Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.

क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 05/09/2016 - 16:43
🗣 101 प्रतिसाद
लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या. कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे. एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अ‍ॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्‍या गुणिले ३० आणि अ‍ॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अ‍ॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो. आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती. तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्‍याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं. आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्‍या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्‍या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्‍याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्‍याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत. तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे. आ.न. कॅ.जॅ.स्पॅ.

प्रतिक्रिया द्या
17088 वाचन

💬 प्रतिसाद (101)
स
स्रुजा Mon, 05/09/2016 - 16:48 नवीन
ही साईट घे: https://www.raspberrypi.org/ बाकी रुमाल टाकुन जाते आहे.
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/09/2016 - 16:48 नवीन
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे देतात तर मुलायम बनियन नक्कीच असेल.
  • Log in or register to post comments
आ
आदूबाळ Mon, 05/09/2016 - 17:13 नवीन
आणि चपळ रासबेरी पायसुद्धा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Mon, 05/09/2016 - 16:48 नवीन
शालगर मध्ये बघा, दणकट पायजमे देतात तर मुलायम बनियन नक्कीच असेल.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 16:59 नवीन
दणकट मंजे णेमका किती दणकट असेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
घ
घाटी फ्लेमिंगो Tue, 05/10/2016 - 10:55 नवीन
दहाव्या मजल्यावरुन उडी मारा... बाकी सगळं फाटेल पण पायजमा नाय...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/11/2016 - 05:31 नवीन
पण पायजमा नकोचं आहे. पंचा सुचवा असा असेल तर. किंवा बन्यन. ;)!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटी फ्लेमिंगो
घ
घाटी फ्लेमिंगो Wed, 05/11/2016 - 07:52 नवीन
असूंदे एक पायजमा... हातखर्चाला...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
प
प्रीत-मोहर Wed, 05/11/2016 - 08:30 नवीन
हातखर्चावरुन हातरुमाल आठवला तो बी असुंदेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटी फ्लेमिंगो
घ
घाटी फ्लेमिंगो Wed, 05/11/2016 - 10:01 नवीन
हां... हातरुन पाउन पाय पसरावेत...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर
ब
बोका-ए-आझम Wed, 05/11/2016 - 10:08 नवीन
धुंद रवींनी घेतलेली? श्रीखंडात शेझवान नूडल्स मिसळून हिरव्या पिवळ्या कापडावर मांजर ओकलेली? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Wed, 05/11/2016 - 10:59 नवीन
ह्या ह्या ह्या. नको बॉ. एवढं नक्षीकाम डोळ्याला अंमळ सहन होत नाही. ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
र
राघवेंद्र Mon, 05/09/2016 - 16:49 नवीन
ऋन्मेऽऽष भौ इकडे कुठे ?
  • Log in or register to post comments
अ
अत्रन्गि पाउस Mon, 05/09/2016 - 16:50 नवीन
मला वाटते इतक्या अतिभव्य, मत्सरजनक, उत्साहवर्धक आणि केवळ स्तुत्य अशा पगारवाढी नंतर प्रथम हात रुमाल विकत घ्यावेत .... किती दिवस तोंडाला 'पाने' पुसून घेणार ??
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 16:52 नवीन
हातरुमाल आहेत हो डझनाने. नारायणानं आख्खं बॉक्स आणुन आपटलेलं. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रन्गि पाउस
ट
टवाळ कार्टा Mon, 05/09/2016 - 17:06 नवीन
तो शब्द अडिच अक्षरी आहे ...बाकी बनियान आणि लुंगीचे फोटोच दिले अस्ते इथे पण मग माझ्या आयडीला घोडे लावले जातील =))
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:11 नवीन
मुर्ख हा शब्दही अडिच अक्षरीचं आहे. =)) बाकी णो कमेंट्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
अ
अजया Mon, 05/09/2016 - 17:19 नवीन
बनियन विकत घेता येईल एवढी पगारवाढ. ऐश आहे मग.सायकलवरून बनियन विकणारा एक जण पुण्यनगरीत नुकताच दिसलाय.घरात काही फुटकी भांडी असतील तर देऊन बघ मिळतो का ते.आणि तो गिफ्ट पॅक करुन एच आर ला दे.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:39 नवीन
बनियन विकत घेता येईल एवढी पगारवाढ.
तो पण चक्कं नवा घेता येईल. =)) बाकी सायकलवाला कोण हा प्रश्ण पडलेला आहे =)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया
ट
टवाळ कार्टा Tue, 05/10/2016 - 07:38 नवीन
पुण्यात सायकल चालवणारा एकच आहे का रे =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सतिश गावडे Mon, 05/09/2016 - 17:28 नवीन
रासबेरी पायसाठी प्रतिसाद वाचत राहीन. मी आरडुइनो बोर्ड विकत घेतला होता मात्र दोन एलिडीचा "डिस्को लाईट"चा प्रोग्राम बनवल्यानंतर माझा उत्साह मावळला.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:38 नवीन
व्यनि करतोय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
ट
टवाळ कार्टा Tue, 05/10/2016 - 07:38 नवीन
मला पण पाठव रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
S
sagarpdy Wed, 05/11/2016 - 15:02 नवीन
मला पन, मला पन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
ज
जव्हेरगंज Mon, 05/09/2016 - 17:35 नवीन
मस्त खुसखुशीत लेखन !!!
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी Mon, 05/09/2016 - 17:36 नवीन
खुसखुशीत लेखन.
  • Log in or register to post comments
ज
जेपी Mon, 05/09/2016 - 17:37 नवीन
धागा समजुन सांगितल्यास सत्कारात पंचा,बनियान आणी ते काय रासबेरी देईन..
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 17:43 नवीन
सल्ला दे रे. रच्याकने पत्ता इथे देउ का व्यनि करु?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ज
जेपी Mon, 05/09/2016 - 17:50 नवीन
जल्ला मला धागा चारदा वाचुन पण कल्ला नाय.. आणी सल्ला देण्या ऐवढा हुशार असतो तर !. ईंजिनीयर...बॅरिष्टर.किंवा गेला बाजार मिपाचा सासं किवा संमु झालो असतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो
स
सतिश गावडे Mon, 05/09/2016 - 18:09 नवीन
पंचा आणि बनियन तुम्हाला माहीती असेलच. रासबेरी पाय काय प्रकरण आहे हे समजून घेण्यासाठी हभप प्रगोमहाराज सातारकर यांच्याशी संपर्क करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
न
नाखु Tue, 05/10/2016 - 05:22 नवीन
सातारकरा महाराजांचा साक्षात्कार सर्वांना होवो ही सदिच्छा!!! खालील ओळी चिमण आणि प्रतिसादींसाठी: चिमण बनियन आजकाल नंतर आटतात जसे मिपावर गेल्या पंधरवाड्यातील धागे सैराटतात तसे, तेंव्हा आधी खात्री करून घे नंतर बळजुबरीने त्या बनियनच्या पोत्यात न मावणारा ऐवज कोंबण्यात काय हशील? पंचाचा नेमका उपयोग काय करणार आहेस? म्हणजे लुंगी-कम पंचा का फक्त सचैल स्नानोत्तर अंगावरील जलबिंदु हळुवार् टिपण्यासाठी? संदर्भ इथे पहा. पंचाचा उपयोग दोघांनाही राहिला तिसरा नग त्या बद्दल आम्ही अडाणी आहोत सबब प्रगोने प्रगट होऊन ज्ञान पाणपोई उघडावी.(त्यांचे नाव सुचविल्याबद्दल गावडे मास्तरांनी त्यांना पकडून आणावे असा उपसल्ला देण्यात येत आहे). प्रतिसादींनी शब्दछल करून अंग पुसण्याचे वस्त्राचा अपभ्रंष करून कप्तानाला अंगवस्त्र हवे आहे असा करू नये. ता.क. म्हणजे ताजा कलम (लगेच ताक किंवा ताकाचे भांडे) असे समजून भांडु नये (फाटा तयार आहे) संक्रुती रक्षक काकांनी धाग्यावरील चर्चेवर बारीक लक्ष्य ठेउन कुठलेही वस्त्र-प्रतिसाद तोकडे पडणार नाहीत याची काळजी घ्यावी (कॉफीची परतफेड करावी) सर्वसमावेशक परोपकारी नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे
च
चौथा कोनाडा Mon, 05/09/2016 - 17:55 नवीन
:-))) अफलातुन "पीळ"दार लेखन ! :-)) छाजेड होजियरी, पिंचिंवाडी मधे एक डझन नग (६ बनियन+६ पंचे) घेतल्यास रास्बेरी पाय फ्री अशी जाहिरात दै. संध्यानंद मध्ये वाचल्याचे स्मरते. मा.तं. गबरूंची तिथे गर्दी झाल्याचा फोटो पण होता त्या जाहिराती खाली. (*माहिती तंत्रज्ञान)
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Mon, 05/09/2016 - 18:12 नवीन
ह्या ह्या ह्या. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौथा कोनाडा
ह
हेमन्त वाघे Mon, 05/09/2016 - 18:35 नवीन
३ च घ्या http://www.amazon.in/Raspberry-Model-RASPBERRYPI-MODB-1GB--built-Bluetooth/dp/B01CCTXDPU/ref=sr_1_1?ie=UTF8&qid=1462810789&sr=8-1&keywords=raspberry+pi+३ अमाझोन वर ३२०० ला आहे फायदे ब्लूटूथ आणि वाय फाय आहे त्यामुळे २ USB पोर्ट वाचतील मग ४ USB पोर्ट पुरावेत काही जन याला २.५ AMP चा चार्गेर लागेल असे सांगतात..
  • Log in or register to post comments
उ
उगा काहितरीच Mon, 05/09/2016 - 18:39 नवीन
सर्वप्रथम जोरदार पगारवाढीबद्दल दणकाऊन अभिनंदन .... आता मुख्य विषयाला सुरूवात करू. पहिला प्रश्न बनियन संदर्भातील आहेना! मुळात बनियन का घालतात लोक ? हाच मोठा प्रश्न आहे. काही अडत नाही बनियन नाही घातली तर. तुमचे एचआर वाले लोक टाय नाही वापरला, बूट नाही घातले तर मेल करतील पण बनियन नाही घातली म्हणून थोडीच मेल टाकून बेजार करणार आहेत ? त्यामुळे बनियन घालायचीच नाही. ओक्के ? दुसरा प्रश्न पंचा कम टॉवेल , हं याला सहमती बिंदास वापरा कारण याचा उपयोग भरपूर प्रकारे होऊ शकते. पंचा, टॉवेल, हे तर तुम्हीच सांगितले याशिवाय उन्हाळ्यात पांघरायला मस्त पर्याय आहे. पोळ्या करताना हात भाजू नयेत म्हणून वापरता येईल. अॉफिस मधे टीशू पेपर संपले की काढायचा पंचा बाहेर हात पुसायला म्हणून लगेच टिशु आणून ठेवतील लोक. अॉफिसमधे टिफीन बॉक्सच्या ऐवजी पंचातच पोळ्या बांधून न्यायच्या मुद्दाम एचआर सोबत जेवायला बसायचं आणि एकदम स्टाईलने पंचातल्या पोळ्या बाहेर काढायच्या . पोळ्यात लोंचं लपवलेलं असेल तर लै भारीच. बसस्टँड, रेल्वेस्टेशन वर, हॉटेलात गेलात तर मस्त बोटं बुडवलेले पाणी आले तर पंचाने गाळून घ्यायचे. वडापाव खायचा असेल अन् तेल जरा जास्तच वाटत असेल तर वडा पंचात ठेवून पिळायचा अन् खायचा सगळं तेल पंचा शोषून घेतो. अहो श्री श्री पंचपंचेश्वर महामहोध्यायांनी (इथे मी स्वतःचे हात स्वतःच्या कानाला लावले असून जिभ दाताखाली चावली आहे . नोंद घ्यावी. ) लिहीलेला "अद्भुत पंचाचे पंचहजार उपयोग" हा संदर्भग्रंथ वाचावा. इथे तुमचा दुसरा प्रश्न काही अंशी सोडला . आता राहिले रासबेरी पाय बद्दल . मला तरी नाही आवडलं हे. एक तर लिमीटेड फंक्शनॕलिटी. हार्ड ड्राईव्ह नाही. काय करणार घेऊन.याला प्रोग्राम करणे भलतं क्लिष्ट असावं. (मित्राचा प्रोजेक्ट बहुतेक बारगळणार यामुळेच) तुम्ही याचा नेमका काय उपयोग करणार हे कळालं तर त्यानुसार माहिती देता येईल. असो आवरतं घेतो आता. पुनश्चः एकवार भरघोस पगारवाढ झाल्याबद्दल भरघोस अभिनंदन .
  • Log in or register to post comments
स
सस्नेह Mon, 05/09/2016 - 19:15 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
र
रातराणी Mon, 05/09/2016 - 20:16 नवीन
खी खी खी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/10/2016 - 03:27 नवीन
ख्या ख्या ख्या. सदर मट्रीयलनं गेंडा डेड स्किन निघेल का पण? चुकुन नं धुता वापरला गेला तर आग आग व्हायची =)) रच्याकने गेमाडपंथी माणसा पुढचा धागा कुठं आहे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कवितानागेश Tue, 05/10/2016 - 08:33 नवीन
अवांतर: मिस्टर बीन आठवला. एकदा त्यांनी पायातले मोजे त्यात मिरी ठेऊन नंतर बुटांनी कुटायला वापरलेत. आणि एकदा झोपण्यासाठी शांतता हवी म्हणून कानात एक बाजू बोळा करून कोंबलीये. मग ते मोजे भूभूच्या कानासारखे दिसतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
ब
बोका-ए-आझम Wed, 05/11/2016 - 10:11 नवीन
धी गिरगांव पंचे डेपो (आमची कुठेही शाखा नाही आणि इथे जानवीजोडही मिळतील) मध्ये लावायचा आहे. लवकर पाठवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच
क
कंजूस Mon, 05/09/2016 - 19:08 नवीन
एक सोलर क्याप हवीच.डोका थंड राहातो.फ्लॅपमध्ये पंखा असतोय.सोलर प्यानेलवर फिरतो.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 05/09/2016 - 19:17 नवीन
कॅप्टन तुमास्नी बनेल म्हनायचंय का? आम्च्यात बनेल म्हनतात...
  • Log in or register to post comments
स
सूड Mon, 05/09/2016 - 19:19 नवीन
आमच्यात मानसं बनेल असतेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
ख
खटपट्या Mon, 05/09/2016 - 19:25 नवीन
ह्म्म, तेच बोलनार होतो. मिपावर सगळीच बनेल हायती..काय कळंना झालंय.. बाकी एक भोकाभोकाचा बनेल पन आसतोय. तो चालल का कप्तानास्नी. लय हवेशीर बगा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
ए
एस Mon, 05/09/2016 - 19:17 नवीन
पराचा एक धागा आठवला.
  • Log in or register to post comments
म
मारवा Mon, 05/09/2016 - 19:24 नवीन
त्यामुळे माझ्या भावना किती दुखावल्या आहेत ते सांगायला माझ्या कडे शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Tue, 05/10/2016 - 03:28 नवीन
भावना का दुखावलीये म्हणे? ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा
म
मारवा Mon, 05/09/2016 - 19:24 नवीन
त्यामुळे माझ्या भावना किती दुखावल्या आहेत ते सांगायला माझ्या कडे शब्द नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मम्बाजी सर्वज्ञ Mon, 05/09/2016 - 19:26 नवीन
रासबेरी पाय घेऊन करणार काय ते आधी ठरवा. म्हणजे हेतू काय? उत्तर सोप्पे आहे - जे लेटेस्ट मोडेल आहे ते घ्या. पण त्यातल्या काम्पोनंत्स चा उपयोग खरच करणार आहात का ते आधी ठरवा. 'मोटारसायकल कुठली घ्यावी' या प्रश्नासारखाच हा प्रश्न आहे. मला एलिमिनेटर आवडली म्हणून तुम्हालाही ती आवड्लीच पाहिजे असे नाही. जर एक दोन मित्रांच्या गाड्या चालवून बघितल्या तर अंदाज येतो आपली आवड कशात आहे ते... हि साईट पहा - https://hackaday.io/
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 05/09/2016 - 19:30 नवीन
बाकी आम्च्या बनेलवर आम्ची कारभारीन टपलेलीच आस्ती बगा. कदी येकदा म्या तो वापरायचा थांबतू आनी कदी येकदा ती तो पाय पुसायला वापरतेय...बाकी टीवी बनेलने चांगला पुसला जातो आसं तीच एक आपलं नीरीक्शान हाये..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा