पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.
लेखनविषयः पंचा, बनियन आणि रास्बेरी पाय विकत घ्यायचे आहेत सल्ला द्या.
कित्येक लोकांना हे विडंबन वाटेल पण हे विडंबन नसुन वस्तुस्थिती आहे हे कृपया लक्षात घेऊन मौल्यवान मार्गदर्शन करावे.
एप्रिल संपला. एप्रिलच्या अगदी पहिल्या दिवशी नाही पण शेवटच्या आठवड्या अॅप्रायजल आणि गोल सेटिंग नामक शिनेमा दाखवुन कंपनीनी एप्रिल फुल (खरं तर ** बनवलयं, पण संपादकिय धोरणं, असांसदिय शब्दांचा वापर वगैरे कारणाने धागा उडु नये म्हणुन सोयीसाठी आपण मुर्ख असा द्वयाक्षरी शब्द चांदण्यांमधे टाकु) केलं. गोल सेटिंगमधे आत्ताच्या जबाबदार्या गुणिले ३० आणि अॅप्रायजलचा आकडा ०.०००००००१२००००१२००००२३१२% अॅप्रायजलचा आकडा ऐकुन श्रावणमाशी हर्शमाणषी हिरकळ दाटे चोहिकडे ह्या अजरामर गाण्यावर एचार कमुणिकेशन्स कम पेरोल पेशालिस्ट नामक चिंधीचोर व्यक्तीच्या केबिन नामक तुरुंगामधे नाचायची इच्छा झालेली. ह्या इसमास लाज, लज्जा, शरम इत्यादी गोष्टी अजिबात म्हणजे अजिबात नसल्याने ते कष्ट आवरले. मात्र जाता जाता थँक्यु सर, अता पुढच्या पगारापासुन नवे बनियन विकत घेउ शकिन म्हणुन शाब्दिक थोबाड फोडुन बाहेर पडलो.
आता फार अवांतर करत नाही. तर अतिभव्य प-गार वाढ झाल्याने यंदा बन्यन, पंचे, लेंग्याच्या नाड्या आणि रास्बेरी पाय घ्यायचा विचार आहे. माझ्या अपेक्षा वगैरे मी सांगतोचं पण मिपाकरांनी आपला काही मिलियन तासांचा अनुभव इथे सांगुन एक नमुना निवडायला मदत करावी अशी विनंती.
तर आता हे प्रश्ण पंचापासुन सोडवायला सुरुवात करु (प्रश्ण सोडवायचा आहे पंचा नव्हे). पंचा रंगीबेरंगी पाहिजे आणि त्यातला मुख्य रंग लाल हवा. शक्यतो गोळ्या-गोळ्यांचं डिझाईन असणारा पंचा/ टॉवेल वगैरे मिळाला तर उत्तम. टॉवेल/ पंचा जो काय असेल तो वर्साटाईल असावा अशी एक माफक अपेक्षा आहे. एकंदर उन्हाळी परिस्थिती लक्षात घेता "चला हवा येउ द्या" लुंगी म्हणुन वापरता यायला हवा. झालचं तर अम्हाला उंचं उंचं पर्वतांवर ट्रेकिंग करायची लैचं हौस असल्याने वं कित्येक वेळा ह्या उंच कड्यावरुन उडी मारुन पॅराग्लायडींग करत करत खाली उतरता आलं तर काय बहार येईल वगैरे विचार डोक्यामधे येतं असल्याने पॅराशुट किंवा अनफ्रेम ग्लायडर म्हणुन वापरता येणारा पंचा उत्तम. टर्किश टॉवेल नकोत. नाजुक असतात ते. बर्याचं मिपाकरांनी वैयक्तिक व्यनिंमधुन, कायप्पावरुन गेंड्याची कातडी वगैरे गौरवास्पद उद्गार काढलेले असल्याने गेंड्याची डेड स्किन निघुन जायचं जे काय मटेरिअल असेल ते मिळालं तर अतिउत्तम. काही मिपाकरांना अश्या मटेरिअलचे पंचे वापरायची सवय आहेचं त्यांनी आपलं मत नक्की सांगावं.
आता बनियनला हात घालु. बनियन म्हणजे बनियनचं हवा आहे. बंडी, उन्हाळी पातळ सदरे वगैरे नको आहेत. बनियनविषयीच्या अमच्या अपेक्षा फार म्हणजे फारचं माफक आहेत. बनियनचं कापड सफेदचं हवं. उगीचं हिरवे-पिवळे, पोपटी, सप्तरंगी रंगाचे वगैरे अजिबात नको. बनियन विकत घेताना जाळीदार नको. सदर बनियन अंगावर घालायचा असुन मासे पकडायला वापरायची इच्छा नाही. बनियन घालुन रस्त्यावर मारामार्या करताना किमान ४ आणि कमाल कितीही सुंदर्या येउन चिकटायला हव्या असा बनियन सुचवणार्याला अर्धा रुमाल (नाक नं शिंकरलेला, फक्तं हात आणि चेहेरा पुसण्यासाठी वापरलेला) बक्षिस देण्यात येईल. बनियन हाप शर्टाच्या बाहिमधुन बाहेर यायला नको वगैरे अपेक्षा पुर्ण झाल्यास कोळश्याहुन काळं.
आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रास्बेरी पाय नामक तळहात संगणक विकत घेणे आहेत. ह्याच्या कैक वर्जन्स असल्याने आणि लिनक्षीचा वापर करायची "अभिनव" अक्कल अमच्याकडे नसल्याने कंचा घ्यावा हा प्रश्ण आहे. शक्यतो टॉप स्पीड आणि र्याम १ जीबी वालं पाय ३ नामक इ-फळकुट विकत घ्यायचा विचार आहे. आधी एका मिपाकर मित्राकडुन निराधारको उधार बेसिस वर आणुन प्रोग्रामिंग शिकायला सुरुवात करायचा विचार आहे. तर सल्ला द्या ब्रे. GTIO/ COM port साठी काही ब्रेडबोर्ड्स, जंपरतारा, रिले वगैरेही सुचवावेत.
तर धागा उडायच्या आत सल्ले द्या ब्रे. कळावे.
आ.न.
कॅ.जॅ.स्पॅ.
💬 प्रतिसाद
(101)
स
सूड
Mon, 05/09/2016 - 19:41
नवीन
तुमच्या ब्रॅन्डच्या बनेलने रास्बेरी पाय पुसता येतंय का?
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 05/09/2016 - 20:00
नवीन
"रास्बेरी पाय" त्ये काय आसतंय ??
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 05/09/2016 - 20:05
नवीन
रासवट पायांची त्वचा मुलायम व्हावी म्हणून त्यावर बेरी चोळतात. सुड्रावांना ते पाय पुसण्यासाठी बनेल हवे असावे असे वाटते.
- Log in or register to post comments
ख
खटपट्या
Mon, 05/09/2016 - 20:17
नवीन
बनेल बरोबर बाकीच्या काप्डावर पन कारभारनीचा डोळा आस्तो. आता आवरतो.... :)
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 05/10/2016 - 02:35
नवीन
त्यावर पाय पुसले पिळले की शेटला तुडवल्याचा फील येतो.
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 05/10/2016 - 08:03
नवीन
श्लेष आहे का?
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 05/09/2016 - 20:20
नवीन
लोल धागा आणि प्रतिसाद!
बाकी टॉवेलचा उपयोग साँवरिया डान्स करायला होतो. वेरी imp .
- Log in or register to post comments
र
रेवती
Mon, 05/09/2016 - 20:28
नवीन
साँवरिया हे नाव बरोबर आहे. म्हणजे आता कपडे वेळेवर सावरा असं म्हणायचं असेल.
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 05/09/2016 - 20:30
नवीन
खिक्क. साँवरिया का सावरता!? =))
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Mon, 05/09/2016 - 20:33
नवीन
साँवरिया हा मुळचा सावराया हा मराठी शब्द असावा काय?
- Log in or register to post comments
र
रातराणी
Mon, 05/09/2016 - 20:57
नवीन
कॉलिंग मिपाचे प्रा.परखडकर =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/10/2016 - 06:11
नवीन
रा रा श्री श्री बॅटोबांशी संवाद झाला आणि त्यांनी दिलेल्या माहीतीनुसार...
फार पुर्वी एका घरात नवपरिणीत दांपत्यास (अर्थात मुंबईत) चाळीमध्ये पुरेसा एकांत मिळत नव्हता. सासु-सासरे,धाकला दीर्,धाकली नंणंद ई मुळे सतत घरात कूणी ना कुणी सतत असायचेच. अता नवविवाहितेला एक उपाय सुचला. तीने टेरेसवर पक्षी छतावर वाळत टाकलेले कपडे आणताना आप्लया नवरोबाला बोलवायचे ठरविले. त्या प्रमाणे नवरा अंघोळीला गेला आणि (नेहमीच्या जन्मजात धांदरटपणामुळे) आंघोळ झाल्यावर फक्त पंचाच आहे बाकी वस्त्रे ठेवली नाहीत बदलायला हे त्याला आंघोळ झाल्यावर्च उमगले , मग काय आधी शिरस्त्या प्रमाणे (उगा वाद विवाद नको म्हणून) आईला विचारून पाहिले. अश्या वेळीस कर्तबगार व धोरणी असल्याने सासूने ही बाब तू तुझ्या बायकोकडे जाऊन सोडव असा रास्त सल्ला दिला.
आपले महाशय तसेच पंच्यावर चाळीच्या छज्यात आले आणी त्यांच्या घरातील गुप्तहेरांनी वहीनी टेरेसवर वाळत टाकलेले कपडे आणायला गेली आहे असे सांगीतले. नवरोबाच तो खेकसायची संधी थोडीच सोडणार. त्याने जागेवरून्च तीच्या नावाहा घोषा लावला (आणि आईला आपण टीएम्सी नाही हे दाखवायचा प्रयत्न केला)
आप्ली कथानायिकाही हुषार तिने खुणेने वर ( टेरेसवर ) ये असे सांगीतले. पण ने.ज.धा. ला कळेत तर शप्पथ्,मग शेवटी ती लाडीकपणे म्हणाली "सांगते वरती या."
त्याचे अपभ्रंष होऊन सांगते वरती या. असे झाले.
बाकीचे उत्पत्ती दावे हे कप्लनाविलास आहेत असेही त्यांनी आवर्जून सांगीतले.
मिपाकरांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.
तत्पर नाखु
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Mon, 05/09/2016 - 20:51
नवीन
मिपाचा दुरुपयोग वाचून शरम वाटली.
एक पंचा दे रे डोळे पुसायला...
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Mon, 05/09/2016 - 21:36
नवीन
पगारवाढीबद्दल अभिनंदन कप्तानसाहेब. बाकी आमचीही पगारवाढ तुमच्यागतच अतिभव्य वगैरे. लोकं मारे मोदी आला मोदी आला म्हणून अच्चेदिन आलेच म्हणतायत पण भेंडी पगारवाढीत अजूनही बुरेदिनच आहेत. जोवर पगार धडपणी वाढत नै तोवर कै अच्चेदिन आले असे म्हणू शकत नै.
- Log in or register to post comments
क
कंजूस
Tue, 05/10/2016 - 02:38
नवीन
पगारवाढीत कोणाला कमिशन जातंय ते शोधा.उगाच मोदी का दिसतोय ( मोदी का दिसताहेत ) पाण्यात?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 03:31
नवीन
हे हे हे. नशिब % चं वापरलाय. मल्टिप्लायर म्हणुन वापरला असता तर शनिवारवाडा "चौपाटी" ला भेळेची गाडी टाकावी लागली असती. ;) ;)!!
- Log in or register to post comments
व
वैभव जाधव
Mon, 05/09/2016 - 21:44
नवीन
पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याने झालेली बचत ही एक प्रकारे पगारवाढ च आहे एवढं बोलून धाग्याला इंधन दिल्या गेल्या आहे. :-)
- Log in or register to post comments
म
मितान
Tue, 05/10/2016 - 02:45
नवीन
पायबीय ठीक आहे पण पंचा परवडेल असं वाटत नाही. तेव्हा नात्यातल्या माताभगिनींना या डिजाईंची ओढणी किंवा साडी आहे का विचारा. साडी असेल तर 3 पंचे होतील. पुढल्या वर्षभराची सोया होईल.:P
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 03:33
नवीन
_/\_
नाहि ओ. किमान ४ वर्ष टिकला पाहिजे असा दणदणीत पाहिजे. तोपर्यंत जरा रिकरिंग करुन नव्याची सोय करता येईल.
(वराहअवतारी पेरोल पेश्शालिस्ट ला हा लेख दाखवायला हवा) =))
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/10/2016 - 05:28
नवीन
तुला प्छा पंचा हवा आहे असे स्पाष्ट साम्ग लोक तोंड लपवायचा स्कार्फ देणार नाहीत. आणि हो ओढणीचे लोढणे अजिबात स्वीकारू नकोस असे नाही असे नाही.
पुन्हा खुलासेदार नाखु
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 05/10/2016 - 05:29
नवीन
लेंग्याच्या नाडीची सोय झाली का?
बनेल,पंचा वगैरे मिळालेलं दिस्तंय. जुने बनेल फाडुन ते कंपनीत फावल्या वेळात वातीसारखे वळून तू नाडी बनवू शकतो.याचे दोन फायदे होतील.तुला नाडीशास्त्र कळेल आणि साईड बिझनेसमुळे उत्त्पन्नात भरघोस वाढ होईल.
बघ ट्राय करुन.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/10/2016 - 05:34
नवीन
नाड्या आवळण्यार्या माणसाला नाड्या बनवण्याचे काम देऊन तुम्ही मुलभूत कौशल्याचा आणि अंगभूत गुणांचा उपयोग करून घेत नाहेत याचा मला आज मिपाकर म्हणून निशेढ करावा वाटातो.
सजग नाखु
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 06:18
नवीन
सिक्सर पे सिक्सर क्या बात क्या बात.
रच्याकने नंतर त्या नाडीची समईची वात करता येते. वातीच्या राखेचा दंतमंजन म्हणुन उपयोग करता येतो. लघुउद्योग बरेचं करता येतात=;)!!!
- Log in or register to post comments
अ
अजया
Tue, 05/10/2016 - 05:44
नवीन
स्वयंरोजगाराला कमी लेखणाऱ्या तुमचाच निषेढ.स्वतःच्या हाताने बनवलेली नाडी आवळणे म्हणजे निव्वळ भाग्ययोग.
- Log in or register to post comments
न
नाखु
Tue, 05/10/2016 - 05:53
नवीन
त्याने आ(गळा) आवळावा असा सल्ला देत असाल तर निशेढ मागे घेण्यात येत आहे.
यशस्वी माघार नाखु
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 06:18
नवीन
फाशीच्या कैद्याला स्वतःच्या फाशीचा दोर स्वतःच बनवावा लागतो म्हणे. तसं वाटलं २ मिनिटं.
- Log in or register to post comments
स
सतिश पाटील
Tue, 05/10/2016 - 07:25
नवीन
माझेही बनियान एका महिन्यात लगेच पिवळे पडतात. त्यामुळे यापुढे पिवळ्या रंगाचेच बनियान घेण्याचा विचार चालू आहे.
आणि चड्डीला देखील एका महिन्यातच मागच्या बाजूला तोफगोळे पडल्यासारखे भोके पडतात.आणि ते सुइधगा घेऊन शीवताही येत नाहीत.
रूपा पासून माय्क्रोम्यान आणि जॉकी स्पोर्ट्स पासून रस्त्यावर मिळणाऱ्या ३० रुपयाला २, सगळे प्रकार वापरून पहिले.
नुसत्या चड्ड्या वरच पगाराचा मोठा भाग खर्च होतोय. आता डिसेंबर महिन्यात गावाला याल्लामाची जत्रा आहे, तेव्हा त्या जत्रेत मिळणाऱ्या आडव्या रंगीबेरंगी पट्ट्यांच्या चड्ड्या घेण्याचा विचार आहे.
तोपर्यत काय करावे, कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 05/10/2016 - 07:31
नवीन
बनेलसाठी जिलबी आणि चड्डी साठी कडधान्ये यांचे प्रमाण कमी करा.
- Log in or register to post comments
ब
बॅटमॅन
Tue, 05/10/2016 - 21:12
नवीन
खास बुव्याला शोभेलसा खौट प्रतिसाद, भेंडी कसेकाय दुर्लक्ष झाले हिकडे लोकांचे काय माहिती. =))
(चना मसाला फॅन) बॅटमॅन.
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Tue, 05/10/2016 - 07:38
नवीन
तुम्चे कौशल्य वादातीत आहे
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 05/10/2016 - 07:51
नवीन
अरेरे, काय हे दुर्दैव!!
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 05/10/2016 - 10:45
नवीन
भोकं पडलेल्या बनेल एकाला एक जोडून लंगोट शिवून घेत चला. बघा किती चालतंय, आमच्या वेवस्थित टिकत असलेने काय अन्भव नाही.
- Log in or register to post comments
अ
अभ्या..
Tue, 05/10/2016 - 10:52
नवीन
कसं बे सूडक्या?
बनेल जोडून लंगोट शिवायची आय्डीया काय व्हिज्युअलाइझ होइना. :(
अर्थात आमचे व्यवस्थित चालत असलेने सांगितले नाहीस तरी चालेल म्हणा पण......
- Log in or register to post comments
स
सूड
Tue, 05/10/2016 - 11:17
नवीन
खांद्यावरचे बंध कापून टाकायचे (ते नाडीला वापरता येतील.) मग उरलेल्या कापडात आपापल्या कल्पनाशक्ती प्रमाणे कलाकारी दाखवावी. ;)
- Log in or register to post comments
य
यमगर्निकर
Tue, 05/10/2016 - 11:14
नवीन
विम बार एवजी कपड्यांच्या साबनाने कपडे धुवुन बघा,
- Log in or register to post comments
प
पैसा
Tue, 05/10/2016 - 07:42
नवीन
घसघशीत पगारवाढीबद्दल हाबिणंडण! तुला नै तरी वाचवलेल्या पगारामुळे तुझ्या कुंपणीला अच्छे दिन येनार नक्की. तेवढी समाजसेवा केल्याबद्दल धन्य वाटून घे.
लक्ष्मी रोडवर पंचे, नाड्या आणि बनेन होलसेल खरेदी झाली की एक घालूनच हापिसात जा. एवढ्या पगारात हाच ड्रेस परवडतो म्हणून सांग आणि यच्च आर पासून सी ईओ पर्यंत सगळ्या हापिसराना हाच युनिफॉर्म कंपल्सरी करावा. पाहिजे तर आपण सप्लाय ऑर्डर घेतो म्हणून ऑफर दे.
रास्पबेरी पाय बद्दल व्हॉट्स अॅपवर बोलणे झालेच आहे. माझ्याकडे लुबुंटु ओएस वाला बानाना पाइ आहे. त्याचे स्पेसिफिकेशन्स रास्पबेरी पाइ पेक्षा चांगले आहेत. मात्र रास्पबेरीची नवी मॉडेल्स बघायला हरकत नाही. हा पाय जर तू ल्यापटोपाबदली वापरणार असशील तर आता असलेला ल्यापटोप मला दान केलास तरी चालेल. तुला सत्पात्री दान केल्याचे पुण्य लाभेल.
https://www.crazypi.com/ ही एक साईट आहे. तिथून किंवा अमेझॉन, स्नॅपडील, अलीएक्सप्रेस कुठूनही तुला आवश्यक तो पाय मिळू शकेल.
- Log in or register to post comments
स
सतिश गावडे
Tue, 05/10/2016 - 07:52
नवीन
रासबेरी पाय अमेरीकन पाय आहे का?
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 05/10/2016 - 09:17
नवीन
ते लैचं येगळं प्रकर्ण आहे सगाशेठ!!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 05/11/2016 - 10:17
नवीन
येवढय उड्या मारताय, नक्की तुम्हाला चांगली पगारवाढ मिळाली असणार. चिल्लरमध्ये पगार वाढलेले लोक थुतरीत मारल्यासारखे गप बसुन राहतात..धागे काढत नाईत कै.. आम्ही बघा, पगार हा शब्द तरी काढलाय का मागच्या ५ वर्षात ;)
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Wed, 05/11/2016 - 10:27
नवीन
खिक्क...बाडिस
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/11/2016 - 11:03
नवीन
अरारा....वेठबिगारी कायद्याने गुन्हा आहे हे तुमच्या हापिसला कळवा ब्रे. =))
रच्याकने तुम्हाला मिळत असलेल्या पगारात तुम्ही समाधानी आहात म्हणजे किमान १६ आकडी पगार येत असावा किंवा तुम्ही अल्पसंतुष्ट, वर्कोहोलिक आणि कुंपणीप्रेमी असणार. ;)!!!
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 05/11/2016 - 11:23
नवीन
आम्ही कामच करत नाही.. आहे तोच पगार कंपनी धर्मार्थ म्हणुन वाटते असे वाटते अनेकदा!! पण येस.. आम्ही अल्पसंतुष्ट आणि (धर्मादाय) कुंपणीप्रेमी आहोत.. मिपाहोलिक आहोत.. त्यासाठी पगार वाटायचं ठरवलं तर १६ आकडी पगार मिळु शकेल. अनेकदा डोक्यात ह्याला असा प्रतिसाद देऊ, त्याची खव उचकुन पाहु.. खफ पाहिला नाही बर्याच दिवसात.. असलेच विचार असतात!!
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/11/2016 - 13:06
नवीन
कोणती हो कंपनी. कॅड-कॅम साठी असेल तर णक्की सांगा. म्हणजे घरी आराम करुन दमुन हापिसात चार तास झोपायला येउ शकु =))
- Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर
Wed, 05/11/2016 - 13:13
नवीन
सध्या जरा डबघाईला आलीये कुंपनी. आहेत त्यांनाच काढायलेत. मीच रामराम ठोकालाय. पुन्हा दारं उघडली तर कळवते. कॅडला लई स्कोप हाय.
- Log in or register to post comments
क
कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 05/11/2016 - 14:06
नवीन
अरारा....नक्की सांगा.
- Log in or register to post comments
द
दुर्गविहारी
Fri, 05/13/2016 - 13:05
नवीन
कप्तानसाहेब, जरा उशिरा प्रतिक्रिया देतोय. या अनुभवाचा काही उपयोग होतो का ते पहा ?
माझी लुंगी खरेदी
- Log in or register to post comments
म
मुक्त विहारि
Fri, 05/13/2016 - 16:06
नवीन
असो...
शतकासाठी शुभेच्छा...
- Log in or register to post comments
स
सिरुसेरि
Sat, 05/14/2016 - 08:43
नवीन
रासबेरिसाठी मॅप्रो हा चांगला ब्रँड आहे .
- Log in or register to post comments
स
संजय पाटिल
Sat, 05/14/2016 - 13:20
नवीन
शंभर करा रे कुनी तरी..
- Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा
Sat, 05/14/2016 - 13:26
नवीन
१००
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- ›
- »