नामांतरीत आयडी
मिपावर जसे वैविध्यपूर्ण लिखाण्/विचार वाचायला मिळतात तसेच वैविध्यपूर्ण आयडी देखिल समोर येतात.
काही काळ लेख,प्रतिसाद वाचून एकेका आयडीचा अंदाज यायला लागतो. हे आयडी बदलतादेखिल येतात. त्यामुळे आयडी बदलला की त्याच्या प्रतिसाद्/लेखांची हिस्ट्री जमेपर्यंत परत अंदाज बांधता येत नाहीत. पण स्वभावाप्रमाणे लेख प्रतिसाद यांची भाषादेखिल लपवणे कठीण असते. चाणाक्ष मिपाकर खूप लवकर कुठल्या आयडीने कुठले नवे नाव धारण केलय ते ओळखतात. डुआयडी वगैरे असेल तर लोक फार काळजी वगैरे घेउन लिखाण करतात पण मिपाकरांच्या नजरेतून वाचणे तसे कठीणच. आता आयडी बदलण्यामागे नेहेमीच काही कलुषित कारणे असतात असे नव्हे. खूप वेगेवेगळे आयडीज बघून आपणही नव आयडी घ्यावा अशीही इच्छा होत असेल.
असो एवढी प्रस्तावना कशाला तर तुम्ही ओळखलेले असे नामांतरीत (अथवा एकाच व्यक्तीचे जुने नवे आयडी अथवा डुआयडी) आयडी इथे टाकणे.. चूक की बरोबर खात्री पण करुन घेता येइल..
माझ्या माहितीतीले हे काही ..
अत्रुप्त आत्मा > अत्रुप्त > आत्मबंध
गगनविहारी > गवि
धनाजी वाकडे > धन्या > सतिश गावडे
संजय क्षीरसागर > विवेक ठाकूर
स्वॅप्स > एस
इस्पिकचा एक्का > डॉ सुहास म्हात्रे
गिरीजा > प्रसाद गोडबोले > प्रगो
माई नाना वगैरे खूप आयडी आहेत.. अचूक यादी श्रीगुरुजीच देउ शकतील!!
.
.
.
.
.
"मिपा डुआयडी एक आडवा आढावा आणि अडवा बढाया"
या आगामी ग्रंथाच्या सवलतीचे कुपन आणि १ किलो भुईमुगाच्या शेंगा १० उसाची कांडके देऊन करण्यात येईल. (वेळ व ठिकाण यासाठी जेपी भाऊम्कडे संपर्क करणे त्यांचा नंबर एस माळींकडे आहे आणि एस माळी कुठे आहे ते फक्त टक्याला माहीती आहे) वरील ग्रंथास जेष्ठ मिपाकर धन्याशेठ गावडे आणि सार्वकालीन माई यांनी प्रस्तावना कौतुक शब्द (हळदी-कुंकवासहीत दिले आहेत याची नोंद घेणे) पहिल्या १० प्रतींवर वरील नामांकीतांची स्वाक्षरी असेल असे आम्च्या सूत्रांनी कळविले आहे. सदस्य अखिल मिपा सत्कार समिती आणि जेपी मित्र परिवार , कुंथुनाथ अगलतगल सेवा समीती.