अहंकार कमी कसा करावा?
माणूस मोठा की त्याचा अहंकार, असा प्रश्न विचारला तर साहजिकच उत्तर असेल माणूस. अनेकदा हे आपल्याला कळत असतं पण वळत नाही, आपण स्वतःपेक्षा या 'अहं' ला जीवापाड जास्त जपतो.
या अहंकाररूपी शत्रूला आपल्या मनातून, जगण्यातून हद्दपार करण्याऐवजी आपण त्याचे कोडकौतुक करतो, त्याला डोक्यावर बसवून मिरवतो, खतपाणी घालून वाढवतो, जोपासतो. मात्र त्यानंतर हा अहं आपल्यालाच डोईजड कधी होऊ लागतो कळतही नाही, त्यापायी आपण इतरांशी शत्रुत्व पत्करत राहतोच, अणि त्याहून वाईट म्हणजे स्वतःचेही शत्रू बनत जातो.
आपण स्वतःपुरता विचार केला तरी आपल्याला जाणवेल, आपल्यात अहंकार आहे की नाही.. असेल तर का आहे..
कशाबद्दल आहे.. नसेल तर अतिउत्तम. अशी निर्विकार, नि:स्वार्थी भावावस्था फार थोड्या लोकांना प्राप्त करता येते.
सहसा सामान्यात सामान्य माणूस म्हटला तरी त्याच्यात कसला न कसला अहंकार असतो. आपल्यात काही चांगले गुण असतील तर त्याचा थोडाफार अभिमान असणे वाईट नाही, एखाद्याकडे तसेच कर्तृत्व असेल तर तो अहंकार त्याला शोभतोही, मात्र अती अहंकारी व्यक्ति इतर लोकांपासून, समाजापासून वेगळी पडत जाण्याची शक्यता जास्त असते.
फक्त उदाहरण म्हणून इथलाच अलीकडील एक अनुभव सांगेन, येथील एका विभागाकडून लेखमालेसाठी लेख लिहीण्याबद्दल विचारणा झाली होती, विषय जिव्हाळ्याचा असल्याने मीही आनंदाने होकार दिला. नंतर त्या विभागातील काही सदस्यांबरोबर माझे किरकोळ मतभेद झाले, अशावेळेस आपल्यातील 'इगो' नामक प्रकार येता जाता दुखावून घ्यायला बसलेलाच असतो त्याप्रमाणे तो दुखावला गेला आणि मी तो लेख लिहू शकणार नाही असे त्यांना कळवून टाकले.
इथे माझ्याकडून काही वेगळ्याच व्यक्तिंचा राग तिसर्याच गोष्टीवर, गरज नसतांना, संदर्भ नसतांना काढला गेला,
फक्त 'अहं' मुळे. यात चूक पूर्णपणे माझी होती, नुकसानही माझेच होणार होते, तसे ते झालेच.
अर्थात तो लेख मी काही झाले तरी लिहीणार होते, त्याप्रमाणे तो लिहीला, प्रकाशितही केला, त्याचे समाधान आहेच,
मात्र केवळ इगोला महत्व देऊन एक अतिशय उत्तम संधी हातातून घालवली याचे दु:ख त्यापेक्षा कितीतरी जास्त आहे.
(वरील उदाहरण हे फक्त प्रातिनिधीक म्हणून दिले आहे, तो लेखाचा आणि चर्चेचा विषय नाही.)
माणसाचे व्यक्तिमत्व म्हणजे फक्त त्याचे वागणे बोलणे दिसणे इतकेच नसून, त्याचे 'असणे' ही महत्वाचे. हे असणे सुधारण्यासाठी, आपल्यातील सर्व दुर्गुण मिटवून सर्वार्थाने निर्विकार होण्यासाठी काय करावे..?
हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ?
आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी...
आपण सर्वज्ञानी नाही हे व्यवस्थित कळत असतांनाही आपण तसे आहोत हे कायम स्वतःला आणि इतरांनाही पटवून देण्याचा अट्टाहास कशासाठी...
अहंकार नष्ट कसा करावा आणि त्यावर विजय कसा मिळवावा ?
💬 प्रतिसाद
(74)
स
स्पा
Wed, 04/27/2016 - 08:36
नवीन
बेचव विडंबने टाकणे बंद करून :)
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 04/27/2016 - 08:37
नवीन
चांगला विषय.
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Wed, 04/27/2016 - 08:38
नवीन
काही विचार....
१. मतभेद होणार असतील तर, वाद न घालता, सॉरी म्हणून मोकळे व्हावे.
२. ह्या पृथीतलावर अद्याप एकही अमर माणूस जन्माला आलेला नाही, जे काही आपण इथे उपभोगत आहोत ते इथेच सोडून देणार आहोत.मग अनावश्यक वाद-विवाद कशाला?
अर्थात वरील विचार अंमलात आणणे तसे थोडे कठीण आहे, पण अशक्य मात्र अजिबात नाही.हा स्वानुभव आहे.
३. अहंकारावर विजय मिळवायचा अजिबात विचार करू नका.त्यापेक्षा अंहकार मनांत येवूच नये, ह्यासाठी प्रयत्न करा.
बर्याच वेळा काही कारणांमुळे, आपल्यात असलेल्या काही कौशल्यामुळे आपल्या मनांत गर्वाची भावना निर्माण होते आणि ती तशी असणे हा मनुष्यस्वभावच.त्यामुळे एखादी गोष्ट आपल्याला उत्तम जमते तशी इतरांना जमत नाही आणि मी म्हणेन तेच खरे, अशी भावना मनांत यायला लागली की, आपल्याला जमत नसलेल्या इतर गोष्टींकडे बघावे.पाय आपोआप जमिनीवर येतात.
- Log in or register to post comments
इ
इरसाल
Wed, 04/27/2016 - 09:49
नवीन
सुरुवाती-सुरुवातीलाच असला सामोपचाराचा प्रतिसाद टाकुन पुढे होवु घातलेल्या रणकंदनाला तत्काळ आळे घालण्याचा प्रयत्न केल्याकारणाने बर्याच दिवसांनी पण लगेचच मुवि यांचा घनघोर निषेध !......आमी नाय ज्जा !
सही.....
"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून "ऐसी अक्षरे" वापरुन हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/01/2016 - 05:56
नवीन
अरेच्च्या.. लग्गेचं धुळवड थांबवलित. णीषेध. मुविंकडुन हि अपेक्षा नव्हती. जर्रा दुसर्यांचे धागे हजारी होउन द्यायचे नाहित. :/
पुर्वीचं मिपा र्हायलं णै राव!
- Log in or register to post comments
प
पथिक
Wed, 04/27/2016 - 08:43
नवीन
माझ्या मते 'तळमळ' असणे सर्वात महत्वाचे, बदलण्याची, मग पुढचे होत जाते आपल्या गतीने, पद्धतीने…
"The time that my journey takes is long and the way of it long
It is the most distant course that comes nearest to thyself, and that training is the most intricate which leads to the utter simplicity of a tune."
- टागोरांच्या गीतांजली मधून
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/27/2016 - 08:46
नवीन
माझ्या मते अहंकारावर विजय मिळवण्याचा एक अत्यंत जालीम उपाय म्हणजे जन्मालाच येऊ नये. आपण जन्माला येणार, आपल्याला स्वतःची जाणीव होणार, त्यातून अहंकार निर्माण होणार. कुणी सांगितलीय कटकट! त्यापेक्षा जन्माला येऊ नये. सगळे प्राॅब्लेम्स खलास!
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Wed, 04/27/2016 - 09:54
नवीन
बोकोबा, हे शक्य आहे का? डेबिट, क्रेडिट करत करत दोन्हीकडचा हिशोब शून्य, त्याच्यावर मिळणारं व्याज शून्य, असलेलं कर्ज शून्य, कुठल्या तरी संरक्षण खात्यात पडून असल्यासारखे बिलियन डॉलर्स विसरलेले नसणं इत्यादी इत्यादी सगळ्या उभ्या आडव्या तिरक्या आधीच्या नंतरच्या गुणाकार, भागाकरानंतर शिल्लक शून्य असलं तर च खातं बंद होईल. एक पै देणं अथवा घेणं जरी शिल्लक असेल तरी खातं सुरु राहतं ना!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/27/2016 - 10:11
नवीन
हेच तर सांगायचंय. म्हणून तर म्हटलं ना की जन्मालाच येऊ नये. तेही आपल्या हातात नाहीये. त्यामुळे अहंकार पूर्णपणे नष्ट होणं शक्य नाही. पण त्याची तीव्रता कमी करता येईल. मलाच कळतं हा अहंकार. त्यापेक्षा मला कळतं, इतरांनाही कळतं ही वृत्ती जरी आली तरी पुष्कळ झालं.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Wed, 04/27/2016 - 08:49
नवीन
मला असले धागे वाचण्यात आजकाल लै मज्जा यायलागलीय. पाडा आता एकेक प्रतिसादाचे आंबे.
सिरियसली सांगायचे झाले तर इथले सल्ले वाचून आचरण करायचे ठरवले तर लंगोटी गुंडाळून हिमालयात जावे लागेल.
- Log in or register to post comments
न
नाखु
Wed, 04/27/2016 - 09:29
नवीन
हाये फक्त लंगोटीही (इथेच) ठेवायला सांगतील आणि तसेच .... हिमालयात जावे लागेल.
अता पहिली गोष्ट : असा काही आपल्यात आहे याची जाणीव होणे हे उत्तम लक्षण आणि त्याचा निपटारा करता आला (वेळचे वेळी तर अगदी सोनेपे सुहागा) नेम्कं या दो बाबीत घोड अडत पडतही आणि पुन्हा पुन्हा पेंड खातं !!!
निरंकारी नसलेला सा़क्षात्कारी नाखु
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Wed, 04/27/2016 - 08:50
नवीन
नीलमोहर तुम्ही एका छान विषयाला चर्चा उपलब्ध करुन दिली आहे. तुमचा पूर्ण लेख मी वाचला. मांडणी पण छानच केलेली आहे.
आता संपूर्ण लेखाचा रोख खालील एका प्रश्नाकडेच आहे:
हा अहं जो माणसाचा फार मोठा शत्रू आहे, ज्यापायी माणूस इतरांपासून, स्वतःपासूनही दूर जात असतो, स्वतःला हरवून बसतो, तो अहं हळूहळू, थोडाथोडा करत एक दिवस पूर्णपणे मिटवण्यासाठी, 'स्व' खर्या अर्थाने गवसण्यासाठी काय करावे ?
याला माझ्या मते तरी उत्तर आपापल्या आवडीनुसार, सवडीनुसार रोज सकाळ संध्याकाळ थोडा तरी वेळ उपासनेसाठी राखून ठेवणे. अवघड आहे वाटचाल. पण अनेक आत्मानुभावी संतांनी या मार्गाची स्तुती केलेली आहे. नुकसान तर काहीच नाही.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 04/27/2016 - 10:50
नवीन
रोज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावतांना हेच म्हणत असते, सर्वांना चांगली बुध्दि द्या मात्र सगळ्यात आधी मला द्या.
तुम्ही उपासना म्हणताय, तिचा अर्थ मेडिटेशन असे समजून लिहीते. मेडिटेशन हा प्रकारच जमत नाही, काय असेल ते असो, तसे पाहिले तर मेडिटेशन म्हणजे चित्त एकाग्र करून, लक्ष विचलित होऊ न देता श्वासावर लक्ष केंद्रित करून काही काळ शांत, स्वस्थ बसणे एवढी सोपी गोष्ट, पण करायला गेले की फार अवघड होऊन बसते. असे बसले की जगभराचे विचार मनात येत राहतात, मनातील गुंता अजून वाढतो, अर्थात नियमित केले तर मनावर ताबा मिळवणेही तेवढे कठीण नसावे.
आर्ट ऑफ लिव्हींगचा कोर्स केलेला असल्यामुळे साधनेने येणारा मनःशांतीचा अनुभव प्रत्यक्ष घेतलाही आहे, तरीही तसा प्रयत्न केला जात नाही हे मात्र आहे.
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 05/01/2016 - 10:04
नवीन
आपल्या मनात दिवसभरात हजारो विचार येऊन जातात पण आपल्याला त्याचा पत्ता नसतो कारण आपण विचारांबरोबर वहात जात असतो.
आपल्या मनात येणार्या विचारांवर लक्ष ठेवणे ही पहिली पायरी आहे. जेव्हा आपण साधना करायला लागतो तेव्हा मनात येणार्या विचारांबरोबर वाहवत न जाता मनात कोणते विचार येत आहेत याकडे लक्ष वेधले जाणे या पहिल्या पायरीवर येतो. खरे म्हणजे ही प्रगती मानायला पाहिजे व ही आनंदाची गोष्ट मानली पाहिजे. पण बरेच जण मन एकाग्र होत नाही म्हणून तक्रार करत बसतात व शेवटी जी काही साधना करत असतात ती सोडून देतात.
ज्या गोष्टीवर आपल्याला लक्ष ठेवायचे असेल ती गोष्ट आपल्यापेक्षा वेगळी असली पाहिजे. जर मनात येणार्या विचारांवर लक्ष ठेवायचे असेल तर मनाकडे वेगळे होऊन पाहाता यायला पाहिजे. मनाकडे वेगळे होऊन पाहायला शिकणे हेच कोणत्याही साधनेच्या पहिल्या पायरीवरचे उद्दिष्ट असते.
थोडक्यात साधना करत असताना आपले साधनेत लक्ष नाहिय्ये, दुसरेच विचार मनात येत आहेत हे लक्षात येणे ही अधोगतीचे नव्हे तर प्रगतीचे लक्षण असल्याचे कळले की, साधनेमधे सातत्य येत जाते व त्याचबरोबर मनात येणार्या विचारांची संख्याही हळूहळू कमी व्ह्यायला लागते.
या सगळ्याला "विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला" असे म्हटले जाते व हीच सर्व साधनांचे प्रथम उद्दिष्ट्य असते.
अहंकार व त्यातून निर्माण निर्माण होणारे काम क्रोध मद मत्सर वगैरे कमी करणे अथवा त्यांवर विजय मिळवणे ही त्यानंतरची पायरी आहे.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Sun, 05/01/2016 - 10:20
नवीन
छानच भागवत साहेब...
एकदम पटले. याविषयावर लेखन नक्की करा.
- Log in or register to post comments
प
प्रचेतस
Wed, 04/27/2016 - 08:51
नवीन
थोडासा अंहंकार असावाच, तो नसला तर सगळंच कसं मिळमिळीत होऊन जाईल.
- Log in or register to post comments
व
विजय पुरोहित
Wed, 04/27/2016 - 08:51
नवीन
सहमत!
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Wed, 04/27/2016 - 08:58
नवीन
Ego is the fountainhead of human progress - Ayn Rand.
- Log in or register to post comments
म
मितान
Wed, 04/27/2016 - 09:00
नवीन
अहंकार नष्ट का बुवा करायचा ? माझ्या मते अहं असावाच. तो रक्तदाब किंवा रक्तशर्करेसारखा असतो. कमी झाला तरी व जास्त झाला तरी वाट लागते. त्या दोन्ही गोष्टींसारखा अहंकार हि ताब्यात प्रमाणात असला तरच मनुष्यजन्म ना !!!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 05/01/2016 - 05:58
नवीन
१००% सहमत.
अगदीच अहंकारशुन्यं माणसाचं लोकं पायपुसणं करतील.
- Log in or register to post comments
व
वैभव पवार
Fri, 10/28/2016 - 11:19
नवीन
यापेक्षा परिपूर्ण उत्तर खरच असु शकत नाही.
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Wed, 04/27/2016 - 09:28
नवीन
पण अहं हा फक्त 'असतो', त्यात कमी जास्त, एवढाच पाहिजे जास्त नको असे ठरवून तो पूर्णपणे कंट्रोल करता येतो का?
शिवाय अहंमुळे श्रेष्ठत्वाची भावना वाढीस लागून माणूस एखाद्या बेटासारखा बाकी लोकांपासून, समाजापासून लांब जाऊ लागतो, तेही चांगले नाही ना.
- Log in or register to post comments
स
सस्नेह
Wed, 04/27/2016 - 09:39
नवीन
इगोला फार महत्व द्यायचे नाही. विसरायला आणि क्षमा करायला शिकायचे.
हे वाचून बघ काही उपयोग होतोय का.
- Log in or register to post comments
ग
गौरी कुलकर्णी २३
Sat, 11/12/2016 - 09:32
नवीन
अगदी खरंय...इगोला न कुरवाळता "लेट गो" करायचं !
- Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/27/2016 - 10:30
नवीन
इगो असला पाहिजे पण त्याचा अतिरेक झाला की ' मी' म्हणजे सर्व आणि मी म्हणेल तसं झालंच पाहिजे असं सुरु होतं. आणि दुर्दैवाने अशी अहंकारी व्यक्ति स्वत:ला फार प्रामाणिक समजत असते, कधी तरी अति अहंकाराचा बुडबुडा फुटतोच, बस वेळ यावी लागते.
"आपल्याला माहित आहे की आपण या विशाल अवकाशातील मात्र एक अतिसूक्ष्म कण आहोत ज्याच्या असण्या-नसण्याने या चराचर सृष्टीला, अखिल ब्रम्हांडाला काहीएक फरक पडणार नाही, तर मग हा वृथा अहंकार कशासाठी..."
आवडलं.
''चराचर सृष्टीला,अखिल ब्रम्हांडाला'' या शब्दाच्या ऐवजी ''मिपाला'' असा शब्द वापरला असा शब्द वापरला असता तर वरील ओळी अजुन थेट भिडल्या असत्या. :)
-दिलीप बिरुटे
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Wed, 04/27/2016 - 10:59
नवीन
असो. एकच पिंक टाकतो.. अहंकार काढणे फार कठीण. मला अहंकार नाही याचा पण अहंकार येतो. तस्मात पास. बाकी वाचत आहे.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 04/28/2016 - 15:34
नवीन
मला अहंकार नाही याचा पण अहंकार येतो.
असेच लिहायला आलो होतो.
"मला कसलाच अहंकार नाही हाच एक अहंकार आहे"
आणि एक
अभिमान आणि अहंकार यात एक सूक्षम रेषा असते आणि ती आपण केंव्हा पार करतो हेच आपल्याला समजत नाही
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 04/27/2016 - 11:13
नवीन
स्वतःच्या कि दुसर्याच्या ;) ?
स्वतःच्या अहंकारावर विजय मिळवणे हे तुर्तास बाजुला ठेवु ! तो मानसशास्त्राच्या क्षेत्रातील विषय आहे , गावडे सर आले की त्यावर सविस्तर चर्चा करुच !!
दुसर्याच्या अहंकारावर विजय मिळवण्याकरिता
१) चपखल उपमा कायम लक्षात ठेवाव्यात अन चान्स मिळताच सट्टकन माराव्यात - उदाहरणार्थ चॅपेलगुरुजी.
२) अहंकारी लोकांच्या शब्दांचा अर्थाचा अनर्थ करणारे फोटो गुगल वर व्यस्थित शोध घेवुन शोधुन काढावेत अन मिपावर डकवावेत उदा. }०{
३) अहंकारी व्यक्तीला अत्यंत प्रेमळ खरड टाकुन त्याच्या अहंकारावर उपरोधिक पण प्रेमळ टीका करावी. जमल्यास त्याचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करावा उदा. ...
४) अहंकारी व्यक्तीच्या लेखनातील विरोधाभास सतत वर आणत रहावा , म्हणजे एका धाग्यावर काही बोलल्यास तीच व्यक्ती अन्यत्र काही विरोधाभासी बोलली असल्याचे दाखवुन द्यावे उदा.
५) अजुन एक महत्वाचा उपाय , जो की कदाचित आपणाला ठाऊक आहेच , तो म्हणजे अहंकारी व्यक्तीच्या धाग्याचे अफाट विडंबन करुन मुळ लेखना पेक्षा जास्त प्रतिसाद मिळवावेत
ह्या व्यतिरिक्त अजुन बरेच उपाय आहेत पण तुर्तास इतकेच पुरे ... ख्यॅ ख्यॅ ख्यॅ =))))
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Wed, 04/27/2016 - 11:34
नवीन
आता कस मिपावर आल्यासारख वाटतयं
- Log in or register to post comments
ग
गणामास्तर
Wed, 04/27/2016 - 11:39
नवीन
बाब्बौ..काय तो अब्यास.
बाकी, हे सगळे उपाय प्रुव्हन आहेत काय ? ;)
- Log in or register to post comments
क
किसन शिंदे
Wed, 04/27/2016 - 11:48
नवीन
गिर्जा, झाल्या गोष्टी सोडून द्या आणि पुढे चला की..
- Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले
Wed, 04/27/2016 - 12:05
नवीन
प्रिय मित्र किसन ,
स.न.वि.वि.
बहुतेक तु सकाळीच व्हॉट्सअॅप्प वर आलेला फॉरवर्ड मेसेज पाहिला नसावा. किती लोकं कायम विखारी बोलत असतात हे अगदी स्पष्ट होते त्यावरुन ! शिवाय जुने आयडी नवीन आयडी घेवुन आले तरीही लोकं जुने जुन्या आयडींचेच हिशेब चुकते करत आहेत हेच खफवर अन विठाच्या धाग्यावरही दिसत आहे.
झाल्या गोष्टी सोडुन देण्यात आणि पुढे चालण्यात आपल्याला कायम आनंदच आहे मात्र आपल्या ह्या विसरण्याला अन पुढे चालण्याला "कसे निरुत्तर केले पहा" असा रंग दिला जात असेल तर काय करायचे ? अशावेळी आम्हाला आमच्या तुकोबांच्या अभंगाची प्रकर्षाने आठवण होते अन सडेतोड प्रतिसाद दिला जातो -
तथापि आपल्या सल्ल्याचा मान राखुन शक्य तितके पुढे चालण्याचा प्रयत्न करत राहीन.
कळावे. लोभ असावा .
आपला विनम्र
प्रगो
- Log in or register to post comments
व
विवेक ठाकूर
Wed, 04/27/2016 - 15:23
नवीन
सत्य आम्हा मनीं | नव्हे गबाळाचे धनी |
देतो तीक्ष्ण उत्तरे | पुढे व्हावयासी बरें ||
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/27/2016 - 18:15
नवीन
तुम्च्या अहंकारावर कोणी मिपाकराने/करणीने विजय मिळवला आहे का?
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 04/27/2016 - 18:24
नवीन
टाकलीस काडी !
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 04/27/2016 - 18:46
नवीन
काहिही हा सृ (का स्रु???)
- Log in or register to post comments
स
स्रुजा
Wed, 04/27/2016 - 18:50
नवीन
मग काय ! त्या विचारतायेत स्वतः चा अहंकार कसा जिंकायचा .. तुझी गाडी भलत्याच ट्रॅकवर ;)
- Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे
Sun, 05/01/2016 - 10:20
नवीन
या वाक्यात "स्लॅश"च्या ऐवजी "स्पेस" असती तर ती एक हजारी काडी झाली असती ;) =))
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sun, 05/01/2016 - 10:25
नवीन
ख्या ख्या ख्या
घ्या आणि लोक मला काड्यासारतोय असे म्हणतात
ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊ
- Log in or register to post comments
श
शाम भागवत
Sun, 05/01/2016 - 10:36
नवीन
:-))
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Wed, 04/27/2016 - 11:48
नवीन
थोडा वेगळा विचार करत आहे. झाला की टंकतो.
- Log in or register to post comments
D
DEADPOOL
Wed, 04/27/2016 - 11:51
नवीन
मी तर लई भारी विचार करतोय.
मी टंकनार नाही लवकर!
- Log in or register to post comments
झ
झेन
Wed, 04/27/2016 - 12:30
नवीन
कृपया आपली चरणकमले इकडे करावीत
_/\_
- Log in or register to post comments
म
मराठी कथालेखक
Wed, 04/27/2016 - 12:32
नवीन
या धाग्यावर प्रतिसाद देवू का ?
कुणाचा बरे आहे हा धाग ? ...अच्छा नीलमोहर.
माझे अलिकडचे दोन-तीन धागे उघडून बघू का ?
हं... नीलमोहर माझ्या धाग्यावर फिरकत नाही. जावुन दे मी तरी तिच्या धाग्यावर प्रतिसाद कशाला देवू ? अपनी कुछ इज्जत है यार...
- Log in or register to post comments
ज
जयन्त बा शिम्पि
Wed, 04/27/2016 - 14:06
नवीन
खर म्हणजे ह्या प्रश्नामागे दडलेला प्रश्न असाही असु शकतो कि अहंकार कशामुळे उत्पन्न होतो ? ते जर समजले तर मुळावरच घाव घातला पाहिजे हे अधिक चांगले ! यासाठी इगतपुरी येथील " विपश्यना " केन्द्राशी वा आपल्या भागातील त्यांच्याच अन्य केन्द्राशी सम्पर्क
साधावा. दहा दिवसांचे शिबिर अटेंड करा. चिंतन व मनन या सोबत प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी प्राप्त करा. कदाचित एका शिबिरात सर्वच गोष्टींचे आकलन होईल असेही नाही. पुन्हा पुन्हा दोन तीन वेळेस जावे लागेल. पण एकदा एक शिबिर अटेन्ड तर कराच. कदाचित अहंकार , यासोबत क्रोध, काम् ,वासना, लोभ , मोह अशा अन्य विकारांवरही मात करण्याची संधी प्राप्त होईल. अर्थात ज्याप्रमाणे योगाचा क्लास अटेंड करुन , प्रमाणपत्र घेवून, घरी टांगून ठेवले आणि शिकवलेली ' योग साधना " घरी केली नाही, तर त्याचा शरीरावर काही परिणाम होत नाही , त्याचप्रमाणे ' विपश्यना ' म्हणजे काय व ती साधना कशी करावी हे नुसते समजावून घेतले तर लगेच विकारांवर विजय मिळून, मनाला शांती मिळेल असं होणार नाही. घरी सुद्धा साधना करावीच लागेल. महाजालावर सर्व माहिती मिळू शकते.
- Log in or register to post comments
ज
जेपी
Wed, 04/27/2016 - 15:45
नवीन
अहंकारा वर विजय मिळवायचा आहे हा पण एक अहंकारच आहे की .!
कश्याला नस्त्या लफड्यात पडायच ...
(फुल्ल अहंकारी) जेपी
- Log in or register to post comments
न
नीलमोहर
Sat, 04/30/2016 - 09:05
नवीन
त्याऐवजी अहंकार नष्ट/कमी करायचा आहे म्हणा, काही म्हटले तरी ते शब्दांचे खेळ फक्त, त्यामागील भावना महत्वाची..
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Wed, 04/27/2016 - 18:40
नवीन
अॅज लाँग अॅज यु आर हॅप्पी, काहि फरक पडत नाहि. अहंकार जर आपल्याच सुख-समाधानाच्या वाटेला यायला लागला कि डोळे मिटुन शांतपणे त्या दु:खाचे कारण शोधावे. आणि मन काय उपाय सांगते तो उपाय आचरावा.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Wed, 04/27/2016 - 19:26
नवीन
इथे सदस्य असताना असा प्रश्न पडतोचं कसा? :)
- Log in or register to post comments
प
पुंबा
गुरुवार, 04/28/2016 - 08:24
नवीन
ईगो प्रत्येकालाच असतो. जो असा दावा करतो की त्याने अहंकारावर विजय मिळवलाय तर तो खोटं बोलतोय असे समजावे. आपल्या ईगोने इतरांना त्रास होऊ नये इतकंच सुत्र मानन्यासारखं.आजीबात अहंकार नसलेली माणसं खरच नाही यशस्वी होऊ शकत.
- Log in or register to post comments
- 1
- 2
- ›
- »