Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी?

स
सांश्रय
Sat, 05/07/2016 - 06:04
🗣 94 प्रतिसाद
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते. मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल... कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल. सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
14825 वाचन

💬 प्रतिसाद (94)
च
चिनार Sat, 05/07/2016 - 06:22 नवीन
हा धागा गाजणार !! पाचशे नक्की.. -- दोन बर्नरच्या शेगडीवर केलेले पोपकॉर्ण विकायला तयार असलेला चिनार
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 07:24 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
उ
उगा काहितरीच Sat, 05/07/2016 - 06:23 नवीन
तुमच्या आयडीचा नेमका अर्थ काय आहे ?
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 09:29 नवीन
शोधा म्हणजे .....सापडेल...... (googla हो..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
श
शिद Sat, 05/07/2016 - 17:06 नवीन
मग तुम्ही हा धागा काढण्याअगोदर गुगलवर शोधलं की नाही? तुम्हीपण योग्यरीत्या शोधलं असतं तर तुम्हालापण हवी ती माहीती नक्कीच मिळाली असती नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 19:13 नवीन
माहिती बरीच मिळाली, परंतु प्रत्यक्ष वापरकर्त्यांकडुन किंवा अनुभवी लोकांकडून मिळावी हे अपेक्षित होतं, पण ते न होता धागा भलत्याच विषयांच्या चर्चेत चाललाय याचे वाईट वाटते, तसे पाहता प्रत्येकाच्या घरात शेगड्या असतील, काही ठराविक सोडता बाकी वेळखाऊ गोष्टी चालल्यात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 06:26 नवीन
चूल नाही का घरात ?
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 10:13 नवीन
चुल आहे पण ती गॅसवर चालणारी आहे व दोन बर्नरची आहे. आत्ता चार बर्नरची घ्यायची आहे. त्यावर बोला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 13:30 नवीन
फोटु टाका की. आम्हाला पण बगायची गॅसवरची चूल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
ज
जेपी Sat, 05/07/2016 - 06:28 नवीन
सेकंड हॅंड चालेल का? पण तीन बर्नर ची आहे.. एक इडंक्शन घ्या.अ र्थात माझ्याकडे आहे. तीन वर स्वयंपाक करा,इंडक्शन वर पाणी तापवा... पण इंडक्शन ला सपाट बुडाची पातेली लागते. एक स्टील चा डबा देतो. हाकानाक
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sat, 05/07/2016 - 06:45 नवीन
सपाट बुडाची पातेली नै हो, लोखंडीच असावी लागते म्हणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Sat, 05/07/2016 - 07:54 नवीन
लोखंडी नै..स्टीलची सपाट बुडाची भांडी.. प्रयोग करा- स्टीलचा डब्बा घ्या 5-6 लीटरचा आणी त्यात पाणी घालुन इंडक्शन वर तापवायला ठेवा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
उ
उगा काहितरीच Sat, 05/07/2016 - 08:19 नवीन
स्टीलचे भांडे चालते इंडक्शन वर. ॲल्युमिनीअम नाही चालत . लोखंडी भांडे पण चालू शकते. फक्त अट एकच बूड सपाट पाहिजे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Sat, 05/07/2016 - 11:29 नवीन
भांड्याचे !!! खुलासेदार नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
प
प्रचेतस Sat, 05/07/2016 - 11:31 नवीन
भांडे लपविले तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
र
रेवती Sat, 05/07/2016 - 15:10 नवीन
ताक मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस
प
प्रचेतस Sat, 05/07/2016 - 15:20 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 10:14 नवीन
सेकंडहँड नको. शिवाय इंडक्शन वगैरे पर्यायही नको...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ए
एस Sat, 05/07/2016 - 06:31 नवीन
गॅस शेगडी अशी घ्यावी जी बिनागॅसचीपण पेटेल. बास्स्स!
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 06:36 नवीन
नाही तर गॅस कुठला घ्यावा असाही धागा येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 10:15 नवीन
तुम्ही शोध लावा. आम्ही तयार आहोत विकत घ्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
ए
एस Sat, 05/07/2016 - 10:44 नवीन
हाहाहा! सोपेय. असे धागे घालायचे शेगडीत. चांगली दणकून पेटते. =)) आणि हवा म्हणून प्रतिसाद घालायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
न
नीलमोहर Sat, 05/07/2016 - 11:06 नवीन
एका अती उपयुक्त धाग्यावर मदत करणे सोडून आग लावण्याचे पुरेपूर प्रयत्न अनेकांकडून सुरू असलेले पाहून... एक मिपाकर म्हणून... वगैरे... वगैरे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चौकटराजा Sat, 05/07/2016 - 06:49 नवीन
चार बर्नरची शेगडी घ्याचीय ना ? मग प्रथम तिला चार बर्नर आहेत ना हे पाहून घ्या किंवा मग दोन बर्नर व दोन बर्नर फ्री च्या स्कीमची वाट पहा !! पावसाळ्यात खास महिलांसाठी वेगवेगळे सेल लागतात म्हणे !
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 05/07/2016 - 07:20 नवीन
प्रथम स्वयंपाक घराच्या कडेला असलेला ओटा ( काहीजण त्यास प्लाटफारम का म्हणतात माहीत नाही )काढून मध्यभागी आणा म्हणजे चार चुलींची खरी मजा येईल.वरती एक धुरांडं लागेल.चुलीपेक्षा धुरांडं महाग आणि कटलरीपेक्षा डिशवॅाशर महाग अशी सध्याची परिस्थिती आहे.एक फायदा म्हणजे मध्यभागी पापकार्न कढईत फोडले की चहुकडे छान उडतात.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 07:29 नवीन
हे खरं आहे. चार बर्नरची शेगडी घेण्यासाठी किचन मधे आवश्यक ते बदल करावे लागतात. चार बर्नरची शेगडी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे प्रशांत दामले येतो. त्याच्या सोबत टीव्हीचा कॅमेरा पण असतो. त्या कॅमे-यात आपलं किचन चांगलं दिसावं म्हणून काही काहींनी घरातला हॉल सुद्धा किचमधे समाविष्ट करून घेतला आहे. ओटा काढून टाकून तिथे किमान तीन चार लाखांचं किचन युनिट बसवून घ्यावं. सेंटरला कांदा कापण्यासाठी एक टेबल. तेच टेबल शिजलेले पदार्थ ठेवण्यासाठी किंवा कॅमे-यासमोर शिजवण्यासाठी वापरता येतं. हॉल आणि किचनमधली भिंत काढून टाकावी. सोफा काढून तिथे डायनिंग टेबल ठेवावं. रात्रीच्या वेळी जाऊन रेल्वे स्टेशनला टांगलेला टीव्ही काढून आणावा. हा दोन्ही बाजूंनी दिसतो. तो मधे टांगला की भूतपूर्व हॉल आणि किचन अशा दोन्ही ठिकाणाहून दिसेल. प्रदा येईल तेव्हां तो त्यावर एखादा प्रश्न विचारेलच. एव्हढी तयारी झाली की मग चार बर्नरची शेगडी आणावी. त्या आधी चिमणी कुठली घ्यावी, किचन युनिट कुठलं घ्यावं हे निश्चित करावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 10:16 नवीन
तुम्हाला मुख्य विषय सोडून बाकिच्या विषयांची बरीच माहिती दिसते. तुम्हीपण कन्हैय्यासारखी पिएचडी करता काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
स
संजय पाटिल Sat, 05/07/2016 - 11:43 नवीन
एका ओळीत चार बर्नर असलेली मिळते का बघा.. म्हणजे ओटा मोठा करायला नको. नाय्तर मग दोन बर्नरचीच अजून एक घेऊन टाका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
ख
खटासि खट Sat, 05/07/2016 - 13:32 नवीन
पीएचडी, कन्हैया ? विषय भरकटवू नका हो मॅडम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
अ
अत्रन्गि पाउस Sat, 05/07/2016 - 07:29 नवीन
प्रश्नातच उत्तर आहे कि ...
  • Log in or register to post comments
अ
अजया Sat, 05/07/2016 - 07:44 नवीन
=))) _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/07/2016 - 07:48 नवीन
सौरउर्जेवर चालणा-या चुली वापरून पाहावे असे वाटते. त्याबद्दल अधिक माहिती नाखु देतील. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
संजय पाटिल Sat, 05/07/2016 - 08:22 नवीन
त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल...
सगळे फिचर्स असलेली बघुन घ्या..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/07/2016 - 08:34 नवीन
मिपावरचे काही लेख चुलीत टाकलेत तर आगही लावायची गरज पडणार नाहीत. त्यावर पाणी तापवुन नंतर महाराष्ट्राला पुरेल एवढी वीजनिर्मीती होईल एवढी जळजळ आहे. शिवाय काही सुज्ञ (???) सदश्य गोल गोल गोवर्‍यांचे प्रतिसाद आणि कच्चा माल टाकत असतातचं. त्याचाही वापर करुन इको फ्रेंडली स्वयपाक व उर्जानिर्मिती साधता येईल.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 05/07/2016 - 08:36 नवीन
लोल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
ज
जेपी Sat, 05/07/2016 - 08:37 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ए
एस Sat, 05/07/2016 - 09:30 नवीन
ख्या ख्या ख्या! हल्ली महाराष्ट्रात ऊर्जा अतिरिक्त झालीये असे ऊर्जामंत्री म्हणत होते ते बहुधा मिपामुळेच असावे. एक मिपाकर म्हणून वैग्रे वैग्रे!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Sat, 05/07/2016 - 11:32 नवीन
(स्वतःच्या) स्वयंपाक बनावायचा अन्नच्छत्र नाही !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस
च
चिनार Sat, 05/07/2016 - 10:43 नवीन
आमच्या पॉपकॉर्नच्या धंद्याला अनुकूल असलेला धागा चुलीत टाकण्याची भाषा केल्याबद्दल चिमणरावांचा जाहीर निषेध !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sat, 05/07/2016 - 18:55 नवीन
कोण म्हणलं हा धागा चुलीत टाका म्हणुन? मोकलाया नंतर एवढे मिपाकर एकत्र आलेले मी पहिल्यांदाचं पहातोय. बाकीचे धागे चुलीत टाका आणि पॉपकॉर्न बनवा. हाकानाका =)). बाकी णीषेध मागे घ्या =)०
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिनार
र
रेवती Sat, 05/07/2016 - 15:12 नवीन
ही ही ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
व
विवेक ठाकूर Sat, 05/07/2016 - 10:02 नवीन
स्वयंपाकाला तरुण आणि तडफदार बाई ठेवा. तिच्याकडून सकाळ-संध्याकाळचा स्वयंपाक एकाच वेळी करुन घ्या. तुमचा सगळा वेळ वाचेल. सगळ्यांना शॉवरखाली गार पाण्यानं अंघोळीची सवय लावा. यानं उर्जा आणि एका शेगडीची बचत तर होईलच शिवाय सगळ्यांचं पटकन आवरेल. कामवाली आली की मिस्टरांना अंघोळीला पाठवा म्हणजे ते चहा वगैरे मागणार नाहीत. आणि पटकन आवरुन बाहेर येतील. ब्रेकफास्टला सगळ्यांना बाईनं केलेल्या पोळीभाजीचीच सवय लावा म्हणजे ते एक काम कमी होईल. फावल्या वेळात बाईकडून वेगवेगळ्या कोरड्या चटण्या करुन घ्या आणि इतर वेळी कुणी खायला मागितलं की त्याला चटणीपोळी द्या. यामुळे भरपूर वेळ वाचतो. चार बर्नरच्या शेगडीचे पैसे वाचल्याबद्दल कामवाल्या बाईलाच थोडे जास्त पैसे देऊन येतांना भाज्या आणण्याची सवय लावा. आता तुम्हाला `वाचलेल्या वेळाचं काय करावं' हा प्रश्न पडेल. ..... मग इथे त्याविषयी धागा काढा.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 05/07/2016 - 10:57 नवीन
अरारा .. अहो हे काय भल॑तेच लावलेय ? त्याना चार बर्नर ची चूल वापरण्यात आध्यात्मिक फायदा काय ...? ते सांगायचे सोडून....... ( आता दोनशे नक्की ... मी आपला कसा बाजूला होतो बरं !!!!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/07/2016 - 11:03 नवीन
तरुण तड़फदार ही कामवाल्या बाइकडून अजुन काय काय कामं करून घेता, मरेल ना बिचारी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
व
विवेक ठाकूर Sat, 05/07/2016 - 11:35 नवीन
तरुण तड़फदार ही कामवाल्या बाइकडून अजुन काय काय कामं करून घेता तिला टू विलर शिकवायची (बुलेट नको!). आणि बँकेचं लोनप्रपोजल करुन नवी स्कूटर घेऊन द्यायची. या कामात आपण गॅरेंटर मात्र राहायाचं नाही. तीचा पगार इएमाय म्हणून भरायचा म्हणजे लोन फिटेपर्यंत तरी बाई काम सोडणार नाही. शिवाय तिला कामाला यायला उशीर पण होणार नाही. जाता येता बँकेच्या कामाची वगैरे पण सवय लावायची म्हणजे तीला ही प्रमोशन झाल्यासारखं वाटेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आ
आनंदी गोपाळ Sat, 05/07/2016 - 11:42 नवीन
अहो, आधीच 'मरत असेल' तरच एक्स्ट्राची कामं करायला राजी होईल ना ती? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 11:09 नवीन
रोगापेक्षा इलाज भैंकर... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
स
सस्नेह Sat, 05/07/2016 - 11:23 नवीन
बाईचा पत्ता व फोन नंबर व्यनि करावा .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर
ध
धनंजय माने Sat, 05/07/2016 - 11:09 नवीन
सल्ला द्यायचे सत्तर रुपये होतील.
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 05/07/2016 - 11:40 नवीन
सुरूवातीला ५० रुपये ना ? डायरेक्ट ७० म्हटल्यावर येणारच नाहीत ते धाग्यावर ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
  • 1
  • 2
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा