Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

ब्राह्मण समाजाने आता आरक्षणाची मागणी करावी!!!!!

च
चंद्रनील मुल्हेरकर
गुरुवार, 05/19/2016 - 13:59
🗣 95 प्रतिसाद
सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे. ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल. ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे... १.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे २. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा. ३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी. ४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.

प्रतिक्रिया द्या
33501 वाचन

💬 प्रतिसाद (95)
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/20/2016 - 12:52 नवीन
आपण सनदी लेखापाल आहात का हो! "Statistics are deceiving" हे आपण अतिशय भारी आकड़ेमोड़ करुन दाखवले! आवडली ही स्टाइल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
आ
आदूबाळ Fri, 05/20/2016 - 14:42 नवीन
होतो एकेकाळी. आता नाही ;) डिसीव्हिंग करायचा हेतू नव्हता. मुद्दा वर लिहिलाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/20/2016 - 17:49 नवीन
पॉइंट वेल टेकन सर!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
ब
बोका-ए-आझम Sun, 05/22/2016 - 09:34 नवीन
C.A. आहातच ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ
प
प्रसाद गोडबोले Fri, 05/20/2016 - 09:28 नवीन
ब्राह्मणांना ऑलरेडी एक प्रकारचे आर्थिक आरक्षण आहेच ! "ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता , त्यात मांडलेली मते कितीही कटु वाटली तरी खरी आहेत हे पटायला लागले आहे . सत्यनारायणसारखी , धर्माच्या कोणत्याही ज्ञानकांडांचा , उपनिषदे, वेद , वेदांत, गीता ह्यातील कशाचाही तिळमात्र स्पर्षही नसलेली पुजा ही ढ ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजनाच आहे ! आणि हे एक प्रकारचे आरक्षण आहेच , तेही जवळपास हिंदुधर्माच्या अंत्काळापर्यंत टिकेल असे ! आणि माझ्या मते इतके आरक्षण पुरेसे आहे ब्राह्मण समाजाला!
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/20/2016 - 10:24 नवीन
चोर-दरोडेखोर्/गुंड्/भाईगीरी यापेक्शा तरी पौरोहित्य चांग्लेच आहे की...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
स
सूड Fri, 05/20/2016 - 13:21 नवीन
टक्या आमच्या घरात एक मृत्यु झाल्यानंतर उदकशांतीनंतर, विनायकशांत, आणखी कसली तरी शांत अशा एकूण तीन-चार शांत्या करायला सांगितल्या होत्या एका गुर्जींनी. २००७ साली या सर्वाचा मिळून साधारण १०००० खर्च सांगितला होता. शेवटी उदकशांत करुन गप बसायला लावलं होतं मी!! तरीही ते गुर्जी कधी कोणत्या कारणाने भेटले की जुनं तुणतुणं वाजवत असत. थोडक्यात काय आपण आपलं डोकं चालवलं नाहीत तर एक प्रकारचा दरोडाच तो!! फक्त चितळ्यांच्या साजूक तुपात घोळून नंतर प्रसाद नामक शिरा हातावर ठेवणारा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा
S
sagarpdy Fri, 05/20/2016 - 14:59 नवीन
डोकं चालवलं नाही तर सर्विस सेंटरवाला पण प्रत्येक सर्विसिंग ला ओईल चेंज करायला सांगतो, एअर फिल्टर बदलायला लावतो. सायकल वाला पण छोट्या फ्रेम ची, स्प्रिंग असलेली सायकल गळ्यात मारतो. डॉक्टर दर महिन्याला हजार टेस्ट आणि नाही-नाही ती ऑपरेशन करायला लावतो, गोळ्या खाऊ घालतो सर्विस कंपन्या काही अक्कल नसताना प्रोजेक्ट करू अशी हमी देतात (नंतर एस्केलेशन होतात) बऱ्याच लोकांच्या मते चहावाल्याने तर शिरा पण नाही दिला हाती. प्रत्येक माणूस टपलाय गंडवायला. पण दरोडा ? मार्केटिंग म्हणतात याला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 05/20/2016 - 15:04 नवीन
पण मला दरोडाच म्हणायचंय!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
स
स्पा Fri, 05/20/2016 - 15:27 नवीन
सुड राव तुमच्या कडे कोणी आमंत्रण घेउन आले नव्हते कसली जबरदस्ती नवहती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड
स
सूड Fri, 05/20/2016 - 16:18 नवीन
11100000 10100100 10010011 11100000 10100100 10111001 00100000 11100000 10100100 10000110 11100000 10100100 10101111 00100000 11100000 10100100 10111000 11100000 10100101 10000000
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
इ
इरसाल Fri, 05/20/2016 - 11:34 नवीन
हा मोठठा काडा होता/आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
र
रमेश भिडे Fri, 05/20/2016 - 12:29 नवीन
सगळ्यांना नाही जमत हो पूजा सांगायला येत. आणि लोक येतात श्रद्धेने. कोणी मलाच बोलवा म्हणत नाही. बाकी असोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
भ
भाते Fri, 05/20/2016 - 13:16 नवीन
फक्त ढ मुलंच पौराहित्य करतात हे कुठे लिहिले आहे? गणपती उत्सवादरम्यान वर्तमानपत्रात अनेक वेळा बातम्या येतात. एरवी वर्षभर गळयाला टाय लाऊन एसी ऑफिसमध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या हुद्दयावर आणि चांगल्या पगाराची नोकरी करणारे सुध्दा गणपती उत्सवादरम्यान मुद्दामुन दहा दिवस सुट्टी घेऊन धोतर आणि झब्बा घालुन केवळ आवड म्हणुन गणपतीची पूजा सांगतात. सत्यनारायणाची किंवा इतर पूजा सांगणे हे कोणालाही सहज जमण्यासारखे काम नक्कीच नाही आहे. इतर काही जमत नाही म्हणुन करा पौराहित्य, इतके ते नक्कीच सोपे नाही आहे. शिवाय फक्त ब्राम्हण समाजानेच पौराहित्य केले पाहिजे असे नाही. आजकाल अनेक देवळांमध्ये अब्राह्मण लोक पुजारी असल्याचे सर्रास बघायला / वाचायला मिळते. आता पौराहित्यामध्ये पुर्वीसारखी ब्राम्हण लोकांची मक्तेदारी राहिली नाही आहे. पौराहित्य म्हणजे ब्राह्मणांसाठीची रोजगार हमी योजना हा उल्लेख खटकणारा आहे. ब्राम्हणांना कधी आरक्षणाच्या कुबड्यांची गरज लागली नाही आणि यापुढेही लागणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
व
विटेकर Fri, 05/20/2016 - 14:20 नवीन
शत प्रतिशत सहमत ! नेमकी पोट्दुखी काय आहे हे केव्हाच लक्षात आले आहे , आडून आडून लिहिले तरी विखारी द्वेष बाहेर पडतोच पडतो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भाते
ग
गणामास्तर Fri, 05/20/2016 - 13:44 नवीन
ब्राह्मणांची ढ पोरं काय करतात" नावाचा एक अप्रतिम लेख वाचनात आला होता , अनिता पाटलांच्या ब्लॉगवर वाचला होता बहुतेक मी हा लेख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले
S
sagarpdy Fri, 05/20/2016 - 13:56 नवीन
सापडला. खरच अप्रतिम (काडा).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर
स
सूड Fri, 05/20/2016 - 14:33 नवीन
हो, पण पेटेना!! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy
ख
खटासि खट Fri, 05/20/2016 - 10:20 नवीन
बाजीराव रस्त्यात सिंघल लागल्यास काय करावे?
  • Log in or register to post comments
अ
अनिरुद्ध प्रभू Fri, 05/20/2016 - 12:22 नवीन
श्री. चंद्रनील मुल्हेरकर साहेब, आपण इथे आहात? मि आपली वाट "त्या" धाग्यावर बघतोय... (अजुनहि प्रतिक्षेत असलेला) अनिरुद्ध
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/20/2016 - 14:34 नवीन
Access denied.... :( आता नै येणार, धाग्यावर त्यांचं काम झालं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू
न
नाखु Sat, 05/21/2016 - 05:42 नवीन
कारवाई झाली, यावेळेला "पाठींबा+वरदहस्त" कमी पडला असावा. असो अजून इतर अवतार असतील्च, वरतीच एक दोन जणांनी प्रमाण दिले आहे. आणि ते खरे(पक्षी वास्तव) असेल त्यांचा हेतु उघड आहे विद्वेषाचे वातावरण तयार करणे, धाग्यात ओढून ताणून ब्राह्मण आणणे आणि मग नेहमीचीच मंडळी गोळा करून दुस्र्याच्या दु:खद आणि जीव्घेण्या प्रसंगालाही कल्पनाविलास असे हिणवणे. एकच शेवटचा प्रश्न मिपा अस्सल विचारवंताना आणि उच्चाभ्रूंनाही (आणि त्या दिवशी खफवर असणार्या धुरीणांनाही)

"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"

रोख ठोक आणि तरी मिपावर मनापासून प्रेम असलेला नाखु. ता.क. आम्ही मिपा सोडून इतर कोठेही नाहीत आणि नसूही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 05:48 नवीन
इंग्रजीत एक म्हण आहे, "बेटर लेट दॅन नेव्हर." (मिपावर मनापासून प्रेम असलेला) मुवि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु
स
सुखीमाणूस Fri, 05/20/2016 - 15:41 नवीन
चांगला प्रयत्न. आधीच मेलेल्याला अजून किती मारणार? आम्ही म्हणतो फेडू देत पुर्वजांची पापे आम्हाला. संशई मन--- भडकवण्यचा प्रयत्न की काय? जपून रे बाबा सगलेजण एक गरीब ब्राम्हन स्त्री
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरसर्वसाक्षी Fri, 05/20/2016 - 16:09 नवीन
सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन स्त्री अच्छा बाई मानुस हाय होय....आता ग बया !
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 05/20/2016 - 17:14 नवीन
सुखीबाईमानूस असे नाव असायला पाहीजे :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरसर्वसाक्षी
न
नाईकांचा बहिर्जी Fri, 05/20/2016 - 17:48 नवीन
सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं फूल किंवा नागमण्याइतकं मिथकीय अन दुर्लभ दृश्य आहे इतके म्हणतो. बाकी चालु देत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या
झ
झेन Sat, 05/21/2016 - 06:54 नवीन
सुखी बाईमाणुस = oximoron
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाईकांचा बहिर्जी
ट
टवाळ कार्टा Sat, 05/21/2016 - 08:33 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 05/21/2016 - 09:55 नवीन
तुमचं सगळ्यांच झाल असेल तर कोणी मला सांगेल का की, "सैराट" रिलीज झाला का ? ;)
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sat, 05/21/2016 - 13:16 नवीन
कारण, एक ४-५ धागे येवून गेले. पण असे कितीही सैराट आले तरी, माणूस आपापले धोतर आणि साडीच सांभाळत बसणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ख
खटपट्या Sun, 05/22/2016 - 04:57 नवीन
ओ ४/५ नाय !! चांगले १३/१४ धागे येउन गेले हां !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
प
प्रकाश घाटपांडे Sat, 05/21/2016 - 10:16 नवीन
चला नवे विधेयक मांडा आता संसदेत. जात्यांतर हक्क विधेयक. धर्मांतर करायचा हक्क आहे पण जात्यांतर नाही. हा काय चावटपणा आहे? अहो हल्ली तर म्हणे लिंग देखील बदलता येते. चला पटापट जाती बदलून घ्या. जात न मानणार्‍यांची पण एक अजात करुन टाका. त्यात पण प्रवेश घेता आला पाहिजे.
  • Log in or register to post comments
ए
एस Mon, 05/23/2016 - 15:22 नवीन
शेवटच्या दोन वाक्यांबद्दल : बर्‍याच वर्षांपूर्वी एक लेख वाचनात आला होता. एका कुठल्याशा गावातले सर्व लोक एकत्र आले आणि त्यांनी स्वतःच्या जातीचा त्याग केला. तर पुढे स्वातंत्र्य मिळाल्यावर सरकारी यंत्रणेने या सगळ्यांना 'अजात' नावाच्या एका नवीन जातीत ढकलून दिले. आता काय करावे अशांना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
अ
अत्रुप्त आत्मा Sat, 05/21/2016 - 13:39 नवीन
टनाटनी धर्माच्या कपट काव्यामुऴे विशिष्ट हक्क उपभोगलेल्यालेल्या आपणांना आ'रक्षण मिऴणार नाही!
  • Log in or register to post comments
र
रमेश भिडे Sat, 05/21/2016 - 16:56 नवीन
अरे किती लेले???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा
प
पुतळाचैतन्याचा Sat, 05/21/2016 - 15:48 नवीन
आरक्षणाची आंदोलना करून वेळ घालवण्या पेक्षा कष्ट करून कोरडी भाकरी चटणी मिळाली तरी चालेल....कष्ट आणि क्षमता यात वाढ करण्या पेक्षा दुर्दैवाने आपण राजकीय लाभ मागत बसलो आहोत....जग कुठे चाललंय, आपण काय मागणी करतोय...त्याही पेक्षा ब्राह्मण समाजाने घरातील संस्कार न विसरता खाली मान घालून काम केले तर कसल्याही आरक्षणाची, चाटूगिरीची गरज नाही...आरक्षण घेतले कि वोट बँक तयार होते आणि कोणाला तरी मिंधे होऊन टोळी युद्धात सामील व्हावे लागते...चुलीत गेल आरक्षण...हे म्हणजे स्वस्थ माणसाने उगीच अपंगाची गाडी वापरण्या सारखे आहे...सरळ मर्सिडीज घ्यावी आणि सुटावे ना भररर ....आणि ब्राह्मण समाज पिछाडीवर जाईल वगेरे शक्यता नाही....जगात एवढ्या संधी असताना जर आपण त्याचा उपयोग नाही करू शकलो तर पिछाडीला जाणारच...आरक्षण असो व नसो...आज गुजराती, मारवाडी अथवा पंजाबी हे संपूर्ण लोक संख्येच्या ३-४ टक्के आहेत...त्यांना अशी भीती वाटत नसावी...कोणी संधी नाकारल्याने कोणी संपत नसते...
  • Log in or register to post comments
ज
जेपी Sun, 05/22/2016 - 08:19 नवीन
मटणाचा भाव काय चालु आहे ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Sun, 05/22/2016 - 08:46 नवीन
४४०रु. किलो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
इ
इरसाल Mon, 05/23/2016 - 15:08 नवीन
खान्देशात ३४० रु आणी गुजरातमधे ३०० रु. किलो आहे. या लवकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
ज
जेपी Mon, 05/23/2016 - 15:28 नवीन
मागच्या टायमाला 360 रु किलो होत. मटण महाग झाल्याच्या चिडचीडीत असे धागे येतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 05/23/2016 - 15:34 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी
ब
बोलघेवडा Sun, 05/22/2016 - 08:47 नवीन
नयनी झणझणीत अंजन घातल्याबद्दल धन्यवाद!!! हमेरीकेसाठी लगोलग ब्यागा भरावयास घेतल्या आहेत. तिथे पुढील २००-५०० वर्षे तरी काळजी नसावी. २००-५०० वर्षानंतर मग तिथेही केवळ आम्हीच पुढे कसे काय? असा प्रश्न आला तर मग मात्र मंगळ किंवा बुधावरच वस्तीस जावे लागेल. असो!! तेव्हाही तुमचे असे कळकळीचे मार्गदर्शनपर सल्ले येतील हि मनातून खात्री आहेच.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Sun, 05/22/2016 - 09:14 नवीन
बोलघेवडा, वाचतांना 'बुधवारच वस्तीस' असे वाचले. बुध आणि बुधवारवस्ती दोन्ही पराकोटीच्या उष्ण आहेत असे ऐकिवात आहे. त्यामुळे गोंधळ झाला असावा. ;-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
ख
खालीमुंडी पाताळधुंडी Mon, 05/23/2016 - 15:31 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा