५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
_________________________________________________________________
(१) तामिळनाडू
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८
मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.
तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.
_________________________________________________________________
(२) केरळ
२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४०
संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २०
काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२
केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(३) पश्चिम बंगाल
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - २९४
तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते
बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ४२
तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९
पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(४) आसाम
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - १२६
काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४
काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७
_________________________________________________________________
बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.
एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
💬 प्रतिसाद
(231)
म
मुक्त विहारि
Sat, 05/21/2016 - 16:54
नवीन
हेच आपल्याला पण लागू होतेच...
आणि निव्वळ एखादा आय.डी. न आवडणे हे पण त्याचेच उदाहरण...
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/21/2016 - 17:25
नवीन
ऑ!!! ओ सर मी काही मिपावर "तिथे किनै एक श्रीगुरुजी आयडी आहे मी किनै गड़े त्याचा द्वेषच करेल" असं ठरवून आलो नव्हतो हो! सुरुवात कोणी केली हे न पाहताच आपण असा बेछुट गोळीबार करू नयेत ही विनंती. माझा अगोदरचा आयडी ह्याचे उच्चार अन नाम साधर्म्य दुसऱ्या कोण्या टवाळ आयडीशी असल्यामुळे मला खुशाल ट्रोल आयडी म्हणाले तुमचा गुरूजी त्याच्याकडे दुर्लक्ष? हद्द आहे राव कंपुबाजीची!!एक नवा सदस्य येतो त्याची रेवड़ी उड़वा ragging घ्या वाटल्यास गमतीचा भाग म्हणून! बाकी काथ्याकुट असला तर तुम्ही म्हणता तसा विचारांना विचारांनी बोला ना उगाच थेट आयडीवर कश्याला घसरतात तुमचे परममित्र! काहीही उग्गाच्!!
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 05/21/2016 - 15:23
नवीन
:D :D
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 05/21/2016 - 15:20
नवीन
फक्त कमेंटला फालतू म्हणाला असतात, तर विषय वाढलाच नसता...
"मी कोणाचा आयडी आहे" वगैरे फालतू धुणी धूत बसलात त्यामुळे मी पुढची प्रतिक्रिया दिली
तुमची पुढची आदळआपट सुद्धा अडोरेबल आहे... ऊदा.
त्यांना भाजपचा विजय सहन होत नाही तर त्यांनी सरळ ऐसी किंवा अन्य डाव्या संस्थळावर आपला राग काढावा नाहीतर इथे दुसरा धागा आढून त्यावर मनसोक्त रडावे...
का? या धाग्यावर अँटीभाजपा प्रतिक्रियांना बंदी आहे का?! आणि
5 राज्यापैकी 4 राज्यातल्या नागरिकांना भाजपा सहन* झालं नाही, असं निकाल सांगतायत, तेव्हा माझी प्रतिक्रिया काही फार वेगळी नाहीये.
*हा तुमचाच शब्द
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/21/2016 - 15:57
नवीन
मी मोठा आहेच. तुम्ही सांगण्याची गरज वाटत नाही. ट्रोलभैरवांकडून काही ऐकण्याची वेळ आणि गरज अजिबात आलेली नाही. अाणि मिपावर भाजपविरोधी प्रतिक्रियांना बंदी अजिबात नाही पण भाजपविरोधी प्रतिक्रियेच्या विरोधी प्रतिक्रिया तुम्हाला सहन होत नाहीत हीसुद्धा वस्तुस्थिती आहे.
नीलमोहर यांच्या रवींद्र पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूवर असलेल्या धाग्यावर पण तुम्ही - ' इथे हजारो लोकांची organized हत्या करणाऱ्यांना पण fan following असतं ' अशी comment दिलेली आहे. त्यानंतरही तुम्ही आपण ट्रोल नाही आणि श्रीगुरुजींनी मिपावरचं वातावरण बिघडवलं असं म्हणताय. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.
आणि दुसरी गोष्ट - इथे आसामींना सहानुभूती असली comment तुम्ही पहिल्यांदा टाकलीय. त्याला विरोध झालेला तुम्हालाच सहन होत नाहीये त्यामुळे हे पुढचे सगळे प्रकार झालेले आहेत. अाणि तुम्ही जर डू आयडी नाही आहात तर सिद्ध करा.
यावरचं तुमचं उत्तर पण मी सांगतो - मला असं करायची गरज वाटत नाही वगैरे वगैरे. त्यावरुन खरं काय ते कळतंच.
त्यामुळे तुम्ही आधी तुमचे डोळे उघडून आजूबाजूचं जग पहा. मग इतरांना मोठे व्हा असं सांगा.
बाकी ५ पैकी ४ राज्यांत भाजपची मतं वाढली आहेत आणि केरळ आणि तामिळनाडू या राज्यांत खातं उघडलेलं आहे हे सांगू इच्छितो.
७ वर्षांनी तुम्हाला एवढा trp मिळवून दिल्याबद्दल खरं तर तुम्ही गुरुजींचे आभार मानले पाहिजेत पण तेवढे manners तुमच्यात असतील असं वाटत नाही.
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 05/21/2016 - 16:31
नवीन
खेडूत यांना दिलेली प्रतिक्रिया वाचल्यानंतर मला विरोध सहन होतो की नाही ते कळेल, आणि manners ही कळतील...
रविंद्र पाटलांच्या धाग्यावरील प्रतिक्रियेत काय चुकीचं आहे?! काय पार्टी वगैरे दीली होती का मी?!
आणि trp? :D
हिलेरीयस :D :D
यासाठी येता की काय मिपा वर?
काय उपयोग?! काय पगार बिगार वाढणार आहे की काय त्यामुळे?!
इथल्या चार-दोन प्रतिक्रियांना जर trp समजत असाल तर शुभेच्छा;
तुमच्या धाग्यावर प्रतिक्रिया देत जाईन :D :D
आता एक though experiment: एखादा आयडी (समजा श्रीगुरूजी) हा तुमचा आयडी नाही; हे कसं सिद्ध कराल?! :)
पांचटपणा च्यायला
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/21/2016 - 16:48
नवीन
:D :D :D :D च्यायला राहावले नाही हो आबा तुमची खंगरी कॉमेंट वाचुन! तसंही इथल्या कंपुशाहीचा मुकुटमणी असलेल्या खरड़फळा नामक पेज थ्री वर तुम्ही आम्ही अन ढेरे "त्रिकुट" असल्याचे जाहिर झालेच आहे! हे आम्हाला नवेच आहे बरंका! आमचा पाठिंबा आबांना! मुद्द्याला मुद्दा देतात म्हणे गुरूजी ! मग त्यांचे पाठीराखे (मिसळपावचे मालक संपादक कोणीही नसताना सुद्धा) अमुक "डाव्या" साईट वर जावा वगैरे फतवे कसे काढू शकतात किंवा आयडीची मापे कशी काढू शकतात बुआ!? हा तर्क आहे? असलाच तर आम्ही अतार्किक बरे! तरी बरं खुद्द गुरुजींनी आमच्याच आयडी विरुद्ध केलेला शिमगा उदाहरण म्हणून दिलाय !
मजा मजा आहे बुआ!! :D
@बोका सर, काय सर तुम्ही तरी भावनिक आंदोलने असलेल्या कॉमेंट्स देणार नाही असे वाटले होते बघा! , आमचे हे असे आहे जे पटले त्यासाठी तुमचे शिष्यत्व पत्करु हात बांधून जिथे शंका असेल तिथे प्रश्न विचारुन भंडावोन सोडु, नथिंग पर्सनल ! :)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/21/2016 - 17:59
नवीन
आबांनी ऐसीवर जावे असा 'फतवा' वगैरे काढलेला नाहीये. तेवढे ते महत्वाचे नाहीत हो. अाणि तो ऐसीचा अपमानच होईल. He is not at all important. पण कसं आहे, ट्रोलांना ठोकणे ही आमची जुनी सवय आहे. आदतसे मजबूर!
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/21/2016 - 18:10
नवीन
ते ठीके हो सर! फ़क्त नेमके ट्रोल ठोका ही विनंती करतोय! नाही आमची पाठ अजुन हुळहुळती आहे :D :D असो!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/21/2016 - 18:03
नवीन
=)) सहि जा रहे हो... दोनो तिनो... ;)
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/21/2016 - 18:08
नवीन
जय खरडवहीसम्राट!
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/21/2016 - 18:34
नवीन
काय भाऊ, लै डोळ्यासमोर येते आहे का ती खरड? तुमच्याकडे अजून काय नाय काय? एवढ्याशा बारुदवर तेही फुसक्या लै टिकाव नै लागायचा. माझ्यावर मुद्दाहिन टिका करणार्या सर्वांसाठी आहे ती खरड. काही लोकांच्या छुप्या हिंस्र स्वभावापेक्षा थेट बोलणं आवडतं आपल्याला. त्याचीच आयडेन्टीटी आहे ती खरड. समझ लो जो समझना है.
तुमचं ट्रोलींग कधी थांबेल याची मालकांकडे चौकशी केली होती. उत्तर आले नाही. तुमच्यासाठी खास नियम दिसत आहेत मिपाचे. बाय द वे, मला विचारण्यापेक्षा, संपादक/मालकांनाच खरडवहीचे संदर्भ मेनबोर्डावर देऊ की नको ह्याबद्द;ल काअही नियम आहेत का हे विचारायला हवे होते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/22/2016 - 05:05
नवीन
तर त्या खरडीचा दुवा दिल्यावर ' हे मिपाच्या धोरणांत बसत नाही, दुस-याची खरडवही कशी काय जाहीर करु शकता - असले अस्तित्वात नसलेले नियम सांगायला का आला होतात? वर परत ' मला त्या खरडीबद्दल काहीही चुकीचं वाटत नाही ' असं तुम्ही म्हणालात आणि त्यावर खरडफळ्यावर सगळ्यांनी तुमची बिनपाण्याने केली - त्याला फार दिवस झालेले नाहीत.
आणि माझ्याकरता काही खास नियम वगैरे नाहीत. पण एवढ्या घाणेरड्या भाषेत लिहून तुम्ही अजूनही आहात म्हणजे तुमच्यासाठी खास संपादकीय धोरण दिसतंय हे काय आम्हाला कळत नाही?
रच्याकने मी तुम्हाला खरडवहीसम्राट म्हटल्यावर तुम्हाला तीच खरड आठवते यावरून तुमच्या मनात त्याबद्दल अजूनही खुपतंय हे तर कळतंच. मी कोणती खरड, काय खरड हे काहीही लिहिलेलं नसताना तुम्हाला अगदी अचूक समजतं कोणती खरड ते. तुमची ही केविलवाणी अवस्था बघून फार काही नाही,कीव वाटते. वर परत मला त्याबद्दल काही वाटत नाही वगैरे उसनं अवसान! छे! कुठे ते विठांना अध्यात्मावरुन आवाज देणारे तजो आणि कुठे हे तजो! बराच फरक आहे हो! यावरून काही शंका यायला लागलेल्या आहेत एवढं नक्कीच सांगू इच्छितो.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 05/22/2016 - 18:08
नवीन
मी मिपावर असल्याचं ठसठसतंय होय... उगी उगी.
लोक तुम्हाला मोठे व्हा उगाच म्हणत नाहीयेत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/22/2016 - 18:21
नवीन
तुम्ही आणि आम्ही या जगात आहोतच की. सगळ्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे थोड्याच होतात? तुम्ही काय आहात, तुमची पातळी काय आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता हे आता प्रत्येकाला कळलेलं आहेच. त्यामुळे यापुढे लोक्स जे काय निष्कर्ष काढायचे ते काढतील. बाकी मिपावर मी किंवा तुम्ही असल्याने किंवा नसल्याने मिपाला काहीही फरक पडत नाही. आपल्याआधीही ते सुशेगाद चालू होतं, आपल्यानंतरही चालू राहील. काळजी करु नये. बरं, तुमची लोक ही व्याख्या स्वतः पाळण्यात असलेल्यांपुरतीच मर्यादित आहे हे बघून मजा वाटली. तुम्हाला मात्र कुणीही काहीही सांगत नाही. उपयोग होणार नाही हे माहित आहे ना सगळ्यांना.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sun, 05/22/2016 - 18:26
नवीन
सगळे म्हणजे कोण? सगळ्यांनी आपले मुखत्यारपत्र तुम्हालाच दिले आहे जणू...
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sat, 05/21/2016 - 17:54
नवीन
तुम्हाला पगार म्हणजे काय असतं हे माहित आहे हे बघून आनंद झाला. देशात बेकारीची परिस्थिती इतकी काही वाईट नाहीये तर. आणि समजा मी श्रीगुरुजींचा डू आयडी आहे. तर काय कराल हो? हिंमत तुमची काही करायची. मतांच्या पिंका टाकून भिंत लाल करणे याशिवाय दुसरं काही विधायक कार्य केलंत तर पगार वाढेल कदाचित. बघा, जमतंय का.
चला, अजून trp वाढवला तुमचा.
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 05/21/2016 - 20:10
नवीन
:D
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/21/2016 - 18:15
नवीन
बाकी आबांच्या एका फालतू comment मुळे हे सगळं घडलं
अहो फालतू सगळ्यांना वाटेल असे नाही ना! हे म्हणजे त्या छपरी यूपी बिहारच्या भैया लोकांसारखे झाले! 'हमरे इहां छठ पूजा होता है जिधर नहीं होता ऊ हिंदुए नाहीये'
आता होऊनच जाऊ दे.
ह्याने नेमके काय साधले / साधते??
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/21/2016 - 18:39
नवीन
जे जे मोदी भाजप विरोधक ते सर्व ट्रोल असे समजणार्यांच्या काय नादी लागता बहिर्जी? कंपुबाजी करणारे एकट्या दुकट्या सदस्यांवर तुटून पडतात हिंस्र श्वापदांसारखे. ह्याला हे सभ्य लोकांचे सुसंस्कृत स्थळ म्हणतात.
जोकर तर आम्ही आहोत, पण मनोरंजन हेच चांगलं करतायत. आनंद उठाओ. आम्ही बसलोय बाल्कनीत, शेम्पेन घेऊन. =))
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Mon, 05/23/2016 - 03:16
नवीन
तर्राट सर, मी मोदींचा द्वेष्टा तर अजिबात नाही अन अंधसमर्थक सुद्धा नाही , तसे पाहता थोड़ा पंखा असेल त्यांच्या कार्याचा. माझा मुद्दा आहे नव्या आयडीचा मानसिक छल करणे त्यात मोदी नॉन मोदी वगैरे विषय नाहीच मोठमोठे प्रश्न साधे होते (अन अजुनही अनुत्तरीत आहेत)
1 माझी साधी तोंड ओळख नसताना सुद्धा माझ्या आयडीवर घसरायचा तो कोण श्रीगुरुजी आहे त्याला काय हक्क?
2 बरं इतकं करूनही त्याचे काही पाठीराखे येऊन गुरूजी मुद्दे धरून बोलतात वगैरे म्हणत मलाच झोड़पायचा क्षीण प्रयत्न का करतात??
3 संपादक मंडळ झोपलेले आहे का??
4"एकमेकांची पाठ खाजवु मिपा गेले खड्डयात" सारखी मानसिकता असलेले लोकं खरड़फळ्याला वैयक्तिक पेज थ्री सारखे कुठल्या हक्काने ट्रीट करू शकतात?
जितपत मला आठवते साहेब आपणही तिकडेच (खरड़फळ्यावर) माझ्या आयडीवर घसरला होतात ! असो.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Mon, 05/23/2016 - 19:27
नवीन
बाकी ज्या माणसाने असे विचित्र आयडी घेऊन, ते सुद्धा ओळीने असे आयडे घेऊन ट्रोलिंग करणार्या आयडीबद्दल कोणीच का बोलत नाही?
जर एखाद्या आयडी ने कोणता पॅटर्न बनवला, तर मग तो पॅटर्न वापरणार्या आयडी वर डुआयडे असल्याचा संशय निर्माण होणारच की. जसे मी वर आबा या आयडी च्या पोस्ट वर म्हणले - की प्रतिक्रियेत सुरूवातीला "." टाकणे, उगाच काड्या सारणे या गोष्टी काही डुआयडींची सिग्नेचर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यात बसलात डुआयडी असल्याचा संशय आम्ही घेणारच.
तुम्ही ज्या श्रीगुरुजी या आयडी बद्दल बोलत आहात त्या आयडी ला "मी डु आयडी नाही" असे स्पष्ट सांगितलेत काय? जर सांगितलेत तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? व्यक्तिगत संदेशांमध्येतरी तुमचे अस्सल असणे सिद्ध करण्याची तयारी आहे का? ते सांगितल्यावरदेखील त्यांनी तुमचे चारित्र्य हनन चालूच ठेवले का? जर ठेवले नसेल तर आत्ता तुम्ही त्यांचे चारित्र्यहनन कश्याच्या आधारावर करत आहात? जर श्रीगुरुजी या आयडीने तुम्हाला नानासाहेब या आयडीचा डुआयडी म्हणले तर नानासाहेब या आयडीने ते नाकारले का? मग तुमचे अस्सलपण कश्याच्या आधारावर सिद्ध होणार?
दुसरी गोष्ट म्हणजे इतरत्र ग्रेट्थिंकर या नावाने वावरणारा आयडी अजूनदेखील मिपावर डुआयडी काढून काड्या सारत असतो हे बर्याच वेळेस सिद्ध झाले आहे. त्यामुळे मिपावर त्याच्या पॅटर्नमध्ये बसणारा कोणताही आयडी डुआयडी असण्याची शंका येणे अत्यंत साहजिक आहे. आणि आम्ही ती घेणारच. त्यामुळे आपल्याला सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे लक्षात घ्या, एव्हडेच नव्हे तर इथे बर्याच आयडींनी अशी (अग्नि)परीक्षा दिलेली आहे. गॅरी ट्रुमन आणि गॅरी शोमन या नावावरून झालेल्या वादाला अजून वर्ष देखील झालेले नाही. जेपी या आयडीने देखील कुठेतरी या प्रसंगाला तोंड दिलेले आहे असे पाहिलेले आहे.
असो. तात्पर्य - आपण कसे वागायचे हे आपण ठरवा, तुमचे जर कोणत्या आयडीशी साधर्म्य दिसून आले तर आम्ही प्रश्न विचारणार, त्याची सवय करून घ्या.
जाता जाता - मध्यंतरी माईसाहेब याअ आयडीच्या वयाचा आणि व्रुद्धपणाचा विषय कोणीतरी काढला होता, मला प्रश्न असा पडला आहे की हा वयोव्रुद्ध स्त्री आयडी अनाहितामध्ये होता का? नसेल तर गिरिजा या आयडीने यावरूनच काय सोसले ते बघा आणि मग आरोप करायला या.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Mon, 05/23/2016 - 20:51
नवीन
प्रश्न विचारणे आणि आरोप करणे यात फरक आहे.
पण काविळ झाली की जग पिवळा दिसता
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Tue, 05/24/2016 - 04:02
नवीन
बाकी ज्या माणसाने असे विचित्र आयडी घेऊन, ते सुद्धा ओळीने असे आयडे घेऊन ट्रोलिंग करणार्या आयडीबद्दल कोणीच का बोलत नाही?
मी का अखिल मिपा ठेकेदारी करू म्हणता हो तुम्ही? मला कोणासंबंधी प्रश्न पडावे हे पण आपण ठरवणार का काय आता??
उगाच काड्या सारणे या गोष्टी काही डुआयडींची सिग्नेचर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यात बसलात डुआयडी असल्याचा संशय आम्ही घेणारच.
अहो एक काय लाख शंका घ्या , फ़क्त "शंका घेणे" अन "ठाम प्रतिपादन" करणे ह्यातला फरक समजून घ्या असे म्हणतो बुआ, तुमच्या त्या श्रीगुरूजी ने शंका घेतली नव्हती नुसती तर दणक्यात "मुल्हेरकर बरोबरच पिराजी" हे दामटले होते! काय वाटेल ते बोलणार तो अन ते चुक आहे हे मी का सिद्ध करत रहावे म्हणे!?
तुम्ही ज्या श्रीगुरुजी या आयडी बद्दल बोलत आहात त्या आयडी ला "मी डु आयडी नाही" असे स्पष्ट सांगितलेत काय? जर सांगितलेत तर त्यांची प्रतिक्रिया काय होती? व्यक्तिगत संदेशांमध्येतरी तुमचे अस्सल असणे सिद्ध करण्याची तयारी आहे का? ते सांगितल्यावरदेखील त्यांनी तुमचे चारित्र्य हनन चालूच ठेवले का? जर ठेवले नसेल तर आत्ता तुम्ही त्यांचे चारित्र्यहनन कश्याच्या आधारावर करत आहात? जर श्रीगुरुजी या आयडीने तुम्हाला नानासाहेब या आयडीचा डुआयडी म्हणले तर नानासाहेब या आयडीने ते नाकारले का? मग तुमचे अस्सलपण कश्याच्या आधारावर सिद्ध होणार?
सर तुम्ही एकतर नेमके हवे तेवढे वाचता किंवा अजिबातच काही वाचत नाही का?? तरी एकदा उत्तर देतो, ते म्हणजे होय मी डू आयडी नाही हे मी गुरुजीला स्पष्ट बोललो होतो , गुरूजी ने माझ्यावर डू आयडीचा आळ घेतला तेव्हा मी समन्वयवादी भूमिका घेत प्रशांत जी ह्यांना व्यनि करुन आयडी बदलून घेतला माझा, पिंपळगावचा पिराजीचा - नाईकांचा बहिर्जी असा ती बदल होता, त्या बदला बद्दल जिथे गुरूजी न माझ्यावर प्रथम आळ घेतला त्या विन्स्टन चर्चिल नामे धाग्यावर मी स्पष्टीकरण सुद्धा दिले, त्यावर एक ओळीची पोच देण्याचे सुद्धा सौजन्य नाही ह्या गुरुजीला ते एक असो, इतके सगळे करुनही संघाच्या थ्रेड वर हाच आयडी परत एकदा मी अन मुल्हेरकर एकच असल्याचे भेकु लागला अजुन काय स्पष्टीकरण हवंय म्हणे?? व्यक्तिगत संदेशात माझे अस्सल असणे सिद्ध करण्याबाबत मी इतकेच म्हणतो की तुम्ही किंवा तुमचा तो गुरुजी कोण आहात कोण हो माझे अटेस्टेशन करणारे? तुम्ही संपादक आहात का मिपामालक आहात? Who the hell are you so that I have to entertain your all whims instantly? Beat it! U r not so important. नानासाहेब हा आयडी डू आहे हे जाहिर आहे ज्याचे कामच trolling आहे तो दुसऱ्या आयडीची साक्ष देऊन मॅटर क्लोज करेल का आपल्या विकृत स्वभावाला अनुसरुन मजा पाहात बसेल हे तुम्हीच ठरवा, जर बॅलन्स विचार करता येणे अजुन जमत असेल तर!!, माझे अस्सलपण सिद्ध करणे कठीणच आहे हो कारण मी सभासदत्व घेतल्या घेतल्या इमानेइतबारे तुमच्यात्या खरड़फळा नामक पेज 3 वर खऱ्या नावासहित इंट्रो टाकला होता त्याचीही रेवड़ी उडवली होती की ह्या तर्राट जोकर अन अजुन एक स्त्री सदस्या आहेत त्यांनी ! तुम्हाला आठवते का श्रीगुरुजीचं मुळ खरे नाव? टाकले आहे का त्यांनी ते मिपावर नसेल टाकल्यास त्यांचे अस्सलपण त्यांनी सुद्धा सिद्ध करायला नको का? की बस तुमच्या कंपुतले आहेत म्हणून सुट अन नवखे मेंबर सापडले तावडीत का द्या दणके हे धोरण आहे तुमचेही त्या मुक्तविहारींसारखे?? आता मागाल का गुरुजीला खरे पणाची साक्ष?? म्हणाल का त्याला की त्याचे खरेपण सिद्धकरायची जबाबदारी त्याचीच आहे म्हणून??
दुसरी गोष्ट म्हणजे इतरत्र ग्रेट्थिंकर या नावाने वावरणारा आयडी अजूनदेखील मिपावर डुआयडी काढून काड्या सारत असतो हे बर्याच वेळेस सिद्ध झाले आहे. त्यामुळे मिपावर त्याच्या पॅटर्नमध्ये बसणारा कोणताही आयडी डुआयडी असण्याची शंका येणे अत्यंत साहजिक आहे. आणि आम्ही ती घेणारच. त्यामुळे आपल्याला सिद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे हे लक्षात घ्या, एव्हडेच नव्हे तर इथे बर्याच आयडींनी अशी (अग्नि)परीक्षा दिलेली आहे. गॅरी ट्रुमन आणि गॅरी शोमन या नावावरून झालेल्या वादाला अजून वर्ष देखील झालेले नाही. जेपी या आयडीने देखील कुठेतरी या प्रसंगाला तोंड दिलेले आहे असे पाहिलेले आहे.
तुमचे कुठल्या आयडी सोबत वाजले आहे किंवा कोण काड्या सारतो हे लक्षात ठेवणे नव्या सभासदत्व घेणाऱ्या मंडळीला लक्षात ठेवणे गरजेचे आहे काय? कोण ते गॅरी ट्रूमन अन जेपी ह्याना विचारले कोणी ओरिजिनल का डू त्याच्याशी माझे काय घेणे देणे आहे म्हणे?? मी ओरिजिनल आहे का डू हे मी स्वतःच नीट इंट्रो दिल्यावर सुद्धा त्या गुरूजीला किंवा तुम्हाला कळत नसेल त्याला मी जबाबदार नाही, त्याहुन पुढे तुम्हाला येणाऱ्या सदस्यांची सत्यासत्यता तपसायची जबाबदारी कोणी दिली आहे? कुठल्या हक्काने तुम्ही मला जाब विचारणार हो साहेब?
असो. तात्पर्य - आपण कसे वागायचे हे आपण ठरवा, तुमचे जर कोणत्या आयडीशी साधर्म्य दिसून आले तर आम्ही प्रश्न विचारणार, त्याची सवय करून घ्या.
धमक्या देऊ नका फरक पडणार नाही ! कोणी मला एकांगी टारगेट करत असला तर मी त्याची वाट लावणारच ! मी नीट वागलो होतो सामान्य संकेताप्रमाणे नवीन जागी आल्यावर इंट्रो देतात तसा दिला होता, एका सदस्याला माझ्या आयडीमुळे कंफ्यूजन होते तर मी पड़ती बाजु घेऊन आयडी सुद्धा बदलून घेतला माझा, तरीही त्याचा कंपु येऊन मलाच धमक्या देतोय ह्यावरुन काय ते समजा , परत सांगतो असल्या धमक्या द्यायच्या नाहीत भिक घातली जाणार नाही
जाता जाता - मध्यंतरी माईसाहेब याअ आयडीच्या वयाचा आणि व्रुद्धपणाचा विषय कोणीतरी काढला होता, मला प्रश्न असा पडला आहे की हा वयोव्रुद्ध स्त्री आयडी अनाहितामध्ये होता का? नसेल तर गिरिजा या आयडीने यावरूनच काय सोसले ते बघा आणि मग आरोप करायला या.
पहिले तर हे "त्यांनी काय काय सोसले ते बघा" वाले तूणतूणे आवराच आता तुम्ही , सहन करणारे असतील शांतिसागर मी नाहीये अन त्यांनी सहन केले म्हणून मी करावे हा नियम मिपाच्या धोरणातला नसताना उगाच कंपुबाजी करत धमक्या देत फिरू नका, माझे तुमच्याशी वैर नाही हे ही क्लियर करतो इथेच फ़क्त जर कंपुबाजी करत कोणाच्या चुकीची भलामण करायला येऊ नका कारण मी शांत बसणाऱ्यातला नाही. ते कोण गिरिजा ट्रूमन अन जेपी असतील ते असूद्या त्यांनी सहन केले म्हणून मी सहन करणार नाही
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 05/24/2016 - 06:30
नवीन
मी धमकी देत नाही. मी केवळ इतिहासात काय झाले आणि त्यानंतर त्याचा परिणाम म्हणून वर्तमानात काय होणे अपेक्षित असू शकते ते सांगितले. दुसरे म्हणजे मी तुम्हाला संस्थळाची रीत सांगितली. आता तुमच्या प्रश्नांची उत्तरे -
१. श्रीगुरुजी हे खरे नाव नाही हे तर सार्यंनाच माहीत आहे, पण त्या आयडीने डुआयडी काढून ट्रोलिंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही हे देखील तेव्हढेच खरे आहे. श्रीगुरुजी या आयडीचे आत्यंतिक भाजपा समर्थन मला देखील पटत नाही, परंतु एक विशिष्ट नावाचा पॅटर्न घेऊन त्याच आयडीला ट्रोल करण्याचा प्रयत्न पूर्वी मिपावर झालेला आहे, त्यामुळे तुम्ही तटस्थपणे विचार केला तर तुम्हाला त्या आयडीचा राग समजून येईल. आणि याच न्यायाने तुम्ही आयडी बदलून तो थांबणार नाही हेदेखील तेव्हढेच सत्य आहे. ते थांबू शकेल केवळ तुम्ही संयम राखून दिलेल्या प्रतिक्रियांमुळे. आणि तुमच्या जालीय वावरातून तुम्ही डुआयडी नाही याचा पॅटर्न तयार झाला की. एकोळी काड्या सारणे ही काही आयडींची खासियत आहे आणि त्याचा त्रास इथे प्रत्येकाने भोगला आहे.
मी कुठे तुम्हाला सहन करा म्हणून सांगतोय, पण तुम्ही जर जालावर टोपणनाव घेऊन वावरायला लागलात तर त्याचे प्रतिसाद असे देखील येउ शकतात एव्हढेच सांगत आहे. फुकटचा सल्ला म्हणा हवे तर. लोक तुमच्या टोपणनावापलिकदे जाण्याचा प्रयत्न करणारच, आणि तुम्ही जेव्हढा त्रागा कराल तेव्हढा तुम्हालाच त्रास होईल.
हा प्रश्न तुम्हाला नव्हता. तुमच्या समर्थनासाठी जे आयडी पुढे सरसावले होते त्यांच्यासाठी होता. त्यांना इतिहास माहीत आहे तर त्यांनी वास्तववादी भूमिका घेतली पाहिजे.
महत्व तुम्हीच देत आहात. एखाद्या जुन्या आणि सर्वांना माहीत असलेल्या आयडीबद्दल जाहीरपणे असहिष्णुतेचे आरोप करताना त्या आयडीबरोबर तुमचे सामोपचाराचे प्रयत्न झाले आहेत का हे कळणे आम्हाला आवश्यक आहे.
ठीक आहे. मी तुम्हाला जाअब विचारणार नाही. मग तुम्ही पण मला विचारायचा नाही. आहे मान्य? मी चर्चा करायला आलो होतो. तुम्ही डायरेक्ट धमक्यांवर उतरलात.
असो - शेवटचे एकच सांगून ही चर्चा संपवतो - तुम्ही डु आयडी नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी केवळ तुमची आहे. तुम्ही जेव्हढे आकांडतांडव करत जाल तेव्हढा आमचा संशय आणखीन वाढत जाईल, कारण तसा पॅटर्न आहे. तर्राट जोकर आ आयडी देखील माझ्या मतांच्या विरूद्ध बरेच काही लिहितो, पण त्याला आम्ही कधी डुआयडी असल्याचा आरोप केलेला नाही. कारण त्याच्या स्वतःच्या मतांचा एक पॅटर्न आहे, आणि त्याचा आम्ही अंदाज करू शकतो. तुमच्याबद्दल जेव्हा असा अंदाज यायला लागेल तेव्हा आपोआपच तुम्ही डुआयडी असल्याचा समज (जर गैरसमज असेल तर) गळून पडेल. आणि हो, इथे आम्ही याचा अर्थ आमचा कंपू असा होत नाही, कारण माझा कोणाशी खरडींमधून्देखील संपर्क नाही. तुमचे आयडी आणि त्यांचे लिखाण हीच तुमची ओळख.
चूक भूल देणे घेणे. तुमच्यावर आरोप करण्याचा माझा हेतू नाही, पण तुम्ही आक्रस्ताळेपणा करू नये एव्हढीच इच्छा आहे.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
Tue, 05/24/2016 - 06:40
नवीन
ठीक आहे तुमचा मुद्दा कळला आनंदा सर, थोड्या एग्रेसिव प्रतिसादाकरीता मी आपली जाहीर माफ़ी मागतो, दूसरे म्हणजे मी गुरूजीला दिलेले प्रतिसाद ह्यावर आपण काय म्हणाल? त्यांनी चक्क मला अतिरेकी स्लीपरसेल वगैरे म्हणले आहे हे खेदपूर्वक नमूद करतो इथे मी, त्यावर आपले मत काय असेल? जिथुन हे सगळे सुरु झाले तिथे मी मुद्द्यावरच बोलत होतो, गुरूजी येऊन विषयसंबंध असणारा एकही शब्द न उच्चारता थेट आरोप करुन गेला होता इतके आपल्या माहीतीकरता सांगतो
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Tue, 05/24/2016 - 07:13
नवीन
ती श्रीगुरुजी या आयडीची चूकच आहे. पण ती चूक गैरसमजातून झालेली आहे. आणि तो गैरसमज आपणच आपल्या वावरातून दूर करू शकता.
आणि माझी माफी वगैरे मागण्याचा प्रश्नच नाही. मी काही मिपाचा मालक्/संपादक नाही. त्यामुळे तुम्हाला माफ करण्याचा मला अधिकार नाही. लोभ असावा हे विनंती.
- Log in or register to post comments
त
तर्राट जोकर
Sat, 05/28/2016 - 18:43
नवीन
जितपत मला आठवते साहेब आपणही तिकडेच (खरड़फळ्यावर) माझ्या आयडीवर घसरला होतात ! असो.
>> इसके वास्ते 'सॉरी' बॉस. आपका नाम एक आयडीके हुबहू लग रहा था... करके.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sat, 05/21/2016 - 19:49
नवीन
पुरावा आरोप करणार्याने द्यायचा असतो. या केसमध्ये मुवि. इतर अनेक केसेसमध्ये गुरुजी.
ती कॉमेंट फाल्तू कशी? त्यांना नाही आवडली एखादी पार्टी जिंकलेली ते लिहिलं तर ती कॉमेंट फाल्तू? हा धागा भाजपाच्या अभिनंदनाचाच आहे काय?
- Log in or register to post comments
आ
आबा
Sat, 05/21/2016 - 20:23
नवीन
पण फालतू तर फालतू म्हणायचं ना...
उगं ड्यूप्लीकट आयडी, ऐसीवर जा, अमकं करा न् फलानं करा ही झील कशाला
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/22/2016 - 04:52
नवीन
असं म्हणून फालतू शब्दाचा अपमान करण्याची इच्छा नव्हती, बाकी काही नाही.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/22/2016 - 05:09
नवीन
निकाल १९ तारखेला लागलेत. तेव्हा भाजप जिंकणार हे कुणाला माहित होतं? बरं, उत्तराखंडमध्ये भाजपचे नाक ठेचले असे उघडउघड धागे येऊ शकतात तर भाजपच्या अभिनंदनावर येऊ शकत नाहीत? विरोध करण्याचं स्वातंत्र्य आहे आणि बाजू घेण्याचं स्वातंत्र्य नाही?
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
Sun, 05/22/2016 - 06:50
नवीन
बजू घेणार्यांवर डुआयडीचे आरोप होत नाहीत. विरोधकांवर होतात.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Sun, 05/22/2016 - 07:07
नवीन
उदाहरणादाखल त्यांची नावंसुद्धा वर लिहिलेली आहेत मी.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 07:22
नवीन
तामिळनाडूमध्ये १९८५ नंतर प्रथमच सत्ताधारी आघाडीचा परत विजय होताना दिसत आहे. एम.जी.रामचंद्रन मुख्यमंत्री असताना अण्णा द्रमुकने १९८५ मध्ये आणखी जोरदार विजय मिळवला होता. २०१२ मध्ये पंजाबमधील यो-यो (एकदा हे आणि एकदा ते) हा ट्रेंड बदलला होता. आता २०१६ मध्ये तामिळनाडूमध्ये तेच अनुभवायला येत आहे. केरळमधील यो-यो ट्रेंड कायम राहिला आहे. बंगालमधील मतदारांना एकच नेता कित्येक वर्षे सत्तेत असावा असे वाटते असे वाटते. यापूर्वी बिधनचंद्र रॉय १४ वर्षे, ज्योती बसू २३ वर्षे तर बुध्ददेव भट्टाचार्य १०.५ वर्षे मुख्यमंत्रीपदी होते. आता ममता बॅनर्जी कमितकमी १० वर्षे मुख्यमंत्री राहतील असे दिसते.
आसाममध्ये मात्र भाजपने अगदीच जोरदार मुसंडी मारली आहे. यापूर्वी १० पेक्षा जास्त जागा भाजपला आसाम विधानसभेत मिळालेल्या नव्हत्या. तिथपासून मित्रपक्षांच्या मदतीने ७० चा आकडा ओलांडणे म्हणजे नक्कीच जोरदार विजय झाला.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 07:41
नवीन
२०१६ च्या विधानसभा निवडणुकांनंतर कॉंग्रेस पक्षाची अवस्था मात्र फारच दयनीय झालेली दिसते.
केरळमध्ये कॉंग्रेसचा पराभव अपेक्षित जरी असला तरी भाजप प्रस्थापितविरोधी मतांमध्ये फूट पाडेल आणि त्यातून पक्षाला विजयाची संधी मिळेल अशी अपेक्षा असावी. पण भाजपने डाव्या आघाडीपेक्षा कॉंग्रेसचीच मते कापलेली दिसत आहेत असे विविध चॅनेलवरील चर्चांवरून समजते. तामिळनाडूमध्ये द्रमुकबरोबर युती करून विजय मिळेल अशी पक्षाची अपेक्षा असावी.पण ते फासेही उलटेच पडलेले दिसतात. आसामात भाजपने कॉंग्रेसचा जोरदार पराभव केलेला दिसत आहे. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसला ३८ जागा मिळताना दिसत आहेत हीच त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट. पण बंगालमध्ये कॉंग्रेसची मते मुख्यत्वे मालदा आणि मिदनापूर जिल्ह्यात एकवटलेली आहेत. NDTV वर दाखविले की कॉंग्रेसला बंगालमध्ये ९% मते मिळाली आहेत. भाजपने प्रथमच कॉंग्रेसपेक्षा जास्त मते बंगालमध्ये मिळवली आहेत. कॉंग्रेसला त्यातल्या त्यात आघाडी पुद्दुचेरीमध्ये मिळालेली दिसत आहे आणि तिथेही स्वबळावर बहुमत दिसत नाही. आणि अर्थातच हा केंद्रशासित प्रदेश अगदीच छोटा आहे त्यामुळे राष्ट्रीय राजकारणावर त्या आघाडीचा प्रभाव शून्य पडेल.
२०१४ मध्ये सफाया झाल्यानंतर कॉंग्रेसची अवस्था अजूनच दयनीय होत आहे. महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ढकलले जाणे, दिल्लीमध्ये व्हाईटवॉश मिळाला होता त्यानंतर बिहारमध्ये लालू-नितीशबरोबर युती करून थोड्याफार जागा मिळाल्या. पण आता आसामात मोठाच झटका बसला, केरळमध्ये पराभव झाला, तामिळनाडू आणि बंगालमध्ये फार प्रभाव पडलेला दिसत नाही. आता कॉंग्रेसकडे कर्नाटक हे एकच मोठे राज्य राहिले आहे. उत्तराखंड, हिमाचल, मेघालय, मणिपूर या राज्यांमध्ये मिळून १२ पेक्षा जास्त लोकसभा जागा नाहीत.
एका अर्थी कॉंग्रेसचे असे पतन होणे वाईट आहे. राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय विरोधी पक्ष प्रबळ हवाच. पण कॉंग्रेस या राष्ट्रीय पक्षाची जागा प्रादेशिक पक्ष घेत असतील तर ते भविष्यात स्थैर्याच्या दृष्टीने वाईट आहे.
- Log in or register to post comments
स
सतीश कुडतरकर
गुरुवार, 05/19/2016 - 07:50
नवीन
congress che patan honarach.
saglikade harlyavar suddha jantemadhye kay sandesh jaatoy, tar 'Aamchyakade Bhrashtachari mandalinvar kontihi karvai keli jaat naahi'.
Karvai karnaar tari konavar, thikthikanchye saramjamdar, yanchyach jivavar tar congress paksh kasabasaa tag dharun ubha aahe.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 07:52
नवीन
पण अल्पसंख्यांक तुष्टीकरण आणि गांधी परिवार लांगुलचालन हे मुख्य कार्यक्रम जोपर्यंत बदलत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला पुनरागमन करणं कठीण आहे. आता सध्या उत्तराखंड, हिमाचल आणि कर्नाटक ही तीनच राज्ये काँग्रेसकडे आहेत. पंजाबमध्ये आआपचं आव्हान आहे. माझी तिथे काँग्रेस यावी अशीच इच्छा आहे. बाकी उत्तर प्रदेशात काँग्रेसने जनाधार ब-यापैकी गमावला आहे.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
गुरुवार, 05/19/2016 - 08:13
नवीन
गांधी परिवारापासुन मुक्ति मिळाल्यास काँग्रेस हा एक उत्तम विरोधीपक्ष होऊ शकतो, आज काँग्रेस मधे खऱ्या मुद्द्यांची जाण असणारे सगळे नेते फ़क्त गांधी परिवाराने केलेले कीड़े सावरण्यात खर्ची पडत आहेत अन पर्यायाने ते आपल्याच पानीपताचे कारण बनत आहेत असे वाटते,
अल्पसंख्याक तुष्टिकरण ह्या मुद्द्यात तितकासा दम वाटत नाही मला तरी कारण बहुतांशी ह्या मुद्द्याच्या समर्थनार्थ जे दाखले दिले जातात ते ऐतिहासिक अन समकालीन नसलेले अर्थात 55 कोटीचे बळी ते फाळणी अन मोपला बंड वगैरे घासुन गुळगुळीत झालेले मुद्दे असतात, आकड़े सुद्धा काँग्रेस शासित राज्य सरकारे असताना विविध राज्यांत घडलेले दंगे इत्यादी असतात. फारच समकालीन स्ट्रेच केल्यास ते शाहबानो प्रकरण इथपर्यंतच पोचतात.
मला काँग्रेस अल्पसंख्य बाबतीत आततायी वाटते म्हणजे एकीकडे पार जबरदस्तीच्या नसबंदी कार्यक्रम ते दुसरीकडे शाहबानो प्रकरण अर्थात माझा तितकासा अभ्यास नाहीये म्हणा , तरीही त्या मुद्द्यात् मला तरी जोर वाटत नाही बुआ. असो.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 09:13
नवीन
हा १९७५ च्या आणीबाणीच्या कालखंडातला मोठा अध्याय आहे, पण आज साठीत आणि सत्तरीत असलेल्या आणि उत्तर प्रदेश आणि हरियाणा इथे राहिलेल्या पिढीला त्याच्याबद्दल माहिती असेल आणि असलंच तर काही सोयरसुतक असेल. जी पिढी आत्ता ३५ ते ५० या वयोगटातील आहे (१९६६ ते १९८१ या काळात जन्मलेले) त्या पिढीला हा मुद्दा academic interest आहे. पुढच्या पिढ्यांचा तर काही संबंधच नाही.
शाह बानो हा मात्र वेगळा मुद्दा आहे, कारण त्याचे परिणाम दूरगामी आहेत, आणि तो काँग्रेसने केलेल्या ऐतिहासिक घोडचुकीचा पुरावा आहे. तेव्हा काँग्रेसला लोकसभेत अाणि राज्यसभेत राक्षसी बहुमत होतं. त्याचा फायदा घेऊन त्यांनी मुस्लिम महिलांच्या तलाकचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायला हवा होता. पण इतका दूरगामी विचार करणारे कुणी तेव्हा काँग्रेसमध्ये नव्हते. आरिफ मोहम्मद खान यांच्यासारख्या पुरोगामी मुस्लिम नेत्यांना डावलून काँग्रेस नेतृत्वाने सय्यद शहाबुद्दीन आणि खुर्शीद आलम खान (सलमान खुर्शीद यांचे वडील) यांच्यासारख्या प्रतिगामी आणि कट्टर नेत्यांना जवळ केलं आणि तलाकला पाठिंबा देणारा आणि शाह बानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला पूर्णपणे रद्दबातल करणारा कायदा मंजूर केला. एकदा असं झाल्यावर काँग्रेसने पुरोगामी मुस्लिमांची मतं ब-यापैकी गमावली. नंतर मंडल आयोग लागू झाल्यावर ओबीसी नेते - मुलायमसिंग, लालूप्रसाद यादव, नितीशकुमार - हे पुढे आले. भाजपनेही ब्राम्हण-बनियांचा पक्ष या प्रतिमेला छेद देण्यासाठी कल्याणसिंग, गोपीनाथ मुंडे, नरेंद्र मोदी यांना पुढे आणलं. काँग्रेस पक्ष मात्र गांधी-नेहरूंच्या पुण्याईवर आपला गाडा खेचत राहिला. मूळच्या काँग्रेसमधल्या ममता बॅनर्जी राज्याच्या राजकारणात डावलल्या गेल्यामुळे बाहेर पडल्या, स्वतःचा पक्ष काढला आणि आता परत काँग्रेसला धोबीपछाड देऊन बंगालमध्ये मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्या हे एक उदाहरण आहे. असे अनेक आहेत. आंध्रसारखं मोठं राज्य तेलंगणाचा प्रश्न नीट न हाताळून काँग्रेसने हातचं गमावलं.
आताही साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचा मुद्दा काँग्रेसच्या अंगावर शेकणार आहे. भाजप नेत्यांचे हिंदू अतिरेक्यांशी संबंध आहेत असा बेछूट आरोप काँग्रेस नेत्यांनी चालू केलेला आहे. एकतर हिंदू दहशतवादी या शब्दप्रयोगाने आणि इस्लामी दहशतवादाबद्दलच्या दुटप्पी भूमिकेने (दहशतवादाला रंग आणि धर्म नसतो असं एकीकडे म्हणणे आणि दुसरीकडे भगवा दहशतवादी आणि हिंदू दहशतवाद वगैरे शब्दप्रयोग करणे) अनेक भाजपसमर्थक नसलेले हिंदूही दुखावले गेलेले आहेत. दुसरं म्हणजे पुरावे न देता फक्त आरोप करणं हे लोक कधीपर्यंत ऐकून घेतील? जर भाजप नेत्यांचे हिंदू दहशतवाद्यांशी संबंध आहेत तर त्यांना अटक करुन खटला भरून शिक्षा का दिली नाही हा प्रश्न लोक विचारणारच.
एकंदरीत काय, तर काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा मोदींच्या किंवा अमित शाह यांच्या डोक्यात येण्यापूर्वी काँग्रेसवाल्यांनी स्वतःच तो आपला अजेंडा असल्याप्रमाणे गोष्टी केलेल्या आहेत.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
गुरुवार, 05/19/2016 - 09:18
नवीन
प्रतिसाद आवडला सर!
एकदा असं झाल्यावर काँग्रेसने पुरोगामी मुस्लिमांची मतं ब-यापैकी गमावली.
तसंही कट्टर अन घट्ट एकेश्वरवादी एकपुस्तकवादी अन एकप्रेषितवादी धर्मात असं कोण हींग लावुन विचारतंय म्हणा ह्या पुरोगामी अल्पसंख्य बुद्धिवंतांना ?? चालायचेच!
- Log in or register to post comments
च
चिनार
गुरुवार, 05/19/2016 - 10:33
नवीन
ह्याला लय वेळा सहमत !!
उत्तम प्रतिसाद
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 10:37
नवीन
मस्त. सहमत आहे
टाईम्स नाऊ वर चर्चा चालू आहे-- तामिळनाडूमध्ये द्रमुकने कॉंग्रेसबरोबर युती करून पायावर धोंडा पाडून घेतला आहे.
अरणब गोस्वामी आणि इतरांनी आकडेवारी सादर केली आहे.त्यावरून लक्षात येते की द्रमुकने लढविलेल्या जागापैकी जवळपास ५०% जागा जिंकल्या आहेत. पण कॉंग्रेसने मात्र २२% जागाच जिंकल्या आहेत. आणि ज्या जागा कॉंग्रेसने जिंकल्या आहेत त्या जागांवरही द्रमुकचीच ताकद होती. कॉंग्रेसबरोबर युती करून बहुदा करूणानिधींनी चूक केली अशी चिन्हे आहेत.
टाईम्स नाऊवर तर आता असे म्हटले जात आहे की यापुढे कॉंग्रेसबरोबर युती करण्यापूर्वी इतर पक्ष दहावेळा विचार करतील. कारण ज्या काही थोड्याथोडक्या जागा कॉंग्रेस लढविते त्याही जिंकायची कॉंग्रेसची क्षमता नाही असे चित्र उभे राहायची शक्यता आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 12:47
नवीन
१९९९-२००४ - रालोआ
२००४-२०१४ - संपुआ
आणि या १५ वर्षांतली ५ वर्षे - २००६-२०११ तामिळनाडूत सत्तेत. म्हणजे द्रमुकने केंद्रातली सत्ता तामिळनाडूपेक्षा जास्त उपभोगली, दोन्ही घरचा पाहुणा उपाशी ही म्हण चुकीची ठरवली आणि परत २G सारखा घोटाळाही केला. कुठेतरी सुशिक्षित तामिळ मतदार याबद्दल विचार करत असणारच. त्यामुळे त्यांनी यावेळी कलैगनारना (एम. करुणानिधी) घरी बसवलं.
- Log in or register to post comments
न
नाईकांचा बहिर्जी
गुरुवार, 05/19/2016 - 13:38
नवीन
सुशिक्षित तमिळ मतदार ह्या शब्दरचनेची अंमळ मौजच वाटली! कलर टीवी मोबाइल वॉशिंग मशीन इतकेच काय तर 3जी कनेक्शन सुद्धा जिथे "निवडणूक वादे" ह्या सदरात येते तिथली जनता सुशिक्षित कशी असा प्रश्न पडतो, आपण आपल्या आजुबाजुला पाहतो ते तमिळ वेगळे असतात खुद्द तमिलनाडु मधले वेगळे, असला मूर्खपणा करणाऱ्या लोकांना जनता निवडते ह्यातच सगळे आले अन हे असले प्रताप युपी बिहार मधे सुद्धा दिसतात खरे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 13:50
नवीन
ते तर दोन्हीही पक्ष करतात हो तिथे. द्रमुक दोन रूपयांत किलोभर तांदूळ देतो तर अम्मा दोन रूपयांत इडली देते. शिवाय तामिळनाडूमधल्या लोकांनी राजकारण हा मुद्दा larger than life बनवलेला आहे. बाकी बाबतीत normal आणि down to earth असलेले तामिळ राजकारण म्हटलं की प्रचंड वेगळे असतात. पण तसे ते दोन्ही पक्षांच्याबाबतीत असतात.
- Log in or register to post comments
च
चिनार
Fri, 05/20/2016 - 07:46
नवीन
ह्याला लय बेक्कारीत सहमत !!
राजकारणच नव्हे तर तमिळ लोकांच्या कितीतरी गोष्टी larger than life असतात.
- Log in or register to post comments
प
प्रदीप साळुंखे
गुरुवार, 05/19/2016 - 14:42
नवीन
अगदी सही बोललात.
मी ही या एकाच मुद्यावर भाजपसमर्थक बनलो आहे.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 08:30
नवीन
काँग्रेसची मतांची टक्केवारी ही डाव्या पक्षांपेक्षा जास्त आहे. म्हणजे डाव्यांचा प्रभाव कमी होतोय असं म्हणता येईल का?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 09:25
नवीन
हो. असे म्हणता येईल.
NDTV वर म्हटले जात आहे की बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या सभांना तरूण आणि स्त्रिया हे दोन महत्वाचे घटक फारसे दिसत नव्हते. लोकांमध्ये असेच चित्र होते की डावे पक्ष म्हणजे मध्यमवयीन आणि वृध्दांचे पक्ष आहेत. त्याउलट ममता बॅनर्जींच्या सभांना या दोन घटकांची भरभरून हजेरी असे.
मला वाटते की डाव्या पक्षांची दुसरी चूक झाली आणि ती म्हणजे कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करणे. डाव्या मतदारांची हयात कॉंग्रेसला विरोध करण्यात गेली. त्याच कॉंग्रेसबरोबर हातमिळवणी करणे या मतदारांना फारसे पसंत पडलेले दिसत नाही. अशा मतदारांना भाजपला मते देणे नक्कीच जड गेले असेल पण त्यापैकी काहींनी तरी ममतांना मते दिलेली दिसत आहेत. या युतीमुळे कॉंग्रेसचे मात्र नुकसान झालेले दिसत नाही. कॉंग्रेसचे मुर्शिदाबाद आणि मालदा भागात पूर्वीपासूनच स्थान आहे. कम्युनिस्टांचे ३४ वर्षे राज्य असतानाही जे काही यश कॉंग्रेसला मिळत असे ते याच भागातून.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »