Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

व
वैभव जाधव
Wed, 04/13/2016 - 18:47
🗣 180 प्रतिसाद
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का? - विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.
वर्गीकरण
प्रश्न

प्रतिक्रिया द्या
31781 वाचन

💬 प्रतिसाद (180)
र
राजेश घासकडवी गुरुवार, 04/14/2016 - 18:25 नवीन
शनिचं वस्तुमान - साधारण ६ वर २६ शून्यं इतके किलो. शनिचं अंतर - १.२ बिलियन किलोमीटर म्हणजे साधारण १ वर १२ शून्य इतके मीटर. शनिचा आपल्या शरीरावर होणारा गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव बरोबर आपलं वस्तुमान गुणिले एक कॉंस्टंट गुणिले ६०० किलो/ मीटर स्क्वेअर. एक्झॅक्ट आकडा काढण्यापेक्षा दुसरं उदाहरण देतो. लोकल ट्रेनमध्ये चिकटून उभ्या असलेल्या ६० किलो वजनाच्या व्यक्तीचा तुमच्यावर जितका गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव होतो तितकाच. किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचं जितकं बल तुमच्यावर कार्य करतं त्याच्या ~१/१००,०००,०००,००० पट कमी बल. म्हणजे साधारण एक भागिले मल्ल्या देणं लागत असलेले रुपये. तुमच्या शरीरातलं पाणीच काय, त्यातला एक नॅनोग्रॅम जरी त्याने हलला तरी नशीब. एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 04/14/2016 - 19:25 नवीन
एवढं गुरुत्वाकर्षण-गुरुत्वाकर्षण म्हणतात, तर आपण जीवर जन्मतो ती पृथ्वी का बरं नसते कुंडलीत?
लोक जेव्हा मंगळावर राहायला जातील तेव्हा येईल की कुंडलीत पृथ्वी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
च
चौकटराजा Fri, 04/15/2016 - 06:29 नवीन
साप्तहिक स्वराज्य चे सम्पादक एस के कुलकर्णी यांचे बरोबर "ज्योतिष एक थोतांड" या विषयावर माझा पुणे ते मुंबई या प्रवासा दरम्यान दीर्घ वाद झाला होता. त्य्या वेळी त्यानी हे चंद्र व भरती ओहोटी चे उदाहरण दिले होते. त्यावेळी राजेश यांचे हे गणित मजबरोबर असावयास हवे होते. प्रत्येक वस्तूचा दुसर्‍यावर प्रभाव आहे. तो किती गण्य व किती नगण्य हे अति महत्वाचे आहे. पण हे ज्योतिष वाले विचारात घेतील तर शपथ. दुसरे असे की त्या प्रभावामुळे घडणारे उत्पात व्यक्ति नुसार बदलतील कसे ? दैवाने ( दैव याचा अर्थ अत्यंत व्यामिश्र प्रक्रिया असा घ्यावा ) बदलले तर ते इतके टोकाचे कसे बदलतील याचे उत्तर का कोणाकडे ? मी या विश्वात कोणीतरी एक आहे मा॑झाही प्रभाव गुरू ,चंद्र शनि, सूर्य इ मंडळींवर आहे. त्याचा हिशेब ते लोक कुणा़कडे हात वा पत्रिका दाखवून पहात असतील का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी Fri, 04/15/2016 - 18:51 नवीन
अहो गंमत अशी आहे की तुमच्या बिल्डिंगचं तुमच्यावर असणारं गुरुत्वाकर्षणाचं बल हे गुरुच्या बलापेक्षा किमान हजार पटीने जास्त असतं. कदाचित लाखपट असेल. काय फरक पडतो? तुम्ही लिफ्टने काही मजले वर गेलात तरी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण किंचित बदलतं. हा बदलही गुरुच्या एकूण गुरुत्वाकर्षणाच्या बलापेक्षा अनेक पटींचा आहे. आता तुम्ही कुठच्या बिल्डिंगीत राहाता हे तुमच्या कुंडलीत घ्यायचं का? मुद्दा असा आहे की ज्योतिषशास्त्र निर्माण झालं तेव्हा ग्रहांच्या स्थितींचा अभ्यास करून पाऊस कधी सुरू होणार, पेरणी कधी करायची यासारखे निर्णय घेण्यासाठीची भाकितं करता यायची. आणि ती तारीख गणित करून सांगणं शेतीप्रधान समाजात अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे 'ज्योतिष्याला भविष्य समजतं' असा समज रूढ होणं साहजिकच आहे. ग्रहांच्या आधारे तारखांचा अंदाज करणं हे शास्त्र झालं. ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो वगैरे कविकल्पना. त्या लढवण्याबद्दल जर ज्योतिष्यांना पैसे मिळणार असतील तर ते का नाही त्या लढवणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 18:33 नवीन
एकदा नारदमुनींकडे शनिमहाराज गेले आणि म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. शनिमहाराजांना त्यांच्या शक्तिचा गर्व झालाय हे नार॑दमुनिंच्या लक्षात आले. पण पूर्ण खात्री करण्यासाठी ते शनिमहाराजांना म्हणाले, "अरे मी सामान्य संन्याशी माणूस. माझ्या राशीला कशाला येतो आहेस? जरा एखादा तुल्यबळ शोधून त्याच्या राशीला जा की." आपल्याला कोणी तुल्यबळ असू शकतो असा विचार शनिदेवांच्या मनातसुध्दा कधी आला नव्हता. त्यामुळे त्यांनी नारदांना आतुरतेने प्रतिप्रश्न केला की, "असा तुल्यबळ कोण आहे?" त्यावर नारदांनी हनुमानाचा निर्देश केला. ताबडतोब शनिदेव मारूतीरायाकडे गेले व म्हणाले की मी तुमच्या राशीला येतोय. त्याबरोबर मारूतीरायांनी आपल्या शेपटीत शनिदेवांना जे गुंडाळून ठेवले की बस्स्स. शनिदेवांचे काही चालेना. शेवटी ते मारूतीरायाला शरण गेले. मी तुझ्याच काय पण तुझ्या भक्ताच्या वाटेलाही कधी जाणार नाही असे वचन घेऊन मग मारूतीरायानी शनि महाराजांना सोडून दिले. तेव्हा पासून शनिच्या देवळात शेजारी मारूतीची पण स्थापना करतात व मारूतीची उपासना करणार्‍याला शनिदेव त्रास देत नाहीत. गोष्ट छोटी आहे. लक्षात ठेवायला सोपी. सांगायला सोपी. अगदी लहान मुलांना सुध्दा फुलवून फुलवून सांगता येईल अशी. शिवाय या पध्दतीने गोष्टीतला मतितार्थ शेकडो वर्षे जपता येतो व तो सुध्दा विशेष परिश्रम अथवा अट्टाहास न करता. या पध्दतीचा वापर करणारा कधी इसाप असतो तर कधी खलील जिब्रान तर कधी असते पंचतंत्र. मात्र या गडबडीत साडेसाती व शनि या ग्रहाचे एक अतुट नाते निर्माण होते. व एक ग्रह चक्क शनिदेव अथवा शनिमहाराज होतो. यावर एकच उपाय असतो की आपल्या मुलांना जर ही गोष्ट कधी सांगितली असेल तर या गोष्टीचा मतितार्थ ही त्याला कळायला लागल्यावर सांगितला पाहिजे. मी माझ्या मुलाला या गोष्टीचा जो मतितार्थ सांगितला तो वेळ मिळाल्यावर टंकतो.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 18:53 नवीन
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत गुरुवार, 04/14/2016 - 18:54 नवीन
महाबली हनुमान हा अजिंक्य असा वीर आहे. त्याच्या कडे सर्व प्रकारच्या शक्ति आहेत. पण त्याला एक शाप आहे की त्या शक्तिंची आठवण त्याला असणार नाही. आपल्या मोठेपणाची आठवण नसल्यामुळेच तो विनम्र आहे. अहंकाररहित आहे. कायम हात जोडून रामापुढे बसून आहे. शनि व हनुमान यांच्यात झालेल्या द्वंधात मारुती जिंकतो, कारण शनिचे काम आहे फुगलेला अहंकार किंवा वृथा अभिमान काढून टाकणे. पण ज्याचा अशुध्द अहंकारच शिल्लकच राहिलेला नाही जो स्वतःला रामरायाचे दास मानतो त्याला कसला आला आहे अभिमान. थोडक्यात अशा मारूतीरायासमोर शनिचे काय चालणार? शनि हरणार आणि हनुमान जिंकणार ही जणू काळ्या दगडावरची रेषच. हेच सांगण्यासाठी, लक्षात राहाण्यासाठी किंवा बिंबविण्यासाठी ही गोष्ट रचली गेली आहे. आणखी एक म्हणजे हनुमानाचा जो भक्त त्याला शनिमहाराज त्रास देत नाहीत याचा अर्थच हा, की वीर हनुमानाप्रमाणे जो अहंकाररहित होण्याचा मार्ग चोखाळत आहे त्याला शनि महाराज कधिही त्रास देत नाहीत. थोडक्यात सर्व संताचे जे सांगणे आहे की, माणसाचा खोटा अहंकार किंवा अभिमान हेच सर्व दु:खाचे कारण आहे. असा हा खोटा अहंकार तसेच अभिमान नाहिसा करण्यासाठी साडेसातीचा काळ अनुकुल असतो. कारण आपले दोष याच काळात ऊघडकीस आल्याने आपल्या लक्षात येतात व ते जावेत यासाठी आपण प्रयत्न करू लागतो. असा भाव ठेवून जो कुणी साडेसातीला सामोरा जाईल त्याला साडेसातीचा नक्की फायदा होईल व भट्टीतून तावून सुलाखून निघालेले सोने जसे आणखी दैदिप्यमान भासते तसे त्याचे जीवन आणखी उजळेल.
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 04/14/2016 - 19:00 नवीन
ह्या प्रश्नावर अनेक वेळां अभ्यास झालेला आहे आणि जयंत नारळीकर ह्यांनी ह्या संशोधना बद्दल अनेकदा मराठीतून लिहिले सुद्धां आहे. बहुतेक ग्रहांचा मानवी शरीरावर होणारा परिणाम जवळ जवळ शून्य आहे. चंद्राचा परिणाम मानवी मनावर होत नाही हे सुद्धा अनेक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. Lunar Lunacy असे सर्च केल्यास तुम्हाला अधिक माहिती भेटेल.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. गुरुवार, 04/14/2016 - 19:37 नवीन
बोगस काकू आहे एक नंबरचा. काम ना धंदा, हर गोविंदा.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Fri, 04/15/2016 - 16:22 नवीन
वाचू आणि चावू नये. नै अवडत तर बघू नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शाम भागवत Fri, 04/15/2016 - 17:22 नवीन
अहो पण तुम्ही का एवढे चिडताय? तुम्हाला न आवडणारे कोणी लिहिले असेल तर तुम्ही बघू नका ना. इतरांना बघू नका असे का सांगताय? आणि हो तुम्ही धागा काढलाय म्हणून त्यात मालकी हक्काने गुंतु नका. या गुंतण्यातून तुम्ही जास्त चिडत जाल. या धाग्यातून जेवढे आवडेल तेवढे घ्यायचे व जे नको असेल ते तिथे धाग्यावरच ठेवायचे हे जर तुम्हाला जमले तर तुम्ही खूप मोठी कला मिळवली आहे अस म्हणता येईल. प्रत्यक्ष जिवनात याच कलेचा उपयोग सर्वात जास्त होतो. ही कला मिळविण्याची नेटप्रॅक्टिस इथे करतोय अस समजा हव तर. एखाद्याने तुम्हाला चिडवले आणि तुम्ही चिडला तर चिडवणारा जिंकला हे लक्षात ठेवा. जोपर्यंत चिडवणारा अंगसटीस जात नाही किंवा आपले नुकसान करत नाही तोपर्यंत तिकडे दुर्लक्ष करायचे शिकता आले पाहिजे. कित्येक वेळेस तर चिडवणारा इतके सुंदर चिडवतो की राग येण्याऐवजी दाद द्यावीशी वाटते. उदा. धागा भरकटवणे हे काही आयडीचे काम असल्याची इथे बरीच ओरड होते. पण मला तर कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती. कमीत कमी शब्दात अगदी साळसूदपणे किती मस्त चिडवल होत त्यांनी. मला तर हसायलाच आले. मी माझ्याशीच हसून पुढे गेलो असतो पण साडेसातीचा विषय त्यांनीच काढल्यामुळे मी टंकायला लागलेलो असल्यामुळे दखल घ्यायला लागली इतकेच. असो. आपल्याला जे पटलेय अनुभवाला आलेय ते मांडत जायचे. मात्र दुस-याला आपले म्हणणे पटलेच पाहिजे हा आग्रह सोडता आला तर जालावर किंवा प्रत्यक्ष जिवनात त्रास होत नाही. मग आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही. :=) बघा पटतय का. नाहीतर त्या सोडून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
व
वैभव जाधव Fri, 04/15/2016 - 17:30 नवीन
ते अभ्या.. आमचं 'मित्र' हाय ओ खास... चालतं आमच्या आमच्यात तेव्हढं. बाकी आपण कमी कालावधीत मोठे मोठे प्रतिसाद लह्यायला लागलाय हे पाहून कसंतरी च वाटायला लागलेलं आहे. म्हणजे एकदम सविस्तर प्रतिसाद आवडतात बरंका! गैरसमज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
श
शाम भागवत Fri, 04/15/2016 - 17:53 नवीन
दोन दिवसापूर्वी एक काम संपलय. सोमवारी नवीन काम सुरू होईल. तोपर्यंत हात व डोक मोकळ आहे म्हणून टंकतोय. एकदा का काम सुरू झाले की मग फक्त वाचनमोड. किंवा वाचनमोडही बंद करून नेट फक्त कामा पुरतेच. कित्येक वेळेस वर्तमान पत्रही वाचायचे बंद करतो. जगात काही सुध्दा फरक पडत नाही. =)) असो. प्रतिसाद मोठा असला तरी, "आपल्या कुंडलीत कोणताही ग्रह कुठेही पडलेला असला तरी फरक पडत नाही." या वाक्याभोवती तो गुंफलाय बरका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
ख
खटपट्या Fri, 04/15/2016 - 23:11 नवीन
हा प्रतिसाद मिपा धोरणात अ‍ॅड करावा अशी संपादकांना विनंती करतो. आणि माझे दोन शब्द संपवतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
र
रामपुरी गुरुवार, 04/14/2016 - 22:24 नवीन
Gravity is the weakest force in nature.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/15/2016 - 01:47 नवीन
जोपर्यंत मॅाडन आर्ट नावाची चित्रं कोटी कोटींत विकी जात आहेत तोपर्यंत आपला चहा तावातावाने बोलून आपल्याच शर्टावर कशाला सांडून घ्यायचा?
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Fri, 04/15/2016 - 16:20 नवीन
माडर्न आर्ट आणि जोतिष दोघांमध्ये निश्चित काही तरी समानता असेल. जोतिष वाले हि कोट्याधीश आहेत आणि न समजणारे चित्र विकणारे हि.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Fri, 04/15/2016 - 18:22 नवीन
मीपण कार्यकत्त्वाबद्दल दुपारी खफवर लिहिलं पण पुसलं गेलंय. "कंजूषरावांनी विषयाला धरून लिहिल्याबद्दलच टपली मारली होती." एकूण रागरंग बघून मी लिहितो.मी वाचतो ज्योतिष,पुराणं,मॅाडर्न आर्ट,फिजिक्स,गणित,देवळं,पाककृती,शेती सर्व. ज्योतिष थोतांड आहे त्याला शास्त्रिय आधार अजिबात नाही हे मिपावर बय्राच लेखांतून मिपाकरांनी सिद्ध केलंय त्यामुळे मी शक्यतो विनोदी प्रतिसाद देतो.पटवायला वगैरे जात नाही.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Fri, 04/15/2016 - 18:40 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
क
कंजूस Fri, 04/15/2016 - 18:25 नवीन
चंद्रावर ओरडणारा कोल्हा ( कोल्हेकुई ) हे चित्र आवडलं हे सांगायचं राहिलंच.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 04/15/2016 - 19:40 नवीन
सिक्सगन आर्मस्ट्रॉन्ग आणि नेफ्यु आर्मस्ट्रॉन्ग नासिकच्या पॅलेस कडुन कोठ्डी पर्यंत सरकत गेले व आता त्याच कक्षेत स्थीर झालेत हा शनिच्या बलाचा परिणाम असावा काय ? असाच परिणाम नेफ्यु पॉवरच्या बाबतीत घडण्याची दाट शक्यता आहे असेbभाकित वर्तवले जात आहे. शनिबलाच्या अभ्यासक / मिपा जाणकार काही प्रकाश टाकु शकतिल का?
  • Log in or register to post comments
ब
बबन ताम्बे Wed, 04/27/2016 - 12:26 नवीन
आणि गुरुअंकल व देव-इंद्राचे चांगले सम्बंध आहेत. तस्मात त्यांना अजून तरी धोका नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
र
राही Fri, 04/15/2016 - 19:50 नवीन
बहुतेक सगळे ज्योतिषी श्याम भागवतांप्रमाणेच सांगतात. की कुंडलीत ग्रह अमुक ठिकाणी आहे म्हणून घटना घडत नाहीत. तर अशा घटना घडण्याची शक्यता आहे असे ते ग्रहचिह्न दर्शवते. जसे रस्त्यावर शाळा असेल तर सूचना म्हणून रस्त्याच्या कडेला मुलाचे चित्र असलेला फलक असतो. फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो. कुंडलीची आणखी एक मनोज्ञ बाजू म्हणजे व्यक्ति आणि भवताल यांचे संबंध तपासणे. कुंडलीतले दुसरे, तिसरे, चौथे, सहावे, सातवे, दहावे, अकरावे स्थान (किंबहुना सर्वच स्थाने) हे त्याच्या आयुष्यावर परिणाम करू शकणार्‍या व्यक्तींसाठी मानले आहे. उदा. चतुर्थ हे मातृस्थान, सप्तम हे ज्यायास्थान, दशम पितृस्थान, वगैरे. या प्रमाणे भावंडे, मातुलगृह, सासर, नोकर, बॉस, मित्र या सर्वांशी त्याचे संबंध कसे असतील हे अजमावता येते. या सर्व स्थानांत चांगलीच ग्रहचिह्ने असतील असे नाही किंबहुना नसणारच. म्हणजे एखादी व्यक्ती आईशी जितपत चांगली वागेल तितकी वडिलांशी वागत नसेल. किंवा पत्नीशी जुलमाने वागणारा माणूस मुलांवर अतिशय प्रेम करणारा असू शकेल. यामुळे माणसाची सकल किंवा सर्वंकष वागणूक अंतर्विरोधात्मक असू शकते हे सत्य कळते. मनुष्य एका कोनातून चांगला म्हणजे सर्वच चांगला असे नसते हे उमगते. चांगल्यावाईटाच्या कल्पना पुन्हा पुन्हा तावून सुलाखून निघतात. स्वतःच्या प्रगतीसाठी हे पृथक्करण साहाय्यभूत ठरू शकते.
  • Log in or register to post comments
स
साहना Fri, 04/15/2016 - 22:31 नवीन
इंग्रजींत ह्याला correlation आहे पण causation नाही असे म्हटले जावू शकते. पण त्याच वेळी अनेक अभ्यासांत correlation सुद्धा नाही असे सामोरे आले आहे. एकाच वेळी जन्म घेतलेली मुले त्यामुळे जवळ जवळ समान भविष्य घेवून जन्माला आली असती आणि तसे असते तर उत्क्रांतीच्या प्रवाहात ठराविक सीजन मध्ये जन्म घेणारी मुले जास्त वाचली असती आणि हळू हळू मानवांचा सुद्धा "मेटिङ्ग सीजन" निर्माण झाला असता. जनावरां मध्ये आपण त्या प्रकारची उत्क्रांती पाहतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
र
राजेश घासकडवी Sat, 04/16/2016 - 13:11 नवीन
फलक असला काय नसला काय, शाळा असणारच. फक्त फलक नसला तर आपल्याला ते कळणार नाही आणि वेगनियंत्रणाची खबरदारी न घेतल्यास अपघात घडू शकतो.
पण यात गृहितक असं आहे की फलकाचा शाळा जवळ असण्याशी काहीतरी संबंध आहे. वर साहना यांनी कोरिलेशन आणि कॉझेशन वगैरे म्हटलेलं आहे. पण ग्रहांच्या बाबतीत तेही नाही. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो. संकटात असलेल्या माणसाला धीर देऊन 'सुमारे तीन महिन्यांत परिस्थिती सुधरायला लागेल' अशी आशा देण्याचं काम करू शकतो. माझी पत्रिका ज्यांनी ज्यांनी कोणा ज्योतिष्याला दाखवली आहे त्यांना हाच सल्ला मिळालेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
ब
बाळ सप्रे गुरुवार, 04/21/2016 - 08:18 नवीन
ज्योतिषी फारतर समुपदेशकाप्रमाणे काम करू शकतो
एक्झॅक्टली.. ज्योतिषात चांगली बाजू पाहण्याच्या इच्छेने विचार झाल्यास हीच एक बाजू समोर येते.. पण मग समुपदेशनच करायचयं तर खरच ज्या घटकांचा परीणाम होतो ( उदा. आजूबाजूच्या व्यक्ति, त्यांच्याशी संबंध, सांपत्तिक स्थिती इ.) त्याच घटकांच्या आधारे का करु नये?? ग्रह तारे दशा वगैरे काल्पनिक आधार कशाला??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी
र
राजेश घासकडवी गुरुवार, 04/21/2016 - 16:29 नवीन
मला वाटतं की काल्पनिकपणा हेच समुपदेशनाच्या बाबतीत ज्योतिष्याचं बलस्थान आहे. 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' हे खरं असलं तरी संकटांनी गांजलेल्यांना, किंवा डिप्रेशनमध्ये अडकलेल्यांना आपली छिन्नी हातोडीच पेलवत नाही. मग पुतळा घडत नाही यामुळे मनोबल अजूनच खच्ची व्हायला होतं. अशांना 'काळजी करू नकोस. हे दोन महिने उलटले की भविष्य उज्ज्वल आहे. हा पुतळा आपोआप तयार होणार आहे.' असं अधिकारवाणीने सांगता आलं की त्या माणसाला किमान छिन्नी हातोडी उचलण्याचं बळ मिळतं. हे जर काल्पनिक घटकांवर आधारित नसेल तर 'चांगलं होणार आहे' यावर विश्वास बसणं कठीण पडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाळ सप्रे
प
पुतळाचैतन्याचा Sat, 04/16/2016 - 07:47 नवीन
अनेक लोक साधे गणित मांडत आहेत कि शनीचे आपल्या पासून अंतर एवढे आहे...चंद्राचे एवढे आहे...म्हणून गुरुत्वाकर्षण बल एवढे येईल...मग काहीच परिणाम होत नाही....यात एक गोष्ट विचारात घेतलेली नाही ती म्हणजे त्या-त्या ग्रहावरून पृथ्वीवर येणारी परावर्तीत प्रकाश उर्जा...म्हणजे...सूर्याचा प्रकाश त्या-त्या ग्रहांवर पडतो आणि तो परावर्तीत होऊन सगळीकडे जातो...त्यातील एक अंश जो पृथ्वीकडे येतो त्यात देखील प्रचंड उर्जा असते....साधे ग्रहण जेव्हा होते तेव्हा एक ग्रह मध्ये आल्याने अनेक बिलियन जुल्स उर्जा अडवली जाते...आणि खरा परिणाम हा या उर्जेतून होत असतो...म्हणून पौर्णिमेला आणि अमावास्येला चंद्राच्या पृथ्वी पासूनच्या अंतरात फार फरक नसतो पण परावर्तीत उर्जेत फार फरक असतो...चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो...या उलट मंगळावर लोह (लाल रंग) अधिक असल्याने तेथून आलेला प्रकाश हा उग्र आणि डोके फिरवणारा मानण्यात येतो...असो....आता ज्योतिष शास्त्र मध्ये ग्रहांचे अस्त आणि उदय असतात...म्हणजे जेव्हा एखाद्या ग्रहाचा पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नाही तेव्हा त्याचा अस्त झाला असे म्हणतात...लग्नाचे मुहूर्त पण गुरु-शुक्र यांच्या अस्त काळात नसतात....तेव्हा फक्त वजन आणि अंतर हे भौतिक शास्त्र (आणि भौतिक विचार??) झाले...अनेक परदेशी विद्यापीठांमध्ये यावर चांगले संशोधन झाले आहे आणि ग्रहांचा हा खेळ आइन्स्ताइन ला देखील जाणवला होता हे त्याचे विचार वाचल्यावर समजते...तेव्हा ज्योतिष हे शास्त्र आहेच...आपल्याला समजत नाही किंवा जाणवत नाही किंवा सोयीस्कर वाटत नाही म्हणून एखादे शास्त्र नाही असे म्हणणे हेच अशास्त्रीय आहे...इथे नास्तिक, निधर्मी आणि सेकुलर वाद असे मुद्दे येतात...पण व्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ज्याने त्याने आपल्या विचाराने स्वीकार किंवा धिक्कार करावा ....वरील विचार स्वीकारण्याची कोणावर कसलीच सक्ती असू शकत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 04/16/2016 - 09:24 नवीन
आयो य्यो . किती मोठा शोध भाउ ? अर्र्र आमच्या गुर्जीनी चन्द्रावरचा प्रकाश म्हणजे परावर्तित म्हणजेच उर्जेच्या सन्दर्भात निकृष्ट ह्ये शिकिवलं हुतं ! चन्द्रावरचं पानी आनाया सुरेश प्रभू ना गाडी पाठवाया सांगायचं काय गड्यानो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा
प
पुतळाचैतन्याचा Sat, 04/16/2016 - 09:34 नवीन
तुमचे गुरुजी चंद्रप्रकाशात कुठे डुलत असतात याचा शोध घ्या....शेवटच्या २ ओळी तुमच्यासाठीच होत्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 10:16 नवीन
>>चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे म्हणून तेथून परावर्तीत प्रकाश हा सौम्य मनाला जातो... याचा उल्लेख असलेल्या एखाद्या शोधनिबंधाचा किंवा एखाद्या अवकाश संशोधन केंद्राचा दाखला मिळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा
प
पुतळाचैतन्याचा Sat, 04/16/2016 - 12:32 नवीन
गावडे साहेब...चंद्र-प्रकाशाचे तापमान मोजणारे आणि त्याला थंड आहे असे जाहीर करणारे अनेक लेख आणि प्रयोग गुगल आणि यु-ट्यूब वर उपलब्ध आहेत. मुद्दाम खाली एक उलटी लिंक देतो: http://www.nytimes.com/1995/03/10/us/surprising-scientists-full-moon-is-found-to-play-role-in-warming-the-earth.html आता यात म्हटले आहे कि या प्रकाशानी पृथ्वी गरम होते (वरील उल्लेखाच्या विरुद्ध). याचा अर्थ पृथ्वीला उर्जा (केलोरीज ) मिळते....तरी पण थंड का म्हणतोय मी? तर जसे आयस्क्रीम थंड असते पण त्यात भरपूर केलोरीज (उर्जा) असते तशी उर्जा पृथ्वीला मिळते पण त्यात थंडावा असतो....मी मुद्दाम एक शब्द वापरला आहे कि...थंड "मानण्यात" आलेला आहे...हे मी पश्चिमी प्रयोगांच्या आधारे नव्हे तर भारतीय शास्त्रांमध्ये चंद्र प्रकाशाला शीतल आणि पोषक मानून त्या नुसार त्याचे कारकत्व देण्यात आले आहे....उदा. अनेक आयुर्वेदिक कंपन्या पौर्णिमेला औषध निर्माण करतात ते याच मुळे...आता फक्त नासा ने थंड सिद्ध केले तरच तो थंड आणि बाकी लोकांनी "मानले" तर थंड नाही असे इथे केलेले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 13:33 नवीन
या बातमीत "चंद्रावर पाणी आणि बर्फ खूप आहे" याचा उल्लेख नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा
M
mugdhagode Tue, 04/19/2016 - 19:43 नवीन
चंद्राचा परिवलन व परिभ्रमण वेग एकच असल्याने चंद्राची एकच बाजु आपल्याला दिसते. जिकडे बर्फ आहे ती बाजु आपल्याकडेच येत नाही. चुभुदेघे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुतळाचैतन्याचा
श
शाम भागवत Sat, 04/16/2016 - 08:03 नवीन
आवडला.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 04/16/2016 - 13:36 नवीन
पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय. ही माझी ट्रीप नेहमीच शनिवारी असायची. हल्ली प्रमाण खूपच कमी झालेय पण पूर्वी वारंवार जायला लागायचे. लाल डब्याने जायचे व यायचे. पण जर कधी स्कूटरने किंवा मोटरसाईकलने गेलो तर शनिशिंगणापूरला जरूर जायचो. तर त्यावेळची पहिली भेट मला आठवतीये त्याप्रमाणे मी मोटरसायकल चौथर्यापासून २-४ फुटावर लावली होती. आरामात चौथर्यावर जाऊन दर्शन घेतले होते. त्या चौथर्यावर बसून मित्राबरोबर गप्पा मारल्या होत्या. आजूबाजूला कोणिही नव्हते. जर मला एखादा रूपया दानधर्म करायची हुक्की आली असती तर तो रूपया दान करण्यासाठी एकही याचक मिळाला नसता. पाय धुवायला नळ नव्हता की ड्रेसकोड नव्हता. अंघोळ करून ओलेत्याने चौथर्यावर जायची सक्ति नव्हती. पण.. १९८७-८८ साली अनिसने तिथे आंदोलन केले. महाराष्ट्रातील सर्व वर्तमान पत्रातून त्या आंदोलनाला अफाट प्रसिध्दी मिळाली आणि सगळे बदलूनच गेले. वर्षभरात मला माझी बाईक चक्क २५ फूटावर लावायला लागली. बर्याच बाईक लागल्या होत्या. दर्शनाला रांग नव्हती पण गर्दी होती. १९९३ साली बजाजने FE नावाची स्कूटर काढली होती. मला पहिल्या लॉट मधली स्कूटर मिळाली होती. ती घेऊन गेलो होतो. मात्र यावेळेस स्कूटर बरीच लांब लावायला लागली. आता ड्रेसकोड आला होता. अंघोळ मस्ट होती. मी चौथर्यावर न जाता लांबूनच नमस्कार केला. रांगेत ओलेत्याने काही पुरूष उभे होते. नेहमीच्या चहावाल्याचे दुकान चांगलेच भरभराटीला आले होते. त्याने ओळख दाखवली पण आता त्याला बोलायला फुरसत नव्हती. आता दानधर्म करायची हुक्की आली तर ती भागवायला काही याचक मदत करायला तयार होते. बराच बदल झाला होता. २००४ साली बजाजची पल्सर घेतली. आता मात्र अर्धा किमी. लांब बाईक लावायला लागली. सिमेंट क्रॉक्रिट टाकून दोन पार्किग लॉट केले होते. गच्च भरले होते. जत्रा फुलली होती. अंघोळ करायला लावलेल्या नळांची संख्याच मुळी ५० च्या वर गेली होती. ओलेत्याने दर्शन घेण्यासाठी भली मोठी रांग लागलेली. दुरूनच दर्शन घेतले व निघालो. काम संपवून रात्री ८ वाजता सोनईहून निघालो. अजूनही जीपगाड्या भरून भक्त येतच होते. रस्ता वाहतूक नियंत्रण करण्यासाठी पोलीस उभे होते. हम्म. सगळेच बदलले होते. आंदोलनाद्वारे अनिसनी जनजागृती केली होती आणि तेव्हापासून अनिसचे कार्यकर्ते गणितीश्रेणीने तर भक्तगण भूमिती श्रेणीने वाढत चालल्याची जाणीव आणखीनच घट्ट झाली होती. पूर्वी बोलेरो, टेंम्पो ट्रॅक्स मधून फक्त बापयेच यायचे. आतातर बायामाणसेही येणार आहेत दर्शनाला. बापेलोग कच्चीबच्ची व बायकोला घरी ठेऊन ट्रीपला जातात. पण बाई माणूस मुले बाळे घरी ठेऊन एकवेळ कामाला जातील पण ट्रीपला नाही जाणार. थोडक्यात आता सहकुटुंब सहपरिवार दर्शन सुरू होईल. घरटी एक मुलगा व एक मुलगी धरल्यास आता भक्त गणांची संख्या चौपट व्ह्यायला काहीच हरकत नाही. शिवाय अगदी लहान असल्यापासून शनिदेवांची भक्ति कशी करायची याचे बाळकडू मिळालेली एकदम तरूण पिढी २०३० सालापर्यंत तयार झालेली आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार असे दिसतेय. मग विचार करायला लागल्यावर प्रश्न पडतो. १) अनिस कुठे कमी पडतीय? २) प्रत्येक शनिच्या देवळा समोरची रांग कायम मोठीच का होत राहिली आहे. ३) गेल्या ३० वर्षात लोकसंख्या फक्त ३५% वाढलेली असली तरी ही भक्तांची रांग हजारपटींनी का वाढतेय ४) शनिदेव वगैरे काही नसते असे मिपाकर सतत सिध्द करत असूनही असे का होतेय. नुसतेच मिपाकर नव्हेत. मायबोली मनोगत वगैरे सर्वठिकाणी प्रयत्न करूनही काहीच कसा बदल घडत नाहीय्ये. ५) जयंत नारळीकर सारखा शास्त्रज्ञाचाही प्रभाव का पडत नाहिय्ये? किंवा ....... १) या भक्तांना खरोखरच काही पडताळे येताहेत का? २) अगोदर त्रास असा नव्हता. सगळे काही ठीक चालले होते. थोड्या कुरबुरी असायच्या पण त्या कोणाच्या संसारात नसतात? पण साडेसाती सुरू झाली व जो एकामागोमाग त्रास सुरू झाला की जीव नकोसा झाला. शेवटी शनिदेवांची आराधना सुरू केली व त्रास थांबला अस काही खरेच होतय का? खरोखरच हे तपासले पाहिजे. ३) शनिशिंगणापूरला अमावास्येला येणारी ही लाखो भक्तमंडळी खरच येडी आहेत? अनाडी आहेत? न शिकलेली आहेत? निष्कर्ष काढणे खरेच इतके सोपे असते? त्यांच्यात वकिल, डॉक्टर, बी.एस्सी, इंजिनिअर झालेल कुणीच नसेल? मला वाटते शनिदेवांची टिंगल टवाळी करून प्रश्न सुटणार नाहीय्ये. भक्तगणांची अडाणी, मूर्ख अशी हेटाळणी करून हे थांबवता आलेले नाहीय्ये, किंवा थांबवता येणार नाहीय्ये. कोणता तरी वेगळा उपाय योजला पाहिजे यावर तरी निदान सहमती होणे आवश्यक आहे. त्यानंतरच कदाचित मार्ग सापडू शकेल. मग.. १) ज्योतिषांची एक भाषा असते. त्याचे शब्दशः अर्थ घेऊन चालणार नाही किंवा २) फलज्योतिष हे ज्योतिषशास्त्राचे एक छोटे अंग किंवा बाय प्रॉडक्ट आहे. या फलज्योतिष सांगणार्याच्या चुकांचे खापर मूळ ज्योतिषशास्त्रावर फोडून चालणार नाही ह्याचेही भान ठेऊन मग उपाययोजना सुचायला लागतील. ३) निदान टिका करण्याअगोदर फलज्योतिषा बरोबरच मूळ ज्योतिष शास्त्रातील मूलभूत संकल्पना ही समजावून घेणे आवश्यक असल्याचे मान्य झाले पाहिजे. असे जेव्हा काही होईल तेव्हा मात्र खर्या अर्थाने परिणाम दिसू लागेल.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/16/2016 - 13:42 नवीन
चांगले लिहीत आहात. सहज मनात आले की एवढे हजारो लाखो लोक आंघोळी पुन्हा तिथे करत असतील तर किती पाणी फुकट जात आहे तिथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
व
विजय पुरोहित Sat, 04/16/2016 - 15:58 नवीन
अतिशय उत्तम प्रतिसाद भागवत साहेब!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 16:28 नवीन
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही. आता लोक शिर्डीला का जातात हा वेगळा मुद्दा आहे. साईबाबांवर लोकांची श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी लोक जातात. शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही. आता शनीची मूर्ती म्हणून ज्या पाषाण शीळेची पुजा केली जाते त्याचीही अशीच एक कथा आहे. तिथल्या एका गावकर्‍याच्या स्वप्नात शनीदेव आले आणि कुठल्याशा ओढ्यात (किंवा शेतात) मी पडून आहे, मला बाहेर काढ आणि माझी स्थापना कर असे म्हणाले. त्याप्रमाणे त्या गावकर्‍याने ती शीळा शोधून काढली आणि तीची स्थापना केली. मंदिरासमोर वाढणार्‍या रांगेबद्दल म्हणाल तर ते फक्त शनीमंदिरांच्या बाबतीत होत नसून सर्वच मंदिरांच्या बाबतीत होत आहे. दिवसेंदिवस माणसाचं आयुष्य अधिकाधिक गुंतागुंतीचं होत चाललं आहे. पावलापावलावर माणसाला अपेक्षाभंगाला सामोरं जावं लागत आहे. हे सारं आयुष्याचा भाग म्हणून स्विकार करण्याईतकी जाण सार्‍यांनाच नाही. ज्यांना नाही ते आपल्या समस्या दूर करण्यासाठी "देव" नावाच्या शक्तीला शरण जात आहेत. त्यातून देवळांसमोरच्या रांगा वाढत आहेत. काही सुखी समाधानीही आहेत. आपलं हे सुख समाधान ही देवाची कृपा आहे अशी त्यांची भावना आहे. असेही लोक देवाप्रती कृतज्ञता म्हणून देवदर्शनाला जातात. "शनी महात्म्य" हे एखाद्या भयकथेला लाजवेल असे कथानक आहे. माझा ज्योतिषाचा विशेष असा अभ्यास नाही मात्र एकंदरीत साडेसाती या संकल्पनेचा विचार करता प्रत्येक माणसाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा साडेसाती येणारच. या काळात जर कुणाच्या आयुष्यात कठीण प्रसंग आला तर काही जण त्याला धीराने सामोरे जातात. काहींना ओळखीपाळखीतील, शेजारी-पाजारी ज्योतिषाला पत्रिका दाखवून बघा असे म्हणतात. हल्ली तर ज्योतिशी लोकही ऑनलाईन कन्सल्टींग देतात. वाकडवरून हिंजवडीला जाताना अशा ज्योतिषांच्या लक्ष वेधून घेणार्‍या भल्या-मोठया जाहीराती दिसतात. असो. कठीण प्रसंगी "हा ही उपाय करून पाहू" असे म्हणून पत्रिका दाखवली जाते. आणि मग त्यातून पुढे "दैवी" उपाय सुरु होतात. ज्योतिषी धीर देतो, तोडग्याने समस्या नक्की दूर होईल असे आश्वासन देतो. चिंताग्रस्त मनाला थोडासा दिलासा मिळतो. वृत्तीत सकारात्मकता येते आणि माणूस समस्येला भीडतो. कधी समस्या दूर होते, कधी नाही होत. जेव्हा समस्या दूर होते तेव्हा त्या ज्योतिषाचा, त्याने दिलेल्या तोडग्याचा बोलबाला होतो. जेव्हा समस्या दूर होत नाही तेव्हा माणूस नाईलाजाने ती परिस्थिती नशिबाचा भाग म्हणून स्विकारतो. माणसाने जेव्हा अज्ञाताचा शोध घ्यायला सुरुवात केली, आपल्या आयुष्यातील सुख-दुखांचा कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न सुरु केला तेव्हा कधीतरी फलज्योतिष या कलेचा शोध लागला असावा. माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा त्याच्या जन्मवेळी आकाशातील "ज्योतींंच्या" स्थानाशी संबंध असावा असे त्याला वाटले असावे. आणि मग नवीन जीव जन्माला आला की त्यावेळची आकाशातील ग्रहांच्या स्थितीची नोंद केली जात असावी. आणि मग त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणार्‍या घटनांचा संबंध जोडला गेला असावा. यातूनच ज्योतिष विकसीत झाले असावे. हे "कोरीलेशन" पुढे काळाच्या ओघात "कॉजेशन" बनले असावे. अर्थात हे जेव्हा कधी झाले तेव्हा माणूस विश्वाचे आकलन करण्यात चाचपडतच असावा. म्हणून तर तारा असणारा सूर्य कुंडलीमध्ये नवग्रहांपै़की एक आहे आणि पृथ्वीचा उपग्रह असणारा चंद्र कुंडलीत एक स्वतंत्र ग्रह मानला जातो. नव्हे, मनाचा कारक म्हणून त्याला कुंडलीत विशेष स्थान आहे. राहू आणि केतूचा तर अतापताच नाही. सध्याचे ज्योतिशी त्यांना उत्तर आणि दक्षिण छेदन बिंदू (north and south lunar nodes) मानतात. दुसरे काय स्पष्टीकरण देणार ते तरी. सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. सौरमालेचा अभ्यास फक्त शाळेतील परीक्षेत उत्तिर्ण होण्यासाठी केला जातो. पुढे आयुष्यात कधी साडेसाती आली की पृथ्वीपासून लाखो-करोडो किलोमीटर दूर असणारा शनी हा ग्रह "देव" बनून आपल्याला शहाणपणा शिकवायला कसा येईल हा प्रश्न त्याला पडत नाही. तो निमुटपणे शनी महात्म्य वाचतो, ज्योतिषाने सांगितलेले तोडगे करतो. मानवी जीवनातील ताण-तणावांना, समस्यांना सामोरं जायचा अजून एक उपाय आहे. तो म्हणजे मानसोपचारांचा. मात्र मानसोपचार प्रचंड खर्चिक आहेत. सर्वसामान्यांना परवडण्यापलिकडचे आहेत. हे उपाय दिर्घकाळ चालू ठेवावे लागतात. इतके करूनही समस्या दूर होईलच याची खात्री नसते. आपल्याकडे मानसोपचारतज्ञाकडे जायचा कुणी विषय काढला की "मला काय वेड लागले आहे काय?" असा प्रतिप्रश्न केला जातो. शरीराचे जसे तात्कालिक छोटे छोटे आजार असतात तसेच मनाचेही (खरे तर मेंदूचे) आजार असतात या गोष्टीचा स्विकार अजूनही समाजाने केलेला नाही. मानसोपचारतज्ञाकडे जाणे म्हणजे वेड लागणे असे एक सरधोपट समिकरण बनले आहे. (वेड लागणे ही schizophrenia या मनोरोगाची टोकाची अवस्था आहे.) डॉक्टरकडे कशाला जातो, तो तुला अँडीप्रेसंटच देईल असे भयानक सरसकटीकरण केले जाते. या सार्‍या कारणांमुळे सर्वसामान्य माणूस मानसोपचारांपासून दूर राहतो आणि देव आणि कुंडलीला जवळ करतो. ते स्वस्तही पडते आणि बरेच वेळा प्रभावीही ठरते. नाहीच काही मार्ग निघाला तर खापर फोडायला नशीब असतेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
क
कंजूस Sat, 04/16/2016 - 17:48 नवीन
किती संयमित प्रतिसाद देता येतो याचे उत्तम उदाहरण.अगोदर राजेश घासकडवी यांनीही गुरुत्त्वाकर्षणाचा मुद्दा सोप्या रीतीने समजावून दिलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौकटराजा Sat, 04/16/2016 - 18:18 नवीन
सर्वसाधारणपणे सश्रद्ध हिंदू घरात जन्माला येणारे मुल आपल्या आई बाबांच्या श्रद्धा तशाच्या तशा स्विकारते. हे जवळ जवळ १००टक्के सत्य .आमचे फॅमिली डो म्हणतात साय अति खाण्याची सवय १५ वर्षापर्यन्त लागते व माणूस एम डी २२ ते २५ व्या वर्षी होतो.सबब साय खाउ नका असे लोकाना सांगतो पण स्वतः......? तसेच हे श्रद्धेचे प्रकरण असते. माझ्या नातेवाईकात हा नियम तर १०००१ टक्के लागू होतो. पुढे कार्यकारण भावाचे कितीही ज्ञान झाले तरी भान येत नाही. प्लासिबो मुळे काही बाबतीत फरक पडतो पण अम्तर्मनातील समजूतीलाव ताकदीला फार मोठे स्थान बाह्य गोष्टीपेक्षा महत्व आहे भले माणसाचे कायिक जीवन परिसरावर अवलंबून असेल तरीही. मी तरी माझ्या जीवनात शुभेच्छा देतो घेतो आशिर्वाद देतो व घेतो पण त्यामुळे मी घडलो किंवा कुणी घडला असे मी मानत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 04/20/2016 - 17:38 नवीन
प्रतिसाद आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
आ
आदूबाळ Sun, 04/17/2016 - 08:42 नवीन
व्वा वा शामराव! एक नंबर प्रतिसाद. अ‍ॅडव्हर्स सिलेक्शनचं उत्तम उदाहरण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
त
तर्राट जोकर Sun, 04/17/2016 - 09:18 नवीन
अ‍ॅडव्हर्स सिलेक्शन म्हणजे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
अ
अभ्या.. Sun, 04/17/2016 - 09:25 नवीन
आम्हाला इन्वर्स सिलेक्शन म्हैते. फोटोशॉपमध्ये असतय. जेवढे सिलेक्ट केलेले तेवढे सोडून उरलेले सिलेक्ट होते. Alt+S+I
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
स
स्पा गुरुवार, 04/21/2016 - 08:56 नवीन
लोउल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..
श
शाम भागवत Sat, 04/16/2016 - 13:53 नवीन
खरे आहे हे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 04/16/2016 - 15:02 नवीन
""पुण्याहून औरंगाबादला जाताना शाम भागवत - Sat, 16/04/2016 - 17:06 नवीन पुण्याहून औरंगाबादला जाताना नगरच्या पुढे घोडेगाव लागते. तिथून ७ कि.मी. वर सोनई गाव आहे. १९८५ सालापासून त्या गावी कामानिमित्त जाण्याचा योग येतोय.--------" हा संपुर्ण प्रतिसाद काय दर्शवतो? जे विश्वास ठेवत नाहीत ते १) विश्वास ठेवणाय्रांना पटवू शकत नाहीत तर ते गुरुत्वाकर्षणाचे नियम इथे थिटे पडतातहेत.२) ज्यांना धाग्याविषयाला धरून चर्चा करायची हे ती चालू द्या.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sat, 04/16/2016 - 18:13 नवीन
वैभव जाधव साहेब या अगोदरची पोस्ट गेल्या ३० वर्षांच्या लढाईच्या मूल्यमापनासाठी स्वअनुभवावर टाकली होती. पण आता माझा सहभाग नसणारेय. अजून एक दोन पोस्टी टाकणार होतो. उद्याचा दिवस त्यासाठी मोकळा असेल असे गृहित धरले होते. पण उद्या तातडीने दुसर्या गावी जावे लागतय त्यामुळे आता जमेल असे वाटत नाही. पण काही असो तुमचा पहिलाच धागा शंभरी पार करणार असे दिसतेय. कंजूष साहेब गावडे साहेब नमस्कार. शुभं भवतु.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Sat, 04/16/2016 - 18:21 नवीन
भागवत सर कृपया प्रतिसाद देत रहा. वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा