Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

चार बर्नरची गॅस शेगडी घ्यायची आहे. कोणती घ्यावी?

स
सांश्रय
Sat, 05/07/2016 - 06:04
🗣 94 प्रतिसाद
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले. वेगवेगळ्या शो-रुम्स मध्ये शोधही घेतला, पण निर्णय घेताना फारच गोंधळायला होते. मग विचार केला की मिपाकरांना विचारायला हरकत नाही याबद्दल... कोणती गॅस शेगडी घ्यावी, त्यात कोणते फिचर्स असावेत याबाबत जरा सुचवल्यास बरं होईल. सर्वाचे अगोदरच आभार मानत आहे. धन्यवाद.

प्रतिक्रिया द्या
14825 वाचन

💬 प्रतिसाद (94)
ध
धनंजय माने Sat, 05/07/2016 - 12:14 नवीन
महागाई! कंबरडं मोडलं हो या महागाईने. आमच्याकडे पार्वती त्या झाडाच्या काटक्या गोळा करुन आणून चूल पेटवतेय सध्या... मिसरी भाजायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Sun, 05/08/2016 - 02:48 नवीन
सुर्यचुल वापरली का हो तुमच्या पार्वतीने? आवडेल त्याला एखादवेळेस. ;) रच्याकने, माने ७० रुपये घेतल्याशिवाय तुम्ही प्रतिसाद कसा दिलात? हा शुद्ध हलकटपणा आहे माने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने
श
श्रीगुरुजी Sat, 05/07/2016 - 11:35 नवीन
ज्योति, सूर्या इ. कंपन्यांच्या चार बर्नरच्या शेगड्या चांगल्या आहेत. परंतु त्यासाठी जास्त रूंदीचा ओटा लागतो. ओट्याची रूंदी मोजून मगच ठरवा की चार बर्नरची शेगडी तिथे बसेल का. ओटा कमी रूंदीचा असेल तर चार ऐवजी तीन बर्नरची शेगडी चालेल.
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 12:47 नवीन
आजकालच्या फ्लॅट मध्ये किचन ओट्याची रुंदी ही जास्तच असते. त्यामुळे रुंदीचा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की कोणत्या कंपनीची घ्यावी, घेतली तर ती ग्लासटॉप ची घ्यावी की स्टील ची? ज्योती आणि सुर्या दोन्ही बघीतले पण ग्लासटॉप की स्टीलची हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
ख
खेडूत Sat, 05/07/2016 - 13:12 नवीन
ओट्याची रुंदी पाहून मग शेगडी घेणे मराठी माणसाने थांबविले पाहिजे. (संदर्भः अंथरूण पाहून...) चार बर्नर्स असलेल्या शेगडीसाठी घरही बदलायची तयारी हवी. 'सहा बर्नर्सची नाही का?' असं दुकान्दाराला विचारायची हिंमत हवी. असा ओटा असेल तर दोन्ही बाजूंनी चार बर्नर्स सहज वापरता यावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
व
विवेक ठाकूर Sat, 05/07/2016 - 13:24 नवीन
म्हणजे दोन शेगड्यांच्या गॅसवर सुद्धा किती पटकन काम होतं हे कळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत
अ
अत्रन्गि पाउस Sun, 05/08/2016 - 04:30 नवीन
आमच्याकडे २ वर्ष वापरतोय ...अर्थात ३ बर्नर वाली आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
र
रुस्तम Sun, 05/08/2016 - 05:37 नवीन
ग्लेन लिहायलाच आलो होतो.. आमच्या कडे ४ थे वर्ष चालू आहे.... ३ बर्नर वालीच...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
आ
आनंदी गोपाळ Sat, 05/07/2016 - 11:37 नवीन
४ बर्नरचा कुकटॉप वापरायला बर्‍यापैकी बोरिंग व त्रासदायक असतो. त्यातले ४री बर्नर्स एकत्र वापरणे जवळजवळ अशक्य आहे. उदा. समोरच्या बर्नरवर भाजी फोडणीस टाकली अन त्याच वेळी पाठीमागच्या पातेल्यातलं पाणी उकळल्याने आंघोळीसाठी बादलीत काढायचं आहे. अशा वेळी आधी हाताला चटके तेव्हा होईल आंघोळ अशी नवी कविता पाडावी लागते. दुसरे, एका वेळी ४ मोठी भांडी ठेवून चारी भांड्यात मोकळेपणी काम करता येईल अशी साईज मी तरी पाहिलेली नाही. बॅकबर्नरवर टाकणे असा वाक्प्रचार का आलाय ते असा पाठीचा बर्नर वापरून पाहिल्यावर लक्षात येईल. तिसरे, चारी बर्नर्स लहानमोठी ज्योतवाले असतात. एकावेळी दोन मोठ्या ज्योती मिळतात का ते पहावे. एकावेळी ४ शेगड्या पेटवायची गरज असेल, तर अजून एक २ बर्नरचा नॉर्मल गॅस आणा, अन कनेक्टर लावून शेजारी ठेवा. काम बरंच सोपं होईल, शिवाय अ‍ॅट ए टाईम दोन लोक दोन ठिकाणी, एकमेकांत लुडबूड न करता काम करू शकतील. पहा बुवा पटतंय का.
  • Log in or register to post comments
प
पैसा Sat, 05/07/2016 - 18:19 नवीन
अगदी अगदी! मी तर म्हणेन एक बर्नरची शेगडी घेऊन आताच्या शेगडीच्या लायनीत जोडून घ्या आणि एक इंडक्शन घ्या. आंघोळीच्या पाण्याला गॅस का वापरता? गीझर बसवून घ्या ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
ब
बॅटमॅन Mon, 05/09/2016 - 21:32 नवीन
एकावेळी ४ शेगड्या पेटवायची गरज असेल, तर अजून एक २ बर्नरचा नॉर्मल गॅस आणा, अन कनेक्टर लावून शेजारी ठेवा. काम बरंच सोपं होईल, शिवाय अ‍ॅट ए टाईम दोन लोक दोन ठिकाणी, एकमेकांत लुडबूड न करता काम करू शकतील.
नेमके हे असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/10/2016 - 03:36 नवीन
खाली अण्भवी बॅटमॅन अशी सही राहिली अशी "अंमळ" शंका आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
र
रेवती Sat, 05/07/2016 - 15:19 नवीन
चारही बर्नर्स एकदम निदान माझेतरी वापरले जात नाहीत. एकाचवेळी तीन बरेचदा वापरले जातात. बर्नर्स हे वेगळाल्या आकाराचे असतात. कुकर कोण्त्या बर्नरवर चांगला होतो, भाजी कुठल्यावर होते हे ठरूनच जाते. ओट्याची रुंदी चांगली आहे म्हणून चार घेण्यास हरकत नाहीसे दिसते अन्यथा नेहमीचे दोन असताना आण्खी तसेच दोन घेतले तर नको असतील तेंव्हा ती शेगडी ओट्यावरून तात्पुरती काढून जागा करता येते. ब्रँडस वगैरे माहिती नाहीत हो.
  • Log in or register to post comments
त
तर्राट जोकर Sat, 05/07/2016 - 15:45 नवीन
{मोड ऑन: कुठला तो जाणकार वळखतीलच} कशाला प्रतिसाद दिला मग ब्र्याण्ड्स माहित नहीत तर, तुम्ही स्वतःला फार हुशार समजता काय फार? माहित आहे तुमच्याकडे चार बर्नर्सचा स्टोव्ह आहे तेची जाहिरात करताय. त्यतले तीनच वापरता आणि इथे आम्हाला शिकवता. कळली तुमची .... इत्यादी इत्यादी. {/मोड ऑन}
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती
ग
गॅरी ट्रुमन Sat, 05/07/2016 - 17:36 नवीन
तुम्ही एक बर्नरच्या चार शेगड्या का घेत नाही? किंवा आठ बर्नरची अर्धी शेगडी?
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Sat, 05/07/2016 - 17:57 नवीन
आता स्पिरीट लॕम्प घ्यायला सांगा. प्रयोगशाळेत वापरतात तसा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
ल
लालगरूड Sat, 05/07/2016 - 19:23 नवीन
मला चार रेगुलेटर असलेला सिलेंडर पाहिजे brand Rajnikant
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Sat, 05/07/2016 - 19:48 नवीन
मिपा वर ठरलेले सभासद ठरलेली उत्तरे देतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ल
लालगरूड Sat, 05/07/2016 - 20:18 नवीन
surya घ्या glass top .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
स
सांश्रय Mon, 05/09/2016 - 14:35 नवीन
आपण सुर्या ग्लास टॉप का म्हणताय? त्याची काही वैशिष्ट्ये असल्यास सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लालगरूड
ट
टवाळ कार्टा Mon, 05/09/2016 - 14:41 नवीन
त्यासाठी दुसरा धागा काढा ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
स
सांश्रय Mon, 05/09/2016 - 14:52 नवीन
धन्यवाद! सल्ला चांगला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अभ्या.. Mon, 05/09/2016 - 14:42 नवीन
काचेचा आहे, खूप रंगात मिळतो, नाव अगदी भारतीय वाटते, सोनाली बेंद्रे जाहीरात करते,(कधीकधी) सूर्या फौन्डेशन बर्‍याच प्रकल्पात मदत करते,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सांश्रय
प
पुणेकर भामटा Sat, 05/07/2016 - 20:06 नवीन
तुम्ही पाणी तापवायला बंब का घेत नाही?
  • Log in or register to post comments
प
पुणेकर भामटा Sat, 05/07/2016 - 20:06 नवीन
तुम्ही पाणी तापवायला बंब का घेत नाही?
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Sat, 05/07/2016 - 22:56 नवीन
इतके बर्नर्स का पेटलेत! मला यातल काही कळत नाही पण वर चिनार यांचे बोलणे खरे व्हावे या नेक हेतूपायी हा अजून एक प्रतिसाद! :) Sandy
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Sun, 05/08/2016 - 18:34 नवीन
दोन बर्नरच्या गॅस शेगडीवर मुलांचे शाळेचे डबे, सकाळचा चहा, आमचा नाश्ता, एखादे वेळेस अंघोळीचे पाणी तापविणे अशी सगळी कामे एकाच वेळी शक्य होत नाहीत. त्याकरीता चार बर्नर असलेली गॅस शेगडी घ्यायचे ठरविले.
हि सगळी कामे तुम्ही एकाच वेळी करणार आहात का? म्हणजे बाथरूममध्ये आंघोळीचे गरम पाणी घेउन चहा पिता पिता नाश्टा खाताना मुलांचे डबे तयार करणे....कस्सं काय जम्तं हो तुम्हाला
  • Log in or register to post comments
स
सांश्रय Mon, 05/09/2016 - 09:14 नवीन
हा धागा काढण्याचा एकच उद्देश होता की, मिपा वरील सुज्ञ सदस्य / मंडऴी अनुभवलेली किंवा माहीतीत असलेली गॅस शेगडी संदर्भातील माहीती येथे लिहीतील जेणेकरुन ही माहीती मर्यादितच न राहता इतरांपर्यंतही पोहचु शकेल........... इथले प्रतिसाद धाग्याविषयी असते तर खुप चांगली चर्चा झाली असती, माहिती मिळाली असती. माझ्या प्रश्नासंदर्भात बरीचशी गंभीरही माहिती मिळतेय व त्याचा अभ्यासही सुरु आहे. मुंबई ग्राहक पंचायतीलाही संपर्क केलेला आहे.
  • Log in or register to post comments
व
वैभव जाधव Mon, 05/09/2016 - 14:53 नवीन
आपलं संस्थळ चुकलं असं वाटतंय. ;)
  • Log in or register to post comments
प
पुणे मुंग्रापं गुरुवार, 05/12/2016 - 08:47 नवीन
असं वाटायला लागलय खरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव
क
कपिलमुनी गुरुवार, 05/12/2016 - 19:14 नवीन
प्रतिसाद द्यायचा आयडी चुकला वाटतं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुणे मुंग्रापं
श
श्री गावसेना प्रमुख Mon, 05/09/2016 - 15:58 नवीन
एक गहन प्रश्न पडलाय घराचे बांधकाम चालू आहे ,संडासीचे भांडे कोणते वापरावे,इंडियन की इंग्लिश कोणते सोईस्कर राहील। जाणकारांनि आपला बहुमोल सल्ला द्यावा।
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Mon, 05/09/2016 - 16:39 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
ट
टवाळ कार्टा Mon, 05/09/2016 - 17:11 नवीन
या विषयातले जाणकारपण मिपावर आहेत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:13 नवीन
कोण्रे कोण्रे? कुं...असो...!!! त्या म्हाराजकी जय =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
श
श्री गावसेना प्रमुख Tue, 05/10/2016 - 02:59 नवीन
आता कोणी घराच्या कामाचे रेट विचारतो कुणी शेगड़ी कोणती घ्यायची हे विचारतो कुणी डिश टीवी बद्दल चवकशी करतो त्यांना सल्ला मिळू शकतो त्या अर्थी मिसळपाव वर बऱ्याच विषयांचे जाणकार उपस्थित असावेत म्हणून माझाही एक गहन प्रश्न।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
व
वैभव जाधव Mon, 05/09/2016 - 17:05 नवीन
प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून आहे. आपल्याला कसं व्यवस्थित 'जमतं'? बाकी कुठून आणायचं, किती खर्च नंतर चा विषय. आधी 'सोय' बघावी. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:08 नवीन
प्रश्ण गहन आहे का थोडी अक्षरात अदलाबदल आहे असा एक प्रश्ण आहे माझा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
च
चिगो गुरुवार, 05/12/2016 - 14:17 नवीन
प्रश्ण गहन आहे का थोडी अक्षरात अदलाबदल आहे असा एक प्रश्ण आहे माझा.
=)) मेलो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/13/2016 - 03:32 नवीन
रच्याकने गॅसचही कनेक्शन बसल्या जागी मिळुन जैल हा मुद्दा तेव्हा डोक्यात आला नव्हता. प्रेशर वाईट. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
च
चिगो गुरुवार, 05/12/2016 - 14:16 नवीन
ते इंग्लिश+इंडीयन कमोड असतं ना? ते घ्या.. अनुभव नसला तरी चार-दोन फायदे सांगतो.. १. मुडप्रमाणे/ तब्येतीप्रमाणे वापरता येईल.. काँस्टीपेशन असेल तर इंडीयन स्टाईल, नेहमीच्या वेळी चॉईस आणि डिसेंट्री झाल्यास इंग्लिश.. २. एक के दाम में दो-दो संडास.. भारतीयत्वाचा आणि आधुनिकतेचा समन्वय देखील.. ३. पाहुणे, मग ते मॉडर्न असोत वा गावरान, देशी असो वा विदेशी, त्यांच्या मनाजोगा कार्यक्रम करु शकतात. ४. कमोडवर भारतीय पद्धतीत बसल्यास जगाकडे 'वेगळ्या' उंचीवरून बघायला मिळेल. संडास हे अनेक कल्पनांचे जन्मस्थान असल्याने हाईटचा फायदा मिळून आपल्या कल्पनांना एक आगळी खोली लाभेल.. आयडीया पटते का सांगा..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख
व
वैभव जाधव गुरुवार, 05/12/2016 - 15:41 नवीन
हे सगळे विचार नेमके 'कुठे' सुचले??? लेका बालिस्टर का झाला नाहीस ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिगो
र
रातराणी Mon, 05/09/2016 - 21:17 नवीन
मी तर म्हणते शेगडी वगैरे काही घेऊ नका. जेवणाच्या गोळ्या मिळाल्या तर किती बरं!
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 05/10/2016 - 02:43 नवीन
वैल चूल घ्या. ( चुलीच्या कडेने बोगदा काढून बाजुला एक खोटी चूल असते.इकडच्या जळणाची थोडी धग तिकडे जाऊन तिकडे भात ,गरम पाणी होते. उष्णता वाया जात नाही.)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा