Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

उत्तराखंडात भाजपचे नाक ठेचले (?)

त
तर्राट जोकर
Wed, 05/11/2016 - 08:46
🗣 141 प्रतिसाद
नाट्यपुर्ण घडामोडींनंतर उत्तराखंड विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान होऊन रावतसाहेबांच्या पारड्यात विजयाची माळ पडली, अर्थात न्यायालयाची अधिकृत घोषणा आज येईल. ह्यानिमित्ताने भाजप कसे सूडाचे राजकारण खेळते आहे हेही समोर आले. न्यायालयाने भाजपाला दिलेले फटकारे पाहता भाजप ने ही परिस्थिती स्वतःच्या मूर्खपणामुळे, अक्कलशून्यतेमुळे व आढ्यतेखोरपणामुळे ओढवून घेतली असे वाटते. बळजबरीने राष्ट्रपती शासन लागू करणे. त्याविरुद्ध लोकांनी बोंबाबोंब केल्यावर ह्यात मोदींचा, भाजपचा काय दोष नाही, राष्ट्रपती राजवट तर राष्ट्रपती लागू करतात असे बाळबोध उत्तर नुकत्याच रांगायला लागलेल्या बाळाला समजवावे त्या थाटात भाजपचे भक्त समजवतांना दिसत होते. रावत ह्यांनी हे प्रकरण थेट न्यायालयात नेऊन आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडली व आता कुठे सत्तेच्या घोड्यावर मांड नीट बसवायचा प्रयत्न करणार्‍या भाजपाला कायदेशीर प्रक्रियेचे बाळकडू पाजले. बहुधा भाजपाला राष्ट्रपतीच्या वर भारतात कोणीच नाही असे वाटत असावे. हुकूमशाहीची स्वप्ने पाहणार्‍यांनी घटनेचा नीट अभ्यास केलेला दिसला नाही. भारतात प्रत्येक शासकिय पद कुणाला ना कुणाला उत्तरदायी आहेच. सार्वभौम, सर्वशक्तिमान असे कोणीच नाही. आहे तर ती फक्त जनता आणि जनतेच्याच पाठिंब्याने राज्य करावे अशी घटना सांगते. ह्याप्रकरणातही भाजप काँग्रेसला धोबीपछाड द्यायच्या नादात आपल्याच धोतरात पाय अडकून कसे तोंडावर आपटले हे बघून खूप मनोरंजन झाले. असेच मनोरंजन येती अजून थोडीफार वर्षे बघत बसणे भारतीय जनतेच्या हातात आहे. सो एन्जॉय.

प्रतिक्रिया द्या
17464 वाचन

💬 प्रतिसाद (141)
म
मार्मिक गोडसे Wed, 05/11/2016 - 12:41 नवीन
भारतीय राजकारणात सगळे पक्ष सारखेच.
नाही नाही 'आमचा' प़क्ष वेगळा आहे. आमच्या पक्षाला दुसर्‍यांचे घोटाळे उकरायला आवडतात. महागाई नियंत्रन,डाळ घोटाळे अशा छोट्या गोष्टीत रस नाही आमच्या पक्षाला.
  • Log in or register to post comments
त
तिमा Wed, 05/11/2016 - 13:31 नवीन
तुम्ही भाजपाप्रेमी असा वा द्वेष्टे असा, गेल्या दोन वर्षांत भाजपाने दादरी प्रकरण कन्हैय्या प्रकरण अरुणाचल विधानसभा उत्तराखंड ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी. बाकी पांच वर्षांनंतर जनता योग्य तो निवाडा करेलच.
  • Log in or register to post comments
र
रंगासेठ Mon, 05/16/2016 - 12:58 नवीन
>>ही प्रकरणे अत्यंत वाईट पद्धतीने हाताळली आहेत, तसेच पक्षातल्या वाचाळवीरांची तोंडे बंद ठेवण्यांत ते पूर्ण अपयशी ठरले आहेत, या मुद्द्यांवर तरी सर्वसहमती असावी.<< +१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा
आ
आरोह Wed, 05/11/2016 - 20:07 नवीन
पुष्कळ(फुटकळ) प्रकरणे काढलीत...पण भ्रष्टाचाराचे एकही प्रकरण कसे नाही? असं कस
  • Log in or register to post comments
र
रमेश आठवले Wed, 05/11/2016 - 21:09 नवीन
उत्तराखंड मध्ये सगळ्या खेळीचे सूत्रधार विधानसभा अध्यक्ष कुन्जवाल हे ठरतात.त्यांनी नियमानुसार सदस्यांनी मागणी केली तर मत विभाजन करणे जरुरी होते तरी तसे केले नाही आणि अर्थ विधेयक मंजूर झाल्याचे जाहीर केले. ही मंजुरी बेकायदेशीर असल्या मुळे आता त्या राज्याचा अर्थसंकल्प लोकसभेत मंजूर करून घ्यावा लागत आहे. त्या नंतर या अध्यक्षांनी सरकार अल्प मतात येऊ नये म्हणून ९ विधायकांचे सदस्यत्व रद्द केले. हा निर्णय वैध होता कि नाही हे सर्वोच न्यायालय १८ जुलै ला ठरवणार आहे. सर्वोच न्यायालयाने केंद्र सरकार ची संमती घेऊन मगच मत परीक्षा करून घेतली आणि राष्ट्रपती शासनच्या निर्णयावर ताशेरे ओढले नाहीत. मध्यंतरी रावत यांनी पैसे देऊन मते मिळवण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केल्याचे सिद्ध झाले आहे. अशी वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:04 नवीन
जुन्या काळात सरकारे बरखास्त केली म्हणून आता बरखास्त केली होय ? बरं. मधल्या काळात जनता केजीतून पीजी ला केजीच नाय काय ?
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:05 नवीन
मधल्या काळात जनता केजीतून पीजी ला गेलीच नाय काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:05 नवीन
ओ खट टाईप करताना लक्ष देत जा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:06 नवीन
बरं देतो खटसाहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:08 नवीन
आणखी एक, गोल गोल प्रतिसाद द्यायचे नाहीत. तुम्ही भाजपच्या बाजूने की काँग्रेसच्या हे क्लिअर व्हायला पाहीजे, म्हणजे तुमची भूतकाळातली पापं उकरून काढून तुम्हाला ठोकायला बरं पडतं. ना या बाजूचा, ना त्या बाजूचा असल्य फालतू लोकांना काडीचीही किंमत नाही, काय कळ्ळं ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:09 नवीन
दोन्हीच्या बाजूचा नाही. दोन्हीच्या चांगल्या गोष्टी आवडतात. तिसरी पार्टी पण आवडते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:11 नवीन
हंगाश्शी आता सापडलं बेणं. मायचं आप्टार्ड सालं फुली फुली फुली. युगपुरूषाचे भक्त नाही का तुम्ही ? बघतोच च्यामायला तुमच्याकडे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:12 नवीन
बुहूहूहूहूहू भूऊऊऊऊऊऊ बुर्र बुर्र फुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र बुडूक बुडूक..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
ज
जेपी गुरुवार, 05/12/2016 - 06:32 नवीन
=))=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
स
साहेब.. गुरुवार, 05/12/2016 - 06:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
क
कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 05/12/2016 - 07:02 नवीन
खट साहेब, आपण वर मिपाला बहाल केलेल्या अजरामर साहित्यिक (उच्च का हुच्च) मूल्य असलेल्या शब्दांच्या जियोमेट्रिक सीरीज मधे "लूऊऊऊऊऊऊऊऊ" नामक बीजमंत्र नाही म्हणून आपला जाहिर निषेध निषेधकर्ता (प्रांतवादी सैनिक) बाप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहेब..
क
कॅप्टन जॅक स्पॅरो Fri, 05/13/2016 - 03:37 नवीन
ह्या ह्या ह्या. अजुन ३०० गोल गोल प्रतिसाद दिले असतेत तर गोल गोल खोले खुदकी पोल गेमचे विजेते झाला असतात खट साहेब ;)!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
प
पैसा Sat, 05/14/2016 - 09:27 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट
स
सुयोग पुणे गुरुवार, 05/12/2016 - 06:15 नवीन
झोपडपट्टीतील दिवस..भाग ३.. बाकीच्या गोष्टी वायफळ समजून सोडून द्या..
  • Log in or register to post comments
स
स्पा गुरुवार, 05/12/2016 - 06:31 नवीन
मिपावरील टाॅप टेन राजकारणीय आयडींचा लकडीपुलावर जाहीर सत्कार करायची इच्छा आहे, कुणि लिस्ट देईल काय
  • Log in or register to post comments
ख
खटासि खट गुरुवार, 05/12/2016 - 06:39 नवीन
शनिवारवाड्यावर सत्कार करावा असे सुचवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
प
प्रचेतस गुरुवार, 05/12/2016 - 06:40 नवीन
फडके रोडवर का नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/12/2016 - 06:46 नवीन
च्याएला एक गोष्ट समजत नाही. जर राजकारणात नसेल इंटरेस्ट तर त्या धाग्यांवर फिरकू नका ना. कोणी तुमच्यावर बळजबरी केली आहे राजकारणावरील धागे उघडून बघाच आणि प्रतिसाद द्याच ही? एकीकडे राजकारणात इंटरेस्ट नाही असे म्हणत परत राजकारणावरच्याच धाग्यांवर अशी भूणभूण मधूनमधून लावणार्‍याही टॉप टेन आयडींचा "ढोंगीभूषण" हा पुरस्कार देऊनही सत्कार त्याचबरोबर उरकून घ्या स्पाराव.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
स
स्पा गुरुवार, 05/12/2016 - 07:25 नवीन
खिक्क गॅरी तापेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 11:08 नवीन
अगदी अगदी. पूर्ण सहमत. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
त
तर्राट जोकर गुरुवार, 05/12/2016 - 06:42 नवीन
सुयोगजी, धन्यवाद. पुढचा भाग अर्धा लिहून झालाय. पूर्ण झाला की टाकतो लगेच. आता वायफळ, फुटकळ बद्दल. जेव्हा भाजपाच्या गैरसोयीची प्रकरणं असतात ती सर्व छोटी, वायफळ, महत्त्व नसलेलीच असतात मात्र काँग्रेस, केजरी यांच्याविरुद्ध किंवा मोदी-भाजपविरोधात जे कोणी आहेत त्यांनी नाक शिंकले तरी ती जीवनमरणाच्या महत्त्वाची, देश बुडायची, प्रलयाच्या महत्त्वाची गोष्ट असते असे इथल्या काही सदस्यांच्या मेगाबायटी प्रतिसादांवरुन वाटते. काही धागे इथे भाजपची आरती ओवाळायला आणि केजरीवालवर गरळ ओकायला काढलेले आहेत. त्याबद्दल कोणालाही वावगे वाटते नाही. मात्र एक भाजपविरोधी धागा निघाला की द्वेष दिसतो, आआप बद्दल, कन्हयाबद्दल कुणी चांगले लिहिलेले दिसले की कंपु त्याच्या हात धुवून मागे लागतो. असो. ही माझी निरिक्षणं. अनुमान काय काढायचा तो ज्याच्यात्याच्या सदसदविवेकबुद्धीवर अवलंबून आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 05/12/2016 - 07:45 नवीन
अर्थसंकल्प फेटाळला जात असताना मखलाशी करून कसा पारित करून घेतला आणी त्या ९ विधायकाना स्पिकरने कसे निलंबित केले यावर काय म्हणणे आहे ? हे या प्रश्नांचे मूळ आहे कि त्याबद्दल आपल्याला काहीच म्हणायचे नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 07:47 नवीन
ते फुटकळ आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ह
हतोळकरांचा प्रसाद Mon, 05/16/2016 - 09:33 नवीन
तुम्ही लाख वेळा विचारा हो, ते यावर उत्तर देत नसतात! भाजप तोंडावर हापटलीये हे सोडून बाकी सगळं फुटकळ आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम गुरुवार, 05/12/2016 - 22:10 नवीन
मग काय करणार आहात? हे जाणण्यासाठी उत्सुक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर
म
मृत्युन्जय गुरुवार, 05/12/2016 - 07:49 नवीन
भाजपाचे नाक कसे ठेचले हे कळत नाही. आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते. त्यांनी मतदान केले असता इतर संगळ्यांचे नाक ठेचले गेले असते काय?
  • Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन गुरुवार, 05/12/2016 - 10:42 नवीन
आता न्यायालयाने दिलेला असल्याने निर्णय मान्य करणे अपरिहार्य आहे पण ९ आमदारांना मतदान न करु देणे हेच मुळात असंबैधानिक आहे असे कोणी म्हणु शकते.
पक्षांतरबंदी कायद्यात अशा बाबतींमध्ये विधानसभा/लोकसभा अध्यक्षांचा निर्णय अंतिम मानला आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येत नाही. नक्की तपासून बघायला हवे. अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयावर वाद व्हायची वेळ अनेकदा आली होती. १. १९ ऑक्टोबर १९९७ रोजी मायावतींनी कल्याणसिंग यांच्या भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतर राज्यपाल रोमेश भंडारी यांनी कल्याणसिंग यांना २१ ऑक्टोबर रोजी बहुमत सिध्द करायला सांगितले. (अवांतरः याच विधानसभा सत्रात अभूतपूर्व गोंधळ झाला होता- माईक, खुर्च्या इत्यादींची फेकाफेकी इत्यादी). कल्याणसिंग यांनी काँग्रेस आणि बसपाचे आमदार फोडून आपले बहुमत सिध्द केले. त्यावेळी कल्याणसिंग यांच्या बाजूने मत देणार्‍या बसपा आमदारांची संख्या १/३ पेक्षा कमी होती (बहुदा ६७ पैकी १८). पक्षांतरबंदी कायद्याप्रमाणे सभागृहात कोणत्याही वेळी मतदान होते त्यावेळी पक्षाने जारी केलेला पक्षादेश (व्हिप) डावलून त्याविरूध्द मतदान करणार्‍या सभासदांनाही त्यांची संख्या एक-तृतीयांशपेक्षा कमी असेल तर पक्षांतर करणर्‍या सभासदांप्रमाणेच अपात्र ठरवायचे अधिकार सभागृह अध्यक्षांना आहेत.त्याप्रमाणे मायावतींनी या आमदारांना अपात्र ठरवावे अशी मागणी अध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठींकडे केली. पण ती मागणी केसरीनाथ त्रिपाठींनी नाकारली. त्याचे कारण त्यांनी असे दिले की बसपाच्या आमदारांनी मायावती या आमच्या पक्षाच्या प्रतोद आहेत असे कुठचेही पत्र त्यांच्याकडे दिले नव्हते. त्यामुळे मायावतींना पक्षादेश जारी करायचा अधिकार नव्हता. त्यामुळे त्यांनी जारी केलेला पक्षादेशच मुळात अवैध होता. २. डिसेंबर १९९१ मध्ये महाराष्ट्र विधानसभेत छगन भुजबळ आणि इतर १७ आमदार (एकूण १८) शिवसेनेतून बाहेर पडले. त्यावेळी शिवसेनेच्या आमदारांची संख्या होती ५२. पण इतर १७ आमदारांपैकी ६ आमदार शिवसेनेत परतले. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की १२ ही संख्या ५२ च्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे या आमदारांना अपात्र ठरवावे. पण अध्यक्ष मधुकरराव चौधरींनी निर्णय दिला की सुरवातीला शिवसेनेतून १८ आमदार बाहेर पडले आणि शिवसेनेत फूट पडली.त्या १८ आमदारांपैकी ६ आमदार (१/३) परत फुटले आणि शिवसेनेत परतले. म्हणजे या गटात दोनदा फूट पडली असा निर्णय मधुकरराव चौधरींनी दिला. ३. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. त्यानंतर जानेवारी १९८८ मध्ये त्यांच्या पत्नी जानकी रामचंद्रन यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली गेली. जानकी रामचंद्रनना जयललितांनी आव्हान दिले आणि मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितला. त्यामुळे राज्यपालांनी जानकी रामचंद्रन यांना विधानसभेत बहुमत सिध्द करायला सांगितले. या मतदानात जयललिता गटाच्या ३३ आमदारांनी भाग घेतला नाही (अण्णा द्रमुकच्या १३२ पैकी). ही संख्या १/३ पेक्षा कमी असल्यामुळे अध्यक्ष पी.एच.पांडियन यांनी त्यांना अपात्र ठरविले. अध्यक्षांच्या या निर्णयाविरूध्द आकांडतांडव उठायची खरे तर गरज नव्हती.पण तरीही ते झालेच. पुढे राजीव गांधींनी जानकी रामचंद्रन यांचे सरकार बरखास्त केले आणि ३५६ व्या कलमाचा दुरूपयोग केला. ४. ऑगस्ट १९९५ मध्ये आंध्र प्रदेशात एन.टी.रामाराव यांच्याविरूध्द एन.चंद्रबाबू नायडू यांनी बंड केले. त्यावेळी तेलुगु देसमचे बहुसंख्य आमदार चंद्रबाबूंच्या मागे होते.पण त्यानंतर काही आमदार परत रामारावांच्या बाजूला गेले.त्यावेळी अध्यक्ष वाय.रामकृष्ण राव यांनी चंद्रबाबू आणि रामाराव हे दोन्ही तेलुगु देसमचेच गट आहेत त्यामुळे एका गटातून दुसर्‍या गटात गेल्यास पक्षांतर होत नाही असे म्हणून या आयाराम-गयारामांना अपात्र ठरविले नव्हते. ५. नोव्हेंबर १९९० मध्ये लोकसभेत जनता दलाच्या सदस्यांमध्ये फूट पडली. सुरवातीला ५४ सदस्य (१४२ पैकी) वेगळे झाले. त्यानंतर काही दिवसांनी आणखी ७ सदस्य वेगळे झाले.त्यावेळी लोकसभा अध्यक्ष रबी रे यांनी भूमिका घेतली की फूट ही एकाच वेळेला घडणारी घटना आहे.त्यामुळे नंतर जे ७ सदस्य वेगळे झाले त्यांची संख्या जनता दलात बाकी राहिलेल्या सदस्यांच्या १/३ पेक्षा कमी आहे म्हणून त्यांचे सदस्यत्व रद्दबादल ठरविले. या ७ लोकसभा सदस्यांमध्ये विद्याचरण शुक्ला आणि भागेय गोवर्धन या ज्येष्ठ सदस्यांचा समावेश होता. आता अध्यक्षांचा हा निर्णय होता. त्यावरही वादंग उठायचे ते उठलेच. चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणावरून "मी तुम्हाला अटक करेन" अशी धमकी अध्यक्ष रबी रे यांना दिली होती आणि त्याबद्दल त्यांना नंतर माफीही मागावी लागली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की या बाबतीत अध्यक्षांच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देता येते का आणि देता येत असल्यास नक्की कोणत्या आधारावर याबाबत मी तरी साशंक आहे. अशावेळी अध्यक्षांची भूमिका निर्णायक ठरते. अध्यक्ष जर त्या पदाचा मान राखणारे पूर्ण निपक्षपाती असतील तर प्रश्न नाही. अन्यथा वादंग उभे राहू शकते. पक्षांतरबंदी कायदा या बाबतीत अजून स्पष्ट करायला पाहिजे असे वाटते. (या बाबतीत माझी माहिती कदाचित जुनी असेल. २००३ मध्ये पक्षांतरबंदी कायद्यात काही दुरूस्ती केली होती.ती नक्की कोणती हे याक्षणी मला माहिती नाही).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 09:17 नवीन
गॅरी, पक्षांतर बंदी आणि खोखो हे छोट्या छोट्या राज्यातून मागच्या काळात एवढ्या प्रमाणावर होत आल आहे की सर्वसामान्यपणे अधून मधून लक्ष ठेवणार्‍यांचा तरी ट्रॅक सुटला असावा (किमान माझा तरी सुटला आहे) पण आपण माहिती दिलीत त्यानंतर अजून बरेच बदल झाले असतील असे वाटते, एकुण निट अभ्यासावयास लागेल. (चुभूदेघे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 09:31 नवीन
@ गॅरी, या हिंदूस्तान टाईम्स वृत्तातले शेवटचे वाक्य पहावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 09:55 नवीन
@ गॅरी हे एक आणि हे दुसरे हि दोन वृत्ते सुद्धा वाचल्यास पक्षांतरबंदी कायद्यासंबंधीची सद्य स्थिती लक्षात येण्यास साहाय्य होईल असे वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 10:17 नवीन
हे वृत्त जरा आधीच आहे पण कायदे विषयक माहिती बर्‍यापैकी दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
ग
गॅरी ट्रुमन Sat, 05/14/2016 - 11:15 नवीन
धन्यवाद माहितगार. हो २००३ च्या दुरूस्तीनंतर दोन तृतीयांश सदस्य बाहेर पडून दुसर्‍या पक्षात सामील झाले तर त्याला 'मर्जर' असे म्हटले जाते तर पूर्वी 'स्प्लीट' साठी १/३ ची अट होती ती काढून टाकली गेली. प्रतिसाद लिहिताक्षणी हे लक्षात येत नव्हते ते त्या हिंदुस्तान टाईम्समधील लेखाने लक्षात आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 13:26 नवीन
१) सध्याच्या स्थितीवरुन पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू या कटेगरीत मोडतात. २) पक्षांतर बंदी विषयक कायद्याच्या संदर्भाने घटनात्मक ग्राह्यतेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांची विवीध केस मध्ये अद्यापी प्रतिक्षा आहे. ३) निकाल + कायद्यात अधिक बदल होऊन कायद्याचा प्रभाव नीटसा स्टॅबीलाईज होण्यासाठी सर्वसाधारण भारतीय वेगाने माझ्या अंदाजाने अजून एखाद तप तरी लागावयास हवे (हे माझे व्यक्तिगत मत)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन
म
माहितगार Sat, 05/14/2016 - 13:27 नवीन
चुभूदेघे हे लिहावयाचे राहीले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
स
सुबोध खरे Sat, 05/14/2016 - 15:46 नवीन
दुर्दैवाने "पक्षांतर बंदी संबंधातले कायदेमंडळांच्या सभापती/अध्यक्षांचे निर्णय अंतिम असले तरी सब्जेक्ट टू ज्युडिशीअल रिव्ह्यू" असले तरीही प्रत्यक्ष सभागृहाच्या आत विधेयक पारित "झाले कि नाही" यावर न्यायालय निर्णय देऊ शकत नाही उत्तराखंड विधानसभेत प्रत्यक्ष मत मोजणी / विभागणीची लेखी मागणी केलेली असताना सभापतींनी ती न करता वित्त विधेयक पारित झाल्याचा धादांत खोटा निर्णय दिला यावर न्यायालयाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही. वित्त विधेयक जर फेटाळले गेले तर सरकार अल्पमतात आहे असे मानले जाते. नंतर त्या ९ आमदारांना निलंबित केले तरीही सरकार पडले आहे असे अर्थ स्पष्टपणे निघतो येथे सभापतींचा धादांत पक्षपातीपणा असून कायद्याने त्याचे काहीही करता येत नाही हा दैवदुर्विलास आहे. याबद्दल भाजप विरोधी लोक "सोयीस्करपणे" मूग गिळून आहेत. "त जो" ना हा प्रश्न दोन वेळेस विचारून त्यांनी त्यावर उत्तर देणे सोयीस्कररीत्या टाळले आहे. आजही ९ आमदार विरोधी आहेत ते ९ आणि भाजपचे ३१ असे ४० आमदार विरोधी असूनही "तांत्रिक" कारणावर हे सरकार टिकवून ठेवले आहे याबद्दल भाजप द्वेष्ट्या लोकांचा "भू:भू:कार" चालू आहे. हा सर्व काथ्याकुट हा खोट्या पायावर रचलेला इमला आहे. बाकी चालु द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
क
कपिलमुनी Sat, 05/14/2016 - 18:33 नवीन
आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
ब
बोका-ए-आझम Sat, 05/14/2016 - 20:03 नवीन
त्याविरूद्ध न्यायालयात जायचा मार्ग विरोधी पक्षांकडे होता. का नाही गेले? आपली बाजू कोर्टात मांडता येणार नाही याची खात्री असल्यामुळेच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Sat, 05/14/2016 - 22:33 नवीन
भाजपा न्यायालयात जाणार आहे का ? किंवा गेला आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम
ब
बोका-ए-आझम Sun, 05/15/2016 - 21:37 नवीन
Floor test सर्वोच्च न्यायालयाच्याच आदेशावरुन झाली ना. त्याच्यानंतर न्यायालयात जायचा प्रश्न कुठे येतोय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे Sun, 05/15/2016 - 20:59 नवीन
आवाजी मतदानावर सरकार तरले होते याची आठवण झाली.तेव्हा गुरुजींनी ते डिफेंड केले होते मुनिवर आवाजी मतदाना बद्दल्हि हरकत नाही निदान ते "व्यवस्थित" तरी होऊ द्या. ७२ च्या विधानसभेत स्पष्टपणे ४० आमदार विरोधात असताना विधेयक "पारित झाले" हे जाहीर करताना जनाची नाही तरी मनाची लाज स्पिकरना वाटायला हवी होती. त्या निखालस असत्यावर हा इमला उभा आहे आणि यावर तजो अजूनही आपले मत मांडत नाहीत. आज या ९ आमदारांनी आमदारकी रद्द केली असतानाहि भाजप मध्ये प्रवेश केला आहे अशी बातमी ऐकली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
क
कपिलमुनी Mon, 05/16/2016 - 11:55 नवीन
याबद्दल सविस्तर विवेचन या धाग्यात माहीतगार यांनी केला आहे . ९ आमदार निलंबित असल्याने त्यांना मतदान करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. "मोजणी घेऊन ६१ उपस्थित सदस्यांपैकी काँग्रेसच्या बाजूने ३३ जणांनी मतदान केल्याची नोंद ऑनलाईन दस्त एवजात दिसते. (९ जणांना निलंबन निर्णय प्रलंबीत असल्याने मतदान करता आले नाही) " एवढा उल्लेख पुरेसा असावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Mon, 05/16/2016 - 16:10 नवीन
त्यांचा आक्षेप बहुधा मनी बील (बजेट संबंधीत) पारीत करण्या संबंधाने आहे, ते डिटेल्स फ्रँकली मी अद्याप तपासले नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
स
सुबोध खरे Mon, 05/16/2016 - 17:48 नवीन
माहितगार साहेब मी वित्तीय बिल पारित करण्याबद्दल बोलतो आहे ज्या वेळेस हे आमदार निलंबित नव्हते आणी कपिल मुनि "वेड पांघरून" कोर्ट कचेर्या नंतर झालेल्या बहुमत चाचणी बद्दल बोलत आहेत. काहीही करून माझेच खरे म्हणण्याची हो वृत्ती आहे कि केवळ द्वेषासाठी द्वेष करायचा हे समजत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार
म
माहितगार Mon, 05/16/2016 - 17:59 नवीन
तुम्ही वेगळ्या विषयावर बोलता आहात हे त्यांच्या लक्षात आले नसावे, हि शक्यता अधिक वाटते, आणि घेऊद्या की त्यांनाही बेनीफीट ऑफ डाऊट कधी कधी. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
म
माहितगार Mon, 05/16/2016 - 16:47 नवीन
हा आणि हा उत्तरांचल उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या आधीचा आहे पण एकुण विवादावर आणि घटनाक्रमावर जरा अधिक प्रकाश पडण्यास उपयूक्त वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा