५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल उद्या १९ मे रोजी जाहीर होणार आहेत. त्यासाठी हा धागा. सर्व राज्यांच्या निवडणुकीसाठी मतदानपूर्व व मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज केवळ बातमी म्हणून देत आहे. या आकड्यांवर सध्या तरी विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही.
_________________________________________________________________
(१) तामिळनाडू
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २३४
अद्रमुक+ : एकूण २०३ (अद्रमुक - १५०, डीएमडीके (विजयकांत) - २९, उजवे कम्युनिस्ट - ९, डावे कम्युनिस्ट - १०, एमएनएमके - २, पीटी - २, फॉरवर्ड ब्लॉक - १)
द्रमुक+ : एकूण २०३ (द्रमुक - २३, काँग्रेस - ५, पीएमके - ३)
भाजप व इतर पक्ष - ०
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ३९
अद्रमुक - ३७ (४४.३% मते), द्रमुक - ० (२३.६% मते), भाजप - १ जागा (५.५०% मते) + पीएमके - १ जागा (४.४०%)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: अद्रमुक - ११६, द्रमुक - १०१, इतर - १७
सी व्होटरः अद्रमुक - १३०, द्रमुक - ७०, इतर - ३४
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतकः अद्रमुक+ ८९, द्रमुक+ १२४
न्यूज नेशन: अद्रमुक+ ९५, द्रमुक+ ११४
चाणक्यः अद्रमुक+ ८१-९९, द्रमुक+ १२९-१५१
अॅक्सिसः अद्रमुक+ ८९-१०१, द्रमुक+ १२४-१४०
सीव्होटरः अद्रमुक+ १३९, द्रमुक+ ७८
मतदानपूर्व सर्वेक्षणात अद्रमुक+ आघाडीला बहुमत मिळण्याचा अंदाज होता. परंतु मतदानोत्तर चाचणीत ५ पैकी फक्त एका चाचणीत अद्रमुक+ आघाडीला बहुमताचा अंदाज आहे.
तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलते. यावेळीही तीच परंपरा कायम राहणार असा माझा अंदाज आहे.
_________________________________________________________________
(२) केरळ
२०११ मधील विधानसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४०
संलोआ (४५.८३% मते) - काँग्रेस (३९), मुस्लिम लीग (२०), केरळ काँग्रेस मणी गट (७), इतर चिल्लर पक्ष (७)
डालोआ (४४.९% मते) - डावे कम्युनिस्ट (४४), उजवे कम्युनिस्ट (१३), निजद (४), राष्ट्रवादी काँग्रेस (२), इतर चिल्लर पक्ष (५)
भाजप - (६:०३% मते) आणि शून्य जागा
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - २०
काँग्रेस - ८ (३१.१% मते) + मुस्लिम लीग - २ (४.५०% मते) + केरळ काँग्रेस - १ (२.४०% मते)
सीपीआयएम - ५ (२१.६०% मते) + सीपीआय - १ (७.६०% मते) + डाव्या आघाडीने पाठिंबा दिलेले अपक्ष - २ + आरएसपी - १
भाजप - ० (१०.३० % मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: डालोआ - ८९, संलोआ - ४९, रालोआ - १, इतर - १
सी-व्होटरः डालोआ - ८६, संलोआ - ५३, रालोआ - १, इतर - ०
सी फोर एशियानेटः - ७७-८२, संलोआ - ५५-६०, रालोआ - ३-५, इतर - ०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: डावी आघाडी ९४, संयुक्त लोकशाही आघाडी ४३, भाजप ०-३
सी व्होटरः डावी आघाडी ७४, संयुक्त लोकशाही आघाडी ५४
टाइम्स नाऊ: डावी आघाडी ७८, संयुक्त लोकशाही आघाडी ५८
चाणक्यः डालोआ ६६-८५, संलोआ ४८-६६, भाजप+ ४-१२
केरळमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात डालोआला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. केरळमध्ये सुद्धा दर ५ वर्षांनी सत्तांतर होत असल्याने यावेळी डालोआ सत्तेवर येणार असा माझा अंदाज आहे. भाजप स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच केरळ विधानसभेत खाते उघडण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(३) पश्चिम बंगाल
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - २९४
तृणमूल काँग्रेस (१८४ जागा, ३८.९३% मते) + काँग्रेस (४२ जागा, ९.०९% मते) - एकूण २२६ जागा, ४८.०२% मते
डावी आघाडी (सीपीआय, सीपीआयएम, फॉरवर्ड ब्लॉक, आरएसपी) - एकूण ६० जागा, ३९.६८% मते
भाजप - शून्य जागा, ४.०६% मते
बाकी इतर सर्व पक्ष या राज्यात नगण्य आहेत.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - ४२
तृणमूल काँग्रेस - ३४ (३९.३% मते), सीपीआयएम - २ (डावी आघाडी एकूण मते - २९.५% मते), भाजप - २ जागा (१६.८% मते), काँग्रेस - ४ जागा (९.६% मते)
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: तॄणमूल - १६०, डावे पक्ष + कॉंग्रेस - १२७, भाजप - ४, इतर - ३
नेल्सनः तॄणमूल - १७८, डावे पक्ष + कॉंग्रेस - ११०, भाजप - १, इतर - ५
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: तृणमूल २३३, काँग्रेस्+डावे पक्ष ३८
एबीपी न्यूजः तृणमूल १७८, काँग्रेस्+डावे पक्ष ११०
सी व्होटरः तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष ७१-७९
टाइम्स नाऊ: तृणमूल १६३-१७१, काँग्रेस्+डावे पक्ष १२०
चाणक्यः तृणमूल १९६-२२४, काँग्रेस्+डावे पक्ष ६१-७९, भाजप ९-१९
पश्चिम बंगालमध्ये मतदानपूर्व व मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणाचे अंदाज सुसंगत आहेत. सर्व अंदाजात तृणमूल काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज दिलेला आहे. पश्चिम बंगालमध्ये बदल न करण्याची व स्थिर सरकारची परंपरा आहे. भाजप बर्याच कालावधीनंतर पश्चिम बंगाल विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
_________________________________________________________________
(४) आसाम
२०११ च्या विधानसभा निवडणुकीत आसाममध्ये खालील चित्र होते.
एकूण जागा - १२६
काँग्रेस (७८ जागा, ३९.३९% मते), एआययुडीएफ (१८ जागा, १२.५७% मते), बीपीएफ (१२ जागा, ६.१३% मते), आसाम गण परीषद (१० जागा, १६.२९% मते), भाजप (५ जागा, ११.४७% मते), तृणमूल काँग्रेस (१ जागा, २.०५% मते), अपक्ष (२ जागा)
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत अशी स्थिती होती.
एकूण जागा - १४
काँग्रेस - ३ (२९.६०% मते), भाजप - ७ जागा (३६.५०% मते), एआययुडीएफ - ३ (१४.८०% मते), आसाम गण परीषद - ० (३.८०%), अपक्ष - १
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानपूर्व मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
इंडीया टीव्ही - सी व्होटर: काँग्रेस - ४४, भाजप+ - ५७, एआययुडीएफ - १९, इतर - ६
सी व्होटर: काँग्रेस - ५३, भाजप+ - ५५, एआययुडीएफ - १२, इतर - ६
नेल्सन: काँग्रेस - ३६, भाजप+ - ७८, एआययुडीएफ - १०, इतर - २
एव्हीसी: काँग्रेस - ४०, भाजप+ - ४८-५४, एआययुडीएफ - २५, इतर - १०
२०१६ मधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदानोत्तर मतदार सर्वेक्षणानुसार संभाव्य जागांचा अंदाज
आजतक-अॅक्सिस: भाजप+ ७९-९३, काँग्रेस+ २६-३३
एबीपी न्यूजः भाजप+ ८१, काँग्रेस+ ३३
सी व्होटरः भाजप+ ५७, काँग्रेस+ ४१
न्यूज नेशनः भाजप+ ६३, काँग्रेस+ ४७
चाणक्यः भाजप+ ९०, काँग्रेस+ २७
_________________________________________________________________
बहुतेक सर्व मतदानपूर्व चाचण्यांचा असा अंदाज होता की आसाममध्ये भाजप आघाडी हा सर्वात मोठा पक्ष असेल, परंतु ते बहुमतापासून थोडेसे दूर राहतील. पण बहुतेक मतदानोत्तर चाचण्यांचा अंदाज असा आहे की आसाममध्ये भाजप+ आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल. तसे झाले तर प्रथमच पूर्वोत्तर भारतामध्ये भाजपची सत्ता येईल.
एकंदरीत आसाममध्ये भाजप चांगली कामगिरी करून सत्ता मिळविण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसची पराभवाची परंपरा सुरूच राहणार असून काँग्रेस केरळ व आसाममध्ये सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. बदल न करण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम राहण्याची शक्यता आहे. केरळ व तामिळनाडूत दर ५ वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा सुरू राहण्याची शक्यता आहे.
💬 प्रतिसाद
(231)
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 08:02
नवीन
तामिळनाडूमधील राजकारण मात्र आता रंगतदार होताना दिसत आहे. या राज्याविषयी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्याही मोठ्या राज्यात सर्वाधिक काळ सत्तेबाहेर कॉंग्रेस पक्ष राहिला असेल तर ते राज्य म्हणजे तामिळनाडू आहे. द्रमुकने कॉंग्रेसचा १९६७ मध्ये पराभव केला आणि त्यानंतर आजपर्यंत कॉंग्रेस पक्ष स्वबळावर सत्तेत येऊ शकलेला नाही. १९९० च्या दशकाच्या सुरवातीपर्यंत कॉंग्रेसची स्वत:ची १५% मते होती तर द्रमुक आणि अण्णा द्रमुकची सुमारे ४०% मते होती. त्यामुळे कॉंग्रेस ज्या बाजूला जाईल त्या बाजूचा जोरदार विजय होत असे. पण नंतरच्या काळात कॉंग्रेसचे ते स्थानही गेले. एकेकाळी चक्रवर्ती राजगोपालाचारी, सी. सुब्रमण्यम, के. कामराज, आर. वेंकटरामन हे कॉंग्रेसचे मोठे नेते तामिळनाडूमध्ये होते. आणि आता पूर्वीच्या वैभवाच्या आठवणीही कोणाच्या मनात नसतील कारण बहुसंख्य लोकांचा जन्म कॉंग्रेसचे ते वैभव सरल्यानंतर झाला आहे.
तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकला ४२% तर द्रमुक आघाडीला ४१% मते मिळाली आहेत असा अंदाज आहे. तर पी.एम.के- डी.एम.डी.के यांना प्रत्येकी ६% मते आहेत असे दिसते. या पराभवानंतर करूणानिधी सक्रीय राजकारणामधून निवृत्त होतील अशी चिन्हे आहेत. स्टॅलिन यांच्याकडे करूणानिधींची लोकप्रियता नक्कीच नाही. तेव्हा भविष्यात द्रमुकलाही उतरती कळा लागेल अशी चिन्हे आहेत. अशावेळी ती पोकळी भरून काढायला आणि वाढीला पी.एम.के-डी.एम.डी.के यासारख्या पक्षांना अधिक वाव मिळेल. भाजपला मात्र तामिळनाडूमध्ये अजून आपला प्रभाव दाखवता आलेला दिसत नाही. २०१४ मध्ये कन्याकुमारीची लोकसभेची जागा पक्षाने स्वबळावर जिंकली होती. पण या क्षणी भाजपला मात्र दोन जागांपेक्षा जास्त जागा मिळताना दिसत नाहीत. तेव्हा भविष्यात पी.एम.के- डी.एम.डी.के हे पक्ष काँग्रेसची पूर्वीची जागा घेतील असे दिसते. वायकोंनी तसा धसमुसळेपणाच केला. अन्यथा या पक्षांच्या यादीत एम.डी.एम.के चे नावही आले असते.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 08:16
नवीन
राष्ट्रीय पक्षांना स्वतःचा चेहरा नाही. तुम्ही पाहिलंत तर इतर दक्षिणी राज्यांत दोन्ही राष्ट्रीय पक्षांकडे नेते आहेत. कर्नाटकात सिद्धरामय्या आणि अनंतकुमार आहेत. त्यामुळे तिथे देवेगौडांचा प्रभाव कमी झालाय. तसे strong चेहरे काँग्रेस आणि भाजपला द्यायला लागतील, कारण आता जर काँग्रेसला come back करायचा असेल तर दक्षिणेकडूनच करावा लागेल. इंदिरा गांधींनी जसा चिकमगळूरमधून केला होता तसा. भाजपलाही आपले footprints भारतभर पसरवायचे असतील तर दक्षिण एकडे जावंच लागेल. त्यातल्या कर्नाटक आणि गोव्यात भाजप आहे, आंध्रात तेलगू देसमचा सत्तेत भागीदार आहे, तेलंगणात अगदीच नगण्य अवस्थेत आहे आणि केरळात आत्ता आत्ता खातं खोलायला सुरूवात केलेली आहे.
तामिळनाडूमध्ये द्रमुकचा पराभव ही दोघाही राष्ट्रीय पक्षांना AIADMK ला पर्याय म्हणून उभं राहायची चांगली संधी आहे. पुढच्या पाच वर्षांत एखाद्या नेत्याला groom करुन विरोधक म्हणून २०२१ मध्ये विरोधी पक्ष म्हणून पुढे येणं अवघड आहे, पण अशक्य नाही.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 09:41
नवीन
१९७८ मध्ये इंदिरा गांधी चिकमागळूरमधून पोटनिवडणुकीत लोकसभेवर निवडून गेल्या आणि त्यांची पुनरागमनाची सुरवात केली. पण १९७७ मध्ये उत्तर भारतात पक्षाचा धुव्वा उडालेला असला तरी दक्षिण भारत मात्र कॉंग्रेसच्या मागे खंबीरपणे होता. कर्नाटकात २८ पैकी २६, आंध्र प्रदेशात ४२ पैकी ४१, तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या साथीने ३९ पैकी ३१ तर केरळमध्ये उजव्या कम्युनिस्टांबरोबर २० पैकी १५ जागा कॉंग्रेसकडे होत्या. त्यामुळे पुनरागमन करायला मोठा बेस दक्षिण भारतात इंदिरा गांधींकडे होता. तो यावेळी पूर्ण भारतात कुठेच नाही. तेव्हा कॉंग्रेसला पुनरागमन करणे १९७८ पेक्षा अधिक कठिण जाईल हे नक्कीच.
- Log in or register to post comments
भ
भोळा भाबडा
गुरुवार, 05/19/2016 - 08:34
नवीन
बोकाभाऊ,गॅरीभाऊ,
मी एक न्यूजचॅनेल सूरू करतोय, जाॅईन होणार का??
बक्कळ मानधन दिले जाईल
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 09:32
नवीन
अरे वा. जॉईन व्हायला नक्कीच आवडेल :)
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 10:23
नवीन
केरळ विधानसभेमध्ये भाजपने प्रवेश केला आहे. नेमम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ज्येष्ठ नेते ओ.राजगोपाल यांनी विजय मिळवला आहे. ही एकच जागा भाजपने जिंकली आहे. मंजेश्वर आणि कासारगोड विधानसभा मतदारसंघांमधून अगदी १९८२ पासून भाजपला ३०-३२% मते मिळून दुसऱ्या क्रमांकावर पक्षाचे उमेदवार राहिले आहेत. ती परंपरा यावेळीही चालू राहिली. पण भाजपच्या उमेदवारांनी १०-१२% मते वाढवली आहेत. मंजेश्वरमधून पक्षाचे दुसरे ज्येष्ठ नेते के.सुरेंद्रन यांचा ९९ मतांनी अगदी थोडक्यात पराभव झाला आहे. कासारगोडमध्ये भाजप उमेदवाराला पूर्वी ३०-३२% मते मिळत होती ती वाढून ४०% झाली आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष के. राजशेखरन यांचा वट्टियुरकावू मतदारसंघातून आणि माजी क्रिकेटपटू श्रीशांतचा तिरूवनंतपुरम मतदारसंघातून पराभव झाला आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 10:58
नवीन
एकूणच भाजपसाठी आजचा दिवस म्हणजे ’अच्छा दिन’ राहिला आहे.
आसामात मित्रपक्षांसह भाजपने दोन-तृतीयांश बहुमत मिळवले आहे (या क्षणी १२६ पैकी ८९ जागांवर आघाडी). केरळ आणि पश्चिम बंगाल विधानसभांमध्ये प्रथमच भाजपने प्रवेश केला आहे. तामिळनाडूमध्ये मात्र भाजपला विधानसभेची जागा जिंकणे शक्य झालेले नाही. तरीही त्यापूर्वीही भाजपने तामिळनाडूत स्वबळावर आतापर्यंत एकदाच (१९९६ मध्ये) जागा जिंकली आहे. त्यामुळे यश मिळाले नसले तरी तामिळनाडूमध्ये मुळात गमाविण्यासारखे भाजपकडे काहीच नव्हते. त्यामुळे हे अपयश नक्कीच म्हणता येणार नाही.
पोटनिवडणुकांमध्येही भाजपची स्थिती बरीच चांगली राहिली आहे. मेघालयमध्ये भाजपचा मित्रपक्ष NPP चे उमेदवार आणि लोकसभेचे माजी अध्यक्ष पी.ए.संगमा यांचा मुलगा पोटनिवडणुकीत तुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून गेला आहे. तर गुजरातमध्ये तलाला विधानसभा मतदारसंघातून भाजपने विजय मिळवला आहे. २००७ आणि २०१२ मध्ये ही जागा कॉंग्रेसने जिंकली होती. उत्तर प्रदेशात दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली-- बिलारी आणि जांगीपूर. या दोन्ही मतदारसंघातून भाजपला २०१२ मध्ये १०% पेक्षा कमी मते होती आणि भाजप उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले होते. या दोन्ही जागा समाजवादी पक्षाने राखल्या. पण भाजपने या मतदारसंघांमध्ये ४०%-४५% मते घेतली आहेत. झारखंडमध्येही दोन मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुक झाली. त्यापैकी मागच्या वेळी जिंकलेली गोड्डाची जागा भाजपने राखली आहे तर दुसरी पानकीची जागा कॉंग्रेसने राखली आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 11:17
नवीन
तलाला मतदारसंघ काँग्रेसने राखला असल्याचे सकाळी बातम्यात दाखवित होते. पोटनिवडणुकीच्या निकालांची लिंक आहे का? उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरनगर येथेही विधानसभेची पोटनिवडणुक होती ना? त्याचा काय निकाल आहे?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 11:23
नवीन
निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर http://eciresults.nic.in/ConstituencywiseS0691.htm?ac=91 इथे तलालाचा निकाल बघता येईल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 11:34
नवीन
ओह! तलालामध्ये भाजपने निसटता विजय मिळविलेला दिसतोय.
- Log in or register to post comments
प
प्रान्जल केलकर
गुरुवार, 05/19/2016 - 11:08
नवीन
ह्या निवडणुकीमुळे राज्यसभेत असलेल कॉंग्रेसच्या किती सीट्स कमी होतील आणि भा ज पा च्या किती सीट्स वाढणार ????
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 11:36
नवीन
राज्यसभेच्या संख्याबळात तातडीने फरक पडणार नाही. भविष्यात जेव्हा आसाममधून राज्यसभेचे खासदार निवडले जातील तेव्हा भाजपचे २ किंवा ३ खासदार निवडून येतील. आजपर्यंत आसाममध्ये काँग्रेसचे बहुमत असल्याने काँग्रेसचे खासदार निवडून जात होते. यापुढील काळात भाजपचे निवडून जातील. अर्थात २-३ खासदारांनी किरकोळ फरक पडेल.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Fri, 05/20/2016 - 11:43
नवीन
हे वाचा.
http://www.loksatta.com/desh-videsh-news/rajya-sabha-count-numbers-to-stay-same-but-govt-can-say-cheers-1240825/
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 11:14
नवीन
मतमोजणी अजून पूर्ण झाली नसली तरी निकालाचा पूर्ण अंदाज आला आहे. तामिळनाडू वगळता इतर निकाल अपेक्षेप्रमाणेच लागले आहेत. तामिळनाडूत अनेक वर्षांनतर प्रथमच सताबदलाची परंपरा खंडीत झाली. आसाममध्ये प्रथमच भाजप सत्तेवर येत आहे. काँग्रेसचा केरळ व आसाममध्ये पराभव झाला तर तामिळनाडूत व बंगालमध्ये काँग्रेस व त्यांच्या साथीदारांचा पराभव झाला. 'कॉंग्रेसमुक्त भारत' या दिशेने अजून एक पाऊल पुढे पडले आहे. २०१५ हे वर्ष भाजपसाठी वाईट गेले होते. आधी दिल्ली व नंतर बिहारमध्ये भाजपचा दारूण पराभव झाला होता. देशात भाजपविरूद्ध वातावरण निर्माण झाले असून काँग्रेस पुनरूज्जीवनाच्या मार्गावर आहे असा प्रचार सुरू होता. अगदी महानगरपालिकेच्या काही वॉर्डातील पोटनिवडणुकांचे संदर्भ देऊन राहुल गांधींना श्रेय दिले जात होते. सुदैवाने भाजपने मागील वर्षींच्या चुकातून बोध घेतलेला दिसतो. आसाममध्ये योग्य त्या पक्षांशी युती करून स्थानिक उमेदवार मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करून भाजपने योग्य पावले टाकली. रोहीत वेमुला, जेएनयु इ. प्रकरणांवरून भाजपवर सडकून टीका झाली. मोदींची पदवी, स्मृती इराणी असे अस्तित्वात नसलेले वाद ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण केले गेले. केरळमधील मोदींच्या अर्भक मृत्युदराच्या विधानाचा दुष्प्रचाराकरिता भरपूर वापर केला गेला. अर्थात त्यामुळे फारसा फरक पडलेला दिसत नाही. भाजपने केरळमध्ये प्रथमच खाते उघडले आहे, तर बंगालात निदान ४-५ जागा तरी मिळण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूत द्रमुक काँग्रेसशी युती न करता स्वतंत्र लढले असते तर कदाचित त्यांचा विजय झाला असता. पण काँग्रेसची दु:संगत भोवली. काँग्रेसबरोबर केलेली चुंबाचुंबी तामिळ मतदारांना आवडलेली दिसत नाही. बंगालमध्ये देखील काँग्रेसशी युती केली नसती तर डाव्या पक्षांच्या कामगिरीत सुधारणा झाली असती. परंतु बंगालमध्ये काँग्रेसशी केलेली शय्यासोबत डाव्या पक्षांना भोवली. जोपर्यंत कॉंग्रेस गांधी घराण्याचे जू मानेवर वागवित आहे तोपर्यंत भाजपला काळजी नाही. काँग्रेसला भविष्यात पुढे येण्यासाठी सर्वप्रथम गांधी घराण्याचे जोखड मानेवर फेकून द्यावे लागेल व नवीन नेतृत्व शोधावे लागेल. अर्थात सध्या कॉंग्रेसमध्ये असा नेता दिसत नाही. जुलै २०१७ मध्ये विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी राष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर जर काँग्रेसींनी नेतृत्व त्यांच्याकडे सोपविले व त्यांनी कॉंग्रेसमधील त्यातल्या त्याच चांगले नेते निवडून आपली टीम निवडली तर काँग्रेसचे पुनरूज्जीवन होण्याची शक्यता आहे. अन्यथा सोनिया, राहुल व प्रियांका या तिघांपलिकडे काँग्रेसने पाहिले नाही तर काँग्रेसची अधोगती थांबणार नाही.
या निकालांचे राष्ट्रीय राजकारणावर थोडेसे परीणाम होणे अटळ आहे. तिसर्या आघाडीचे अनेक नेते राष्ट्रीय राजकारणात येऊन भाजप व काँग्रेसविरोधी आघाडीचा नेता बनण्यास उत्सुक आहेत. नितीशकुमारांनी त्या दृष्टीने पावले टाकण्यास केव्हाच सुरूवात केली आहे. केजरीवालांच्या पक्षाचे दिल्लीबाहेर अस्तित्व नसले तरी सातत्याने राष्ट्रीय वृत्तपत्रात सर्व राज्यात स्वतःचा उदोउदो करणार्या जाहिराती प्रसिद्ध करून राष्ट्रीय नेता बनण्याची त्यांची केविलवाणी धडपड सुरू आहे. या यादीत आता जयललिता व ममता बॅनर्जींची भर पडेल. लागोपाठ दोन निवडणुका जिंकल्याने राष्ट्रीय पातळीवर त्यांचा दावा इतरांच्या तुलनेत मजबूत झाला आहे. आपल्या विदूषकी चाळ्यामुळे व नौटंकीमुळे केजरीवाल राष्ट्रीय नेता बनणे अवघड आहे, तर लालूसारख्या महाभ्रष्टाचारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीबरोबर शय्यासोबत केल्याने नितीशकुमारांनाही राष्ट्रीय नेता बनणे अवघड आहे. मुलायम, मायावती इ. ना उत्तर प्रदेशाबाहेर स्थान नाही. पण तेसुद्धा या शर्यतीत आहेत.
भाजपला आसाम हे एक नवीन राज्य मिळत आहे. भविष्यात भाजपला आसाममधून २-३ खासदार राज्यसभेवर निवडून आणता येतील. तसेच जुलै २०१७ मधील राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आसाममधील वाढलेले आमदार व बंगाल आणि केरळ मधून निवडून आलेले मूठभर आमदार यांच्या मतांचा फायदा होईल.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 05/19/2016 - 11:34
नवीन
मी न्यूजचॅनेल बघुन वर्ष लोटलं त्यामुळॅ याबद्दल तिथे चर्चा काय चाललिये कल्पना नाही. पण यात एक गोष्ट कोणाच्या किती लक्षात आलीये कल्पना नाही की काँग्रेस जिंकणं/हरणं हा मुद्दाच नाहिये.
तिसरी आघाडी अधिक सक्षम झालीये.
ममताच्या जागा वाढल्या, केरळातही डावे जिंकले, तमिळनाडकोही काँग्रेस ज्याच्यासोबत होती त्याला नाकारतिसस्वतंत्र तिसर्या पक्षाला पहिल्यांदाच सलग दुसर्यांदा निवडून दिलंय
केवळ कर्नाटक, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश हा भाग सोडला तर भाजपा व काँग्रेसला एकट्याच्या बळावर सत्ता मिळावता आलेली नाही. आसाम हिमाचल वगैरे लहान राज्य आहेत.
पैकी गोवा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल इथे आआप चंचुप्रवेश करू पाहते आहे.
पंजाब महाराष्ट्रात भाजपा तर बिहारात काँग्रेस स्वतःच्या जीवावर नाही.
जर हे नेते एक आणि नेमका नेता (पंतप्रधानपदाचा उमेदवार) निवडू शकले तर भाजपाला व काँग्रेसला पुढिल निवडणूक प्रचंड कठिण जाईल. नितीशकुमार विरुद्ध मोदी अशी २०१९ निवडणुक असेल हे या निकालांनी जवळजवळ नक्की केले आहे.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 12:02
नवीन
असहमत.
तिसरी आघाडी या नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नाही. त्यामुळे तिसरी आघाडी बळकट झाली हा भ्रम आहे. काही प्रादेशिक पक्ष बळकट झालेले दिसतात. परंतु ते पूर्वीपासूनच बळकट होते.
भाजप गुजरात, म.प्र., छत्तीसगड, राजस्थान, गोवा आणि हरयाना या सहा राज्यात स्वबळावर सत्तेत आहे. महाराष्ट्र, आता आसाम आणि झारखंड या तीन राज्यांमध्ये मध्ये भाजप हा प्रमुख पक्ष आहे व शिवसेना, आसाम गण परीषद, बोडो पीपल्स फ्रंट व झारखंड स्टुडंट्स युनियन हे प्रादेशिक पक्ष भाजपच्या तुलनेत खूपच लहान आहेत. फक्त पंजाब, आंध्रप्रदेश व जम्मू-काश्मिर या तीन राज्यात भाजप कनिष्ठ सहकार्याच्या भूमिकेत आहे. म्हणजे सत्तेवर असलेल्या १२ राज्यांपैकी ६ राज्यात भाजप स्वबळावर सत्तेत आहे, ३ राज्यात वरिष्ठ भागीदार आहे व फक्त ३ रा़ज्यात भाजप कनिष्ठ सहकारी आहे.
काँग्रेस कर्नाटक, हि.प्र. व उत्तराखंड मध्ये स्वबळावर सत्तेत आहे. केरळ व बिहार मध्ये अनेक प्रादेशिक पक्षांचे कडबोळे सत्तेवर आहे. तामिळनाडू, तेलंगण, दिल्ली, पश्चिम बंगाल, ओरिसा आणि उत्तर प्रदेश या ६ राज्यात वेगवेगळे प्रादेशिक पक्ष स्वबळावर सत्तेत आहेत.
यातील अनेक प्रादेशिक नेत्यांना राष्ट्रीय नेता बनण्याची महत्वाकांक्षा आहे. नितीशकुमार, केजरीवाल, ममता, मुलायम, जयललिता अनेक वर्षांपासून आपण तिसर्या आघाडीचा राष्ट्रीय नेता बनावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांच्या आपापसात लाथाळ्या आहेत. ममताला डावे पक्ष पाठिंबा देणार नाहीत, जयललिताला द्रमुक पाठिंबा देणार नाही, नितीशकुमारांना लालू पाठिंबा देणार नाही, मुलायलला मायावती व अजितसिंग पाठिंबा देणार नाही. शरद पवार हेसुद्धा अधूनमधून यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु त्यांना महाराष्ट्रातूनच पाठिंबा मिळणे शक्य नाही. यातील सर्वात आदरणीय नाव म्हणजे नवीन पटनाईक. जर तिसरी आघाडी सत्तेवर येण्याची परिस्थिती निर्माण झाली तर डार्क हॉर्स म्हणून पटनाईकांचे नाव पुढे येऊ शकते.
२०१९ मधील निवडणुक नितीशकुमार विरूद्ध मोदी अशी असेल हा गैरसमज आहे. लालूशी युती करून नितीशकुमारांनी सत्ता टिकविली. परंतु त्यामुळे देशभर वाईट संदेश गेला आहे. लालूने बिहारमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळविले. लालूमुळे बिहारमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा जंगलराज सुरू झाले आहे असे वाहिन्यांवरून सांगितले जात आहे. लालूकडे स्वतःचे ८० व काँग्रेसचे २७ असे १०७ आमदार आहेत. बहुमतासाठी लालूला फक्त १५ आमदार हवे आहेत. लालू नितीशकुमारांचे सरकार पाडून स्वतःच्या मुलाला मुख्यमंत्री बनविण्याचा प्रयत्न करणार हे नक्की. काही काळाने नितीशकुमारांना लालूचे जोखड फेकून द्यावे लागणार आहे. नितीशकुमार व भाजप पुन्हा एकदा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केजरीवालांच्या पक्षाला दिल्लीबाहेर स्थान नाही. गोवा, उत्तराखंड इ. राज्यात आआप चंचुप्रवेश करू पाहत आहे म्हणजे नक्की काय करीत आहे? आआपने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिल्ली वगळता एकाही रा़ज्यात विधानसभा अथवा स्थानिक निवडणुकीत सहभाग घेतलेला नाही. त्यांनी दिलेल्या भरमसाठ आश्वासनांचा दिल्लीकरांवर प्रभाव पडला. परंतु इतर राज्यात असा प्रभाव पडणे अशक्य आहे. त्यांची नौटंकी आणि विदूषकी चाळे यामुळे दिल्लीबाहेर त्यांच्याविरूद्ध अत्यंत नकारात्मक मत आहे. पुढील वर्षी होणार्या पंजाबमधील निवडणुकीत सुद्धा आआप काहीही करू शकणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अनुप ढेरे
गुरुवार, 05/19/2016 - 12:08
नवीन
पंजाबात आप जिंकायचे चांसेस खूप आहेत. गोव्यात देखील.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 12:15
नवीन
आआपला गोव्यात स्थानच नाही. गोव्यात आआपकडे नेते व कार्यकर्ते नाहीत व तिथे आआपची संघटना देखील नाही. केजरीवालांनी तिथे एखादी सभा घेतली म्हणजे संपूर्ण गोवा आआपमय होईल ही चुकीची समजूत आहे. दिल्लीतही आआपचा प्रभाव ओसरायला सुरूवात झाली आहे. फेब्रुवारी २०१५ मध्ये तब्बल ५४% मते घेऊन ७० पैकी ६७ आमदार जिंकलेल्या आआपला नंतर फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. सप्टेंबर २०१५ मधील दिल्ली विद्यापीठातील निवडणुकीसाठी सिसोदिया व केजरीवालांनी विद्यापीठात सभा घेतली होती. प्रत्यक्षात सर्व ४ जागा भाजपने जिंकल्या. आआपचे उमेदवार तिसर्या व चौथ्या क्रमांकावर राहिले. तरू़ण विद्यार्थ्यांमध्येच आआपचा पाठिंबा घटलेला दिसला. ३-४ दिवसांपूर्वी दिल्ली महापालिकेच्या १३ वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत आआपने किमान ११-१२ जागा जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात आआपचे फक्त ५ नगरसेवक निवडून आले. पंजाबमध्ये सुद्धा आआप जिंकेल असे वाटत नाही. २०१४ च्या निवडणुकीत पंजाबमध्ये १४ खासदारांपैकी आआपचे ४ खासदार निवडून आले होते. परंतु आता २ वर्षानंतर आआपचा प्रभाव पूर्णपणे ओसरला आहे. बघूया २०१७ मध्ये काय होतंय ते.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 14:22
नवीन
खरं तर ही पोटनिवडणुक आआपला खूपच सोपी जायला हवी होती. इतर कुठल्याही महापालिकेप्रमाणे दिल्ली महापालिकेचाही कारभार अत्यंत भ्रष्ट आणि अकार्यक्षम आहे. आणि भरीस भर म्हणजे २००७ पासून भाजप दिल्ली महापालिकेत सत्तेत आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी मते खायची आआपला सुवर्णसंधी होती. आणि फेब्रुवारी २०१५ मधील कामगिरी लक्षात घेता ११-१२ काय १३ च्या १३ जागा आआपने जिंकायला हव्या होत्या. प्रत्यक्षात जिंकल्या केवळ ५. प्रस्थापितविरोधी मते कॉंग्रेसला मोठ्या प्रमाणावर गेली.
आता लाभाचे पद या मुद्द्यावरून आआपच्या २१ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द व्हावे असे फार वाटते. असे व्हायची शक्यता आहे हे लक्षात घेऊन मध्यंतरी नेहमीप्रमाणे केजरीवालांनी मोदींच्या नावाने आदळआपट केली सुध्दा. म्हणजे मजा बघा-- हे कायद्यातील तरतुदींच्या विरोधात अशा २१ आमदारांची दिल्ली सरकारच्या लाभाच्या पदावर नियुक्ती करणार, त्यावर नोटिस निवडणुक आयोग बजावणार-- म्हणजे यांची आमदारकी रद्द झाली तर ती कायद्यातील तरतुदींमुळे होणार. आणि केजरीवाल थयथयाट करणार कोणाच्या नावाने? तर मोदींच्या नावाने!! असो. तर या २१ जागांवर पोटनिवडणुक झाल्यास ती मिनी दिल्ली विधानसभा निवडणुक असेल आणि त्यातून केजरीवालांनी किती समर्थन गमावले आहे आणि किती कायम ठेवले आहे हे स्पष्ट होईलच.
केजरीवालांनी वसंतपंचमी निमित्त पंजाबात सभा घेतल्या त्याला चांगलीच गर्दी झाली होती. काही ठिकाणी लोक कॉंग्रेस आणि अकाली दलाची वाहने वापरून केजरीवालांच्या सभांना गेले होते अशाही बातम्या आल्या होत्या. तसेच काही सर्वेक्षणांनुसार पंजाबमध्ये आआप स्वीप करेल असे आले आहे. २०१७ ची पंजाब विधानसभा निवडणुकही अकाली दल-भाजपसाठी हरायचीच निवडणुक आहे आणि ती निवडणुक आआप जिंकायची शक्यता नक्कीच जास्त आहे असे वाटते. आणि तसेच व्हावे असेही मला वाटते. कारण त्यातून पंजाबमधून केजरीवालांना आव्हान देणारे दुसरे सत्ताकेंद्र तयार होईल. आणि स्वत: केजरीवाल दिल्ली सोडून पंजाबचे मुख्यमंत्री व्हायला गेले तर हातचे सोडून पळत्याच्या मागे जाणारा हा टॅग केजरीवालांवर आणखी ठळक होईल आणि दिल्ली हातातून निसटत जाईल ही पण शक्यता आहेच. काहीही झाले तरी त्या माणसाचा आणि त्याच्या पक्षाचा शेवटी पूर्ण धुव्वा उडावा हीच माझी इच्छा.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 14:49
नवीन
का हो? Anti-incumbency व्यतिरिक्त काही ठोस कारणं आहेत? २००२-२००७ मध्ये पंजाबात काँग्रेस होती. मग २००७-१२ मध्ये आणि अाता २०१२-१७ परत त्यांचंच राज्य आहे. उत्सुकता म्हणून विचारतोय.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 05/19/2016 - 14:51
नवीन
कॉग्रेस ला बहुमत मिळावे अशी मनोकामना करतो.... आप वाले जर आले तर....विचार हि करवत नाहि.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 15:16
नवीन
हे कारण आहेच. आणि दुसरे म्हणजे अकाली दल-भाजप सरकारमध्ये प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थाशी संबंधित बेकायदा व्यवसायातील लोकांचे सत्ताधारी अकाली दलाच्या नेत्यांशी असलेले साटेलोटे ही महत्वाची कारणे आहेत. नोव्हेंबर २०१४ मध्ये अकाली दलाच्या एका नेत्याच्या मालकीच्या बस कंपनीच्या बसमध्ये निर्भया-२ प्रकार घडला होता. अशा घटनांमुळेही अकाली दलाविरूध्द जोरदार नाराजीची भावना आहे अशा बातम्या आहेत.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 15:28
नवीन
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष प्रताप बाजवा आणि पंजाबमधल्या काँग्रेसचा चेहरा कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यातून विस्तवही जात नाही. मजा म्हणजे बाजवा गुरदासपूरमधून लोकसभा निवडणूक हरले (विनोद खन्ना यांच्या विरोधात) आणि अमरिंदर सिंग अमृतसरमधून अरुण जेटलींना हरवून जिंकले. त्यामुळे अमरिंदर सिंग यांचं पारडं जड आहे. पण त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं तर प्रताप बाजवा आणि पक्षसंघटनेचा सक्रीय पाठिंबा मिळणं हे कठीण आहे. पण मग पर्याय काय? अाआप? ते दिल्ली परवडली असला गोंधळ घालतील. एका सीमावर्ती, सामरिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यात हे कितपत परवडण्यासारखे आहे? दिल्ली विधानसभा ही glorified municipality आहे आणि महत्वाच्या गोष्टी, उदाहरणार्थ पोलिस यंत्रणा केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे. पण पंजाबमध्ये ही सगळी यंत्रणा आआपसारख्यांच्या, ज्यांचे प्रमुख शेवटी केजरीवाल असणार आहेत - अशांच्या हाती देणं ही फार मोठी चूक ठरणार नाही का?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 15:31
नवीन
होईलच ना. पण देशात लोकशाही असल्याची ही किंमत आपल्याला मोजायला हवी.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 05/19/2016 - 15:34
नवीन
पण मग पर्याय काय? अाआप? ते दिल्ली परवडली असला गोंधळ घालतील. एका सीमावर्ती, सामरिक दृष्ट्या महत्वाच्या राज्यात हे कितपत परवडण्यासारखे आहे? दिल्ली विधानसभा ही glorified municipality आहे
अतितिव्र सहमती
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 05/19/2016 - 12:16
नवीन
प्रादेशिक पक्षांना जोवर फायदा दिसतोय तोवर ते एकत्रच रहातील. काँग्रेस किंवा भाजपाशिवाय अशी आघाडी भारतात मुळात कधीच उभीच राहिलेली नाही. काँग्रेस दुर्बळ झाल्यावर ती जागा भाजपाने घेतली असती तर तिचरी आघाडी तुम्ही म्हणता तशी उभीच राहिली नसती. पघा आता ते सत्तेसाठी का होईना एकत्र येतील असे वाटते.
जिथे काँग्रेस आकुंचन पावते आहे आहे ती जागा तिसरेच पक्ष घेताहेत. तेव्हा काँग्रेस व भाजपा शिवायची तिसरी आघाडी उभी रहाण्याची शक्यता पहिल्यांदा उभी रहातेय (आजवर तिसर्यांची सरकारे जेव्हा बनली तेव्हा ती या दोन राष्ट्रीय पक्षांनी पाडली आहेत, प्रादेशिक पक्षांच्या अंतर्गत कलहातून नाही हे फक्त नोंदवतो)
तिसरी आघाडी टिकेल किती माहित नाही पण आता ती बनणार हे ऑलमोस्ट नक्की झालेय. काँग्रेस जोवर मजबूत होता तेव्हा ही आघाडी स्वबळावर उभी रहाण्या इतकी शक्यता नव्हती
ऑलमोस्ट यासाठी म्हणालो (त्यापैकी एक कारण तुम्हीच वर नाकारले आहे ते असे की) पंजाबात जर आआपने करिश्मा केला आणि युपीत भाजपाला जिंकता आले नाही की)तिसर्या आघाडीवर शिक्कामोर्तब होईल!
ही तिसरी आघाडी भाजपा/एन्डीएला हरवू शकेल का माहित नाही. मात्र काँग्रेस इतकी दुर्बळ झाल्यावर मोदींसमोर उभी राहु शकेल अशी तिच एक आघाडी शिल्लक रहाते इतके तर आता प्रत्येक पक्षाने जाणले आहे. (शिवसेना, तेलुगू देसम हे ही वेळ आली तर लगेच भाजपाकडे पाठ फिरवपाठ)
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 12:25
नवीन
फक्त तॄणमूल काँग्रेस, बिजद, तेरास व तेदे हे ४ प्रादेशिक पक्ष हे त्या त्या राज्यातले एकमेव प्रादेशिक पक्ष आहेत. इतर रा़ज्यात एकापेक्षा जास्त प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व आहे व ते एकमेकांचे विरोधक आहेत. त्यामुळे ते एकत्र येणे खूप अवघड आहे. जरी ते एकत्र आले तरी त्यांची आघाडी फार काळ टिकत नाही असे इतिहास सांगतो. आजवरची तिसर्यांची सरकारे कार्यकाल पूर्ण करू शकली नाहीत कारण ती सरकारे स्वबळावर सत्तेत आली नव्हती. ती सर्व सरकारे राष्ट्रीय पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेवर आली होती. त्यामुळे ती सरकारे कार्यकाल पूर्ण करणे शक्यच नव्हते.
दुसरे म्हणजे जिथे जिथे भाजपने स्थान निर्माण केले तिथे बर्याच ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व संपले आहे (उदा. गोव्यात मगोपा, महाराष्ट्रात देखील मनसे संपुष्टात आली असून शिवसेना संपण्याच्या मार्गावर आहे, आसाममध्ये दोन वेळा पूर्ण १० वर्षे सत्तेवर असलेली आगप आता भाजपच्या दुय्यम भागीदाराच्या भूमिकेत आहे). त्यामुळे तिसरी आघाडी जर निर्माण झाली तर त्यात अगदी थोडेच प्रादेशिक पक्ष असतील व त्यांना शेवटी एखाद्या राष्ट्रीय पक्षाच्या पाठिंब्यावरच उभे रहावे लागेल. त्यांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षेमुळे अशी आघाडी प्रत्यक्षात येणे खूपच अवघड आहे.
- Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश
गुरुवार, 05/19/2016 - 12:39
नवीन
राष्ट्रवादी, देवेगौडांचा जनता दल, अण्णा द्रमुक, केरळातले डावे (बंगालातले वायले), समाजवादी किंवा बसपा यापैकी एक, नितीश कुमारांचा जद+राजद (नजीकच्या भविष्यात तरी ते दूर जातीलशी स्वप्ने बघणे मुंगेरीलालची ठरावीत) हे अधिकचे आपापल्या राज्यातील मजबूत पक्ष
माझ्या मते तिसरी (किंवा विकास म्हणतात तसे दुसरी ;) ) आघाडी हा दुर्लक्षिण्याचा विषय राहिलेला नाही. पंजाब व युपी या दोन राज्यांत जर भाजपा व काँग्रेस एकहाती काही करू शकल्या नाहीत तर ही आघाडी नक्की एकत्र येईल.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 12:41
नवीन
याच दृष्टीने मला तामिळनाडूमध्ये जयललिता जिंकायला हव्या होत्या. ते मी काही दिवसांपूर्वी खरडफळ्यावर लिहिलेही होते. त्या दृष्टीने आजचे निकाल खूपच चांगले लागले आहेत. जर जयललितांनी स्वीप केला असता तर २०१९ मध्ये तिसऱ्या आघाडीला द्रमुकला न घेता अण्णा द्रमुकला घेण्यात काहीच अडचण नव्हती. पण आता द्रमुकलाही थोड्याच जागा आणि थोडीच मते कमी आहेत. आणि एखाद टक्का मते इकडची तिकडे झाली तर निकाल पूर्ण उलट होऊ शकतो. त्यामुळे आता द्रमुक-अण्णा द्रमुक एकमेकांना तुल्यबळ पक्ष म्हणून सामोरे आले आहेत. आणि ते mutually incomptabile आहेत. डाव्यांचा बंगालमध्ये धुव्वा उडाला असला तरी केरळमध्ये मात्र चांगलेच यश मिळाले आहे. ममता आणि डावे एकाच आघाडीत असणे फारच कठिण. तीच गोष्ट सपा आणि बसपाची. हे दोन पक्ष mutually incompatible आहेत. इतके दिवस लालू आणि नितीशही असेच परस्परविरोधी आहेत असे वाटत होते पण ते एकत्र आले. तरीही लालू-नितीश आणि सपा-बसपा किंवा ममता-डावे यांच्यात तुलना करता येणार नाही. लालू-नितीश अगदी जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनापासून एकमेकांचे सहकारी होते ते अगदी १९९४ पर्यंत. म्हणजे सुरवातीची २० वर्षे हे एकमेकांचे सहकारी होते. पण सपा-बसपा किंवा ममता-डावे यांच्यात तसे सख्य कधीच नव्हते.
आणि त्यातून बंगालमध्ये यश मिळाल्यामुळे ममता आणि तामिळनाडूत यश मिळाल्यामुळे जयललितांचा नेतेपदावरचा दावा अधिक प्रबळ झाला आहे (त्यातल्या त्यात ममतांचा अधिक). नितीशकुमार कितीही काहीही झाले तरी बिहारमध्ये अर्धे तर त्याच आकाराच्या राज्यांमध्ये ममता आणि जयललिता पूर्ण. तेव्हा नितीशकुमारांपेक्षा त्यांचा दावा अधिक प्रबळ असेल. तसेच २०१७ मध्ये उत्तर प्रदेशात यश मिळाल्यास मायावतीही त्याच कॅटेगिरीमध्ये येतील. त्यामुळे नितीशकुमार कितीही गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असले तरी त्यांची वाट तितकी सोपी नाही.
तिसरी आघाडी २०१९ मध्ये अस्तित्वात येणारच नाही असे मी नक्कीच म्हणत नाही. तृणमूल, बिजद, अण्णा द्रमुक/ द्रमुक, सपा/बसपा, जदयु, राजद, आआप, जदस अशी तिसरी आघाडी येऊपण शकेल. पण या आघाडीलाही स्वबळावर बहुमत मिळणे शक्य नाही. शेवटी राष्ट्रीय पक्षावर अवलंबून राहणे आलेच.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
गुरुवार, 05/19/2016 - 14:20
नवीन
तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी राज्यापातळीवरचे यश राष्ट्रीय निवडणूकीत मिळणे अवघड आहे. वाजपेयींच्या वेळी आणि पूर्वीदेखील कडबोळे सरकारने काम पाहिले असल्याने मतदार कधीच आघाडी च्या मागे उभा राहणार नाही.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 05/19/2016 - 22:43
नवीन
सध्या महाराष्ट्रात जाणवण्यालायक अस्तित्व फक्त शिवसेनेचं आहे. सेना संपणं फार लांब राहिलं, भाजपाला सेनेच्या नाकदुर्या काढाव्या लागतील येत्या काळात.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/20/2016 - 07:27
नवीन
शिवसेनेने कितीही आवाज केला तरी त्यांना स्वबळावर भाजपच्या निम्म्याच जागा निवडून आणता आल्या. मुंबई महापालिका जर शिवसेनेला राखता आली तर शिवसेनेत थोडीफार धुगधुगी राहील, आणि हेच ओळखून भाजपने त्याविरूद्ध मोर्चेबांधणी सुरु केलेली आहे. केंद्रात सेनेला फक्त एक मंत्रिपद आहे. राज्यात महत्वाची सगळी पदं भाजपकडे आहेत. पण १५ वर्षांनंतर सत्ता उपभोगायला मिळत असल्यामुळे सेना गप्प बसली आहे. ते जर सरकारमधून बाहेर पडले तर सहानुभूती भाजपला मिळेल आणि परत जर निवडणूक झाली तर सेनेच्या आत्ता आल्या आहेत तेवढ्याही जागा येणार नाहीत. शिवाय सत्तेत सहभागी होता येणार नाही. हा सगळा व्यावहारिक विचार करूनच सेना सरकारमध्ये गप्प बसलेली आहे. अधूनमधून ते डरकाळी फोडतात, मग त्यांना भाजपबरोबर एका व्यासपीठावर जागा दिली, मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी आमचे मार्गदर्शक वगैरे साखरपेरणी केली, की ते शांत होतात. त्यांच्या नाकदु-या काढणं दूर, त्यांच्यातल्या काहींना फोडून भाजपने महाराष्ट्रात १४४ चा आकडा पार करायचा प्रयत्न केला तर मला आश्चर्य वाटणार नाही. मुंबई महापालिकेत सेना काय करते त्यावर भाजप हे कधी करायचं ते ठरवेल असं माझं मत आहे. It's not a question of if, it's a question of when.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 05/20/2016 - 07:53
नवीन
पण सेना संपण्याच्या मार्गावर अजीबात नाहि. सेना तिच्या मर्यादीत बालेकिल्ल्यात अगदी सुरक्षीत आहे. सेनेच्या आमदारांची फोडाफोडी केल्यास लोकांची सर्व सहानुभूती सेनेकडे जाते. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत उ.प्र. कितीही मदतीला आला (किंवा नाहि आला) तरी महाराष्ट्रातल्या खासदार संख्येचं महत्व कमि होत नाहि. इथे परत सेनाच कामाला येते. राज्य भाजपा लिडरशीप आणि स्वतः मुख्यमंत्री पवारकाकांच्या नादाला लागण्यास तयार नाहित. त्यांना सेनाच हाताशी हवी आहे. उधोजी कितीही वटवट करत असले तरी तो माणुस राजकारणात ममता-जयललीता इतका हडेलहप्पी नाहि. त्यांच्याशी एका विशिष्ट पद्धतीने वाटाघाटी करता येतात. मुख्य म्हणजे कट्टर भाजपा विरोधी लोकमत सावकाश पण निश्चीतपणे हात आणि घड्याळ सोडुन सेनेकडेच पर्याय म्हणुन बघायला लागतील.
या सर्व भांडवलावर सेना टिकुन राहिल, थोडीफार +/- होईल पण सेना संपणार वगैरे अजीबात नाहि. किंबहुना त्यांची गरज ओळखुन दादा-बाबा करत भाजपा त्यांच्याशी वेळप्रसंगी निभावुन न्यायला एक पाऊल स्वतः पुढे टाकेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
Fri, 05/20/2016 - 10:13
नवीन
सेना हे सगळं करु शकेल. पण करेल का हा प्रश्न आहे. सेनेत आता सध्या दोन सरळसरळ गट आहेत. एक, ज्याला सेनेने एखाद्या सत्तेत असलेल्या राजकीय पक्षाप्रमाणे नेमस्तपणे वागावं असं वाटतं आणि दुसरा म्हणजे ज्याला सत्ता ही अधिकृत गुंडगिरीसाठी आणि खळ्ळ खटॅक साठी हवी आहे. जोपर्यंत उधोजींपाशी या दुस-या गटाचं कडं आहे - तोपर्यंत सेना स्वतःचा विस्तार करणं कठीण आहे. हे लोक सेनेकडे स्वतःची राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचं एक साधन म्हणून बघताहेत.उद्या ते दुसरीकडेही जाऊ शकतील. हात आणि घड्याळ यांना पर्याय म्हणून उभं राहायला सेनेला पहिल्यांदा शांत राहणं आणि वेळप्रसंगी दूरगामी फायद्यांसाठी अपमान गिळणं शिकावं लागेल. ते त्यांना सध्या कितपत जमतं हे महाराष्ट्र विधानसभेच्या प्रचारात लोकांना दिसलं आहेच. युती तुटल्यावर ज्या भाषेत शिवसेनेने त्याचा निषेध केला ते पाहून अगदी कट्टर शिवसैनिकही हबकले होते. संजय राऊतांचे सामना मधले अग्रलेख वाचून confuse झालेले शिवसैनिक मी स्वतः पाहिलेले आहेत. त्यातल्या बहुसंख्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला मोदी लाटेमुळे जागा मिळाल्या आणि त्यामुळे भाजप विधानसभेत जास्त जागा मागणार यात काहीही चुकीचं वाटत नव्हतं. पण सेना नेतृत्वाने या समंजस लोकांचं न ऐकता स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आणि मराठवाडा आणि मुंबई अशा दोन ठिकाणी एम.आय.एम. ला चंचुप्रवेश करु दिला.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
Fri, 05/20/2016 - 19:01
नवीन
सेनेची हि मर्यादा आहेच. पुढे देखील त्यात फार ड्रास्टीक बदल होईल असं वाटत नाहि. पण स्वतः उधोजींना देखील त्याची जाणीव नक्कीच आहे. सेना महाराष्ट्राच्या राजकारणातुन हद्दपार होईल असं दिसत नाहि.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/21/2016 - 12:11
नवीन
एकदा किंवा अनेकदा सत्ता मिळविलेले अनेक प्रादेशिक पक्ष आज जवळपास संपल्यात जमा आहेत किंवा अत्यंत दयनीय अवस्थेत आहेत. गोव्यात मगोप पक्षाकडे अनेक वर्षे मुख्यमंत्रीपद होते, आता हा पक्ष जवळपास संपल्यात जमा आहे. कर्नाटकातील देवेगौडाचा पक्ष त्याच अवस्थेत आहे. आसाममध्ये १० वर्षे सत्ताधारी असलेला आसाम गण परीषद हा पक्ष आता भाजपचा दुय्यम भागीदार आहे. महाराष्ट्रात शेकाप कधीच सत्तेवर नव्हता. परंतु प्रत्येक निवडणुकीत शेकापला बर्यापैकी जागा मिळत असत (१९८५ मध्ये शेकापचे १२ आमदार होते). आज या पक्षाचे महाराष्ट्रातील अस्तित्व नगण्य आहे. या सर्वांचा र्हास होण्याचे मुख्य कारण म्हणजे ते काळानुसार बदलले नाहीत व त्यांनी स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याचा प्रयत्न केला नाही.
भाजपशी युती होण्यापूर्वी सेना महाराष्ट्रात नगण्य होती. जोपर्यंत भाजप बरोबर होता तोपर्यंत सेना माज करीत होती. २०१४ मध्ये भाजपने साथ सोडून स्वतःला बरेच मोठे केले. सेनेला हे सहन न झाल्यामुळे सेनेने अत्यंत नकारात्मक भूमिका घेतलेली आहे. शिवसेनेने एकतर विरोधी पक्षाची भूमिका घ्यायला हवी होती किंवा नंतर सत्तेत भागीदारी मिळाल्यावर सत्ताधार्यांप्रमाणे वागून हातात असलेल्या मंत्रीपदांचा फायदा घ्यायला हवा होता. ते न करता सेना सत्ताधारी पक्षात राहून विरोधाकरीता विरोध ही विचित्र भूमिका घेत आहे. सेना नेते रोज एका नवीन कारणावरून भाजप व मोदींवर हास्यास्पद स्वरूपाची टीका करतात. या विचित्र भूमिकेचा भविष्यात सेनेला तोटा होणार आहे. जर सध्याच्या सरकारचे काम चांगले झाले तर श्रेय भाजपला जाईल व जर सरकारने निराशा केली तर जनमत पुन्हा काँग्रेसकडे वळेल. काहीही झाले तरी सेनेला तोटाच आहे व सेनेचा र्हास नजीकच्याच भविष्यात दिसेल.
- Log in or register to post comments
ब
बोका-ए-आझम
गुरुवार, 05/19/2016 - 12:32
नवीन
या कारणावरून हे पक्ष एकत्र आले असतील तर पुढची ८ वर्षे त्यांची एकी राहिली पाहिजे. शिवाय विरोधाचा मुद्दा पाहिजे. २००४ मध्ये गोध्रा आणि इंडिया शायनिंग असे दोन मुद्दे घेऊन काँग्रेसने भाजपला पराभूत केलं होतं. आता हे मुद्दे उरलेले नाहीत. दुसरी गोष्ट एका राष्ट्रीय पक्षाविरुद्ध राष्ट्रीय मुद्द्यांवर लढायला राष्ट्रीय प्रतिमा असलेला नेता पाहिजे. नितीशकुमार विकास या मुद्द्याऐवजी राजद आणि जदयु यांच्यातली मतविभागणी टाळल्यामुळे जिंकले आहेत. जर विकास हा मुद्दा बिहारमध्ये एवढा महत्वाचा असता तर जदयुच्या राजदपेक्षा जास्त जागा आल्या असत्या. शिवाय केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाची सत्ता असणं (भाजप) हे कधीही विकासासाठी चांगलं असतं. पण तसा विचार बिहारमधल्या मतदारांनी केला नाही.
शिवाय या तिसऱ्या आघाडीत सध्यातरी उत्तर प्रदेशातील एकही मोठा पक्ष नाही. काँग्रेस उत्तर प्रदेशात नगण्य आहे. मायावती आणि नितीश एकत्र येणं कठीण आहे, कारण दोघेही पंतप्रधानपदासाठी उत्सुक आहेत आणि दोघांनाही राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवल्यावर दुय्यम स्थान स्वीकारणं कठीण जाईल. दोघांकडेही ते केंद्रात गेल्यावर राज्य संभाळू शकेल असा दुस-या फळीचा नेता नाही. शिवाय ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतानाही त्यांचं निम्मं लक्ष बंगालमध्ये असायचं - तसंच नितीश किंवा मायावती यांचं होणार.
शिवाय पुढचं कोणी पाहिलंय? लालूने आपले रंग दाखवले (आणि ते होणारच. चोर चोरीसे जाय, हेराफेरीसे न जाय) तर कदाचित जदयु आणि भाजप परत एकत्र येऊ शकतील. मायावती आणि नितीश एकत्र येण्यापेक्षा याची शक्यता जास्त आहे. मग सगळी समीकरणं बदलून जातील.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 14:36
नवीन
बुबुडाविपुमावि मोड ऑन--
बिहारमध्ये लालूजी आणि सुशासन बाबूंचा नेत्रदीपक विजय म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदींच्या जातीयवादी, फॅसिस्ट सरकारला धर्मनिरपेक्ष तत्वांनी दिलेली जोरदार चपराक होती. आणि शेवटी बिहारमध्ये निवडणुका नितीशकुमार यांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बनवून लढविल्या होत्या. स्वत: लालूजींने ते मान्यही केले होते.
बुबुडाविपुमावि मोड ऑफ
अर्थातच बोकोबांच्या या म्हणण्याला पूर्ण सहमती.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
Sat, 05/21/2016 - 11:58
नवीन
नितीशकुमार व इतर प्रादेशिक नेते (मुलायम, मायावती, ममता, जयललिता, नायडू, पटनाईक) यांच्यात खूप फरक आहे. इतर सर्व प्रादेशिक नेते आपापल्या राज्यात खूप बळकट आहेत. यातील प्रत्येकाने आपापल्या राज्यात किमान एकदा स्वबळावर संपूर्ण बहुमत मिळवून दाखविले आहे. नितीशकुमार आजवर दुसर्या पक्षांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. १९९६ ते २०१३ भाजपबरोबर व २०१५ पासून लालू व काँग्रेसबरोबर युती केल्याने ते सत्तेवर आहेत. त्यांनी फक्त एकदाच (२०१४ ची लोकसभा निवडणुक) स्वबळावर लढविली होती व त्यात त्यांच्या पक्षाला ४० पैकी फक्त २ जागा मिळाल्या होत्या. इतर पक्ष मदतीला नसतील तर त्यांचे काही चालू शकत नाही. त्यामुळे आपापल्या राज्यात प्रचंड जनाधार असलेले इतर प्रादेशिक नेते त्यांना आपला नेता कधीही मानणार नाहीत.
याबाबतीत नितीशकुमारांचे शरद पवारांशी साम्य आहे. शरद पवारांना महाराष्ट्राच्या काही भागातच पाठिंबा आहे. काही भागांचा अपवाद वगळता महाराष्ट्राने त्यांना आपला नेता कधीच मानले नाही. आपण राष्ट्रीय नेता आहोत व भविष्यातील तिसर्या आघाडीचा नेता आपणच अशी त्यांनी कितीही बतावणी केली तरी त्यांना महाराष्ट्रात किती कमी जनाधार आहे हे इतर सर्वजण जाणून आहेत. त्यामुळे पवार हे इतरांना नेता म्हणून कधीही मान्य होणार नाहीत.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 11:39
नवीन
निकालांचा भांडवली बाजारात नकारात्मक परीणाम झाला आहे. मुंबई भांडवल बाजाराचा निर्देशांक आज २७० अंकांनी म्हणजेच जवळपास १% ने उतरला आहे. डावे अजून पूर्ण नेस्तनाबूत झाले नाहीत हे यामागचे कारण असावे का?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 11:49
नवीन
वाटत नाही. जूनमध्ये अमेरिकन फेडच्या चेअरपर्सन जॅनेट येलन व्याजाचे दर वाढवतील ही शक्यता अधिक ठळक झाली आहे असे आजचे मार्केटमधले चित्र आहे. त्यामुळे बाजार आज खाली आहे.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 11:42
नवीन
तसे करण्यास घटनात्मक अडचण कुठलीच नाही. पण तसे करणे प्रशस्त होणार नाही. राष्ट्रपती या सर्वोच्च पदावर राहिलेल्या व्यक्तीने परत पक्षीय राजकारणात पडणे प्रशस्त होणार नाही. आजपर्यंत तसे कधीच झालेले नाही. दुसरे म्हणजे २०१७ मध्ये स्वत: प्रणव मुखर्जी जवळपास ८२ वर्षांचे होतील. म्हणजे ते ही फार तरूण आणि energetic असतील असे नाही. तिसरे म्हणजे प्रणव मुखर्जी अत्यंत कुशल प्रशासक असले तरी त्यांना लोकांमध्ये लोकप्रियता आहे असेही नाही. ते संसदीय राजकारणात अगदी १९७० पासून आहेत पण त्यांनी सर्वप्रथम लोकसभा निवडणुक लढवली २००४ मध्ये. राजीव गांधींनी मतभेद झाल्यानंतर त्यांची सुरवातीला मंत्रीपदावरून आणि १९८६ मध्ये कॉंग्रेस पक्षातून उचलबांगडी झाली. त्यावेळी त्यांनी स्वत:चा National Socialist Congress नावाचा पक्ष स्थापन केला होता. १९८७ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकाही या पक्षाने लढविल्या. आणि सगळ्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले हे वेगळे सांगायलाच नको.तेव्हा प्रणवदा परत पक्षीय राजकारणात सक्रीय झाले तरी त्याचा कितपत उपयोग होईल?
बाकी कॉंग्रेसमधल्या इतर कुठल्याच नेत्याला जनाधार नाही. त्यामुळे यापुढील काळात नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिल हे नक्कीच. इतकी वर्षे एकाच कुटुंबावर अवलंबून राहणे आणि प्रभावी दुसरी फळी निर्माण होऊ न देण्याचे परिणाम आहेत हे.
- Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२
गुरुवार, 05/19/2016 - 11:59
नवीन
कॉंग्रेज पक्षाला मत देणे तर सोडाच.
पण आजकाल कॉंग्रेज पक्षाच्या कोणत्याही नेत्याला नुसते पाहिल्यावर देखिल 'जोड्या'ने हाणावेसे वाटते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 12:08
नवीन
भाजपचे भैरवसिंह शेखावत २००२ ते २००७ या काळात उपराष्ट्रपती पदावर होते. २००७ मध्ये त्यांनी प्रतिभा पाटलांविरूद्ध राष्ट्रपतीपदाची निवडणुक लढविली. परंतु त्यात त्यांना अपयश आले. २००७ मध्ये उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी निवृत्तीचे जीवन जगणे अपेक्षित होते. परंतु रालोआने त्यांना जॉर्ज फर्नांडिसांच्या जागी रालोआचा कोऑर्डिनेटर म्हणून नेमले. रालोआतील घटक पक्षांशी सुसंवाद साधणे, समान कार्यक्रम बनविणे, एकत्रित निवडणुक लढविले इ. कामे आघाडीचा निमंत्रक या नात्याने करणे अपेक्षित होते. म्हणजे उपराष्ट्रपतीपदावरून निवृत्त झाल्यावर ते पुन्हा एकदा पक्षीय राजकारणात पडले होते.
त्यांचे काही कालानंतर निधन झाल्याने त्यांना फारसे काम करता आले नव्हते व नंतर त्यांच्या जागी शरद यादवांची नेमणूक झाली होती.
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 12:22
नवीन
नाही.
डिसेंबर २००८ मध्येच जॉर्ज फर्नांडिस आजारी असल्याच्या कारणामुळे त्यांच्या जागी शरद यादव यांची NDA Convenor म्हणून नियुक्ती झाली होती . मधल्या काळात भैरोसिंग शेखावत त्या पदावर नव्हते.
शेखावतांनी निवृत्तीनंतर पक्षीय राजकारणावर एकच वक्तव्य केले होते. २००९ मध्ये अडवाणी पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. खरे तर वाजपेयी, अडवाणी आणि शेखावत (आणि १९७३ पर्यंत बलराज मधोक) हे अगदी वरीष्ठ फळीतले नेते होते. अशावेळी आपणही पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतो असे शेखावत २००९ च्या निवडणुकांपूर्वी म्हणाले होते.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 05/19/2016 - 12:30
नवीन
माहिती पुन्हा एकदा चेक करतो. शेखावतांना रालोआचा संयोजक म्हणून नेमण्याचे वृत्त वृत्तपत्रात वाचले होते. त्याची लिंक शोधतो.
- Log in or register to post comments
च
चौकटराजा
गुरुवार, 05/19/2016 - 12:12
नवीन
दलितामधे एकी नसल्याने त्यात काशीराम मायवती पासून दलितांची तर मुलायम पासून मुस्लिमांची गळती कॉन्ग्रेस मधून होउ लागली आता तर एम आय एम आली व भाजपने भटजी व शेटजी इमेज बर्यापैकी पुसल्याने हे चित्र असे दिसत आहे. पण शिवसेना, द्रमुक, त्रुणमूल असे प्रादेशिक पक्ष निर्माण होणे फारसे बरे नाही. आता गांधी घराण्याची इतकी
चटक कॉन्ग्रेस ला लागली आहे की ती सुटणे अशक्य सबब त्यांचा नाश अटळ. बाकी मोदी विरूद्ध नीतिशकुमार ? काय राव चेष्टा करता की काय ...? मोदी शंभर अपराध करण्याचे पातक करतील असे वाटत नाही.
- Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी
गुरुवार, 05/19/2016 - 14:25
नवीन
क्लिंटन भाउ तुम्हि बरोबर बोललात....हे बघा आयबिएन ला काय बातमि आहे.
"प्रादेशिक पक्षांच्या या यशामुळे आता तिसर्या आघाडीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. बिहार हा आमचा शेजारी आहे असं सांगत ममतादीदींनी तसं बोलूनही दाखवलंय. त्यामुळे भव्यिष्यात तिसरी आघाडी उदयास आली तर राजकारणात हा एक नवा आध्याय असेल."
मला तरी वाटतय कि आता काँग्रेस पक्षाने गांधि परिवाराला थोडे बाजुला सारून पक्षबांधणि करावि. असल्या तिसर्या - चौथ्या आघाड्यांपेक्षा आणि नौटंकि युगपुरुषांपे़क्षा मजबुत काँग्रेस कधिहि चांगलि. पण हे वाटणे झाले आता युवराजांनि महात्माजींच स्वप्न तेच ते काँग्रेस विसर्जित करण्याचे इतके मनावर घेतले असेल तर आपण वाटुन तरि काय करु शकतो.
कन्हैय्या और उसके चाहने वाले कहा है ?
- Log in or register to post comments
ग
गॅरी ट्रुमन
गुरुवार, 05/19/2016 - 15:11
नवीन
असे किती नवे अध्याय भारताच्या इतिहासात झाले याची टाईमलाईन रोचक आहे.
१९४८ -- जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र देव यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून समाजवादी पक्ष स्थापन केला.
१९५१-- पहिल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी आचार्य कृपलानींनी काँग्रेसमधून बाहेर पडून किसान मजदूर प्रजा पक्ष या आपल्या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली.
१९५२-- पहिल्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पक्ष आणि आचार्य कृपलानी यांच्या किसान मजदूर प्रजा पक्ष यांचे विलीनीकरण होऊन प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना
१९५५-- प्रजा समाजवादी पक्षातून राम मनोहर लोहिया बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा समाजवादी पक्ष स्थापन केला
१९६४--प्रजा समाजवादी पक्षातून जॉर्ज फर्नांडिस बाहेर पडले आणि संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना
१९६७--चरणसिंग कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा भारतीय क्रांती दल हा पक्ष स्थापन केला
१९६९--बिजू पटनाईक कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा उत्कल कॉंग्रेस पक्ष स्थापन केला
१९६९--कॉंग्रेस पक्षात फूट. इंदिरा गांधींचा गट आणि मोरारजी देसाईंचा कॉंग्रेस (संघटना) असे दोन पक्ष झाले.
१९७२--प्रजा समाजवादी पक्ष आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांचे विलीनीकरण होऊन परत एकदा समाजवादी पक्ष या नावाने पुनर्जन्म
१९७४--चरणसिंगांचा भारतीय क्रांती दल, बिजू पटनाईकांचा उत्कल कॉंग्रेस, १९७२ मध्ये प्रजा आणि संयुक्त समाजवादी पक्ष यांच्या विलीनीकरणातून पुनर्जन्म झालेला समाजवादी पक्ष, राजाजींच्या निधनानंतर उतरणीला लागलेला स्वतंत्र पक्ष, भारतीय जनसंघातून हकालपट्टी झाल्यानंतर बलराज मधोक यांनी स्थापन केलेला पक्ष (नाव नक्की लक्षात नाही) आणि अन्य एक-दोन लहान पक्ष यांचे विलीनीकरण होऊन भारतीय लोकदल हा पक्ष स्थापन झाला
१९७७ -- जगजीवन राम, हेमवतीनंदन बहुगुणा, नंदिनी सत्पथी, नारायणदत्त तिवारी कॉंग्रेसबाहेर पडले आणि त्यांच्या कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी या पक्षाची स्थापना. त्यांचा कॉंग्रेस फॉर डेमॉक्रसी, १९६९ च्या फुटीतील इंदिराविरोधी गट-- संघटना कॉंग्रेस (कॉंग्रेस-ओ), चरणसिंगांचा भारतीय लोकदल आणि भारतीय जनसंघ या पक्षांनी विलीन होऊन त्यातून जनता पक्ष स्थापन झाला.
१९७८ --- शरद पवार, वायलार रवी, के.पी.उन्नीकृष्णन आणि अंबिका सोनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी समाजवादी कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.
१९७९-- जनता पक्षातून चरणसिंग, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये इत्यादी बाहेर पडले आणि त्यांचा जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) हा पक्ष स्थापन झाला.
१९८० -- जनता पक्षातून पूर्वाश्रमीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांची हकालपट्टी. त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. चरणसिंग यांनी जनता पक्ष (धर्मनिरपेक्ष) सोडून भारतीय लोकदल पक्षाची पुनर्स्थापना केली. जगजीवनराम यांनी जनता पक्षातून बाहेर पडून कॉंग्रेस (जे) या पक्षाची स्थापना केली.
१९८७-- कॉंग्रेसमधून हकालपट्टी झाल्यावर वि.प्र.सिंगांनी जनमोर्चा या गटाची स्थापना केली. शरद पवार, वायलार रवी आणि अंबिका सोनी समाजवादी कॉंग्रेस सोडून कॉंग्रेस पक्षात परतल्या. समाजवादी कॉंग्रेसमध्ये केवळ के.पी.उन्नीकृष्णन राहिले.
१९८८-- चरणसिंगांचा (आणि त्यांचे निधन झाल्यानंतर अजित सिंगांचा) भारतीय लोकदल, के.पी. उन्नीकृष्णन यांचा समाजवादी कॉंग्रेस आणि वि.प्र.सिंगांचा जनमोर्चा या तीन पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल हा पक्ष स्थापन झाला.
१९९०-- चंद्रशेखर आणि देवीलाल जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:च्या समाजवादी जनता दलाची स्थापना केली. मुलायमसिंग यादव, चिमणभाई पटेल हे सुध्दा समाजवादी जनता दलात सामील झाले. राजस्थानात दिग्विजय सिंग (कॉंग्रेसमधील वाचाळवीर दिग्विजयसिंग आणि हे वेगळे) जनता दलातून बाहेर पडले आणि त्यांनी स्वत:चा वेगळा गट स्थापन केला. त्यांनी राजस्थानचे भाजपचे मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत यांच्या मंत्रीमंडळात मंत्रीपदही पटकावले.
१९९१-- कॉंग्रेसचे चंद्रशेखर यांच्या समाजवादी जनता दलाशी फाटल्यावर गुजरातचे मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांनी समाजवादी जनता दलातून बाहेर पडून जनता दल (गुजरात) या पक्षाची स्थापना केली. कॉंग्रेसच्या पाठिंब्यावर चिमणभाई पटेल मुख्यमंत्रीपदी कायम राहिले.
१९९२-- जनता दल (गुजरात) पक्ष कॉंग्रेस पक्षात विलीन झाला. अजित सिंग यांनी जनता दलातून बाहेर पडून स्वत:चा जनता दल (अजित) या पक्षाची स्थापना केली. मुलायमसिंग यादव यांनी समाजवादी जनत दलातून बाहेर पडून स्वत:च्या समाजवादी पक्षाची स्थापना केली.
१९९३-- उत्तर प्रदेशातील महत्वाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनता दल, जनता दल (अजित) आणि समाजवादी जनता दल या तीन पक्षांनी एकत्र येऊन एकाच पक्षाची स्थापना करायची घोषणा केली. पण उत्तर प्रदेशात पराभव झाल्यानंतर प्रत्यक्ष विलीनीकरण झालेच नाही. त्यानंतर जनता दल (अजित) पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन झाला आणि नरसिंह राव सरकारमध्ये अजितसिंग मंत्री झाले.
१९९४-- जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार आणि रबी रे यांनी जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली.
१९९५--हरियाणात देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समाजवादी जनता दल सोडून समता पक्षात प्रवेश केला.
१९९६-- चंद्रशेखर १९९६ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये समता पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले. देवेगौडा पंतप्रधान झाल्यानंतर जनता दलातून रामकृष्ण हेगडेंची हकालपट्टी. त्यांनी स्वत:चा लोकशक्ती हा पक्ष काढला. हरियाणात देवीलाल आणि ओमप्रकाश चौटाला यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा हरियाणा लोक दल (राष्ट्रीय) हा पक्ष स्थापन केला.
१९९७-- लालू यादव यांनी जनता दलातून बाहेर पडून स्वत:च्या राष्ट्रीय जनता दलाची स्थापना केली. अकरावी लोकसभा बरखास्त झाल्यानंतर चंद्रशेखर यांनी समता पक्षातून बाहेर पडून स्वत:चा समाजवादी जनता पक्ष (राष्ट्रीय) या पक्षाची स्थापना केली. तसेच ओरिसामध्ये नवीन पटनायक आणि दिलीप रे यांनी जनता दलातून बाहेर पडून बिजू जनता दल या वेगळ्या पक्षाची स्थापना केली.
१९९९-- उरल्यासुरल्या जनता दलाचे आणखी दोन तुकडे पडले-- जनता दल (संयुक्त) आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष). देवेगौडा जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षात गेले तर रामविलास पासवान जनता दल (संयुक्त) पक्षात गेले. जॉर्ज फर्नांडिस-नितीशकुमारचा समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडेंचा लोकशक्ती हे पक्ष जनता दल (संयुक्त) पक्षात विलीन झाले.
२००२-- रामविलास पासवानांनी जनता दल (संयुक्त) पक्ष सोडून स्वत:चा लोकजनशक्ती या पक्षाची स्थापना केली.
२०१४-- मोदीलाटेत वाहून गेल्यानंतर सर्व जनता दलांनी एकत्र यायची गोष्ट सुरू झाली.
२०१५-- प्रस्तावित एकीकरणास मुलायमसिंग यादव यांनी मोडता घातला.
माझी खात्री आहे की यापैकी मधल्या अनेक पायर्या मी विसरलेलो आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात असे किती नवे अध्याय लिहिले गेले आणि जनता दल, जनता पक्ष या नावाचे किती वेगवेगळे पक्ष स्थापन झाले याची गणतीच नाही.
- Log in or register to post comments
व
विकास
गुरुवार, 05/19/2016 - 16:31
नवीन
चार ओंडक्यांची होते निवडणुकीत भेट
एक लाट तोडी, तरीही बांधतात मोट.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »