आकडे बघत बसले नाही. कारण लातुर - अंबेजोगाई - औरंगाबाद मध्ये भरपुर नातेवाईक आहेत. तिकडच्या बातम्या कळतात.
महिन्याला एकदा पाणी येते. कसे भागवतात कोण जाणे.
अशावेळेस फक्त मज्जा करायला पाणी नासवु शकत नाही.
आपल्याच महाराष्ट्रात पिकं, गाई-गुरं, माणसं पाण्याअभावी अतोनात हाल अपेष्टा सहन करत असताना आपण पाण्यात नाचणे पटत नाही. हिंदु सण वगैरे फुटकळ मुद्दे तर लक्षातही घ्यायची गरज वाटत नाही.
दुष्काळ धर्म बघुन पडत नाही.
- Log in or register to post comments
प
प्रसाद१९७१
Tue, 03/22/2016 - 12:03
नवीन
लेखकाला म्हणायचे आहे की रुट कॉज वेगळे आहे आणि आपण अगदीच मलमपट्टी करतो आहोत छोटी.
मुळ कारणच जर थोडे फार कमी केले तर मराठवाड्यात पण रंगपंचमी खेळता येइल
- Log in or register to post comments
श
श्रीरंगपंत
गुरुवार, 03/24/2016 - 12:48
नवीन
+१
- Log in or register to post comments
च
चाणक्य
Wed, 03/23/2016 - 10:10
नवीन
+१
- Log in or register to post comments
म
मृत्युन्जय
Tue, 03/22/2016 - 11:41
नवीन
उत्तम लेख. माझा दृष्टीकोन असाच होता रंगपंचमी बद्दल. पण इतकी आकडेवारी आणि अभ्यास नव्हता / नाही. माझा पॉईंट लोकांम्ना पटवुन देण्यासाठी मुद्दे दिल्याबद्दल धन्यवाद :)
- Log in or register to post comments
ब
बाळ सप्रे
Tue, 03/22/2016 - 12:17
नवीन
अहो मुंबई पुण्याच्या पाणी स्रोतांतील पाण्याची पातळीही खूप खाली गेलीय.. खडकवासला , पानशेतला जाउन बघा पाणी कमी माती जास्त दिसतेय. शहरातील बर्याच भागात पाणी रोज येत नाही नळाला.. आलं तरी काही तासच. बहुतांश स्विमिंग पूल्स बंद झालेत.
हे पाहून तुमचे आकडे मिसलिडींग आहेत हे नक्की.
आणि हिंदू धर्माचा उल्लेख पाहून तर तुम्हाला त्यातच जास्त रस आहे याची खात्रीही पटते.
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
Tue, 03/22/2016 - 19:37
नवीन
तुमचे मुद्दे पूर्ण पटले. पण हिंदू कसे वाईट आहेत हे सुद्धा दाखवण्याचा प्रकार यामुळेच चालू होईल याबद्दल शंका नाही. बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची कोल्हेकुई इथे चालू झालीच आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Tue, 03/22/2016 - 19:56
नवीन
धर्म वगैरे सगळं राहू दे. होळीत वापरलं जाणारं पाणी ही नासाडी आहे हे मुळात आपल्याला मान्य आहे की नाही? बाकी आकडेवारी बिनतोड आहे. Carbon Footprint सारखा आपला Water Footprint चा मुद्दाही पटला. पण तुमचाच मुद्दा घेऊन म्हणतो - होळीचा Water Footprint जास्त आहेच. त्यामुळे ते वाचवलं तर बिघडलं कुठे? आणि पाणीटंचाई प्रत्यक्षापेक्षा जास्त सांगितली तरी चालेल असं मला वाटतं. निदान लोक पाणी कमी नासतील.
- Log in or register to post comments
व
विकास
Tue, 03/22/2016 - 21:21
नवीन
सहमत...
पाण्याचे व्यवस्थापन सर्वच क्षेत्रात होणे महत्वाचे आहे. त्यात शेती देखील आली. पण, जेंव्हा पाणीच पाणी चोहीकडे असेल तेंव्हा जर कोणी रंगपंचमीस / धुळवडीस विरोध केला तर त्याला विरोध करेन. पण आत्ता, सर्वत्र पाण्याचे दुर्भिक्ष झाले असले तर असे करू नये असे वाटते.
- Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस
Wed, 03/23/2016 - 04:43
नवीन
त्यातून कोरडे रंग वगैरे भंपक पणा पुढे आहेच ....कोरडे रंग धुवायला पाणी लागते त्याचे काय ??
असो ....
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/22/2016 - 20:36
नवीन
बाकी हिंदू विरोधकांची नेहमीची कोल्हेकुई इथे चालू झालीच आहे
१. इथे हिंदू विरोधक कोण आहेत हे काळापहाड ह्यांना माहित आहे काय?
२. कोल्हेकुई सुरु झाली ह्याचा अर्थ काय?
संपादकमंडळ, इकडे लक्ष देईल काय? आणि इथल्या सदस्यांशी सभ्यपणे वागावे असा नेहमी एकतर्फी दबाव आणणारे सारे सन्माननीय सदस्य आता विरोध करतील काय?
- Log in or register to post comments
क
काळा पहाड
गुरुवार, 03/24/2016 - 07:35
नवीन
इथे हिंदू विरोधक कोण आहेत हे तर्राट जोकर ह्यांना माहित नाही असं म्हणायचं आहे काय? तसं असेल तर त्यांनी आपला अभ्यास वाढवावा.
आता मराठी शब्द, वाक्प्रचार, म्हणी यांचे अर्थ सुद्धा समजवावेत असं वाटत असेल तर बोलणंच खुंटलं. तुम्ही एक मराठी इयत्ता दुसरीचं पुस्तक विकत घेवून अभ्यास करावा असा माझा सल्ला आहे.
१. संपादक मंडळ आणि सन्माननीय सदस्य अशी विभागणी करण्याचं कारण कळलं नाही. संपादक मंडळाचे सदस्य सन्माननीय नाहीत असं तुम्हाला म्हणायचं आहे काय? संपादक मंडळाने कृपया लक्ष द्यावं.
२. सन्माननीय सदस्य (जे कुणी असतील ते) एकतर्फी दबाव आणतात असा जो तुमचा आरोप आहे त्याबद्दल तुम्ही पुराव्याने काही शाबीत करू शकता का ? नसेल तर तुम्ही काही सन्माननीय सदस्यांवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताय. तसंच दादा दरेकर (किंवा त्यांचे दशावतार) सोडता इथे सगळे सन्न्माननीय च असल्यामुळे तुमचा आरोप बेचूट स्वरूपाचा आहे याची नोंद घ्यावी. संपादक मंडळाने कृपया लक्ष द्यावं.
- Log in or register to post comments
न
नाखु
गुरुवार, 03/24/2016 - 09:12
नवीन
काढणे यालाच म्ह्णतात काय?
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
गुरुवार, 03/24/2016 - 10:00
नवीन
शब्दांचे फुगे उडवून मुद्दा दाबणे म्हणतात नाखुशेठ.
जाकी रही भावना जैसी | प्रभु मूरत देखी तिन तैसी ||
शेवटी हेच खरं होत आहे मिसळपाव वर.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Tue, 03/22/2016 - 23:09
नवीन
पाणी वाचवा धाग्यावर मोदींची चर्चा आणि भक्तांची भलामण??? आता विनातक्रार चालेल ;-)
कुठे गेले मला विषयांतर करतो, अवांतर करतो, धागा मूळ विषयापासून भरकटवतो, नको तिथे मोदीचा विषय आणतो म्हणुन बदनाम करणारे सोज्वळ, धुतल्या तांदळाचे भक्तगण?
- Log in or register to post comments
स
साधा मुलगा
Wed, 03/23/2016 - 06:21
नवीन
प्रथमतः आपण आकडे देऊन आपला मुद्दा मांडलात याबद्दल आपले अभिनंदन.
पण अशी परिस्थिती आहे कि आमच्याकडे महानगरपालिकेचे पाणी जे सकाळी आणि संध्याकळी तीन-चार तास चांगल्या दाबाने यायचे तेच आता पाणीकपात म्हणून आठवड्यातले पाचच दिवस येते दोन दिवस येत नाही. बाकी इतर गाव शहरात किती टंचाई भीषण आहे हे मी सांगायची गरज नाही.
म्हणजे पाण्याची टंचाई आहे हे तुम्हीसुध्दा मान्य कराल.
माझा अंदाज/ठोकताळा: ( अंदाजपंचे लिहित आहे , चुका लक्षात आणून द्याव्यात)
पूर्वी रंगपंचमी खेळून आल्यावर किमान दोन पाणी बादल्यांनी आंघोळ करावी लागायची. शिवाय रंगपंचमी खेळत असताना किमान दहा बादल्या पाणी तरी सहज आम्ही एकमेकांवर उडवायचो. म्हणजे जिथे आम्ही रोज साधारण चार ते पाच बदल्या पाणी वापरत असू तर तोच वापर पंचमीच्या दिवसात पंधराच्या वर जाऊ शकतो. हे एका घराबाबत झाले, यालाच शहरातील रंगपंचमी खेळणाऱ्या लोकांच्या संख्येने गुणले तर आकडा फार मोठा होऊ शकतो. आणि हल्ली तर काय रेन dance वगैरे प्रकार चालले आहेत तिकडे किती पाणी वापरतात कोणाला माहिती.
माझे म्हणणे एवढेच आहे कि जर पाणी टंचाई आहे तर पाणी जपून वापरणे प्राप्त आहे. जर होळीच्या दिवशी आपण एवढे पाणी फुकट (साधारण दुप्पट ते चौपट) घालवत असू, तर त्यापेक्षा होळी न खेळता
त्या पाण्याची बचत करून, दोन दिवसांची पाणी टंचाई किमान एक दिवसावर तरी आणता येईल.(हे हि अंदाजपंचे बोलत आहे.)
शेतकऱ्यांच्या पाण्याची गोष्ट तर दूरच आहे किमान माझे पिण्याचे/घराच्या वापराचे पाणी तरी मला नियमित मिळू द्या. उगाच रीण काढून सण साजरा करावा हि वृत्ती मला तरी आवडत नाही.
बाकी आकडेवारी:
मागे मी एकदा राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद अंतर्गत शालेय मुलांनी आपण रोजच्या वापरातील पाणी बचत केल्यास किती बचत होते यावर एक प्रकल्प केला होता , ते पुस्तक माझ्याकडे आहे , घरी गेल्यावर वाचून त्याची आकडेवारी टाकतो, आत्ता वायफळ बडबड करण्यात अर्थ नाही.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 03/23/2016 - 07:27
नवीन
आकडेवारीच्या प्रतीक्षेत
- Log in or register to post comments
ब
ब़जरबट्टू
Wed, 03/23/2016 - 07:34
नवीन
ते अजून घरी पोहचले नाहीत... :)
- Log in or register to post comments
र
राही
Wed, 03/23/2016 - 08:15
नवीन
अहो, इथे कृत्रिम हौद उभे करतात रंगीत पाण्याने भरलेले. आहात कुठे? पिंपे भरभरून पाणी फेकले जाते. आणि केवळ दुष्काळातच नव्हे तर सामान्य परिस्थितीतही एक बादली पाणीच काय कोणतेही नैसर्गिक संसाधन शक्यतो कणभरही वाया जाऊ नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये असे माझे मत आहे. यात दुधातुपाचे अभिषेकही आले. सध्या आमच्याकडे शिवजयंतीनिमित्त वीजकंपनीच्या रस्त्यावरील स्टेशन्समधून वीज वापरून मंडप सजले आहेत. एरवीही सोसायट्यांमधील दिवे सकाळी सुमारे एक तास अधिक वेळ जळत असतात. परिसरात एक अनधिकृत देऊळ आहे. त्याला मोठी पत्र्याची शेड घालून सुमारे साडेतीनशे चौ.फू.ची आवार बनवले आहे. मध्ये १०x१० ची घुमटी आहे. घुमटीमध्ये अहोरात्र दिवा असणे ठीक. पण आवारात सुमारे दहा-बारा ट्यूब रात्रभर सकाळी पावणेआठपर्यंत जळत असतात. सध्या लवकर उजाडते. तेव्हा हा सगळा विजेचा अपव्यय आहे असे मला वाटते. मला जाताजाता समोर हे दिसते. ते टाळण्याजोगे आहे असे वाटते.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »