Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पुरोगाम्यांचे सण-रुढी परंपरा

व
वडापाव
गुरुवार, 04/14/2016 - 19:50
🗣 98 प्रतिसाद
पुरोगामी होऊन जुन्या रुढी परंपरांना छेद द्यावा अशी अगदी योग्य भूमिका मांडणारी बहुतेक मंडळी कधीकधी मात्र कोड्यात टाकतात. होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात. असं करून आपण ज्या विचारसरणीला विरोध करतो तिचा पुरस्कार करणा-या मनुस्मृतीचा खप आपणच वाढवतोय हे का बरं दिसत नाही यांना? हे म्हणजे दिवाळीला आंघोळ करताना नरकासूर (नरकासूरच ना?) फोडण्यासारखंच आहे. विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात?

प्रतिक्रिया द्या
12561 वाचन

💬 प्रतिसाद (98)
न
नाना स्कॉच Fri, 04/15/2016 - 04:40 नवीन
विविध धार्मिक सणांच्या सार्वजनिक साजरीकरणामुळे होणा-या वाहतुकीच्या कोंडीबद्दल आणि एकूणच गोंगाटाबद्दल बोंब मारताना आपणही आंबेडकर जयंती/मयंतीला तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? नेमकं तेव्हाच कसं भावना महत्त्वाच्या होतात? आंबेडकर फ़क्त पुरोगाम्यांचे का? बरंय! बरंच आहे! असो.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Fri, 04/15/2016 - 05:47 नवीन
ते अजिबात आंबेडकर पुरोगाम्यांचे वगैरे म्हणालेले नाहीत. त्यांनी तथाकथित पुरोगाम्यांच्या दुटप्पीपणावर आक्षेप घेतलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
न
नाना स्कॉच Fri, 04/15/2016 - 06:05 नवीन
तेच करतो/तेच करण्याचं आवाहन करतो/तेच करण्याचा पुरस्कार करतो हे सोयीस्करपणे विसरताना लाज नाही वाटत?? पुरोगाम्यांनी आंबेडकर जयंतीला डीजे लावा किंवा धांगड़धिंगा करा ह्याचा 'पुरस्कार' केल्याचे दाखवता का उदाहरण? किंवा स्वतःही धिंगाणा केल्याचे तरी उदाहरण दाखवता का एखादे?? का पुरोगामी दुटप्पीपणा तो बहाना है, बाकी औरही निशाना है म्हणायचे?? एकीकडे पुरोगामी ढोंगी म्हणायचे दुसरीकडे ते डीजे अन दंग्याला सपोर्ट करतात म्हणायचे, म्हणजे नेमके काय असेल? पुरोगामी सगळे आंबेडकराईट असतात असे म्हणता आहात की आंबेडकराईट सगळे पुरोगामी असतात अन पर्यायाने दुटप्पी असतात असे म्हणता आहात? स्वतः लेखकाने जरी स्पष्टीकरण दिले तरी चालेल, बाकी सोडा, ठळक केलेल्या (स्वटंकित) वाक्यांचा अर्थ काय अभिप्रेत आहे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Fri, 04/15/2016 - 07:34 नवीन
मी नाही किंवा धागाकर्त्यानेही नाही. यावरूनच काय ते लक्षात आलं. असो. पुरोगाम्यांनी निषेध केलेला नाही यावरून त्यांचा पाठिंबा आहे हे लक्षात येतंच. पुरोगामी मोदींवर किंवा कोणत्याही भाजप नेत्यावर आरोप करताना हेच तर्कशास्त्र वापरतात, त्यामुळे तेच त्यांनाही लागू पडतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
स
स्वामी संकेतानंद Wed, 04/27/2016 - 10:04 नवीन
पुरोगाम्यांनी आंबेडकर जयंतीला डीजे लावा किंवा धांगड़धिंगा करा ह्याचा 'पुरस्कार' केल्याचे दाखवता का उदाहरण?
होय. फेसबुकवर दोन पोस्ट्स आहेत तशा. आणि त्याखाली भरपूर्‍ कमेंट्स आहेत आणि शेअर पण मिळाले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
अ
अत्रे Fri, 04/15/2016 - 04:53 नवीन
होळी दहन करून होणा-या प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करतात आणि मनुस्मृती दहनासाठी मात्र सगळ्यांनी पुढे येण्याचं उत्साहानं आवाहन करत बसतात.
नेमके कोणाबद्दल बोलताय हे कळेल का? पुरावा द्यावा. काल्पनिक शत्रू का निर्माण करावेत माणसाने मी म्हणतो?
  • Log in or register to post comments
व
वडापाव Fri, 04/15/2016 - 07:27 नवीन
माझ्या चेपुवरील मित्रयादीत असे बरेच महाभाग आहेत जे असा दुटप्पीपणा करताना वारंवार दिसून येतात. त्यांची नावं इथे किंवा इतरत्रही प्रकाशित करणं मला सौजन्याला धरून वाटत नाही. बाकी औरही निशाना वगैरे काही नाही. काल्पनिक शत्रुही नाहीत. पण अशी दुटप्पी भूमिका घेणारी माणसं खरोखर आहेत. मला कही पे निगाहे कही पे निशाना फालतुगिरी जमत नाही, जे वाटतं ते स्पष्टपणे ज्याला त्याला बोलून मोकळा होतो. चेपुवर मला आलेला अनुभव इतरांनाही आला असेल असं वाटून मी तो मिपावर मांडला आहे. इतर कोणाला हा अनभव येत नसेल तर चांगलंय, मग मीच तेवढा दुर्दैवी म्हणायला हवा! नाना स्काॅच, तुम्हाला बोक ए आझम यांनी उत्तर दिलेलं आहे तेच माझं उत्तर मानावं. मी काही समस्त पुरोगाम्यांना बोल लावत नाही. मी स्वतः नास्तिक आहे आणि सगळ्या धार्मिक रुढी परंपरांचा मला तिटकारा आहे. पण त्यांसोबतच पुरोगामित्वाच्या नावाखाली ज्या बावळट रुढी प्रचलित होत चालल्या आहेत त्यांनाही विरोध करावा इतकंच माझं म्हणणं आहे.
  • Log in or register to post comments
व
विजय पुरोहित Fri, 04/15/2016 - 07:29 नवीन
मला कही पे निगाहे कही पे निशाना फालतुगिरी जमत नाही, जे वाटतं ते स्पष्टपणे ज्याला त्याला बोलून मोकळा होतो. +१११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
न
नाना स्कॉच Fri, 04/15/2016 - 07:36 नवीन
पण त्यांसोबतच पुरोगामित्वाच्या नावाखाली ज्या बावळट रुढी प्रचलित होत चालल्या आहेत त्यांनाही विरोध करावा इतकंच माझं म्हणणं आहे. +100 सहमत!! आता थोड़े डिटेल बोलतो आपण म्हणता पुरोगामित्वाच्या नावं चालणाऱ्या खुळचट रूढ़ीपरंपराना विरोध, तर त्याला मी सहमती देतोच आहेत, फ़क्त जर कोणी म्हणत असेल की 'नव्या पुरोगामी परंपरा' म्हणजे अमुक एक धर्म किंवा जातीचे सण फेवर करणे आहे तर ते मला अमान्य आहे सर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वडापाव
व
वडापाव Fri, 04/15/2016 - 07:42 नवीन
मला 'नव्या फुरोगामी परंपरा' असं म्हणायला हवं होतं. संपादकांना शक्य असल्यास धाग्याचं नाव बदलून 'फुरोगाम्यांचे सण रुढी परंपरा' असं करावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
व
विवेकपटाईत Fri, 04/15/2016 - 16:11 नवीन
स्वत:ला पुरोगामी म्हणविणारे ९०% लोक ढोंगी असतात. अश्या लोकाना मी फार जवळून पहिले आहे. बाहेर एक आणि घरात ते वेगळे असतात. आपल्या फायद्या साठी ते पुरोगामी असतात.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Fri, 04/15/2016 - 16:48 नवीन
ढोंगीच म्हणायचं तर भारतातली ९९ टक्के जनता ढोंगी मग काय सेकुलर, फेकुलर, धर्मांध, निधर्मांध, डावे, उजवे, अधले मधले. स्वार्थीपणात १०० टक्के प्रामाणिक आणि ढोंग करण्यात एकमेकांचे भाऊ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ब
बोका-ए-आझम Sat, 04/16/2016 - 04:50 नवीन
मी आणि तुम्ही उरलेल्या १% लोकांमध्ये येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 04/16/2016 - 04:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
व
विजय पुरोहित Sat, 04/16/2016 - 05:30 नवीन
लोल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
अ
अजया Sat, 04/16/2016 - 13:33 नवीन
=)))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित
अ
असंका Sun, 04/17/2016 - 07:57 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
म
मितान Mon, 04/25/2016 - 16:18 नवीन
Lol !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका
प
पैसा Sun, 04/17/2016 - 08:18 नवीन
तजोनी हल्ली उत्तरे द्यायचे सोडलंय म्हणून! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
श
श्रीगुरुजी Fri, 04/15/2016 - 16:57 नवीन
याकूब मेमन, अफझल गुरू इ. चा महापरिनिर्वाणदिन साजरा करणे, टिपू सुलतानचा प्रकटदिन साजरा करणे इ. सोहळे पुरोगाम्यांचे सण मानता येतील का?
  • Log in or register to post comments
आ
आनंदी गोपाळ Sun, 04/24/2016 - 16:50 नवीन
ते 'त्यांचे' सण आहेत, असे तुमच्यासारखे प्रचारक कुजबूज मोहिमांतून सांगत असत, आजकाल जाहीरपणे संस्थळांवर लिहू लागलेत. चांगल्या विचारांचा प्रतिवाद करता न आल्याने त्याची बदनामी करणे हे जुनेच तंत्र आहे, पण ते पुन्हा एकदा इफेक्टिवली वापरले जाताना दिसते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
श
श्रीगुरुजी Sun, 04/24/2016 - 17:15 नवीन
अरे अरे, माफ करा. याकूब मेमन, अफझल गुरू, टिपू सुलतान इ. विचारवंतांची बदनामी केल्याचे महापातक केल्याबद्दल व त्यामुळे तुमच्यासारख्या निधर्मी पुरोगाम्यांचे मन दुखावल्याबद्दल बिनशर्त माफी मागतो. आता खूष?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
M
mugdhagode Sun, 04/24/2016 - 19:33 नवीन
तुम्ही का त्रास करुन घेताय ? बुडाला --- पापी ! म्लेंछसंहार जाहला ! असा रोज १०८ वेळा जप करावा... --- च्या जागी याकुब्या , अफझुल्या वगैरे शब्द घालावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
भ
भंकस बाबा Mon, 04/25/2016 - 05:25 नवीन
तुमचे सेक्युलरव्वादी सध्या इशरत जहाँ, बाटला हाउस या प्रकरणी मूग गिळून बसले आहेत. फार कशाला शायरा बानो प्रकरणात तर यांच्या कानावर काहीच आले नाही दिसते. कनहैया तर जिथे जातो तिथे मोदींच्या नावाचा जप करत असतो. म्हणजे कन्हैयाच्या लेखी पप्पू,इटालियन मैडम, लालू, मुलायम सगळे संत आणि मोदी तेवढे एक चोर! फुकट प्रसिद्धिचे सर्व स्टंट संपले म्हणुन विमानात नाटके करून हां मुर्ख लक्ष वेधायला बघत आहे. लवकरच याचा दिग्गिराजा होणार! म्हणजे कुत्रे पण नाय विचारणार हो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
न
निमिष ध. Fri, 04/15/2016 - 17:54 नवीन
एकूणच फेबु वरील जनता बघून लेखकाचा पुरोगामी या शब्दाबद्दल गोंधळ उडालेला दिसतोय. खरे पुरोगामी असतील तर ते कुठल्याही जाळपोळीला विरोधच करतील आणि डीजेला सुद्धा. पण आता राजकारणाकरता फक्त पुरोगामी म्हणून घेत असतील तर मात्र वेगळा विषय आहे. पण त्याकरता लेखाचे नाव आणि एकूणच बाज चुकलेला वाटतोय. फुरोगामी शब्द आवडला. जसे स्युडो-सेक्युलर तसेच हे फुरोगामी !
  • Log in or register to post comments
व
वडापाव Fri, 04/15/2016 - 18:25 नवीन
फुरोगामी शब्द माझा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमिष ध.
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 06:27 नवीन
बिच्चारे पुरोगामी. पब्लिक नाहक बदनाम करतंय त्यांना. एक ते ब्लॉगर ज्यांना उठता बसता जळी स्थळी काष्ठी पाषाणी पुरोगामी दिसतात. आणि एक हे धागाकर्ते. आगरकर, गोखले, राजा राममोहन रॉय, शाहू, फुले, आंबेडकर ही आदरणीय नावे पुरोगामी होती. तुम्ही भलत्याच लोकांना पुरोगामी म्हणून धोपटत आहात.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Sat, 04/16/2016 - 06:52 नवीन
गावडे साहेब रुपयाची किमत स्वातंत्र्याच्या वेळेस १ रुपया होती ती घसरत घसरत आता साडे तीन पैशाइतकी राहिली आहे. तितकीच किंमत आता प्रामाणिकपणा निस्वार्थीपणा या गुणांची राहिली आहे. तेंव्हा तुमची तुलना स्वातंत्र्य पूर्व काळातील पुरोगाम्यांची आजच्या तथाकथित पुरोगाम्यांशी करणे हा त्या लोकांचा अपमान आहे असेच मी समजतो. कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाचा बोकड( तट्टाणी म्हणायचे होते पण या लोकांची तेवढी पण लायकी नाही). हे सरकारी कुरणावर चरणारे बोकडच आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
न
नाना स्कॉच Sat, 04/16/2016 - 07:40 नवीन
डॉक्टर साहेब हल्ली हल्ली 'पुरोगामी सरकारी मलीदा खातात/चरतात' वगैरे सतत ऐकायला येते , हे खातात म्हणजे नेमके काय करतात? कुठल्या स्वरुपात खातात? कॅश ऑर काइंड ? अशी काही उदाहरणे देता येतील का? माझ्या वाचण्यात असे एक उदाहरण आलेले आठवते, ते म्हणजे अभिनेत्री अन तथाकथित पुरोगामी 'नंदिता दास' ह्यांच्या चित्रकार का संगीतकार काका ला अलॉट झालेला सरकारी बंगला अन तो खाली करायला त्यांची झालेली घालमेल, त्यावरून नंदिता सरकार विरोधक असल्याचे ,सिद्ध केले गेले होते. आपल्याला असे वाटते का की सगळे तथाकथित पुरोगामी असलेच कॅश किंवा काइंड फेवर सरकारकडून कायम घेतात?? भारतातल्या सध्या बदनाम असलेल्या (रास्त बदनामी का अवाजवी ह्या वादात पडायची इच्छा नाही) सगळ्या पहिल्या फळीच्या पुरोगाम्यांनी असे फायदे घेतले आहेत का?? असल्यास त्या संबंधी अजुन वाचायला आवडेल म्हणजे पुढे मला सुद्धा कॉन्फिडेंटली 'होय हे तमाम लोकं सरकारी मलीदा खातात' असे आत्मविश्वासाने म्हणता येईल ! आगाऊ धन्यवाद अन उणे अधिक माफ़ी ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2016 - 11:19 नवीन
या विषयावर गॅरी ट्रुमन यांचा खालील प्रतिसाद माहितीपूर्ण आहे. http://www.misalpav.com/comment/755336#comment-755336 अजून एक लेख https://www.newsbred.com/indian-media-sick-and-hurting
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाना स्कॉच
र
राही Sat, 04/16/2016 - 08:02 नवीन
आज पुरोगामी हा टिंगलटवाळीचा शब्द ठरला असला तरी यातले काही खरोखर निष्ठेने आणि शांततेने जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धानिर्मूलन, एखाद्या धर्माच्या माणसांबद्दल त्यांच्या धर्मावरून/जातीवरून अप्रीती न दाखवणे, कर्मकांडे त्यागणे असे आचरण किमान स्वतःपुरतेतरी करीत असतात, स्वतःच्या आचरणाने इतरांना आदर्श घालून देत असतात. त्यासाठी इतरांचे शिव्याशाप खात असतात. ते कुणाचेच नसतात त्यामुळे कुठलाही एक धर्म, जात त्यांच्या हयातीत त्यांच्यामागे ठामपणे उभी राहात नाही. पुढे तीस-पस्तीस वर्षांनंतर त्यांच्या कार्याचे महत्त्व लक्ष्यात येऊ लागते आणि पन्नास-शंभर वर्षांनंतर ते महान विचारवंत ठरतात. आगरकर काय, फुले काय, र.धों. कर्वे काय, सर्वांची त्यांच्या हयातीत प्रचंड कुचेष्टा आणि उपेक्षा झाली. कुणाच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली, कुणाची जिवंतपणी प्रेतयात्रा काढण्यात आली. त्यांना जाहीर निर्भत्सनेला तोंड द्यावे लागले. समाज त्यांच्याविरुद्ध विखार ओकत होता. समकालीनांना काळाच्या अतिसमीपतेमुळे यांच्या कर्तृत्वाचे मोल लक्ष्यात येत नसते. पण या मूठभर लोकांमुळेच हळूहळू बदल घडून येतात. आणि प्रत्येक पिढीत असे लोक निपजतच असतात. पुनरुक्ति करायची तर आपल्यासमोर असल्याने त्यांचे मोठेपण आपल्या लक्ष्यात येत नाही. बदल घडतात हे गृहीतक मान्य असेल तर वरील मांडणीस आक्षेप घेण्याचे कारण दिसत नाही. बदल होतच नाहीत, सर्व काही जैसे थे आहे, हजार-पाचशे किंवा शेदोनशे वर्षांपूर्वीसारखेच आहे असे म्हणायचे असल्यास मुद्दा संपला. काळ एव्हढा झपाट्याने बदलतो आहे की कालच्या सुधारकाची तत्त्वे आज जगताना सामान्य वाटू शकतात पण एकेकाळी ते जगणे सामान्य नव्हते हे लक्ष्यात आले की झाले. काळाच्या चौकटीत दृश्य कसे दिसते ते महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम Sat, 04/16/2016 - 16:08 नवीन
तुम्ही म्हणताय तसे पुरोगामी हे कुठल्याही देशाला अभिमानास्पदच आहेत आणि ते कधीही दांभिकपणे वागणार नाहीत. हमीद दलवाईंनी तलाकपीडित मुस्लिम स्त्रियांच्या प्रश्नाबद्दल आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, आमच्या धर्मात असंच असतं असं म्हटलं नाही. हे खरे पुरोगामी. आणि हमीदजींनी हे कुठल्याही लौकिक यशाच्या अपेक्षेशिवाय केलं. पण आजचे NGO-पुरोगामी तसे आहेत का? ते तर नुसतेच हंगामी आहेत. त्यांचं पुरोगामीत्व हे सोयीस्कर आहे. शिंगणापूरला स्त्रियांना बंदी ब-याच काळापासून आहे. आत्ताच आंदोलन करण्याची गरज का उद्भवावी? गेल्या दोन वर्षांत असं काय झालं की मंदिरप्रवेशाच्या केलाच पाहिजे अशी निकड निर्माण झाली? अशा सोयीस्कर भूमिका घेणाऱ्यांना काहीही म्हणा, पुरोगामी म्हणू नका. तो त्या शब्दाचा अपमान आहे, कारण महात्मा फुले आणि आगरकरांसारखे महान लोक त्या अभिधानाशी जोडले गेलेले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Sat, 04/16/2016 - 08:43 नवीन
राही ताई पुरोगामी हा शब्द टिंगल टवाळीचा का झाला आहे? तर हिंदू धर्मावर टीका करणे आणी इतर धर्मांची तळी उचलणे यात धन्यता मानणार्यांनी आम्ही पुरोगामी आहोत आणी हिंदू धर्म "मानणाऱ्या" लोकांना बुर्झ्वा ठरवले आहे. धर्म मानणे किंवा न मानणे हा वैयक्तिक प्रश्न असताना केवळ हिंदूंची बाजू घेणाऱ्या भाजप ला विरोध पण धर्मांध असणार्या इतर कोणत्याही पक्षाबरोबर युती करणे हे सर्व तथाकथित पुरोगामी लोक करत आले आहेत.यात "सर्व" समाजवादी आणि कम्युनिस्टही येतात.दुटप्पीपणा हा त्यांचा स्थायीभाव आहे.कम्युनिस्टांची निष्ठा कुठे आहे हे तर स्वातंत्र्य लढ्यापासून स्वच्छपणे दिसत असूनही ते पुरोगामी ठरतात. शहाबानो खटल्यात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय "घटनादुरुस्ती" करून फिरवणारे राजीव गांधी पुरोगामी लोकांना मान्य होतात पण धर्मांतराला बंदी करा म्हणणारे हिंदू लोक मात्र पुरातन होतात. एकीकडे घटना हीच सर्वोच्च मानायची पण त्याच वेळेस अल्पसंख्यांकांना झुकते माप द्यायचे हा पुरोगामीपणा ठरत आहे. म्हणून आज तीन वेळा तलाक हा स्त्रियांच्या मुलभूत हक्काच्या विरुद्ध आहे असे सर्वोच्च न्यायालय म्हणते तेंव्हा सर्वोच्च न्यायालयाला आमच्या वैयक्तिक बाबीत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला मानत नाही असे म्हणणार्या मुस्लिम वैयक्तिक कायदा मंडळा चा(AIMPLB) निषेध करण्याची हिम्मत एकाही पुरोगाम्याने दाखवलेली नाही. अल्पसंख्यांकांचे लांगुलचालन हा एकमेव अजेंडा असणारे अनेक लोक स्वतःला "पुरोगामी" म्हणवतात. इशारत जहानला "बहिण" मानणारे किंवा तिच्या नावाने रुग्णवाहिका सेवा सुरु करणारे पुरोगामी ठरतात हीच एक शोकांतिका. बाकी "आताच्या" तथाकथित पुरोगामी लोकांनी आपण आगरकर,सावरकर, आंबेडकर किंवा फुले आहोत हे म्हणणे म्हणजे "टिनपाट" कवीने स्वतःला उद्याचा कालिदास म्हणण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
M
mugdhagode Sat, 04/16/2016 - 10:29 नवीन
पूर्ण बहुमताचे भाजपा येउन दोन वर्षे झाली. आता तरी गांधी नेहरु काँग्रेसला सोडा. रच्याकने , साखरपुडा / लग्न करुन राष्ट्रकार्य करायला संसार सोडतात , ते तलाक तरी बोलतात का ? पोटगी देतात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 10:29 नवीन
डॉक, तुमचं म्हणणं योग्य आहे. मी ही तेच म्हणतोय की भलत्याच लोकांना पुरोगामी म्हणून धोपटलं जातंय. त्यामुळे पुरोगामी हा शब्द बदनाम होतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
र
राही Sat, 04/16/2016 - 20:45 नवीन
पुरोगामी आणि अल्पसंख्य समाज इतकेच समीकरण आहे का? आपल्या मनात तसे असेल तर पुरोगाम्यांनी चालवलेल्या अनेक चळवळी, समाजसुधारणा ह्याबद्दल लोकांना माहिती नाही असे म्हणावे लागेल. महिलांविषयी तर अनेक गट वेगवेगळ्या क्षेत्रांत सक्रिय आहेत. वेश्यांचे आरोग्य, त्यांच्या मुलांचे शिक्षण किंवा त्यांच्या रात्रीच्या निवार्‍याचा प्रश्न(त्या वेळी ही मुले आईबरोबर राहू शकत नाहीत.), महिला कामकर्‍यांचे, घरगुती महिला कामगारांचे प्रश्न, त्यांचे वेतन, राइट टु पी, बायकांचे आरोग्यविषयक आणि मासिकपाळीसंबंधी प्रश्न, (सॅनिटरी नॅप्किन्सची उपलब्धता आणि प्रबोधन- यासाठी पुष्कळ श्रम आणि वेळ खर्ची पडला) त्यांचे लैंगिक शिक्षण, कचरा वेचणार्‍या बायकांचे संघटन, त्यांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण, देवदासीप्रथा निर्मूलन, त्यांचे पुनर्वसन (याला बर्‍यापैकी यश आले आहे.) स्त्रीभ्रूणहत्याविरोध, गर्भलिंगनिदानविरोध, बेटी बचाओ जागृती, जातपंचायत निर्मूलन, वाळीत टाकण्यास प्रतिबंध, असे अनेक पैलू आहेत या कार्याचे. आणि हे कार्य दोन पातळ्यांवर चालते. १) वैचारिक प्रबोधन, माध्यमांद्वारे प्रसार्/प्रचार, २)प्रत्यक्ष फील्ड वर्क. वैचारिक प्रबोधनामुळे फील्ड वर्कसाठी भूमी आणि भूमिका तयार होते. या कार्याचाच एक भाग म्हणजे जातिभेद निर्मूलन, मंदिरप्रवेश वगैरे. शिवाय नाडलेल्यां महिलांच्या न्यायालयीन लढ्यासाठी साहाय्य, अ‍ॅडॉप्शन्संबंधी कायदे महिलांना अधिक अनुकूल करणे, कायदेविषयक इतर अडचणींचे निवारण( फ्लेविया अ‍ॅग्नेस यांचे नाव अनेकांनी ऐकले असेल.) महिलांनी अपारंपरिक व्यवसायात शिरावे म्हणून उत्तेजन, प्रशिक्षण, मानसोपचार, बेबनाव झालेल्या जोडप्यांचे समुपदेशन अशी अगणित कामे चालतात. आणि 'आत्ताच का' या प्रश्नावर 'आत्ता का नको' असा प्रतिप्रश्न करता येईल. (मंदिरप्रवेशाच्या चळवळीला दीर्घ इतिहास आहेच.) आणि जेव्हा सकल महिलालढ्याचा समग्र इतिहास लिहिला जाईल तेव्हा त्यात या मंदिरप्रवेश चळवळीचा उल्लेख असेलच असेल. विरोधकांचा मात्र असेल की नाही याबद्दल शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
स
सुबोध खरे Mon, 04/18/2016 - 16:40 नवीन
राही ताई आपण पुरोगामी आणि समाजसेवा यात गल्लत करत आहात. हि जाणून बुजून आहे कि अनवधानाने आहे ते माहित नाही पण अनवधानाने आहे असे समजून मी भाष्य करीत आहे. श्री सत्य साई बाबा, मत श्री अमृतानंदमयि देवी पासून ते तिरुमला तिरुपती देवस्थान, श्री मंजुनाथ देवस्थान धर्मस्थळ हे धार्मिक लोक बरेच समाजसेवेचे प्रकल्प राबवत असतात. मदर तेरेसा यांचे धर्मप्रसाराच्या छुप्या अजेन्द्याच्या मागे का हॊइन पण समाजसेवेचे लक्षणीय काम करीत आहेत यात शंका नाही. वनवासी कल्याण आश्रम सारख्या इतर संस्था किंवा रुबिना पटेल आणि त्यांची रुबिना प्रशिक्षण संस्था सुद्धा समाजसेवेचे भरीव काम करत असतात. यातले कोणीही आम्ही पुरोगामी आहोत असा दावा करीत नाहीत. तेंव्हा आपण उद्धृत केलेली बरीच कामे पुरोगामी नसलेले लोकही करीत असतात. तेंव्हा समाजसेवा हि पुरोगामी लोकांची "मक्तेदारी" नाही. मुळात समाजसेवा हि कोणाचीच मक्तेदारी नाही कि पुरोगाम्यांनी आपण एवढे आणि तेवढे काम करतो आहोत आणि आमच्यावर कोणी टीका करू शकत नाही असा दावा करावा. सामान्य माणूस सुद्धा जेंव्हा आपल्या मोलकरणीच्या मुलाची फी भरतो तेंव्हा तो पण समाजसेवेचा आपला खरीच वाट उचलत असतो. बाबा आमटे किंवा प्रकाश आमटे सारखे लोक दिग्गज आहेत म्हणून सामान्य माणूस कः पदार्थ आहे असेही नाही. आज तुम्ही मिपावर विचारले तर जवळ जवळ १०० % लोक काहीतरी समाजसेवा करत असतातच. तेंव्हा पुरोगामी लोक एवढे काम करता याची यादी देण्याची गरज नव्हती. कारण त्यातून पुरोगामी"च" लोक समाजसेवा करतात आणि त्यांना बोलायचा कोणाला हक्क नाहि असा एक सूर निघतो असे माझ्या अल्पमतीला वाटते. विरोधकांचा मात्र असेल की नाही याबद्दल शंका आहे. सगळे विरोधक समाजसेवा करीतच नाहीत असच अर्थ आपल्या या शेवटच्या वाक्याचा निघतो. एखादा हाडाचा समाजसेवक सुद्धा त्याच्या विचार सरणी प्रमाणे मंदिर प्रवेशाला विरोध करीत असेल. याचा अर्थ त्याची समाजसेवा "कुचकामी" आहे असे आपण म्हणू शकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
न
नुस्त्या उचापती Sat, 04/16/2016 - 10:30 नवीन
हे म्हणजे पुरोगाम्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून आंबेडकरवादयांना गोळ्या घालण्याचा प्रकार झाला .
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Sat, 04/16/2016 - 10:37 नवीन
आक्षेप रूढी-परंपराप्रिय पुरोगामी लोकांबद्दल आहे की वाहतूक कोंडी आणि गोंगाटाबद्दल आहे ? माझं मत, वाहतूक कोंडी आणि गोंगाट निर्माण करणार्‍या सर्व उपक्रमांवर कायद्याने बंदी घालायला हवी.
  • Log in or register to post comments
र
राही Sun, 04/17/2016 - 07:45 नवीन
अगदी सहमत. आणि त्याहूनही अधिक म्हणजे यापुढे कोणत्याही सणाचे सार्वजनिकीकरण होऊ नये. आहे तेव्हढे बस्स झाले. तेही कमी होईल तर बरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह
न
नुस्त्या उचापती Sat, 04/16/2016 - 10:41 नवीन
नाही . ह्यांचं वेगळंच दुखणं आहे .
  • Log in or register to post comments
व
वडापाव Sat, 04/16/2016 - 16:03 नवीन
दुखणी खूप आहेत हो. हे त्यातलंच एक आहे असं समजा. आणि दुखणं जसं मांडलंय तसंच आहे. छुपं काही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती
भ
भीमाईचा पिपळ्या. Sat, 04/16/2016 - 17:55 नवीन
अवघड जागी दुखणे आणि जावै डॉक्टर ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नुस्त्या उचापती
श
श्रीगुरुजी Sat, 04/16/2016 - 10:50 नवीन
ढोंगी पुरोगाम्यांवर हा एक उत्कॄष्ट लेख आहे. http://www.loksatta.com/agralekh-news/as-compare-to-dadri-more-dangerous-murders-happens-1149432/
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 04/16/2016 - 11:08 नवीन
काही दिवसांपूर्वी झालेल्या माफी प्रकरणात कुबेरांना माफ करुन लोकसत्ता वाचतो अशा अग्रलेखांसाठीच. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विजय पुरोहित Sat, 04/16/2016 - 16:12 नवीन
गुरुजी भारीच आहे लेख! लोकसत्तामध्ये इतके निःपक्ष लिखाण यावे हे आश्चर्यच आहे. ढोंगी फुरोगाम्यांचा चांगलाच पर्दाफाश केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
राही Sat, 04/16/2016 - 11:13 नवीन
लिहिण्यात माझी थोडी चूक झाली. "आज पुरोगामी हा शब्द टिंगलटवाळीचा ठरला असला तरी" या शब्दांऐवजी मी असे लिहायला हवे होते की 'पुरोगामी हा शब्द नेहमीच समकालीनांकडून टिंगलटवाळीचा ठरत आला आहे.' पुरोगामी याचा अर्थ सांगायला नकोच. काळाच्या पुढे जाणारा, पुढे पाहाणारा तो पुरोगामी. बहुतेक समकालीनांकडे बहुधा पुढे काय घडणार आहे ते समजण्याइतका द्रष्टेपणा नसतो आणि हे साहजिकच आहे. फारच थोडे लोक काळाची पावले ओळखू शकतात. त्यामुळे पुरोगामी हे नेहमीच अल्पसंख्य असतात. आणि प्रवाहाविरुद्ध पोहणारा वेडाच असतो, नाही का? उगीच आत्मघात करून घेणारा? आपल्याच पायांवर कुर्‍हाड मारून घेणारा? मुसलमानांमध्ये जागृती वगैरे पुरोगाम्यांकडून अपेक्षित असते. तर या बाबतीत असे म्हणता येईल की त्या धर्मातल्या सुधारणावाद्यांना बळ देण्याचे काम कित्येक वर्षे बिनबोभाट्याने चालू आहे. तलाकपीडित महिलांचा प्रश्न, मुस्लिम महिलांचा मशीदप्रवेशाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न यामध्ये अनेक सुधारणावादी गट कार्यरत आहेत. किंबहुना देशातल्या सर्व प्रमुख सुधारणावाद्यांचा (धर्म/जात/निरपेक्ष) आपसात बर्‍यापैकी संपर्क असतो. प्रसिद्धी मुद्दामच टाळली जाते कारण ती कार्यहानी करते. (आता पुढील परिच्छेदावर वादविवाद आणि असहमती होऊ शकते. मी कायदेतज्ज्ञ नाही. यावर इथले कायदेतज्ज्ञ योग्य मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा ठेवून लिहिले आहे.) सुप्रीम कोर्टाने (१९८५) 'सेक्यूलर अ‍ॅलिमनी लॉ'चा आधार घेत असा निर्णय दिला होता की शाह बानोच्या पतीने तिला रु.१७९ असा मेन्टेनन्स तहहयात द्यावा. मुस्लिम लॉमध्ये 'इद्दत'च्या (पतीचा मृत्यु अथवा घटस्फोट या नंतरचा दु:खाचा आणि अलिप्ततेचा ठराविक काळ. या काळामध्ये ती महिला पुनर्विवाह करू शकत नाही.) काळापुरताच मेन्टेनन्स देण्याची तरतूद आहे. ही तहहयात मेन्टेनन्सची तरतूद कडव्या मुस्लिमांना आवडली नाही आणि त्यांनी 'धर्मामध्ये हस्तक्षेप' असा गदारोळ केला. त्यावर राजीव गांधी सरकारने वरकरणी मुस्लिमांना खुश करताना 'मुस्लिम लॉ अ‍ॅक्ट १९८६(Protection of Rights on Divorce) मंजूर केला. हा कायदा विरोधकांच्या खूपच उपयोगी पडला कारण शाह बानो निवाडा गुंडाळून ठेवणारा कायदा' या नावाखाली त्याची प्रसिद्धी आणि एन्कॅशमेंट करता आली. पण या कायद्यात एक कलम [section 3(1)(a)] घातले गेले होते ज्या योगे घटस्फोटित पत्नीसाठी 'रीज़नेबल अँड फेअर' मेन्टेनन्स ठेवण्याची आणि अदा करण्याची जबाबदारी पतीवर आली. म्हणजे वास्तवात या कायद्याने शाह बानो निवाड्याची पायमल्ली तर केली नाहीच उलट तो निर्णय उचलून धरला. मुस्लिम महिलांच्या मागणीला/स्थितीला बळकटी आली, कारण 'सेक्यूलर अ‍ॅलिमनी लॉ' अन्वये अ‍ॅलिमनीची कमाल मर्यादा रु.५०० होती तर या नव्या मुस्लिम वुइमेन्स अ‍ॅक्टमध्ये अशी कोणतीही कमाल मर्यादा नव्हती. यावर शाह बानोच्या वकीलांनी एक पिटिशन फाइल केले.'जर हा कायदा मुस्लिम घटस्फोटित महिलांना पोटगी नाकारत असेल तर तो घटनाविरोधी आहे म्हणून तो रद्द करावा' या स्वरूपाचे हे पिटिशन होते. यावर २००१मध्ये सुप्रीम कोर्टाने पुन्हा शिक्कामोर्तब केले की "या कायद्यात कुठीही मुस्लिम महिलांना पोटगी नाकारण्यात आलेली नाही. उलट, जरी मुस्लिम वुइमेन्स अ‍ॅक्ट हा शाह बानो निवाडा फिरवण्यासाठी केलेला दिसला तरी वास्तवात तो या निवाड्यातले rationale codify करणारा आहे". म्हणजे वरकरणी हा नवीन लॉ मुस्लिमांचे तुष्टीकरण करणारा/करण्यासाठी केलेला वाटला तरी त्याने मुस्लिम महिलांचे स्थान अधिक सुरक्षित केले. (विकीवरून साभार.)
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 04/16/2016 - 13:47 नवीन
रुबिना पटेल यांच्याबद्दल वाचले होते की त्यांच्या चांगल्या सुशिक्षित नवर्‍याने न्यायालयाच्या निर्णयानंतरही त्यांना पोटगी किंवा मुलाचा ताबा द्यायला नकार दिला होता, तसेच मुस्लिम महिला असल्याने पोलिसांनी केस दाखल करून घ्यायला नकार दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
स
सुबोध खरे Sat, 04/16/2016 - 14:30 नवीन
@राही ताई काय पुरोगामी कोलांटी आहे? त्यावर "राजीव गांधी सरकारने वरकरणी मुस्लिमांना खुश करताना" कशाला शब्दांचे खेळ करता? राजीव गांधीनी निवडणूक वर्षात स्वच्छ आणि उघडपणे मुसलमानांचे लांगुलचालन करण्याचा प्रयत्न केला होता. This case caused the Congress government, with its absolute majority, to pass the Muslim Women (Protection of Rights on Divorce) Act, 1986 which diluted the judgment of the Supreme Court and, in reality, denied even utterly destitute Muslim divorcées the right to alimony from their former husbands हे विकीचेच शब्द आहेत However the Court held that if the Act accorded Muslim divorcees unequal rights to spousal support compared with the provisions of the secular law under section 125 of the Criminal Procedure Code, then the law would in fact, be unconstitutional हे daniel लतीफी केस मधील सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने त्याच कायद्याचा अर्थ असा वेगळा लावत मुसलमान स्त्रियांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे प्रयत्न केले आहेत याचे कारण भारतीय दंडविधान संहिता (क्रिमिनल प्रोसीजर कोड) सर्वाना एकच आहे. ( सिव्हिल प्रोसिजर कोड- नागरी कायदा वेगळा असला तरीही) यामुळे हे सर्वोच्च न्यायालयाला करता आले. अन्यथा मुसलमान स्त्रिया सहाव्या शतकात ढकलल्या गेल्या. त्यावेळेस सुद्धा कोणताही पुरोगामी राजीव गांधींचा विरोध करायला पुढे आला नव्हता. Makarand Paranjape sees the overruling of Supreme Court verdict in Shah Bano case which happened when the Congress party was in power, as one of the examples of the party's pseudo-secular tactics which allowed "cynical manipulation of religion for political ends कशाला राजीव गांधीनी मुसलमान स्त्रियांना न्याय मिळवून द्यायला मुद्दाम असा कायदा पास केला असा शब्द्च्छल करता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही
M
mugdhagode Sat, 04/16/2016 - 16:28 नवीन
http://www.rediff.com/news/2007/jun/09sc.htm मुस्लिम स्त्री पोटगी मागु शकते. आणि जर ती सक्षम असेल तर पोटगी नाकारलीही जाऊ शकते. http://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Qualified-woman-cant-claim-maintenance-Court/articleshow/46489096.cms http://vikaspedia.in/social-welfare/women-and-child-development/meera-didi-se-poocho/property-richts-of-women-in-india-and-maintenance हेही पहा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा