Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

विस्टन चर्चिल...

अ
अनिरुद्ध प्रभू
Fri, 05/06/2016 - 11:13
🗣 68 प्रतिसाद
काल आंतरजालावर काहितरी शोधकार्य चालु असताना मला सर विस्टन चर्चिल यांच्या काही ओळी मिळाल्या, "Power will go to the hands of rascals, rogues, freebooters; all Indian leaders will be of low caliber & men of straw. They will have sweet tongues & silly hearts. They will fight amongst themselves for power & India will be lost in political squabbles. A day would come when even air & water... would be taxed in India." जुन १९४७ साली जेव्हा क्लिमंट अ‍ॅटली ब्रिटनचे पंतप्रधान होते, त्यांनी the Indian Independence Act ब्रिटिश संसदेत ठरावासाठी मांडला होता. त्यावेळी विस्टन चर्चिल यांनी या ओळी उच्चारल्या होत्या. आता प्रश्न असा उभा राहतो कि खरच अशा ओळी त्यांच्या आहेत ? आणि जर असतील तर चर्चिल एवढ्या ठामपणे कसे सांगु शकले?

प्रतिक्रिया द्या
11502 वाचन

💬 प्रतिसाद (68)
अ
अनिरुद्ध प्रभू Mon, 05/09/2016 - 12:13 नवीन
प्रत्येकाचं मत त्या त्या जागी बरोबर आहे. परंतु तरिही चर्चिल किति क्रुर नालायक होता हे सगळ बाजुला ठेवुन त्याचं हे मत सध्या आपल्या स्वातंत्र्यानंतर लागु पडतय का नाही हे पहाणं गरजेच नाही का? माफी असावी पण ज्या प्रकारे आपण त्याच्या इतर गोष्टींवरुन या मताचा विरोध करतो किंवा त्यावर दुर्लक्ष करतो त्याच पद्धतीनं गांधींच्या कामगिरींकडे पाहिलं तर राष्ट्रपिताच काय पण अजुन कुठलिच पदवी देउ शकनार नाही....
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Mon, 05/09/2016 - 14:04 नवीन
गांधीजी बद्दल हेच म्हणायचे आहे, पण इथे काही मिपाकराना गांधीवर टिका केलि की जबरदस्त पोटशूल उठतो, मग त्यावर उतारा म्हणुन संघ, सावरकर , मोदी यांच्या सात पिढ्याचा उद्धार केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
त
तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 14:17 नवीन
हा धागा शेवटी गांधीद्वेष ह्या हेतुवर आणायचा विचार आहे का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
भ
भंकस बाबा Mon, 05/09/2016 - 17:46 नवीन
सैन्यभरतीला गांधीनी विरोध केला असता तर चर्चिल अर्धा तिथेच खल्लास झाला असता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
फ
फारएन्ड Mon, 05/09/2016 - 17:49 नवीन
गांधींनीच काय, सर्व कॉंग्रेसने केला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
त
तर्राट जोकर Mon, 05/09/2016 - 17:55 नवीन
गांधीद्वेष करायचा तर वेगळा धागा काढा ना? शिवाय इतिहासात जर तर ला महत्त्व नसते हेही लक्षात असू देत. चांगल्या चर्चेला नको ते वळण द्यायचे आणि मग धुराळा झाला की आहेच कानफाट्या....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
भ
भंकस बाबा Wed, 05/11/2016 - 09:19 नवीन
उद्या तुम्ही बोलाल, शिवाजी महाराजांची पराक्रमाचि गाथा सांगताना अफझलखान वधाची माहिती सांगू नका, त्याने अल्पसंख्यक दुखावतात. चर्चिलचे चरित्र घडण्यात ज्यांचा हातभार लागला त्यांचा उल्लेख होणारच! बाकी अफझलखानाबरोबर कृष्णाजी भास्करचा उल्लेख केला तर अनेक सर्वधर्मसम्भाववाल्यांची तळी शांत होते असे ऐकून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
भ
भंकस बाबा Wed, 05/11/2016 - 09:19 नवीन
उद्या तुम्ही बोलाल, शिवाजी महाराजांची पराक्रमाचि गाथा सांगताना अफझलखान वधाची माहिती सांगू नका, त्याने अल्पसंख्यक दुखावतात. चर्चिलचे चरित्र घडण्यात ज्यांचा हातभार लागला त्यांचा उल्लेख होणारच! बाकी अफझलखानाबरोबर कृष्णाजी भास्करचा उल्लेख केला तर अनेक सर्वधर्मसम्भाववाल्यांची तळी शांत होते असे ऐकून आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Wed, 05/11/2016 - 09:49 नवीन
आम्ही काही बोलत नाही. माझ्यावर अवांतर करुन धाग्याची वाट लावतो असे म्हणणारे तुमच्या ह्या प्रतिसादांना काय म्हणतील ह्यावर विचार करत आहे. लगे रहो. ;) असंबंद्ध बडबडीला व्हॅल्यू नसते. हा शेवटचा प्रतिसाद. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भंकस बाबा
व
विवेकपटाईत Mon, 05/09/2016 - 17:38 नवीन
चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरले आहे. ७० वर्षानंतर हि आपल्या इथे लोकतंत्र अधिक परिपक्व झाले आहे. मिळून राज्य करणे हि आपण शिकलो आहे. शिवाय आपण १२५ कोटीहून जास्त लोकांचे पोट भरतो आहे.
  • Log in or register to post comments
म
मार्मिक गोडसे Mon, 05/09/2016 - 20:06 नवीन
मिळून राज्य करणे हि आपण शिकलो आहे. शिवाय आपण १२५ कोटीहून जास्त लोकांचे पोट भरतो आहे.
हे महत्वाचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
अ
अर्धवटराव Mon, 05/09/2016 - 21:09 नवीन
भारताला केवळ एक रिसोर्स प्रोव्हायडर म्हणुन बघणार्‍या चर्चीलला भारतातलं राजकीय पोटेन्शीअल कळलं नाहि हेच खरं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ह
हुप्प्या Tue, 05/10/2016 - 06:38 नवीन
लोकतंंत्र परिपक्व कसे? नेहरू मेल्यावर इंदिरा गांधीला वारसदार म्हणून लगेचच नेमले गेले नाही. इंदिरा बाईंना विरोध करणारे लोक अनेक होते. उलट इंदिरा गांधींची हत्या झाल्यावर राजकारणातील र ही कळत नसणार्‍या राजीव गांधीला नेता बनवले आणि पंतप्रधानही. राजीवजींचे निधन झाल्यावर लगेच राजकारणापासून अलिप्त असणार्‍या सोनियादेवींना साकडे घातले गेले. राहुलजींना पायघड्या घातलेल्या आहेतच शिवाय प्रियांकाच्या मागेही तगादा आहे. हे सगळे लोकतंत्र परिपक्व होण्याचे लक्षण म्हणायचे का? नेहरु गांधी घराणे एकमेव वगैरे काही नाही. कश्मीरमधे अब्दुल्ला खानदान आहे, मुफ्ती महंमद सैदचे खानदान आहे, उत्तर प्रदेशात मुलायम, अखिलेश आणि डिंपल यादव आहे, लालू राबडी आणि अन्य यादवी लोक आहेत, शिंद्यांचे घराणे आहे (मध्य प्रदेशात, राजस्थानात आणि महाराष्ट्रातही!), ठाकरे घराणे आहे, मुंडे, महाजन, पवार, भुजबळ आहेत, राणे, नाईक, देशमुख वगैरे घराणी आहेतच. आर आर पाटील गेले तेव्हा त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या पत्नीची बिनविरोध निवड! दक्षिणेतही हेच. एम जी आर, जानकी, जयललिता, करुणानिधी आणि त्यांची पिलावळ आहे. चंद्राबाबू नायडू, एन टी आर, ही केवळ काही उदाहरणे. पूर्ण यादी करायची म्हटली तर अनेक पाने भरतील. मला वाटते लोकशाही म्हणून परिपक्व होण्याऐवजी राजेशाही लोकशाहीच्या झिरझिरीत पडद्याआड वावरण्यात परिपक्व होऊ लागली आहे. बंगालच्या दुष्काळाच्या काळापासून आपण खूपच सुधारलेलो आहेत हे नक्की. पण ह्या राजघराण्यांच्या अंदाधुंदीमुळे जितकी होऊ शकली असती त्यापेक्षा प्रगती खूपच मंद आहे. पाण्याची परिस्थिती बिकट होत आहे आणि त्यामुळे अन्नधान्याचीही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 08:44 नवीन
आपल्याकडे 'राजघराणा लोकशाही' आहे आणि ती राहणारच. पण ह्याचे खापर जनतेवर फोडले पाहिजे, कोणत्याही विशिष्ट राजकिय पक्षावर नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
ह
हुप्प्या Tue, 05/10/2016 - 09:31 नवीन
चर्चिलचे मत हे भारतीय लोकांबद्दलच होते कुठल्या विशिष्ट राजकीय पक्षाबद्दल नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
त
तर्राट जोकर Tue, 05/10/2016 - 09:35 नवीन
हो. ते खरे आहेच. पण घराणेशाही म्हटलं की फक्त गांधी घराण्यावर टिका होतांना दिसते म्हणून आपलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या
अ
अनिरुद्ध प्रभू Tue, 05/10/2016 - 06:47 नवीन
चर्चिलचे म्हणणे पूर्णपणे खोटे ठरले आहे
मग सद्ध्याच्या भारतातल्या राजकारणाचि नक्की दिशा काय?
७० वर्षानंतर हि आपल्या इथे लोकतंत्र अधिक परिपक्व झाले आहे.
जोक ओफ डे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत
ह
हेमंत लाटकर Sat, 06/10/2017 - 04:01 नवीन
विस्टन चर्चिल चे वाक्य, "इतिहासाचा अभ्यास जितका खोल कराल, तितका भविष्यकाळ लांबवर पाहू शकाल"
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा