Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

व
वैभव जाधव
Wed, 04/13/2016 - 18:47
🗣 180 प्रतिसाद
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का? - विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.
वर्गीकरण
प्रश्न

प्रतिक्रिया द्या
31781 वाचन

💬 प्रतिसाद (180)
द
दा विन्ची Wed, 04/13/2016 - 18:52 नवीन
गरम तव्यावर पोळी भाजुन घ्या साहेब.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Wed, 04/13/2016 - 18:57 नवीन
वेगळा धागा मुद्दाम काढला आहे. खरंच प्रश्न आहेत. बाकी पोळी, ऑम्लेट वगैरे पाकृ विभागात भाजुया का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दा विन्ची
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 18:53 नवीन
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. ज्योतिषातले ग्रह म्हणजे रेफरंस पॉइंट आहेत. कॅलेंडरमधे जुलै महिना आहे म्हणून पाऊस पडत नाही. किंवा पाऊस पडतो म्हणून कॅलेंडरमधे जुलै महिना नसतो.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Wed, 04/13/2016 - 19:09 नवीन
ग्रहाचा माणसावर परिणाम होत नाही हे च कशावरुन म्हणताय ? चंद्रामुळे पृथ्वीवर जर भरती ओहोटी होत असेल तर माणसाच्या शरीरावर- म्हणून मनावर- म्हणून वागण्यावर परिणाम होत नाही असं शक्य असेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 19:13 नवीन
तसे असेल तर पृथ्वीवर सजीव फक्त मनुष्य नाही. अमावस्या पौर्णिमेला विक्षिप्त वागतांना इतर सजीवांना बघितलेले आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
व
वैभव जाधव Wed, 04/13/2016 - 19:31 नवीन
प्राणी मूलभूत गोष्टींव्यतिरिक्त अधिकचा विचार करु शकत नाहीत ना? सध्या माणसाबाबत विचार करुया.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 04/13/2016 - 19:55 नवीन
आपण मूळ धाग्यात निर्जीवांचे (पाणी) वर्तनही निरिक्षणाखाली घेतले आहे. तेव्हा सजीवांचेही घेणे क्रमप्राप्त ठरते. आपला प्रश्न आहे निर्जीव ग्रहांच्या परिवलनामुळे मनुष्यावर (पर्यायाने सजीवांवर) परिणाम होतो का? तर आपलाच प्रश्न पुढे थोडा वाढवत इतर सजीवांनाही त्यात घेतले. अमावस्या पौर्णिमेला जर मनुष्यवर्तन (वर्तन बरं, मन नाही) जर प्रभावित होऊ शकते तर इतर सजीवांचेही होण्यास हरकत नसावी. आकारमानाने मोठ्या असलेल्या व्हेल, हत्ती, इत्यादी प्राणी अमुक दिवशी काही विक्षिप्त वर्तन करतांना दिसल्याचे काही अभ्यास झालेले आहेत काय हा माझा प्रश्न. भूकंप किंवा सुर्य्ग्रहण इत्यादी नैसर्गिक घटनांच्या वेळेस मनुष्य सोडून इतर प्राणी विक्षिप्त वर्तन करत असल्याचे आढळून आले आहे. तेव्हा सजीवांचे वर्तन प्रभावित होण्यास कोणत्या घटना कारणीभूत ठरतात ह्यावर मलाही उत्तर हवेच आहे. चर्चेत पुढे मी एक एक मूलभूत मुद्दा स्पष्ट करत जाणार आहे. कृपया माझ्या प्रश्नांना फाटे फोडणे समजू नये ही विनंती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
व
वैभव जाधव Wed, 04/13/2016 - 20:16 नवीन
चर्चा संवादी झाली तर उपयोग होतो. आपल्यासारख्या अभ्यासू आयडी कडून मुद्द्यांची उकल झालेली आवडेल. येऊ द्या! वेगवेगळ्या दृष्टीकोणाचे असलेले प्रतिसाद आलेले आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
S
sagarpdy गुरुवार, 04/14/2016 - 07:38 नवीन
On busy nights throughout her career in emergency veterinary medicine, Dr. Raegan Wells would often hear staff members and colleagues wonder aloud, "It must be a full moon tonight." Wells, currently the chief medical officer at Emergency Animal Clinic in Phoenix, was skeptical of the notion that they were busier during a full moon, so she decided to take matters into her own hands to see if there was a correlation. In 2007, Wells co-authored a retrospective study at Colorado State University that examined whether the volume of animal emergency room visits increased on the days of the full moon. The data was compiled of nearly 12,000 case histories of small animals, specifically dogs and cats, from 1992-2002 at the university's veterinary medical center. Such emergency types include animal bites, epilepsy and trauma to name just a few. The results of the study were surprising, she said.
अधिक १, २ परंतु चंद्र व सुर्य हे उजेड व गुरुत्वीय बल या स्वरुपात जेवढा परिणाम पृथ्वीवरील सजीवांवर करतील तेवढा (अथवा जाणवण्याइतपत) अन्य ग्रह-ताऱ्यांकडून होणे केवळ अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
D
DEADPOOL गुरुवार, 04/14/2016 - 08:06 नवीन
१.अमावस्या पौर्णिमेस कुत्री फारच भुँकतात २. पौर्णिमेस कोल्हेकुई जरा जास्तच ऐकू येते स्वतः शेतात राहिलो असल्याने प्राथमिक अनुभव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
व
वेल्लाभट गुरुवार, 04/14/2016 - 11:11 नवीन
टीव्ही कार्टून्स मधेही हे साधारण असंच चित्र बघितलेलं आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
स
साहना Fri, 04/15/2016 - 22:03 नवीन
त्याचा संबंध गुरुत्वाकार्षानाशी नसून उजेडासाठी आहे. अनेक जनावरे, प्राणी आणि पक्षी सूर्य तार्यांच्या मदतीने दिशा समजू शकतात. अमावास्येच्या रात्री मासे पकडणे जास्त चांगले होते कारण विजेरीच्या उजेडांत मासे पृष्ठभागा कडे आकर्षित होतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: DEADPOOL
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/14/2016 - 08:57 नवीन
पण माणसांचा विक्षिप्तपणा आपण जेवढ्या गंभीरपणे घेतो तेवढा प्राण्यांचा घेत नाही. पण त्यांच्यातही असे प्रकार असणारच. त्यांचा मेंदू माणसाएवढा प्रगत नसल्यामुळे या भावना माणसासारख्या स्पष्ट नसतील पण त्या असणार एवढं नक्की. विनोदाचा मुद्दा सोडला तर - जेवढं भौतिकशास्त्र आठवतंय त्यानुसार दोन वस्तूंंमधलं गुरूत्वाकर्षण हे त्यांच्या वस्तुमानाच्या सम प्रमाणात आणि त्यांच्यामध्ये असलेल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. शनिचं वस्तुमान पृथ्वीच्या मानाने प्रचंड आहे पण पृथ्वीपासून असलेलं अंतरही अवाढव्य आहे. त्यामुळे त्याचा पृथ्वीवरील लोकांवर असा किती फरक पडत असेल? शिवाय फलज्योतिषातील एक अप्रतिम विसंगती ही आहे की ते शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात. गुरुचं वस्तुमान शनिपेक्षा जास्त आणि पृथ्वीपासून अंतरही कमी पण तरीही शनि जास्त पावरबाज. हे कसं काय? यावरूनच फलज्योतिष हे शास्त्र नाही, छद्मशास्त्र किंवा Psuedo-science आहे हे सिद्ध होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/14/2016 - 09:11 नवीन
@सागर, दुव्यांसाठी धन्यवाद. रोचक प्रकरण आहे. @ बोकाभाऊ, धन्यवाद. बाकी ग्रहांबद्दल खाली भागवत सरांनी जे स्पष्टीकरण दिलंय ते पुरेसं आहे. शनी पापग्रह, गुरु शुभग्रह हे अक्षरशः घ्यायचे नसते. ते रेफरंस पॉइंट आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/14/2016 - 14:07 नवीन
मी त्यांचा काही impact होतो हेच मानत नाही. ते उदाहरण फलज्योतिषातील तर्कदुष्टता समजावून देण्यासाठी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/14/2016 - 14:18 नवीन
ओके. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
उ
उगा काहितरीच Wed, 04/13/2016 - 20:23 नवीन
हम्ममम ! चर्चा वाचण्यास उत्सुक...
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 04/14/2016 - 06:00 नवीन
कोणत्याही ग्रहाचा माणसाच्या जीवनावर परिणाम होत नाही. जोकर साहेब आपले हे मूळ गृहीत चुकीचे आहे. खगोलशास्त्री श्री दा कृ सोमण यांच्या भाषणातील एक महत्त्वाचा मुद्दा मी येथे मांडतो आहे. मानवी जीवनावर सर्वात खोलवर कुठल्या ग्रहाचा परिणाम होत असेल तो "दुराग्रहाचा"
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/14/2016 - 06:05 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
प
पैसा गुरुवार, 04/14/2016 - 06:21 नवीन
=)) दशम ग्रह विसरलात! वेळोवेळी अख्ख्या भारतावर त्याचा परिणाम झालाय. =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ट
टवाळ कार्टा गुरुवार, 04/14/2016 - 07:38 नवीन
सिक्सर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
च
चौकटराजा गुरुवार, 04/14/2016 - 08:01 नवीन
भारतावर परिं॑णाम झाला सुनेचा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा
व
वैभव जाधव गुरुवार, 04/14/2016 - 09:04 नवीन
दुराग्रह- खासच डॉक्टर साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ए
एस गुरुवार, 04/14/2016 - 09:55 नवीन
हा पूर्वग्रह असू शकेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
न
नाखु Fri, 04/15/2016 - 05:45 नवीन
हट्टाग्रह आणि जालावर शिव्याग्रहची चलती चालू आहे असे एक निरिक्षण आहे. आप-परग्रह नसलेला नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
क
कंजूस गुरुवार, 04/14/2016 - 08:22 नवीन
शनिची कडी एकेक अडीच वर्षांची असतात तिनातले एककडेही भारी पडते.काहीजणा्ंना तिनांचा जॅकपॅाट लागतो -साडेसात वर्षं.काहींना म्हणे डबल लागलेला आहे चौदा वर्षं.सहामहिने कापून.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 08:31 नवीन
माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं.
ज्योतिष शास्त्रानुसार कोणताच ग्रह काही करत नाही तर फक्त तो परिस्थिती कशी असेल याचे दिशा दिग्दर्शन करतो. माणसाच्या जिवनातील घटना व त्यावेळची ग्रह स्थिती यांचा ताळमेळ शेकडो वर्षे निरिक्षणात घालवून हे ठोकताळे बनवले गेले आहेत. मी पुण्याहून मुंबईला जात असेन तर वाटेत मैलाचे दगड लागतात व ते मुंबई जवळ येत असल्याचे किंवा माझा रस्ता चुकत नसल्याचे किंवा माझी ध्येयाकडे प्रगती होत असल्याचे सुचीत करत असतात. पण ते दगड मला मुंबईला पोहोचवतात असे म्हणणे योग्य होईल का? ते मैलांचे दगड मला मुंबईला पोचवायला मदत करतात असे जास्तीत जास्त म्हणता येईल. किंवा वाटेत मध्येच ठाणे ३० किमी. असा दगड लागला तर तो दगड मी रस्ता चुकलो असल्याचे सूचीत करतो. पण त्या दगडाने मला चुकवले असे म्हणणे कितपत योग्य होईल? अगदी त्याचप्रमाणे माणसाच्या मनावर होणारे परिणाम लक्षात घेता ते पोर्णिमा व अमावास्येला जास्त होतात हे लक्षात आले. व त्यानुसार चंद्राच्या स्थितीनुसार ते ठोकताळे बांधले गेले. बस्स. इतकेच. त्यानुसार पोर्णिमा अमावस्येला काळजी घेणे इतपतच ठिक आहे. पण चंद्र हे सगळे करतो असे मानणे योग्य वाटत नाही. यातूनच मनाचा संबंध चंद्राशी असतो असे म्हणायला सुरवात झाली. खरे म्हणजे चंद्रावरून माणसाच्या मनाबद्दल काही ठोकताळे मांडता येतात इतपतच हे योग्य होय. पण हळू हळू चंद्र इथे आहे म्हणून असे झाले व तो तिथे गेला की मग प्रश्न सुटेल वगैरे वाक्ये ऐकायला यायला लागलात व चंद्रच सगळे करतो असा गैरसमज पसरायला सुरवात होते. चंद्र प्रत्यक्ष काही करत नाही तर तो फक्त त्याला नेमून दिलेल्या पध्द्तीने व गतीने कोणताही भेदभाव न करता कोणतीही अपेक्षा न बाळगता वाटचाल करत असतो. आणि म्हणूनच माणूस त्याच्या गतीचा उपयोग ठोकताळे बांधण्यासाठी करू शकला आहे
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर गुरुवार, 04/14/2016 - 09:07 नवीन
सहमत. हेच म्हणायचे होते. ज्योतिषामध्ये ज्याप्रकारे टर्मिनोलॉजी वापरली जाते, जशी भाषा, संवाद केल्या जातात त्याच्या मुळाशी जायचे सोडून अंनिसवाले ह्या संज्ञावरुन स्वर्ग गाठून खिल्ली उडवतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/14/2016 - 08:41 नवीन
गुरुत्वाकर्षण बलाचे सूत्र पाहिल्यास F=Gm1m2/(r^2) G= Gravitational constant m1= mass of object 1 (चंद्राचे वस्तूमान म्हणू या ठिकाणी) m2 = mass of object 2 (केस १ = समुद्राचे पाण्याचे वस्तूमान, केस २ = माणसाच्या शरीरातील पाण्याचे/इतर द्रवाचे वस्तूमान) r = distance between 2 objects (चंद्र आणि समुद्र वा माणूस यातील अंतर) m1 स्थिर असताना : m2 म्हणजे दुसर्‍या वस्तूचे वस्तूमान कमी असेल तर गुरुत्वीय बल कमी असणार. समुद्राच्या पाण्याचे जे वस्तूमान आहे त्या तुलनेने माणसाच्या शरीरातील द्रवाचे वस्तूमान अगदीच नगण्य आहे. फार काय एखाद्या तलावाच्या पाण्यातही चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाने भरती ओहोटी होत नाही यानेच काय ते समजून येईल. दुसरी गोष्टः r चा वर्ग छेदात आहे म्हणजे अंतर वाढल्यास गुरुत्वीय बल कमी होणार. शनीचे वस्तूमान चंद्रापेक्षा निश्चीतच जास्त असणार (मी शोधले नाहीत , पण जालावर हे आकडे मिळू शकतील). पण शनीचे पृथ्वीपासूनचे अंतर खूप जास्त असल्याने शनीपासून उत्पन्न होणारे गुरुत्वीय बल विशेष प्रभावी नसणार (निदान शनीमुळे सागराला भरती -ओहोटी आल्याचे मी कधी ऐकले नाही)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/20/2016 - 17:33 नवीन
मला असं कोणी गणितीय पद्धतीने काही समजून सांगायला लागलं की रोचक वाट्तं. आणि आवडतं. प्रतिसाद आवडला. कोणतेही दगड्गोट्यांचा माणसावर परिणाम होत नाही, एवढेच मला कळते. कितीतरी हजार किलोमिटर दूरवर असलेल्या शनिला, करोडो लोकांच्या भाऊगर्दीत मिपावर पडीक असलेले प्रा.डॉ. नेमके कसे सापडतील ? लेखकासाठी काही दुवे :१) घाटपांडे साहेबांचा लेख २) वरील प्रमाणे. दुवा. - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी कथालेखक
त
तर्राट जोकर Wed, 04/20/2016 - 17:53 नवीन
एखाद्या आफ्रिकेतल्या घनघोर जंगलातल्या अनभिज्ञ आदिवाश्याला तुमच्या हातातल्या घड्याळाचा तुमच्या जीवनावर कसा दुरगामी परिणाम होतो हे सांगुनही पटणार नाही. म्हणजे ते खोटे असे समजावे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मराठी कथालेखक गुरुवार, 04/21/2016 - 08:25 नवीन
धन्यवाद प्रा. डॉ साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
श
शरभ गुरुवार, 04/14/2016 - 09:35 नवीन
फारच परिणाम होतो चंद्रामुळे. पोर्णिमा आणि विशेषतः कोजागिरीची असेल तर, आम्हाला मसाला दुध प्यायची (चारोळ्या वगैरे घालुन) फारच इछा होते. काही कळत नाही का ते. आणि अमावस्या असेल तर दुर्बीणि लाउन तासन्तास ग्रह, तारे, आकाशगंगा इ. पाहायची विछा पुर्ण केलेय. --शरभ
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/14/2016 - 11:29 नवीन
"Autobiography of a Yogi" या शीर्षकाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे. त्याचा मराठी अनुवाद "योगीकथामृत" या नावाने प्रसिद्ध आहे. परमहंस श्री श्री योगानंद यांनी स्वतःच्या जीवनातील स्वानुभवांवर हे आत्मचरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात ज्योतिष व ग्रहतार्‍यांचा मानवी जीवनावर कसा परीणाम होतो या विषयावर एक मोठे प्रकरण आहे. जिज्ञासूंनी ते जरूर वाचावे. माझा ज्योतिषशास्त्राचा थोडासा अभ्यास आहे. जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो. अनेक माणसांच्या स्वभावाच्या अभ्यासातून हे माझे मत बनलेले आहे. जन्मराशीवरून जसा स्वभाव ओळखता येतो तसाच स्वभावावरून जन्मरास ओळ्खता येते. ग्रहतार्‍यांच्या भ्रमणातून चांगलावाईट काळ नक्की ओळखता येतो. यावर ज्यांना विश्वास ठेवायचा त्यांनी ठेवावा, ज्यांचा विश्वास नाही त्यांनी अंधश्रद्धा समजून दुर्लक्ष करावे. ज्योतिष हे शास्त्र आहे का नाही, ज्योतिष हे थोतांड आहे का या वादात मला पडायचे नाही.
  • Log in or register to post comments
य
यमगर्निकर Sat, 04/16/2016 - 10:11 नवीन
मी आपल्या मताशी पुर्णपणे सहमत आहे. मी सुधा थोडा अभ्यास केला आहे ज्योतिषविध्येचा आणी त्याचि अनुभुति सुद्धा घेतलि आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
उ
उपयोजक Sun, 04/17/2016 - 09:26 नवीन
आपण म्हणता ते प्रकरण बहुधा हेच असावे. Outwitting The Stars "Mukunda, why don't you get an astrological armlet?" "Should I, Master? I don't believe in astrology." "It is never a question of belief ; the only scientific attitude one can take on any subject is whether it is true . The law of gravitation worked as efficiently before Newton as after him. The cosmos would be fairly chaotic if its laws could not operate without the sanction of human belief. "Charlatans have brought the stellar science to its present state of disrepute. Astrology is too vast, both mathematically 16-1 and philosophically, to be rightly grasped except by men of profound understanding. If ignoramuses misread the heavens, and see there a scrawl instead of a script, that is to be expected in this imperfect world. One should not dismiss the wisdom with the 'wise.' "All parts of creation are linked together and interchange their influences. The balanced rhythm of the universe is rooted in reciprocity," my guru continued. "Man, in his human aspect, has to combat two sets of forces-first, the tumults within his being, caused by the admixture of earth, water, fire, air, and ethereal elements; second, the outer disintegrating powers of nature. So long as man struggles with his mortality, he is affected by the myriad mutations of heaven and earth. "Astrology is the study of man's response to planetary stimuli. The stars have no conscious benevolence or animosity; they merely send forth positive and negative radiations. Of themselves, these do not help or harm humanity, but offer a lawful channel for the outward operation of cause-effect equilibriums which each man has set into motion in the past. "A child is born on that day and at that hour when the celestial rays are in mathematical harmony with his individual karma. His horoscope is a challenging portrait, revealing his unalterable past and its probable future results. But the natal chart can be rightly interpreted only by men of intuitive wisdom: these are few. "The message boldly blazoned across the heavens at the moment of birth is not meant to emphasize fate-the result of past good and evil-but to arouse man's will to escape from his universal thralldom. What he has done, he can undo. None other than himself was the instigator of the causes of whatever effects are now prevalent in his life. He can overcome any limitation, because he created it by his own actions in the first place, and because he has spiritual resources which are not subject to planetary pressure. "Superstitious awe of astrology makes one an automaton, slavishly dependent on mechanical guidance. The wise man defeats his planets- which is to say, his past-by transferring his allegiance from the creation to the Creator. The more he realizes his unity with Spirit, the less he can be dominated by matter. The soul is ever-free; it is deathless because birthless. It cannot be regimented by stars. "Man is a soul, and has a body. When he properly places his sense of identity, he leaves behind all compulsive patterns. So long as he remains confused in his ordinary state of spiritual amnesia, he will know the subtle fetters of environmental law. "God is harmony; the devotee who attunes himself will never perform any action amiss. His activities will be correctly and naturally timed to accord with astrological law. After deep prayer and meditation he is in touch with his divine consciousness; there is no greater power than that inward protection." "Then, dear Master, why do you want me to wear an astrological bangle?" I ventured this question after a long silence, during which I had tried to assimilate Sri Yukteswar's noble exposition. "It is only when a traveler has reached his goal that he is justified in discarding his maps. During the journey, he takes advantage of any convenient short cut. The ancient rishis discovered many ways to curtail the period of man's exile in delusion. There are certain mechanical features in the law of karma which can be skillfully adjusted by the fingers of wisdom. "All human ills arise from some transgression of universal law. The scriptures point out that man must satisfy the laws of nature, while not discrediting the divine omnipotence. He should say: 'Lord, I trust in Thee, and know Thou canst help me, but I too will do my best to undo any wrong I have done.' By a number of means-by prayer, by will power, by yoga meditation, by consultation with saints, by use of astrological bangles-the adverse effects of past wrongs can be minimized or nullified. "Just as a house can be fitted with a copper rod to absorb the shock of lightning, so the bodily temple can be benefited by various protective measures. Ages ago our yogis discovered that pure metals emit an astral light which is powerfully counteractive to negative pulls of the planets. Subtle electrical and magnetic radiations are constantly circulating in the universe; when a man's body is being aided, he does not know it; when it is being disintegrated, he is still in ignorance. Can he do anything about it? "This problem received attention from our rishis; they found helpful not only a combination of metals, but also of plants and-most effective of all-faultless jewels of not less than two carats. The preventive uses of astrology have seldom been seriously studied outside of India. One littleknown fact is that the proper jewels, metals, or plant preparations are valueless unless the required weight is secured, and unless these remedial agents are worn next to the skin." "Sir, of course I shall take your advice and get a bangle. I am intrigued at the thought of outwitting a planet!" "For general purposes I counsel the use of an armlet made of gold, silver, and copper. But for a specific purpose I want you to get one of silver and lead." Sri Yukteswar added careful directions. "Guruji, what 'specific purpose' do you mean?" "The stars are about to take an unfriendly interest in you, Mukunda. Fear not; you shall be protected. In about a month your liver will cause you much trouble. The illness is scheduled to last for six months, but your use of an astrological armlet will shorten the period to twenty-four days." I sought out a jeweler the next day, and was soon wearing the bangle. My health was excellent; Master's prediction slipped from my mind. He left Serampore to visit Benares. Thirty days after our conversation, I felt a sudden pain in the region of my liver. The following weeks were a nightmare of excruciating pain. Reluctant to disturb my guru, I thought I would bravely endure my trial alone. But twenty-three days of torture weakened my resolution; I entrained for Benares. There Sri Yukteswar greeted me with unusual warmth, but gave me no opportunity to tell him my woes in private. Many devotees visited Master that day, just for a darshan. 16-2 Ill and neglected, I sat in a corner. It was not until after the evening meal that all guests had departed. My guru summoned me to the octagonal balcony of the house. "You must have come about your liver disorder." Sri Yukteswar's gaze was averted; he walked to and fro, occasionally intercepting the moonlight. "Let me see; you have been ailing for twentyfour days, haven't you?" "Yes, sir." "Please do the stomach exercise I have taught you." "If you knew the extent of my suffering, Master, you would not ask me to exercise." Nevertheless I made a feeble attempt to obey him. "You say you have pain; I say you have none. How can such contradictions exist?" My guru looked at me inquiringly. I was dazed and then overcome with joyful relief. No longer could I feel the continuous torment that had kept me nearly sleepless for weeks; at Sri Yukteswar's words the agony vanished as though it had never been. I started to kneel at his feet in gratitude, but he quickly prevented me. "Don't be childish. Get up and enjoy the beauty of the moon over the Ganges." But Master's eyes were twinkling happily as I stood in silence beside him. I understood by his attitude that he wanted me to feel that not he, but God, had been the Healer. I wear even now the heavy silver and lead bangle, a memento of that day-long-past, evercherished-when I found anew that I was living with a personage indeed superhuman. On later occasions, when I brought my friends to Sri Yukteswar for healing, he invariably recommended jewels or the bangle, extolling their use as an act of astrological wisdom. I had been prejudiced against astrology from my childhood, partly because I observed that many people are sequaciously attached to it, and partly because of a prediction made by our family astrologer: "You will marry three times, being twice a widower." I brooded over the matter, feeling like a goat awaiting sacrifice before the temple of triple matrimony. "You may as well be resigned to your fate," my brother Ananta had remarked. "Your written horoscope has correctly stated that you would fly from home toward the Himalayas during your early years, but would be forcibly returned. The forecast of your marriages is also bound to be true." A clear intuition came to me one night that the prophecy was wholly false. I set fire to the horoscope scroll, placing the ashes in a paper bag on which I wrote: "Seeds of past karma cannot germinate if they are roasted in the divine fires of wisdom." I put the bag in a conspicuous spot; Ananta immediately read my defiant comment. "You cannot destroy truth as easily as you have burnt this paper scroll." My brother laughed scornfully. It is a fact that on three occasions before I reached manhood, my family tried to arrange my betrothal. Each time I refused to fall in with the plans, 16-3 knowing that my love for God was more overwhelming than any astrological persuasion from the past. "The deeper the self-realization of a man, the more he influences the whole universe by his subtle spiritual vibrations, and the less he himself is affected by the phenomenal flux." These words of Master's often returned inspiringly to my mind. Occasionally I told astrologers to select my worst periods, according to planetary indications, and I would still accomplish whatever task I set myself. It is true that my success at such times has been accompanied by extraordinary difficulties. But my conviction has always been justified: faith in the divine protection, and the right use of man's God-given will, are forces formidable beyond any the "inverted bowl" can muster. The starry inscription at one's birth, I came to understand, is not that man is a puppet of his past. Its message is rather a prod to pride; the very heavens seek to arouse man's determination to be free from every limitation. God created each man as a soul, dowered with individuality, hence essential to the universal structure, whether in the temporary role of pillar or parasite. His freedom is final and immediate, if he so wills; it depends not on outer but inner victories.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 11:43 नवीन
शनि हा पापग्रह आणि लोकांची आयुष्यं होत्याची नव्हती करुन टाकणारा असं मानतात आणि गुरु हा शुभग्रह मानतात.
खरे म्हणजे असे काही नाहीय्ये. ग्रहांचे कारकत्व म्हणजे कोणत्या ग्रहावरून कोणते अंदाज बांधायचे हे लक्षात राहावे यासाठी ह्या संकल्पनांचा वापर केलाय. दोन ग्रहांचे कारकत्व विरोधी असेल तर त्यातला एक नायक म्हणून रंगवायचा व दुसरा खलनायक म्हणून रंगवायचा म्हणजे लक्षात ठेवावयाला किंवा अभ्यास करायला सोपे जाते. मित्रग्रहांच्या संकल्पना ही अशाच तयार झाल्या आहेत. राशींना पण कारकत्व असते. ग्रह व व रास यांच्यातील संबंध लक्षात राहावे यासाठी ग्रहाची उच्चरास, निचरास वगैरे संकल्पना तयार झाल्या आहेत. तसेच या संकल्पना नीट लक्षात राहाव्या म्हणून गोष्टी तयार केल्या आहेत. जेणे करून हे सर्व पिढ्यान पिढ्या वर्षानुवर्षे असे शेकडो वर्षे लक्षात राहू शकेल. गोष्टीरूपांनी हे सर्व मांडले तर हे संक्रमण खूपच सोपे सुलभ होते. पण ह्या गोष्टींच्या मागील हे तत्व लक्षात न घेता गोष्टीकडे पाहिले तर मात्र फारच विचित्र चमत्कारीक असे काहीतरी वाटायला लागते यात काही शंका नाही.
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 04/14/2016 - 11:47 नवीन
ज्योतिष शास्त्रावर अजून विवेचन वाचायला आवडेल शाम काका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 11:56 नवीन
जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीनुसारच माणसाचा स्वभाव बनतो
प्रत्यक्षात जे पेरावे तसे उगवते या सिध्दांतानुसार त्या माणसाचा जन्मजात स्वभाव कसा असेल ते ठरत असते. थोडक्यात त्याचे पूर्वकर्म हेच त्याच्या स्वभावाचे खरे कारण असते. ते नक्की काय असावे याचा अंदाज चंद्राची स्थिती पाहून घेता येतो. पण बोलीभाषेत आपण असे म्हणतो की, चंद्र अमूक ठिकाणी आहे म्हणून त्याचा स्वभाव असा आहे. या वाक्यातून चंद्रांमुळेच त्याचा स्वभाव असा बनला आहे अशी काहीतरी कल्पना होते. प्रत्यक्षात चंद्राने काहीही केलेले नसते तर तो फक्त दिशा दिग्दशन करत असतो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 04/14/2016 - 16:43 नवीन
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
क
कंजूस गुरुवार, 04/14/2016 - 15:50 नवीन
पाश्चात्य ज्योतिषांत साडेसाती कल्पना नाही म्हणून त्यांना याची फार उत्सुकता असते.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 17:06 नवीन
जे आपल्या हक्काचे नाही ते आपले आहे असे समजणे हा माणसातला दोष घालविण्याचे कार्य साडेसातीत होते असे म्हणतात. ही साडेसातीची साडेसात वर्षे शनीच्या भ्रमणावरून काढली जात असल्याने शनिदेव सर्व करतात असे मानले जाते. प्रत्यक्षात शनी हा ग्रह फक्त ही साडेसात वर्षे निर्देशीत करण्याव्यतिरिक्त काहीही करत नाही. वेगळ्या शब्दात सां गायचे झाल्यास माणसाला जमिनीवर आणण्याचे कार्य या काळात होते. मात्र जो मुळात जमीनीवरच असेल किंवा ज्याचे यश डोक्यात गेलेले नसेल त्याला साडेसाती जाणवणारही नाही. ही संकल्पना शब्दात मांडणे खरेच अवघड आहे. तरीपण मी एका संस्थळावर टंकलेले परत इथे चिकटवतोय. साधारणतः माणसाची स्वतःची एक प्रतिमा त्याने स्वतःच बनविलेली असते व बर्‍याच वेळेस ती थोडीफार तरी भ्रामक असते. उदा. एखादी व्यक्ती चांगली असते, खरे बोलणारी असते. सहसा ती इतरांना दुखवत नाही त्यामुळे इतरांची आवडती असते. उच्च शिक्षण व त्या आधारे मिळणारी चांगली नोकरी व त्यामुळे आलेली सुबत्ता ह्या आणखी जमेच्या बाजू असू शकतात. अशा व्यक्तीचे आपण चांगले आहोत असे मत असते व इतरांचेही तसेच मत असते. जर अशा व्यक्तिला सौंदर्यही लाभले तर ही प्रक्रिया आणखी गतीमान होते. स्त्रियांच्या बाबतीत तर ही गती अनेकपटीने वाढते कारण स्त्रीचे सौंदर्य ही स्त्रीची शक्ति असते. आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये यासाठी अशी व्यक्ती पुढेही चांगली वागत राहाते. इतपर्यंत सगळे ठीक असते. पण अशी व्यक्ती ह्या आपल्या चांगुलपणाचे सर्व श्रेय स्वतःकडे नकळत घेऊ लागते. ही सर्व प्रक्रिया हळूहळू होत असल्याने त्या व्यक्तिच्या हे लक्षातही येऊ शकत नाही. इतकेच नव्हे तर हा चांगुलपणा ज्यांच्याकडे नाही त्यांच्याकडे अशी व्यक्ति दोषेकदृष्टीने पाहाते. खरे म्हणजे अशी व्यक्ती चांगली निपजते कारण त्या व्यक्तिला मिळालेले चांगले आई-वडिल, चांगले शेजारी-पाजारी, चांगले मित्र, चांगल्या शैक्षणिक सुविधा वगैरे वगैरे. या सर्व गोष्टींना जर आवश्यक ते श्रेय प्रत्येक वेळेस दिले गेले (म्हणजेच याचे अखंड भान असेल) तर अशा व्यक्तिला आपण चांगले आहोत असे नक्की वाटेल पण त्याचा गर्व होणार नाही. इतकेच नव्हे जर अशा व्यक्तिचे त्याच्या यशाबाबत आपण कौतुक केले तर ती व्यक्ति (मनापासून) ते श्रेय १०० टक्के आपल्याकडे घेणार नाही. परिस्थिती, नशीब, आईवडील, शिक्षक किंवा असेच काहीसे कारण पुढे करेल. (विरोधाभास म्हणजे आपण सामान्यतः ही कारणे आपले अपयश झाकण्यासाठी किंवा लपविण्यासाठी उपयोगात आणतो. ) =)) हेच आणखी स्पष्ट व्हावे म्हणून असे म्हटता येईल की, जर अशी व्यक्ती झोपडपट्टीत जन्माला आली असती, वडिल दारूडे, आईच्या तोंडात शिव्या, भाऊ जुगारी व सवंगड्यात शाळेत जाणारे कोणीही नाही. आणि अशी सर्व परिस्थिती असताना देखील जर ती व्यक्ती कोणाचीही मदत न घेता चांगली निपजली असती तर मात्र ती व्यक्ती चांगली असण्याचे सर्व श्रेय त्या व्यक्तीकडेच गेले असते. थोडक्यात, हे जे जास्तीचे श्रेय ती व्यक्ति तिच्या नकळत स्वतःकडे घेते ते त्या व्यक्तिकडून काढून घेणे हे कार्य या साडेसात वर्षात केले जाते. ज्याचे श्रेय आहे ते त्यालाच देणे म्हणजे कृतद्यता होय. कृतद्यता ही नम्रता वाढवते व नकळत आपले हात जोडले जातात. ही नम्रता आपला अहंकार कमी करते. व ज्याचा अहंकार कमी त्याचे पाय जमिनीवर असल्याने त्याला साडेसातीत त्रास होत नाही. मात्र हे सगळे समजून घेणे किंवा समजावणे सोपे जावे म्हणून एखादी गोष्ट रचली जाते. ती गोष्ट व त्याचा मतितार्थ वेळ झाला की टंकतो.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Fri, 04/15/2016 - 07:16 नवीन
भागवत साहेब. फार सुंदर लिहिताय. या विषयावर आवर्जून्लेखन करा हे सुचवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
क
कंजूस गुरुवार, 04/14/2016 - 17:26 नवीन
हे अगदी विषयाला धरून झाले.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 17:53 नवीन
टाईमपाससाठी प्रश्न विचारला गेला आहे हे लक्षातच आले नाही. सॉरी. =(( तेव्हा येथेच थांबतो.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव गुरुवार, 04/14/2016 - 17:58 नवीन
मी? नाही सरकार. खरंच प्रश्न पडले होते. काय राव!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 18:08 नवीन
अहो तुम्हाला नाही हो ते उत्तर. साडेसातीबद्दल कंजूसराव बोलत होते. म्हणून जरा माझे विचार टायपत होतो. ते थांबवले इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
व
वैभव जाधव गुरुवार, 04/14/2016 - 18:14 नवीन
आपले प्रतिसाद आवडले आहेत. कृपया लिहावे. स्वतःच्या धाग्यावर स्वतः प्रतिसाद देऊ नयेत अशा मताचा असलेला पण..... पहिला धागा ना ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 18:24 नवीन
निदान हा साडेसातीचा विषय तरी पूर्ण करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
स
सतिश गावडे गुरुवार, 04/14/2016 - 18:05 नवीन
कोण काय हेतूने विचारतो याचा विचार न करता लिहा तुम्ही. फलज्योतिशाकडे पाहण्याचा खुप वेगळा दृष्टीकोन आहे तुमचा; जो खरच विचार करण्याजोगा आहे. वर साडेसातीच्या अनुषंगाने तुम्ही मानवी स्वभावावर जे भाष्य केलंत ते खुपच योग्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा